मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिरवाई… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ हिरवाई... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

हिरवाईच्या हिरव्या हिरव्या लाटा बघून खुलतो

हिरव्या लाटांवरचे हिरवे तुषार पिऊन जगतो

*

हिरव्या हिरव्या झाडांचीही हिरवी हिरवी पाने

हिरव्या हिरव्या पानांमधुनी फुलते हिरवे गाणे

*

हिरव्या हिरव्या पाण्यावरती हिरव्या हिरव्या लाटा

हिरव्या हिरव्या कुरणामधुनी हिरव्या हिरव्या वाटा

*

हिरव्या हिरव्या फांदीवरती हिरवे हिरवे यावे

हिरव्या हिरव्या वेळुवनातून गाती हिरवे पावे

*

हिरवी शाई, हिरवा कागद, हिरवे हिरवे अक्षर

हिरवी भाषा, हिरवी आशा, मनात हिरवे अंकुर

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस जर, तारुण्य सर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस जर, तारुण्य सर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पावसात भिजून झालेनंतर

मन कसे हे तरुण झाले

आयुष्याचे सरलेले ओले क्षण

पुन्हा नव्याने फिरुन आले.

*

घनासारखी मनात झरझर

आठवांचे जळ खळखळ

हिरवे रंग चौफेर डौलदार

त्या दिवसांची तळमळ.

*

आता सुखांना कवेत घ्यावे

सोनेरी उन्हात रमावे

मंद पाउले पळावीत थोडी

डोळ्यात श्रावण जमावे.

*

तरी वेदना शमवी पाऊस

अलगद हृदयी तारुण्य

उगीच हसावे स्वतःशी पुन्हा

कंठ दाटता ऋतू कारुण्य.

*

किलबील ऐकता भाव नवे

प्राण ऊभारी आनंद पावे

पाखरांच्या घरट्यात विसावा

पाऊस उसंती, तृप्त व्हावे.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – आहा हे कौतुक… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – आहा हे कौतुक… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

तुका जगा द्यावी नीती /

करावे फजित चुकती ते //१//

*

कासयाचा बाध एकाच्या निरोपें

काय व्हावें कोपें जगाचिया //२//

*

अविध्येचा येथें कोठें परिश्रम/

रामकृष्णनाम ऐसें बाण //३//

*

तुका म्हणे तेथें ख-याचा विकरा /

न सरती येरा खोट्या परी //४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

जो चुकतो त्याची पुरती फजिती करावी आणि साध्या सामान्य लोकांना खरी नितीमत्ता शिकवावी हेच आमचे कौतुकाचे नव्हे तर मुख्य काम आहे. तो अधिकार आम्हाला मिळाला आहे. आम्ही असे वर्तन केल्याने सगळे जग जरी आमच्यावर रागावले तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. कारण आम्ही कुठल्याही अविध्येचा प्रचार प्रसार मुळीच करत नाही आणि तो खोटारडेपणा मिळवण्यासाठी नको ते आडवळनाचे कष्ट ही करत नाही. त्याला विरोध करण्यासाठी आमच्या हातात रामकृष्णनामाचे प्रभावी शस्त्र आम्ही धारण केले आहे. या जगात फक्त ख-याचीच प्रामुख्याने विक्री होते हे आमच्या पुरते लक्षातही आले आहे. खोटारडा हिंनसक, येरागबाळा माल येथे खपत नाही हेही आता आम्ही जाणून आहोत.

आपण जे करतो आहे त्याच्यावर तुकाराम महाराजाची दृढ श्रध्दा आणि अतूट विश्वास आहे. त्यालाच ते सत्याचा खरा मार्ग आहे असे मानतात. आणि म्हणूनच जगातील सामान्य भोळ्याभाबड्या लोकांना नैतिकतेचा बोध देणे आणि ती त्यांना शिकवणे व तिच्यापासून जर कोणी दूर जात असतील तर त्यांना जाग्यावर आणने हेच आपले महत्त्वाचे काम आहेअसे महाराजमानतात. तेच मी आवडीने करत आहे. असे म्हणतात. जग मला काय म्हणेल, कोणाला काय वाटेल कोणाला राग येईल. याच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. त्या मुळे मी करत असलेल्या कामात कसलीही बाधा येणार नाही. महाराजांचा हा दृढनिश्चय आहे. कारण ते म्हणातात आम्ही चांगले म्हणजे देवानेच काम करीत आहेत. आणि आमच्या कामात अडथळा आणणाऱ्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आता रामकृष्ण हरी नामाचे अत्यंत प्रभावी शस्त्र ही हाती धारण केले आहे. म्हणून आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहोत. तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना स्वानुभवातून दिलेला हा संदेश प्रभावी आणि परिणामकारक वाटतो. व ते सर्व त्याचा विनंम्रभावे स्विकारावी करतात. व तेथेच नतमस्तक होऊन आपली अतूट श्रद्धा ही ठेवतात. हेच तर तुकाराम महाराजांच्या लोकमान्य तेचे खरे गमक आहे. ह्मणूच तुका झालासे कळस असे लोकांना वाटत रहाते.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाप्पा.. दे यांना सद्बुद्धी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बाप्पा.. दे यांना सद्बुद्धी..  ? श्री आशिष  बिवलकर ☆

 

टिळकांनी केली उत्सवाची प्रथा |

पारतंत्र्य व्यथा | सोडवाया ||१||

*
उद्देश सरळ | समाज जागृती |

स्वातंत्र्य स्विकृती | जनतेत ||२||

*
दूरदृष्टी त्यांची | स्थापली मंडळं |

लढण्यास बळ | एकजूट ||३||

*
मिळाले स्वातंत्र्य | आली लोकशाही |

सार्वभौम ग्वाही | भारतात ||४||

*

दुर्दैव सणाचे | बदलला काळ | 

फासे हरताळ | वर्तनाने ||५||

*

मिरवणुकीत | डीजेचा आवाज |

मंडपात माज | सद्यस्थिती ||६||

*

बिब्बा म्हणे बाप्पा | दे यांना सद्बुद्धी |

उत्सव समृद्धी | वाढवाया ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरे लंबोदर कोण ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ खरे लंबोदर कोण ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

क्रोध तव मुखावर दिसतोय 

आम्हां भक्तांना गणराया,

चार पाच तासांचा प्रश्न आहे 

तुम्हां सभामंडपी विराजाया !

*
दुखू जरी लागले तुमचे पाय

नाही त्याला काही ईलाज,

नेहमी पावसाळ्यात “रस्ते”

सोडतात स्वतःची “लाज!”

*
बुद्धी वाटतांना सकलजनां 

मुद्दामच वगळता “त्यांना, “

फक्त विसरू नका म्हणता,

कधीच “दामाजी पंतांना !”

*
दरवर्षीच्या पावसाळ्यात 

करोडो खड्ड्यात जातात,

हिशोब नाही त्यातले किती 

“लंबोदरात” गडप होतात !

*
त्रास सोसा आता दरवर्षी

करतो विनंती माफी मागून,

अठ्यात्तर वर्ष झाली तरी 

लंबोदर त्यांचे भरे ना अजून !

लंबोदर त्यांचे भरे ना अजून !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शक्ती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ शक्ती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वागायचेच नाही सोडून संयमाला

बालंट सहज येते घेऊन संकटाला

*

वचने तुम्ही दिलेली पाळा जरूर सारी

विश्वास ठेवतो ना जोडून माणसाला

*

उपरे उगाच कोणा समजायचे कशाला

प्रत्येक जीव असतो तरबेज वागण्याला

*

अमरत्व लाभलेला येथे कुणीच नाही

घेवून मरण आला संपून जावयाला

*

भोगून भोग सारे जगणे जगून घ्यावे

नाही समर्थ कोणी ते दैव टाळण्याला

*

साही विकार झाले शत्रूच माणसाचे

जिंकेल जो तयाना तो थोर वीर झाला

*

कोठे तरी निराळी आहे अगाध शक्ती

धावून तीच येते उद्धारण्या जगाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ निष्ठूर पाऊस… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ निष्ठूर पाऊस… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

अरे अरे पावसा रे

झाले काय सांग तुला

असा कसा वेड्यावाणी

धाड धाड कोसळला

*

आधीच रे शेतकरी

गरिबीने पिचलेला

मशागत शेतीची रे

करुनिया भिजलेला

*

तुझ्यावर जीव त्याचा

संसार ही तुझ्यावर

अशा तुझ्या येण्याने रे

घालतोय गहिवर

*

उभे पिक पाण्यामध्ये

भूई सपाट रे झाले

पाहुनिया दैन्यावस्था

धाय धाय ते रडले

*

असा का रे रागावून

कधी होतोस बेभान

घर दार जनावरे

सारे नेतोस वाहून

*

चोहीकडे पाणी पाणी

गाव पुराने वेढले

अवचित आल्याने रे

लाखो संसार बुडाले

*

होऊ नकोस निष्ठूर

कशी आटली रे माया

धर आम्हावरी छाया

तुझ्या पडते रे पाया

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ! – कवी : श्री विजय पोहनेरकर  ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ! कवी : श्री विजय पोहनेरकर  ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ!

महालक्षुम्या आल्या, महालक्षुम्या आल्या

घाबरून नका जाऊ

जेवढं होईल तेवढंच करा

टेन्शन नका घेऊ

 

काळाप्रमाणे काही गोष्टीत

बदल केले पाहिजे

सोळा भाज्या सोळा चटण्या

कमी केले पाहिजे


एवढेच लाडू तेवढ्या करंज्या

तरकटी नको बाई

काही धरायचं काही सोडायचं

काही होत नाही


= (
पूर्वीच्या काळी…) =

एकत्र कुटुंब माणसं भरपूर

अन्न खाल्ल्या जायचं

थोडं जास्त झालं तरी

वाया नाही जायचं

 

गडी माणसं पाहुणे रावळे

चढाओढीने खायचे

Acidity, पोटात गुडगुड

काही नाही व्हायचे 


आता काळ बदलला आहे

घरोघरी माणसं चार

माऊल्यांनो खरंच जास्त

होऊ नका तुम्ही बेजार


भला मोठा स्वयंपाक करून

फेकून देऊ नका

अन्न पूर्ण ब्रह्म आहे

कधीच विसरू नका


सण करणं श्रद्धा असणं

हा भाग महत्वाचा

लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो

फक्त भाजी भाकरीचा


जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास

गौरी-गणपती येत नाहीत

थोडं कमीजास्त झालं तरी

कुणावरही कोपत नाहीत


तुमच्यावर राग राग करायला

देव थोडाच माणूस आहे

महालक्ष्मी असो गणपती असो

फक्त भक्तीचा भुकेला आहे


ऐपतीप्रमाणेच सगळं करा

रिन काढून नको सण

नको लायटिंग नको माळा

फक्त हवे शुद्ध मन


सगळ्यांनी सामील होणं

हे महत्वाचं असतं

खरंच ताण घेऊ नका

काही कामाचं नसतं


आमच्याकडे असं असतं

अन त्यांच्याकडे तसं

ताण न घेता काम करावं

जसं जमेल तसं

 

गाठीभेटी गप्पागोष्टी

सणासुदीला अपेक्षित असतात

प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच

दसरा दिवाळी लक्षुम्या असतात


मंत्र जोर जोरात म्हणायचे

अन सासुशी करायची कट्टी

असं वागल्यावर कशी होईल

महालक्षुम्याशी गट्टी?


राग अहंकार चांगला नसतो

गोडीगुलाबीने वागलं पाहिजे

फटकळ बोलणं सोडून देऊन

घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे 

कवी : प्रा. विजय पोहनेरकर, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

 9420929389

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दहीहंडी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दहीहंडी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

दहीहंडी

थरावर थर

लावून चढू

शाश्वत सुखाची

दहीहंडी फोडू….

*

पाया असे

साधनेचा थर

सातत्याची

घट्ट पकड वर…

*

कामक्रोधाचे

नमविताच शिर

आत्मरूपी कृष्ण

चढे वरवर…

*

जन सोडती

कुचेष्टेचे नीर शर

ठरती मार्गात अडसर

संयमाने करू पार..

*

घट अहंकाराचा

टांगला आहे शिरी

चला फोडू तया

आत्मबले खरोखरी..

*

मीच घट डोईचा

मीच इंद्रियरूपी गोप

मीच घटातील अहंकार

मी कृष्ण, फोडी घट..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखाचा संसार… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सुखाचा संसार… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार : अभंग – विषय : संसार)

संसार सुखाचा| करावा गोडीने|

आनंदें प्रेमाने|टिकवावा||||

*

सुख-दु:ख दोन्ही|साहावे जोडीने

|राखत गोडीने|एकमेका||||

*

संसाराचा रथ|पतीपत्नी चाके|

कौशल्याने बाके|चालवावा|||

*

सांगाती राहावे|क्रोधास टाळावे|

प्रेमाने जिंकावे|परस्परां||||

*

तंटा-वाद सारा|क्षणी विसरावा |

एकमेका द्यावा|आधारची||||

*

गोडी ती राखावी |साथ संगतीत|

मनीचे गुपित |ओळखावे |||

*

संसारासी अर्थ |देता होई सार्थ

ठरे ना तो व्यर्थ|जगामध्ये||||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares