मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ३ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ३ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

श्लोक २१ ते ३० 

☆

श्लोक

समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखा-

न्निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने ।

अथाऽयं व्यासङ्गो हतपतितनिस्तारणविधौ

न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगति ॥ २१॥

*

नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कतमया

पुराणां संहर्तुः सुरधुनि कपर्दोऽधिरुरुहे ।

कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालि सलिलै-

स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः ॥ २२॥

*

विधत्तां निःशङ्कं निरवधि समाधिं विधिरहो

सुखं शेषे शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः ।

कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः

सवित्री कामानां यदि जगति जागर्ति जननी ॥ २३॥

*

अनाथः स्नेहार्द्रां विगलितगतिः पुण्यगतिदां

पतन् विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः सिद्धभिषजम् ।

सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं

शिशुः सम्प्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम् ॥ २४॥

*

विलीनो वै वैवस्वतनगरकोलाहलभरो

गता दूता दूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुम् ।

विमानानां व्रातो विदलयति वीथिर्दिविषदां

कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात् ॥ २५॥

*

स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसञ्जातजटिल-

ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां नः प्रतिदिनम् ।

हरन्तां सन्तापं कमपि मरुदुल्लासलहरि-

च्छटाचञ्चत्पाथःकणसरणयो दिव्यसरितः ॥ २६॥

*

इदं हि ब्रह्माण्डं सकलभुवनाभोगभवनं

तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिन्दुकमिव ।

स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो

जलानां सङ्घातस्तव जननि तापं हरतु नः ॥ २७॥

*

त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ

करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः ।

इमं त्वं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये

पुनाना सर्वेषामघमथनदर्पं दलयसि ॥ २८॥

*

श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितै-

र्विमुक्तानामेकं किल सदनमेनःपरिषदाम् ।

अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं

तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः ॥ २९॥

*

न कोऽप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितो

यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः ।

इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती-

मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः ॥ ३०॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद – – 

☆

पद्मासम सुंदर विष्णूपद नखापासुनी जन्म

अनंगारिच्या जटाजुटात तुझे निवास स्थान

उद्धारास्तव पतितांच्या त्या जीवनात तू मग्न

उत्कर्ष श्रेष्ठतम आहे तव या समस्त विश्वातून ॥२१॥

*

दुजी नगनदी नाही केली शिवशंभू धारण

कोण्या नदीने नाही केले केशवपद क्षालन

अशी न सरिता ठायि जिच्या तव उपमेचा लेश

सर्वश्रेष्ठ हे भागीरथी तू दिव्यत्वाचा अंश ॥२२॥

*

विरंचि लावो समाधि त्याची निरंतर वा अनंत

शेषशयन हरि करो वा हर तांडव ते नृत्य

यज्ञ दान तप कशास प्रायश्चित्ताचे कांड ते

जगात जोवर तुझी जननी गे जागृती जागते ॥२३॥

*

अनाथ गतिहिन व्याधीग्रस्त मी पातकी जरी

तृषार्त स्नेहासी होउनिया आर्त मनी मी उरी

सुधासिंधु वैद्यसिद्ध ते समस्त जग उद्धरी

शिशू पातला शरण तयासी भले तेच तू करी ॥२४॥

*

अवतरली अवनीवरती तव गाथा मंगलदायी

यमनगरीतिल पापिजनांचा आक्रोशहि कमी होई

अस्तित्व तुझे नाही तेथे दूत यमाचे जाती

पतीत पापी कुठे मिळति का याचा शोध घेती ॥२५॥

*

क्रोधे उद्भवलेल्या जटिल तेज ज्वरांच्या ज्वाला

संतापाने जाळित अमुच्या जर्जर देहाला

पवन प्रवाहे चंचल तुझिया जलकण लहरींनी

ताप हरो हा सदैव अमुचा माते तू प्रतिदिनी ॥२६॥

*

ब्रह्माण्डाचा आश्रय सकल भुवनासी सर्वत्र

ज्याच्या लहरींनी आहे स्थित जणू तेंदूपत्र

शिवजटेतुनी जटिल जाहला जलप्रवाह जेथे

नाश करो तापांचा अमुच्या शांती असो येथे ॥२७॥

*

उद्धारास्तव समस्त तीर्थे माझ्या संकोचती

भस्मविभूषित शिवशंकरही कानी कर ठेविती

अंतर्यामी अनुकंपा तव पावन मज करिशी

तीर्थांचा अन् महादेवाचा गर्व सर्व हरिशी ॥२८॥

*

पापाचरण करू ना करु संदेही पापी मी

ऐसा सागर घोर नीच कृत्यांचा आहे मी

उद्धरण्यास्तव मम पतिताला कसे आळवू मी

स्तवन तुझे गे कसे करावे नरपशू आहे मी ॥२९॥

*

आजवरी ना कधी गवसला पतीत येथ जगात

उद्धाराने ज्याच्या होईल आश्चर्यावर मात

माझ्यारूपे आज पातला ऐसा पापी प्राप्त

कृपा करुनी मजसि उद्धरी पुरवी मनोरथ ॥३०॥

☆

– क्रमशः भाग तिसरा 

☆ ☆ ☆ ☆

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवनशोध ☆ अनिता जयंत खाडीलकर ☆

अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? जीवनशोध ? श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

☆

घट डोईवर मूल कडेवर 

जीवन फिरवते वणवण 

दिस आलाय माथ्यावर 

किती फिरशील रानातून 

*

 अंगभर वस्त्र डोईवर पदर

 संस्कृती ही सांभाळत 

 करते ती सुखाचा संसार 

 शिकवण मायेची देत

*

पायी अनवाणी चालत 

तोल सावरते विश्वासावर 

मृगजळामागे धावत 

जाशील तू कुठवर?

*

 दोन जीवनाचे आधार 

 एक सोबत घेऊन 

 दुसरा शोधत दिनभर 

 जाशील तू दमून 

*

एकेक थेंब साठवून 

बचतीचे धडे देते

ठरेल जगती वरदान 

संस्कारी जीवन घडवते

.

– – – रस्त्यावर मोलमजुरी करून दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकत फिरणार्‍या आईचं वर्णन करणारी ही माझी कविता त्या सर्व आईंना समर्पित.

☆

© अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओली सांजवेळ… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ ओली सांजवेळ… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

…

 (षडाक्षरी)

☆

ओल्या सांजवेळी

नभ लुटे रंग!

आभाळीचा चंद्र,

दावी अंतरंग!

* 

 पावसाची सर,

 भिजवे धरती!

 मृद्गंध पसरे,

साऱ्या आसमंती!

 *

ऋतू पावसाळी,

 काव्याला बहर!

शब्दांचे ओघळ,

 येती सर सर!

 *

तीन ऋतू मध्ये,

 वर्षा ऋतू राजा!

 ये असा भू वर,

 कर गाजावाजा!

☆

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कोमल वाचा दे रे राम’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कोमल वाचा दे रे राम ’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

आत्मसंस्कारातून राष्ट्रसंस्काराकडे समर्थांची गुणयाचना :

प्रस्तावना

प्रार्थनेचे स्वरूप आणि आशयव्याप्ती

समर्थ रामदासस्वामींची प्रस्तुत रचना ही पारंपरिक भक्तिपर प्रार्थनेच्या चौकटीत बसणारी असली, तरी तिचा आशय केवळ वैयक्तिक मोक्षाभिलाषेपुरता मर्यादित नाही. ही गुणयाचना आहे; आणि ती व्यक्तिमत्त्वविकास, लोकसंघटन आणि धर्मसंस्थापना यांचा सूचक आराखडा मांडते. प्रस्तुत लेखात या प्रार्थनेतील मागण्यांची तार्किक संगती, त्यांचे आध्यात्मिक व सामाजिक आशय, तसेच समर्थांच्या धर्म–राष्ट्रकार्याशी त्यांचे नाते यांचा विचार केला आहे.

वाणी आणि करणी : नैतिक अधिष्ठानाची संकल्पना

“कोमल वाचा” आणि “विमल करणी” या दोन संकल्पना समर्थांच्या नैतिक दृष्टिकोनाचा पाया दर्शवितात. वाणीतील कोमलता ही संवादक्षमतेचे, तर करणीतील विमलता ही आचरणशुद्धीचे प्रतीक आहे. संतपरंपरेत वाणीचे महत्त्व अधोरेखित झालेले असले, तरी समर्थ येथे वाणी–करणी सुसंगतीवर विशेष भर देतात.

यातून एक मूलभूत तत्त्व स्पष्ट होते : _नैतिक विश्वसनीयता हीच नेतृत्वाची पूर्वअट आहे_.

प्रसंगावधान आणि ‘धूर्त कळा’ : संताची व्यवहारदृष्टी

“प्रसंग ओळखी” आणि “धूर्त कळा” ही मागणी विशेष लक्षणीय आहे. संतस्वभाव आणि राजकीय व्यवहारदृष्टी यांचा समन्वय येथे दिसतो. ‘धूर्त’ हा शब्द येथे नकारात्मक अर्थाने नसून, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून यथायोग्य कृती करण्याची चातुर्यदृष्टी दर्शवितो.

शिवकालीन अस्थैर्य, सामाजिक विघटन आणि परकीय सत्तेच्या पार्श्वभूमीवर धर्मसंरक्षणासाठी ही व्यवहारबुद्धी आवश्यक होती. समर्थांच्या दासबोधातील उपदेशांमध्येही ही व्यावहारिकता जागोजागी स्पष्ट दिसते.

हितकारकता, बहुजन मैत्री आणि लोकाभिमुख साधना

“हितकारक”, “जनसुखकारक” आणि “बहुजन मैत्री” या मागण्या समर्थांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक आहेत. साधना ही समाजविरहित नसून समाजाभिमुख असावी, ही त्यांची भूमिका होती.

समर्थांनी उभारलेली मारुती मंदिरे, मठसंस्था आणि व्यायामप्रणाली या धार्मिक संस्थांइतक्याच सामाजिक संघटनकेंद्रे होत्या. व्यक्तीची नैतिक व शारीरिक उभारणी ही राष्ट्रधर्माच्या पुन:स्थापनेसाठी आवश्यक असल्याचे समर्थ मानतात.

 विद्या, उदासीनता आणि नम्रतेचे तत्त्वज्ञान

“विद्या वैभव” आणि त्यासोबत “उदासीनता” यांची संयुक्त मागणी ही संतुलित दृष्टी दर्शवते. विद्या प्राप्त झाली तरी तिचा अहंकार नको; वैभव आले तरी आसक्ती नको.

“मागो नेणे दे” ही ओळ मानवी मर्यादेची जाणीव व्यक्त करते. ईश्वरनिष्ठा आणि नम्रता या समर्थांच्या आध्यात्मिकतेच्या मूलभूत अटी आहेत.

कला, शब्दसामर्थ्य आणि सावधता : जनजागृतीची साधने

संगीत, गायन, प्रबंध, कथा, शब्दमनोहरता, या सर्व मागण्या समर्थांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती साधली.

“सावधपणा” आणि “बहुत पाठांतर” या मागण्या आत्मशिस्त व अध्ययनशीलता दर्शवितात. समर्थांची साधना भावनावादी नसून अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध आहे.

अभेद भक्ती ते ब्रह्मानुभव : साधनेची अंतर्मुख परिणती

प्रार्थनेच्या उत्तरार्धात मागण्या अधिक सूक्ष्म होत जातात. “अभेद भक्ती”, “आत्मनिवेदन”, “तद्रूपता”, “ब्रह्म अनुभव”.

येथे साधनेचा क्रम स्पष्ट दिसतो :

भक्ती → आत्मसमर्पण → अहंनिवृत्ती → ब्रह्मानुभव.

“मजवीण तू मज दे” ही ओळ अद्वैतानुभूतीचे संकेत देते. ही व्यक्तिनिष्ठ अध्यात्मिकता असली, तरी तिचा परिणाम समाजाभिमुख कर्तृत्वात होतो.

गुणयाचनेतील तार्किक संगती

ही प्रार्थना विस्कळीत मागण्यांचा संच नाही. तिची अंतर्गत रचना क्रमबद्ध आहे :

नैतिकता → व्यवहारदृष्टी → सामाजभान → वैराग्य → सांस्कृतिक साधने → भक्ती → अद्वैतानुभव.

हा क्रम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सूचित करतो.

समर्थांचे धर्म–राष्ट्रकार्य : गुणांचे कार्यरूप

समर्थांनी प्रत्यक्ष कार्यातून या संपादित गुणांचे प्रकटीकरण केले. छ. शिवाजी महाराजांना दिलेले आध्यात्मिक अधिष्ठान, संघटनप्रवण उपदेश, ‘दासबोधा’तील व्यवहारमार्गदर्शन आणि ‘मनाचे श्लोकां’तील आत्मशिस्त — हे सर्व या गुणयाचनेचे कार्यरूप आहे.

त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे केवळ उपासना नव्हे; तो समाजनियमन, नैतिकता आणि राष्ट्रस्वातंत्र्याचा मूल्याधार आहे.

समारोप:

समर्थ रामदासांची ही गुणयाचना ही संतपरंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती वैयक्तिक मोक्षाभिलाषा आणि सामाजिक दायित्व यांचा समन्वय साधते.

“कोमल वाचा” पासून “मजवीण तू मज दे” पर्यंतचा प्रवास हा व्यक्तीच्या बाह्य शुद्धीपासून अंतर्मुख अद्वैतानुभवापर्यंत आणि तेथून समाजाभिमुख कर्तृत्वापर्यंत जाणारा आहे.

म्हणूनच ही प्रार्थना केवळ भक्तिसाहित्याचा भाग न राहता, राष्ट्रधर्माच्या तात्त्विक अधिष्ठानाचे विधान ठरते.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

(समर्थांनी रामाकडे केलेली गुणयाचना)

*

कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम ।

प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम ॥ १ ॥

*
हितकारक दे रे राम, जन सुख कारक दे रे राम ।

अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम ॥ २॥

*

विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम ।

मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम ॥ ३॥

*

तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम ।

संगित गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम॥ ४ ॥

*

धात माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम।

रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम ॥ ५॥

*

दस्तक टाळी मज दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम।

प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम ॥ ६ ॥

*

सावध पण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम।

दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम ॥ ७ ॥

*

पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम।

अभेद भक्ती दे रे राम, आत्म निवेदन दे रे राम ॥ ८ ॥

*

तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम ।

सज्जन संगती दे रे राम, अलिप्त पण मज दे रे राम ॥ ९ ॥

*

ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम ।

मजविण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम॥ १० ॥

*

– – समर्थ रामदासस्वामी

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पंचदली रानभेंडी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पंचदली रानभेंडी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 भावगीत : (वर्ण संख्या १४ यति ८ व्या अक्षरावर) 

☆

गुलबिल्या पाकळीत श्वेतांगी देखणी 

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||ध्रु||

*

हेमंताच्या थंडीमध्ये फुलारून येते

जणू सारे चैतन्यच निसर्गाला देते 

मोह घालीते मनाला पर्णांच्या गोंदणी

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||१||

*

श्वेतरंगी पाकळ्यात जांभळी टिकली

हिंदोळते वाऱ्यासवे पाकळी पाकळी

दुरूनच पाहू फळे काट्याची टोचणी

पंचदली रान भेंडी नक्षत्र चांदणी ||२||

*

रानीवनी उगवते रंग किती छान 

काव्यमोती जडवून देते हिला मान 

कवितेत आली माझ्या ही लावण्यखणी 

पंचदली रानभेंडी नक्षत्र चांदणी ||३||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१९ ☆ परिपूर्ती… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१९ ?

☆ परिपूर्ती… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

हीच परिपूर्ती आयुष्याची,

जगून घेता सर्व छटा….

गच्च भरलेला…हिंदकळणारा…

प्रत्येक घट लागेल तटा…!

*

जीवनाचा किती भरवसा?

पापाचा घट, पुण्याचे घडे…

कालिंदीच्या तीरावरती….

अजून काही अलौकिक घडे !

*

जागे आहे मनात काही,

एक अनोखी शीळ मनी

जगण्याच्या आसोशीतच

परिपूर्तीची स्नेहधूनी !

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अरण्य… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ अरण्य… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(पादाकुलक)

☆

 एक वृक्ष ना संवादाला

 फांदीवर ना कुणी पाखरे

 भरल्या रानी खुद्द स्वतःच्या

 झाड किती हे एकएकले

* 

 निष्पर्णाच्या ऋतूत हिरवे

 हिरव्या रानी कधी बोडके

 जरा विसंगत ऋतुचक्राशी

 वनी असुनही वनावेगळे

 *

 मंत्रोच्चारासम दुमदुमते

 उत्तररात्री याची सळसळ

 तुफान नसता हलती फांद्या

 झपाटल्यागत गदगद गदगद

 *

 याच्यासाठी शेंड्यावरती

 रोज नव्याने उगवे तारा

 ऋतूनंदनातून दूरच्या

 घाली भवती पिंगा वारा

 *

 असून बेड्या घट्ट मुळांच्या

 उंच उंच हे जाऊ पाहे

 अंतरिक्षही याच्यासाठी

 खाली खाली येऊ पाहे

 *

 विजा वादळे धग वणव्याची

 सोसुन सारे झाले आहे

 कधीकाळच्या झाडाचे हे

 अरण्य आता झाले आहे !

☆

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

नोबेल पुरस्कार समितीने दिलेल्या मानपत्रात टागोरांविषयी लिहिले आहे की, “रविंद्रनाथ टागोर यांच्या अत्यंत संवेदनशील, मनोवेधक, वेगळ्या धाटणीच्या व परिपूर्ण अशा काव्यरचनांनी त्यांनी इंग्रजी साहित्य विश्वाला त्यांच्या अनोख्या काव्यात्म विचारांनी समृद्ध केले आहे. ” तर इकडे टागोरांना असं वाटलं की, “या पुरस्कारामुळे एकमेकांना अपरिचित असलेल्या संस्कृती, विश्वबंधुत्वाच्या भावनेने जवळ आल्या. “

रविंद्रनाथ १९१२ च्या सुरवातीला बरेच आजारी होते त्यामुळे त्यांची आधीच ठरलेली लंडन ट्रिप त्यांना पुढे ढकलावी लागली. त्याऐवजी ते हवाबदलासाठी त्यांच्या पद्मा नदीच्या किनाऱ्यावरील शिलादोह येथील वडिलोपार्जित घरी राहायला गेले. तिथं त्यांनी त्यांच्या काही बंगाली कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्यांनी एका खाजगी पत्रात आपण हा अनुवाद, का व कसा केला याविषयी लिहिलं आहे. ते म्हणतात, ” हा शब्दश: अनुवाद नाही तर या कवितांचा हा पुनर्जन्म आहे. मी यातून पुनश्च एकदा नवनिर्मितीचा अनुभव घेतला. ” इंग्रजी रचनेसाठी सोईस्कर असा गद्य काव्य प्रकार त्यानी यासाठी निवडला व त्यांना हा काव्यसंग्रह व्हायला नको होता तर ती एक काव्य मालिका व्हायला हवी होती.

नंतर कांही महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने, इंग्लंडला बोटीने जाण्यासाठी ते निघाले या प्रवासात त्यांनी आणखी काही कवितांचे इंग्रजी भाषांतर केलं. लंडनला गेल्यावर ते त्यांचे चित्रकार मित्र रोथेन्स्टाइन यांना भेटले व रोथेन्स्टाइन यांनी त्यांची व त्यांच्या काव्याची ओळख लंडनच्या आपल्या नामांकित मित्र परिवाराला करून दिली. यात डब्ल्यू. बी. यीट्स होते तसेच थॉमस मूर, इजा पाऊंड, ब्रुक इत्यादि अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्या सर्वांना टागोरांच्या गूढ, अप्रतिम व नाविन्यपूर्ण काव्याने प्रभावित केले.

यीट्स् यांनी या भाषांतरीत कवितांमधून निवडक १०३ कवितांचे पुस्तक काढण्याचा आग्रह धरला. रोथेन्स्टाइन यांच्यामुळे ‘इंडिया सोसायटी ऑफ लंडन’ यांनी या कवितांचे पुस्तक छापले. या पुस्तकाचे इंग्रजी वाचकांनी खूपच उत्साहाने स्वागत केले व या पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापण्यासाठी मॅकमिलन प्रेस ऑफ लंडन पुढे आली. अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या. केवळ रोथेन्स्टाइन यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले म्हणूनच टागोरांनी हे पुस्तक रोथेन्स्टाइन यांनाच अर्पण केले आहे. यीट्स् यांना तर या कवितांनी इतकं भारून टाकलं होतं की त्यांनी आपण होऊन या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली.

या पुस्तकातल्या सहा कविता ‘पोएट्री’ या अमेरिकन मासिकात प्रसिद्ध झाल्या व त्यांचे तिथे अनेक नियतकालिकांमधून खूप कौतुकही झाले.

यानंतर रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर चे सदस्य असलेले ब्रिटिश साहित्यिक थॉमस मूर यांनी नोबेल पुरस्कारासाठी रवींद्रनाथांचे नाव पुरस्कृत केलं व हॉल स्टाॅर्म व इतर महानुभावांनी त्याला अनुमोदन दिले. एकूण २८ नामांकनांमधून टागोरांचं नाव सर्व संमत झालं. तारेने ही बातमी टागोरांना कळविण्यात आली, जी टागोरांना २२ नोव्हेंबर १९१३ रोजी मिळाली. संपूर्ण शांती निकेतन या बातमीने हर्षभरीत झालं व २३ नोव्हेंबरला तिथे टागोरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जगदीशचंद्र बोस प्रमुख पाहुणे होते. सुमारे पाचशे उत्साहित प्रशंसकांना घेऊन एक खास रेल्वे गाडी कलकत्त्याहून बोलपूरला म्हणजे शांतीनिकेतनला या कार्यक्रमासाठी आली.

नोबेल पुरस्कार सोहळ्याला स्वीडन येथे वेळेत पोहोचू शकत नसल्यामुळे, समारंभाला टागोर उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठविलेले लिखित भाषण समारंभात वाचून दाखविण्यात आले.

नंतर तो पुरस्कार व मानपत्र २७ जानेवारी १९१४ रोजी बंगालचे गव्हर्नर लॉर्ड कारमिशेल यांच्या मार्फत राजभवनात टागोरांना समारंभ पूर्वक दिले गेले.

—–

☆ गीत : ८५ ☆

WHEN the warriors came out first from their master’s hall, where had they hid their power? Where were their armour and their arms?

They looked poor and helpless, and the arrows were showered upon them on the day

they came out from their master’s hall.

When the warriors marched back again to their master’s hall where did they hide their power?

They had dropped the sword and dropped the bow and the arrow; peace was on their

foreheads, and they had left the fruits of their life behind them on the day they marched back again to their master’s hall.

——

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८५ ☆

☆

अज्ञात जगातून येथे येती

शस्त्रे अस्त्रे मुळीच नसती

*

ज्ञात जगाच्या या पटलावर

धावा बोलती सारे त्यांवर

*

सामर्थ्याला टांगून शमीवर

अज्ञातवासा का येती भूवर

*

चिलखत देखिल नसते तेंव्हा

होत बाणांचा वर्षाव जेंव्हा

*

धैर्याची तो प्रचिती देऊन

साही यातना संयम राखून

*

परतण्याची मग वेळा येता

जाती ठेवून शांती चित्ता

*

कर्मफले पण इथेच त्यागुनि

प्रभुच्या चरणी जाती परतुनि

☆

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८६ ☆

DEATH, thy servant, is at my door. He has crossed the unknown sea and brought thy

call to my home.

The night is dark and my heart is fearful yet I will take up the lamp, open my gates and

bow to him my welcome. It is thy messenger who stands at my door.

I will worship him with folded hands, and with tears. I will worship him placing at his feet the treasure of my heart.

He will go back with his errand done, leaving a dark shadow on my morning; and in my

desolate home only my forlorn self will remain as my last offering to thee.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८६ ☆

☆

मृत्यू उभा दारात येऊनि

अज्ञाताचा सागर लांघुनि

*

तुझिया आमंत्रणा घेऊनि

हृदयक्रंदना जरा थोपवुनि

*

पायघड्यांस्तव तया अंथरुनि

दीप लावुनि स्वागत करुनि

*

पूजन त्याचे हात जोडुनि

जाईल परतुनि कार्या करुनि

*

आत्मा नेईल देहा सोडुनि

तोच देह मग तुला अर्पुनि

*

शेवटची आहुती टाकुनि

यज्ञकुंड ते देईन शांतवुनि

☆

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८७ ☆

IN desperate hope I go and search for her in all the corners of my room; I find her not.

My house is small and what once has gone from it can never be regained. But infinite is

thy mansion, my lord, and seeking her I have come to thy door. I stand under the golden canopy of thine evening sky and I lift my eager eyes to thy face.

I have come to the brink of eternity from which nothing can vanish ⎯ no hope, no

happiness, no vision of a face seen through tears.

Oh, dip my emptied life into that ocean, plunge it into the deepest fullness.

Let me for once feel that lost sweet touch in the allness of the universe.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८७ ☆

☆

शोधशोधुनि तिज माझ्या कुटीरी

आलो तुझिया भव्य मंदिरी॥

*

हुलकावणी मज देऊन गेली

पुन्हा न माझ्या घरी परतली॥

*

इथे उभा मी तुझिया द्वारी

सुवर्णमंडित आकाशमंदिरी॥

*

जीस गमावले तिच्या प्राप्तीचा

मार्ग दावशील तू खात्रीचा॥

*

शाश्वततेच्या काठावर तो

सुखदुःखांचा नाश न होतो॥

*

रिक्त माझे जीवन फिरुनि

पुनःपुन्हा तू देशी भरुनि॥

*

स्पर्शू दे मज त्या विश्वाला

जन्म पुनश्च देई मजला॥

☆

– क्रमशः भाग २९..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वय असतं का पावसाला? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

☆

वय असतं का पावसाला?

असतं की…

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षांचा असतो.

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षांचा असतो.

ट्रेकिंग करतांना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो.

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची.

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची.

नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात, आणि नातवंडांना ओरडतो पण की अरे भिजू नका रे पावसात.

आपल्याबरोबर बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं, किती पहावा पाऊस

*

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले.

 *

वय पावसाला नाही

वय मला भिवविते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते.

 ☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री गणित आयुष्याचे… + संपादकीय निवेदन – डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शैलजा करोडे

💐 अ भि नं द न 💐

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांचे हस्ते, आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ शैलजा करोडे यांच्या ‘ मेंदीच्या पानावर ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पनवेल येथे झाले. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. श्रीमती करोडे यांच्या साहित्यिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यापुढेही त्यांची साहित्यिक वाटचाल अशीच चालू राहो यासाठी शुभेच्छा!🌹

या काव्य संग्रहातील एक कविता “स्त्री गणित आयुष्याचे” आज प्रकाशित करत आहोत.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्त्री गणित आयुष्याचे ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

☆

स्त्रीची भूमिका अनेक

माता भगिनी वहिनी

सून आई अर्धांगिनी

यात घडते गृहिणी

 *

कुटुंबाला सावरते

स्वइच्छेला तिलांजली

मोती नात्यांचे ओवते

उपेक्षांना श्रद्धांजली 

 *

चालविते ती प्रपंच

मांडी जीवन गणित

बेरजेला देई थारा

वजाबाकी सदोदित

 *

चिन्ह फुलीचे गुणते

गुणाकार आनंदाचा

तिच्या पदर छायेत

ठेवा मिळतो सौख्याचा

 *

पाया असते घराचा

बंध नात्यांचे जपते

क्षेत्र तिचे वर्तुळाचे

केंद्रस्थानी वावरते.

 *

अर्थ संकल्प घराचा

मांडितसे शिताफीने 

तूट भरून काढते

आकारते शिलकीने

☆

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares