मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

फोडशी भारंगी आणि तेरे अळू

आषाढात खाल्ले हळू हळू

*

केनी कुरडू शेवगा आणि टाकळा

श्रावणात खाऊन करू मोकळा

*

भेंडी पडवळ दोडका आणि गवार

भाद्रपद अश्विनात याचाच भडिमार

*

भोपळे महाराज कार्तिकात फोडू

वांगी आणि मुळा जोडीला काढू

 *

कडवे कुळीथ चवळीचे गावातच शेत.

मार्गशीर्षात उसळ कळणाचाच बेत

*

फणसाच्या कुयरीची भाजी

पौषातच खायची

दारातील तोंडली शेंगा हिरवी केळी

जोडीला काढायची

 *

माघ फाल्गुनाला काय

असं म्हणू नका

चिने कणगी कांदे सुरण.

दारातच आहे केळीचा कोका.

*

चण्याची उसळ आणि आंबा डाळ

याची मजा चैत्रात फार

वैशाखाची मजाच आगळी

उकडगरे आणि आमरस प्रत्येकवेळी

*

पावसाळ्याची बेगमी करून

उरलं सुरलं जेष्ठात संपवू

वर्षभर बाजारात गेलोच नाही

आमचं काही अडलं नाही

*

कोकणच्या गृहिणी आम्ही हुषार

टोमॅटोची दादागिरी

नाही चालू देणार नाही चालू देणार!

कवयित्री: सौ. विद्या विष्णु वेलणकर

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || भुरळ… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || भुरळ… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

शोधक या नजरेला,

तुझीच रे आस आहे |

क्षणोक्षणी आहे संगे,

त्याचा मज भास आहे |

*

मागे वळून पाहतांना,

स्वप्नांनी भरलेली वाट |

संपता संपत नाही रे,

आठवणींचा थयथयाट |

*

वावरले होती तुज संगे,

सोडून जगाची रे लाज |

रंगीत स्वप्नांची झालीत,

आसवे कशी रे आज |

*

काय सांगावे कोणास,

जडली होते रे वेडी प्रीत |

हरवलास सोडून वाटेवर,

विखुरले रे प्रणयाचे गीत |

*

काही केल्या उमजेना,

कशाची घातलीस रे भुरळ |

तू जरी नाही सोबतीला,

हृदयात तुझेच स्थान रे अढळ |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ. मंजिरी येडूरकर – अभिनंदन – आणि त्यांची एक कविता ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. मंजिरी येडूरकर

💐अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंजिरी येडूरकर यांनी तिहेरी यश संपादन केले आहे.

काव्य किरण मंडळ, कल्याण यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत त्यांच्या ‘ज्ञानेश्वरांचा वसंत’ या रचनेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

ऋतूपर्ण दिवाळी अंक आयोजित कथा स्पर्धेत त्यांच्या कथेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्याकडून मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी घेण्यात येणा-या साहित्यभूषण या परीक्षेत तृतीय कृष्णामाई पुरस्कार प्राप्त झाला आहे.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता – ज्ञानेश्वरांचा वसंत

 

☆ ज्ञानेश्वरांचा वसंत ☆

 (राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा, काव्य किरण मंडळ, कल्याण)

(विषय – संत ज्ञानेश्वर, शीर्षक – ज्ञानेश्वरांचा वसंत)

दिसतो वसंत, व्यासांच्या तेजाते

महाभारताते, वैभविले

*

अर्जुन वसंत, कृष्ण तो कोकीळ

पार्थास कथील, गीताख्यान

*

वसंत कळतो, हिरवाईतून

दिव्य तेजातून, जैसा ज्ञानी

*

प्रतिभेच्या वेली, बहरली गाणी

देह रुपी वनी, वसंत हा

*

मी पण लोपेल, स्मरा भगवंत,

भक्तीचा वसंत, गीताख्यान

*

वसंती सुमने, सुमनी शैलेय

श्रीकृष्णी अजेय, गीतार्थात

*

कर्म फल त्यागी, वसंत मोहवी

म्हणे त्या माधवी, ज्ञानदेव

*

वसंती मोगरी, ओवली वा सुटी

समानत्व वाटी, गंधामाजी

*

तैसे साम्य दावी, गीतेची संस्कृत,

टीका ती विस्तृत, मराठीत

*

अशा या वसंता, किती रूपातून

पाहतो आतून, ज्ञानदेव

सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – डॉ. शोभना आगाशे – अभिनंदन – आणि त्यांची एक कविता ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शोभना आगाशे

💐अ भि नं द न 💐

काव्य किरण मंडळ, कल्याण यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. शोभना आगाशे यांच्या ज्ञानेश्वर समाधीया रचनेस द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

तसेच

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्याकडून मराठी साहित्याच्या अभ्यासासाठी घेण्यात येणा-या साहित्यभूषण या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले आहे.

त्यांच्या या उज्वल यशाबद्दल ई अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता – ज्ञानेश्वर समाधी

ज्ञानेश्वर समाधी ☆

 *

भावार्थ दीपिका, लिहविली माये

तीर्थाटना जाये, संतांसवे ||१||

*

परतुनी येता, आज्ञा मागे तदा

जाया मोक्ष पदा, विठाईसी ||२||

*

इंद्रायणी तीरी, वंदूनी गुरूसी

विनवी आज्ञेसी, ज्ञान राजा ||३||

*

समाधीची वार्ता, जाई संतांप्रती

वैष्णवांचे चित्ती, थारा नाही ||४||

*

पंढरीचा रावा, रुक्मिणी सहीत

ऋषी, मुनी, संत, जमा होती ||५||

*

समाधीचे स्थान, सिद्ध ते अनादि

तेथेच समाधी, ज्ञाना घेई ||६||

*

द्वादशी पारणे, रांधे रुक्माबाई

हरी वाढू जाई, प्रसादासी ||७||

*

फुटलासे बांध, निवृत्तीचे मन

करी समाधान, विठूराया ||८||

*

एके बाजू गुरू, दुजे देव तारू

वाद्यांचा गजरू, चोहीकडे ||९||

*

समाधीस्थ होता, निरंजनी लीन

झाले ब्रम्हपूर्ण, ज्ञानराज ||१०||

 डाॅ. शोभना आगाशे

वाकड, पुणे

 मो. नं. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – अणुरेणुया थोकडा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – अणुरेणुया थोकडा … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 अणुरेणुया थोकडा / तुका आकाशात येवढा //१//

गिळूनी सांडिले कळिवर /भव भ्रमाचा आकार//२//

सांडिली त्रिपुटी/ दीप उजळला घटीं //३//

तुका म्हणे आता/ उरलों उपकारा पुरता //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपला आपल्याला आत्मसाक्षात्कार होणे ही फार कठीण गोष्ट आहे. तो अधिकार सहजा सहजी मिळत नाही. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपण खरे कोण आहोत याची आपल्याला जाणीव होते. तुकाराम महाराजांना परिपूर्ण ध्यानचिंतना नंतर ही अवस्था प्राप्त झाली होती. त्यांनी स्वतःला आजमावले होते. म्हणूनच ते म्हणतात.

अणुरेणुहून लहान असलेला तुकाराम आता आकाशा येवढा झाला आहे. कारण माझा देह म्हणजे या संसारात वावरणारा केवळ भवभ्रमाचा आकार आहे हे मी जाणले आहे. त्या देहालाच मी गिळून टाकले आहे. आता फक्त त्याचे कलेवर बाकी उरले आहे. त्यांच्यावर माझे आता पूर्ण नियंत्रण आहे. ते कलेवर आता मी माझ्या ताब्यात घेतले आहे. याचे एक कारण आहे. मला त्रिपुटीची जाणीव झाल्यावर मीच तिला ओलांडून तिच्या पलीकडे पोहोचलो आहे. ती मी सांडून टाकली आहे. त्यामुळेच मी कोण आहे हे दाखवणारी प्रकाशज्योत आता माझ्या घटात प्रज्वलित झाली आहे. मला दिसली आहे. त्या मुळेच माझ्या पुरताच असणारा मी आता संपून गेलो आहे. आता मी फक्त उपकारा पुरताच उरलो आहे.

परमेश्वर सर्व व्यापी आहे. आपल्यात आणि परमेशरात फारसा फरक उरलेला नाही अशा परमतत्वाची अनुभुती झाली की आपण अगदी क्षुल्लक आहोत याची जाणीव होते. आणि आपण आकाशायेवढे विशाल आहोत हे ही कळून चुकते. मग आपला देह त्यापुढे काहीच नाही याची जाणीव होते. त्याचा सर्व अभिमान गळून पडतो. देह फक्त कलेवरासारखा दिसू लागतो. आपल्यातल्या अहं भावनेचा अस्त होतो. मग वेगळ्या अलौकिक साक्षात्काराचे तेज प्रकटते. ते आपल्यात संचारते.

आणि आपल्यात उरते ती दुस-याला प्रेरणा आणि चैतन्य देण्याची भावना

* 

.© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अगोचर… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अगोचर… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

सगुणात नाही

म्हणोन का दु:खासी थारा

दिसतो का कधी कुणा?

तरी वाहतोच की रे वारा….

*

वा-यापरी आहे

सर्वत्र मी व्यापलेली

वा-यासमान समदृष्टी

मज सान-थोर ना कुणी….

*

नकोच शोधू तू मला

आता इथे तिथे, कुठेही

प्रसन्न मी तूझ्या भक्तीवर बाळा,

सदैव तूझिया हृदयी राही….

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “निवृत्तीनंतर…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाटे उठावे स्वतः चहा करावा

झोप मोडेल असा आवाज नसावा

*

प्राणायाम करावा योग साधावा

हाडे मोडतील इतपत तो नसावा

*

फिरायला जावे प्रमाणात असावे

सोबत मोबाईल खिशात असावा

पडाल कोठे तर नक्की सापडाल

आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा

न रागावता गोड मानून घ्यावा

*

किराणा भाजी पोस्ट बँक

फिरणे समजून आनंद घ्यावा

*

ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा

पण त्यात कुठला वाद नसावा

मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा

*

लिहीणे वाचणे वाजवणे गाणे

एखादा तरी छंद नक्की असावा

*

मी कोणी मोठा होतो हे विसरा

मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा

मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती

लक्षात ठेवा हीच कामाला येती

*

आता काय राहलंय? म्हणू नका

कुणाला उपदेश करत सुटू नका

पर्यटन चित्रपट नाटक

राहुन गेले असेल तर उरका

पत्नीला सोबत घ्या विसरु नका

*

प्रकृती आणि पैसा येती कामा

या दोघांना सांभाळून ठेवा

*

संध्याछाया भिववती हृदया

हे विसरण्याची साधावी किमया

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पुष्पदलाची ही वाटी…. ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पुष्पदलाची ही वाटी…. ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

पुष्पदलाची ही वाटी

निर्मिलीय भ्रमरासाठी

वाटीमधला मकरंद ठेवा

परागाच्या नाजुक ओठी

*

प्रेमगीत गात भ्रमर येई

मकरंदाला शोषून घेई

परागीभवना साथ देता

समतोल सृष्टीचा होई

*

जागोजागी उमलून येतील

नाजुकसे हे द्रोण फुलांचे

सुशोभित अंगण होईल

फूल आणि फूल-मुलांचे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेल्फी… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ सेल्फी… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

सेल्फी म्हणताच माझ्या ओठांवर येते हसू

जाड नाक जाड ओठ सेल्फीत कसे दिसू?

तोंड वेंगाडलेले नि पार विचका मुखाचा

आला आठव कुणाला सेल्फीच्या या दु:खाचा…

*

काही तरीच नाटके जरी दिसती फाटके

सेल्फीत दिसती हो सारे नक्टे बसके विचके

वेड इतके लागले कसे हो मृत्यूलाच निमंत्रण

नाही मनावर ताबा जरा नाही नियंत्रण..

*

कुणी दिसतंच नाही सेल्फी मध्ये छान छान

चेहरा दिसतो फाटका जाडजूड दिसते मान

फार फार हौशी हो लोक ठार वेडे झालेत

कुठे ही जा परक्या जागी तिथे सेल्फी काढायलेत..

*

किती मेले आता पावेतो कड्यावरून दरीत

समुद्रात बुडालेत किती अगणित नाही माहित

बुडतो, पडतो, मरतो माहित आहे जगास साऱ्या

पुन्हा पुन्हा करतात तरी का मृत्यू दारीच्या वाऱ्या…

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७३ – चालक तूं…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७३ – विजय साहित्य ?

☆ चालक तूं…!

दत्त दत्त कृपा निधी

वेद चारी तुझ्या पदी..

गोमाताही देवगणी

दत्तात्रेय नाम वदी..१

*

गुरुदेवा दिगंबरा

सत्व रज तम मूर्ती..

निजरुपे लीन होऊ

द्यावी चेतना नी स्फूर्ती..२

*

अनुसूया अत्रीऋषी

जन्म दाते त्रैमुर्तीचे..

ब्रम्हा विष्णू आणि हर

तेज आगळे मूर्तीचे..३

*

दत्त दत्त घेता नाम

भय चिंता जाई दूर

लय, स्थिती नी उत्पत्ती

कृपासिंधु येई पूर..४

*

अवधुता गुरू राया

तुझ्या दर्शना आलो‌ मी..

काया वाचा पदी तुझ्या

आनंदात त्या न्हालो मी..५

*

हरी, हर नी ब्रम्हा तू

साक्षात्कारी पालक तू

ज्ञानमूर्ती पीडाहारी

संसाराचा चालक तू..६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares