मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०४ ☆ पावसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०४ ?

☆ पावसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

पावसा आता तुला कंटाळले

जा म्हणूनी हात आहे जोडले

*

काल मी आतूर होते भेटण्या

भेट पहिली छान होते नाचले

*

भंग केला तू कराराचा असा

वागणे आहे तुझे हे टोचले

*

मित्र होता आज झाला शत्रु तू

तू तुडवता शेत माझे लोळले

*

एवढ्या वर्षात नाही जाहला

वेधशाळा देत आहे दाखले

*

सांगना तू काय आता खायचे

तू बरसला पीक सारे नासले

*

गाळ हा शेतात होता साचला

वाटले मी विस्तवातुन चालले

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुकया खरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ तुकया खरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुकयाची भाषा विनाशीत दोषा

ज्ञानीयास रोषा गगनापरी.

*

अज्ञानाचे मुळ अभंडाचा अहं

शरिराचा स्वयं थोतांडराजा.

*

संताचीये बोध आत्मभक्ती शोध

परमात्मा वेध विठ्ठलध्यान.

*

अचाटाची गाथा मार्तंडाशी लाथा

घालीतसे गीता तुकातत्वांनी.

*

उपमाही सत्य सुर्य-चंद्र नित्य

दर्शनास पथ्य संतवचने.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वणवण बळीराजाची… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वणवण बळीराजाची…? श्री आशिष  बिवलकर ☆

बरसू लागलेत काळे ढग,

बरसू लागलेत डोळ्यातून अश्रू |

जणू दोघांत लागलीय स्पर्धा,

बळीराजा म्हणे कुठं दुःख विसरू |

*

उभी पीकं झोपली शेतात,

दाण्यादाण्याला फुटला अंकुर |

फुटलं नशीबच सारं आता,

निसर्गा एवढा कसा झालास क्रूर |

*

हताश झालाय रे बळीराजा,

अस्मानी सुलताना आता घे आवर |

पीक नाही आलं हाताशी,

भकास झालाय शेतीतला वावर | 

*

ऐन सणावाराला ऐन दिवाळीत,

बळीराजाचं तोंड झालंय कडू |

हुंदक्यात जगण्याची भैरवी गातो,

शेतकऱ्यांना कोसळू लागलंय रडू |

*

फाटकच लुगडं कारभारणीला,

फाटकीच लाज झाकाया लंगोटी |

लेकरंबाळं उघडी फिरती गावात,

पिकाविना शेतीच झाली वांझोटी |

*

मायबाप सरकार झालं बहिरं,

बळीराजाचा आक्रोश ऐकूच येईना |

बळीराजाची जगायची वणवण,

दाही दिशा काही केल्या संपेना |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पौर्णिमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ठाव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खोडले मी तुझे नाव नाही

मांडला वेगळा खेळ नाही

*

पालखी वाहतो विठ्ठलाची

ठेवला अंतरी भाव नाही

*

प्रेमिकेला इथे भेटला तो

प्रेमवेडा कुणी राव नाही

*

प्राणमाझा कसा यार घेता

टाकला नेमका घाव नाही

*

भावनांची जरा ओल शोधा

घेतलेला कुणी ठाव नाही

*

माणसांना लळा लावला मी

भेठला चांगला साव नाही

*

जिंदगीचा असा खेळ झाला

वेगळा मज दिला वाव नाही

*

शो़धतो मी किती काळ झाला

ओळखीचे कुठे गाव नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठ्ठला तू नाथ… ☆ सौ. किरण ढवळे बावनकर ☆

सौ. किरण ढवळे बावनकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विठ्ठला तू नाथ... ☆ सौ. किरण ढवळे बावनकर

विठ्ठला तू नाथ पंढरीचा

युगे अठ्ठावीस

विटेवरी तू उभा ॥१॥

*

रखुमाई माय माऊली आमची

आम्हा लेकरांवर नेहमी

कृपा असू दे मायेची ॥२॥

*

चंद्रभागेच्या तिरी वसली आहे

माझी पंढरी

जणू गंगा वाहे पंढरपुरातूनी

*

तुळशीमाळ घालुनी गाळ्यामंदी

भजन तुझे गाउनी

तुझ्या भेटीला पाऊली चालत येतो वारकरी…

*

कार्तिक एकादशी जणु सण आमचा वारकऱ्यांसाठी

टाळ, वीणा आणि मृदुंगाच्या नादावर

नाचते माझ्या हरीची पंढरी

*

पांडुरंगा तुझ्या नामाची गोडी लागे मनी

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

हेच भजन माझ्या ओठांवरी

© सौ. किरण ढवळे बावनकर

मणीकोंडा, रंगा रेड्डी डिस्ट्रिक्ट, हैदराबाद, तेलंगाना

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाढलेला मुक्काम – चित्र एक.. काव्ये दोन श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वाढलेला मुक्काम – चित्र एक.. काव्ये दोन ? श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के 

श्री प्रमोद वामन वर्तक

(१ )

फराळ खाऊन झाला 

तरी नाव घेत नाहीस जायचं,

बारा महिने तुझ्यासवे 

सांग कसं बरं जगायचं ?

*
रोजच सांजवेळी भिजवण

आम्हाला नाही आवडायचं,

तुझ्या संगतीत किती दिवस 

आम्ही आजारी पडायचं ?

*

मान्य आहे आमच्यामुळेच 

सारं ऋतुचक्र बदललंय,

पण आता तरी खरं सांग 

मुक्काम हलवायचं कधी ठरलंय ?

*

कवी : श्री प्रमोद वामन वर्तक

मानपाडा, ठाणे पश्चिम ४००६१०, मोबाईल – ९८९२५६१०८६

सुश्री नीलांबरी शिर्के

(२)

आवडतो तु म्हटले होते

चुकले का रे !

*
सगळ्या ॠतूतच तुझे येणे

नको नको रे !

*

उन्हाळा हिवाळा ॠतूही

आहेत गरजेचे रे !

त्यांच्यावरती कुरघोडी तव

नको नको रे !

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तूच... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तू

 

तू विचारलस, ” काय पाहिलंस माझ्यात ?”

 

तूच सांग, काय पाहतो आपण

पौर्णिमेच्या चांदण्यात?

श्रावणातल्या सरीत?

इंद्रधनुच्या सप्तरंगात?

 

तुझ्या डोळ्यांच्या डोहात पाहतोय

माझ्या स्वप्नांच प्रतिबिंब

तुझ्या सहवासाच्या जाणीवेत फुलतोय

माझ्या मनाचा गुलमोहर

तुझ्या स्मिताच्या हिंदोळ्यावर हेलकावतोय

माझ्या मनाचा पक्षी

तुझा प्रत्येक पदन्यास जणू माझ्या

जीवन पथावरील नाजूक नक्षी

आणि तरीही तू विचारतेस

” काय पाहिलंस माझ्यात?”

सारं काही स्पष्ट दिसेल

जर पाहिलंस माझ्या मनाच्या दर्पणात

सर्वत्र तूच माझ्या मनात

कणाकणात

रोमारोमात

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – तुज जसा कोणी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – तुज जसा कोणी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

तुज जसा कोण उदाराची रासी/

आपुलेंचि देसी पद दासा //१//

*

शुद्ध हीन कांहीं न पाहासु कुळ /

करिसी निर्मळ वास देहीं //२//

*

भावें हें कदान्न खासी त्याचे घरी/

आमट्यांच्या परी नावडती //३//

*

नवजासी जेथें दुरी दवडितां /

न तेही जो चित्ता योगियाच्या//४//

*

तुका म्हणे ऐसीं ब्रीदे तुझी खरीं /

बोलतील चारी वेद मुखें //५//

*

तुका म्हणे

तुकाराम महाराज देवाला त्याची ओळख करून देताना देवालाच अत्यंत आदराने म्हणतात, देवा या जगात तुझ्या सारखा तूच उदार मनाचा आहेस. कारण तू तुझे पद तुझ्या दासालाही सहजपणे देवून टाकतोस. जेव्हा तू हे करतोस तेव्हा तू ज्याला तुझे पद देतोस तेव्हा त्याची जात, कुळी, धर्म काय आहे हे पाहून भेदभव मुळीच करत नाहीस. फक्त ज्याचा देह निर्मळ आणि मन शुद्ध आहे की नाही तेवढेच पहातोस. शुद्ध आणि निर्मळ मनाच्या भक्ताच्या घरचे कदान्न ही तू आवडीने खातोस. पण जो अभक्त आहे त्याच्या घरचे तुला काहीही चालत नाही. तुला आवडतही नाही. नवागत भक्ताने तुझी मनोभावे भक्ती करायला सुरवात केलेल्या भक्ताला तू तुझ्या पासून त्याला दूर लोटताना कोणत्याही महान योगी पुरुषाला कधीच आढळले नाही. दिसले ही नाही.असा तुझा स्वभाव दिलदार आहे. ते तुझे ब्रीदच आहे. असे मी म्हणत नाही तर चारी वेद त्यांच्या मुखाने हेच सातत्याने बोलतात. देवाची ही खरीखुरी ओळख महाराज आपल्याला स्वानुभवातून सांगतात. आणि देवानेही कधी कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव पाळलेला नाही हे सप्रमाण दाखवून देतात. मग सामान्य माणसांनी, महापंडित व महान योगी पुरुषांनी तरी तो का पाळावा. समतेचा आणि समानतेचा केवढा महान विचार महारज किती सहजतेने सांगून जातात.आणि त्याचा किती मोठा परिणाम होतो हे सहजपणे लक्षात येते.

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ 

(काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.)

(१)

भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती

पंचप्राण जीव भावे ओवाळू आरती*

*

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा

दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा

*

काय महिमा वर्णू आता सांगणे किती

कोटी ब्रम्ह हत्या मुख पाहता जाती

*

राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही

मयूर पुच्छे चामरे ढाळती ठाईच्या ठाई

*

सत्व रजतमात्मक काकडा केला

भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला

*

तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा

विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥

(२)

सहस्र दीपै दीप जैसी प्रकाशली प्रभा

उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा

*

काकड आरती माझ्या कृष्णसभागीया

चराचर मोहरले तुझी मूर्ति पहाया

*

कोंदलेसे तेजे प्रभा आलीसे एक

नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख

*

आरती करता तेज प्रकाशले नयनी

तेणे नेत्रे मिळाला एका एकी जनार्दनी ॥

*

अशा अनेक आरत्या होऊन शेवटी तुळशीची आरती होते.

*

जय देवी जय देवी जय माये तुळशी

निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी

*

ही आरती सर्वांना ठाऊक आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही विठ्ठल मंदिरात काकड आरतीला जात होतो, तेव्हा तुळशीची एक वेगळी आरती म्हटली जायची. ती छोटीशी आरती या ठिकाणी देते आहे.

*

श्री तुळशी जय तुळशी मानव बोलता वदनी

ऐकून यमदुत बहु दूर पळती दिशा उल्लंघुनी

*

कोमल तुळशी वनी पाहुनिया हरीशी आनंद

अखंड राहे तेथे राधा रमणा गोविंद

*

या तुळशीची सेवा करता पुण्याच्या राशी

अपार संकट भोगुनी प्राण्या जाय मुक्तिशी

*

ओवाळू आरती तुळशी हरी पंकजनयना

कृष्ण तनया म्हणे सरली भ्रांतीची भ्रमणा ॥

*

यानंतर नियमितपणे सद्गुरुची आरती, कापूर आरती होत असे. याच ओघात सर्वांसाठी एक मागणं मागितलं जायचं.

*

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा /माझीया सकळा हरीच्या दासा

 कल्पनेची बाधा न हो कोणे काळी /ही संत मंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा न लागो राजसा/ माझ्या विष्णू दासा भाविकाशी

नामा म्हणे जया असावे कल्याण /द्या मुक्ती निधान पांडुरंग ॥

*

नंतर सगळ्यांना आरती दिली जायची. सर्वांचा सुका प्रसाद, फळं, तीर्थ एकत्र करून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जायचा आणि हळुवार पूर्वेला सूर्यबिंब प्रकट व्हायचं. आजही ही प्रथा खेड्यापाड्यांमधून आणि मंदिरांमधून सुरू आहे. मात्र तथाकथित आधुनिकतेचा वारा लागलेले लोक यापासून दूर आहेत. काही लोकांनी तिथेही ह्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. त्याला यश देणं हे आपल्याच सर्वांच्या हातात आहे !

विस्तारभयास्तव आज इथेच थांबते. अजून अनेक काकडआरत्या आणि भुपाळ्या आहेत. त्या आपल्यालाही ठाऊक आहेत.तुळशी विवाह होतो. नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीची समाप्ती ही सहसा गोपालकाल्याने केली जाते. यावेळी कुठे कुठे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह ही आयोजित केला जातो. येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आश्विन /कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद !

 – समाप्त – 

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७० – येता एकादशी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७० – विजय साहित्य ?

☆ येता एकादशी…!

(अभंग वृत्त)

येता एकादशी

वाजतो मृदुंग

वारकरी दंग

संकीर्तनी….. !

*

येता एकादशी

सांप्रदायी ठेवा

अंतरीच्या देवा

दंडवत…. !

*

येता एकादशी

नको जीवा भूल

कर्माचीच झूल

बासनात….. !

*

येता एकादशी

अबीर गुलाल

वैष्णवांचे भाल

उजळले…. !

*

येता एकादशी

धरू उपवास

हरीनाम खास

मुखी ठेऊ… !

*

येता एकादशी

चंद्रभागे स्नान

सौभाग्याचे वाण

पदरात…. !

*

कविराज शब्दी

एकादशी सार

तुळशीचा हार

प्रासादिक… !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares