हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ९८० ⇒ गाढव ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “गाढव।)

?अभी अभी # ९८० ⇒ आलेख – गाढव ? श्री प्रदीप शर्मा  ?

हर भाषा में कुछ शब्द बड़े प्यारे होते हैं, और अगर प्यार से बोले जाएं तो और भी प्यारे लगते हैं। शेक्सपीयर ने गुलाब का उदाहरण दिया। लेकिन अगर वे गुलाब की जगह किसी गधे का उदाहरण देते तो शायद बात नहीं बनती। हम जिसे चाहें उसे गधे की उपाधि दे सकते हैं, लेकिन गधे को हम किसी और अच्छे नाम से संबोधित नहीं कर सकते। हो सकता हो, यह कॉपीराइट का मामला हो।

कृष्ण चंदर ने एक गधे की आत्मकथा ही नहीं लिखी, वह उसे संसद तक ले भी गए और उसकी वापसी भी की। हमारे हिंदी के आचार्य हमें प्यार से कालिदास कहते थे। कालिदास कभी इतने विद्वान थे कि, जिस डाल पर बैठे होते थे, उसे ही काटते थे। सभी दासों के अपने अपने दासबोध हैं। रत्नावली के भी तुलसीदास थे। अगर रत्नावली उनके ज्ञान चक्षु नहीं खोलती, तो क्या संसार उन्हें मर्यादा पुरुषोत्तम के तुलसी के रूप में जान पाता।।

ज्ञान की वर्षा गुरुकुल में होती है, कोई कृष्ण बन जाता है तो कोई सुदामा रह जाता है। बचपन के मित्र जब बरसों बाद मिलते हैं तो वही बचपन लौट आता है जहां जीवन में सहजता थी, सरलता थी, आपस में प्यारे प्यारे संबोधन थे। हमारे एक आचार्य हरिहर लहरी अपने विशेष प्रिय शिष्यों को बजरबट्टू कहते थे। हम भी अपने किसी मित्र को आपस में सिंधी कहते थे तो किसी को सरदार। बम्मन और कढ़ी तो बड़ा आम था। तब क्या हम मूर्ख अथवा गधे थे, जो हमें ना तो बुरा लगता था और ना ही हमारी धार्मिक भावना आहत होती थी। आज सोचते हैं तो आश्चर्य होता है। ये कहां आ गए हम।

आज वाणी पर संयम रखना पड़ता है। आज की पीढ़ी बाप शब्द तक से भड़क जाती है। बाप तक कैसे पहुंच गए, आपकी सातों पुश्तें याद करा देंगे। गांव में जिस तरह आज भी वृद्धजनों के लिए डोकरा और डोकरी शब्द प्रचलित है, गुजराती में बच्चों को डीकरा और डीकरी कहकर पुकारा जाता है। हमारे बनारस के छोरा छोरी महाराष्ट्र में मुलगा मुलगी हो जाते हैं। कहीं पोरा पोरी तो हैदराबाद में पोट्टा पोट्टी। आजकल के छोटे बच्चे पोट्टी का कुछ और ही अर्थ समझते हैं।।

अब देखिए, कितना प्यारा है आज का शब्द गाढव।

ध्वनि में माधव से मिलता जुलता। अन्यथा ना लें, हमारे यहां मिट्टी के माधो भी होते हैं और गोबर गणेश भी। आज आप इतना तनकर चल रहे हैं, कभी जीवन में आपने भी बेवकूफी की होगी। किसी ने आपको प्यार में ही सही, गधा अथवा बेईमान भी अवश्य ही कहा होगा। छुपा लें हमसे, क्या क्या छुपाएंगे। कभी तो आपको वे पुराने दिन याद आएंगे।

बहुत लाद लिया अपने आप पर परिवार और जिम्मेदारियों का बोझ। कर ली बहुत गधा हम्माली। बस अब नहीं होता। आता है कभी कभी ऐसा खयाल। फिर भी दिल है कि मानता नहीं। थोड़ा किसी ने फुसलाया, गधे को बाप बनाया, अपुन खुश।

अपनों के बिना भी क्या जीना ! तेरे बिना भी क्या जीना ?

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

 येतो फिरून

मर्त्यलोकी

चक्र हे अनादी

जाण बा…

 

साधनेत रत

येते नाम ओठी

अंतीम क्षणी

तिचि गती…

 

वाटते त्वा

येणे जाणे खुंटावे

म्हणोन प्रभूला स्मरावे

श्वासागणिक…

 

करिता यत्ने

होशील एकरुप

इप्सित फलद्रूप

पावे परमधाम…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- डॉ. परांजपे हे आमचे फॅमिली डॉक्टर. त्यांच्याशी ताईच्या प्रॉब्लेमबद्दल मोकळेपणाने बोलून मनावरचं ओझं हलकं करावसं वाटलं. त्यांना फोन करून मी त्यांच्या भेटीची लगेचची वेळ ठरवली, तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रूपातला एक आशेचा किरण तोवर अंधारात चाचपडणाऱ्या मला पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देत होता! )

“तुम्ही त्यांचे रिपोर्टस् मला दाखवण्याची व्यवस्था करू शकाल कां? त्यांनाही इथे घेऊन येऊ शकलात तर बोटाची जखमही मला तपासता येईल. ” डॉक्टर म्हणाले. ते रास्तही होतंच. पण हे सगळं जमवता येईल कां हा मात्र प्रश्न होता. याला कारणही तसंच होतं.

तो शनिवार होता. तसंही मी आज ताईला भेटायला कोल्हापूरला जाणार होतोच. त्यामुळे सगळ्या रिपोर्टसच्या झेराॅक्स काॅपीज् आणणं कठीण नव्हतं. पण ताईला कसं आणायचं? मुळात तिकडे आॅपरेशनची तारीख ठरवण्यापूर्वी दुसऱ्या एका आॅर्थोपेडीकचे सेकंड ओपिनियन घेतलेले होते. मग पुन्हा मुद्दाम सांगलीला तिला आणून दुसऱ्या एका डॉक्टरांचं मत विचारण्याची आवश्यकता नाही असं ताईच्या घरच्यांना वाटलं तर? आज मी दुपारनंतर तिथं जाऊन, सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा म्हंटलं तरी लगोलग आजच ताईला आणणं शक्य कसं होणार? उद्या रविवार म्हणजे परांजपे डॉक्टरांचं क्लिनिकला उद्या सुट्टी आणि सोमवारी ऑपरेशनची तारीख आहे. मग करायचं काय?

यातून काही मार्ग निघेल याची शक्यता मला दुरास्पतच वाटत होती. मी डॉक्टरना ही अडचण सांगितली तेव्हा क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले,

” ठीक आहे. त्या उद्या दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान येऊ शकल्या तर त्यांना आमच्या घरी घेऊन या हवंतर. कांहीच प्राॅब्लेम नाही. “

मला गहन वाटणारा प्रश्न असा चुटकीसरशी सुटणं हा शुभशकूनच होता माझ्यासाठी! आणि आश्चर्य म्हणजे एखादं किचकट, अवघड वाटणारं गणित चुटकीसरशी सुटावं तशी पुढची सगळी सूत्रंही आपोआप हवी तशी विनाविलंब हलू लागली..!!

त्यादिवशी मी ठरल्याप्रमाणे ताईकडे गेलो. आम्ही ट्रीपला गेलेलो आहोत हेच गृहीत धरलेल्या सर्वांना माझं असं अचानक तिथं जाणं आश्चर्य वाटावं असंच होतं.

” तू? तुम्ही ट्रीपला गेला होतात ना? मग असं मधेच? ” ताईनं विचारलं.

ट्रीप अर्धवट कां सोडावी लागली ते मी थोडक्यात सांगितलं आणि मुख्य विषयालाच हात घातला.

“पण आलो ते बरंच झालं. कारण काल रात्री घरी आल्यावर सलिलकडून सोमवारी तुझं ऑपरेशन ठरल्याचं समजलं आणि.. “

“हो रे. बघ ना काय होऊन बसलंय.. ” ताई म्हणाली. मग पुढे त्याचीच चर्चा. उदय-योगिता म्हणजे ताईचा मुलगा न् सून.. , माझे मेहुणे यांच्याकडून हे सगळं कां, कसं झालं ते सविस्तर समजलं.

” भोग म्हणायचे आपले. दुसरं काय? तरी योग्य निदान लवकर झालं म्हणून बोटावरच निभावलंय. नाहीतर कांही खरं नव्हतं. ” ताई म्हणाली.

त्या सर्वांनी मनाविरूध्द का होईना पण सगळं स्वीकारलं होतं!

“मलाही ऐकलं तेव्हा धक्काच बसला होता. यातून कांहीतरी मार्ग निघेल या आशेने आज सकाळीच सांगलीतल्या डाॅ. परांजपेंची भेट घेऊन मी त्यांना हा प्राॅब्लेम सांगितलाय. ” असं म्हणून मी डाॅक्टर काय म्हणाले ते सविस्तर सगळं सांगून टाकलं.

“तुम्ही दुसऱ्या ऑर्थोपेडिकना रिपोर्टस् दाखवून आधीच त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलंय ते गरजेचंच होतं. पण तरीही सोमवारी ऑपरेशन होण्यापूर्वी उद्याच ताईला घेऊन तुम्ही कुणीतरी सांगलीला माझ्याकडे येऊ शकलात तर आपण डॉक्टरांची त्यांच्या घरीच जाऊन भेट घ्यायचीय असं ठरलंय. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. मुख्य म्हणजे ते माझ्या माहितीतले एकमेव असे डॉक्टर आहेत ज्यांनी एम. डी. आयुर्वेद आणि एम. बी. बी. एस् अशा दोन्ही डिग्रीज् प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या घरी आजोबांपासून आयुर्वेदाचं ज्ञान आणि वैद्यकी दोन्ही परंपरेने चालत आलेलं आहे. शिवाय यांची ऍलोपथीची डिग्रीही योग्य ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांना उपयोगी पडतेय. ऑपरेशन शिवाय दुसरा कांहीच उपाय नाहीय असंही रिपोर्ट्स पाहून आणि जखम तपासून ते म्हणतील कदाचित, तरीही शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला नाही असं नको ना व्हायला? काय करूया? ” मी विचारलं.

” कांहीच हरकत नाही. आम्ही आईला घेऊन उद्या येतो. ” उदयची ही लगेचची सकारात्मक प्रतिक्रिया माझ्यासाठी उत्साहवर्धक होती. मी सांगलीला परतलो.

दुसऱ्या दिवशी उदय आणि योगिता कारमधून ताईला घेऊन आले. डाॅ. परांजपेनी बोटाची जखम तपासली. सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. आणि म्हणाले,

“मी ८०% खात्री देतो. बोट वाचेल. “

ऐकून माझ्या अंगावर शहाराच आला. हे सत्य कीं स्वप्न समजेचना. ताई, उदय, योगिता यांच्या मनातली भावनाही यापेक्षा वेगळी नव्हती.

आमच्या मनातली उरलेल्या २० टक्क्यांची अनिश्चितता कां? ही शंका आम्ही न सांगताच समजल्यासारखं डॉक्टर म्हणाले,

“८०% खात्री मी देतोय ती मी तुम्हाला सांगणार असलेल्या उपायांबद्दलची. बाकी २०% तुम्ही ते सर्व उपाय किती चिकाटीने आणि नियमित करु शकाल याच्यावर अवलंबून असेल. ” ते म्हणाले. हे कसं तेही त्यांनी आम्हाला सविस्तर समजावून सांगितलं.

‘ते सांगतील त्या पध्दतीने मसाज आणि बॅंडेज अनेक दिवस चिकाटीने करावं लागेल. त्यात घरच्या इतरांचीही मनापासूनची मदतही अत्यावश्यक आहे. शिवाय पेशंटचंही न कंटाळता सातत्यपूर्ण सहकार्य हवं. फरक अगदी हळूहळूच जाणवेल पण अखेर गुण येईल हे नक्की. ‘ हा त्यांच्या सविस्तर सांगण्याचा मतितार्थ होता!

” डाॅक्टर, बोटाला मसाज आणि बॅंडेज कसं, कधी आणि दिवसातून किती वेळा करायचं ते सांगा. मी ते कितीही दिवस करावं लागलं तरी नियमित करीन. आईही ते सगळं शांतपणे करुन घेणाऱ्या आहेत. आम्ही मॅनेज करू. ” योगिता मनापासून म्हणाली. ताईचं बोट वाचायची शक्यता आहे हेच ताईच्या घरच्या सगळ्यांसाठीच असं खूप महत्त्वाचं होतं!

“उद्याचं ऑपरेशन करायचं नाहीये हे त्या डॉक्टरना लगेच सांगायला हवं. ” उदय म्हणाला.

” हो ते सांगाच. प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेणार आहोत हेही सांगून टाका. त्यात लपवण्यासारखं कांहीच नाहीय. शिवाय ऑपरेशन करायचं नाहीये असं नका म्हणू. ते थोडे दिवस पुढे ढकलूया असं सांगा. ” परांजपे डाॅक्टर म्हणाले.

कोल्हापूरच्या डॉक्टरनी ‘सध्या घेत असलेल्या मी दिलेल्या गोळ्या बंद करणं धोक्याचं ठरेल’ याची कल्पना देऊन आॅपरेशन पुढं ढकलणं मान्य केलं. पण सध्या सुरू असलेली पहिली औषधं बंद करणं धोक्याचं ठरू शकेल असं निक्षून सांगितलं. अर्थात डाॅ. परांजपेनीही त्याला विरोध दर्शवला नाही हे महत्त्वाचं!

या आधी मी ‘ एखादं अतिशय अवघड आणि किचकट गणित चुटकीसरशी

सुटलं जावं तशी पुढची सगळीच सूत्रं वेगानं हलू लागली’ असं म्हटलं होतं त्याची ही सुरुवात होती!

डॉ. परांजपे यांच्या ट्रीटमेंटच्या, त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या, रोज सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा बोटाला करायचा मसाज आणि जखमेला करायचं ड्रेसिंग या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मसाज साठी आवश्यक ते तेल डॉक्टर स्वतः तयार करून देणार होते. ते तेल बोटाला हलक्या हाताने मसाज करून पूर्ण मुरवायचे होते. ड्रेसिंग करण्यापूर्वी जास्त प्रमाणात पिकून लिबलिबीत झालेल्या देशी केळ्याचा गर कुस्करून त्याचा लेप जखमेवर व्यवस्थित लावून त्यावर मेडिकेटेड कापसाची घडी ठेवून मग बँडेज करायचे होते.

ट्रीटमेंट नियमित सुरू झाली. योगिताने स्वीकारलेली जबाबदारी अतिशय निगुतीने अगदी मनापासून पार पाडली. पहिले दिड-दोन महिने कांहीही फरक जाणवला नाही तरी तिने धीर सोडला नाही. नंतर मात्र अगदी कणाकणानंच पण बोटावरची सूज कमी होतेय असं मसाज करताना तिला जाणवू लागलं. आणि पुढेही खूप दिवस चिकाटीने हा नित्यक्रम असाच सुरू ठेवल्यानंतर अखेर बोटावरची सूज हळूहळू करत एक दिवस पूर्णतः उतरली. त्याचवेळी हाडांचा भुगा होऊन अतिशय पोकळ झालेलं त्या बोटाचं हाडही भरून येऊ लागलं आणि अखेर ताईचं बोट वाचलं!!

या घटनेला आज दहाबारा वर्षं उलटून गेलीयत. पण ती आठवण मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यानच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबीजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनाच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या ताम्हणाखाली लपलेल्या तिच्या ‘त्या’ बोटाचा वेध घेत असते!!

इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंटला गुण येणं हा चमत्कार नव्हताच. चमत्कार लपलेला होता तो त्या त्या वेळी घडत गेलेल्या सगळ्या घटनाक्रमांत! त्यातील प्रत्येक वळणावर ‘तो’ होताच. त्या त्या प्रसंगात ‘तो’ स्वतःच घालत असलेली असंख्य धाग्यादोऱ्यांची घट्ट वीण मला इतक्या प्रदीर्घ काळानंतर आजही स्वच्छ जाणवते आणि मी ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक होतो!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळूसकर

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सुन म्हणून आमच्या गावात आली. खरं तर विनायक निलाशी लग्न करणार असा सर्वांचा अंदाज होता कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसें आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नंदाशी लग्न करेल पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले.. पण नंदाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरी बरोबर.

माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली…

‘काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्या बरोबर पाट धरता?

‘आसता बाये एखाद्याचा नशीब.. तेंका होयो तितके बायलो गावातत..

मग मला कळले विनायक च्या आई बाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेंव्हा म्हणाले..

‘नीला म्हणजे चालू पोर ता.. कोणाचेय गाडीवर बसुन जाईत.. मी विन्याक सांगलंय.. त्या पोराक माझ्या घरात हाडू नको..

मी गप्प झालो. शेवटी विनायक चे मंदाशी लग्न झाले.

मंदा दिसायला यथातथाच होती पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली आणि परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आई बाबा खूष होते शिवाय हे सर्व ती खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी निलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्ठामस्करी करणे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली..

‘तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्लात हल्ली?

‘जातंय मधी मधी..

‘त्या नीलाचो मुक्काम अजून आसता म्हणे दुकानात?

‘मी पण बघितलंय.. पण आपण काय शकतो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात?

‘पण आता घरात बाईल आसा मा? पूर्वीचे दिवस वेगळे.. आता सांभाळून वागा..

मी गप्प राहिलो.

गणपतीच्या दिवसात परबाकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्याघरी मदतीला गेलेली. रात्री घरी आल्यावर मला म्हणाली..

‘मंदा गप्पगप्प होती.. त्यान्च्याकडे काम करणारी काशी म्हणत होती..

‘मंदाक अंदाज इलोवा.. कोणीतरी चिठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड आसा, अशी बातमी दिलिया.. त्या दिवसापासून मंदा गप्पगप्प आसा. मंदान आपल्या आईवडिलांका बोलावून आणल्यानं.. तेनी जावयाक जाब विचारलो.. पण विन्यात काय बदल नाय. विन्याच्या आईबाबांनीपण विन्याची खरडपट्टी काढली, पण..

शेवटी मी विन्याचा मित्र म्हणून त्याश्याशी बोलायला गेलो.

‘विन्या.. पूर्वीचे दिवस वेगळे पण आता घरात मंदा आसा.. तेच्याशी लग्न करून तेका घरात आणलंस.. आता त्या निलाचो नाद सोड, त्या नीला पायी तुजो दुकानात लक्ष नाय आणि संसारात पण नाय. लहान गावात असले गोष्टी प्रत्येकाक कळतत आणि तसेच ते तूझ्या बायकोक पण कळले बहुतेक..

‘पण मी बाबांका सांगाललंय, माका मंदाशी लग्न करुचा नाय, तरीपण माझ्या गळ्यात घातल्यानी..

‘पण त्यात त्या मंदाचो काय दोष? तेच्या गळ्यात माळ घातलास मा? असो दोन दगडावर पाय ठेवून मोठया संकटाक आमंत्रण देतंस, या लक्षात ठेव.

दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली, तिचे आईवडील तिला शोधत होते, त्यानी त्त्यांचे सर्व नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली.. पण तिचा पत्ता लागला नाही.. मग लोकात कुजबुज सुरु झाली.. विन्यान नीलाक म्हापश्यात ठेवल्यानं आणि शनिवारी रविवारी आपण तिकडे जाता. आता विन्याचे दुकानात पण लक्ष नव्हते, त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळतं नव्हत्या.. दुकानातील कपाटे खाली दिसू लागली.

पंधरा दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली.

‘मंदा दिवाळीक माहेरी गेला ता परत येऊकच नाय..

मला वाईट वाटतं होते, एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते.

विन्याचे आईबाबा साधी माणसे होती. त्याना विन्याचे वागणे आवडत नव्हते पण.. विन्यापुढे त्त्यांचे पण काही चालत नव्हते, त्यात विन्याचे दुकानावरील दुर्लक्ष त्याना त्रास देत होते.

दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले.

घरी आल्यापासून मंदा गप्पगप्पच होती. विन्याला मंदा घरात असली काय नसली काय फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळतं होते.

मग मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती, त्या निलाचा नाद सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत होती. पण विन्या कुणाला भीक घालत नव्हता. शनिवार रविवार निलाकडे पळत होता.

आणि एके दिवशी.. मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कुटरला किक मारत होतो.. एव्हड्यात परबांच्या घराकडून ओरड ऐकू आली.. मोठमोठ्याने रडणे ऐकू आले.. माझी बायको पटकन घरातून बाहेर आली आणि मी स्कुटर परबांच्या घराकडे जोरात घेतली. मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो.. विन्याची आई मोठमोठ्याने ओरडत होती.. बाबा थरथरत उभे होते.. मंदाने बिष घेतलेले दिसत होते.. तोंडाला फेस आला होता.. माझी बायको पटकन पुढे झाली.. मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले, रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधी मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली.. मग शवव्हिचेदन.. पोलीस कम्प्लेंट.. विन्याला अटक.. केस सुरु झाली.

मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आली. मंदाच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरख्याली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले असा जबाब दिला. विन्या चार महिने जेलमध्ये राहिला आणि मग जमिनावर सुटला. त्याच्या दुकानाचे बारा वाजलेच होते.

विन्याचे आईबाबा या घरात राहायला घाबरू लागले. तरुण सुनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे असा त्यांचा समज झाला होता. विन्या आता नीलाकडे रहात होता. विन्याच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली, त्यात तिची सुन रडताना दिसू लागली. विन्याच्या बाबांना कुणीतरी रडताना ऐकू येऊ लागले.. त्या दोघांची झोप उडाली.

शेवटी दोघांनी ते घर सोडले आणि ते त्यान्च्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले.

मग जिकडेतिकडे बातमी पसरली.. कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाकुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली.. त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले.

गेले कित्येक वर्षे हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विन्याचे वडील वारले.. मग दोन वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला रहात असलेली नंदा मग गावात आली, त्या बंगल्यात विन्यासह राहू लागली.. तिची मुलगी पाच वर्षांची होती.

नीला या बंगल्यात राहू लागली खरी पण तिची मुलगी सतत आजारी पडू लागली. तिचे शाळेत लक्ष लागेना.. निलाला पण वाटू लागले… मंदाचा आत्मा या घरात वावरतो आहे, तो कुणाला सुख देणारं नाही.. तिने विन्याला सांगून जागा बदलली.

आता लोकांची खात्रीच झाली.

या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही.. त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले.. भुताचा बंगला..

भुताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवरील पाण्याला शेवल चिकटला. कुणी सुद्धा कुणी त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बस स्टॉप होता.. त्याचे पण नाव पडले.. ‘भुताच्या बंगला स्टॉप.

जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता, नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात. विनायकला पैशाची निकट होती.. म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोण जागा विकत घेईना. तो मला सांगायला लागला.. ‘या बंगल्यासाठी गिऱ्हाईक बघ. मी त्याला म्हंटले.. ‘ही जागा भुताची म्हणून प्रसिद्ध झालिया.. आपल्या भागातलो कोण विकत घेऊचो नाय.. कोणी बाहेरचो आपटलो तर बघूया. पुढील दहा वर्षे तो बंगला तसाच होता.. हळूहळू जीर्ण होत चाललेला.

बाबुभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानें होती. त्यांचे या भागावर लक्ष होते. त्यान्च्या मेहुण्यासाठी किरण पटेल याच्यासाठी जागा हवी होती.. जमिनीच्या एका एजेंटने त्यांना ही जागा दाखवली. बाबुभाईना जागा आवडली. पण अनेकांनी त्याना हा “भूतबंगला.. असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भुते येतात असे पण सांगितले. बाबुभाई हसले.. त्यान्च्या लक्षात आले, ही जागा कोण घेणार नाही, मालकाकडे पाडून मागायला हवे.

बाबुभाई विनायकला भेटले. विनायक खूष झाला कारण पहिल्यांदाच कुणी गिऱ्हाईक आले होते. विनायकने किंमत सांगितली त्याच्या निम्याने बाबुभाईनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खूष कारण त्या जागेचे थोडे तरी पैसे मिळाले.

बाबुभाईनी जेसीपी मागविले आणि संपूर्ण बंगला पाडला आणि दणकत बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडावून आणि वरती राहायला मोठा फ्लॅट.

बाबुभाईचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरु केले. भरपूर माल ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वाशी गोड बोलून धंदा बसवीला.

दुकानावरती घरी बायको, मुले राहायला आली. नातेवाईक येतजात राहिले. गाड्या आल्या, ट्रक्स आले.. पातेलांच्या धंद्याला बरकत आली.

पण गावातील जुने लोक अजून ‘पटेलाना मंदाचे भूत दिसते का? याचीच चौकशी करत राहिले.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.) 

इथून पुढे – – –  

एका मोठया होर्डिंगवर काल बऱ्याच स्थानिक नेत्यांचे फोटो होते, आज त्याची बॅक ग्राउंड फिकट पिवळी झाली होती व त्यावर असा मजकूर होता —

रस्त्यावर सगळ्यांचे स्वागत. नियम पाळा आणि सुरक्षित घरी पोहोचा / ऑफिसला पोहोचा / कामाच्या ठिकाणी पोहोचा.

१) सिग्नल तोडला, तर सर्व अंगाला खाज सुटू शकते आणि गाडी चालवणे अशक्य होऊ शकते

२) वेग मर्यादा तोडली / वेडी वाकडी गाडी चालवली, तर डोळ्यासमोर अंधारी / चक्कर येऊ शकते. गाडी साईड ला उभी करा. १०-१५ मिनिटांनी अंधारी जाईल.

३) झेब्रा मार्किंग वर गाडी उभी केली, तर उलटी होऊ शकते आणि कपडे खराब होऊ शकतात

४) गाडी चालवतांना मोबाईल वर बोलला, तर एकसारख्या शिंका येऊ शकतात, किती वेळ, ते सांगता येत नाही

५) फुटपाथवर गाडी घातली, रस्त्यावर उलट्या दिशेनी गाडी घातली / नो एंट्री मध्ये गाडी घातली, तर गाडी बंद पडेल व १० मिनिटे तरी सुरु होणार नाही.

६) पादचारी मंडळींना पण काही बंधने पाळणे, आता बंधनकारक राहील. मनमानेल तसा वावर, आता रस्त्यांवर करता येणार नाही. सिग्नल बघून रस्ता ओलांडा / झेब्रा मार्किंग वरूनच रस्ता ओलांडा. जिथे फुटपाथ आहे, तिथे फुटपाथवरच चालायचे आहे.

असे न केल्यास पायात गोळे येऊ शकतात. किती वेळ पाय दुखेल हे सांगता येत नाही.

अशाच आशयाची होर्डिंग ठिकठिकाणी दिसत होती. सिग्नल नेहेमीप्रमाणे लाग – वीझ होत होते आणि वाहन चालक नेहेमीच्या मस्तीत गाड्या मारत होते. रस्ता क्रॉस करणारे मुठीत जीव घेऊन, इकडे – तिकडे जात येत होते. नेहेमीप्रमाणे सगळ्यांचीच रस्त्यावर मनमानी सुरु होती. चालणारी बरीच मंडळी नवीन होर्डिंग वाचण्यात मग्न होती, पण त्यांना काहीच उलगडा होत नव्हता, की, होर्डिंग कुणी बदलली आणि हा सगळा काय प्रकार आहे? बाजूच्या पानपट्टीजवळ उभे राहून लोक पेपर बघत होते. सगळ्याच पेपरमध्ये फ्रंट पेज वर होर्डिंग वरची माहिती छापून आली होती. पेपरमध्ये ही माहिती कोणी छापली, हे कोडे पेपरवाल्यांना पण पडले असणार! त्या दिवशी संध्याकाळी, मी मुद्दाम चौकात चक्कर मारली. सकाळ ची काही होर्डिंग काढून, पुन्हा तिथे नेहेमीची वाढदिवस / अभिनंदन अशी होर्डिंग आली होती. टीव्ही च्या बातम्यांमध्ये ह्या सगळ्या बातम्या येत होत्या, पण हे कसे घडले आणि या मागे कोण? हे सगळ्यांकरता कोडेच होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. करिष्मा वरून पुढे मेन रोड वर आलो. आणि चौकामध्ये डावीकडे फुटपाथवर उभे राहिलो. मी घड्याळात पाहीले. ८ ला १० मिनिटे कमी होती. मी मनामध्ये १० मिनिटांचा काउंट डाऊन सुरु केला. वाहतुकीची मनमानी नेहेमीप्रमाणे सुरु होती. आश्चर्य म्हणजे काल दुपारी बदललेली होर्डिंग पुन्हा वाहतुकीचे नियम दाखवत होती. सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर कालच्याप्रमाणेच पुन्हा वाहतूकनियम आले होते.

घड्याळात ८ वाजले आणि सिग्नल तोडून जाणाऱ्या, तीन टू व्हीलर आणि एक कार थोड्या पुढे येऊन थांबल्या होत्या. चालवणारे खाली उतरून अंग खाजवत होते. अजून गर्दी तशी तुरळकच होती आणि हळू हळू वाढत होती. झेब्रा मार्किंग वर थांबलेल्या कार ड्रायव्हर ला उलटी झाली. काच खाली करेपर्यंत उलटी कपड्यांवर झाली असावी. नवरा बायको बसलेली स्कुटी झेब्रा मार्किंग वर थांबली आणि चालवणाऱ्या बायकोला उलटी झाली. नवरा खुश झाला आणि त्यानी बायकोचे अभिनंदन केले.

गाडीवर मोबाईलवर बोलणाऱ्यांना शिंका सुरु झाल्या. दोघींचे मोबाईल खाली पडले. रस्त्यावर थोडी गर्दी वाढली, म्हणून एकानी आपली बाईक आम्ही उभे होतो तिथे फुटपाथवर घातली. आणि लगेचच तो थांबला. तेवढ्यात बाजूचा पानपट्टीवाला त्याला म्हणाला, “दादा, फुटपाथवर बाईक चालवू नका, गाडी बंद पडेल ”. बाइकवाल्यानी त्याला मुर्खात काढले आणि बाईकला किक मारली. किक वर किक मारतोय, पानपट्टीवाल्यावर चिडून किका मारल्या, पण गाडी सुरु कुठे होतेय! आता तो घाबरला आणि मुकाट फुटपाथवरून खाली उतरला. मी त्यांना म्हटलं – दादा, १० मिनिटे शांत बसा, पाय दुखले असतील. १० मिनिटांनी गाडी सुरु होते असं पेपरला आलयं.

आम्ही गणपती मंदिराकडे चालायला लागलो. बरेच पायी चालणारे फुटपाथवर बसलेले दिसत होते. मी एका आजोबांना विचारलं – आजोबा बरे वाटत नाही का? ते म्हणाले पायात गोळे आले आहेत. होर्डिंग्ज वर लिहिल्याप्रमाणे, आता चालणाऱ्यांनी पण चालायचे नियम पाळायला पाहिजेत. स्पीडनी गाड्या मारणारे साईडला थांबले होते. सिग्नल तोडून सुटणारे, बाजूला थांबून, पाठ – हात – पाय खाजवत होते. शिंकांनी घामाघूम झालेल्या एक मॅडम कार च्या बाहेर उभ्या राहून रिलॅक्स होत होत्या. शिंका थांबल्यावर, कार मध्ये बसतांना, त्यांनी मोबाईल मागच्या सीट वर फेकला आणि कार सुरु करून पुढे गेल्या. रस्त्यावर दोन प्रकारचे लोक दिसत होते. “ ह्या, असे कुठे नियम असतात का? ” म्हणणारे आणि नंतर शिंका -उलटी यांना जवळ करणारे. आणि दुसरे म्हणजे, पुढच्याला ठेच, मागचा शहाणा, हे समजून शांत पणे नियम पाळणारे.

स्वीट मार्ट चौकातून आम्ही पुढे गेलो. पुढे डावीकडे एक मोठी सोसायटी आहे. तिथून बाहेर पडणारे सगळे रस्त्यावरून उलटे मागे चौकापर्यंत येतात. आणि मग वळून पुढे जातात. आम्ही तिथे पोहोचलो आणि आतून एक भली मोठी कार बाहेर आली आणि वळल्यावर लगीच थांबली. तिथला वॉचमन पेपर घेऊन आला आणि म्हणाला, ’साब, उलटे मत जावं, गाडी बंद पडेगी ’. आम्ही बाजूला उभे राहून बघत होतो. गाडी खरंच बंद पडली होती. गाडी मालकानी बराच वेळ चावी फिरवली, नंतर बॉनेट उघडले. मी त्यांना म्हटलं – काका, काहीही करू नका, १० मिनिटे थांबा, गाडी आपोआप सुरु होईल, तसं आजच्या पेपर मध्ये दिलेले आहे. १० मिनिटे त्यांच्याशी गप्पा झाल्या. गाडी सुरु झाली. आता हा उलटा शॉर्ट कट चालणार नाही, असे म्हणून, बाय करून, काका निघाले.

दिवसभर असेच सगळे सुरु असावे. टीव्ही वर बातम्यांमध्ये सगळ्या चॅनल वर आमचे शहर झळकत होते. तब्येत ठणठणीत असणारे पण अचानक चक्कर आलेले, शिंका वाले, अंगाला खाज सुटलेले, अंगावर उलटी झालेले, अचानक गाड्या बंद पडलेले, यांच्या मुलाखती, हेच चक्र सुरु होते.

** तिसरा दिवस : पेपरच्या बातम्या

शहरातला जीवघेणा ट्रॅफिक आता सुखकर झाला आहे. पादचारी खुशीत आहेत.

** चौथा दिवस

 कार्पोरेशन नि युद्ध पातळीवर रस्त्यांवरचे सर्व स्पीड ब्रेकर आणि रम्बलर काढले. खड्डे बुजवणे जोरात सुरु झाले. सर्व लोक खुश. या सगळ्यांमागे कोण? हा तपास जोरात सुरु, पण काहीही प्रगती नाही. राजकीय पुढाऱ्यांचे मार्मिक उत्तर – अरे भाई, सब लोग खुश है ना! हम यही चाहते है. आप लोग आम खाते रहो, आप को पेड से क्या मतलब है!

** पाचवा दिवस

गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ची दखल : “या शहरा मध्ये वाहतूक अपघात – शून्य”

हा अनुभव सांगण्याकरता मनवा आणि मेघना कधी भेटतात, याच्या ‘मी’ प्रतीक्षेत! भारद्वाज पक्षी आता गेटवर कधी बसतो आणि दिसतो, याच्या “मी” प्रतीक्षेत!! आणि, मी तयार केलेल्या यादीमधल्या, पुढच्या आयटम करता, देव कधी स्वप्नामध्ये येतात, याच्या “मी” प्रतीक्षेत!!!!

समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “निवड आपली आहे – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “निवड आपली आहे – –☆ श्री जगदीश काबरे ☆

परलोक ही संकल्पना मानवी भीती, अनिश्चितता आणि नियंत्रणाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे, असे अनेक इहलोकवादी तत्त्वज्ञ मानतात. जेव्हा माणसाला मृत्यूचे रहस्य समजत नाही, तेव्हा तो त्याला अर्थ देण्यासाठी “परलोक” ही कल्पना उभी करतो. वेदांत परंपरेत हा परलोक केवळ अस्तित्वाचा पुढचा टप्पा नसून, नैतिक नियंत्रणाचे साधनही बनतो. इहलोकात ज्या गोष्टींना “भोग”, “वासना” किंवा “मोह” म्हणून नाकारले जाते, त्याच गोष्टींना परलोकातील स्वर्गात अधिक शुद्ध, अधिक उंच रूपात मिळण्याची कल्पना मांडली जाते. त्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास तयार होतो—इथे नाकारणे आणि तिथे अपेक्षा ठेवणे.

याच्या अगदी उलट भूमिका चार्वाक (लोकायत) मांडतात. चार्वाकांचा मूलभूत आग्रह असा आहे की, प्रत्यक्ष अनुभव हाच ज्ञानाचा एकमेव विश्वसनीय स्रोत आहे. जे दिसत नाही, जे अनुभवता येत नाही, त्यावर विश्वास ठेवणे ही भ्रमनिर्मिती आहे. म्हणूनच ते परलोक, आत्मा, पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना नाकारतात. “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” ही त्यांची प्रसिद्ध भूमिका केवळ भोगवाद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरते; कारण येथे “सुख” म्हणजे बेफाम उपभोग नव्हे, तर या एकमेव आयुष्याचे महत्त्व ओळखून त्याचा अर्थपूर्ण उपयोग करणे असा व्यापक अर्थ घ्यायला हवा.

एवंच चार्वाक तत्त्वज्ञानात सकारात्मकतेचे अनेक पैलू दिसतात. पहिले म्हणजे, चार्वाक विचार माणसाला वास्तवात ठेवतो. तो काल्पनिक भीती (नरक) आणि काल्पनिक लालसा (स्वर्ग) यांपासून मुक्त करतो. दुसरे म्हणजे, तो जबाबदारी वाढवतो. जर परलोक नाही, तर या जगातच न्याय, आनंद आणि अर्थ निर्माण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माणसावर येते. ही भूमिका पलायनवादी नसून अत्यंत सक्रिय आणि जबाबदार आहे. तथापि, चार्वाक विचारावर एक टीकाही कायम केली जाते, ती म्हणजे तो नैतिकतेचा पाया कमकुवत करतो. कारण जर “परलोकातील शिक्षा” नाही, तर माणूस अनैतिक वर्तनाकडे झुकू शकतो. पण हा आक्षेप पूर्णपणे पटणारा नाही. कारण नैतिकता ही केवळ भीतीवर टिकत नाही; ती सामाजिक सहजीवन, सहानुभूती आणि परस्पर अवलंबित्वावर उभी असते. चार्वाक तत्त्वज्ञान हेच सूचित करते की, नैतिकता ही मानवी करारातून आणि व्यवहारातून निर्माण होते, बाह्य दैवी नियंत्रणातून नव्हे. म्हणूनच, चार्वाक तत्त्वज्ञानाला “सकारात्मक” म्हणतात. कारण ते माणसाला भ्रमातून बाहेर काढून वास्तवात जगायला शिकवते. ते जीवनाला नाकारत नाही, तर उलट त्याला मध्यवर्ती ठेवते. परलोकाच्या आशेवर जगण्याऐवजी इहलोकातील न्याय, आनंद आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याची प्रेरणा देते. या अर्थाने ते बौद्धिक प्रामाणिकपणाचे आणि जीवनाभिमुखतेचे तत्त्वज्ञान आहे.

हे तत्त्वज्ञान मान्य करणे म्हणजे फक्त एक विचार स्वीकारणे नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे आहे. भीतीवर आधारित नव्हे, तर अनुभव आणि जबाबदारीवर आधारित जीवन जगणे होय. त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर खोल परिणाम करणारा ठरतो. म्हणून साथींनो, चार्वाकवादी होणे म्हणजे आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणे होय. अदृश्य आणि काल्पनिक देवाच्या भीतीपोटी नैतिकतेने जगणे योग्य की स्वतःच्या जबाबदारीवर निर्भयतेने जगणे योग्य? यापैकी तुम्ही कशाची निवड कराल?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली 

दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष होते.

औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.२०२६ या वर्षी मोरोक्को ची राजधानी बरात हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे

२३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. भारत सरकारने २३ एप्रिल २००१ पासून हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला सुरवात केली. विनामूल्य पुस्तक वितरण, स्पर्धा, पुरस्कार अशा कार्यक्रमांद्वारे वाचनाविषयी आवड व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवर्षी जागतिक पातळीवर पुस्तकांची राजधानी निवडली जाते. आतापर्यंत शारजा, माद्रिद, मट्रीयल अमस्टरडम, क्रोनकी, बँकाक, अथेन्स, व्रोक्ला, बोगोटा, बैरूत, इंचिऑन, येरेवान आदि शहरे पुस्तक राजधानी म्हणून निवडण्यात आली. २००३ ला आपले नवी दिल्ली हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. पुस्तकाच्या राजधानीत वर्षभर पुस्तक स्वामित्व हक्क, वाचन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. मेक्सिकोतील गुडलजरा हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित झाले होते कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम झाले.

युनेस्को मार्फत पुस्तक राजधानी प्रमाणेच दरवर्षी वाचकांसाठी संदेश, theme, संकल्पना दिली जाते. 2024 ला, you are a reader तुम्ही वाचक आहात ही मुलांसाठी संकल्पना होती.२००३ ला दिल्ली पुस्तकाची राजधानी असताना, ‘ जीवनाचा दोस्त – पुस्तक ‘ असा संदेश होता. आतापर्यंत वाचन म्हणजे थंड हवा, एक पुस्तक द्या, आनंदाचे तास, जीवनाचा मित्र, वाचन एक अखंड यात्रा, अभ्यास, कायमस्वरुपी साक्षरता जीवन बदलते, वाचन हाच उपाय, भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्षे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विकास, प्रकाशन, मानवाधिकार, संस्कृती संपर्क, पुस्तक निर्मितीचा इतिहास – लिहण्यापासून डिजीटल पर्यंत, पुस्तके आणि अनुवाद, वाचन ही बौद्धिक संपदेची सुरक्षा, पुस्तक वाचा, हुशार व्हा, जग वाचा, वाचन माझा अधिकार, कथा share करा, पुस्तक : जगाची खिडकी अशा संकल्पना व संदेशावर काम करण्यात आले.

 

❀꧁꧂❀┉

लेखक : संजय थोरात

प्रस्तुती : हर्षल सुरेश भानुशाली

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त मा. राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष… ) 

मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर 

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम. बी. बी. एस. ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : डॉ. राजेंद्र भारुड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पानं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पानं…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

काही पानं खुडायची असतात. (चहा)

काही पानं वाढायची असतात. (केळी, भोजन)

काही पानं चिरायची असतात. (कोथिंबीर)

काही पानं शिजवायची असतात.(पालक, मेथी)

 काही पानं तळायची असतात. (अळू, कढीपत्ता)

काही पानं खायची – रंगवायची असतात. (नागवेल, विडा)

 काही पानं कुटायची असतात. (पुदिना)

 काही पानं लुटायची असतात. (आपटा)

काही पानं पुरायची असतात. (पालापाचोळा कंपोस्ट)

 काही पानं जपायची असतात. (पिंपळ)

 काही पानं तोरणात सजवायची असतात. (आंबा)

काही पानं केसात माळायची असतात. (केवडा)

काही पान वाहायची असतात. (बेल)

काही पानं मानाची असतात. (नागवेली)

काही पानं खमंग फोडणीसाठी असतात. (कढीपत्ता)

काही पानं शेवटी सोबती येतात. (कडबा)

काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. (मेहंदी)

काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णतेसाठी असतात.(तुळस)

काही पानं फक्त स्वादासाठी असतात(पुदिना)

काही पानं मसाल्यासाठी असतात. (तेजपत्ता)

काही पानं सुशोभिकरणासाठी असतात. (नारळाच्या झावळ्या)

काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात. (पळस)

काही पानं तल्लफ भागविणारी असतात. (तंबाखू)

काही पानं सत्यनारायण पूजेसाठी उपयुक्त असतात. (कर्दळी)

काही पानं गणपतीला आवडतात. (आघाडा,हराळी)

आणि

    आपल्यासाठी

काही पानं भरायची असतात.(वही)

काही पानं जोडायची असतात. (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात. (प्रगती पुस्तक !)

काही पानं उलटायची असतात. (भूतकाळ, दुःखाचे क्षण)

काही पान तोंडाला पुसायची असतात (आश्वासन)

तर

काही नवीन पानं उघडायची असतात.

काही पानं खेळायची असतात (पत्ते)

थोडक्यात काय, तर पानोपानी आनंदी आनंद…!

  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सीतामुडी किती निराळी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सीतामुडी किती निराळी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सरसर पाऊस येताना 

झरझरती रेशीम धारा

आंबा फणसावर फुलतो 

मनमोही सुखद नजारा

लतिकेने वृक्षावरती 

गजराच माळला भासे

सीतावेणी लडिवाळे

जणू हळूच खुदकन हासे 

 *

 गुलबिल्या अंगाची ही 

 श्वेतांगीशी फुलवंती 

 गजऱ्यात हिच्या रुपाची

 किती लाभलीच श्रीमंती

 *

आमरी म्हणती हिज कोणी

सीतामुडी किती निराळी

पानसकोळी ही सुंदर 

कोकणात हिची झळाळी

 *

द्रौपदी माला सजलेली

गजऱ्यात फुले ही शंभर

चिमणी श्वेतांगी सुमने

जांभूळली त्यावर झालर

 *

किती भाग्यच या वेणीचे

प्रेमाचे प्रतिक झाली

कुंतली माळता तिजला

मग नवी झळाळी ल्याली

 *

किती सुगंध गोजिरवाणा

मन माझे पिंगा घाली

शब्दांची फुलपाखरणी

कविता जन्माला आली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares