मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरी वाजले सूप…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏 जरी वाजले सूप…! 👍 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आली आली म्हणता

येवून सरली दिवाळी,

ठेवा डब्यात माळ्यावर

आता शिल्लक रांगोळी!

*

चिवडा चकली शेवेचा

उरला असेल जर चुरा,

करून सुट्टीत मिसळ

घरातच तो वापरा!

*

लक्ष्मी पूजनाचे ताट

ठेवा नीट सांभाळून,

पुढच्या वर्षी दुप्पट

भर घालायचे ठरवून!

*

फटाक्याच्या धुरात

पुन्हा पैसे नका टाकू,

अनाथालया दान देण्याचे

मनांत ठरवून टाकू!

*

जरी संपला दीपोत्सव

ठेवा तेवत स्वप्नांचे दीप,

निर्धार करुन स्वप्नपूर्तीचा

जगी मिळवा मान खूप!

जगी मिळवा मान खूप!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दर्पण… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दर्पण… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

सृष्टीस मोह झाला

प्रतिबिंब पाहण्याचा

कंठात हार घाली

पितस्वर्ण फुलांचा

*

पाण्यात पाहताना

प्रतिबिंब ती स्वतःचे

पाणीही जाहले स्तब्ध

दर्पण होई जलाचे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्ग ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ निसर्ग ☆ सौ. मंजिरी येडूरकर

मज दावितो निसर्ग, रोज वेगळेच भास

शाळाच भरवितो जणू, ऋतूंचीच खास

*

येता वसंत कोकिळ, खुलवितसे शिवार

येईल पानोपानी, फुलवेलींना बहार

*

बेचैन होतसे मी, ग्रीष्मातल्या झळांनी

बसलाय शुष्क चातक, चोचीस फुलवोनी

*

चैतन्य देई वर्षा, नटली वसुंधरा ती

उघडे निळा पिसारा, मन मोर नाचताती

*

आकाश स्वच्छ होता गीत रंगले खगांचे

शरदात पांघरते, नभ वस्त्र चांदण्यांचे

*

बोचऱ्या हिवाचा, नको पहाटेस स्पर्श

हेमंत येई घेऊनि, शेकोटीचा ग हर्ष

*

अति रुक्ष पानगळ, शिशिरात होतसे ती

अंकुर नाही डोई, तरी वृक्षास नाही भिती

*

वाट पाहतो हा, उरी घेऊनि मनिषा

येईल पुन्हा वसंत, बहरेल माझी आशा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “हा छंद जिवाला लावी पिसे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “हा छंद जिवाला लावी पिसे...” ☆ सौ राधिका भांडारकर 

धुंदमनी एकाकी मी गातो

देहभान विसरुनी जातो

नाद पैंजणी तुझाच भासे

हा छंद जिवाला लावी पिसे।ध्रु।

*

मंद वारा कसा बिलगतो

गंध स्पर्श तुझा जाणवतो

मिठीत यावे वाटतसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

तव दिठीतली तेजकळी

कपोली लाजरी एक खळी

आठवून मी बेभान असे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

डाव तो खट्याळ पावसाचा

आरस्पानी देह लावण्याचा

प्रणयात जीव गुंततसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

हरित पानी पीत बहावा

बेचैन करी तुझा दुरावा

टिपुर चांदणे नभी हसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष आहे मोह ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कल्पवृक्ष आहे मोह ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 (अष्टाक्षरी)

तुला पाहून मनाला

माझ्या पडतो ना मोह

असा सुगंध देणारा

कल्पवृक्ष आहे मोह

*

मोठ्या मोठ्या पानांमध्ये

पांढुरकी छान फुले

येता वाऱ्याची झुळूक

झुबक्यात पहा खुले

*

रात्री उमलती सारे

किती झाडाखाली सडे

आदिवासींचा हा देव

सदा उपयोगी पडे

*

तेल बनतेच याचे

औषधेही बनतात

फळफुल पान सारे

उपयोगी गणतात

*

फुले लागतात गोड

प्राणी पक्षी खाती सारे

माणसाला झिंग चढे

मोहाचे या रंग न्यारे

*

खीर रोट बनवती

आदिवासी खाण्यासाठी

पर्यावरण राखतो

हवा शुद्ध देण्यासाठी

*

नावातच मोह आहे

मद्य बनते फुलांचे

आज मोहाचे केले मी

काव्यातून गाजेवाजे

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आता थांबायचं नाही… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आता थांबायचं नाही… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कोणी टाकले दगड वाटेत

अडथळे उभे अडवायला ||

पाहिले उंच त्या आकाशाकडे

निर्मीत वाट लागे चालायला ||

*

धारेची मग मी झाले ओहोळ

अडथळ्यांना वळसे घालून ||

कपारीवरून झोकून दिले

मिरवले मग झरा होऊन ||

*

कितीतरी ते खड्डे बुजवले

कितीतरी गं काठ सजवले||

माझ्यासंगे ‘जीवन’ फुलवीत

सरीता झाले वाहत राहिले||

*

पुढे जायचा घेतला वसा मी

कुठेच आता थांबायचं नाय||

सागर होऊन दाखविणार

ध्येय मार्ग जरी दुर्गम हाय||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९२ ☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९२ ?

☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तू एक ताठ कणा,

“मोडेन पण वाकणार नाही”

असा!

मला समजत होते,

तुझे वेगळेपण,

पण सहन होत नव्हते,

तुझे शाब्दिक अंगार,

सहनशीलता—

वेगवेगळ्याच असतात ना…

प्रत्येकाच्या!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गहिवर… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ गहिवर ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

माहेर सोडून सासरी निघता,

गहिवरले मन माहेरासाठी!

सासरी गोतावळ्यात रमले,

गुंतून गेले मन संसारासाठी!

*

एक दिवस असा उजाडला,

निरोप द्यावा लागे लेकीला,

मन माझे गहिवरून आले!

पापणीआड झाकले पाण्याला! …

पाहून लाडक्या नातीला,

गहिवर दाटे माझ्या अंतरात!

गोजिरवाणी नात माझी,

जेव्हा जाते दूर देशात!

*

जिवलग अपुले दूर जाता,

मन गहिवरले कोणाला सांगू!

जीव गुंततो आप्तेष्टांमध्ये,

गहिवर मनाचा कोणास दावू!

*

प्रेम- जिव्हाळा नाती देती,

सुख दुःखाचे डोळ्यात पाणी!

गुंफत धागे या जीवनाचे,

गहिवरते मन भाव भावनांनी!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०७ ☆ चळलो नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०७ ?

चळलो नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

चकाकणाऱ्या सोन्याला मी फसलो नाही

सुंदर होता जरी पिंजरा भुललो नाही

*

धुंद केवडा त्याच्या भवती साप विषारी

राजकारण्यां सोबत काही रमलो नाही

*

मानवतेचा झेंडा होता हाती माझ्या

सौख्य त्यागले कर्तव्याला चुकलो नाही

*

स्वप्नी रोजच जरी यायची रंभा माझ्या

सारी स्वप्ने फसवी होती चळलो नाही

*

गजल सोबती आहे म्हनूनच कार्यमग्न मी

जरी जगाला तसा फारसा कळलो नाही

*

सुख दुःखाची गाठ भेट तर रोजच होते

दुःख घेउनी कधीच सोबत बसलो नाही

*

पिकले आहे केस जरासे डोक्यावरचे

वय झाले पण तसा मनाने पिकलो नाही

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आम्ही आनंदी पाखरे

मन आभाळ भरारी

आम्हा आनंद सावरे

दुःख-वेदना निवारी.

 *

आनंदी गातच गीत

आम्ही आनंदे विहारु

आनंदी स्वप्ने अंतरी

आत्म संतुष्टी साकारु.

 *

युध्द वादळ संघर्ष

पार सागर अनंत

आनंदी भाव लहरी

शब्द आनंदे सुपंथ.

 *

आम्ही सेवतो आनंद

आनंद आमुचा स्पंद

जीवना सुखाचा स्वर्ग

 संसारी आनंद छंद.

 *

पसरे आनंद किर्ती

त्रैलोकी सोहळा पुर्ती

देहाचे विकार होमा

देतसे आनंद स्फुर्ती.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares