डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “कधी कधी नि:शब्द व्हायला होतं- – – ” ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
☆
कधी कधी निशब्द व्हायला होतं
आणि डोळ्यात गहिवर दाटून येतो
*
आता जायाचच की कवातरी पटदीशी.
आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी,
आम्ही छंदी फंदी नादी नाना गुणी
केली फसवा फसवी न कीतीदा पडलो फशी,
इष्काच्या पायी कैक जणींचे रुणी
आता जायाचच की कवातरी पटदीशी :
– कवी वसंत बापट
☆
हि कविता आवडली म्हणून जवळच्या काहीजणांना पाठवली! सगळ्यांनी त्याला जमेल तसा प्रतिसाद दिला पण त्यापैकी एक रिप्लाय मला निशब्द करून गेला! तोच तुमच्यासोबत शेयर करतोय!
(टीप : हे यासाठी इथं शेयर करतोय की त्यातून नकळत इतर कुणाला प्रेरणा मिळाली तर पोस्ट सार्थकी)
*
(एका बहिणीकडून आलेला रिप्लाय… जसाच्या तसा… तिच्या शब्दात)
येतानाच “जायचे” कन्फर्म रिझर्वेशन घेऊन आलोय की सोबत! ! !
चालती बोलती आई, हॉस्पिटलमध्ये नेल्यावर नंबर लागेस्तो (आत पेशंट होता) मांडीवर डोके ठेवले, कधी गेली कळलेच नाही
माझे वय 22/23
एकटीच होते. व रिक्षावाला होता सोबत.
तस्सेच चालता बोलता exit मिळावी
बस्स! !
कधीतरी बोलेन.
माझ्या संसाराचा अभिमान चित्रपट झालाय.
मी जमेल तितकं आनंदाने जगते.
खडूस, म्हणून मी फेमस आहे.
वार्तेला विचार करुनच येतात कोणीही…
मेष रास, आक्रमक आहे.
एकदा एका प्रचंड टोकाच्या क्षणी विचार केला
अभी नही तो कभी नही
नाही अत्याचार सहन करायचा
DD भाई आहेत ना आपले! ! !
राहतील उभे पाठीशी.
पंखात बळ आले.
DD भाऊ कधी बघितला नव्हता बोललेही नव्हते.
गाठला SP
आता अत्याचार थांबले.
रेडलाईट भागातील बहिणीना जपतात, DD
मला ही जपतील.
या विचारानेच बळ आले होते.
असो
फिर कभी…
काळजी घ्या.
अनेक ताईंचा सहारा, विश्वास, आधार आहात तुम्ही
—
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





