(लेखन-प्रकाशन – गत 2022 से छंद लेखन, एकल प्रकाशन– कलम के नवांकुर, अनुग्रह नवप्रस्तारित छंद पर लेखन (मैजिक बुक ऑफ रिकॉर्ड), साझा संकलन – तकरीबन 10, द्वादश ज्योतिर्लिंग (लंदन बुक आफ रिकार्ड), अनेकता में एकता (एशिया बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड), छंदावली – (मैजिक बुक ऑफ रिकॉर्ड), महाकाल साहित्य सम्मान से सम्मानित। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता हरी भरी वसुंधरा!!)
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “|| रे व ड़ी ||“।)
अभी अभी # १०५४ ⇒ आलेख – || रे व ड़ी || श्री प्रदीप शर्मा
SWEET MEAT
जो बांटा जाता है, वह प्रसाद कहलाता है। जिसका अपने इष्ट को भोग लगाया जाए, वह प्रसाद बन जाता है। प्रसाद का श्रीगणेश अक्सर लड्डू से ही किया जाता है क्योंकि गणेश जी मोदक प्रिय हैं। सुनने में थोड़ा अजीब लगता है, लेकिन बजरंग बली के मंदिर में चने चिरोंजी का प्रसाद चढ़ाया जाता है। थोड़ा मीठा और थोड़ा पौष्टिक हो जाए। भुने हुए चने और चिरोंजी, वाह क्या जोड़ी है प्रसाद की।
आरती हो अथवा कथा, प्रसाद की यही कथा ! कहीं रवे का हलवा, तो कहीं पिसे धनिये की पंजेरी, जिसमें शकर की मिठास भी शामिल होती है। पांच तरह का अमृत, जिसे हथेली में ग्रहण किया जाता है, पंचामृत कहलाता है। दूध, घी, दही, शहद और शक्कर। इसके अलावा अगर आपने कोई संकल्प लिया हो अथवा मन्नत मांगी हो, तो सवा रुपए से लगाकर सवा मनी तक की लिमिट होती है प्रसाद की। प्रसाद बांटना और ग्रहण करना पुण्य का काम होता है। ।
हमें अभी तक इसमें कहीं रेवड़ी यानी sweetmeat, नजर नहीं आई। आखिर क्या है यह रेवड़ी, जो इतनी मशहूर भी है और बदनाम भी। आइए, थोड़ा रेवड़ी चिंतन करें।
तिल गुड़ का जीवन में बहुत महत्व है। एक पर्व आता है, मकर सक्रांति, जब सूर्य मकर राशि में प्रवेश कर जाता है। आप चाहे पतंग उड़ाएं, अथवा किसी की पतंग काटें, लेकिन तिल गुड़ खाएं जरूर। मीठा गुड़ भी होता है और शकर भी। तिल और गुड़ के लड्डू भी बनते हैं और गजक भी। जैसे जैसे सर्दी बढ़ती जाती है, गजक की मांग बढ़ती जाती है। बस, रेवड़ी भी और कुछ नहीं, तिल गुड़ के लड्डू अथवा गजक का बोनसाई स्वरूप ही है। गुड़ अथवा शकर की गोली और उस पर तिल्ली का लेप। बस, यही तो है हमारी रेवड़ी जो अब बंटने के लिए तैयार है। ।
किसी भी प्रसाद में रेवड़ी भी, अन्य प्रसाद के साथ शामिल भी कर ली जाती है, अथवा रेवड़ी का प्रसाद का स्वतंत्र प्रभार भी होता है। महिलाओं में पहले शुभ अवसरों पर, सामूहिक रूप से गीत गाया जाता था, जिसके पश्चात शकर के बतासों का वितरण किया जाता था। हमारे यहां इन गीत वाले बताशों का एक कांच की बरनी में संग्रह किया जाता था, जो हम बच्चों के लिए चॉकलेट का काम भी करती थी और घर में शकर के अभाव में चाय में शकर का भी करती थी। इसी तरह प्रसाद के रूप में एकत्रित रेवडियों का भी संग्रह किया जाता था। रेवड़ी का स्वाद, खुद खाओ, खुद जान जाओ।
रेवड़ी में कुछ तो ऐसी खूबी है जो यह केवल अपनों अपनों में ही बांटी जाती है। महाराज धृतराष्ट्र को भी जब सत्ता रूपी रेवड़ियों का बंटवारा करना पड़ा, तो उन्हें केवल अपने सौ कौरव पुत्र ही याद आए।
कौन जानता था कि अपने अपनों को रेवड़ी बांटने के कारण महाभारत भी हो सकता था। ना रेवड़ियां बंटती, और ना महाभारत होता। ।
जब रेवड़ियों को लेकर बंदर बांट और लूटमार मचने लगे तो बेहतर है, रेवड़ियां बांटी ही ना जाएं। लेकिन भक्तों में तो तब तक रेवड़ियां बंटती रहेंगी, जब तक भगवान है, पूजा है, आरती है, और प्रसाद है। पंडित जी बांटें रेवड़ी, अपनों अपनों को दें। बच्चा लोग, रेवड़ी का प्रसाद खतम, अब कल आना ..!!
☆ ‘वारकरी आणि रामदासी : महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील दोन समन्वयी प्रवाह’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात संतपरंपरेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मध्ययुगीन भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीने समाजजीवनात नवा आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन निर्माण केला. या चळवळीने धर्माचे तत्त्वज्ञान केवळ शास्त्र आणि मठांच्या मर्यादेत न ठेवता ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
महाराष्ट्रात या भक्तिप्रवाहाचे विविध स्वरूप दिसून येते. वारकरी संप्रदाय, महानुभाव परंपरा, दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय आणि समर्थ रामदासांनी प्रेरित केलेला रामदासी संप्रदाय हे या व्यापक भक्तिपरंपरेचे महत्त्वाचे घटक आहेत.
यांपैकी वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे दोन प्रवाह विशेष प्रभावी मानले जातात. वरवर पाहता या दोन्ही परंपरांमध्ये काही तात्त्विक व आचारभेद दिसतात; तथापि सखोल अभ्यास केल्यास असे आढळते की या दोन्ही परंपरांचा उगम भागवत वैष्णव भक्तीच्या समान तत्त्वज्ञानातून झाला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतील भिन्नता ही मुख्यतः त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.
वारकरी संप्रदाय : भक्ती, समता आणि लोकधर्म
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आणि लोकाभिमुख असा भक्तिपंथ आहे. या संप्रदायाचे केंद्रस्थान पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिर आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाऊन विठ्ठलदर्शन घेतात. या यात्रेला ‘वारी’ असे संबोधले जाते.
वारकरी भक्तीमध्ये विठ्ठल हा विष्णू किंवा श्रीकृष्णाचे रूप मानला जातो. भक्त आणि देव यांच्यातील संबंध अत्यंत आत्मीयतेचा असतो. विठ्ठल हा भक्तांचा सखा, मायबाप, बंधू किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून अनुभवला जातो.
वारकरी परंपरेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समता आणि सर्वसमावेशकता. या संप्रदायात जातिभेद, सामाजिक उच्च-नीचता किंवा धार्मिक संकुचितपणा यांना स्थान नाही. संतज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई इत्यादी संतांनी आपल्या अभंगांद्वारे भक्तीचा संदेश सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला.
संतज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले. संत तुकारामांच्या अभंगांनी वारकरी भक्तीला व्यापक लोकाधार मिळवून दिला.
समर्थ रामदास आणि सतराव्या शतकातील सामाजिक परिस्थिती
सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींचा उदय झाला. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून समाजजीवनाचे निरीक्षण केले. त्या काळात भारतातील अनेक प्रदेशांवर परकीय सत्तेचे वर्चस्व होते आणि सामाजिक तसेच राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
या परिस्थितीत समाजात आत्मविश्वास, नैतिकता आणि संघटन यांची गरज निर्माण झाली होती. समर्थांनी भक्तीच्या आधारावर समाजजागृती आणि संघटन यांचा कार्यक्रम हाती घेतला.
समर्थ रामदासांचा दासबोध हा ग्रंथ त्यांच्या विचारांचा प्रमुख स्रोत मानला जातो. या ग्रंथात भक्ती, विवेक, वैराग्य, कर्तव्य आणि समाजधर्म यांचे महत्त्व स्पष्टपणे मांडलेले आहे.
रामदासी संप्रदाय : भक्ती आणि कर्तृत्वाचा समन्वय
समर्थ रामदासांनी श्रीराम आणि हनुमान यांच्या उपासनेचा मार्ग समाजासमोर ठेवला. श्रीराम हे धर्मसंस्थापन आणि आदर्श राजधर्माचे प्रतीक आहेत, तर हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक मानले जातात.
समर्थांनी देशभर अनेक मठ आणि मारुती मंदिरे स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी समाजात बलोपासना, संघटन आणि कर्तव्यभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यातून ‘रामदासी संप्रदाय’ किंवा ‘समर्थ संप्रदाय’ विकसित झाला.
या संप्रदायात भक्तीबरोबरच समाजधर्माची जाणीवही महत्त्वाची मानली जाते.
वारकरी आणि रामदासी संप्रदाय : तुलनात्मक दृष्टिकोन
घटक: वारकरी संप्रदाय ‘ वा’
रामदासी संप्रदाय ‘ रा’
आराध्य देव
वा: विठ्ठल (विष्णू/कृष्ण)
रा: श्रीराम व हनुमान
प्रमुख संत
वा: ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम
रा: समर्थ रामदास
मुख्य साधना
वा: नामस्मरण, अभंग, वारी
रा: उपासना, शिस्त, बलोपासना
तत्त्वज्ञान
वा: भक्ती आणि समता
रा: भक्ती आणि कर्तव्य
सामाजिक कार्य
वा:लोकधर्म आणि समता
रा: संघटन आणि नैतिक जागृती
या तुलनेवरून स्पष्ट होते की दोन्ही संप्रदायांचे मूलतत्त्व भक्ती आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत मात्र काळानुसार भिन्नता दिसते.
राम आणि विठ्ठल : तात्त्विक एकात्मता
समर्थ रामदासांनी रामभक्तीचा पुरस्कार केला असला तरी त्यांनी विठ्ठल आणि राम यांना तात्त्विकदृष्ट्या वेगळे मानले नाही. पंढरपूर येथे विठ्ठलदर्शन घेताना त्यांना विठ्ठलामध्येच श्रीरामाचे दर्शन झाल्याची परंपरा सांगितली जाते. त्या प्रसंगी त्यांनी उच्चारलेले शब्द प्रसिद्ध आहेत —
“येथे का उभा श्रीरामा
मनमोहन मेघश्यामा।”
या काव्यरचनेत राम आणि विठ्ठल यांचे मूलतत्त्व एकच असल्याची भावना व्यक्त होते.
समारोप
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा विचार करताना वारकरी आणि रामदासी या दोन परंपरांचा समन्वय लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाने भक्तीचा लोकाभिमुख मार्ग समाजासमोर ठेवला, तर समर्थ रामदासांनी भक्तीबरोबरच संघटन, नैतिकता आणि कर्तृत्वाचा संदेश दिला.
या दोन परंपरा विरोधी नसून परस्परपूरक आहेत. विठ्ठल आणि श्रीराम हे विष्णूच्या एकाच तत्त्वाची भिन्न रूपे मानली जातात. त्यामुळे वारकरी आणि रामदासी हे भक्तिपरंपरेचे दोन समन्वयी प्रवाह आहेत असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “
कालपासून घरात खूपच शांतता आहे. आईचे बोलणे अगदी मोजकेच व घरातील कामे शांतपणे चालू आहेत. कोणाला काही ‘instructions’ देणे वगैरे नाहीच.
आज ओला टॉवेल पलंगावर टाकल्या वर, आई नेहमी प्रमाणे काही म्हणाली नाही. मी सवयीप्रमाणे आलमरी उघडी टाकली. वर्तमानपत्रातील सर्व पाने इकडे तिकडे पसरलेली होती. सकाळपासूनच मोबाईल वर बोलत होतो. अभ्यास केला नाही. पण आज रोजचे डायलॉग ऐकू येत नव्हते.
आज आई नेहमी सारखी वागत नाहीये. कसल्या तरी विचारात आहे. हे सर्वांच्या हळूहळू लक्षात आलं. बाबा, अनघा अजय सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. पण काय कारण असावे?? हे कोणाला कळले नाही. वादळं येण्यापुर्वी ची ही शांतता असावी का?? . असं म्हणून सर्व वादळं येण्याची वाट बघत होते. आज काही खरं नाही. एवढं मात्र नक्की.
शेवटी अनघाने विचारलेच काय झाले आई?? बरं वाटतं नाही का?? मी काही मदत करू का?? पण त्याच शांतपणे आई म्हणाली, अग, नको. तू कर आपला अभ्यास, मी बघते सर्व.
आज ‘जागतिक फॅमिली डे ‘ तेंव्हा आईने प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ केला होता. अगदी एखाद्या सणासाठी असतो ना, तसा पूर्ण स्वयंपाक होता. प्रत्येक जण अचंबित होता. जेवण तर उत्तम, विशेष आहे, पण रोजच्या सारखे वागणे नाही. रागावणे ही नाही. इतकं शांत आईला बघायची सवयच नाही. काही कळत नव्हते.
त्यात भर पडली, जेंव्हा जेवताना आई म्हणाली आज संध्याकाळी तुमच्या सर्वांचा काय कार्यक्रम आहे.?? मला आज तुमच्या सर्वांचा एक तास हवा आहे. मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. काळजी करू नका. काही भयंकर असं मी बोलणार नाही. फक्त माझ्या मनातलं सहजच तुमच्या जवळ बोलावे असं मला वाटतंय.
आज ‘फॅमिली डे ‘म्हणजे परिवाराकरिता महत्वाचा दिवस. यापेक्षा योग्य दिवस दूसरा नाही. तर आज आपण सर्व येथेच संध्याकाळी सात वाजता भेटतोय.
असं आईचे म्हणणे ऐकून सर्व म्हणजे, बाबांपासून सर्व वेगळ्याच विश्वात पोचले. आपापली समीकरण मनातल्या मनात जमवू लागले. जून्या नवीन घटनांचे विचार/ विश्लेषण होऊ लागले. आपल्या काही सांगितलेल्या, काही न सांगितलेल्या चूका डोळ्यासमोर येऊ लागल्या. पण आज बोलायची किंवा आईला प्रश्न विचारायची हिम्मत बाबांना पण झाली नाही. मन मात्र शंका कुशंका आश्चर्याने भरून गेले. अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे समोर आले. पण लिंक काही लागत नव्हती. कसा तरी सात वाजेपर्यंत चां वेळ काढला. पहिल्यांदाच आपल्याच घरात एवढं चविष्ट जेवण जेवून ही सर्व अस्वस्थ होते.
संध्याकाळी सर्व डायनिंग टेबलावर जमले. आईने बोलायला सुरुवात केली. माझे बोलणे झाल्यावरच तुम्हाला जे बोलायचे असेल ते बोला. मधे नाही.
आईने अगदी ‘Professional ‘वक्ता असल्यासारखी सुरुवात केली.
आई म्हणाली,
” मी अनिता देशमुख, श्री आनंद देशमुख यांची पत्नी व अजय आणि अनघा ची आई. ही माझी ओळख म्हणा किंवा अस्तीत्व, किंवा माझं जग म्हणा. माझ्या जगण्याचा उद्देश म्हणा. “काही ही समजा.
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या पासून होते. व दिवस मावळतो ही अशाच काही घरच्या कामाने. मी रोज रात्री दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ‘Homework’ करते. त्यात रोजचा स्वयंपाक, तुमचे डबे, तुमची, घरातील इतर कामे असतात. मी माझ्या सवयीनुसार, तुमच्या आवडीनुसार, माझ्या क्षमतेनुसार, बुध्दीनुसार, प्रामाणिकपणे रोजचा आराखडा तयार करते व आनंदाने सर्व गोष्टी करायचा प्रयत्न असतो माझा. हे सर्व करणे मी माझे कर्तव्य समजते. रोजची कामे खूप आनंदाने पार पडतातच, असं दररोज होत नाहीं. काही अडथळे येतातच.
तुमचे वागणे नेहमीच खूप चूकीचे असते असं नाही. पण खूपदा मला पटणारे नसते. वयाप्रमाणेच वागता तुम्ही. पण मला दिसणाऱ्या काही गोष्टींकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. ते बघून काळजी करत बसणे, यापेक्षा तुमच्या शी आज बोलावे असं वाटल मला. रोज रोज त्याच त्याच गोष्टींवर वाद घालायचा, चर्चा करायची पण प्रगती काहीच नाही. ‘ जैसे थे ‘. मी मात्र काळजी करत बसते. विचार करून करून मला मानसिक थकवा येतो, कधी कधी झोप लागत नाही. माझं काम मी बरोबर करत नाहिये असं वाटतं. मी अस्वस्थ असते. पण याने प्रश्न सुटत नाहीत.. माझा त्रास वाढतोय धैर्य संपतं चाललंय. मला मानसिक शांतता हवी आहे. मला यावर उपाय शोधायचा आहे.
मी ‘आई ‘ म्हणजे माझ्या कामांची एक नियमावली /रूपरेषा पूर्वी पासूनच ठरविण्यात आली आले. घर, नवरा मुलं त्यांची जबाबदारी, त्यांची देखभाल, त्यांना आनंदी ठेवणे हे सर्व त्यात आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहात नाही, तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे. असं मी समजते. पण मी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडतेच असं नाही. तुमची प्रतिक्रिया बघून मला ते समजत. कुठे तरी राग निघतो. चिडचिड होते. तुमचा व माझा वेळ जातो, मन खराब होत. ताणतणाव वाढतो. आपल्या संबंधांवर ही त्याचा परिणाम होतो. मनात अढी निर्माण होतात. अजून पर्यंत तरी तुम्ही मला दुरत्तरे देत नाही. ते सर्व कसं थांबवायचे?? किंवा कमी करायचे.??? हे बदलता येईल का?? यावर मी विचार केला व एक प्रयोग करायचे ठरविले.
फक्त तुम्हीच चूकता असं माझं म्हणणं नाही. माझ्या पण खूप गोष्टी तुम्हाला आवडत नसतील. मी हे शंभर टक्के मान्य करते.
आज मी तुम्हाला एक ‘Homework’ देते.
तुम्ही तिघांनी एका कागदावर तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत. त्यात माझे वागणे, बोलणे, स्वयंपाक, ड्रेसिंग सेन्स, तुम्हाला टोकणे, अशा अनेक इतर कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. किंवा मी अजून काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे?? हे अगदी बिनधास्त लिहा. एक कागद कमी पडला तर दूसरा घ्या. माझी काही हरकत नाही. मलाही माझ्या चूका सुधारायचा किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची संधी द्या. खर तर हे काम मी दोन वर्ष आधीच करायला हवं होतं, जेंव्हा तुम्ही दोघेही टीनेजर झाला. म्हणजे परिणामाचा विचार करण्याएवढे मोठे तुम्ही झाला.
चला, काही हरकत नाही.
“देर आये दुरुस्त आये।. “
माझ्या एक लक्षात आलंय, माझे तुमच्या सर्वांवर जीवापाड प्रेम आहे. तुमचे नेहमी चांगलेच व्हावे ही माझी इच्छा व देवाजवळ प्रार्थनाही असते. पण सर्वच गोष्टी माझ्या हातात नाही. तुमचा आनंद, तुमचे पूढचे आयुष्य तुमच्या सवयींवर, तुमच्या निर्णयावर ही अवलंबून आहे. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची पण आहे.
तुम्हाला प्रोत्साहन देणे, मदत करणे सल्ला देणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्या चूका दाखविणे हेही माझे काम आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे की नाही?? हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मी हे काम करावे की नाही हे पण तुम्हालाच ठरवायचे आहे.
तुमच्या सवयी तुमचे निर्णय त्यामुळे होणारे परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या याकरिता तुम्ही जबाबदार असणार आहात. लक्षात ठेवा, विचार करा. तुमच नशीब घडविणारे किंवा उद्ध्वस्त करणारे तुमचे विचार व सवयी असतात.
” नशीब आकाशातून घडत नाही. किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही. तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतः चे नशीब स्वतः घडवत असतो. “नशीबात असेल तसे घडेल “या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू, त्याचप्रमाणे नशीब घडेल. हे लक्षात असू द्या. यावर विश्वास ठेवा.
आज आईने घेतलेला हा ‘ Stand ‘ आश्चर्यकारक होता. विचार करण्यासारखा होता. सगळे स्तब्ध होते.
म्हणजे एखाद्या कडक मास्तरांनी लाईनीत सरळ उभा रहा, म्हणून पाठीवर जोरात मारलेल्या धपाट्या सारखाच होता.
प्रत्येकाच्या हातात कागद तर होता पण कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं. एक मात्र लक्षात आलं, आमच्या आयुष्याची जबाबदारी आईने आमच्यावरच सोपवली आहे.
आई मात्र शांत होती. तिचा निर्णय झाला होता.
“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “
गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.
बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.
तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.
मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.
सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी काम देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला धपाटे देईन हं असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.
कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.
कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. श्वास चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.
खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.
बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.
“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते. मी तिला सांगितलं तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. क्लार्कला पैसे द्या म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. ”
बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.
आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.
देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.
निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार धपाटे देईन हं म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.
बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.
समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :
महंते महंत करावे,
युक्तीबुद्धीने भरावे,
जाणते करून विखरावे,
नाना देशी.
समर्थच असेही म्हणतात की
आपणासी जे ठावे,
ते ते दुसऱ्यासी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकळ जन.
हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं.
बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.
जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!
आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!
तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.
आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?
तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?
तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…
तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.
त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.
दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.
का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!
पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. ‘माझ्याशिवाय‘ काही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला ‘नाखुष ‘कोणी करत नव्हते.
अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.
माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.
पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.
आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…
पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…
सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.
माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.
ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्या गोष्टींशी बोलू लागलो.
साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.
आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.
तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.
तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?
अजुन बर्याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.
चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.
वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.
तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,
आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!
कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.
ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.
भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.
अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.
आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाहीकी ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.
खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.
तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!
एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!
तुझी
दीदी
लेखिका : अनामिका.
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈