मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ४ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ४ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

श्रावण – ३

आपले पूर्वज खरोखरच निसर्गाचा अभ्यास करून प्रत्येक सण, वार याचे महत्व व पूजा यांची सांगड घालत होते. काही व्यक्ती विज्ञान मानतात तर काही देव, व्रते या वर विश्वास ठेवतात. या दोन्हींची सांगड आपल्या पूर्वजांनी मोठ्या हुशारीने घातली होती. कोणत्याही भावनेने ही व्रते केली तरी त्याचे फायदेच मिळणार आहेत.

शुक्रवारच्या जिवती पूजे विषयी लक्षात घेतले तर प्रत्येक प्रथा अर्थपूर्ण आहे. या जिवती पूजेची पद्धत सर्वांना माहिती असेलच. श्रावणी शुक्रवार या दिवशी ही पूजा केली जाते. ही पूजा करताना जिवतीच्या चित्राला गंध, हळद कुंकू लावतात. आघाडा दुर्वा यांचा हार घालतात. कापसाच्या मण्यांची माळ घालतात. तिची आरती करतात. जिवतीची कहाणी मोठ्या भक्तीने पठण केली जाते. त्यात मुख्यत्वे मुला बाळांचे सुख, रक्षण व्हावे हा भाव असतो व त्या साठी प्रार्थना असते. या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाची आरती (दिवे) करून त्या दिव्यांनी आरती केली जाते. व घरातील मुलांचे औक्षण केले जाते. पुरणाचे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात. याच दिवशी घरात महिलांचे हळदी कुंकू आयोजित केले जाते. त्यात फुटाणे, दूध, साळीच्या लाह्या प्रसाद म्हणून दिले जाते.

या पूजेतील सर्व वस्तू व पदार्थ बघितले तर सगळे उपयुक्त असल्याचे लक्षात येते.

आघाडा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, कफ यावर याचा काढा उपयुक्त असतो. या वनस्पतीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. दात दुखीवर आणि हिरड्यांच्या समस्येवर, दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्या मजबूत करण्यासाठी याच्या काड्यांचा उपयोग होतो. त्वचेच्या समस्येवर याच्या पानांचा लेप उपयुक्त असतो. याच्या पानात दाह कमी करण्याचे गुण असतात. त्या मुळे सूज, वेदना कमी होतात. पानाचा एलर्जी व त्वचा विकार, ताप, डोकेदुखी, पोटातील कृमी यावर उपयोग होतो.

मुत्रविकार, मुतखडा यावर आघाड्याच्या मुळांचा उपयोग होतो.

पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणूनही केला जातो.

वास्तूशास्त्रा नुसार ही वनस्पती घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि सुख समृध्दी वाढते.

दुसरी वनस्पती दुर्वा याचेही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे उपयोग आहेत.

दुर्वा, ज्याला बर्म्युडा गवत देखील म्हणतात, एक औषधी वनस्पती आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

दुर्वाचे औषधी उपयोग:

दुर्वा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्वचेवरील खाज, जळजळ, इसब आणि पुरळ यांसारख्या समस्यांवर दुर्वा वाटून लावल्यास आराम मिळतो. पचनक्रिया सुधारते. दुर्वांचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुर्वांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुर्वांचा रस उपयुक्त आहे. दुर्वांचा रस मूळव्याधीच्या समस्येवर गुणकारी आहे. यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि वेदना कमी होतात. दुर्वा शरीराला थंडावा देतात. त्यामुळे ताप आल्यास दुर्वांचा रस प्यायल्याने आराम मिळतो. दुर्वा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. नाकातून किंवा तोंडून रक्त येत असल्यास दुर्वांचा रस पिळल्याने रक्तस्त्राव थांबतो. दुर्वा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. डोळ्यांची जळजळ किंवा इतर समस्यांसाठी दुर्वांचा वापर केला जातो.

देवाला अर्पण केलेल्या दुर्वा प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात.

या दिवसात पचनशक्ती मंदावते म्हणून साळीच्या लाह्या खाल्ल्या जातात. उपास केले जातात. आणि पुरण खाल्ले जाते. पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेत फरक पडतो. पोळीसाठी लागणारं पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. त्यामुळे केवळ तूर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा जातो. पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. विशेष म्हणजे याने वजन वाढत नाही.

असे उपयुक्त घटक घेऊन येणारा श्रावण! कोणी कोणत्याही दृष्टीने साजरा केला तरी त्याचे फायदेच मिळणार!

अशीच काही माहिती बघू पुढील भागात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चक्रव्यूह… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ चक्रव्यूह… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसाला जगणं महत्त्वाच वाटत. पण त्याला कर्तव्याचा वाटा तुडवताना पडणारा ताण घयाळ करतो. किती केलं तरी काम सरत नाही आणि मनातली मोठेपण घेवून जगण्याची हाव ही मरत नाही. ससेहोलपट सहन करत ताणतणावात गुरफटलेलं जगणं नकोसं वाटतं नाही. यालाच तर माणसांची जिद्द म्हणतात ती जोपर्यंत जोमात आहे तो पर्यंत धडपडत तो नवनवे मार्ग शोधत प्राप्त परिस्थितीसोबत झट्याझोंब्या खेळत तिला नामोहरम करण्यातच आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. माणसांना कर्तृत्ववान बनवते ती आशा.

ती मोठी चिवट आणि चिकट असते. ती त्याला जन्म जातच चिकटून बसलेली असते, स्फूर्ती देते, कुठल्या तरी ध्येयाचे अमीश दाखवून त्याला कार्यतत्पर बनवते. गती मान करून धावायला लावते. मग माणूस दमत नाही, थकत नाही झपाटल्या सारखा ध्येयाचा ध्यास घेवू धावथच रहातो जगण्याचे सार्थक करण्या साठी. ठरवलेल्या ध्येयाच उदिष्ट पदरी पडलं की त्याचा जीव भांड्यात पडतो. महत्वाकांक्षी माणूस प्रयत्नशील असतो. पूर्वसुरींचा मागोवा घेत तो अनुभव संपन्न होत तो यशस्वी होतो. आपला आवाका ओळखून ‌तो आपल्या भोवती आपणच मारलेल्या रिंगणात आनंदी रहायला शिकतो. पण आशा त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती पुन्हापुन्हा त्याला नवे उदिष्ट देवून धावायला लावते. यालाच मानवी जीवनचक्र म्हणतात पण ते जीवनचक्र नसून जगण्यासाठीचा चक्रव्यूह असतो हे माणसाला फार उशिरा कळतं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपले पूर्वज खरोखरच निसर्गाचा अभ्यास करून प्रत्येक सण, वार याचे महत्व व पूजा यांची सांगड घालत होते. काही व्यक्ती विज्ञान मानतात तर काही देव, व्रते या वर विश्वास ठेवतात. या दोन्हींची सांगड आपल्या पूर्वजांनी मोठ्या हुशारीने घातली होती. कोणत्याही भावनेने ही व्रते केली तरी त्याचे फायदेच मिळणार आहेत.

शुक्रवारच्या जिवती पूजे विषयी लक्षात घेतले तर प्रत्येक प्रथा अर्थपूर्ण आहे. या जिवती पूजेची पद्धत सर्वांना माहिती असेलच. श्रावणी शुक्रवार या दिवशी ही पूजा केली जाते. ही पूजा करताना जिवतीच्या चित्राला गंध, हळद कुंकू लावतात. आघाडा दुर्वा यांचा हार घालतात. कापसाच्या मण्यांची माळ घालतात. तिची आरती करतात. जिवतीची कहाणी मोठ्या भक्तीने पठण केली जाते. त्यात मुख्यत्वे मुला बाळांचे सुख, रक्षण व्हावे हा भाव असतो व त्या साठी प्रार्थना असते. या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाची आरती (दिवे) करून त्या दिव्यांनी आरती केली जाते. व घरातील मुलांचे औक्षण केले जाते. पुरणाचे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात. याच दिवशी घरात महिलांचे हळदी कुंकू आयोजित केले जाते. त्यात फुटाणे, दूध, साळीच्या लाह्या प्रसाद म्हणून दिले जाते.

या पूजेतील सर्व वस्तू व पदार्थ बघितले तर सगळे उपयुक्त असल्याचे लक्षात येते.

आघाडा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, कफ यावर याचा काढा उपयुक्त असतो. या वनस्पतीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. दात दुखीवर आणि हिरड्यांच्या समस्येवर, दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्या मजबूत करण्यासाठी याच्या काड्यांचा उपयोग होतो. त्वचेच्या समस्येवर याच्या पानांचा लेप उपयुक्त असतो. याच्या पानात दाह कमी करण्याचे गुण असतात. त्या मुळे सूज, वेदना कमी होतात. पानाचा एलर्जी व त्वचा विकार, ताप, डोकेदुखी, पोटातील कृमी यावर उपयोग होतो.

मुत्रविकार, मुतखडा यावर आघाड्याच्या मुळांचा उपयोग होतो.

पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणूनही केला जातो.

वास्तूशास्त्रा नुसार ही वनस्पती घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि सुख समृध्दी वाढते.

दुसरी वनस्पती दुर्वा याचेही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे उपयोग आहेत.

दुर्वा, ज्याला बर्म्युडा गवत देखील म्हणतात, एक औषधी वनस्पती आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

दुर्वाचे औषधी उपयोग:

दुर्वा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्वचेवरील खाज, जळजळ, इसब आणि पुरळ यांसारख्या समस्यांवर दुर्वा वाटून लावल्यास आराम मिळतो. पचनक्रिया सुधारते. दुर्वांचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुर्वांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुर्वांचा रस उपयुक्त आहे. दुर्वांचा रस मूळव्याधीच्या समस्येवर गुणकारी आहे. यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि वेदना कमी होतात. दुर्वा शरीराला थंडावा देतात. त्यामुळे ताप आल्यास दुर्वांचा रस प्यायल्याने आराम मिळतो. दुर्वा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. नाकातून किंवा तोंडून रक्त येत असल्यास दुर्वांचा रस पिळल्याने रक्तस्त्राव थांबतो. दुर्वा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. डोळ्यांची जळजळ किंवा इतर समस्यांसाठी दुर्वांचा वापर केला जातो.

देवाला अर्पण केलेल्या दुर्वा प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात.

या दिवसात पचनशक्ती मंदावते म्हणून साळीच्या लाह्या खाल्ल्या जातात. उपास केले जातात. आणि पुरण खाल्ले जाते. पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेत फरक पडतो. पोळीसाठी लागणारं पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. त्यामुळे केवळ तूर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा जातो. पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. विशेष म्हणजे याने वजन वाढत नाही.

असे उपयुक्त घटक घेऊन येणारा श्रावण! कोणी कोणत्याही दृष्टीने साजरा केला तरी त्याचे फायदेच मिळणार!

अशीच काही माहिती बघू पुढील भागात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ सेल्फी… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

आज-काल कधीही कुठेही आणि निमित्त असो वा नसो.. सेल्फी काढणारे दर्दी नेहमीच दिसतात. तोंडाचा चंबू करून सेल्फी काढण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो. आताशा आरशाची जागा या सेल्फीने घेतली आहे. मोबाईल मधल्या कॅमेऱ्याच्या सेल्फी मोडवर थांबूनच मेकअप करायचा, केशरचना बदलायची आणि सेल्फी काढायचा. दुसऱ्या मिनिटाला नेमके आपण कसे दिसतो? असं पाहायचं…. मनानं ते पसंत केलं तर ठीक. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंंचावन्न! रोल, कॅमेरा, ॲक्शन असा मनानं ‘ग्रीन सिग्नल’ दिला की मग क्लिक होतो हा सेल्फी. इथवर हे हौशी थांबत नाहीत… फोटो ‘पोस्ट’ करून त्याला किती ‘लाईक’ मिळाले हाही छंद हे सेल्फी प्रेमी जपतात..

फोटोत स्वतःला बंदिस्त करून घेण्याची ही टेक्नॉलॉजी नवीन म्हणता म्हणता जुनी होऊ लागली आहे पण त्याचं फ्याड मात्र वाढत चाललं आहे. त्याचा आनंद घेता घेता दुष्परिणामही दिसायला लागलेत. सेल्फीचं फ्याड इतकं की त्यापासून झालेल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ जेव्हा आपण पाहतो तेव्हा हृदयाचा थरकाप होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. या छंदाचा अतिरेक आता मनोविकारात गणला जाऊ लागलाय…

शरीराचं बाह्य रूप जोवर मनाजोगंत होत नाही तोवर त्याचा मेकअप करून अनेकदा सेल्फी काढला जातो. एकूणच मनाची पसंती येईपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो. परंतु जे मन सरते शेवटी या क्लिकला हिरवा कंदील दाखवतं त्या मनाचा सेल्फी काढावा असं त्या शरीराला कधी वाटत नाही का? आपल्या मनाचा सेल्फी आपल्याला काढता आला तर? …. असा कधी आपण विचार केलाय का? आपण जेव्हा कोणाही व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहतो तेव्हा सर्वप्रथम आपण त्याचं बाह्यरूप पाहतो. याच शरीराला नियंत्रित करणारे ‘सॉफ्टवेअर’ म्हणजे मन आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. शरीराच्या सेल्फीत मनाचं प्रतिबिंब धूसर दिसतं. शरीर सुडौल दिसावे यासाठी आपण जिम्नेशियम, योगासनं, झुंबा अशा विविध गोष्टींचा आधार घेतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी मेकअप करतो. प्लास्टिक सर्जरी करतो. हे सर्व करताना मन शरीराला साथ देतं. तेच मन स्थिर करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, मनःशांतीसाठी आपण काही वेगळे करतो का? नाही ना? मनाला आपण गृहीत धरतो… डावलतो….

आरसा आपल्या शरीराचं प्रतिबिंब दाखवतो. न की मनाचं….. निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणं आपल्या अवतीभवती असलेले लोक आपल्याला आरसा दाखवत असतात. अंतर्मनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी अंतरंगाच विश्लेषण करणारे हे बाहेरच्या जगातले प्रवासी! त्या आरशातलं आपलं प्रतिबिंब पहायची आपल्याला गरज भासत नाही. थोडक्यात आपण त्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. शरीर सौंदर्य हे सर्वांना जन्मतः मिळालेलं आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपलं मनही जन्मतः सुंदरच असतं परंतु जगरहाटीत ते कलुषित होत जातं कारण त्यावर सभोवतालच्या वाईट विचारांची पुटं चढत जातात ती दूर करून त्याचं मूळ सुंदर रूप आपल्याला गवसलं तर त्या सारखा आनंद दुसरा नाही. त्यासाठी आपल्याला मनाला सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.. सुंदर मनाचा सेल्फीही किती सुंदर असेल ना?

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दहीहंडी…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

 

☆ “दहीहंडी…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

काल टीव्ही वरती सर्वत्र दहीहंडी दाखवण्याचा कार्यक्रम होता वेगवेगळ्या स्तरावरती मोठ्या धाडसाने मुलं चढत होती. बघणार्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. मोठे मांडव, मोठे स्टेज त्यावर वाद्यरुंदाचा प्रचंड मोठा आवाज. गोविंदा हिरीरीने वर चढत होते आणि त्या मंडळाने बांधलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. दहीहंडी फोडणाऱ्याला लाखांनी बक्षीस होते. तरुण मुलांनी अनेक दिवस सराव केलेला हा खेळ मुंबईत खूपच लोकप्रिय आहे. मोठाली बक्षीस लावली जातात, व्यासपीठावरती चित्रपट सृष्टीतील अनेक नावाजलेली मंडळी हजेरी लावतात, राजकीय व्यासपीठावरील मंडळी तिथे दिसतात. मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तींच्या नावाने मंडळांनी बक्षीसं ठेवलेली असतात आणि हजारोंच्या संख्येने लोक ते पाहायला आलेले असतात. हा सगळा थरार काल टीव्हीवरून पाहत होते महिला मंडळही मागे नव्हतेच तरुण मुलीही या खेळात हिरीरीने पुढे होत्या. सगळ्यात कौतुक होते त्या छोट्या मुलाचे जो वरच्या थरावरती जाऊन आपले दोन्ही हात सोडून नमस्कार करून हंडी फोडत होता. सगळेच जीवघेणे होते. 95 गोविंदा जखमी झाले आणि एका गोविंदाचा मृत्यू झाला हे दरवर्षी ठरलेलेच असते. दहीहंडी याचा अर्थ हा नाहीच मुळी. कृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे पूर्वी शाळा शाळातून छोटे कृष्ण तयार करून मध्ये बाजूला आणखीन छोटे कृष्णा किंवा गोप गोपिका तयार करून त्याच स्टुला वर तो छोटा कृष्ण उभा राहत असे ती छोटी बांधलेली दहीहंडी फोडत असे. हे दृश्य आम्ही पाहिले किंवा जास्तीत जास्त दोन तीन थराची हंडी पण काल दहा थराच्या हंडी ने पारितोषिक प्राप्त केले असे दोन गट निघाले. हि बातमी मी टीव्हीवर पाहिली. त्याशिवाय टीव्हीवर जे दिसत होते ते खूप भयानक होते अनेक नृत्यांगना हिडीस नृत्य करत होत्या समोरच्या मॉबला प्रोत्साहित करत होत्या. कंबर लचकवणे, शरीराचे वेडे वाकडे अंग विक्षेप ज्याला म्हणतो ते करणे चालू होते. मागे तसेच भयानक गाणी लावली जात होती. समोरची 17 /18 वर्षाची मुले त्याच्या मागे बसलेले तरुण ही आपली सगळी तरुणाई कंबर लचकावून दोन्ही हात बाजूला घेऊन शरीर घुसळून नाचत होती आणि विचित्र हातवारे करत होते. क्षणभर वाटला हा आपला भारतीय संस्कारच नव्हे! पण हे कोण सांगणार? हे दृश्य पाहून खूप वाईट वाटले.

दहीहंडीचा खरा अर्थ एका कीर्तनकाराने फार सुंदर सांगितला श्रीकृष्णाच्या काल खंडात दहीहंडीचे जे वर्णन आहे त्यामध्ये चार थराची दहीहंडी चौथ्या थरावर श्रीकृष्ण, आणि ती दह्याची लोण्याची हंडी फोडून श्रीकृष्ण तो ती हंडी फोडून तळ्यातल्या माणसाला पहिल्यादा खायला देतो. इथे समाज व्यवस्थेवरती खूप छान भाष्य केलं गेल आहे ते म्हणतात, ” समाजात त्या काळात चातुर्वर्ण रचना होती ती कर्मानुसार होती म्हणजे कामानुसार भाग्यानुसार नाही मग या चारही थरामध्ये चौथ्या थरावर चढून जाणारा जो आहे तो या तिन्ही थरांच्या मदतीने वर गेलेला आहे त्याची जबाबदारी आहे की तळागाळातल्या प्रत्येक माणसाला त्या हंडी मधला ऐवज मिळाला पाहिजे पहिल्यांदा तो तृप्त झाला पाहिजे नाहीतर मी हंडी फोडतोय मीच तिथे बसून लोणी खाणार असं कृष्णाने कधीच केलं नाही त्या हंडीतल्या धारा सगळ्या तळामध्ये प्रथम येत असत आणि त्यानुसार प्रत्येक थरातल्या माणसाला ते सर्व मिळाले पाहिजे हा अट्टाहास होता. वरच्या थरामधल्यानेच बसून सगळं खायचं नाही”. उत्तम संदेश आहे ना आज चातुर्वर्ण जरी नसेल तरी विचार किती सुंदर आहे की अगदी समाजातल्या तळातल्या माणसाला सुद्धा जे मी खाणार आहे ते मिळाले पाहिजे आणि त्यांनी खाल्ल्यानंतर मला ते उपलब्ध झाले पाहिजे किंवा त्याला दिल्याशिवाय मी खाता कामा नेये. त्याचे पोट भरणे ही माझी जबाबदारी आहे किती सुंदर संदेश मला त्या कीर्तनकारांचा हा खुलासा अतिशय आवडला. हंडी अशी श्रद्धेने झाली पाहिजे पण आज त्याला काही अर्थ उरला नाही आज हे सगळे सण इव्हेंट झालेत. राजकीय पक्षांचे तरुणाईला आपल्याकडे खेचण्याचे व्यासपीठ ठरले आहेत आणि त्या सणांना वाईट रूप आले आहे. गोविंदा आपलं कसब आपली कला आपलं कौशल्य दाखवत असतात त्यासाठी मेहनत करतात हे प्रेक्षणीय आहे पण त्या त्या स्टेजवर चाललेला धिंगाणा अत्यंत वाईट आहे ही सगळी राजकीय शर्यत आहे आपल्या राजकारण्यांनी अशा अनेक ठिकाणी घुसखोरी केली आहे आणि त्या सणांच पावित्र्य नष्ट केलय. सरकार पक्षाला नामोहरम करणे इतकंच काम उरल आहे. उलट अशा सणांच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा एकत्रितपणे काम करून आपल्या तरुणाईला आपल्या संस्कृतीला साजेचा उत्सव साजरा करायला प्रोत्साहन देणे हे त्यांचे काम असायला हवे. न की बाया नाचवणे ती सुंदर नृत्य असती तरी छान वाटले असते परंतु त्या नृत्यांमधला नृत्य हा शब्द मी चुकीचा वापरते त्या नाचा मधला भडकपणा अंगवीक्षेप बाईच्या प्रत्येक अवयवाचे दर्शन अत्यंत वाईट पद्धतीने दाखवले जात होते ही आपली संस्कृती नाही हा आपला संस्कार नाही हे या तरुण पिढीला कोण सांगणार? आणि सांगणारा असला तरी त्यांना पटणार का? हा प्रश्न आहे कुठे जाणार आहोत आपण? …..!

मंडळी तुम्हाला काय वाटतं……?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सारेच झपाटलेले… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ सारेच झपाटलेले… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

(स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान जे आजच्या पिढीला माहित नाही)

सारेच झपाटलेले…

मंडळी, आमच्या वाड्यात ज्या घरात मोराण्याच्या कमलताई भाड्याने रहात होत्या व बालवाडीचे काम करत होत्या तेव्हा त्यांचा मुलगा शाम अवघ्या सहा/सात महिन्यांचा नुकताच बसायला लागला होता व सहा महिन्याच्या पोराला घेऊन त्या एकट्या आमच्या आश्रयाने बालवाडीचे काम करत होत्या. (नाही तर आम्ही बघा! )तेव्हा ही राष्ट्रसेवादलाची(नाव ही राष्ट्र सेवा दल वाह वा! ) ही सारीच माणसे देशसेवेने झपाटलेली होती व त्यांनी नाना प्रकारे आपल्याला कामात झोकून दिले होते. कमल ताईंचे यजमान दशरथ तात्या अधून मधून कापडण्याला ताईंना व अप्पांना म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला येत असत. मोठ्या उमद्या मनाचे व मोकळ्या स्वभावाचे गृहस्थ होते ते! मला वाटते त्यांनीही राष्ट्रसेवादलाला वाहून घेतले होते. म्हणजे पहा देशातल्या प्रत्येकच माणसाच्या मनात देशासाठी काही ना काही करण्याची प्रबळ इच्छा होती, देश स्वतंत्र होण्याच्या कामी माझी काय व कोणत्या प्रकारे मदत होऊ शकते याचा प्रत्येक भारतीय मनातून विचार करत होता व जमेल त्या मार्गाने देशसेवेत सामिल होत होता. (आज कमल ताई व तात्याही नाहीत पण माझ्या नजरेत मी लहानपणी पाहिलेले आज ही तसेच्या तसे आहेत.)कारण ह्या सर्व मंडळींचे झपाटलेपण माझ्या बालमनावर कायमचे ठसले आहे. हे फक्त एक उदा. मी तुम्हाला दिले पण त्यावेळी हे झपाटलेपण प्रत्येकच देशभक्तांत होते असे मी पाहिलेले आहे. क्रांतीपासून ते देश स्वतंत्र झाल्यानंतरही ही देश प्रेमाची लाट कित्येक वर्षे टिकून होती व विष्णुभाऊंसारखे कार्यकर्ते कित्येक वर्षे नव्हे आयुष्याच्या अखेरी पर्यंत देशासाठी प्राण पणाला लावून काम करत होते नि माझ्या वयाच्या पिढीवर हेच चांगले संस्कार होत होते. (आज हे देशप्रेम लयाला जाऊन त्याची जागा स्वार्थ व देशद्रोहाने घेतली की काय? असे म्हणण्या इतपत परिस्थिती भयावह झाली आहे की काय या विचारानेही आमच्या सारख्यांना प्रचंड भीती वाटून एवढ्या कष्टाने मिळवलेल्या व त्यागाने भारलेल्या स्वातंत्र्याच्या गळ्याला नख तर लागणार नाही ना? या विचारानेही अस्वस्थ व्हायला होते.)

बेचाळीसच्या चळवळीच्या आधी पासूनच ३०/३५ साला पासून ही सर्व देशभक्त मंडळी देशासाठी अक्षरश: झपाटून तहानभूक विसरून काम करत होती. माझे वडिल व त्यांचे सहकारी तर घरदार वाऱ्यावर सोडून देशासाठी काम करत होते. बाळूभाई मेहतां सारखी मंडळी पाठीशी होती व त्यांचा माझ्या वडिलांवर प्रचंड विश्वास होता. त्या मुळे भूमिगत राहून विष्णुभाऊ रात्री बेरात्री पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सायकलवरून कित्येक मैलांची पायपिट करत कार्यकर्त्यांशी संपर्क साधूनच त्यांना कामे नेमून देत व पैसाही पाठवत असत. समाजातील दानशूर मंडळी गुपचूप ह्या क्रांतिकार्याला पैसे पाठवत असत. कारण इतक्या लोकांचे जेवणखाणं व दारूगोळा पिस्तुले या साठी ही पैसा लागत असे. तो वरच्या नेत्यांकडून किंवा समाजातूनच येत असे. ब्रिटिश सरकारला सहकार्य न करता त्यांच्या पुढे अडचणी निर्माण करून त्रास देऊन त्यांना जेरीस आणायचे की जेणे करून ते देश सोडतील. पण ते काही कच्या गुरूचे चेले नव्हते. अतिशय धूर्त, पोहोचलेले व संयमी लोक होते ते! ते एवढ्या सहजा सहजी थोडीच जाणार होते!

खादी भांडाराचे ही काम चालू होतेच. त्या साठी विष्णुभाऊंना महाराष्ट्रभर फिरावे लागे. सुतकताईचे धडे देऊन विद्यार्थी तयार करावे लागत. त्या मुळे चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठे ही बदली होई व मुलांना आजोळी ठेवून माझ्या आईला सोबत घेऊन भाऊंची भ्रमंती चालू असे. आई सुद्धा खादीच्याच साड्या नेसून प्रेमाताई कंटकांसारख्या महिला नेत्यांसोबत जमेल तसा क्रांतिकार्यात भाग घेत असे. वर्ध्याला दोन वर्षे गांधी आश्रमात रोज प्रार्थनेला हजेरी व हरिजन वस्तीत राहून हरिजन बांधवांची सेवा, त्यांच्या समवेत जेवणखाण करून अस्पृश्यता निर्मूलनाचेही काम वेगात चालू होते. संडास धुण्यापासून सारी कामे आईवडील करत असत. देशा साठी काहीही.. अशी त्यांची भावना असे.

खानदेशातील विरदेल दलवाडे चिलाणे नवलनगर मुक्टी कापडणे अशा पंचक्रोशितील अनेक गावांत भाऊंनी सुतकताई व चरख्याचे, पेळू कसे तयार करायचे इथ पासून धडे देत शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते तयार केले. मग त्यांची ठिकठिकाणी सुतकताई केंद्रावर नेमणूक होत असे व ते स्वतंत्रपणे ते केंद्र चालवत व त्याचा अहवाल सादर करत असत. स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही धुळे व कापडणे सहित भाऊंचे हे खादी भांडाराचे काम चालूच होते. कापडण्याला तर महिला मोठ्या प्रमाणावर हे कताईचे काम करत असत. नंतर भांऊंनी अंबर चरखे ही मागवले होते. केंद्रात स्वतंत्रपणे माणूस नेमलेला असे तो हे काम बघत असे. मी खूप वेळा चिल्लर मोजायला अप्पांबरोबर बोरसे गल्लीच्या शेवटच्या घरात जात असे व रूपयाच्या नाण्यांच्या गड्ड्या करून अप्पांना देत असे, मग ते रूपये मोजून हिशोब लिहीत असत.

३० रूपये पगाराचे मिळत त्यातील १५ रूपये घरी पाठवून भाऊ १५ रूपयांत कार्यकर्त्यांसह संसार चालवित असत. त्यातून बदल्या व संसार जोडीला होताच. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आमचे पूर्ण कुटुंबच क्रांतिकार्यात सामिल होते. माझे आजोबा काका व मुक्टीची आत्या व मामा सारेच तुरूंगात जाऊन आले होते. याला म्हणतात देशभक्ती! कापडणे गावच मुळी स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते एवढे देशभक्त कापडण्यात होते. कापडण्याचे लोक क्रांतिकारकांची माहिती देत नाहीत, त्यांना छुपी मदत करतात म्हणून चिडून ब्रिटिश सरकारने कापडणे गावालाच सामुहिक दंड ठोठावल्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. अशी कापडणे गावाची महती आहे. कापडणे गावातील शेकडो लोकांनी या ना त्या प्रकारे ब्रिटिशांना जेरीस आणले होतेच पण फैजपूर कॅांग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा कापडण्यातील महिलांनी रातोरात ३/४ क्विंटल गहू जात्यावर दळून अधिवेशनासाठी पिठाचा पुरवठा केला होता व एकप्रकारे क्रांतिकार्याला हातभारच लावला होता. असे आहे कापडणे गाव! का बरे अभिमान वाटणार नाही त्याचा?

भूमिगत असतांना विष्णुभाऊ व त्यांचे सैनिक आताच्या नाशिकच्या थत्तेवाडीत लपून छपून कार्य करत होते. पोलिसांना सुगावा लागताच रातोरात पळायचे व दुसरे गाव गाठायचे असा खो खो सतत चालू असे. देशभर पळापळ चालत असे. माझी आई उत्तरप्रदेशची भाषा फार छान बोलत असे. म्हणायची कसला संसार बाई? कागदावर जेवायचो, रात्रीतून कधी कधी तीन घरे बदलावी लागत असत. पोलिस मागावरच असत कारण त्यांचे खबरे पेरलेले असत ते त्यांना सतत माहिती पुरवायचे. थत्तेवाडीतून मग माझ्या मामाच्या गावाला हिरापूरला

मामाच्या शेतात ही मंडळी बरेच दिवस भूमीगत होती. मामा चोरून लपत छपत त्यांना भाकऱ्या पोहोचवत असत. माझ्या आईची आत्या गंगू आत्या मुलांचा सांभाळ करत असे, एकप्रकारे त्याही घरात बसून क्रांतिकार्यालाच मदत करत नव्हत्या का? नक्कीच करत होत्या. हे क्रांतिकारक सतत ब्रिटिशांना जेरीस आणत असत. टेलिफोनच्या तारा तोडणे, जेणे करून ब्रिटिशांची दळणवळण यंत्रणा बंद पडेल, सरकारी कार्यालये लुटणे, जाळणे, तलाठी ॲाफिस जाळणे, ठिकठिकाणी आगी लावणे जेणे करून सरकारी कागदपत्रे जळून खाक होतील अशी अत्यंत जोखमीची कामे हे देशभक्त जीवावर उदार होऊन करत असत. त्यात ते ही जखमी होत असत, पण सापडून जाऊ म्हणून दवाखान्यात जायची सोय नसे असे मोठे जिकिरीचे जीवन या देशभक्तांनी देशासाठी पत्करले होते हे पाहून आज ही अभिमानाने ऊर भरून येतो. आज वाटते लक्षावधी लोकांनी एवढ्या कष्टाने देश स्वतंत्र केला आहे तो जपून ठेऊन तो प्रगती पथावर नेण्यासाठी कष्टाची व देशभक्तिची आस आम्हाला का नसावी? की आयते मिळालेल्या या स्वातंत्र्याची आम्हाला किंमतच नाही?

जणू काही हा देश आमचा नाही असेच अत्यंत अशोभनिय असेच आमचे वर्तन असते.

आपला देश सुंदर व संपन्न व्हावा म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो? झाडे लावतो? पाणी जपून वापरतो? पेट्रोल कमी वापरतो? ध्वनी प्रदूषण कमी व्हावे या साठी प्रयत्न करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारार्थी आहेत ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे? ही माती हा देश आम्हाला आमचा वाटत नाही काय? मग देशाकडून काही मागण्याचा तरी आम्हाला काय अधिकार आहे? तर मंडळी देश सेवा अशा प्रकारेही करता येते, सध्या आपण अशा प्रकारे ही देशसेवा करू शकतो. आपल्या देशाला साधन संपत्तीची गरज आहे, ती कशी वाढवता येईल हे आपण बघू या..

बरंय् मंडळी.. धन्यवाद..

जय हिंद.. जय महाराष्ट्र…

आपलीच..

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

 

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवेदनशीलता… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

🌸 विविधा 🌸

☆ संवेदनशीलता… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

मे महिन्याची सुट्टी संपत आली होती. नवीन वर्षाची शाळा आता सुरू होणार होती. काही मुले शाळेत जाण्यासाठी आनंदली होती, तर काही मुले आता खेळायला, उनाडक्या करायला मिळणार नाही म्हणून हिरमुसली झाली होती. तरीसुद्धा नवीन वर्ष, नवा वर्ग, नवे सोबती मिळणार म्हणून प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता होती.

अजय एका गावातील शाळेत शिकत होता. गावातील शाळा चौथीपर्यंतच असल्यामुळे त्याला आता शहरातील शाळेमध्ये जावे लागणार होते. तो सुद्धा शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होता. नवीन शाळेतील वातावरण कसे असेल, मित्र कसे वागतील, नवीन गुरुजी व बाई आपल्याशी कशाप्रकारे जुळवून घेतील, याविषयी त्याच्या मनात अनेक विचार येत होते. गावात राहिल्यामुळे त्याच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानातही थोडासा गावंढळपणा होता. तरीसुद्धा त्याच्याकडे खेळाचे व चित्रकलेचे उत्तम कौशल्य होते. गावातील शाळेच्या गुरुजींचा तो लाडका विद्यार्थी होता. अनेक चित्रकला स्पर्धेमध्ये व खेळण्याच्या स्पर्धेत त्याने बक्षीसे मिळवली होती. त्याच्याकडील कौशल्ये शहरातील शाळेतही अशीच विकसित व्हावीत असे त्याच्या गुरुजींना मनोमन वाटत होते.

जून महिना उजाडला. अजयच्या वडिलांनी शहरातील आदर्श विद्यालयात अजयला प्रवेश घेतला. या शाळेतील अनेक मुले शहरी संस्कृतीमध्ये वाढलेली होती. अजयला ही मुले चिडवू लागली. त्याला भाषेवरून, राहणीमानावरून हसू लागली. मात्र अजयने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तो नियमितपणे शाळेत जायचा. मन लावून अभ्यास करायचा. शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होवू लागला. अल्पावधीतच तो या शाळेतीलही गुरुजींचा आवडता विद्यार्थी बनला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अजयच्या वर्गातील तसेच शाळेतील बऱ्याच मुलांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेदिवशी अजयने मन लावून चित्र काढले. आकर्षक रंगसंगतीने चित्र सुबक बनविले. इतर मुलांना त्याच्याइतके सुंदर चित्र काढायला जमले नव्हते. नेहमी त्याला हसणारी चिडविणारी मुले आज मात्र कौतुकाने त्याचे चित्र न्याहाळत होती. स्पर्धा संपल्यावर गुरुजींनी सर्वांची चित्रे गोळा केली. काही वेळाने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. अर्थातच अजयचा शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला होता. अजयला खूप आनंद झाला. त्याचबरोबर अजयमुळे आपल्या वर्गालासुद्धा बक्षीस मिळाल्याचा आनंद इतर मुलांना झाला. सर्व मित्रांनी अजयचे कौतुक केले. “आजपासून आम्ही तुला चिडवणार नाही, तुझ्याबरोबर पक्की मैत्री करणार, ” असे प्रत्येकाने अजयला सांगितले. अजयने नम्रपणाने सर्वांचे कौतुक स्विकारले.

वर्गशिक्षक वर्गात आले. वर्गातील मुलांमध्ये झालेला बदल व मुलांना झालेला आनंद पाहून त्यांनाही समाधान वाटले. ते म्हणाले, “पाहिलेत विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाजवळ काही ना काही कौशल्य हे असतेच. कोण अभ्यासात हुशार असतो; तर कोणाजवळ इतर कौशल्ये असतात. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करायला शिकले पाहिजे. एकमेकांविषयी संवेदनशील असले पाहिजे.”

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोपाळ काला / काल्याचे कीर्तन… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गोपाळ काला / काल्याचे कीर्तन… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

बारसे हा आपल्या संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. बाळाचा जन्म झाला, त्याचा पाळणा झाला, नाव ठेवलं. श्रीकृष्ण! बाळ हळूहळू मोठं झालं आणि कृष्णाच्या खोड्या वाढल्या. त्याच्या बाललीला वाढल्या. पुढे तो कांबळीवाला झाला आणि काठी घेऊन गोधन चारायला जाऊ लागला. त्याचे अनेक सोबती होते. गरीब – श्रीमंत! सगळेच त्या ठिकाणी सारखे होते. सर्वांची शिदोरी एकत्र करून ते एकत्र खात तोच हा गोपालकाला.

पुढे हा गोपालकाला वारकरी संप्रदायात प्रमुख ठरला. कीर्तन करून हा गोपालकाला केला जाई. काल्याचे किर्तन म्हणजे कृष्णाच्या बाललीला! गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाशी संबंधित असलेले कीर्तन कृष्णाच्या विविध कथा भक्ती आणि तत्वज्ञानावर आधारीत – असे हे किर्तन असते. काला हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळांबरोबर जो काला केला, अगदी तसाच्या तसा काला वारकरी संप्रदायात केला जातो. जीवा – शिवाचे ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन. काला हे त्याग, समर्पण, विश्वास, असे परिपूर्णतेचे कीर्तन आहे. सामान्य माणसाला प्रसाद हा काल्याच्या कीर्तनातून मिळत असतो. वाळवंटात केलेला काला, भगवान कृष्णाच्या चारित्र्याचा विचार म्हणजेच काला.

काल्याचे वांङ्मयात तीन प्रकार आहेत. दहिभात अभेद आणि काला! असे हे तीन प्रकार असून काल्याच्या कीर्तनात तीन प्रकारचे अभंग घेतले जातात. बाळक्रीडा, गवळण आणि काला. दुसऱ्यांना खाऊ घालण्याची भारतीयांची संस्कृती यात आहे. भगवान कृष्णाच्या अवतारात परिपूर्णता आहे. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळ, कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा असेही कृष्ण शब्दाचे तीन अर्थ होतात.

वैकुंठामधे सर्व काही आहे. परंतु काला नाही, म्हणून तो अवीट असणारा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा वैकुंठातून मृत्यूलोकात परत येऊ, असं प्रत्यक्ष देव म्हणतात. वाळवंटाचे तीन गुण आहेत. बरे, नीट आणि उत्तम. काल्यात भारतीय संस्कृती बघायला मिळते. स्वतः जेवणे ही प्रकृती, दुसऱ्यांचे हिसकावून घेणे ही विकृती ‘ आणि दुसऱ्यांना जेवू घालणे ही संस्कृती. काल्याचा विषय हा – श्रीकृष्णाचे चरित्र, काल्याचे ठिकाण – वाळवंट, काल्याचा देव – श्रीकृष्ण, काल्याचे भक्त – गोपाळ! देव भक्तीचे आवीट सुख. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटात जो काला केला, तो काला देऊन सर्व गोपाल यांना तृप्त केले.

गोपालकाला – ज्याला दहीहंडी असे म्हणतात, हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात विशेषत्वाने हा साजरा होतो. तिथे लोक मानवी मनोरा तयार करून दही आणि लोणी असलेले माठ फोडतात.

कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादाला सुद्धा गोपालकाला असं म्हणतात. या व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे किर्तन होते, तेव्हा तेव्हा कीर्तनानंदात गोपाल काला होतो. म्हणून याला गोपालकाल्याचे कीर्तन असे म्हणतात. ज्ञानेश्वरी किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर, एक्का, एकादशीचे पारणे, कीर्तन महोत्सव, अशावेळी शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपालकाला करूनच होते.

गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे, दही – ताक, चण्याची डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिळून काला तयार केला जातो. हा कृष्णाला फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण आणि सर्व सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत आणि सर्वजण वाटून स्वतः भगवान खात असे मानले जाते.

गोपालकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात, निर्गुण चैतन्याची संबंध दर्शविणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समुच्चय! काला हा शब्द एकसंध व सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. श्रीकृष्णाच्या वेदांगी पूर्णकारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो. पोहे दही दूध ताक लोणी हे प्रमुख पाच घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत. पोहे – वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक. म्हणजेच श्रीकृष्णाला धरून ठेवणारे त्याचे सवंगडी! दही – वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक आहे. दूध – गोपींच्या सहज, सगुण, मधुरा भक्तीचे प्रतीक तर ताक – गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक आहे. लोणी – सर्वांच्या श्रीकृष्णावरील अव्दैत प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी ब्रम्हांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

शरीर व मन यांना पोषक असे या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारित असल्याने, देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने, मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढविणारे असते. सर्व सृष्टी आनंदी असते.

कीर्तनामधे मधोमध एक छोटीशी दहीहंडी टांगली जाते. त्याला एक मातीचे गाडगे बांधले जाते. त्यात थोड्याशा लाह्या आणि दही असतं. कुठले तरी वारकरी आपल्या टाळानेच ते गाडगे फोडतात आणि “गोपालकाला गोड झाला – दैवी होता त्याला मिळाला ” हा गजर करतात आणि त्यानंतर गोपालकाल्याचं भजन होतं एक भजन आपण बघूया.

चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी

मांडीयेल्या काल्या भवती गोपाळांची दाटी ॥

*

आनंदे कवळ देती एका मुखी एक

न म्हणती सानथोर अवघे सकळीक ॥

*

हमामा हुंबरी पोवा वाजविती मोहरी

घेतलासे फेरा माजी घालुनिया हरी ॥

*

लुब्धल्या नरनारी अवघ्या पशुजाती

विसरल्या देहभान शंका नाही चित्ती ॥

*

पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी

तुळशी गुंफोनिया माळा घाली कंठी ॥

*

यादवांच्या गोपी मनोहर कान्हा

तुका म्हणे सुख वाटे मोहुनिया मना ॥

*

तर असे हे गोपालकाल्याचे कीर्तन किंवा भजन. आजच्या पिढीला किमान काही शब्द कळावेत म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या संबंधात अनेक कथाही आहे.

मात्र स्वानुभवाने एक गोष्ट इथे सांगते आहे. मंदिरात वगैरे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात काला कालवण्याचे काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गावातल्या अनेक घरातून काल्याचं सामान येतं. ते काही एकदम एकत्र येत नाही. तेव्हा आलेली प्रत्येक वस्तू / मग ते ताकदही असो, पोहे असूदेत किंवा लोणचे! काल्याच्या चवीत तसूभरही फरक पडत नाही. तो तेवढाच अप्रतिम लागतो.

असो.

पुढेही सण येतच आहेत. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाल्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “राष्ट्रीय सण…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “राष्ट्रीय सण…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“कोणत्याही सणांपेक्षा राष्ट्रीय सण सर्वात महत्त्वाचे. “

जुलै, आॉगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••

असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••

महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••

देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, व सांजोरया, पुरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••

प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••

याच बरोबर 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.

तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.

आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?

आपल्याच घरच उदाहरण घ्या…. घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच.

घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.

कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायचा, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. माझ्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलना आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.

जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील 140 करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा……

मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही तर दररोजचचच..

इतक्यातच घडलेली घटना…..

41 वर्षानंतर अंतराळातून

भारत कसा दिसतो?

याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…

अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.

त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.

अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.

मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,…. मी माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच नाही.

सिंदूर ऑपरेशन  च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.

परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे ही. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••

 हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो?? . म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.

ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?

कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••

देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असते.

मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल.

मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..

ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।

म्हणतात ना…

Your greatest weapon is your mind. Train it

To make right decisions.

To make right selectios.

To make right choices.

जय हिंद.

 

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? विविधा ?

☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार….

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या वेलू ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… मुत्तू वेदुंगानाथ थेवर यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक विध्वंसक युद्ध म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा लढ, आगे बढो… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या समिधेने! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक मोळीच बांधली तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… “रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग”… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… कुयिली ला आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी कुयिली ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात! नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती.

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने * मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा, टिपू सुलतान वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगई… वीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपू यात ही त्रिपुटी… आणि म्हणू यात ना… तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares