image_print

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)  नारायण सुर्वे  (१५ ऑक्टोबर १९२६- १६ ऑगस्ट २०१०) नारायण गंगाराम सुर्वे हे मराठीतले एक नामवंत आणि लौकिकसंपन्न कवी. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९८ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. त्यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला होता आणि हाच आशय त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केला आहे.  १९२६- २७ मधे गंगाराम सुर्वे यांना कापड गिरणीसमोर एक लहान बाळ सापडले. निपुत्रिक असलेल्या गंगाराम आणि काशीबाईंनी हे बाळ आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. त्याला नारायण हे नाव दिले. हे बाळ म्हणजेच पुढच्या काळात सुप्रसिद्ध झालेले कवी नारायण सुर्वे. त्यांनी नारायणला शाळेत घातले. चौथीपर्यंतचे शिक्षण दिले. पुढे ते निवृत्त झाले आणि कोकणातल्या आपल्या गावी निघून गेले. नारायण मुंबईतच राहिला. पुढील शिक्षण त्यांनी स्वत:च्या हिमतीवर केले. पुढच्या काळात जीवनाशी संघर्ष करताना त्यांनी घरगडी, होटेलमधला पोर्या:, कुणाचं कुत्रं, कुणाचं मूल सांभाळणं, हरकाम्या, दूध टाकणार्याग पोर्याध, पत्रे उचलणे, हमाली अशी अनेक कामे केली. हा त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर असा होता. १९५८मधे ‘नवयुग’ मासिकात त्यांची पहिली...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १४ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)  गंगाधर नारायण जोगळेकर: गं.ना.जोगळेकर या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक हे भाषाशास्त्रज्ञ व समीक्षकही होते.त्यांचा जन्म जमखंडी येथे झाला.मॅट्रीक पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण करून पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सातारा व सांगली येथे पूर्ण केले.त्यानंतर पुणे विद्यापीठात एम्.ए.केले.पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते व त्या महाविद्यालयाचे प्राचार्यही होते.काही काळ त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महविद्यालयात मराठी अध्यापनाचे काम केले.महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या संस्थेशी सुमारे तीस वर्षे ते निगडीत होते.या संस्थेचे ते सहा वर्षे कार्याध्यक्ष होते. सुरुवातीला त्यांनी विडंबनात्मक काव्य लेखन केले.परंतु पुढे त्यांचे लेखन हे भाषाशास्त्र व समीक्षा याविषयीच होते. त्यांची ग्रंथसंपदा: महाराष्ट्र आणि मराठी भाषा अभिनव भाषाविज्ञान. मुद्रा उपचार पद्धती. मराठी वाड्मयाचा अभिनव इतिहास. मराठी टीकाकार व साहित्य समीक्षा स्वरूप व विकास या पुस्तकांसाठी त्यांनी सहलेखन केले.त्यांचे 'मराठी भाषेचे ठळक विशेष' हे पुस्तक मुक्त विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आले. श्री.जोगळेकर यांचे 2007 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन. श्री.जोगळेकर यांना विनम्र अभिवादन . ☆☆☆☆☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ मराठी विभाग संदर्भ :विकिपीडिया, सहपिडिया. ≈संपादक – श्री...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी)  पु. भा. भावे पुरुषोत्तम भास्कर भावे (12 एप्रिल 1910 - 13 ऑगस्ट 1980)हे थोर लेखक व विचारवंत होते. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये व लॉ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. भावेंनी 'अकुलिना', 'अडीच अक्षरे', 'दोन भिंती', ' व्याध' इत्यादी 17 कादंबऱ्या लिहिल्या. 'पद्मिनी', 'महाराणी', 'मुक्ती', 'विषकन्या' व 'स्वामिनी' ही पाच नाटके त्यांनी लिहिली. 'ठरीव ठशाची गोष्ट', 'फुलवा', 'पहिला पाऊस', 'प्रतारणा' इत्यादी 11 कथासंग्रह त्यांनी लिहिले. 'रक्त आणि अश्रू', 'विठ्ठला पांडुरंगा' इत्यादी 14 लेखसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांचे 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. ते 'आदेश' व 'सावधान' या नागपूरच्या वृत्तपत्रात स्तंभलेखनही करत असत. 'रायगडचा राजबंदी' या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. 'अंमलदार'मध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती. 1977मध्ये पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषाप्रभू पु. भा. भावे समिती दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कै. पु. भा. भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करते. 🙏🏻 ☆☆☆☆ शांताराम विष्णू आवळसकर शांताराम विष्णू आवळसकर (9 नोव्हेंबर 1907- 13 ऑगस्ट 1963) हे ऐतिहासिक लेखन करत असत. त्यांनी 'रायगडची जीवनकथा' हे पुस्तक लिहिले. मराठेकालीन कोकणच्या इतिहासाच्या साधनांचा त्यांनी...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)  महामोहपाध्याय बाळशास्त्री हरदास हे महाराष्ट्रातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व. प्रकांड पंडित. त्यांचे हे जन्मशताबदीचे वर्ष. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून ‘वेदातील राष्ट्रदर्शन समाजाला घडवले. त्यांची वाणी ओघवती, अस्खल्लीत आणि रसाळ होती. बापूजी अणे म्हणायचे, ‘बाळशास्त्री केवळ साहित्याचार्य नव्हते, तर चालते बोलते विद्यापीठ होते. देवता ‘श्रीदक्षिणामूर्ती’ त्यांचे उपास्य दैवत. दक्षिणा म्हणजे ज्ञान. अर्थातच बाळशास्त्री ज्ञानाचे उपासक होते. वयाच्या आठव्या वर्षी ते प्राच्य विद्येकडे वळले. अठरा वर्षाचे असताना त्यांनी, ‘काव्यातीर्थ, ‘वेदांततीर्थ’, आणि ‘साहित्याचार्य’ या तीनही परीक्षा दिल्या व त्यात ते उत्तम श्रेणीत पास झाले. त्यानंतर त्यांनी संस्कृत पंचमहाकाव्ये आणि वेदशास्त्राचा अभ्यास केला. त्यांचा अव्याहत व्यासंग पाहून गोवर्धन पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘  महामोहपाध्याय’ ही पदवी दिली. ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत यावर त्यांनी खूप लेखन केले, तसेच व्याख्यानेही दिली. याशिवाय, वेदातील राष्ट्रदर्शन, भारतीय स्वातंत्र्य समर, आर्य चाणाक्य, शिवाजी, स्व. सावरकर, डॉ. हेडगेवार यावरही त्यांनी व्याख्याने दिली. महाराष्ट्र या वृत्तपत्रातून ते दर रविवारी ‘साहित्य समालोचन’ हे सदर लिहीत. त्यांनी जवळ जवळ २०००...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)  सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती इरावती कर्वे यांचा आज स्मृतिदिन.  (१५/१२/१९०५ — ११/८/१९७०)  मानववंशशास्त्र , समाजशास्त्र , आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे, या उच्चशिक्षित होत्या. त्यांनी “ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण “ हा विषय घेऊन एम.ए. केलं होतं , तर  “ मनुष्याच्या कवटीची नेहेमीची असमप्रमाणता “ या एका वेगळ्याच विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची पी.एच.डी. मिळवली होती. मराठीबरोबरच संस्कृत आणि इंग्लिश भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून कार्यरत होत्या. लंडन विद्यापीठातही त्यांनी ‘ व्याख्याती ‘ म्हणून एक वर्ष काम केले होते. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये मानववंशशास्त्राच्या प्रपाठक म्हणून त्या रुजू झाल्या. तिथेच त्यांनी पुरातत्वविद्येतील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला. श्री. सांकलिया यांच्यासह त्यांनी गुजरातमधील लांघजण या मध्यअश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले असता तिथे मानवी अवशेष सापडल्याने त्यांचे हे संशोधन कार्य मोलाचे ठरले.   निरीश्वरवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी असणाऱ्या या लेखिकेचा, भारतीय संस्कृती, आणि त्यातही मराठी संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावर मराठीबरोबरच त्यांनी इंग्लिश भाषेतूनही लेखन केले. त्यांनी वैचारिक ग्रंथ तर लिहिलेच,...
Read More

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ अविराम 1111 – श्री संजय भारद्वाज ☆ हेमन्त बावनकर ☆

हेमन्त बावनकर ☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ अविराम 1111 - श्री संजय भारद्वाज ☆ हेमन्त बावनकर ☆ अविराम 1111 👈 एक शब्द और एक अंक मात्र ही नहीं, अपने आप में एक वाक्य भी है। "अविराम 1111" इस वाक्य की पूर्णता में परम आदरणीय श्री संजय भरद्वाज जी का अविराम चिंतन, अध्यात्म, संवेदनशीलता और हमारे प्रबुद्ध पाठकगण का प्रतिसाद एवं स्नेह है जिसने श्री संजय जी की अविराम लेखनी को सतत ऊर्जा प्रदान की है। ई-अभिव्यक्ति मात्र एक मंच है जिसके माध्यम से प्रतिदिन प्रबुद्ध लेखक गण अपने संवेदनशील अथाह सागर रूपी हृदय - मानस से शब्दों को पिरोकर अपनी अविराम लेखनी से सकारात्मक सत्साहित्य आप तक सम्प्रेषित करने का प्रयास करते हैं। ई-अभिव्यक्ति का अस्तित्व श्री संजय भारद्वाज जी जैसे सुहृदय लेखक एवं आप जैसे प्रबुद्ध पाठकों के बिना असंभव है। आज जब अविराम 1111 के इतिहास के पन्नों में विगत अविराम 1111 और भविष्य के अविराम पृष्ठों को पढ़ने का प्रयास करता हूँ तो पाता हूँ कि मुझे श्री दीपक करंदीकर जी...
Read More

हिन्दी साहित्य – संवाद ☆ अविराम 1111 – संजय दृष्टि – पाठकों की प्रतिक्रियाएं – प्रतिसाद … ☆

☆ हिन्दी साहित्य – संवाद ☆ अविराम 1111 - संजय दृष्टि - पाठकों की प्रतिक्रियाएं - प्रतिसाद … ☆ श्री संजय भारद्वाज जी के लेखन-प्रकाशन के 1111 दिन पूरे होने पर  पाठकों की प्रतिनिधि प्रतिक्रियाएँ- [1] सुश्री वीनु जमुआर बचपन के दिनों में, प्रहर की रात्रिबेला में, सोने से पूर्व प्रतिदिन दादी-नानी द्वारा सुनाई  गयी  कहानियाँ, लोककथाएँ, लोकगीत इत्यादि ज्ञान तथा विवेक सिंचित व्यक्तित्व को गढ़ने का मार्ग होती थीं। सर्वविदित है कि प्रतिदिन का प्रयास  पत्थर पर भी लकीरें उकेरता है। निरंतरता साँस की तो जीवित रहने का अहसास, संवेदना सृजन की तो मष्तिष्क के चैतन्य रहने का विश्वास! समय बदला, गति बदली, संयुक्त का एकल में परिवर्तन हमने देखा। ऐसे समय में सृजनकारों की जिम्मेदारी बढ़ी। आइए, आज बात करें एक ऐसे युवा मननशील, मनीषी रचनाकार की जो न केवल अनुभूतियों की बात कहता है बल्कि इन्हें अभिव्यक्त करने की भाषा पर भी अपने विचार व्यक्त करता है। कहता है, 'अपनी भाषा में अभिव्यक्त होना अपने अस्तित्व को चैतन्य रखना है।' अध्यात्म को देह,...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी)  विष्णुदास भावे विष्णुदास अमृत भावे (9ऑगस्ट 1819 - 9 ऑगस्ट 1901)हे आद्य मराठी नाटककार होते.त्यांना मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जाते. त्यांचा उल्लेख 'महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी'असा होतो. त्यांचा जन्म सांगली येथे झाला.त्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडे नोकरीला होते. विष्णुदास अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करू शकणाऱ्या असंख्य लाकडी बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. त्या वापरून ते 'सीतास्वयंवर' हे नाटक करणार होते. परंतु तत्पूर्वी कर्नाटकातील भागवत मंडळींप्रमाणे कीर्तनी खेळ रचण्याची आज्ञा सांगलीचे राजे पटवर्धन यांनी त्यांना दिली व 1843 साली भावेंनी 'सीतास्वयंवर' हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून भावेंनी अनेक ठिकाणी अनेक नाटकांचे प्रयोग केले. 1853मध्ये त्यांनी मुंबईला 'इंद्रजितवध'चा पहिला नाट्यप्रयोग केला. त्यांनी 'इंद्रजितवध', 'राजा गोपीचंद', 'सीतास्वयंवर' वगैरे नाटकांचे अनेक प्रयोग केले. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले होते. 'सीतास्वयंवर' या नाटकात त्यांनी गीतलेखनही केले होते.'राजा गोपीचंद' या नाटकाचे हिंदी प्रयोगही त्यांनी केले होते. विष्णुदास भावेंनी बनवलेल्या लाकडी बाहुल्या...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)  भीमराव गस्ती (इ.स. १९५० – ८ ऑगस्ट २०१७.) भीमराव गस्ती यांचा जन्म यमनापूर – बेळगाव इथे झाला. देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते साहित्यिक होते, त्याचप्रमाणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेही होते. बेरड समाजाच्या व्यथा-वेदना आणि त्यांच्या होणार्याम छ्ळाचे चित्रण त्यांनी आपल्या ‘बेरड’ या आत्मचरित्रात केले आहे. या आत्मचरित्राने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली. भीमराव गस्ती यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण यमनापूर इथे झालं. पुढे एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर रशियाची राजधानी मास्कोयेथील पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेट संपादन केली. हैद्राबादयेथील रिसर्च अॅंीड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमधे त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरी मिळाली. एकदा एका दरोड्यासंदर्भात पोलिसांनी बेरड समाजाच्या २० निरपराध लोकांना अटक केली व त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाविरुद्ध गस्तींनी  न्यायालयात झुंज दिली. मोर्चे काढले. आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी निपाणी येथे देवदासींच्या  १८० मुलींसाठी  वसतिगृह सुरू केले. तिथे देवदासींच्या मुली शिकून शिक्षिका, प्राध्यापिका,...
Read More

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ... संस्कृतपंडित व लेखक श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांचा आज स्मृतिदिन . ( मृत्यू दि. ७/८/१९२४.)  हे कोल्हापूर महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. त्याचबरोबर, वेदान्तशास्त्राचे, तसेच, ज्ञानदेव आणि शंकराचार्य यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक आणि भाष्यकार अशीही त्यांची ओळख होती.  त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ पुढीलप्रमाणे —--  १) श्री अनुभवामृत पर्यबोधिनी टीका.  २) ( हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांची ) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदांत.   ३) ग्रंथमाला.  ४) श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोग शास्त्र. —- हा ग्रंथ करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी गौरवलेला होता.  ५) विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या दृष्टीने वेदातील मतांचे तात्पर्य.  श्री. हुपरीकर यांच्याविषयी आणखी एक महत्वाचे सांगायचे ते असे की, लो. टिळक यांनी लिहिलेल्या “ गीतारहस्य “ या गाजलेल्या ग्रंथावर त्यावेळच्या ज्या काही मान्यवरांनी जाहीरपणे टीकात्मक ( जरा कडवट ) भाष्य केले होते, त्यामध्ये श्री. हुपरीकर यांचाही समावेश होता.  श्री. बाळशास्त्री हुपरीकर यांना विनम्र अभिवादन. ☆☆☆☆☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ मराठी विभाग संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ....
Read More
image_print