सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर – ॥भावपूर्ण आदरांजली॥ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 पद्मविभूषण  डॉ. जयंत विष्णू नारळीकर 💐

(जन्म : १९ जुलै १९३८ / मृत्यू : २० मे २०२५)

🙏 संपादकीय निवेदन 🙏

💐 ॥ भावपूर्ण आदरांजली ॥ 💐

अखिल भारत देशाचे भूषण असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, विज्ञानयोगी, जगप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे काल दु:खद निधन झाले. आपल्या ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे डॉ. नारळीकर यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली. 💐

डॉ. नारळीकर यांचा परिचय थोडक्यात करून देता येणे खरंच अशक्य आहे … पण तरीही एक प्रयत्न करत आहोत – – 

त्यांचा जन्म कोल्हापूर इथे एका प्रज्ञावंत कुटुंबात झाला होता. तेव्हाचे प्रसिद्ध गणितज्ञ रँग्लर विष्णू वा. नारळीकर हे त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत असल्याने डॉ. जयंत यांचे शालेय शिक्षण वाराणसीलाच झाले होते. त्यांच्या आई सुमती यांची त्या काळातल्या ‘संस्कृत विदुषी‘ अशीच ओळख होती. बुद्धीचा हा समृद्ध वारसा डॉ. जयंत यांनी आणखीच दिमाखदारपणे पुढे चालवला असे निश्चितच म्हणायला हवे. 

पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांच्या यशाचा झेंडा दिमाखात फडकताच राहिला. तिथे त्यांनी पी.एच.डी. ही पदवी, तसेच रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्रातील टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पारितोषिके मिळवली. भारतात परतल्यावर त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू केले आणि अखेरपर्यंत त्यांचे हे काम अव्याहत सुरूच होते. सुरुवातीला मुंबईतल्या “Tata Institute of Fundamental Research” या विख्यात संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते रुजू झाले. पुढे काही वर्षांनी पुण्यात स्थापन झालेल्या “आयुका” संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 

सर फ्रेड हॉएल यांच्या बरोबर काम करत असतांना त्यांनी ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’  हा महत्वपूर्ण सिद्धांत मांडला. अखेरपर्यंत ते स्वतःला याच क्षेत्रात झोकून देऊन काम करत राहिले होते. 

या जराशा रुक्ष समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात अगदी अचानकपणे त्यांच्यातला साहित्यिकही जागा झाला होता. त्यासाठी सुरुवातीला ते ‘ नारायण विनायक जगताप ‘ या टोपण नावाने विज्ञान कथा-स्पर्धेत भाग घेत असत हे अनेकांना बहुदा ज्ञात नसावं. पुढे त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला . तर ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या सुंदर आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या व्यतिरिक्त विज्ञानकथा सांगणारी त्यांची २५ हूनही अधिक प्रकाशित पुस्तके प्रसिद्ध आहेत. विविध मराठी नियतकालिकांमध्येही त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखनही सतत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादही झालेले आहेत. 

नाशिक येथे आयोजित केल्या गेलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

लेखिका डॉ. विजया वाड यांनी “विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर” या नावाने त्यांचे चरित्र लिहिलेले आहे. 

त्यांनी विविध माध्यमांमधून विज्ञान प्रसाराचे मोलाचे काम ‘आपले आद्यकर्तव्य’ समजून शेवटपर्यंत अगदी जोमाने केलेले आहे. खरं तर डॉ. नारळीकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. पण जाताजाता त्यांची समाज हिताची तळमळ अधोरेखित करायलाच हवी. समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला हवे ही त्यांची मनापासूनची तळमळ होती. पण त्याबाबतीतले त्यांचे विचार त्यांनी कधीच लोकांसमोर आक्रस्ताळेपणाने..अवास्तव भडकपणाने मांडले नाहीत. ते विचार नेहेमीच समाजाचा साकल्याने विचार करणारे, संतुलित, आणि ज्ञान-विज्ञान-तत्वज्ञान या तिन्हींचा उत्तम मेळ साधणारेच असत. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतलेल्यांना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी असे म्हणावेसे वाटते. 

डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी सुश्री मंगला नारळीकर ही दोन एकमेकांना अगदी पूरक अशी व्यक्तिमत्वे “माणुसकीचा खळाळता झरा” म्हणूनही का ओळखली जायची हे सांगणारा एक लेख आपण आजच्याच अंकात वाचणार आहोत. 

🙏💐पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐🙏

– संपादक मंडळ

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – १ + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था‘ पुणे जिल्हा शाखा यांच्यातर्फे ‘१ मे २०२५ – महाराष्ट्र दिना’ निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना त्यांच्या “पराधीन” या कथेसाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.💐

आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा पराधीन – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

शोभाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. तिच्या हृदयाची क्षमता दहा टक्क्यावर आली होती. मॉनिटरवरच्या आलेखावरून फिरणारा तो हिरवा प्रकाशाचा ठिपका धोक्याच्याच सूचना देत होता. शोभाचे सारे चैतन्यदायी घटक हळूहळू उतरत होते. व्हेंटिलेटर वर असूनही तिला श्वास घेणं प्रचंड त्रासदायक होत होतं आणि तिची छाती जोरजोरात उडत होती.

ताईला कळुन चुकलं होतं की शोभाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, या यातनांमधून शोभाला फक्त मृत्यूच सोडवू शकत होता. ताईला हे सत्य पटत होतं पण कितीही झालं तरी धाकट्या बहिणीने आपल्या आधी जावे हे सत्य स्वीकारणे तिला कठीण जात होते. शिवाय शोभाच्या जाण्याने काही नवीन प्रश्न उपस्थित होणार होते ते वेगळेच. सायलीचे काय?

खूप दिवसांपूर्वी शोभा ताईला म्हणाली होती, ” आयुष्यभर देवाने माझ्या पदरात नकारात्मक दानच टाकले. आता मात्र देवाजवळ माझं एकच मागणं आहे. माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी सायलीने या जगाचा निरोप घ्यावा. कोण करेल ग तिचं? कोण जबाबदारी घेईल तिची? आणि सायली ही माझीच जबाबदारी नाही का? ती मी अशी कशी कुणावर सोपवू शकेन? ”

बोलता बोलता तिला हुंदके आवरत नव्हते.

कोपऱ्यात एका टेबलावर सायली बसली होती. स्वतःशीच हसत होती, काही बडबडत होती. जणू काही आईचं दुःख, तिचं अश्रू गाळणं या साऱ्यांच्या पलीकडे तिचं वेगळं जग होतं.

त्यादिवशी ताईने शोभाला समजावले. मोठ्या बहिणीच्या मायेने तिला जवळ घेतले. पाठीवर थोपटले.

“अग! असं का म्हणतेस आणि तुला कशाला काही होईल? तू असे विचार करू नकोस. शेवटी आपल्या हातात काय आहे? माणूस हा पराधीन आहे. जे ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल पण एक लक्षात ठेव जो चोच देतो तो चाराही देतो. तू विश्वास आणि श्रद्धा ठेव. ”

भैय्यासाहेब गेल्यानंतर ताई, शोभा आणि सायलीला स्वतःच्या घरी घेऊन आली होती.

“आता तुम्ही इथेच रहा. मीही तर एकटीच असते. विनयला मी सांगितलं आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. ”

तसं पाहिलं तर सगळ्यांचीच आयुष्यं एकमेकात गुंतलेली. स्वतंत्र तरीही गुंतलेली. काही वर्षांपूर्वीच ताईच्या पतीचे निधन झाले होते. ताईला एकच मुलगा. विनय. तो अमेरिकेत स्थायिक. बाबा गेल्यानंतर ताई काही महिने विनय सोबत अमेरिकेत राहिलीही पण तिने जाणले की असे इथे परदेशात कायम राहणे मानसिक दृष्ट्या तिला शक्य नव्हते. विनयला तिने न दुखवता पटवूनही दिले

खरं म्हणजे जो तो आपापले आयुष्य जगत असतो. टप्प्याटप्प्यावर बदललेल्या आयुष्याची घडी सावरत असतो. पुढे जात असतो. भविष्यात काय घडणार हे कुठे ज्ञात असतं?

भैय्यासाहेब गेले. शोभा आणि सायलीचा आधार ढासळला. तशा त्या अनाथ नव्हत्या, शोभाच्या सासरची माणसं तशी जबाबदार आणि समंजस होती. जरी ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेली होती तरी कुणीही सायलीला आणि शोभाला नाकारलं नव्हतं, डावललं नव्हतं. पण ताईने आपणहून शोभाला मदतीचा म्हणण्यापेक्षा मायेचा, अपार विश्वासाचा, आधाराचा हात दिला. त्या दोघींचं एक प्रकारचं केविलवाणेपण ताईच्या काळजाला कुठेतरी चिरून जात होतं.

तेव्हापासून ताई, शोभा आणि सायली यांचं एकत्र जीवन सुरू झालं.

सोपं नव्हतं. प्रत्येकाचे आपापल्या आयुष्याचे कम्फर्ट झोन होतेच. आता एका निराळ्या समूहात आयुष्याची नवी सुरुवात करताना त्रास हा होणारच होता. शिवाय सायलीची स्वमग्नता हा त्यातला सर्वात दुबळा भाग होता. शोभाला सायलीची सवय झालेली होती. तिच्या वागण्या बोलण्यातला विचित्रपणा, तिचे कधी घसरणारे तर कधी प्रखर झालेले मानसिक कल, शोभाला सायलीच्या जन्मापासून तसे अंगवळणी पडले होते. आणि शेवटी शोभा एक “आई” होती. सायली तिच्या रक्तामांसाचा गोळा होता.

मावशी या नात्याने ताईला सुद्धा सायलीचा ऑटिझम ज्ञात होताच पण दूर असणं आणि सहवासात राहणं यात खूप फरक होता.

सायलीला तिच्या कुठल्याही वस्तुंना हात लावलेला चालत नसे. तिचे कपडे, तिच्या वस्तू, चपला अगदी केसाला लावायच्या पिना सुद्धा कोणी जागेवरून हलवल्या तर ती प्रचंड क्रोधित व्हायची. तिला सतत टीव्ही लागायचा. तिने लावलेला चॅनल कोणीही बदलायचा नाही. आवाज सहन न झाल्यामुळे तिला न विचारता जर टीव्ही बंद केला तर तिचा पारा चढायचा. शेवटी ती असाधारण आहे, वेगळी आहे, तिला कळत नाही, विचार करण्याची क्षमता तिच्यात नाही असा विचार करून, सायलीलाच केंद्रस्थानी ठेवून सारे व्यवहार करणं क्रमप्राप्त होतं.

एक दिवस ताई शोभाला म्हणाली,

“शोभा चूक तुझी आहे. अगं! अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात तिथे का नाही तू तिला घातलेस? तिथे ती काही शिकली असती. वेळीच तुम्ही दोघांनी हा विचार का नाही केला? ”

“ताई तिच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही केलं होतं ग! तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचाही विचार केला नाही पण नशिबाचे फासे उलटेच पडले. ”

शोभाचा आवाज रडवेला होत गेला, डोळे वहायला लागले.

सायली भिंतीला टेकून ताठ उभी होती, तिचे डोळे वटारलेले होते. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. तिला पाहताच ताईने संवाद तोडला. विषय बदलला.

ताईला का माहित नव्हत्या शोभाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना?

भैय्यासाहेबांना लोकल गाडीत चढताना झालेला तो भयाण, जीवघेणा अपघात! त्यातून ते वाचले तरीही पूर्ववत कधीच झाले नाहीत. कायमचे अपंगत्व आले, नोकरी सोडावी लागली.

थोडीफार सेव्हींग्ज, साचलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, घरून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा आणि पुढे उरलेलं लांबलचक आयुष्य.

शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा.

देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ श्री शारदा दयाल श्रीवास्तव का व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” लोकार्पित ☆ प्रस्तुति – श्री सुरेश पटवा ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹 श्री शारदा दयाल श्रीवास्तव का व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” लोकार्पित ☆ प्रस्तुति – श्री सुरेश पटवा 🌹

श्री शारदा दयाल श्रीवास्तव के व्यंग्य संग्रह “ज्ञानगंगा में गधों का आचमन” का लोकार्पण दुष्यंत संग्रहालय में डॉ. साधना बलबटे, की अध्यक्षता में संपन्न हुआ। मुख्य अतिथि सेवानिवृत्त गृह सचिव, मध्य प्रदेश शासन श्री ओम प्रकाश श्रीवास्तव, सारस्वत अतिथि  श्री सुरेश पटवा, संयुक्त सचिव दुष्यंत संग्रहालय और विशिष्ट अतिथि श्री मंगत राम गुप्ता, श्री गोकुल सोनी और श्री विवेक रंजन श्रीवास्तव रहे।

इस अवसर पर सारस्वत अतिथि सुरेश पटवा ने सर्वप्रथम शारदा दयाल श्रीवास्तव के लेखकीय व्यक्तित्व का परिचय देते हुए कहा कि शारदा दयाल ऊपर से शांत दिखते हैं लेकिन अंदर ज्वालामुखी छुपाए हैं। तभी इनके भीतर से विसंगतियों के विरुद्ध तीखी प्रतिक्रिया निकलती है। वही इनके व्यंग्य को धार प्रदान करती है।

इस अवसर पर शारदा दयाल श्रीवास्तव ने संदर्भित व्यंग्य संग्रह की रचना प्रक्रिया के अनुभव साझा करते हुए “मेरा देश मेरा भेष” व्यंग्य का पाठ अनोखे अंदाज़ में किया। उन्होंने पुस्तक के नामकारण के बारे में बताया कि मुझमें और गधे में कुछ लाक्षणिक समानताएं हैं और मैं भी ज्ञान गंगा में डुबकी लगाता रहता हूँ इसलिए इस पुस्तक का नाम  “ज्ञानगंगा में गधों का आचमन” तय पाया गया।

डॉ. साधना बलबटे ने कहा की इस व्यंग्य संग्रह में सामयिक नहीं अपितु वैश्विक परिस्थितियों पर शाश्वत व्यंग्य शामिल हैं। आजकल व्यंग्य में बोथरापन भटकाव अधिक नज़र आता है। इन्होंने अपने व्यंग्य में व्यंजना के माध्यम से साहित्य को ज़िंदा रखा है। ये एक कुशल और कलात्मक व्यंग्यकार हैं। इन्होंने पहली कृति में ही छक्का मारा है।

श्री ओम प्रकाश श्रीवास्तव ने कहा कि आजकल व्यंग्य लिखना खतरे से खाली नहीं है। लेकिन शारदा दयाल श्रीवास्तव ने सामयिक और शाश्वत विषयों पर व्यंग्य और हास्य का अद्भुत मिश्रण किया है। जो इनकी पुस्तक को अनोखा बनाती है।

श्री गोकुल सोनी ने कहा कि व्यंग्य समाज की विसंगत एवं रुग्ण मानसिकता के लिए “शुगर कोटेड” कड़वी दवाई की तरह है। वास्तव में जो व्यंग्य तात्कालिक परिस्थितियों पर लिखे जाते हैं, वे अल्पजीवी होते हैं, परंतु मानवीय कुप्रवृत्तियों पर एवं कुप्रथाओं पर लिखे गए व्यंग्य कालजयी होते हैं। श्री एस डी श्रीवास्तव के व्यंग्यों में पर्याप्त पैनापन है, जो पाठक को चमत्कृत करता है।

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ने कहा कि शारदा दयाल श्रीवास्तव का लेखन उनके सरल, विद्रोही और अनुभवी व्यक्तित्व का ऐसा दर्पण जो पाठकों से सीधा संवाद स्थापित करता है। उनकी शैली में व्यक्तिगत अनुभवों की सच्चाई झलकती है। इन्होंने बैंक कर्मचारियों के शोषण, नौकरशाही की जड़ता और सामाजिक पाखंड पर प्रहार किया।

श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी द्वारा ज्ञानगंगा में गधों का आचमन की पुस्तक समीक्षा पढ़ने के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 180 ☆ “ज्ञान गंगा में गधों का आचमन” – व्यंग्यकार… श्री शारदा दयाल श्रीवास्तव ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’☆

श्री मंगत राम गुप्ता ने शारदा दयाल श्रीवास्तव के व्यक्तित्व पर प्रकाश डालते हुए कहा कि इनके शान्त व्यक्तित्व में एक चिंतनशील बेचैन व्यक्ति छुपा है। जिससे इनके भीतर भीतर से चुटीलापन प्रकट होता है।

दुष्यंत संग्रहालय के संयुक्त सचिव और कार्यक्रम संयोजक श्री सुरेश पटवा ने जानकारी दी है कि सरस संचालन श्रीमती जया केतकी शर्मा ने किया और सरस्वती वंदना सुश्री सुनीता शर्मा ने प्रस्तुत की। 

  साभार – श्री सुरेश पटवा

कार्यक्रम संयोजक / संयुक्त सचिव

दुष्यंत संग्रहालय भोपाल

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी की कहानियाँ  ‘कलम की पूजा’ और ‘मोक्षदायिनी शिप्रा की कहानी’ पाठ्यक्रम में शामिल, अभिनंदन ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी की कहानियाँ  ‘कलम की पूजा’ और ‘मोक्षदायिनी शिप्रा की कहानी’ पाठ्यक्रम में शामिल, अभिनंदन

रतनगढ़/ नीमच (निप्र)। देश के प्रसिद्ध बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ की लेखनी ने एक बार फिर साहित्य जगत में नया कीर्तिमान स्थापित किया है। उनकी कालजयी गद्य रचनाएँ कलम की पूजा और शिप्रा की आत्मकथा अब देश भर के स्कूली बच्चों के पाठ्यक्रम का हिस्सा बनेंगी। न्यू सरस्वती हाउस प्राइवेट लिमिटेड की कक्षा-5 और कक्षा-8 की आगामी पाठ्यपुस्तक शृंखला में इन रचनाओं को शामिल किया गया है, जो देश और मध्य प्रदेश के लिए गर्व का क्षण है।

शिप्रा की आत्मकथा जो पवित्र नदी शिप्रा के आध्यात्मिक और सांस्कृतिक महत्व को दर्शाती है, बच्चों को न केवल साहित्यिक संवेदनशीलता से जोड़ेगी, बल्कि उन्हें भारतीय संस्कृति की गहराइयों से भी परिचित कराएगी। दूसरी ओर, कलम की पूजा लेखन की शक्ति और ज्ञान के प्रति श्रद्धा का संदेश देती है। ये दोनों रचनाएँ अपनी गहनता और प्रेरणादायक शैली के लिए जानी जाती हैं, और अब ये स्कूली बच्चों के लिए एक अमूल्य उपहार बनेंगी।

न्यू सरस्वती हाउस, जो शैक्षिक प्रकाशन में अपनी गुणवत्ता के लिए विख्यात है, ने श्री क्षत्रिय की रचनाओं को उनके मौलिक महत्व को पहचानते हुए चुना है। संपादक श्री शशि प्रकाश द्विवेदी ने अपने पत्र में स्पष्ट किया कि रचनाओं का कॉपीराइट श्री क्षत्रिय के पास ही रहेगा, और वे भविष्य में इनका उपयोग स्वतंत्र रूप से कर सकेंगे। प्रकाशन के बाद पाठ्यपुस्तक की प्रतियाँ लेखक को संस्थागत नियमों के अनुसार भेजी जाएँगी। यह पारदर्शी और सम्मानजनक दृष्टिकोण प्रकाशन जगत में एक मिसाल है।

श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ने इस सम्मान पर हर्ष व्यक्त करते हुए कहा, “मेरी रचनाएँ, विशेष रूप से शिप्रा की आत्मकथा, जो मेरे हृदय के करीब है, अब बच्चों के बीच जाएँगी। यह मेरे लिए साहित्यिक जीवन का सबसे बड़ा पुरस्कार है। मैं न्यू सरस्वती हाउस का आभारी हूँ कि उन्होंने मेरे शब्दों को इतना बड़ा मंच दिया।”

साहित्य जगत में इस खबर ने उत्साह की लहर दौड़ा दी है। प्रसिद्ध साहित्यकार एवं मध्य प्रदेश साहित्य अकादमी के  निदेशक श्री विकास दवे ने कहा, “ओमप्रकाश जी की रचनाएँ हमारी सांस्कृतिक धरोहर का हिस्सा हैं। शिप्रा की आत्मकथा जैसी रचना बच्चों को अपनी जड़ों से जोड़ेगी और कलम की पूजा उन्हें ज्ञान का महत्व सिखाएगी। यह नीमच के लिए ऐतिहासिक उपलब्धि है।”

यह उपलब्धि न केवल श्री क्षत्रिय की साहित्यिक प्रतिभा को रेखांकित करती है, बल्कि छोटे शहरों के लेखकों के लिए एक प्रेरणा भी है। न्यू सरस्वती हाउस की यह पहल स्कूली शिक्षा में साहित्यिक और सांस्कृतिक मूल्यों को समृद्ध करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।

श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को इस अभूतपूर्व उपलब्धि के लिए ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से हार्दिक बधाई! मप्र का यह साहित्यिक रत्न निश्चित रूप से भविष्य में और अधिक ऊँचाइयाँ छूएगा।

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ डॉ. शैलजा करोडे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन!! 💐

दि. ४ मे रोजी ठाणे येथे “शब्दसाज साहित्यिक स्नेह-संमेलन 2025” आयोजित केले गेले होते. आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांना या संमेलनात “साहित्य भूषण” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या संमेलनात प्रमुख अतिथी म्हणूनही त्यांना निमंत्रित केलेले होते.

तसेच या संमेलनात “साहित्य लेखन करतांना नवोदित लेखकांनी घ्यावयाची काळजी ” या विषयावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. या संमेलनात त्यांच्या हस्ते

(1) शब्दांचा डोह—प्रातिनिधिक कथासंग्रह (2) भाव स्पंदन—प्रातिनिधिक कवितासंग्रह.. या दोन पुस्तकांचे प्रकाशनही संपन्न झाले.

या गौरवास्पद पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे डॉ. शैलजा करोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या पुढील त्यांच्या अशाच सातत्यपूर्ण साहित्यसेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री वीणा रारावीकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री वीणा रारावीकर

🌺  अ भि नं द न  🌺

आपल्या समूहातील लेखिका सुश्री वीणा रारावीकर यांनी अनुवादित केलेले  ‘यू हॅपिअर’ हे पुस्तक  मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे द्वारा नुकतेच प्रकाशित केले गेले आहे. मूळ इंग्रजीत असलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. 

 – – ‘ आनंद हे मेंदूचे कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर जीवन आनंदाने जगता येऊ शकते. त्यासाठी आपल्या  मेंदूचा प्रकार ओळखा आणि मेंदूचे सर्वांगीण आरोग्य सुधारा ‘ असा महत्वाचा आणि मोलाचा संदेश देणारे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी न्यूरो सायन्समधील रहस्यांवर आधारित शास्त्रशुद्ध उपाय सांगणारे हे पुस्तक, आनंदाने जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल असे खात्रीने म्हणावेसे वाटते. 

या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल आपल्या समूहातर्फे सुश्री वीणा रारावीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि असेच लोकोपयोगी काम यापुढेही त्यांच्या हातून व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असेही पुनर्मिलन… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

साहित्यरंग वाङ्मय मंडळ, वारजे आयोजित ‘कल्पनाविस्तार’ स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🪻

पुरस्कार प्राप्त लेख ‘असेही पुनर्मिलन’ आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? विविधा ?

☆ “असेही पुनर्मिलन” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

“चला उतरा लास्ट स्टाॕप आला “कंडक्टर मोठ्याने ओरडला. त्यासरशी मी एकदम जागी झाले, तो झोपेत माझा स्टाॕप मागेच गेला होता अन् मी एका अपरिचित ठिकाणी उतरले. काय करावे काही सुचत नव्हते. बाकी पॕसेंजर भराभरा त्यांच्या मुक्कामी निघून गेले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. चहा घेऊन समोरच असलेल्या देवळात शिरले आणि समोर बघते तर……

सभामंडपाच्या पायऱ्या उतरून येणाऱ्या त्या बाईचा चेहरा अगदी ओळखीचा वाटला. मी जागेवरच थांबून पाहू लागले अन् आठवले ‘अरेच्चा ही तर आपली बालमैत्रीण प्रभा आहे’. तिला पाहून मला अतिशय आनंद झाला.

अचानक तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. ती पण पहातच राहिली. एकदम ” नंदिनीऽऽ.. ??? नंदू ऽऽऽ “, अशा जोराने हाका मारत ती भराभर पायऱ्या उतरली आणि माझ्याजवळ येऊन तिने घट्ट मिठी मारली. ती आता ओक्साबोक्शी रडू लागली. ” अग, तुला भेटण्यासाठी मी किती तळमळत होते. आज देवालाच दया आली. त्याच्या दारातच तू पुन्हा भेटलीस. किती आनंद झालाय म्हणून सांगू ? कुठे होतीस ग इतके दिवस ?”

तिचं रडणं आणि बोलणं एकत्रच सुरू होतं. मी तिला शांत करीत खाली बसवलं, पाणी दिलं. ती खूप सावरली. मला जवळ घेत तोंडावरून हात फिरवत म्हणाली, ” नंदू, किती काळ लोटला ग आपल्या भेटीला. आता पुन्हा भेट होणारच नाही असं वाटत होतं. पण देवानंच आपली भेट घडवली. किती जीवाभावाच्या मैत्रिणी आपण, खूप आनंदात होतो. पण मला काय दुर्बुद्धी सुचली अन त्या खोटारड्या जयडीवर विश्वास ठेवला. तुझ्याशी अबोला धरला. नंतर मग खूप वाटलं तुझी माफी मागावी, पुन्हा एकत्र यावं, पण आपली भेटच झाली नाही. “

“प्रभा अगं जाऊ दे ना. विसर ते जुनं सगळं. ” हे ऐकून चिडलीच.

“कशी विसरू ? माझ्या चुकीनंच मी तुला गमावलं होतं ना? खरंच माझं तेव्हा खूप चुकलं होतं. मला माफ करशील ना ग नंदू ?” ती पुन्हा रडू लागली.

” हे बघ प्रभा, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मैत्रीत कसली माफी मागतेस ? आपली ती वेळच वाईट होती. मी तर केव्हाच सगळं विसरले आहे. तुला भेटून मात्र खूप खूप आनंद झाला. माझं उतरायचं गाव मागं गेल्यामुळं मी इथं आले हे फारच छान झालं. “

आता प्रभा पूर्ण सावरली. त्या गावातच तिचं घर होतं. आम्ही तिच्या घरी आलो. हसतखेळत रात्री जेवण झालं. मी आणि प्रभा झोपायला गेलो. झोप कुठली यायला ? इतक्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा झाल्या. त्या भांडणाची उजळणी पण झाली.

आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी होतो. हे न बघवणाऱ्या मुली आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करायच्या. एकदा जयश्रीनं माझ्याबद्दल काहीतरी खोटंनाटं प्रभाच्या मनात भरवलं. प्रभा खूप चिडली. आमचं जोरात भांडण झालं. माझं म्हणणं ऐकून न घेताच ती निघून गेली. कायमचा अबोला धरला. पुढं बदलीमुळं ते परगावी गेले आणि आम्ही कायमच्या दुरावलो. कसलाच संपर्क झाला नाही. लग्नानंतर तर गावही दुरावला.

पण ही गोष्ट प्रभाच्या इतकी जिव्हारी लागलेली असेल याची कल्पनाच नव्हती. आत्ता भेटल्यावर सगळं मळभ दूर झालं. खूप आनंद झाला.

गप्पांमधे इतर मैत्रिणींच्या आठवणी निघाल्या. आमची मैत्रीण विजयाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आधीच्या गावात उतरणार होते. मग दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर प्रभासुध्दा लग्नाला आली. तिथे आमच्या आणखी ३-४ मैत्रिणी आलेल्या होत्या. माझ्याबरोबर प्रभाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला. आमच्या बालपणाच्या आठवणींचं कारंजं थुईथुई उडू लागलं. त्यात आम्ही चिंब झालो. पुन्हा एकदा लहान होऊन खूप हसलो खिदळलो. खूप मजा केली. भेटीचा पुरता आनंद घेतला. ही ‘पुनर्भेट’ आम्ही अतिशय मनापासून उपभोगली. आलं देवाजीच्या मना…. !

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५ ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५ ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे

महाराष्ट्र राज्यस्तरीय हा शालेय व महाविद्यालयीन शिक्षकवर्गासाठी -महादान “महाचषक” निबंध स्पर्धा २०२५

महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान)

श्री सुनील देशपांडे

निबंध विषय (खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर):

  1. महादान ही काळाची गरज
  2. विद्यार्थ्यांमध्ये महादान संस्कार रुजवण्यासाठी माझ्या संकल्पना
  3. महादानासाठी शिक्षकांची भूमिका
  4. समाजासाठी महादान – सामूहिक जबाबदारी

भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी

ही स्पर्धा दोन गटात विभागली आहे

गट विभाग पहिला

शालेय शिक्षक गट – इयत्ता १० वी पर्यंत शिकवणारे शिक्षक

गट विभाग दुसरा

महाविद्यालयीन प्राध्यापक गट – इयत्ता ११ वी ते पदवी स्तरावर शिकवणारे प्राध्यापक

निबंध लेखनासाठी सूचना:

१) एका शिक्षकाला कोणत्याही एका भाषेतून व कोणत्याही एकाच विषयावर एकच निबंध सादर करता येईल.

२) शब्दमर्यादा: ८०० ते १००० शब्द

३) निबंध ए ४, साईज कागदावर, एकाच बाजूने सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टाईप केलेला असावा.

४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्यावर कोणत्याही प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया केली जाऊ शकणार नाही

५) निबंधावर लेखकाचे नाव किंवा ओळख दर्शवणारी कोणतीही माहिती लिहू नये

६) निबंधासोबत खालील माहिती वेगळ्या कागदावर देऊन स्टेपल करून पाठवावी:

        • लेखकाचे पूर्ण नाव
        • वय
        • मोबाईल नंबर
        • ई-मेल
        • शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता
        • मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे नाव व संपर्क क्रमांक
        • लेखकाचै एक छायाचित्र. (पासपोर्ट साईज फोटो)

प्रतिज्ञापत्र:

(स्वतःच्या माहितीच्या कागदाखाली लिहावे आणि स्वाक्षरी करावी)

“मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की वरील निबंध मी स्वतः लिहिला आहे.

तो कोणत्याही व्यक्तीच्या, संस्थेच्या वा इंटरनेटवरील मजकुराची प्रत नाही.

हा निबंध यापूर्वी कुठेही प्रसिद्ध केलेला नाही व हा या स्पर्धेसाठीच सादर केला आहे.

स्पर्धेचे सर्व नियम व अटी मला मान्य आहेत.”

स्वाक्षरी, स्थळ व दिनांक

६) निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक: ३० जून २०२५ पर्यंत

७) पोस्टाने किंवा कुरिअरने निबंध पोहोचलेला असला पाहिजे.

८) निबंध पाठविण्याचा पत्ता:

श्री. सुधीर बागाईतकर, उपाध्यक्ष,

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन,

रो हाऊस क्र. १५, साई सदन सोसायटी,

महानगर बँकेजवळ, सेक्टर क्र. २,

ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८

टीप: ई-मेल, व्हॉट्सॲप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पाठवलेले निबंध स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.

९) बक्षीसै व सन्मान:

प्रत्येक गटातून:

प्रथम क्रमांक: ₹१०,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

द्वितीय क्रमांक: ₹५,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

प्रत्येक भाषेतील एका निबंधास एक विशेष पुरस्कार: ₹३,०००/- + प्रमाणपत्र + शाळा/कॉलेजसाठी ढाल (स्मृतिचिन्ह)

१०) निकाल आणि सन्मान समारंभ:

निकाल:  ऑगस्ट २०२५ या महिन्यात  जाहीर करण्यात येईल

सन्मान समारंभ: फेडरेशनच्या २०२५ मधील राज्यस्तरीय अधिवेशनात बक्षिसाची रक्कम व विजेत्यांचा सन्मान केला जाईल (२०२५)

अधिवेशनासाठी विजेत्यांना स्वखर्चाने यावे लागेल, परंतु अधिवेशनाचे सहभाग शुल्क भरावे लागणार नाही.

११) बक्षीस विजेते निबंध फेडरेशनच्या विशेषांकात प्रसिद्ध केले जातील त्याला कोणतेही वेगळे मानधन दिले जाणार नाही

१२) सर्व सहभागी शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र (ई-सर्टिफिकेट स्वरूपात) मिळेल.

१३) अधिक माहिती व संपर्कासाठी

श्री सुधीर बागाईतकर – 9819970706

श्री सुनील देशपांडे  – 9657709640

श्री प्रशांत पागनीस – 8530085054

सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य,  शिक्षक बांधव व शिक्षक संघटनांना विनंती:

आपल्या संस्थेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महादान विषयक संस्कार रुजवावेत, ही नम्र विनंती!

साभार  – श्री सुनील देशपांडे 

पुणे , मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com

https://www.organdonation.net.in  ईमेल : federation@organdonation.net.in

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बैल गेला नि झोपा केला… + संपादकीय निवेदन – सुश्री शीला पतकी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शीला पतकी 

💐 अ भि नं द न 💐

“युवा विवेक” या पुणेस्थित संस्थेतर्फे “म्हणींच्या गोष्टी” या नावाने आयोजित केलेल्या एका वेगळ्याच प्रकारच्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री शीला पतकी यांच्या “बैल गेला नि झोपा केला” या कथेला सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांतर्फे सुश्री शीला पतकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्य-प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..💐

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 जीवनरंग 🌸

☆ बैल गेला नि झोपा केला… ☆ सुश्री शीला पतकी ☆

शेवटचा पेपर संपून संध्याकाळी सगळी मुले नाना आजोबांकडे आली त्यावेळेस सगळेजण समीरला चिडवत होते तो बिचारा अगदी रडकुंडीला आलेला. नानानी विचारलं, “काय रे काय झालं ?”समीर खाली मान घालून उभा” नाना आजोबा माझा पेपर बुडाला म्हणजे आज शेवटचा दिवस होता ना म्हणून सकाळी पेपर ठेवला होता आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे दुपारी आहे मी दुपारी गेलो माझ्या लक्षात नव्हते आणि त्यामुळे आता माझा पेपर बुडाला पेपर झाल्यावर मी शाळेत गेलो”. त्यावर नाना म्हणाले” अरेरे! म्हणजे तुझं असं झालं… पेपर गेला आणि समीर आला..! तुझ्यावरून आता ही नवीन म्हण पडेल “.. म्हण म्हणजे काय हो आजोबा? सगळ्या मुलांनी एक सुरात विचारले. नाना म्हणाले “अरे एखादी घटना अगदी थोडक्यात सांगण्याचे साधन म्हणजे म्हण! अशा म्हणी आम्ही खूप वापरत असू तुमच्या पिढीला हे माहिती नाही. ” पण म्हण म्हणजे काय? नाना म्हणाले म्हण म्हणजे.. नाचता येईना अंगण वाकडे… नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.. अंथरून पाहून पाय पसरावे.. इकडे आड तिकडे विहीर याला सगळ्याला म्हणी असे म्हणतात. अशाच एखाद्या गोष्टीवरून ती म्हण पडलेली असते. गोष्टीवरून म्हणल्याबरोबर मुले जोराने म्हणाली “मग आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना” आजोबा म्हणाले” हो सांगतो ना बसा बसा सगळे बसा.. पेपर कसे गेले सगळ्यांना?” छान गेले आजोबा”. तोपर्यंत आतून आजी म्हणाल्या पोरांनो तुमच्या आजोबांची गोष्ट होईपर्यंत मी मस्त भेळ तयार करते मग भेळ खाऊन जारे…! पोरं तर आनंदाने उड्याच भरायला लागले. सगळ्यांनी एकच गल्ला केला. सांगा ना आजोबा सांगा ना आजोबा अरे हो सांगतो. आजोबा सांगू लागले..

खवणी नावाचे एक गाव होते. त्या तिथे जीवाजी नावाचा शेतकरी राहत होता. भरपूर शेती होती मळा होता जिवाजी खूप कष्ट करणारा शेतकरी आपला मळा त्याने सुंदर केला होता. त्याच्याकडे सोन्या आणि तान्या अशी दोन बैलं होती त्याच्यावर जिवाजीचा फार जीव होता जिवाजी म्हातारा झाला आणि मुलगा शेती करायला लागला मुलाचं नाव होतं तानाजी तानाजीला ही शेतीतलं ज्ञान चांगलं होतं. पण थोडासा आळशी होता तेथे काम वेळेवर करावे ही पहिल्या पिढीतली शिकवण तानाजी कडे नव्हतीच त्यामुळे जिवाजीला थोडा राग पण यायचा. अरे शेतीत कामे वेळेवर केली पाहिजेत बाबा. पण तो म्हणायचा करतोय ना त्यापुढे जिवाजी काहीच बोलत नसे. जीवाजीचे दोन बैल ज्या झापेत बांधायचे तो झापा पडला होता आणि जिवाजी रोज तानाजीच्या मागे लागायचा अरे झापा नीट करून घे नवा बांध तो म्हणायचा सध्या खूप काम आहे. दुपारी तो बैलांना झाडाखाली बांधायचा आणि रात्री घराच्या पुढे आलेल्या पत्रात जवळपास वर्षभर हे चालले होते पावसाळ्यात बैलांना पाऊस लागे चिखलात उभं राहावं लागलं उन्हाळ्यात वरून ऊन मारत होतं आणि थंडीत थंडी वाजली. बैल कंटाळले होते पण तानाजीला वेळ नव्हता बैल एकदा असेच झाडाखाली एकमेकांशी बोलत होते ते म्हणाले आपला मालक जीवाजी आपल्यावर किती प्रेम करत होता आणि हा मुलगा आपल्याला एक डोक्यावर छप्फर बांधून देत नाही किती दिवस आपण चिखलात मातीत पाण्यात उभे राहायचं बरं ?.. आपण येथून पळून जाऊ. दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही बैल दावं तोडून पळून गेले जिवाजी सकाळी पाहतो तर झाडाखाली बैलं नाहीत शेतातही कुठे दिसेना बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा आवाज सकाळी ऐकल्याशिवाय जिवाजीला चैन पडत नसे. त्याने सगळ्यांना बैल हुडकायला चारी दिशांना पिटाळलं. संध्याकाळपर्यंत बैल कोणालाही सापडले नाहीत. जिवाजींन तानाजीला सांगितलं तानाजी अरे बैलांची सुद्धा काळजी घ्यावी लागते घरातल्या माणसाप्रमाणे तू त्यांची वर्षभर अबदा केलीस.. किती सोसणार मुक जनावर बिचारे… जिवाजी खूप रागावला. तानाजीला खूप वाईट वाटलं खरंच आपण चुकलो त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून मोठे डाम रोऊन घेतले होते भोवताली पट्ट्या लावून तुराट्या बांधून घेतल्या चिखला न लिंपून घेतल्या. गवताच्या पेंढ्या लावून वरच्या बाजूला छप्पर केल जमिनीपासून वर एक फुटावर घेतल्यामुळे ते छान दिसत होत. त्यांन जिवाजीला बोलवून दाखवलं बाबा कसा गोठा चांगला झालाय बघ. बा म्हणाला, पण आता त्याचा उपयोग काय बैल गेला अन झापा केला अशी तुझी गत झाली. सुदैवानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिवाजीच्या ओढीन बैल घराकडे परतले. त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज ऐकून जीवाची खुश झाला. जिवाजीच्या बायकोन रकमाना त्या बैलांना ओवाळलं. पाणी पाजलं. गुळ अन भाकरी खाऊ घातली आणि बैल नव्या झाप्यात जाऊन उभे राहिले. तानाजीने त्यांना बांधलं. चारा टाकला. पाण्याच्या बादल्या ठेवल्या आणि त्यांन त्या दोन्ही बैलांना अक्षरशः गळ्याला लावले त्यांच्या अंगावर हात फिरवत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नका बाचा जेवढा जीव आहे तेवढाच माझा बी जीव आहे तुमच्यावर… जिवाजी हे लांबून पाहत होता जिवाजीचे गडी तानाजीला म्हणाले मालक आता बैल गेला आणि झापा केला असं करू नका बरं आपल्या बाच जरा ऐकत चला. हो रे बाबांनो चूक झाली माझ्याकडून आता पुन्यांदा अशी चूक होणार नाही.

– – आणि या प्रसंगातून एक म्हण तयार झाली ” बैल गेला अन झापा केला. ” आता आपल्या समीरला पण एक म्हण तयार होईल ना नाना! कोणती रे? तीच ती मगाशीच तुम्ही म्हणालात ना ” पेपर झाला आणि समीर गेला “.. सगळे मोठ्यांना हसायला लागले. तोच आजीने हाक दिली ‘ चला रे भेळ खायला या आत मध्ये ‘ मुले उड्या मारत स्वयंपाक घरात गेली.. भेळेवर ताव मारायला.

© सुश्री शीला पतकी

सोलापूर 

मो. 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता #283 – फसली आशा…+ संपादकीय निवेदन – श्री अशोक श्रीपाद भांबुरे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

💐 अ भि नं द न 💐

ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार,  मा. ए. के. शेखमा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283 ?

☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज जीवनी उरली नाही कसली आशा

वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा

*

तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा

दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा

*

बरेच काही बोलायाचे होते बाकी

कुठे बोलली मुकाट होती बसली आशा

*

बोली होती तिची लागली या बाजारी

अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा

*

हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी

सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा

*

मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे

आभासाच्या जलाशयाला फसली आशा

*

तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता

तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares