मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तूप … ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तूप… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

तूप

जेवण कसलेहि असो, पंगतीला ,,तूप,, वाढले कि,मगच जेवायला सुरवात करायचि, आपलि परंपरा आहे. एकंदरित तूप हा अविभाज्य घटक आहे.

(१) जुन्या काळात युद्ध लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठि, तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारि.

(२) घ्रूत,अज्या, घि, हवि, सर्पि वैगेरे विविध नावाने तुपाला संबोधल्या जाते. तुप मधुर, अत्यंत बलवान, थंड , पित्तशामक, मेद मज्जा, शुक्र धातूंचे पोषण करणारे आहे.

(४) तुपामुळे स्मुर्ति, बुद्यि, आदिंचि वाढ होते. तूपाचे वैशिष्ट्य हे कि, तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तूपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे।

(५) तूपामूळे स्वरयंत्र सुधारते. आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाहि व रसायन गुणधर्माचे आहे.

(६) तूप कोणत्याहि रोगांत, विशेषतः वात-पित्त-कफ विकारांत वापरता येतं आयुर्वेदांत अनेक औषधि द्रव्ये तूपात सिद्ध करून त्यांचे औषधे बनवलि आहेत.

(७) डोके दुखत असेल तर, तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत. किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालिश करावि.

(८) १००  वेळा धुतलेले (शतधौत घ्रुत) तुप त्वचाविकार, जखमांवर, अंगाला खाज, टाचा फुटणे, अंग फुटणे, या विकारात गुणकारि आहे.

(९)  तूप किंचित कोमट करून खाल्ल्यावर उचकि थांबते. रात्रि झोपतांना एक पेलाभर दूधांत एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सकाळि पोटाचा कोठा मोकळा होतो. बद्धकोष्ठ, मुळव्याध बरि होते.

(१०)  तुपामुळे मेद, चरबि वाढते हि समजूत चुकिचि आहे. नेहमि जे हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात, त्यांनि अवश्य तुप खावे.

(११)  कँसरच्या रूग्णाला तूप म्हणजे अम्रूतासमान.. कारण तूपात कँसरच्या पेशिंचि वाढ थांबवण्याचि शक्ति आहे.

तेव्हा अश्या बहुगुणि तुपाला आहारात श्रेष्ठ स्थान आहे च….

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ इंद्रधनुष्य ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆

संग्राहिका : सुश्री स्नेहल रोकडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समाधानाची व्याख्या… ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ समाधानाची व्याख्या… ☆ संग्रहिका – सुश्री मंजिरी गोरे ☆

समाधानाची व्याख्या

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून,

मी बस मधे चढलो तर खरं.

पण आतली गर्दी बघून जीव घाबरला.

बसायला जागा नव्हती.

तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.

पुढचा एक जण सहज

तेथे बसू शकत होता ….

पण त्याने ती सीट मला दिली.

 

पूढच्या stopवर पुन्हा तेच घडले.

पुन्हा आपली सीट

त्याने दुसऱ्याला दिली.

आमच्या पूर्ण बस प्रवासात

हा प्रकार चारदा घडला.

बर हा माणूस,

अगदी सामान्य दिसत होता,

म्हणजे कुठे तरी मजदूरी करून

घरी परत जात असावा,

आता शेवटच्या stopवर

आम्ही सर्वच उतरलो.

तेंव्हा उत्सुकता

म्हणून मी त्याच्याशी बोललो.

विचारले

प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट

दुसऱ्याला का देत होता??

तेंव्हा त्याने दिलेले उत्तर,

मी शिकलेला नाही हो.

अशिक्षित आहे मी.

एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही.

ज्ञान नाही , पैसा नाही.

तेंव्हा मी, हे असे रोज करतो.

हेच मी सहज‌ करू शकतो.

 

दिवसभर काम केल्यानंतर

अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमते

मी तुम्हाला माझी जागा दिली,

तुम्ही धन्यवाद म्हणालात,

त्यातच मला खूप समाधान मिळाले,

मी कोणाच्या तरी कामी आलो ना?

कोणाला कायतरी दिल्याच.

असं मी रोज करतो

माझा नियमच झाला आहे••

आणि

रोज मी आनंदाने घरी जातो.

उत्तर ऐकून मी थक्कच झालो.

त्याचे विचार व समज बघून!

याला

अशिक्षित म्हणायचे का?

काय समजायचे ?

कोणाकरिता,

काही तरी करायची इच्छा,

ती पण स्वतः ची परिस्थिती

अशी असताना!

मी कशा रीतीने मदत करू शकतो?

त्यावर शोधलेला हा उपाय बघून

निसर्गसुध्दा आपल्या या निर्मीती वर खुष झाला असेल!

माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल!

त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या

स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी, त्याच्या समोर खाली मान घालून

स्वतः चे परिक्षण करू लागलो.

किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.

*

मदत ही खूप महाग गोष्ट आहे

कारण मनाने श्रीमंत असणारे

खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षत का ?

हीच माणसाची खरी ओळख का ?

मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ??

कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल, आणि तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही!
या माणसाच्या संगतीने
माझे विचार स्वच्छ झाले.

म्हणतात ना •••

” कर्म से पहचान होती है इंसानों की ।

वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में “।

🌿 Have a Good day 🌿

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ ( भाग दुसरा) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग दुसरा) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ

रक्तदाब – हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात

उच्च रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ….४:३५ (भाभी)

२) चलो दिलदार चलो ….३:३२ (पाकीजा)

३) नीले गगन के तले….४:१३ (हमराज)

४) ज्योती कलश छलके ….३:३० (भाभी की चूड़ियाँ)

कमी रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ….७:२० (सिकंदरे आज़म)

२) पंख होती तो उड़ आती रे ….४:३२ (सेहरा)

३) ओ निंद ना मुझको आये ४:०८ (पोस्ट बॉक्स नं. ९०)

रक्तक्षय, अनिमिया- अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ….४:५५ (इजाजत)

२) आज सोचा तो आँसू भर आये ….४:२७ (हँसते जख्म)

३)नदियाँ किनारे ….३:३४ (अभिमान)

४) मैने रंग ली आज चुनरिया …..५:३४ (दुल्हन एक रात की)

अशक्तपणा – शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके …. (उड़न खटोला)

२) मनमोहना बड़े झूठे….३:५८  (सीमा)

३) साज हो तुम आवाज हूँ मै ….५:३७ (चंद्रगुप्त)

 पित्तविकार, अॅसिडीटी- अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत

१) छूकर मेरे मन को ….२:३५ (याराना)

२) तुम कमसीन हो नादा हो ….४:२९ (आई मिलन की बेला)

३) आयो कहाँ से घनश्याम….२:५९ (बुढ्ढा मील गया)

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये …..३:४४ (सेहरा)

चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.

सुरिले परिवार/ सिनेमा अणि बरेच काही सुरिला संगीत 🎼

संगीतकार : खय्याम – १०

१. दो बुंदे सावन की (फिर सुबह होगी)

२. हरियाला बन्ना आए रे (रझिया सुलतान)

३. करोगे याद तो हर बात (बाजार)                         

४. तुम्हारी पलकोंकी चिलमनो में (नाखुदा)

५. मौसम मौसम लव्हली मौसम (आहिस्ता आहिस्ता)

६. चोरी चोरी कोई आए (नुरी)

 

गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी

पुणे

मो 8805984880

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ ( भाग पहिला) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग पहिला) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆

☆ MUSIC IS MEDICINE ☆

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.

४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.

६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.

८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.

९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

१२ राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.

१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.

☆ संगीतोपचार ☆

विशेष सूचना:- डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

हृदयरोग – राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया….८:१६ (मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए….६:०६   (काजल)

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम….४:२४ (साजन)

४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६    (नागिन).

विस्मरण – लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों ….५:०६ (मेहबूबा) 

२) ओ मेरे सनम….५:०९ (संगम)

३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ….४:४१ (ब्रह्मचारी)

४) जाने कहा गये वो दिन ….६:५३ (मेरा नाम जोकर)

मानसिक ताण, अस्वस्थता – ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत

१) पिया बावरी….४:०२ (खूबसूरत)

२) मेरे सूर और तेरे गीत ….३:११ (गूँज उठी शहनाई)

३) मतवारी नार ठुमक ठुमक चली ….६:२९ (आम्रपाली)

४) तेरे प्यार मे दिलदार ….४:०४ (मेरे मेहबूब)

क्रमशः… 

गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी

पुणे

मो 8805984880

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळी… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ पुरणपोळी… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

शाळेत असताना बाईंनी शिकवलेली वॄत्ते आठवा…..

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना ….

 

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

 

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते ||  (जातिकोश – जायफळ)

 

वसंततिलका

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

 

मालिनी

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

 

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

 

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

 

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे……!!

 

सर्व  मित्रं ,मैत्रिणींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🔥 होळी रे होळी पुरणाची पोळी😊

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

प्रिय सावित्रीबाई

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं

की आज तुझी पुण्यतिथी

बायकोला सांगितलं,

अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.

मग स्वतःलाच विचारलं

सावित्रीबाईंची पुण्यतिथी ?

कसं शक्य आहे ?

अगं, माझ्या गावातली, शहरातली,

देशातली प्रत्येक मुलगी

जेव्हा शिक्षण घेऊन

एखाद्या मोठ्या पदावर जाते,

शिक्षणाच्या भरोशावर एखादा

सन्मान प्राप्त करते

तेव्हा – तेव्हा तूच तर

जन्माला आलेली असतेस

यंदा माझी पुतणी पदवी घेईल

म्हणजे यंदा तू माझ्या घरातही

जन्माला येणार आहेस

सुरुवातीला प्रश्न पडला

तुला काय म्हणावं ?

बाई म्हणावं की आई म्हणावं ?

आमच्याकडे गावात

मोठ्या बहिणीला बाई म्हणतात

मग विचार केला

माझी आई शिकलेली,

थोरली बहीण शिकलेली,

मावशी शिकलेली,

माझी पुतणी शिकतेय

म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात

माझ्याभोवती आहेस,

सरकारचं घोषवाक्य आहे

‘मुलगी शिकली, प्रगती झाली !

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली’.

आजही वाटतं तुला

भारतरत्न मिळायला हवं होतं

मग लक्षात येतं की

या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत

ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत

जेव्हा कुठल्या महिलेला

भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू

ज्योतिबांना सांगत असशील

‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला

भारतरत्न मिळालं’

तुझ्या बद्दलचा मुळातच असलेला आदर

सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार

सहन करीत तू तुझं काम करीत राहिली

म्हणजे आतून तू किती कणखर

असली पाहिजेस

ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी.

तसूभरही ढळली नाही

आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने

काळाच्या मागे जावं,

लहान बनून तुमच्या घरात यावं

ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्या

तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत.

मला एक प्रश्न नेहमी पडतो

आपण करतो आहोत

ते काम क्रांतिकारी आहे याची तुला

जराशीही कल्पना नव्हती का ?

कारण नखभर ही अटीट्युड नव्हता तुझ्यामध्ये

नखभर सोडा, अणू – रेणू इतका

सूक्ष्म पण नाही

हे कसं साध्य करायचीस ?

नाहीतर आम्ही बघ

हीतभर करतो आणि हात भर

त्याचा हो हल्ला, कल्ला करत

ती दुखणी सांगत

ते यश सांगत गावभर हिंडतो

कदाचित म्हणूनच

तू त्यावेळच्या स्त्रियांना

शिक्षित करण्यासाठी म्हणून

जी अक्षरं पाटीवर गिरवलीत

ती काळाच्या पाठीवर गिरवला गेलीत

आणि या भारतात

जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री

शिक्षित होत राहील

तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील

पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील.

 

–  श्री गजानन घोंगडे

9823087650

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

थेरेसा सर्बर माल्कल!

? इंद्रधनुष्य ?

☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे..

थेरेसा सर्बर माल्कल!

हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो…

मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.

साभार फेसबुक 

संग्रहिका – प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो… मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी मदत कर. 

श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो. तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकच धोशा लावतो की मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

श्रीकृष्ण म्हणतो ठिक आहे.. मी तुला एक संधी देतो. पण माझी पण एक अट आहे… मी तुला जी संधी देईन, तीच संधी कर्णाला सुद्धा देईन आणि ह्या परीक्षेत तु कर्णापेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन श्रीकृष्णाची ही अट मान्य करतो.

श्रीकृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो.. आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक.. अट एकच एकूण एक सोने तु दान केले पाहिजेस.

लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की… मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की बास….!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की…. या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तु लोकांना दान करून टाकायच्या…..

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की… या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

अर्जुन चकित होऊन पहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही… या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.

श्रीकृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला… अनावधानाने का होईना तु सोन्याकडे आकर्षित झालास…..! तु गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तु दान करत होतास…..! 

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय… गुणगान गातंय… हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे… शुभेच्छा द्याव्यात… धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे… म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे… कार्य करावे…                                                  *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार. कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगलं द्या पदरी चांगलंच मिळेल.

‘आपलं काय चुकलं’ हे शोधायला हवं…. पण आपण मात्र ‘कुणाचं चुकलं’ हेच शोधत राहतो. …

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ‌ प्रेमळ‌ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.

अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच.  आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.

 – मेघःशाम सोनवणे

                       – 🌼 –

महिला दिनाचा संकल्प करूयात,

घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!

आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर,  सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !

महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.

पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.

समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.

आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!

घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की  संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.

आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.

समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !

तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.

हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले?  माझे आईबाबा कुठे चुकले?  माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं?  मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना???  कधी महत्व कळेल यांना माझं? 

अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.

समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी???  अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!

सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन,  दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.

या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!

या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात…  जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!

©️ सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे

काउन्सीलर. 9766863443

(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.  -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)

स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares