मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दागिना… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दागिना ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

  लक्ष्मीहार, मोहनमाळ

 गळा वैजयंतीमाला

 कर्णभूषणे, नथीचा आकडा

 विलसतसे ही बाला….. १

  *

 कटीस मेखला, कुंतली पुष्पे

 नुपुरे रुणुझुणुती

 गोठ, पाटल्या करात कंगन

कानी किणकिणती…. २

 *

 मोतीयाचे झुंबर कानी

 तसाच रत्नहार

 मजसी वाटे अशाश्वत हा

 सकल साजशृंगार….. ३

 *

 माय पित्याने आहेर मजसी

 संस्कारांचा दिला

 दया, माया, प्रेमाचा मज

 दागिना शाश्वत अर्पिला….. ४

 मानवतेचा कंठमणी

 घालुनी मी मिरवते

 अमूल्य माझा असा दागिना

 अभिमानाने जपते….. ५

*

अवर्णनीय आनंद त्याचा

 नच कसली तुलना

 तेज लकाके वदनावरती

 पूर्ण मनोकामना,….. 6

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मोकळे आकाश…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ मोकळे आकाशसौ. वृंदा गंभीर

व्हावे आज मज आकाश मोकळे

एका उनाड दिवसाचे एकांत सोहळे

 *

केली चाळीशी पार आता फिरावे

सारे कर्तव्य पार पडले का झुरावे

 *

मनातील मुक्त व्यंजनांना आडवावे

भावनांनाएकदा मोकळे ओसंडून द्यावे

 *

क्षितिज दोन्ही हाताने कवेत घ्यावे

पंखांनी भरारी घेऊन नभी उडावे

 *

पतीच्या साथीने प्रेमाच्या झुल्यात झुलावे

द्यावे सगळे बंधन सोडून बिनधास्त व्हावे

 *

नको वयाचा विचार पुन्हा तरुण व्हावे

विसीतील होऊन मन मोकळे जगावे

 *

मोगऱ्याच्या सुगंधापरी दरवळून जावे

हसत हसत एक दिन स्मशान मोकळे व्हावे

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ | पंढरीची वारी | ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

☆ | पंढरीची वारी | ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पाऊले चालती माऊलीसांगाती

पंढरीच्या वाटे आनंद किती

 *

विठ्ठल विठ्ठल मुखे घेती नाम

तोची एक असे सुखाचिये धाम

 *

विठ्ठल विठ्ठल करिती गजर

विसरला सारा संसाराचा भार

 *

सांभाळ माऊली तुची सर्व पाही

देई मज आता सुखाची साऊली

 *

शिणली पाऊले परि वाट चाले

कळस दर्शन घडावे म्हणून

 *

हात जोडोनिया मिटताच डोळे

पांडुरंग उभा रखुमाई सवे

 *

भेटतसे हरी मनी जीवेभावे

अंधार सरला प्रकाश जाहला

 *

हरि पांडुरंगा तारुन नेई बा

संसार सागरी घडावी ही वारी

 *

दर्शनाची आंस मज लागतसे

आणिक मागणे नाही दुजे काही

 *

फिरतो माघारी आनंदे संसारी

मनं तुझ्या पायी जरि वाहिलेले

💦🌨️

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य – आठवणी ☆ – श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य  – आठवणी ☆ 

दर वर्षी ,

खूप काही वाहून जातं

ह्या पावसात…

माणसं..,

घरं…,

संसार…,…

आणखी बरंच काही…!

पण.. . ,

आठवणी मात्र

वाहून जात नाहीत..

त्या तशाच राहतात,

मनाच्या खोल तळाशी

जिथे पाऊस कधी

पोहचूच शकत नाही…..!

 

©  श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? कवितेचा उत्सव ?

☆ निरोप☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

नऊ मास उदरी वाहूनी

सांभाळले मजला मातेने

उपकार अनंत असती मजवर

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

अनंत जन्म असतील घेतले

किती माता अन पुत्र किती

गणना त्यांची कशी करू मी

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

गुरुजनांनी शिक्षण दिधले

मायपित्याने ‘शहाणे’ केले

अनपेक्षित अलौकिक मज लाभले

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

सगेसोयरे आप्तस्वकीय

अकृत्रिम स्नेहे करती माया

जनव्यवहार शिकविला मजला

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

*

निरोप तुझा कसा मी घेऊ

जिथून आलो तेथेच जाणे

हेच ज्ञान मजला लाभावे सत्वर

निरोप घेतो कृतज्ञतेने।।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गुरुदक्षिणा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “गुरुदक्षिणा…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

हे काव्यपुष्प मी वाहते … गुरुदक्षिणा अत्यल्पशी

दक्षिणा ही निकस जरी … विद्या ही नित बावनकशी ।।

*

हा ज्ञान-स्वर्गच दाविशी … नित तो आम्हा तू भूवरी

परि दार आमचे तोकडे … घर जरी असे गंगेतीरी ।।

*

भाग्य आमचे थोर म्हणुनी … गुरु मिळाला तुजपरी

भरभरून करिशी दान तू … घ्यावे किती आम्ही करी ।।

*

कलियुगी या दाटले … ते द्रोण गुरु सगळीकडे

दक्षिणेला मान आधी … ज्ञानदान तिथेच अडे ।।

*

काही परी तुजसम गुरु … देणेच ज्यांना माहिती

तो एकलव्यही हळहळे … हे भाग्य नाही त्याप्रती ।।

*

सद्भागी आम्ही की करंटे … प्रश्न हा मजला पडे

तू गुरु आम्हा हे भाग्य … आम्ही शिष्य म्हणुनी तोकडे ।।

*

तव कीर्ती उज्ज्वल गुरुपदी … निशिदिनीच आहे वाढती

आतूर ज्ञानासाठी होऊ … शपथ आज ही तुजप्रती ।।

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॐ सदगुरु माऊली… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ॐ सदगुरु माऊली… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

सन्मार्ग दाविते

नीत ते प्रभूचे

बीजही पेरते

दिव्य अशा विचारांचे.

*

शाश्वत सुख

साधका मिळावे,

हेचि जीवनकार्य

ऐसे ती मानते…

*

बोध देती सत्याची

सर्व साधकास

होतील उन्नत

ही आस तियेस…

*

किलकिले होतील

किमान‌ कवाडे काहींचे

यत्न अविरत करीते

प्रवेशिती कवडसे प्रकाशाचे…

*

तूझ्या ग्रंथातील अनमोल शब्द,

मौनातील गूढ ते संवाद,

तूझे अस्तित्व जाणवे

सर्व साधकास उद्धरण्या….

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे… एक मन तुझ्या – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे… एक मन तुझ्या – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

एक मन तुझ्या अवघ्या भांडवला /

वाटता ते तुला येईल

कसे //१//

 

म्हणऊनि दृढ धरी

पांडुरंग/

देहा लावी संग प्रारब्धाचा //२//

*

तुका म्हणे ऐसे जाणावे

उचित/

तरी सहज स्थिर येईल

कळो //३//

 – संत तुकाराम.

 *

रसास्वाद:

तुझ्याकडे तुझा देह आणि त्यात वसणारे तुझे मन हेच एकमेव भांडवल आहे. ते तुला इतराना कसे काय वाटता येईल. म्हणूनच तू पांडुरंगा चरणी लीन होऊन त्यालाच फक्त दृढ विश्वासाने धरून ठेव. तुझ्या देहाला त्याच्या प्रारब्धाच्या वाट्याला आलेले भोग भोगून देत. ही महत्वाची बाब तुला नेमकेपणाणे कळली तर जीवनाला लाभणारी स्थिरता म्हणजे काय ते तुला कळून येईल. तुकाराम महाराजांचे हे स्वानुभव कथन आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खुणावतो मज हळूच चाफा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खुणावतो मज हळूच चाफा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

खुणावतो मज हळूच चाफा

अन् गुपित सांगतो काही 

माझ्यासम तू फुलत रहा ग

फुलत रहा लवलाही

*
फुलपाखरू जणू मजला वाटे 

भुईचंपक हा गोड 

धरणीवरती फुले उमलती 

गंधाची मजला ओढ 

*
देवासम हा श्वेतरंगी पण

वाटे मजला योगी 

देवचाफा कधी समाधीस्थ 

कधी वाटे रमता जोगी 

*

सोनवर्खिल्या रंगामधला

धुंद सुगंधी काया

मला भेटतो पानांमधूनी

अत्तर फाया द्याया

*
कवठी चाफा सुगंध देण्या 

ओंजळ भरुनी उमले 

संगतीत मी त्याच्या अविरत 

कवनांमध्ये रमले 

*
पानांमध्ये लपून बसतो 

हिरवा गंधित चाफा 

जरा शोधता किती फुले ती

दिसतो नुसता ताफा 

*

नागचाफा पिवळा चाफा 

तांबडा ही तो असतो

मनात माझ्या मोहिनी घाली

जिकडे तिकडे दिसतो

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ पाऊस आला मिरगाचा हो“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पाऊस आला मिरगाचा हो – ? ☆ श्री सुहास सोहोनी

पाऊस आला मिरगाचा हो,

सांगे हा मृगकिडा

लाल मखमली शोभे, खाली

हिरवा कातळ कडा…!!

*
दूत असे हा मृगमासाचा

पर्जन्याची देई चाहुल

पाउसधारा पडता भूवर

मृद्गंधाची पडते भूल…!!

*
हिरवे लेवुन सजली धरणी

जणु की रति मदनाची

तिच्या ललाटी तीट लावली

लाल रक्तिमा वर्णाची…!!

*
शुभशकुनी हा कीटक देईल

जगताला पर्जन्य

फला-फुलांतुन बहरुन येईल

स्वर्गीचे चैतन्य…!!

*
अवतरतो हा अवनीवरती

केवळ मृग मासात

अन्य समयि हा लपून बसतो

बहुधा लाल फुलांत….!!

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares