मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमूल्य देणग्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

सौ. उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अमूल्य देणग्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

  1. टायर चालताना घासले जातात, पण पायाचे तळवे आयुष्यभर धावत राहूनही नवीनच राहतात.
  2. शरीर ७५% पाण्याने बनलेले आहे, तरीही लाखो रोमछिद्रं असूनसुद्धा एक थेंबही गळत नाही.
  3. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण हे शरीर स्वतःचा तोल राखते.
  4. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय चालत नाही, पण हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड धडकत राहते.
  5. कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही, पण रक्त आयुष्यभर अखंड शरीरभर वाहत राहते.
  6. जगातील सर्वात महागडे कॅमेरेही मर्यादित आहेत, पण डोळे हजारो मेगापिक्सेल गुणवत्तेत प्रत्येक दृश्य टिपू शकतात.
  7. कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवी तपासू शकत नाही, पण जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी ओळखू शकते.
  8. सर्वात प्रगत सेन्सरही मर्यादित असतात, पण त्वचेला अगदी हलकीशी संवेदनादेखील जाणवू शकते.
  9. कोणतेही यंत्र सर्व आवाज निर्माण करू शकत नाही, पण कंठातून हजारो फ्रिक्वेन्सीचे स्वर निर्माण होऊ शकतात.
  10. कोणतेही उपकरण सर्व आवाजांचे पूर्ण अर्थ लावू शकत नाही, पण कान प्रत्येक आवाज ओळखून त्याचा अर्थ समजतात.

ईश्वराने आपल्याला दिलेल्या या अमूल्य देणग्यांसाठी त्याचे आभार माना. त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एकावर एक फ्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकावर एक फ्री…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..

जर आपण ‘राग’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘ॲसिडिटी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘ईर्ष्या’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘डोकेदुखी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘द्वेष’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘अल्सर’ फुकट मिळतो.

*

जर आपण ‘ताणतणाव’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘रक्तदाब (BP)’ फुकट मिळतो.

जर आपण ‘विश्वास’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘मैत्री’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘व्यायाम’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘निरोगी आयुष्य’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘शांती’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘समृद्धी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘प्रामाणिकपणा’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘झोप’ फुकट मिळते.

*

आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की,

आपण काय विकत घेतलं पाहिजे…

ते आपणचं ठरवायचं आहे.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आमच्या नवरा-बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार, अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..

ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालंल..? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ”

तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.

आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो? ” त्यावर घरातले सगळे हसायचे.

आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..

आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंतकरणाला देऊन गेली.

अधूनमधून होतात आमची भांडणे… पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..

तुम्हाला एक खरं सांगू..?

हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी आजोबा मुके झालेत. परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.

आणखी एक… घरातलं लहान बाळ रडायला लागलं, कि आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही… कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी, नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.

नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना मला आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…

‘जरी या वर्तमानाला

कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या

पिढ्यांशी बोलतो आम्ही’

मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला, अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.

बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला! तो फक्त बाहेर काढला..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नको जाऊस मंदिरात…” – कवी : श्री. रविंद्रनाथ टागोर मराठी भावानुवाद : स्व माधुरी काबरे माधुरी काबरे ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

स्व माधुरी काबरे

☆ “नको जाऊस मंदिरात…” – कवी : श्री. रविंद्रनाथ टागोर मराठी भावानुवाद : स्व माधुरी काबरे ☆ श्री जगदीश काबरे

नको जाऊस मंदिरात 

फुलं वाहण्यासाठी 

मूर्तीच्या चरणावर…

प्रेमपुष्पांचा गंध पसरून घे 

आधी आपल्या घरभर ।।१।।

*

नको जाऊस मंदिरात 

दिवा उजळण्यासाठी 

मूर्तीच्या गाभाऱ्यात…

आधी पापांचा अंधार दूर कर 

साकळलेला मनभर ।।२।।

*

नको जाऊस मंदिरात 

नतमस्तक होऊन 

करायला प्रार्थना…

आधी नम्रपणे वाग ना 

भोवतालच्या जगभर ।।३।।

*

नको जाऊस मंदिरात 

दगडी मूर्तीसमोर 

झुकण्यासाठी गुडघे टेकून…

आधी झुकून त्यांना वर काढ 

खितपत आहेत जे खोलवर ।।४।।

*

नको जाऊस मंदिरात 

पश्चात्तापाने पोळून 

मागण्यासाठी क्षमा…

आधी माफ कर त्यांना 

ठेवलेस ज्यांना लांबवर ।।५।

*

कवी : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (गीतांजली)

भावानुवाद : माधुरी काबरे

प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गीतासार…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “गीतासार…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली.

मला फार प्रसन्न वाटत होतं की पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या.

सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय ‘गीतासार’, त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या.

मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं की “काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही. “

ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, “अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं?

आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने ‘आम्हाला, सासऱ्यांनी जेवायला बोलावलंय’ हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा?

हाच कर्मयोग!

आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे!

माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं. पाहुणे पुढे म्हणाले, “तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना? “

मुलीला हे सगळं छान पटत होतं!

“नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं, हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा! “

काकांचं बोलणं पटकन कळल्यामुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावंसं वाटत होतं. मीही थक्क झाले.

मग काका म्हणाले, “आता आणखी एक गंमत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते! प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा? “

“हो, पण त्यात काय नवीन? “मोकळेपणाने कन्या विचारती झाली.

“अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग!

समोर जर देण्यायोग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक,

आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय. “

गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते,

विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर!

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘एवढे दे पांडुरंगा…’ – कवी : श्री. सुरेश भट ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘एवढे दे पांडुरंगा…’ – कवी : श्री. सुरेश भट ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

माझिया गीतात वेडे

दु:ख संतांचे भिनावे;

वाळल्या वेलीस माझ्या

अमृताचे फूल यावे !

*

आशयांच्या अंबरांनी

टंच माझा शब्द व्हावा;

कोरडा माझा उमाळा

रोज माधुर्यात न्हावा !

*

स्पंदने ज्ञानेश्वराची

माझिया वक्षांत व्हावी;

इंद्रियांवाचून मीही

इंद्रिये भोगून घ्यावी !

*

एकनाथाने मलाही

बैसवावे पंगतीला;

नामयाहाती बनावे

हे जिणे गोपाळकाला !

*

माझियासाठी जगाचे

रोज जाते घर्घरावे;

मात्र मी सोशीन जे जे

ते जनाईचे असावे !

*

मी तुक्याच्या लोचनांनी

गांजल्यासाठी रडावे;

चोख वेव्हारात माझ्या

मी मला वाटून द्यावे !

*

ह्याविना काही नको रे

एवढे दे पांडुरंगा !

ह्याचसाठी मांडीला हा

मी तुझ्या दारात दंगा !

*

कवी: सुरेश भट (रंग माझा वेगळा)

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

फोडशी भारंगी आणि तेरे अळू

आषाढात खाल्ले हळू हळू

*

केनी कुरडू शेवगा आणि टाकळा

श्रावणात खाऊन करू मोकळा

*

भेंडी पडवळ दोडका आणि गवार

भाद्रपद अश्विनात याचाच भडिमार

*

भोपळे महाराज कार्तिकात फोडू

वांगी आणि मुळा जोडीला काढू

 *

कडवे कुळीथ चवळीचे गावातच शेत.

मार्गशीर्षात उसळ कळणाचाच बेत

*

फणसाच्या कुयरीची भाजी

पौषातच खायची

दारातील तोंडली शेंगा हिरवी केळी

जोडीला काढायची

 *

माघ फाल्गुनाला काय

असं म्हणू नका

चिने कणगी कांदे सुरण.

दारातच आहे केळीचा कोका.

*

चण्याची उसळ आणि आंबा डाळ

याची मजा चैत्रात फार

वैशाखाची मजाच आगळी

उकडगरे आणि आमरस प्रत्येकवेळी

*

पावसाळ्याची बेगमी करून

उरलं सुरलं जेष्ठात संपवू

वर्षभर बाजारात गेलोच नाही

आमचं काही अडलं नाही

*

कोकणच्या गृहिणी आम्ही हुषार

टोमॅटोची दादागिरी

नाही चालू देणार नाही चालू देणार!

कवयित्री: सौ. विद्या विष्णु वेलणकर

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक दिवस असाही… – कवी : श्री शिरीष मोराणकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

सौ. प्रज्ञा गाडेकर

? वाचताना वेचलेले ?

⭐ एक दिवस असाही… – कवी : श्री शिरीष मोराणकर ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

*

एक दिवस असाही

उनाड होऊन उजाडावा

सकाळ दुपार संध्याकाळचा

कुठलाच मेळ नसावा

*

घड्याळाच्या गजराचीही

कट्टी तेव्हा असावी

कितीही वाजले तरी

चादरीची घडी नसावी

*

तास मिनीट सेकंदाशी

कुठलाही मेळ नसावा

उगवणारा प्रत्येक क्षण

आळसावलेलाच असावा

*

घरभर सारा पसारा

मस्तपैकी पसरावा

घडीविनाच वाचलेला

पेपर समोर असावा

*

स्नानाआधीच पदयात्रा

कोपऱ्यापर्यंत घडावी

झणझणीत मिसळ

येताना उदरी रिचवावी

*

न कळवताच ऑफीसला

सरळ दांडी मारावी

बाॅसच्या चेहऱ्यावर

खुश्शाल फुली मारावी

*

घरच्याच कपड्यांमधे मग

बाईकवरून भटकावं

गावाबाहेरच्या धाब्यावर

पोटभर हादडावं

*

जमलंच तर मित्रांसोबत

दोन घटका बसावं

एखादा रमीचा डाव टाकून

गप्पांमधे डुबकावं

*

रोजच्या सगळ्या चिंतांना

एक दिवस विसरावं

कानात वारा गेलेल्या वासरागत

हवं तसं हुंदडावं

*

रोजच्या आखीव रुटीनचं

रेखीव वळण विसरावं

एक दिवस उनाड होऊन

जगण्याचं टाॅनिक मिळवावं

कवी: श्री शिरीष मोराणकर

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाटे उठावे स्वतः चहा करावा

झोप मोडेल असा आवाज नसावा

*

प्राणायाम करावा योग साधावा

हाडे मोडतील इतपत तो नसावा

*

फिरायला जावे प्रमाणात असावे

सोबत मोबाईल खिशात असावा

पडाल कोठे तर नक्की सापडाल

आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा

न रागावता गोड मानून घ्यावा

*

किराणा भाजी पोस्ट बँक

फिरणे समजून आनंद घ्यावा

*

ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा

पण त्यात कुठला वाद नसावा

मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा

*

लिहीणे वाचणे वाजवणे गाणे

एखादा तरी छंद नक्की असावा

*

मी कोणी मोठा होतो हे विसरा

मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा

मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती

लक्षात ठेवा हीच कामाला येती

*

आता काय राहलंय? म्हणू नका

कुणाला उपदेश करत सुटू नका

पर्यटन चित्रपट नाटक

राहुन गेले असेल तर उरका

पत्नीला सोबत घ्या विसरु नका

*

प्रकृती आणि पैसा येती कामा

या दोघांना सांभाळून ठेवा

*

संध्याछाया भिववती हृदया

हे विसरण्याची साधावी किमया

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’स्त्रिया आणि पुरुष…’ – लेखक : मधुकर क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’स्त्रिया आणि पुरुष…’ – लेखक : मधुकर क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

स्त्रिया हुशार असतात तरीही त्या दुःखी का राहतात?

त्यांच्या दु:खा मागील ७ विचित्र सत्यं वाचा…!

१ ‘ती’ काटकसर करून…! बचतीवर विश्वास ठेवते.

२ तरीही ‘ती’ महागडे महागडे कपडे खरेदी करते.

३ महागडे महागडे कपडे विकत घेते, तरीही ‘ती’ माझ्याकडे घालायला काही नाही, असे म्हणत राहते.

४ घालायला काहीच नाही, असे म्हणते, तरीही तिच्या कपाटात एक इंचही जागा नसते…!

५ तिचे कपडे खूप सुंदर असतात, परंतु कधीही ‘ती’ समाधानी नसते.

६ ‘ती’ कधीही समाधानी नसते, पण… नेहमी तिच्या पतीने तिची स्तुती करावी, असे तिला वाटते.

७ तिच्या नवऱ्याने तिची स्तुती करावी असे वाटते, पण जर तिचा नवरा ‘खरोखरच तिची स्तुती’ करत असेल तर ‘ती’ विश्वास ठेवत नाही.

थोडक्यात… काय?

स्त्रिया ‘भेंडी’ सारख्या असतात… आणि म्हणूनच त्यांचं कोणाशीही जमत नाही!

पुरुष नेहमी आनंदी का असतात?

त्याचीही ७ कारणे दिली आहेत.

१ त्याचे फोनवर ‘३० सेकंदात’ बोलणे संपते.

२ पाच दिवसांच्या सहलीसाठी ‘एक पँट पुरेशी’ असते.

३ निमंत्रण नसले तरी ‘मैत्री पक्की’ असते…!

४ संपूर्ण आयुष्यासाठी ‘एकच केशरचना’ (महत्त्वाचा मुद्दा).

५ कोणत्याही प्रकारच्या ‘खरेदीसाठी त्याला २० मिनिटे’ पुरेशी असतात.

६ इतरांच्या कपड्यांचा ‘मत्सर करत नाहीत’ (दुसरा महत्त्वाचा मुद्दा).

७ कोणताही ‘आडमुठेपणा’ नाही, ‘साधी जीवनशैली’… आज परिधान केलेला शर्ट उद्याच्या र्टीसाठीही काम करतो!

(अति महत्त्वाची बाब).

थोडक्यात,

पुरुष हा ‘टोमॅटो’ सारखा आहे… कोणत्याही भाजीत ‘मिसळून आनंदी’ राहतो!

लेखक: श्री. मधुकर क्षीरसागर

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares