मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – माप म्हणे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – माप म्हणे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

माप म्हणे मी मविते/

भरी धनी ठेवे रिते //१//

 

देवा अभिमान नको/

माझे ठायी देऊ सको//२//

 

हाती सूत्र दोरी/

तुका म्हणे त्याची दोरी //३//

  – संत तुकाराम.

 *

 तुका म्हणे

फक्त मोजत रहाणे हेच कोणत्याही मापाचे काम असते. त्या मापाला भरून ठेवणे किंवा रिकामे ठेवणे हे त्या मापाच्या मालकाच्या मालकाच्या हातात असते. कारण त्या मापाचा मालक दुसराच कोणी तरी असतो. तसा माझा देव हाच माझा मालकही आहे. म्हणूनच तुकाराम महाराज देवाला मला अभिमान येऊ देऊ नका अशी विनवणी करतात.

आपल्या जगण्याची आणि जीवनाची दोरी देवाच्याच हातात आहे. हा सर्व मोठेपणा देवाचाच आहे. आपल्याकडे कर्तृत्वाचे सामर्थ्य देणारा किंवा न देणारा परमेश्वरच आहे. म्हणूनच माप भरणे किंवा ते रिकामे ठेवणे हे त्याच मालकाच्या इच्छे प्रमाणे घडते. ही वस्तुस्थिती मी ओळखून आहे. म्हणूनच मला कर्तेपणाचा अभिमान येऊ देऊ नकोस. हा सर्व तुझाच अधिकार आहे. मी फक्त तुझ्या हातातील खेळणे आहे. आपल्या जीवनाचे असे सूक्ष्म आवलोकन करून तुकाराम महाराज परमेश्वर चरणी नतमस्तक होतात.

तुका म्हणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहुणा ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहुणा ? श्री आशिष  बिवलकर ☆

कुणी ना देखिला जगी,

श्वास कसा दिसतो |

चेतना असते जोवरी,

देहात तो वसतो |

*

शरीर एक नश्वर झोपडी,

श्वास राही त्यात पाहुणा |

पाहुणा जाता सोडून,

झोपडी निरर्थक म्हणा |

*

चोचले देहाचे चाले,

जोवर चालतो श्वास |

कोंडाता श्वास मात्र,

काळ घेतो त्याचा घास |

*

संसार सुखाचा थाटता,

येते प्रापंचिक जबाबदारी |

अखेरच्या श्वासापर्यंत,

सुटत नाही दुनियादारी |

*

कोणी रंक असो वा की राव,

विकत मिळेना त्यास श्वास |

जितकी आयुष्याची दोरी,

तितकाच इहलोकीचा प्रवास |

*

किती वर्ष जगला यापेक्षा,

कसा जगला यास अर्थ |

चौऱ्याऐंशी लक्ष योनी,

अन्यथा भ्रमण ते व्यर्थ |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मूठ आणि माफी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मूठ आणि माफी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

राग येता पराभवाचा 

मूठ आपटे दाणकन

राजा चौसष्ट घरांचा 

बसे हरवून मग भान

*

भाव दिसती आश्चर्याचे 

गुकेशच्या चेहऱ्यावरती 

शांत संयमी “राजाची”

केली त्यानेच फजिती

*

सावध होऊन कार्लसन

माफी मागे गुकेशची 

करून हसत अभिनंदन 

पाठ थोपटे मग त्याची

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चला वाचवू श्वास मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ चला वाचवू श्वास मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 

मराठमोळ्या महाराष्ट्राच्या

मुखात भाषा फक्त मराठी

जुन्या जाणत्या इतिहासाचे

करते रक्षण तख्त मराठी

*

इथे जन्मल्या माणसातल्या

धमन्या मधले रक्त मराठी

परंपरागत देव पुजेला

इथे नांदले भक्त मराठी

*

सह्याद्रीच्या कडे कपारी

स्वातंत्र्याचे गीत मराठी

बळकट दणकट समाजातली

सणवारांची रीत मराठी

*

वावरताना इकडे तिकडे

इथे चालते शिस्त मराठी

सबलदुर्बला साठी सुद्धा

सदा जागती गस्त मराठी

*

रंग मराठी संग मराठी

आस मराठी ध्यास मराठी

भाव मराठी ठाव मराठी

चला वाचवू श्वास मराठी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ व्यास पौर्णिमा– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ व्यास पौर्णिमा– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जीवन ज्यावेळी जाहले सुरू

माता माझी झाली हो प्रथम गुरू ॥

*

गेले मी शाळेत शिक्षणाला

अनेक विषय ते शिकण्याला

सुरवंटाचे केले ज्यांनी फुलपाखरू

शिक्षक माझे सारे जीवन गुरू ॥

*

जाण हो आली अशी मम मनाला

गुण सा-यांचे येती निदर्शनाला

म्हटले गुण घेण्याचा तो प्रयत्न करू

सृष्टी सारी झाली हो आदर्श गुरू ॥

*

कळेना कसा हा काळ लोटला

सा-यांनी नकळत गुरू बदलला

गुरूंनाही वाटे जो त्यांचाच गुरू

मोबाईल जाहला सकल गुरू ॥

*

नको आता आई ही , नको शाळा ही

नको ते निरीक्षण , नको लिखाण ही

मोबाईल तो सर्वकाळ हातात धरू

इ जगात वावरताना , बरा इ गुरू ॥

*

कोणताही असो गुरू , आम्ही घडलो

जगामधे त्यांच्यामुळे आम्ही तरलो

व्यासपौर्णिमेला त्यांचे स्मरण करू

लीन होऊनिया जरा चरण धरू ॥

*

गुरू सारखा ना जगी दुसरा महा

तस्मै श्री गुरवे नम:

म्हणा तस्मै श्री गुरवे नम:

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ माझ्या या संसारी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ माझ्या या संसारी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सडा संमार्जन / चुल मुलं काम /

हेच चार धाम / देवा माझे //१//

*

दळीते कांडीते / नाव तुझे घेते /

आवडे करिते / घर काम //२//

*

रांधिते वाढिते / उष्टे मी काढिते /

घर आनंदिते / सेवाभावे //३//

*

धुणं भांडी सारी / करता करता /

विठ्ठल जपता / समाधान //४//

*

काळजी सर्वांची / घराची दाराची /

सुश्रुषा मोठ्यांची / अत्यादरे //५//

*

घर टापटीप / शोधते सौंदर्य /

अतिथी औदार्य / त्यात देव //६//

*

साथीदार माझा / साथ त्याची देते /

शेतात राबते / सवे त्याच्या //७//

*

काटे कुटे कष्ट / शिवार पंढरी /

माझ्या या संसारी / पांडुरंगा //८//

*

जरी कष्टकरी / भक्ती तुम्हावरी /

पांडुरंग हरी / ध्यास तुझा //९//

*

एक आस आहे / तुझ्या दर्शनाची /

वेळ निर्वाणीची / येण्याआधी //१०//

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सहिष्णूपणे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सहिष्णूपणे ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अपेक्षांची अखंड पानगळ सोशित

वास्तवाच्या ग्रीष्मात

निष्पर्णपणाने उभं आहे झाड.

 

थेंबभर पाण्यासाठी दाही दिशांना

वणवणतायत मुळं,

पण चुकूनही मिळत नाही त्यांना

कणभरही ओलावा.

जाग येण्यापूर्वीच पाखरांचे निघून जाणे

गृहित धरलेले आहे झाडाने.

कृतघ्न हातातील कुऱ्हाडी अन् करवतींची

भीती तर आजन्मच दबा धरुन मनात.

 

” घरट्यांचे काय? ” विचाराल तर

ओकेबोकेपणीही झाडं उभं आहे

ते त्यांच्यासाठीच

सहिष्णूपणे.

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ वचन :: एक अनुभूती ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ वचन :: एक अनुभूती ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

 आमच्या काव्यसाधना समूहात प्रत्येक वेळेस मी एक चरण देतो आणि त्यावर पुढच्या खेपेला सर्व कवी कविता करून सादर करतात. तसा चरण लिहायला मी बसलो; पहिल्या दोन शब्दांनंतर ‘हळुच वळू दे’ हे शब्द आले आणि अचानक माझे भान हरपले. मी उन्मनी अवस्थेत गेलो. माझी लेखणी चालत होती. पण मला मी काय लिहितोय याचे भान नव्हते. कोणी तरी माझ्याकडून लिहून घेत आहे हे मला जाणवत होते.

आणि त्यातून साकारली खालील ‘वचन‘ ही कविता :

☆ वचन ☆ डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆

आयुष्याच्या वळणावरती हळुच वळू दे मला

शाश्वत राहिल साथ आपुली देते वचन तुला ||ध्रु||

मार्गावरती असंख्य अगणित किती खाचखळगे

पुढचे पाउल पुढेच पडले नाही वळले मागे

ध्येयप्राप्तीचा निर्धाराने अंगिकारला वसा

उतून मातुन खचून नाही कधी सांडला पसा ||१||

वाटेवरती भुलवित होत्या किती मोहवासना

मोहापायी भुरळून जाऊन ध्येया सोडले ना

उत्कर्षाचा ध्यास मनातून निग्रह होता केला

हाती घेउन हात आपुले पंथ कंठला होता||२||

झपाटलो होतो जिद्दीने उद्दिष्टासाठी

बुद्धी आणिक जिद्दचि केवळ होते अपुल्या गाठी

हाती होते हात अपुले साथीचे विश्वासाचे

नैराश्यातून एकेमेका स्फूर्तीला द्यायचे ||३||

वाटेला या सरळ जायचे क्षितिजाला शिवण्या

यशोमन्दिराचे हे वळण आहे मजला वळण्या

कर्मपुर्ती ही कर्तव्याची नाही रेंगाळणे

मार्ग सोडूनी हा आता पुढचाची अनुसरणे ||४||

होते आहे असेन मी तर सदैव तुझ्याच संगे

दिला शब्द न कधी सांडोनी वळेन ना मी मागे

असा सरळ तू अनुसर अपुल्या विहीत मार्गाला

वास तुझ्यातच शाश्वत आहे देते वचन तुला ||५||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आताही जोडीने करू वारी… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशीष ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आताही जोडीने करू वारी… – चित्र एक काव्ये दोन ? सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

आयुष्यभर जोडीने केली

पंढरीची प्रत्येक वारी

अचानक मागे सोडून गेला

आभाळातील देवाघरी

*

 तुमच्या विना वारीला येणं 

 नकोनकोसं वाटत गेलं

 परंपरा माऊलीची ओढ

 म्हणून यायचंच ठरलं

*

 तुमच्याविना पाय निघेना

 तुळस वृंदावन घेतले डोई

 माऊली दर्शन घडवायला

 तुमचा फोटोच घेतला बाई

*

 चंद्रभागेत अंघोळ उरकली

 तुम्हाला अंघोळ घालते

 छातीशी घट्ट फोटो धरून

 जोडीने विठू दर्शन घेते…..

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

श्री आशिष बिवलकर

धन्य झाली चंद्रभागा,

घालून ऐसे पवित्र स्नान |

पुसल्या कुंकूवाचा,

माऊलीने राखला मान |

*

वैष्णवांचा सोहळा रंगला,

चंद्रभागेच्या वाळवंटी |

मन तृप्त होते,

सख्या पांडुरंगाच्या भेटी |

*

कारभाऱ्यासंगे करू लागली

कारभारीण पंढरीची वारी |

साथ जरी सुटली या जन्माची,

स्मृतींना घेऊन विठ्ठलाच्या दारी |

*

यापुढे तो जरी नाही संगतीला

शेवटपर्यंत वारी नाही चुकणार |

विठूराया तूझ्या दर्शनाला,

सोबत त्याला ती असाच आणणार |

*

कोणी म्हणा साधीभोळी,

कोणी म्हणा तिला आडाणी |

वेड्या मायेच्या स्नानाने,

पवित्र झाले चंद्रभागेचे पाणी |

*

सुखाचा संसार करतांना,

जीवापाड लावली तिने माया |

सांग रे पंढरीच्या नाथा,

असं पुण्य जाते का जन्मी वाया |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारकरी श्रेष्ठ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ वारकरी श्रेष्ठ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

आहे वारकरी| सुखी समाधानी |

भक्ति भाव मनी | विठूराया |

ओळख वारीची| मायभूमी एक|

जाती ह्या अनेक|  भेद मोठे|

कळले ज्ञान्याला| एकीच्या मिषाने|

घडविले त्याने| वारकरी|

तुका म्हणे तेणे|एकीची ही वारी|

जाऊया पंढरी| एकादशी|

भंगलेली मने| व्हावीत अभंग|

होऊ या नि:संग| वारीसाठी|

वारीला जातांना| काय दिसे चित्र|

वारकरी मित्र| भाव मोठा|

येथे कोणी नाही| ज्येष्ठ नि कनिष्ठ|

वारकरी श्रेष्ठ| वंदनीय|

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares