मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गाची रंगपंचमी ☆ शुभदा भा. कुलकर्णी ☆

शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? निसर्गाची रंगपंचमी ?  शुभदा भा. कुलकर्णी ☆

बाई माझ्या अंगणात 

रंगे पंचमीचा खेळ 

रंगात रंगुनी साऱ्या 

निसर्गही बहरात..

*
कोवळी ही हिरवाई 

पानांपानांत हसली 

कळी -फुलां बिलगुनी 

आनंदाने गाणे गाई..

*
सप्तरंगात न्हाली 

फुले मोहक सुंदर 

वाऱ्यासवे झोके घेता 

नकळत शहारली..

*
वसंताच्या सोहळ्याला 

येई रंगत आगळी 

हर्ष भरे मन माझे 

देई साद कवितेला..

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मातृत्वाची दैवी शक्ती! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मातृत्वाची दैवीशक्ती! ? श्री आशिष  बिवलकर ☆

व्याघ्र मुखी तिचा जीव,

निश्चिंत नेत्र पाडसं सुखरूप |

तिन्ही जगी श्रेष्ठच माता,

त्याग समर्पणाचे वंदावे रूप |

*

आई ती आई असते,

जीव तिचा सदा लेकरात |

अखेरच्या श्वासापर्यंत,

तेवत ठेवते जीवनाची वात |

*

लेकेराला जन्म देण्यापासून,

वाढेपर्यंत सोसते नाना कळा |

अपार कष्ट हाल अपेष्टा सोसत,

जगते निरपेक्ष मातृत्वाचा सोहळा |

*

लोण्यापेक्षा मऊ असतात,

मातेच्या ह्रदयातले भाव |

ममत्वाचा महासागराच तो,

कुणी न जाणे अंतरंग ठाव |

*

मातृत्वाची दैवीशक्ती सदैव,

तिच्याच अंगात फक्त वसते |

मृत्यू जरी उभा राही समोर,

लेकरांनाच न्याहळत असते |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आभा स्वागत… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आभा स्वागत… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

दोन बाजूला चवऱ्या ढाळक 

मधे अंथरला फुलगालिचा 

नभा मधुनी आभा उतरे 

थाट अनोखा तिच्या स्वागताचा ||

*

दोन ढग हे तत्पर असती 

सुगंधी जल शिंपडण्यासाठी 

खग आरव हे हलके नादती 

स्वागत गीत म्हणण्यासाठी ||

*

प्रसन्नतेचे अत्तर सांडले 

वातावरण हे चैतन्यमयी 

रंगसंगती निसर्गाची अशी 

वाटे सकलां मोहमयी ||

*

स्वागताचा हा रम्य सोहळा 

पहाता प्रभात सरते झरझर 

उष्णताही घेउन संगे 

दिनराज मग चढतो वरवर ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चाहूल कृत्रिमाची!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चाहूल कृत्रिमाची!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

ए आय ची फुलं 

मना पाडी भूल

येतेच चाहूल

कृत्रिमाची!!

*

निसर्ग संपन्न

आमुचा हा देश

कशास हवी

साथ ए आय ची!!

*

ए आय घुसता

फोटोग्राफी मघे

सायबर गुन्हे

फोफावती!!

*

बघाया वाटते

नेत्र सुखावह

परिणाम याचे

वाटे भयावह!!

*

गुन्हेगार वृत्ती

स्वार्थावर भक्ति

योजतील युक्ती

निःसंदेह!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चांदणीचे रूप हिचे… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चांदणीचे रूप हिचे… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या सोळा, यती आठव्या अक्षक्षरावर)

(भावगीत)

येता बकुळ फुलोरा सुगंधाची मांदियाळी 

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||ध्रु||

*

मन जाते माझे तेथे ताटव्यात सुगंधाच्या 

किती देखणे लावण्य ओटी मध्ये  वसंताच्या

कोणी इळन्नी म्हणती कोणी म्हणती बकुळी 

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||१||

*

कधी ओवळ होऊन वेळेसरात गुंफले

कुंतलास गंधाळतं दान त्याने हो शिंपले

फुले उमलु येताना गोड मधुकण गाळी 

गंधवारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||२||

*

कवितेचे शब्द झाली लावणीला शोभा आली

कोणी रमणी देखणी बकुळीचा साज ल्याली  

चांदणीचे रूप हिचे तारकांची हो झळाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||३||

*

हिच्या सुगंधाची भूल मनाला लागले  पिसे

बरसोळी ओघळता हिमवर्षावच दिसे

बासरीची धून गातो गोकुळचा वनमाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||४||

*

बकुळीच्या गंधकोशी अत्तराचा फाया झाला

सा रे ग म प ध नी सा स्वर माझा आला आला 

बकुळीची गोड बिंदी लावली मी काव्यभाळी

गंध वारा पिंगा देतो ओघळती सायंकाळी ||५||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अध्यात्माचे शाश्वत धन! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अध्यात्माचे शाश्वत धन! ? श्री आशिष  बिवलकर ☆

शेगाव ग्रामे,

प्रकट झाले श्री गजानन!

अवलिया असा,

अध्यात्माचे शाश्वत धन!

*

उष्ट्या पत्रावळी,

आनंदे अन्न सेवन!

योगियाचे झाले,

जगा प्रथम दर्शन!

*

गजानन महाराजांनी,

केल्या लीला अगाध!

धावून भक्तांच्या हाकेला,

कृपेचा दिला प्रसाद!

*

झुणका भाकरी नैवैद्य,

महाराजांना तो प्रिय!

चिलीम घेतली हाती,

भाव भक्ताचा वंदनीय!

*

गण गण गणात बोते,

ध्यान मंत्र मुखी सदा!

सरतील संसारी दु:खे,

टळतील सर्व आपदा!

*

शेगावी दर्शना जावे,

करावे तेथे पारायण!

एक चित्ती ध्यान करावे,

प्रसन्न होईल नारायण!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मुग्ध कळी… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

 

?️? चित्रकाव्य ?️?

? मुग्ध कळी… ? प्राची अभय जोशी ☆

सकाळ होताच कळीने 

अलगद उमलावं…

*

वा-याच्या झुळुकेत अगदी

हळूवार डुलावं…

*

सुंदरता काय असते हे

यांच्याकडून शिकावं…

*

स्वतःच्या अबोध सौंदर्यानं

सर्वांना मंत्रमुग्ध करावं…

*

किती ते सुंदर दिसावं अन

किती ते सहज असावं…

*

काटयांमधे उमलून सुद्धा

खूप कणखर रहावं…

*

स्वतःचे गुलाबीपण मात्र 

अगदी अभिमानाने मिरवावं…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रांगोळी अशी ही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रांगोळी अशी ही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

निळ्या आभाळी

नाजुक रांगोळी

रेखिलीय कोणी

सकाळी सकाळी!!

*
वारा वाहे तशी

बदलते नक्षी

आभाळ अंगण

तयासाठी साक्षी!!

*

रंग रांगोळीचा

फिकट लिंबोळी

निळ्या लिंबोळीची

आगळी ही खेळी!

*

रंगसंगती ही

मना पाडी भूल

आभाळाचं चित्र

मनात रेखलं!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वेड्याला वेळीच आवरा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ वेड्याला वेळीच आवराश्री प्रमोद वामन वर्तक ☆

लोटून जगाला भयंकर 

तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत 

वेडा “तात्या” स्वतः निघाला

आरूढ होण्या मुद्रेवर घाईत

*

जगात डागाळलेली प्रतिमा 

स्वच्छ होईल कां स्वर्णमुद्रेने?

अहंकाराचा मेरूमणी म्हणून 

पूर्वीच ओळखले त्या जगाने

*

बगल मारून कायद्याला

“तात्या” स्वर्णनाणे छापणार 

स्वतः नरकवासी झाला तरी 

शिक्का बनून अमर राहणार

*

द्यावी सु्बुद्धी लवकर त्याला 

आज विनवितो मी येशूला 

नाहीतर एका ठार वेड्यामुळे 

अंत जगाचा तो ठरलेला

अंत जगाचा तो ठरलेला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गगनजाई रूपवती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गगनजाई रूपवती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत)

येता ऋतूगंध खास, फुले येती बहरास 

पाय माझे तिथे घुटमळती

शरदाच्या चांदण्यात, हेमंतातली पहाट 

गगनजाई रूपवती

 

उंच उंच तरू देखणे 

पानात रुपेरी चांदणे

झुपक्यात फुलांचे नांदणे

पाचूला श्वेतांगी गोंदणे

हा वारा येता येता, सुगंधाच दान देता 

माझ्या मनास मोहवती

 

नभात रातीची चांदणी

भुलली पाहून रजनी

भेटण्या आतुर धरणी

सुगंध घेऊन अंगणी

बकावली फुलणारी, फुले भिरभिरणारी

वळेसरात गंधवती

 

पाटलीनबाई दिसते भारी

गगनमल्लीगे चमचमणारी 

धवल चंद्रिका दिसते न्यारी

मन गाभारी रुजली सारी

दृष्ट काढूया का याची, याच्या देखण्या रुपाची

ओंजळीत माझ्या किती खुलती

 

आकाशमोगरा कुणी म्हणे

बुचाच्या फुलात हिला गणे

आकाशनीमास देखणे

लाभले चंदेरी चांदणे

मन बालपणी जाते, त्याचे माझे गोड नाते 

कवने ओठी मज स्मरती

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares