मरणशय्येवर वडील निजलेले होते. समोर त्यांचा लाडका पुत्र. वडिलांना काही तरी सांगायचं होतं. मुलगा त्यांची मनोव्यथा जाणून घ्यायला आतूर झाला होता. वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘बाळा, ह्या घराशिवाय माझ्या पाशी काही नाही. जे होतं ते तुला वाढवण्यात आणि तुझ्या शिक्षणात मी खर्च केलं. मला अभिमान वाटतोय की माझा मुलगा परदेशातल्या एका
कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो आहे. माझं जे काही आहे ते ह्या कपाटात ठेवलं आहे.
मुलाला आश्चर्य वाटलं. लोक मूल्यवान गोष्टी बँकेच्या लाँकरमध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवतात. मुलाच्या शंकेखोर चेहऱ्याकडे बघून त्या लेखक वडिलांनी सत्य सांगितलं.’बाळा,ह्या कपाटात माझी प्रकाशित पुस्तकं,अप्रकाशित लेखन, वाचकांची खुशी पत्र आणि काही स्मृती चिन्हं आहेत. बास. एव्हढीच माझी पुंजी आहे. ती तुझ्याकडे सुपूर्द करतो.’
मुलाला ठाऊक होतं, वडिलांनी जन्मभर साहित्य साधना केली होती. म्हणूनच तो अभिमानाने म्हणाला, ‘बाबा, ह्या घरात मी साहित्यसंग्रहालय काढीन, तुमचं अप्रकाशित लेखन मी प्रकाशकांकडे पाठवीन, सगळ्या प्रशस्तीपत्रांचा एक अल्बम बनवीन, तुमचे पुरस्कार आणि स्मृती चिन्हं म्हणजे तर आपल्या घराण्याची अनामत ठेव होईल. कारण हे माझं वंश पारंपरिक धन आहे.’
खूप वेदना होत असतानाही वडिलांच्या डोळ्यांत आनंदाची चमक आली.
मूळ हिंदी लघुकथा-‘विरासत’ – लेखक – श्री सेवा सदन प्रसाद, खारघर, नवी मुंबई
मो. 9619025094.
मराठी अनुवाद –श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.
दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.
घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.
‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.
लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वितरण , दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.
लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.
एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवले लक्ष्मी शाश्वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.
काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होणे अपरिहार्य आहे. तसाच बदल मुंबईत साजरा होणा-या दिवाळीत झाला आहे… दिवाळी ही धनश्रीमंतांचे इमलेही उजळते व मन श्रीमंतांचे दरवाजेही उघडते..मुंबईची दिवाळी म्हणजे फटाक्यांचा दणदणाट, आतषबाजी, चमचमीत फराळ, सुगंधी उटणे, दिव्यांची रोषणाई असे बरेच काही असते..
दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढचं नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे उजळला पाहिजे. आज माणसांचं मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते ना अगदी तसच्चं…
मोबाईलच्या जमान्याने शुभेच्छा पत्र, मेसेजेस कालबाह्य झाली आणि आपली मन बँकवर्ड झालीत.
एकमेकांच्या संवादाचे सूर धुसर झालेले दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ख-या अर्थाने प्रत्यक्ष जगण्यातचं स्वतःला झोकून द्यावं . चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्यात त्यामुळे जीवनात नवचैतन्य निर्माण होईल.
सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवा तसेच या कालावधीतही वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा, कविता पाठांतर, गायन कथा-कथन अश्या स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे आपण एकत्र येतो व एकत्रित संवादही साधला जातो.
दिवाळी पहाट ही संकल्पना तर अतिशय सुंदर… सांस्कृतिक क्षेत्रातून केला गेलेला एक अनोखा कार्यक्रम.. दिवाळी पहाट संगीतमय व्हावी हा हेतू विविध कला असलेले कलाकार एकत्र येऊन कलेचे सादरीकरण घरघुती स्वरूपात करत होते. कालांतराने त्याचे सार्वजनिक स्वरूप झाले.आता तसे न करता ” दिवाळी पहाट ” ही घरघुती स्वरूपाचीच असावी त्यामुळे सर्वांना अगदी सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल व आनंदही लुटता येईल.
खरी ” दिवाळी पहाट ” झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येईल.
आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदा पासून वंचित आहेत या आनंदाला मुकले आहेत. अश्या लोकांबरोबर जर दिवाळी साजरी केली तर आपल्या बरोबरच सर्वांची दिवाळी सुखाची जाईल आणि सर्वांच्याच चेह-यावर आनंद दिसेल.
अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक अशांसाठी कामे करणा-या संस्थांना देणग्या द्याव्यात. त्यांच्या बरोबर जर आपण दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेह-यावरचे हसू आनंद आपल्या मनाला आत्मिक समाधान देऊन जातं ख-या अर्थाने दिवाळी साजरी होईल असे मी मनापासून नमूद करीन.. या सणामागचा उदात्त हेतू असा की कृतज्ञतापूर्वक माणुसकी जोपासून परोपकार करावा. सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच विश्वाचं पालन करणा-या महाशक्तीलाही विसरू नये..
भाग्यदायिनी लक्ष्मीदेवतेला आवाहन करणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा पवित्र सूर भाषेच्या पलीकडं जाऊन आपल्याला ज्या गीताशी तादात्म्य पावायला लावतो ते कन्नड गीत म्हणजे ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आणि शब्दार्थापलीकडच्या ह्या बंधांमधे महत्वाची भूमिका बजावतात ते ‘बिभास’ रागाचे सूर! मागच्या दोन लेखांमधे उल्लेखिलेल्या भूप व देशकार रागांचाच आरोह-अवरोह घेऊन त्यातील रे आणि ध हे दोन स्वर कोमल केले कि बिभास रागाचे आरोह-अवरोह मिळतात आणि त्यात फक्त रे हा एकच स्वर कोमल केला तर तो शुद्ध धैवताचा बिभास होतो. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे पद ह्यापैकी रे व ध दोन्ही स्वर कोमल असणाऱ्या बिभासातले आहे.
एकच आरोह-अवरोह पण त्यातल्या एक किंवा अनेक स्वरांचे ‘व्हेरिएशन’ वापरले गेले तर लगेच त्या रागाचा थाट बदलतो आणि काहीवेळा रागस्वरूपानुसार अगदी तेच सूर असणाऱ्या रागांचाही थाट भिन्न असू शकतो. यासाठी एक उदाहरण भूप-देशकाराचे देता येईल. एकच आरोह-अवरोह असूनही भूप ‘कल्याण’ थाटातला तर देशकार ‘बिलावल’ थाटातला! ह्याच आरोह-अवरोहात रे आणि ध कोमल झाले कि तो बिभास ‘भैरव’ थाटातला आणि फक्त रे कोमल केला कि तयार होणारा शुद्ध धैवताचा बिभास हा मारवा थाटातला!
आता ‘थाट’ म्हणजे नेमके काय? आजवर कुणीच कधीही कोणता थाट गायल्याचे कुणाच्याच ऐकिवात नसेल, तरीही थाटाचे इतके महत्व काय आहे? आणि थाट व रागात नेमका काय फरक आहे?
सप्तकातील मुख्य सात स्वर व त्यांपैकी पाच स्वरांची व्हेरिएशन्स म्हणजे पाच विकृत स्वर ह्या एकूण बारा स्वरांतून निर्माण होणारी सात स्वरांची वेगवेगळी ‘कॉम्बिनेशन्स’ म्हणजे थाट! हिंदुस्थानी पद्धतीत एकावेळी एका स्वराचे कोणतेतरी एकच स्थान विचारात घेतले जाते. म्हणजे प्रत्येक थाटात सा आणि प हे दोन अचल स्वर व उरलेल्या रे, ग, म, ध, नि ह्या पाच स्वरांचा शुद्ध किंवा कोमल/तीव्र ह्यापैकी एकच प्रकार वापरला जातो. एका स्वराची शुद्ध व कोमल किंवा शुद्ध व तीव्र अशी दोन्ही रूपं एकाच थाटात आढळून येणार नाहीत. थोडक्यात सा, रे, ग, म, प, ध, नि हे सात स्वर घेऊन केली गेलेली वेगवेगळी(स्वरांच्या शुद्ध/कोमल/तीव्र रुपांमुळे वेगळेपण ल्यायलेली) सप्तके म्हणजे थाट आणि एका थाटातील स्वरांची विविध ‘कॉम्बिनेशन्स’ म्हणजे राग! त्यामुळे थाटास रागांचे उत्पत्तीस्थान मानले आहे.
सोपं करून सांगायचं तर एक उदाहरण देता येईल. समजा सात ठराविक ‘इनग्रेडियन्ट्स’चे(पाककृतीसाठी साहित्य) किट तयार केले आणि आणि ते किट बऱ्याचजणांना देऊन काहीतरी रेसिपी तयार करायला सांगितली. त्यासाठी अट अशी ठेवली कि किमान पाच ‘इनग्रेडियन्ट्स’ तरी वापरायला हवे (रागात किमान पाच स्वर असावे लागतात) परंतू कोणता ‘इनग्रेडियन्ट’ किती प्रमाणात वापरायचा हे स्वातंत्र्य रेसिपी तयार करणाऱ्याला दिलं. आता विचार करता ह्या प्रकारे एकाच ‘इनग्रेडियन्ट्स’च्या ‘सेट’ मधून कोणतेही पाच/सहा/सात ‘इनग्रेडियन्ट्स’ वापरले ह्यासाठी गणितीय ‘परम्युटेशन-कॉम्बिनेशन’ पद्धतीनुसार ठरविक ‘रेसिपीसंख्या’ निर्माण होईल आणि त्यातही कोणता ‘इनग्रेडियन्ट’ किती प्रमाणात वापरला गेला ह्यानुसार रेसिपी वेगळी मानायची तर चवीत जाणवण्यासारखा फरक असलेल्या ‘रेसिपीज’ही गृहीत धरता येतील(उदा. भूप-देशकार)!
ह्यापैकी ‘इन्ग्रेडियन्ट्स’ म्हणजे एक ठराविक स्वरसप्तक/थाट आणि त्यातून दिलेल्या नियमांचे पालन करून तयार होणाऱ्या ‘स्वादिष्ट/रुचकर’ पाककृती म्हणजे राग! ‘स्वादिष्ट/रुचकर’पणावरच सगळ्यांना त्या ‘पाककृती’चं आवडणं/नावडणं ठरतं त्यानुसारच ‘कानाला भावणारे’ स्वरसमूह राग म्हणून अस्तित्वात आले. रागाबाबत आरोह व अवरोहात समान स्वरसंख्या व समान स्वर असावेत हे बंधनकारक नाही, त्यामुळे गणितीय पद्धतीने अनेक कॉम्बिनेशन तयार झाली. मात्र ते प्रत्येकच कॉम्बिनेशन प्रचलित झाले असे नाही त्याचे कारण म्हणजे ‘रंजयती इति राग:’ हा निकष आहे. ‘थाट कुणीही गायल्याचे ऐकिवात नाही’ ह्याचा अर्थ कळणे आता सोपे जाईल. नुसते कच्चे ‘इनग्रेडियन्ट्स’ कुणी खाऊ शकत नाही(तसेच नुसता थाट कुणी गाऊ शकत नाही). त्यातून निर्माण होणाऱ्या ‘स्वादिष्ट’ पाककृतीचा मात्र आस्वाद घेता येतो(तसेच कानाला सुखावणाऱ्या स्वरसमूहातून उभे राहाणारे विश्व म्हणजे राग!).
रागाला आरोह-अवरोह असतात कारण तरच वर्तुळ पूर्ण करता येते. थाटाला आरोह-अवरोह नसतात किंवा इतरही काही नियम नसतात… तो फक्त एक ‘सेट ऑफ नोट्स’! पुन्हा वार्चेच उदाहरण देता येईल. आधी नुसता कच्चा तांदूळ व त्यावर मसाले, तिखट-मीठ, कच्च्या भाज्या खाऊन मग वरती गरम पाणी पिऊन कुणी मसालेभात/बिर्याणी खाल्ल्याचं समाधान मिळवू शकेल का!? त्या ‘इनग्रेडियन्ट्स’वर(रागातील स्वर) योग्य त्या पद्धतीने(रागनियम पाळून) संपूर्ण प्रक्रिया(ठराविक आकृतीबंधात विस्तार करून राग खुलविणे) केली गेली तरच रुचकर पदार्थाचा आस्वाद घेता येऊ शकतो(राग मनाला भावणारा ठरतो.).
हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
अध्याय 18
(ज्ञाननिष्ठा का विषय )
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति॥
जो निस्पृह रह जितेन्द्रिय, नित, रखे बुद्धि निर्लिप्त
वह सन्यास प्रवृति से, पाता नैष्कर्मक सिद्धि ।।49।।
भावार्थ : सर्वत्र आसक्तिरहित बुद्धिवाला, स्पृहारहित और जीते हुए अंतःकरण वाला पुरुष सांख्ययोग के द्वारा उस परम नैष्कर्म्यसिद्धि को प्राप्त होता है॥49॥
He whose intellect is unattached everywhere, who has subdued his self, from whom desire has fled,-he by renunciation attains the supreme state of freedom from action.
( आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी की दीपावली पर्व पर एक विशेष कविता लक्ष्मी स्तवन। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ संजय दृष्टि ☆ दिपावली☆
अमावस बन
अंधेरा मुझे डराता रहा,
हर अंधेरे के विरुद्ध
एक दीया मैं जलाता रहा,
रोशनी की मेरी मुहिम
शनैः-शनैः रंग लाई,
अनगिन दीयों से
रात झिलमिलाई,
सर पर पैर रख
अंधेरा पलायन कर गया
और-इस अमावस
मैंने दीपावली मनाई।
आपको एवं आपके परिवार को शुभ दीपावली। आरोग्य, यश, संपदा, संतोष के दीपक सदा प्रज्ज्वलित रहें।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆