मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ मैत्री सुश्री नीलांबरी शिर्के 

मैत्री म्हणजे आयुष्यातील

घमघमणारे असते चंदन

सगळ्या नात्याच्या पल्याड

नसते त्याला कसले बंधन

*

चिमणीचा घासाचा खाऊ

कापडातुनी तुकडा मिळतो

अमृतासम गोडी तयाची

बालपणी मैत्रीतुन कळतो

*

संसाराच्या व्यापामधूनी

मैत्र रेशमी धागा असते

सुखदु:खाच्या प्रवाहाची

विश्वासाची जागा असते

*

मैत्रीमध्ये कळतच नाही

या कानाची त्या काना भाषा

कानामधल्या संवादाला

काळजातच सरळ रेषा

*

हातामध्ये मैत्रहात गुंफता

मनामनाशी जडते नाते

मौनातुनही मी आहे ना!

नीत्यच आपणा मैत्र सांगते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लीलाधर भगवंत प्रगटले… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ लीलाधर भगवंत प्रगटले…  ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

लीलाधर भगवंत प्रगटले जीवनी साकार

असा हा अद्भुत साक्षात्कार!!

*

दृष्टी दिली संसार पाहिला आनंदी आनंद

तीच दृष्टी ही आत वळवली झाला परमानंद

काय पहावे, जाणावे हे कळले एक क्षणात

असा हा अद्भुत साक्षात्कार..

*

पायी चाललो, सृष्टी पाहिली आनंदी आनंद

प्रदक्षिणा घालता तुला रे झाला परमानंद

कोठे जावे, अन थांबावे, कळले एक क्षणात

असा हा अद्भुत साक्षात्कार..

*

गाणी गायली नाच नाचलो आनंदी आनंद

भजन प्रेम मग गात नाचता झाला परमानंद

प्रेम भक्ती ही मुळात आहे कळले एक क्षणात

असा हा अद्भुत साक्षात्कार…

*

मी मी माझे.. माझे.. माझे.. आनंदी आनंद

तो मी नाही कळले जेव्हा झाला परमानंद

नाम, रुप, अवतार गौण हे कळले एक क्षणात

असा हा अद्भुत साक्षात्कार..

*

दिवस मास अन् वर्षे सरली आनंदी आनंद

क्षण एक मग तो अवतरला अन झाला परमानंद

क्षणात एका विश्व पाहिले, कळले त्याच क्षणात

असा हा अद्भुत साक्षात्कार…

*

सोहम्” पटवत धाडियले या देही भगवंताने

कोहम्, कोहम्” म्हणत विसरलो “सोहम” या देहाने

सद्गुरू” आले हृदयी धरले आणि झाला चमत्कार

असा हा अद्भुत साक्षात्कार…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – मनोमय पूजा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – मनोमय पूजा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

मनोमय पूजा/

हेच प्रिये केशिराजा //१//

*

घेतो कल्पनेचे भोग /

न मानतील बाह्यरंग // २//

*

अंतरीचे जाणे /

आदी वर्तमान खुणे//३//

*

तुका म्हणे कुडे /

कोठे सारे त्याच्यापुढे//४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

तुम्ही मनापासून केलेली परमेश्वराची पूजा परमेश्वर चरणीच अर्पण करा. कारण परमेश्वर बाह्यरंगाला भुलत नाही तर तो तुम्ही अंरात्म्यातूनकेलेले सोपस्कार जाणून घेतो. तुमच्या मनात आणि बाहेर जे काय आहे ते त्याला सर्वकाही माहिती असते. मग त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य होईल का?

तुमच्याकडे डामडौल, आणि डोळेदिपवणारा बाह्य देखावा नसला तरी तुम्ही देवाची करूणा भाका. त्याची मनोभावे पूजा करा. तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवे आहे ते तो ओळखतो. तुम्हाला काय द्यायचे हे ही तोच ठरवतो. म्हणून तर त्याला सर्वेश्वर म्हणतात. त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य असेल का?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ किती देखणी गांधारी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? किती देखणी गांधारी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत (वर्ण संख्या सोळा यती आठव्या अक्षरावर)

शालू नेसलं शिवारं काठ त्याचे जरतारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

कांगोण्याची फुले छान चांदण्याच आकाशीच्या

सप्तरंगी उमलल्या कळ्या पहा टनटनीच्या

झाली कुंपणं साजरी शिवाराला राखणारी

बा़धाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

चार पाकळ्याचे फूल गुच्छागुच्छाने उमले

तिच्या मोहक गंधात मन माझेही रमले

वैद्य आहे ही जालीम खोड मूळं पाने सारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

पायवाट नागमोडी दिसतात गोड फुले 

लक्ष वेधती साऱ्यांचे पुष्पगुच्छ पहा डुले

रंगपंचमी चालली हिरव्या पानात न्यारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

रानामध्ये पिकं डोले बांधावर रंग सारे

किती मस्तीत वाहती शिळ घालणारे वारे

शेतीमाती चैतन्याने रंगरूपे सजणारी

बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी

*

नववधू माती झाली तिला साज घाणेरीचा 

फुला फुलांनी सजला हिरवा पदर तिचा 

फुलावर विसावती फुलपाखरांची स्वारी 

बांधा बांधावर आली किती देखणी गांधारी

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ थुई थुई थुई थुई… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

?️?  चित्रकाव्य  ?️?

? थुई थुई थुई थुई…  ? ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

थुईथुई थुईथुई नर्तन याचे मोतीच सांडती

थयथय थयथय पाऊस धारा तुफान मांडती

गडगड खडखड धडधडधडधड ढगांचे भांडण

थरथरथरथर कापती धारा अंगणी सांडती…

कडकडकडाड बिजली नाचे ढगांना कापते

चाबूक घेऊन हाती आपुल्या जलद चोपते

धडाडधूम त्या ढग पालख्या धावत सुटती

मोती मोती जिकडे तिकडे सरीच ओघळती…

 *

थेंब टपोरे पाणीदार ते चमचम करती

डेरेदार ती झाडे सारी अलगद झेलती

न्हाऊन निघती निथळत सारे आनंदे डोलती

तृणपाती नि उंच माड ते प्राशन करती…

 *

सळसळ सळसळ नागीण धावे फुफाट ते पाणी

सरसर सरसर पाऊसधारा गाती पहा गाणी

मध्येच थरथर मध्येच गरगर वारा ही नाचतो

शिरशिरी येई अंगावरती तुषार उडवितो..

 *

खेळ चालतो मोर नाचतो झाडे ही नाचती

ये रे ये रे भिजव अंगी पावसास सांगती

जिकडे तिकडे पाऊस धारा पाऊस पसारा

लहरी राजा मध्येच नाचत टपटपती गारा…

 *

खडखड दडदड पत्रे वाजती पक्षी भेदरती

निथळती झाडे पानाआड ती आसरा शोधती

भिजून चिंब ओले अंग वसुंधरा ओली

जिकडे तिकडे कलकल कलकल ओलीच

ती बोली…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८१ ☆ अभिनेत्री… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८१ ?

☆ अभिनेत्री… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

अभिनेत्री ज्योती चांदेकर!

(दुःखद निधन– १६ ऑगस्ट २०२५)

☆ (एक स्फुट) ☆

तिची माझी ओळख एका व्हाॅटस अॅप ग्रुप वर ची,

म्हटलं,  “मी तुमची फॅन आहे, “!

“फॅन नी आपलं नाव सांगायचं असतं,”

मी नाव सांगितलं!

पुढे तिचा खूप सुंदर सिनेमा पाहिला,

मी सिंधुताई…..

आणि रंगत संगतला,

‘आदर्श आई ‘ पुरस्कारासाठी–

तिचं नाव सुचवलं!

आणि तेव्हापासून मैत्र जुळलं!

 

समजलं—-

भांडारकर रोड वरच्या,

बालशिक्षण मंदिरची

विद्यार्थीनी ती पण,

म्हणून बालमैत्रीणी!

 

तिचे पती गेल्यावर,

पाठवला व्हाॅटस अॅप वर

श्रद्धांजली संदेश,

 तेव्हा तिचाच फोन आला,

“तुला मला भेटावंस नाही वाटत का गं”!

 आणि तेव्हापासून–

“तुमने पुकारा और हम चले आए…”

अशी मैत्री !

वैशाली, वाडेश्वर,आमराई—

वरच्या भेटी गाठी,

तिच्या नाटकाच्या तालमींना,

नाटकांना जाणं !

 आंबेजोगाई संमेलन,

ती प्रमुख पाहुणी असलेलं,

मुंबईतला तिच्या नातेवाईकांचा,

लग्न समारंभ,

तिचा प्रत्येक जन्मदिवस,

आणि वर्षा अखेर चा दिवस,

खूप छान साजरे केले…

नंतर अचानक पडलेला,

अंतराय…..

जुलै मधे मी फोन केला तेव्हा म्हणाली होती,

ऑगस्ट मधे येतेय, कधी ते नक्की नाही,

रोजचं गुड मॉर्निंग,

गुड नाईट येत होतं….११ ऑगस्ट पर्यंत,

एक ब्रीफ सीझन….क्वालिटी टाईम,

एक मैत्रपर्व,

आयुष्याच्या पुस्तकात कैद,

कायमचंच!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावणमास… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आला श्रावणमास... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

आला श्रावणमास

मनामनातून खुलवित आला एक नवा उल्हास

आला श्रावणमास

*

थेंब टपोरे सरले आता सर हलकिशी आली

नवा जन्म हा पुन्हा घेऊनी सृष्टी अवतरली

*

चहुबाजुंनी दिसते माया तेजाची पसरली

सौंदर्यांचे लेवून लेणे वसुंधरा ही सजली

*

सफेद, पिवळी, निळी, जांभळी फुले बहरली किती

वनावनातून रानफुलांच्या डोलू लागल्या पंक्ती

*

नाजुक नक्षी गुलबक्षीची, बकुलफुले, जास्वंदी

सडा शिंपीते गंधीत होऊन प्राजक्ताची फांदी

*

निळ्या नभातील सात रंग हे स्वर्गीचे सोपान

रंग तयांचे घेऊन आली फुलपाखरे छान

*

रंगमंच हा या जगताचा बदले क्षणोक्षणी

चहुबाजूंनी सुखवी नयना हिरवळ आणिक पाणी

*

सणासुदीचा, व्रत पूजेचा सुवासिनींचा मास

चैतन्याचा, हिरवाळीचा रंगीत गंधीत मास

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उजाड… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ उजाड… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

दूर हिरवे डोंगर

दाट मेघाली त्यावर

झरे खळाळते कोठे

धुंद झरणारी सर

*

माझ्या उजाड अंतरी

का न काहीच पालवे?

फक्त अथांग सागर

भय.. दुःखांचा हेलावे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भीती मेंदूत आरपार… कवी- दासू वैद्य ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ भीती मेंदूत आरपार… कवी- दासू वैद्य  ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ भीती मेंदूत आरपार… ☆

आता फारशी जत्रा भरत नाही,

भरली तरी

मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,

घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

 

मुलं कुठं खेळतात खेळ पाणी

खेळतात युद्ध युद्ध

 

बैठकीतल्या उशांचा बांध रचून

पोरांनी एकदा

माझ्यावरच रोखली, स्टेनगन

गोळीला घाबरलो नाही

पण चिमुकल्या डोळ्यात

हिंस्रतेचा अविर्भाव पाहून,

हातातली खोटी बंदूक

कधीही खरी होण्याची भीती

मेंदूत आरपार घुसत गेली.

 कवी – दासू वैद्य

  रसास्वाद

दासू वैद्य हे विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापासून लेखन करणारे आघाडीचे कवी, गीतकार, नाटककार. त्यांनी बाल व कुमार वाङ्मयात देखील मोलाची भर घातली आहे. त्यांच्या एकांकिका, नभोनाट्य, ललित लेख इत्यादी विपुल साहित्य असून ते टी व्ही, चित्रपट यासाठी गीतलेखन देखिल करतात. त्यांच्या बाल कवितांचं वाचन विजय तेंडुलकरांसारख्या चिकित्सक साहित्यिकाने केले आहे.

ते आपल्या आजूबाजूच्या जीवनात रमतात व त्या जीवनाशी निगडित विषयांवर साहित्य निर्मिती करतात. त्यांची कविता जगण्याचे वास्तव सांगते, स्वप्नरंजनात रमत नाही. ती तत्वज्ञान सांगत नाही तर बहुसंख्यांच्या जगण्याचं वास्तव सांगते. कवी म्हणून समकालाकडे बघण्याची त्यांची दृष्टी प्रस्तुत कवितेत स्पष्टपणे जाणवते. सद्यस्थितीचं सखोल आकलन व ते व्यक्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज ज्या साहित्यिकांना कळते तेच समाजाचं देणं फेडू शकतात. दासू वैद्य त्यातलेच एक व प्रस्तुत कविता अशातलीच एक.

सदर कवितेत कवी आपल्या दाराशी येऊन ठेपलेल्या भयावह भविष्याबाबत आपल्याला जागरूक करतात. ही कविता, हा विचार, समाजातल्या विशेष करून मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, एक किंवा दोनच मुले असणारे, आपल्या मुलांचे सर्व लाड पुरवणारे, मुलांना सर्व अत्याधुनिक व महागडी खेळणी आणून देणारे पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याची निकड दासू सरांना जाणवते म्हणून ते अशा कविता लिहितात.

आपण वेळीच जागे झालो नाही तर पाश्चात्य देशातील शाळांत घडणाऱ्या दुर्दैवी घटना आपल्याकडेही लवकरच पहायला मिळतील. अल्पवयीन मुले गंमत म्हणून किंवा किरकोळ कारणावरून घरातल्या वडिलधाऱ्यांचे पिस्तुल वापरायला मागेपुढे बघणार नाहीत.

कवी म्हणतात पूर्वी जत्रा भरायच्या, तिथं मुलं आण्या, दोन आण्याला मिळणारी पुंग्यांसारखी खेळणी घ्यायची पण आता मुलांना धडाडणारी, खोट्या का असेनात पण सटासट गोळ्या झाडणारी मशीनगन आवडते, त्यांना युद्ध युद्ध खेळायला आवडतं. उशांचाअडसर बनवून, त्यामागून मुलाने जेव्हा वडिलांवर बंदूक रोखली तेव्हा त्याच्या डोळ्यातील हिंस्र भाव बघून कवीचे काळीज चरकलं व त्यातूनच जन्मली ही कविता.

पाश्चात्य देशांत अधुनमधून अल्पवयीन मुलांकडून अशी हिंसा घडत असते पण आपण त्यातून कांहीच बोध घेणार नाही का? खेळण्यांचे निर्माते पैसे कमवण्यासाठी कसलीही खेळणी बनवतील पण आपण कसलाही विचार न करता ती खेळणी मुलांना आणून देणार आहोत का? सिनेमातील हिंसा बघून बघून आपणही हिंसेला निर्ढावलो आहोत का? लहान मुलांच्या निष्पाप मनात आपणच हिंसेची बीजं तर रोवत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे दासू सर या कविते द्वारे समाजाकडे मागत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ — (स्तोत्र दुसरे) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ (स्तोत्र दुसरे) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

नमामि यमुनामहं सकल सिद्धि हेतुं मुदा,

मुरारि पद पंकज स्फ़ुरदमन्द रेणुत्कटाम।

तटस्थ नव कानन प्रकटमोद पुष्पाम्बुना,

सुरासुरसुपूजित स्मरपितुः श्रियं बिभ्रतीम॥१॥

*

कलिन्द गिरि मस्तके पतदमन्दपूरोज्ज्वला,

विलासगमनोल्लसत्प्रकटगण्ड्शैलोन्न्ता।

सघोषगति दन्तुरा समधिरूढदोलोत्तमा,

मुकुन्दरतिवर्द्धिनी जयति पद्मबन्धोः सुता॥२॥

*

भुवं भुवनपावनीमधिगतामनेकस्वनैः,

प्रियाभिरिव सेवितां शुकमयूरहंसादिभिः।

तरंगभुजकंकण प्रकटमुक्तिकावाकुका,

नितन्बतटसुन्दरीं नमत कृष्ण्तुर्यप्रियाम॥३॥

*

अनन्तगुण भूषिते शिवविरंचिदेवस्तुते,

घनाघननिभे सदा ध्रुवपराशराभीष्टदे।

विशुद्ध मथुरातटे सकलगोपगोपीवृते,

कृपाजलधिसंश्रिते मम मनः सुखं भावय॥४॥

*

यया चरणपद्मजा मुररिपोः प्रियं भावुका,

समागमनतो भवत्सकलसिद्धिदा सेवताम।

तया सहशतामियात्कमलजा सपत्नीवय,

हरिप्रियकलिन्दया मनसि मे सदा स्थीयताम॥५॥

*

नमोस्तु यमुने सदा तव चरित्र मत्यद्भुतं,

न जातु यमयातना भवति ते पयः पानतः।

यमोपि भगिनीसुतान कथमुहन्ति दुष्टानपि,

प्रियो भवति सेवनात्तव हरेर्यथा गोपिकाः॥६॥

*

ममास्तु तव सन्निधौ तनुनवत्वमेतावता,

न दुर्लभतमारतिर्मुररिपौ मुकुन्दप्रिये ।

अतोस्तु तव लालना सुरधुनी परं सुंगमात्तवैव,

भुवि कीर्तिता न तु कदापि पुष्टिस्थितैः॥७॥

*
स्तुति तव करोति कः कमलजासपत्नि प्रिये,

हरेर्यदनुसेवया भवति सौख्यमामोक्षतः।

इयं तव कथाधिका सकल गोपिका संगम,

स्मरश्रमजलाणुभिः सकल गात्रजैः संगमः॥८॥

*

तवाष्टकमिदं मुदा पठति सूरसूते सदा,

समस्तदुरितक्षयो भवति वै मुकुन्दे रतिः।

तया सकलसिद्धयो मुररिपुश्च सन्तुष्यति,

स्वभावविजयो भवेत वदति वल्लभः श्री हरेः॥९॥

*
☆ मराठी भावानुवाद ☆

*

प्रसन्नतेने सिद्धी कारण यमुनेला नमन

मुरारीचरण कमल उत्कट वालुकाकण

तटावरील काननात घालित सडा सूमन

सुरासूरही पूजिती श्रिया शिवासी सन्मान ॥१॥

*
गिरीशिखरावरी झेप घेउनी कालिंदी तेजस्वी

शैल कपारींवरुनी विलासे वाहतसे उल्हासी

उच्च रवाने विविध गतीने वाहे हासत डोलत 

जय हो पद्मबंध तनये मुकुंद प्रीती करि वर्धित ॥२॥

*

गुंजन करीत बहुध्वनींचे करी धरिती पावन

पूजा मयूर हंस शुकादि द्वारा अर्चने समान 

प्रवाह मोहक जैसे करीचे मौक्तीक कंगण

जणू सुंदरी नितंब किनारा कृष्णप्रियेला नमन ॥३॥

*

ब्रह्मा विष्णू महेश स्तवती असीम गुणालंकृत

घनपापहारिणी सदा ध्रुव पराशर इष्ट दैवत

तटावरी पावन मथुरा नगरी गोप-गोपी वेष्टित

कृपानिधे तुजला शरण मना सदैव ठेवी सुखात ॥४॥

*
धारण केले रूप सुप्रिय पद्मजा मुरारीस्तव

समागमाने प्रदान करिते सिद्धी भक्तांस्तव

हरी कमलजा प्रिय कालिंदी बहूकलायुक्त

मनी निरंतर वास करोनी तिथेच राही स्थित ॥५॥

*

सदैव तुजला नमन अद्भुत चरित्रगुणी यमुना

जलपानाने तव कदापि होत ना यमयातना 

भक्ती करता गोपी जैसे प्रिय होत श्रीकृष्णा

यमराज कदापि भगिनी पुत्रा प्रकोप करीत ना ॥६॥

*

तव सन्निध्ये देहासीया नवप्रफुल्लता दान

मुरारी मुकुंद प्रिये भक्तीने दुर्लभ काही न

हे सुरसरिते तव भक्तांना सुलभ कृपादान

कीर्तिमान तव महिमा भूवर समृद्धाही स्मरण ॥७॥

*

मुमुक्षु जन हे सारे करती प्रिये तुझे स्तवन 

भगवान हरी भक्तीने प्राप्ती मोक्षाची जाणुन

श्रम नि आंसवे गात्रोत्पन्न कणाकणापासून

कहाणी तुझी अधीक श्रेष्ठ गोपीमिलनाहुन ॥८॥

*

अष्टश्लोक हे देवसुते पठण करील आनंदाने 

दुरितांचा सकल विनाश होइल मुकुंदप्रीतीने

हरीकृपेने राहिल अंकुश अपुल्या मनावरी

प्राप्ती सकल सिद्धींची संतुष्ट होऊनी मुरारी ॥९॥

॥ इति निशिकान्त भावानुवादित श्रीयमुनाष्टक स्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares