मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठ... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

शुष्क धरेवर शुभ्र घनासह पाय रोवले ज्येष्ठाने

कपाशीपरी मेघ भासती, की पंख पसरले हंसाने

 *

वसंत सरला, ग्रीष्म भडकला, आग पेटली चोहीकडे

गुलमोहर हा उतू चालला केशरमिश्रित पडती सडे

 *

दिवस लांबले, पवन थांबला, पानोपानी रंग बदलले

सर हलकिशी यावीम्हणुनीआसुसले हे डोळे

 *

कुटुंबवत्सल कुठे पक्षिणी घरट्यातून विसावे

मातीमधुनी क्वचित कोठे मृगकीटक खुणावे

 *

ज्येष्ठ तपस्वी ऋषी मुनींसम या धवल मेघमाला

श्यामवर्ण मेघांचा होईल, सुखवी जो बळीराजाला

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९४ – नको देऊ मजला…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९४ – विजय साहित्य ?

☆ नको देऊ मजला…!

(अक्षरछंद , १२ अक्षरी)

नको देऊ मजला,पेरुची फोड

पिंजऱ्याच्या बाहेर,मला तू सोड…||धृ.||

* 

उडे स्वच्छंदी थवा,एक विचारी

उडती हिरवळ, उंच भरारी

शिरले अलगद, संशय वारे

मिठू मिठू पोपट,झालो विजोड

नको देऊ मजला…   ||||

काच कवडश्यांनी,केली शिकार

सगे सोयरे तेव्हा, झाले पसार

मोह लालसा नडे,चुकली वारी

झगमग पिंजरा,वाटला गोड

नको देऊ मजला…   |||| 

आभासी दुनियेचा,नको पसारा

पिंजरा कनकाचा, तुरूंग प्यारा

काढीत आठवण, झुरे एकटा

किती पुरवशील,फाजील कोड

नको देऊ मजला…   |||| 

 *

शोधत फिरतील, आई नी बाबा

मनावर राहिला, नाहीच ताबा

विसरत चाललो, घरपण मी

पुरतीच जिरली, स्वभाव खोड..

नको देऊ मजला…   ||||

 *

उसने अलगूज,पाळीव पक्षी,

करी पोपटपंची ,कदान्न भक्षी

‌हा सजीव बाहुला,दावीवाकुल्या

विनवीतो तुजला,कवाड तोड

नको देऊ मजला…   ||||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वर्ग स्वातंत्र्याचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वर्ग स्वातंत्र्याचा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(“Where the head is held high” ह्या रवींद्रनाथांच्या कवितेचा भावानुवाद)

गगन निरामय निर्भयतेचे

जिथे न कसले बंधन ज्ञाना

स्वत्व रक्षितो जो तो जेथे

जसे जपावे अपुल्या प्राणा

*

जिथे न खंडित मानवताही

मतभेदाच्या क्षुद्र तटांनी

मंदिर जेथे पूर्णत्वाचे

घडे अहर्निश अथक करांनी

*

जीर्ण रुढींच्या, परंपरांच्या

तप्त रणाची झळ सोसुनही

तर्कबुद्धिचा निर्झर झुळझुळ

जिथे मुळीही सुकला नाही

*

ओढ विचारा अन् आचारा

उदात्ततेची, सत्यशिवाची

दिव्य प्रेरणा जेथ यात्रिका

मिळे निरंतर परमेशाची

*

सकल बंधने गळुन पडू दे

काळोखाचा विझु दे कणकण

स्वर्ग अवतरो स्वातंत्र्याचा

माझ्या देशी, हे करुणाघन !

 

(माझ्या ‘ऐलपैल’ या काव्यसंग्रहातून)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नभाळी होऊन फुलते… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नभाळी होऊन फुलते… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

शरद ऋतूची चाहूल लागे 

निळवंती मम काया

डोंगररांगा नीलम झाल्या 

मम रंगाची माया

*

गुच्छ साजरे निळे जांभळे 

वरती केशरी टिकली 

आकाशाला म्हणते हासुनी

तव् कांती मी जपली

*

निलवंती अंगावर माझ्या 

चिमणा रवीकर हसतो

रूपडे त्याचे कुशीत माझ्या

केशर गोंडा दिसतो

*

झिरमिर झिरमिर काया माझी

मला बेचका म्हणती

आभाळासम कांती माझी

आभाळी म्हणुनी गणती

*

शरदाच्या चांदण्यास हेवा 

उतरून आले खाली

पाणमोती होऊन दिवाणे

मम अंगाशी पिंगा घाली

*

सह्याद्रीच्या अंगांगावर 

नभाळी होऊन फुलते

कास पठारी फुलात साऱ्या 

निळवंती मी झुलते

*

श्रावण देतो मला निळाई

शरदाची मी चांदण टिकली

हरितपर्णी मी निळी जांभळी

निलम रंगावली सुंदर जपली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ त्याचा प्रकाशाचा हात…. ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? त्याचा प्रकाशाचा हात ? डॉ. माधुरी जोशी 

कधी असतो तो आकाशी

पण काळोखात जगतो

कुणी प्रचंड मेघ काळा

अस्ताव्यस्त पसरतो

 

पण सूर्यच आहे ना तो?

तो कसा असा हारेल 

त्या काळ्याच्या किनारी

चंदेरी तो चमकेल 

 

पण असे क्वचितच घडते

सडासारवण नित्य 

तो आला आला रे क्षितीजी

हे एकच रोज सत्य

 

मग कधी गुलाबी 

कधी केशरी

कधी सोन्याचा कलश

सांडत राहतो त्या वाटेवर 

 

पण हा खेळ निमिष

जरा जरा वर येताना तो

लख्ख पांढरा होतो

अन् सृष्टीचा कानाकोपरा.. उजेडी न्हाऊन निघतो 

 

कुठलाही ऋतू.. कुठलाही दिन

 मीच “पूर्व “तो म्हणतो

आणि संध्याकाळी आपला 

तेज पसारा आवरतो

 

जिथे असेल अंधार दाट

करण्या तिथे पहाट

घेऊन जातो तिथे आपला

प्रकाशाचा हात …

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१४ ☆ वटवृक्ष… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१४ ?

☆ वटवृक्ष ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

वडील गेल्यानंतर… 

थोड्याच दिवसात गावातला,

 खूप पुरातन वटवृक्ष कोसळला…

पावसाळ्यात!

त्या वटवृक्षावरची असंख्य पाखरं ,

कुठं गेली असतील?

त्यांनी  कुठे बांधली असतील

नवी घरटी ?

त्या मुसळधार पावसात!

 

झाड कोसळलं की,

पक्षी होतात बेघर…आणि माणसं,

हरवतात त्यांचा पावसा पाण्यातला,

निवारा आणि उन्हातली सावली !

 

 लहानपणी आजी सांगायची गोष्ट,

साळीतली साळूबाई,

निंबाखालचा निंबोजी,

अंब्या खालचा अंबोजी….

पूर्ण गोष्ट आठवत नाही,

पण साळीच्या शेतात,

निंबाच्या झाडाखाली,

अंब्याच्या झाडाखाली…..

मुलं सापडायची की जन्मायची?

हे कळत नव्हतं तेव्हा…बालबुद्धीला,

 आयुष्याच्या संध्याकाळी

जाणवतंय—

जुनी झाडं पडली ,

तरी उगवतात नवी झाडं,

आपसूकच!

झाडं बापच असतात आपले!

म्हणूनच बापावरही सांगू नयेत अधिकार!

दोघांना सोसावेच लागतात,

बहर….फुलाफळांचे…आणि पानगळीचे शापही !

आयुष्यात एक तरी झाड लावावं!

बापाची आठवण म्हणून…..

आणि

पुढच्या अनंत पिढ्यांसाठी बनून रहावं…..

 

बापझाड!

 

आधार वड !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

नि:संग हो मना

करूनी साधना।।

 

संग तो विषयांचा

संग तो अशाश्वताचा

शाश्ववताचा लळा

लाव रे मना…

नि:संग…

 

सांडी रे मोह-माया

नश्वर देह ही काया

नाम जप जपाया

गोडी लावी ये मना..

नि:संग…

 

हे चपल मना

जरा शांत बस ना

मर्कट लिला थांबवं ना

तुज मुळे फे-यात अडकेल ना..

नि:संग…

 

बघ ना मना

तुझिया नामातच

सार आहे कलीयुगेचे

उद्धरण्या जना..

नि:संग…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२७ ☆ घरात वादळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२७ ?

☆ घरात वादळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नाही अंगण नाही कर्दळ

हद्दपार ही झाली बाभळ

*

जुन्या घराचे झाले टॉवर

कॉलनीतही नाही वर्दळ

*

वारा इथला शांत भासतो

प्रत्येकाच्या घरात वादळ

*

शहरासाठी गाव सोडले

प्रदूषणाने येते भोवळ

*

डोळ्यांमधले हट्टी अश्रू

पुसले त्याने सारे काजळ

*

पक्षी सारे उडून गेले

पहा ओस ही झाली ढाबळ

*

डोंगर माथी वर्षा होता

दऱ्या दऱ्यातुन निघती ओघळ

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे बंध… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ हे बंध ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

हे बंध नात्यांचे तुटताना ,

उगा गहिवर दाटून येतो .

काळजाला बांधल्या गाठीचा

सल मनात खुपत रहातो

*

वेळेस कधी सावरताना

मी काळास साकडे घालते

या निराधार आभाळाचा

टाहो  उरातच फोडते

*

हे बंध मायाजाल होताना

ओझे सरताना न सरते

ही आठवे पुसून टाकताना

मात्र गोंदण मातीत उरते

*

लाट किनार्‍याहून परतताना

फक्त वाळूच किनारी उरते

वाळूस मुठीत आवळताना

ती हळूवार निसटून जाते 

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वैशाख दृश्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वैशाख दृश्य... ☆ श्रीशैल चौगुले ☆

वा-यात थोडी माया झाड वेली छाया

धरती सुख काया धग दाह वाया.

*

असूर उष्मा नाचे जीव स्पर्शा टोचे

वणवा तुरा खोचे घाम-घाम साचे.

*

घनाचा कृष्ण वर्ण रानो माळी श्रम

आर्याचा तोरा क्रम अहं श्रेष्ठी भ्रम.

*

भृंगर नाद धरी फुलां फुलां वरी

वैशाखी मजा खरी तप्त धरा जरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares