मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ उंच हंडी ध्येयाची ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

☆ क्षण सृजनाचा ☆ उंच हंडी ध्येयाची श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आजकाल दहीहंडी हा एक इव्हेंट बनला आहे! लाखोंची उंच हंडी फोडायच्या नादात, अनेक तरुण गोविंदा कायमचे जखमी अथवा मृत झाले आहेत. म्हणून मी एक वेगळ्या प्रकारची हंडी फोडायचे आवाहन, आजच्या तरुणांना करतो आहे. ती हंडी फोडायचा त्यांनी जरूर विचार करावा! 🙏

😅🙏 उंच हंडी ध्येयाची! 😅🙏

उंच बांधा हंडी ध्येयाची

रचा मनोरा मेहनतीचा,

उच्च आदर्श धरूनी मनी

आयुष्य सुखाचे वेचा!

*

फोडतांना हंडी ध्येयाची

जरी कोसळला मनोरा,

प्रयत्न लावून पणाला

नव्या दमाने पुन्हा उभारा!

*

पार करा वाटेवरचे

थर सारे अडचणींचे,

लागता हंडी हाताला

बोल ऐका कौतुकाचे!

*

हाती येता वरचे श्रीफळ

फोडा हंडी तुम्ही ध्येयाची,

मजा लुटाल आयुष्यभर

गोड गोपाल काल्याची!

गोड गोपाल काल्याची!

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पानापानात मान…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “पानापानात मान…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

तुळशीचे पान – विष्णूपदी स्थान.

बेलाचे पान – शंकरजीचा मान..

केवड्याचे पान – नागाचे स्थान..

रुईचे पान – मारुतीची शान..

केळीचे पान – भोजनाशी छान ..

नागवेलीचे पान – गोविंद विड्याला छान..

मेंदीचे पान – शकुनाचा मान..

पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान..

पिंपळाचे पान – मुंजाचे स्थान..

गुलाबाचे पान – काटेरी छान..

कढीपत्त्याचे पान – फोडणीत स्थान..

आळूचे पान – अळूवडीला छान..

तमालपत्राचे पान – मसाल्याची शान..

वहीचे पान – लिहायला छान..

पुस्तकाचे पान – माहितीची खाण..

गवताचे पान – दवबिंदू शोभायमान..

ओव्याचे पान-सुवासिक छान

                   त्याला भजीत मान

तुळशीचे पान – स्मरण शक्तीला महान..

कोरफडीचं पान – त्वचेला छान…

आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान..

आंब्याचे पान – तोरणाची शान,

                     त्याला शुभ कार्यांत मान

पाना पानांचा राखा मान

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नैवेद्य – कवी : A. K. मराठे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नैवेद्य – कवी : A. K. मराठे ?  प्रस्तुती –  सुश्री नीलांबरी शिर्के 

“दाखवता” की “अर्पण करता” 

त्यावर सारं अवलंबून 

शब्द वापरताना सुद्धा 

एकेक अक्षर वापरा जपून ll

*
तुम्ही नैवेद्य “दाखवलात” 

तोही फक्त सुख “दाखवेल” 

प्रेमभराने अर्पण केलात

तोही सुख ढीगभर पाठवेल ll

*

नैवेद्याच्या पानावरती

काय वाढता गौण असतं

कसं वाढता त्याच्यावरती

देवाचंही प्रेम बसतं ll

*

एक वाढा, एकवीस वाढा

मोदक तो खातो थोडाच

त्याला फक्त भावाची भूक

त्याला वरणभातही गोडाच ll

*

घरातल्यांना, पै पाहुण्यांना

जसं वाढता आग्रह करून

तसाच त्याचा नैवेद्य वाढा

मनात प्रेम, भक्ती भरून ll

*

बाप्पा आणखी वाढू का

खा आणखी थोडं तरी

आग्रहाने म्हणून बघा

त्यालाच म्हणतात भक्ती खरी ll

*

दहा दिवसात एकदा तरी

असा नैवेद्य “अर्पण” करा

“मोद”कांची तुमच्यावरती 

वृष्टी करील खात्री धरा ll

कवी : AK (काव्यानंद) मराठे, कुर्धे, पावस, रत्नागिरी

 9405751698

प्रस्तुती : नीलांबरी शिर्के 

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समरूप… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ समरूप… ☆ सौ. गौरी गाडेकर

पाऊस म्हणजे पंचमहाभूतांचा खेळ

पृथ्वीवरील जलतत्त्व

अग्नितत्त्वाने तापून

वायुरूपाने आकाशात

नंतर आप होऊन पुन्हा खाली

असा हा युगानुयुगे चाललेला

पंचमहाभूतांचा खेळ

 

पाऊस आणि मी

हो. फक्त पाऊस आणि मी

सहस्रार चक्रातून

माझ्या शरीरात प्रवेश करून

मूलाधार चक्रापर्यंतचा

त्याचा प्रवास

क्षणार्धात

 

माझ्या शरीरातील

अणू-रेणू

पेशी-न-पेशी

विरघळून गेल्या

पावसात.

आणि माझं वेगळं अस्तित्व

उरलंच नाही

 

सर्जक, शामक

आणि क्वचित विनाशक

असणाऱ्या पावसाशी

मी समरूप होऊन गेले

मी पाऊसच होऊन गेले

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्यानंतर केवळ सत्तेसाठी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्यानंतर केवळ सत्तेसाठी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

प्रहार पाठीवर लाठीचे,

गोळ्या बंदुकीच्या छातीवर

मरण यातना तुरुंगात पण,

हृदयी स्वातंत्र्याचा जागर

*

तोडण्यास त्या दास्यशृंखला

वधस्तंभीही चढले हासत

असे क्रांतीचे शिपाई होते

भारत-मातेसाठी झुंजत

*

अखेर क्षितिजावर तेजोमय

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

आल्या क्रांती ऐवजी शूरांच्या

हाती शांतीच्या जप-माला

*

नवा गडी अन् राज्यही नवे

तंत्र नवे लागले कळू

भोग-लालसा भुजंग होऊन

डंख मारती हळूहळू

*

चोरी, अत्याचार, मुजोरी

कायद्याची ना तमा कुणा

मूठ दाबल्याविण फाइल ती

जरा पुढेही सरके ना

*

शतक वयाच्या जुन्या इमारती

उभ्या आजही डौलात

काल बांधले पूल-मनोरे

आज कसे कोसळतात?

*

हे ‘ते’ स्वराज्य नोहे ज्यास्तव

देशभक्त फाशी गेले

इंग्रज गेले, आम्हीच आमुच्या

देशाला पुरते लुटले

*

काबिज करण्या तख्त दिल्लीचे

पक्ष सांगती गर्जून

आम्हीच सक्षम राज्य कराया

द्या आम्हाला निवडून

*

क्रांति-विरांचे ते प्राणार्पण

अन् सत्तेसाठी ‘हे’ रणकंदन

अध:पतन पाहून विलक्षण

तुटती धागे आतुन आतुन

*

तरीही वंदनिय हिंदभूमी ही

मला तिचा अभिमान आहे

फडकत राहो उंच ‘तिरंगा’

तो तर आमुचा प्राण आहे

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – समचरणदृष्टि विटेवरी साजिरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – समचरणदृष्टि विटेवरी साजिरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी /

तेथे माझी हरी वृत्ती राहो //१//

*

आणीक न लगे मायिक पदार्थ /

तेथे माझे आर्त नको देवा //२//

*

ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी /

तेथे दूश्चित झणी जडो देसी //३//

*

तुका म्हणे त्याचें कळालें आम्हां वर्म

जे जे कर्मधर्म नाशवंत //४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

तुकाराम महाराज देवाकडे मागणी करताना म्हणतात. सर्वांभूती समदृष्टीठेवून तुझी साजिरी मूर्ती समचरणावरती जेथे उभी आहे तेथेच माझी दृष्टी कायम खिळून राहू दे. दूस-या कोणत्याही मोहमायेत मला गुंतवून तू माझे हाल करून नकोस. जी उच्य वर्गतील ब्रह्मादिक सामर्थ्याची पदे आहेत ती सारी दु:खाची गाठोडी आहेत त्यांच्याकडे माझी नजर सुद्धा फिरकू देवू नकोस. त्यातील खरे काय आहे ते मला आता पुरते कळालेले आहे. तेथे जे काही कर्मधर्म करावे लागणारआहे ते सगळेच नाश पावणारे आहे. फक्त तुझे सावळे रुपच तेवढे चिरस्मरणीय आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६३ – ओवाळू आरती..! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६३  – विजय साहित्य ?

☆ ओवाळू आरती..!

ओवाळू आरती सप्रेम, देवा गजानना

दुःखहारक, सुखदायी तू, पुरवी मनोकामना.. ॥ध्रु॥

*

रूप आगळे, जगावेगळे, तू जगताचा त्राता

बुद्धी दायक, गणनायक तू, सुख समृद्धी दाता

आबालवृद्धांचा ईश्वर तू, दूर करी वंचना…॥१॥

*

मुख्य पुराणे, अठरा अपुली, गाती तव महती

शिव,ब्रम्हा,स्कंद,विष्णू, तुजला साकारती

विविध कलांचा,आविष्कार तू, दे भक्तांसी चेतना..॥२॥

*

सत्य,त्रेता,द्वापार,कलियुगी, तुझाच रे अवतार

गौरी नंदन, पुत्र शिवाचा, गजवदनी साकार

संरक्षक,नी गाणपत्य तू, संजीवन यंत्रणा….॥३॥

*

बृहस्पती तू, वाचस्पती तू ज्योतिर्मय कांती

मयुरेश्वर तू, गणाधीश तू देसी सुख शांती

रक्तवर्ण तू, दैत्य विनाशक, ऐरावत आनना……॥४॥

*

मूषक वाहन,चतुर्भूज तू, लेखनिक नामी

भाग्यविधाता, विघ्नेश्वर तू, ये भक्तांच्या धामी

गजाननाची मंगल‌मूर्ती नित्य, नवी प्रेरणा…॥५॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ते गंध रांगडे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “ते गंध रांगडे...” ☆ सौ राधिका भांडारकर 

धुक्यात गेल्या अबोलवाटा ओलावुनि त्या स्मृती

स्पर्शात गंध जाणवे किती..

*

चंद्र नभीचा कधी खुणावे चमचमत्या चांदण्या

आरक्त शृंगारा सजविण्या…

*

सळसळ पानी शीळ वाऱ्यात थेंबात गळे कशी

ओल्यात होते वेडीपिशी..

*

का दुराव्यात क्षण हे वेचू माझे मला नकळे

संपले वाटता परत गळे..

*

ते क्षितिज उगा भासे उदास रंगात सोनसळी

मावळे गालावरची खळी…

*

वचनांना त्या वेढतो तमस मिटोनि त्या भावना

हुरहुरत झाकोळी कामना.. (का मना)

*

तू नसल्याचे दुःख मोडके उरावरी पेलते

खोटेच फूल दगडी खुलते..

*

त्या पुष्पांना नसतो सुगंध गडद रंग बेगडे

फांदीत झुले फक्त रांगडे

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “हो… ती बदलली…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “हो… ती बदलली ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

सारे सहजच म्हणतात

ती बदलली.. ती बदलली

हो… पण तिच्यासाठी

सोप्पे नव्हते हे काही….

*

अनुभवातून शहाणी झाली

बदलण्यासाठी तिने

मेहनत खूप घेतली….

*

कोणा आवडली

कोणा खटकली

नजर साऱ्यांनी रोखली….

*

एकदा नाही कित्येकदा

कधी जगासाठी

कधी स्वतःसाठी जगली…

*

मऊ मखमली पावली

काट्याकुट्यातून चालली

जपली तिने स्वतःची सावली…

*

अनेक प्रश्न ठेवुनी निरुत्तरीत

मन सुंदर विचारात व्यतीत

जगणे झाले अकल्पित…

*

जग दुनिया अचंबित

तिला पाहून सदा सुगंधित

ती दरवळते स्वतःलाच शोधीत…

*

हो… ती बदलली

प्रेमात स्वतःच्या न्हाहुन आली

सुंदर तिच्या विश्वात रमली

आनंदाने भरभरून जगू लागली…

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

कथादिष्विति गर्गः ॥ १७ ॥

अर्थ : भगवत कथा, भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे भक्ती होय, असे गर्गाचार्य मानतात.

विवेचन: महर्षी व्यासांचे मत सांगितल्यावर नारद मुनी गर्गाचार्यांचे मत सांगतात. गर्गाचार्य हे गर्ग मुनी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मागील सूत्रात आपण विविध प्रकारचे पूजाविधी पाहिले. परंतु पूजाविधी करायला अनेक प्रकारचे साहित्य लागते, तसेच योग्य स्थलकालादिकाची आवश्यकता देखील असते. कीर्तन, श्रवणभक्तीकरिता विविध साधनाची अपेक्षा असतेच असे नाही. वीणा, मृदंग, तालादी वाद्ये उपलब्ध झाली तरी उत्तमच, पण ते नसेल तर काही अडत नाही.

संत एकनाथ महाराज सांगतात,

“कलियुगीं दोष बहुत ।

केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।

तेथें दोषत्यागें जे गुण घेत ।

ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥

*

हरिकीर्तनें शुध्द चित्त ।

दोषत्यागें गुण संग्रहीत ।

ऐसे सारभागी कलियुगांत ।

परममुक्त हरिकीर्तने ॥ ५ ॥

संत तुकाराम महाराज हे कथे विषयी अतिशय अनुराग ठेवणारे होते, ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात –

*

“सांडुनि कीर्तन न करी आणीक काज ।

नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥ १ ॥

*

(अभंग क्रमांक २२४७, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

स्वतः नारद महाराज हे कीर्तन भक्तीचे अध्वर्यू मानले जातात. सतत नारायण नारायण या नामाचे संकीर्तन करीत ते तिन्ही लोकांत फिरत असतात. कीर्तनाची सर्वात सोपी व्याख्या म्हणजे भगवत्कथा, भगवतांचे गुण प्रेमाने गाणे, प्रेमाने श्रवण करणे.

संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.

सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावीं ।

सज्जनवृंदे मनोभावें आधी वंदावीं ॥ १ ॥

*

संतसंगें अंतररंगे नाम बोलावें ।

कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥ २ ॥

*

भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।

प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥ ३ ॥

*

जेणेंकरूनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची ।

ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥ ४ ॥

*

अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी ।

एका जनार्दनी मीमुक्त होय तत्काळी ॥ ५ ॥

*

कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. कीर्तनाला येणारे श्रोते आपल्याला काहितरी नवीन ऐकायला मिळेल या सुप्त हेतूने येत असतात. यासाठी किर्तनकार बहुश्रुत असणे अत्यावश्यक ठरते. बंध म्हणजे बंधन किंवा गाठ. श्रोता आणि वक्ता यात एक अनुबंध निर्माण व्हावा, जर हा बंध नसेल तर त्या कीर्तनात नियमाप्रमाणे सर्व काही होईल, पण त्याचा अपेक्षित प्रभाव जाणवेल असे म्हणता येणार नाही. त्या कीर्तनाची ‘कुडी आहे पण प्राण नाही’ अशी अवस्था होईल. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये ‘बंध’ निर्माण होण्यासाठी ते एकरूप झाले पाहिजेत. म्हणून समर्थ संप्रदायात ‘श्रोता वक्ता श्रीराम समर्थ’ असे आवर्जून म्हटले जात असावे. संतांचे ग्रंथ उदात्त हेतूने लिहिलेले असतात, त्यात पांडित्य नसते असे म्हणणे धाडसाचे ठरेल, परंतु ते ग्रंथ साधे, सोपे, सरळ असतात. त्यांचा अभ्यास केला, त्यानुसार आचरण केले की ते ग्रंथ मनुष्याला थेट आत्मारामाची भेट घडवून देऊ शकतात. म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यातून सरळ अर्थ काढावा आणि तो समाजापर्यंत पोहोचवावा. त्या शब्दाचे स्लेष काढत बसू नये.

संवाद साधायचा असेल तर शब्दांशिवाय पर्याय नाही. म्हणून किर्तनातच नव्हे तर दैनंदिन व्यवहारात देखील प्रत्येक शब्द जपून वापरावा. आमची आज्जी सांगायची घरात प्रत्येकाने जपून बोलावे, शब्द काळजीपूर्वक योजावे, कारण वास्तूदेवता सतत ‘तथास्तु’ म्हणत असते. बोलण्याच्या आधी विचार केला की बोलल्यानंतर आपल्याला विचार करावा लागत नाही असेही म्हटले जाते, यामागे मोठा अर्थ आहे. आपण तो समजून घ्यावा. आपली वाणी शुद्ध, वाचा नम्र आणि शब्द मनोहर असावेत. ‘चिंच म्हटले की तोंडाला पाणी सुटत असेल’ तर प्रत्येक शब्दाला किती मूल्य आहे हे आपल्या लक्षात येईल. इथे माझी एक कविता देत आहे.

‘ शब्द ‘

बोलके करतात ‘शब्द’

अबोल करतात ‘शब्द’

*

शुद्ध करतात ‘शब्द’

अशुद्ध करतात ‘शब्द’

*

मने जोडतात ‘शब्द’

मने दुभंगतात ‘शब्द’ 

*

पवित्र करतात ‘शब्द’

अपवित्र करतात ‘शब्द’

*

सबळ करतात ‘शब्द’

दुर्बळ करतात ‘शब्द’

*

नाती जोडतात ‘शब्द’

नाती तोडतात ‘शब्द’

*

विजयी करतात ‘शब्द’

पराजयी करतात ‘शब्द’

*

शस्त्र होतात ‘शब्द’

निःशस्त्र करतात ‘शब्द’

*

आधार देतात ‘शब्द’

निराधार करतात ‘शब्द’

*

जीवन देतात ‘शब्द’

मरण देतात ‘शब्द’

*

शब्द-शब्दात अडकला ‘शब्द’

शब्दातून सुटका करील ‘शब्द’

*

शब्द-शब्दात जप तू अर्थ

शब्दाविना ‘शब्द’चि व्यर्थ

*

रे मनुष्या…..! पाळ तू ‘शब्द’!

राजा हरिश्चंद्रही पाळी शब्द’!!

*

शब्द-शब्द पाळता ‘राम’

‘मृदूल’ शब्दे होई काम.

*

जय जय रघुवीर समर्थ!!

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ 

*

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १७

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares