image_print

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हेमराजवाडीतील गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे  मनमंजुषेतून  ☆ हेमराजवाडीतील  गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆  प्रत्येकवर्षी गणपती आले की  गिरगावातील वेगवेगळ्या गणपतींची आठवण  येतेच.  सहा महिने आधीपासून रविवारी गणपती मंडळांच्या मिटींग्स चालू व्हायच्या .वाडीतील काही बुजुर्ग लोकाना अध्यक्ष,सचिव, खजिनदार अशी पदे देऊन सार्वजनिक मंडळाची नेमणूक व्हायची. वर्गणीवर चर्चा व्हायची, वाद आणि काही वेळा भांडणेही होत असत.  पण त्यामुळे कधी गणेशोत्सवात विघ्न येत नसे. सगळेजण गणेशोत्सव कसा चांगला होईल ह्यासाठी जोमाने कामाला लागायचे. ---- पण १९८७ च्या  हेमराजवाडीच्या  गणपतीची तयारी मात्र एक वर्ष आधीपासूनच चालू होती, कारण त्यावर्षी हेमराजवाडीतल्या गणपतीला ५० वर्षे होणार होती. त्यामुळे ते गणपतीउत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याची संपूर्ण जबाबदारी अशा कामात नेहेमी आघाडीवर असणाऱ्या  वाडीतील चार तरुणांनी  घेतली होती. वाडीतील असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्या मदतीला  होते. त्यामुळेच सुवर्णमहोत्सवी शिवधनुष्य वाडीतल्या रहिवाश्यांच्या साथीने व्यवस्थित  उचलले गेले. सुवर्ण महोत्सवाची तयारी पद्धतशीरपणे  चालू होती. एक महिना शिल्लक असताना बाबूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तसे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना येणे हे  नवीन नव्हते. त्याने सांगितले, " ह्यावर्षी  आपण गणपतीला  खरोखरच्या हत्तीवरून आणायचे ". सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले...
Read More

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट स्नेहाची ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले  मनमंजुषेतून  ☆ गोष्ट स्नेहाची ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆  दवाखाना अगदी बंद करताना, स्नेहा घाईघाईने आली . " मावशी, सॉरी हं जरा उशीर  झााला, पण थोडे बोलायचे होते." " अग बोल ना, काय आहे  प्रॉब्लेम."  " कुठून सुरवात करू, तेच समजत नाहीये मला....  तुम्हाला तर माहित आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, माझी जायची वेळ नक्की, पण यायची कधीच लवकर नसते हो. फार धावपळ होते माझी. तरीही, होईल ते सगळं करत असते मी.  आत्ताच प्रमोशन झालं आणि पगारही छान वाढला माझा. पण कसं सांगू , माझी मुलं सासूबाई सांभाळतात.  खूप मायाही करतात, लक्ष देतात मुलांवर.  पण परवा मी सहज भाजी केली तर अमोल म्हणाला,' शी ! आजीसारखी नाही झाली भाजी.  मला नको ही डब्यात.' --- असं अनेक वेळा झालंय, पण मी दुर्लक्ष केलं ! पण हल्ली हे वरचेवर व्हायला लागलंय.  मुलांना माझ्या कष्टाची किंमत वाटत  नाही, असं वाटतं मला.  बघा ना, माझ्या कंपनीतून कर्ज काढून, हे मोठं घर आम्ही घेऊ शकलो. दोघं कमावतो, म्हणून हे शक्य झालंय ना ! पण-- मुलं मला असं बोलली तर सासूबाईंना...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची वैदेही…. ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

मनमंजुषेतून ☆ आमची वैदेही.... ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆  नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली.. हा भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण! आणि आमच्या घरातही.. जन्मष्टमी म्हणजे "श्रीकृष्णाचा हॅप्पा" (हॅप्पी बर्थडे) म्हणून सकाळीच वैदेहीने तिच्या या "मित्राच्या" पूजेची तयारी केली.. सकाळीच देवासमोर बसून आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला "जन्मदिनमिदं..." म्हणून शुभेच्छा दिल्या, आणि मग घरातील देव्हाऱ्या व्यतिरिक्त असलेले बाळकृष्ण/श्रीकृष्ण गोळा करून देव्हाऱ्याशेजारी आपला वेगळा पाट मांडला, आणि आजोबांच्या बरोबर आमचीपण जन्माष्टमीची पूजा संपन्न झाली! (त्यात "दिवसभर सॉफ्ट कृष्ण सुद्धा हलवायचा नाही हं पूजेतून, आजी!" अशी मला दटावणी पण झाली) साक्षात भगवंताचा हॅप्पा साजरा करणारी ही "सहज भक्ती" सर्वांनाच मिळावी हीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आज जन्माष्टमी निमित्त प्रार्थना!   सौ. मेधा सहस्रबुद्धे पुणे मो  9420861468 medhasahasrabuddhe@gmail.com ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे..…! ☆ संग्रहिका : सौ. स्मिता पंडित

मनमंजुषेतून ☆ पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे..…! ☆ संग्रहिका : सौ. स्मिता पंडित ☆ घरी आल्यावर हातपाय धुतलेस का? चल उठ आधी, तशीच बसलियेस घाणेरडी! अग जेवायला बसायचं ना, हात धुतलेस का स्वच्छ? संध्याकाळ झाली, आधी तोंड धू आणि नीट केस विंचरून वेणी घाल. तोंड पुसायचा टॉवेल हात पुसायला घेऊ नको ग, गलिच्छ कुठली!  बाथरूम मधून बाहेर येताना पाय कोरडे कर, ओले पाय घेऊन फिरू नको घरभर! केस स्वयंपाकघरात नको ग विंचरू, अन्नात जातील, शिळ्या भाताचा चमचा ताज्या भाताला वापरू नकोस, खराब होईल तो, दुधाची पातेली एकदम वरच्या खणात ग फ्रीजमध्ये, खालती नको ठेऊ! वाट्टेल त्या भांड्यात दुध नाही तापवायच ग. तुझ्या भांड्याने पाणी पी, माझं घेऊ नकोस, अग केस पुसायच्या पंचाने अंग नको पुसू, बेक्कार नुसती!!! खोकताना तोंडावर रुमाल घे, कितीवेळा सांगायचं, आणि तो रुमाल स्वतः धू, बाकीच्या कपड्यात टाकू नको धुवायला, दुसऱ्याशी बोलताना चांगलं हातभार अंतर ठेवून उभी रहा, थुंकी उडते कधीकधी 😥. कशाला जाता येता मिठ्या मारायच्या एकमेकांना, घाम असतो, धूळ असते अंगाला ती लागेल ना! काहीतरी फ्याड एकेक,...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्व बदल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे  मनमंजुषेतून  ☆ स्व बदल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆  नाही म्हणू नका,  काहीतरी करून दाखवूया  दुसऱ्याला नाही,  तर स्वतःलाच बदलून दाखवूया    फुटपाथ हा फक्त चालण्यासाठी असतो फेरीवाले विक्रेते ह्यांच्या बापाचा नसतो  मान्य आहे,  रस्त्यातली खरेदी, वेळेची बचत करते  सर्व काही आपल्याला, स्वस्त्यात मिळते  अहो, घाणीचे साम्राज्य, तिथेच तर पसरते  सवय आपलीच, शहराची दुर्दशा करवते  तुम्हीच नाही म्हणा, ते बसणार नाहीत   रस्त्यात आपला ठेला, ते मांडणार नाहीत  विचार करा, विचार करा, आपल्या वरिष्ठ नागरिकांचा  रस्ता द्या हो त्यांना, त्यांच्या हक्काचा  नाही म्हणू नका, काहीतरी करून दाखवूया  दुसऱ्याला नाही,  तर स्वतःलाच बदलून दाखवूया    सिग्नलचे पालन करून, शिस्तीचे धडे गिरवू झेब्राच्या आधी, एका रांगेत गाडी थांबवू  नको तो हॉर्न, नको ती घिसाडघाई  मीच पहिला, अशी नको ती बढाई  उजव्या हाती आहे त्याला, पहिले जाऊ द्या हो  कोंडी न करता, इंधन आणि वेळ वाचवूया हो  गाडी पार्किंग करताना, दुसऱ्यांचा विचार करूया  वेगावर नियंत्रण ठेऊनच गाडी चालवूया  नाही म्हणू नका, काहीतरी करून दाखवूया  दुसऱ्याला नाही, तर स्वतःलाच बदलून दाखवूया    गावातील आपलेच बांधव, वणवण फिरतात  पाण्यासाठी अजूनही, त्यांचे हाल होतात  शहरात मात्र पाण्याचा, अति वापर करतात  आंघोळीला शॉवरखाली, तासनतास बसतात  पाण्याचे नियोजन करून, अपव्यय टाळूया  पावसाचे पाणी अडवून, बंधारे बांधूया  काहीही करून गावकऱ्यांना, दिलासा देऊया  श्रमदान करून गावांमध्ये, शेततळी बांधूया  नाही म्हणू नका, काहीतरी करून दाखवूया  दुसऱ्याला...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राखीची गोष्ट… कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ संग्रहिका – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई  मनमंजुषेतून ☆ राखीची गोष्ट… कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ 'राखीची गोष्ट' सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला  सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट.लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे ? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरतला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि  स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे..त्यावर 'वीर जवान , देश की शान' असं लिहलंय... लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी. लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला.खरं तर काजल राखी घेऊन जायचीयेय.तीच ती आर्मीवाली राखी.काजलचे आई बाबाही आहेत बरोबर.तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट. तर काय सांगत होतो ? परमिशन्स,रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला."बच्ची की चिंता मत करो , हम है ना !". मी कशाला नाही म्हणतोय...? लेक खुष....
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे मनमंजुषेतून ☆ शुक्रवारचे गरम चणे...... ☆ श्री विजय गावडे ☆   गेले ते दिन गेले. बालपणस्य कथा रम्य : जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची.  त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं.  तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे.  गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे. श्रावणातील शुक्रवार हा  आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा  वार असायचा.  आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ' शिगम्यान पावस नी चवतीन गिम ' अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे.  परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे ईश्वरा – डाॅ.निलीमा गुंडी ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे मनमंजुषेतून  ☆ हे ईश्वरा - डाॅ.निलीमा गुंडी ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆  हे ईश्वरा, तुझ्या  असण्याविषयीच्या  भोव-यात गुंतण्यापूर्वी नि तुझ्या बासरीच्या सुरांनी  मोहित होण्यापूर्वी  विचारायचा आहे  तुला  एक प्रश्न !  पुन्हा पुन्हा अवतार घेताना  एकदाही तू स्त्रीचा जन्म  कसा नाही  घेतलास ? तिच्या दुर्दैवाचे दशावतार  भोगायला का कचरलास ?  सोपे होते रे तुझे  कुब्जेला सुंदर करणे  नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे !  जगून तरी पाहायचे  त्यांचे अपमानित जगणे ! मोरपिसाच्या स्पर्शाने  बुजतात का क्षणात  सा-या जखमांचे व्रण ? नि शिळा जिवंत होताच  सरते का रे , तिचे अपराधीपण ?  हे सर्वज्ञा,  जन्माचे रहस्य  तूच  जिच्याकडे  सोपवलेस, तिच्या मनाचा थांग  तुला कसा नाही लागला ? डाॅ. नीलिमा गुंडी संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे ९८२२८४६७६२. ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दृष्टीकोन… ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे  जीवनरंग  ☆ दृष्टिकोन… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆  " चौकट आपल्या विचारांची " प्रत्येक गोष्टीला अनेक अर्थ असती जैसी ज्याची दृष्टी तैसे त्यास भावती | एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो 'रेघ खूप छान बारीक काढली',  तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे. हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय 'ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे'. पण आपलेच खरे हा दुराग्रह...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन धडे – श्री नारायण मूर्ती ☆ संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले मनमंजुषेतून ☆ तीन धडे – श्री नारायण मूर्ती ☆ संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆  (यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती यांनी सांगितलेले)  जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.  माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.  एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.” त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे.  म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली.  जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत...
Read More
image_print