मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूमितीतले कोन आणि दृष्टिकोन! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 भूमितीतले कोन आणि दृष्टिकोन! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

तू मोठा की मी मोठा

झाले भांडण कोनांचे,

ऐकून धाबे दणाणले

गणिताच्या शिक्षकाचे!

*

लघु, विशाल, अती विशाल

तुटून पडले एकमेकांवरी,

काटकोन म्हणे सगळ्यांना

मीच तो जगात एक भारी!

*

त्यांचे भांडण सोडवायचा

केला प्रयत्न शिक्षकांनी,

पण सोडवता सोडवता आले

त्यांच्याच डोळ्यात पाणी!

*

जाता भांडण विकोपाला

गेले सारे हेडमास्तरांकडे,

तुम्हीच सोडवा भांडण,

घातले त्यांना मग साकडे!

*

“आपापल्या जागी तुम्ही

सारेच आहात हो मोठे,

करा विचार तुम्हा पटेल

माझे म्हणणे नाही खोटे!

पण,

सांगतो तुम्हां त्रिवार सत्य

जगात सर्वात मोठा कोण,

ठेवून विशाल आपले हृदय

दुसऱ्याकडे पहायचा दृष्टीकोन! “

दुसऱ्याकडे पहायचा दृष्टीकोन! “

© श्री प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२५

(सध्या 😅) – D-1, सुंदर सृष्टी, सन सिटी, आनंद नगर, वडगाव, पुणे. 

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्थान महात्म्य… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्थान महात्म्य… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आई तुझिया

दारी आलो

अत्यानंदात

न्हालो न्हालो…

*

परब्रह्मांच्या चरणांनी

तयांच्या वास्तव्याने

पुनित ही भूमी

सद्गदीत मी आनंदाने..

*

गुरु एकचि दाता

मिळे सारे न मागता

लोळण घेतो तव रजा

खुंटे येणे-जाणे आता…

*

भले बुरे विसरुन

साधनरत मी तुला स्मरून

जे जे घडेल सारे

हितचि माझे असेल म्हणून…

*

श्वास निःश्वासी

तुझेच नाम आहे

नामचि मम नाव

पैलतीर मज नेत आहे..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – शब्दा नाही धीर… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – शब्दा नाही धीर… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

शब्दा नाही धीर /

ज्याची बुद्धि नाही स्थीर //१//

*

त्याचे न व्हावे दर्शन/

खळा पंगती भोजन//२//

*

संतांसी जो निंदी/

अधम लोभासाठी वंदी //३//

*

तुका म्हणे पोटी/

भाव आणीक ज्या ओठी//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

ज्या माणसाची बुद्धी स्थीर नाही त्याच्या शब्दालाही धीर धरवत नाही. अशा माणसाचे प्रत्यक्ष दर्शन ही होवू नये. त्याच प्रमाणे जो खल आहे त्यांच्या सोबत बसून पंगतीतही कधी भोजन घेवू नये.

जी व्यक्ती संताची निंदा करते ती व्यक्ती स्वतःच्या लाभासाठी अधमालाही वंदन करते. त्याचे वर्तन ओठात एक आणि पोटत एक असेच असते.

तुकाराम महाराजांचे समाज निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आणि तरल होते. त्यांना माणसांची योग्य पारख होती. माणसातली वैगुण्ये सांगताना महाराज म्हणतात. जो माणूस स्थीर बुद्धीचा आणि गंभीर वर्तनाचा नसून चंचल स्वभावाचा असतो त्याच्या शब्दाना मुळीच धीर धरवत नाही. त्याची निर्थक बडबड सतत चाललेली असते. अशा माणसांचे आपल्याला दर्शन ही घडू नये

त्याच प्रमाणे दुष्कर्म करणा-या माणसासोबत पंगतीत बसून जेवणही करू नये. जो माणूस संतांची सतत निंदा नालस्ती करतो तोच माणूस स्वतःच्या लाभासाठी, स्वार्थी साठी अधमातील अधम व्यक्तीला वंदन करत असतो. तो ओठात एक आणि पोटात एक अशा कपटी स्वभावाचा असतो. अशा लोका पासून आपण दूरचं रहाणे पसंत करावे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आत्मघात! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आत्मघात! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कौरवांनी वागण्याचे

ताळतंत्रच सोडले

देशहिता सोडूनीया

वैरी हिताशी जोडले!

*

कौरवांची कूटनीती 

परकियांना धार्जिणी

बंद मुठीचे मागे मनगट

सांगेल यांना का कुणी!

*

 घरातल्या चोरवाटा

 वैऱ्यास का हे दावती

 आत्मघात करुनी हे

 कळे न काय साधती???

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “हाल…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ हालसौ. वृंदा गंभीर

अरे पावसा पावसा

किती किती बरसतो

तुझ्या मुळे हाल हाल

शेतकरी जीव देतो

*

पिकं जाती हातातून

कर्ज झालं डोक्यावरी

पोरंबाळ रडतीरं

सततची धारधरी

*

दुष्मणापरी झालासी

पाळवीशी तोंडी घास

घरं झालं सुनं सुनं

धन पैका नसे वास

*

जीनं नको गरिबीचं

मिळू हाती पैक पाणी

देवा राबतो शेतात

आस पुरो चक्रपाणी

*

हातालावी तिथं सोनं

शेतातलं पिकं पिकं

बागायत काळं रानं

अवकाळी मागं भिकं

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “संसारातील क्रिकेट” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “संसारातील क्रिकेट” ☆ सुश्री शीला पतकी 

संसाराच्या पिचवर रोजच चालते क्रिकेट

कितीही चांगले खेळा पण माझीच पडते विकेट

*

सासुबाई विकेटकीपर सासरे असतात अंपायर

झेल माझे झेलायला नवरा असतो तत्पर

*

टोमणे मारणारी नणंद नेमका मधला स्टंप उडवते

नवीन काहीच नाही तीच चमत्कार घडवते

*

नवरा ओरडतो पळ पळ पोरं म्हणतात मम्मी धाव

*

धावून धावून जमतात माझ्या खात्यात पाच रन

दिर बिचारा भावासारखा म्हणतो काय खेळलात वहिनी ए वन

*

ठाऊक असतं मला जमत नाही खेळायला

पण हौस वाटते ना मलाही बूट टोपी घालायला

*

किती मारले चौकार षटकार तरी झेल आमचेच जाणार

इथे तरी झेलतात आम्हाला तेवढेच समाधान घेणार

*

संसारातलं क्रिकेट नसत सोपं बरं

सासरची टीम नेहमीच जोरात आपलंच नसतं खरं

*

आऊट झालात म्हणलं की तंबूत जायचं ….एंडिंग

रिव्ह्यू नसतो इथे डिसिजन ऑलवेज पेंडिंग…….

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – एका बीजा केला नास… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – एका बीजा केला नास… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

एका बीजा केला नास /

मग भोगिले कणीस //१//

*

कळे सगळा हा भाव /

लहान थोरावरी जीव //२//

*

लाभ नाही फुकाफूकी /

केल्याविण जीवासाठी //३//

*

तुका म्हणे रणी /

जीव देता लाभ धुणी //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

एक बीज जेव्हा नष्ट होते तेव्हा त्याचे झाड होते. त्याला कणीस येते. मग ते भोगायला मिळते. लहान थोराना हे माहिती असते. जीवासाठी आपण काही केले तरच लाभ होतो. फुकटात काहीच मिळत नाही. पण जो रणांगणावर मरतो त्याला मिळणारा लाभ दुप्पट असतो.

काही मिळवायला काही त्यागावेच लागते.

एक बीज पेरले जाते.

ते नष्ट होते. झाडाचे रूप धरते. त्याचे रक्षण करावे लागते. मशागत करून ते वाढवावे लागते. काही काळ गेल्यावर त्याला कणीस येते. मगच त्याचा उपभोग घेता येतो. हे खरेतर सगळ्याना माहीत असते. एक बीज नष्ट होते. ते दुस-या जीवाला जन्म देते. पण जो आयुष्याच्या रणांगणावर आपला जीव खर्च करतो त्याला थोडाथोडका नाही तर दुप्पट लाभ होतो. इथले रणांगण म्हणजे शत्रू पक्षाशी लढण्याची जागा नव्हे तर संसार आहे. इथे रोजच संकटाशी लढावे लागते. मात्तबर असणा-या शड् रिपुंशी लढावे लागले. त्याना जिंकले तरच जन्माचे सार्थक होते. हेच तुकाराम महाराजांनी लोकांना उदाहरणांसह पटवून दिले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६२ – हायकू… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६२  – विजय साहित्य ?

☆ हायकू……!

सागरी तट

सदैव खळबळ

सोसे वर्दळ. . . . !

*

सागरी तट

विस्तीर्ण जलाशय

खारा संचय. . . !

*

सागरी तट

विपुल मिठागर

हा रत्नाकर. . . . !

*

माड पोफळी

इथले सहचर

भेटे सागर.. . !

*

गाज सागरी

जीवन सरगम

या विश्वासम. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी अस्मिता… + संपादकीय निवेदन – सौ. अस्मिता इनामदार – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. अस्मिता इनामदार

🪻 अभिनंदन 🪻

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. अस्मिता इनामदार यांना शब्दसेतू आयोजित काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹

आज त्यांची कविता “मराठी अस्मिता…“,कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

☆ मराठी अस्मिता… ☆ सौ. अस्मिता इनामदार ☆

१) “  “ कवयित्री : अस्मिता इनामदार

शीर्षक : मराठी अस्मिता

किती सांगावे कौतुक

माझ्या माय मराठीचे

ज्ञानेश्वरीतून झरतात

शब्दकण अमृताचे….

*

मराठीची शब्दकळा

जशी फुलवावी फुलते

शब्दा शब्दांची उकल

अर्थातून व्यक्त होते….

*

नाही आड येत कधी

नियमांचे अडसर

बोलताना समजते

नाद मधुर सुस्वर….

*

जरी म्हणतात सारे

भाषा बदले कोसावरी

आत्मा परी एक तिचा

बाज वेगळा आहे जरी….

*

ओवी, अभंग, भारूड

लावणीही बहरते

नानाविध प्रकाराने

भाषा रंगरूप घेते….

*

प्राचीन, स्वयंभू, सलगता

श्रेष्ठता हे निकष चार

माय मराठी ही भाषा

चौगुणांनी शोभे फार….

*

अशी माझी गोड भाषा

व्यथा सांगते मनीची

ज्योत पेटती रहावी

मराठीच्या अस्मितेची….

© सौ. अस्मिता इनामदार 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवणींचा झुला… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवणींचा झुला… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

तुझी आठवण येता मजला रोम रोम फुलतो

आठवणींचा झुला मग तो मनामध्ये झुलतो..

 

मी राधा तू कृष्णच होता

आधारा हात

करत राहिलो संकटावरी रे

सहजी ती मात..

मनी गुंजतो काळ मधुर तो परतून ना येतो

आठवणींचा झुला मग तो..

 

ग्रहतारे नि चंद्र चांदण्या

हाती जणू होत्या

विहंग होतो अवकाशी रे

चिंता मनी नव्हत्या

तम नव्हता नि प्रकाश नव्हता

भविष्यकाळ होता…

आठवणींचा झुला मग तो…

 

अधांतरी ती होती पाऊले

राजा नि राणी

भानच नव्हते जगताचे रे

होती मधुर गाणी..

ऊन नि पाऊस वाटे सारखा

अधिर फक्त होतो..

आठवणींचा झुला मग तो..

 

काळ तो इतका छोटा पण रे

का असतो सांग

तृप्ती मनाची होतच नाही

ना फिटती पांग

उडून जाती फुलपांखरे गुलाबही सुकतो

गळून पाकळ्या मातीमध्ये एकजीव होतो..

आठवणींचा झुला मग तो…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares