आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार यांच्या, मानस, इंद्रा आणि नक्षत्र या तीन कवितासंग्रहांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा.
आज त्यांची एक नवीन कविता “भेट आपुली ती पहिली…“, ‘कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.
🙏 💐 वरिष्ठ साहित्यकार गुरुवर प्रो चित्र भूषण श्रीवास्तव विदग्ध जी अनंत में विलीन – विनम्र श्रद्धांजलि 💐🙏
भोपाल। वरिष्ठ साहित्यकार, भगवतगीता , रघुवंश, मेघदूत के हिंदी काव्य में अनुवादक, 40 से ज्यादा कृतियों के कवि, लेखक, आध्यात्मिक, राष्ट्र प्रेम की भावधारा के साहित्यिक पिताजी प्रो चित्र भूषण श्रीवास्तव विदग्ध का दुखद अवसान 99 वर्ष की आयु में आज 25 जुलाई को शाम 4 बजकर 50 मिनट पर हो गया है।
उन्होने शांति से अंतिम सांसे ली, और दिव्य स्थान को प्रस्थान कर गए हैं।
उन्होंने बच्चों के बच्चों के संग भी जीवन का भरपूर आनंद लिया।
ई-अभिव्यक्ति परिवार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ संपादक ई-अभिव्यक्ति (हिंदी) के इस दुःख में सहभागी है। 🙏
– हेमन्त बावनकर, पुणे
🙏 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से गुरुवर प्रो चित्र भूषण श्रीवास्तव विदग्ध जी को विनम्र श्रद्धांजलि 🙏
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अंजली गोखले यांनी लिहिलेले “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे माहितीपूर्ण पुस्तक ‘विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग’ यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे.
आपल्या समूहातर्फे अंजलीताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन आणि यापुढील त्यांच्या अशाच समृद्ध साहित्य-सेवेसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐
🌸🌼🌸
आजच्या “ मनमंजुषा “ सदरात वाचू या.. ‘ हे पुस्तक का लिहावेसे वाटले ‘याबद्दलचे अंजलीताईंचे मनोगत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ स्वामी विवेकानंदांवरचे पुस्तक मला का लिहावेसे वाटले… ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆
☆
स्वामीजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेनेच या पुस्तकाचे लिखाण पूर्णत्वाला जाऊ शकले.
ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंद या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करताना स्वामी विवेकानंदांचा संदर्भ आला.
अमेरिकेतील एका छोट्या गावामध्ये सहा सात वर्षाची मुले खेळत असतात. जवळच छोटासा टॅंकअसतो. थोडावेळ खेळ झाल्यानंतर मुलांची दंगामस्ती, त्यानंतर भांडणे होतात. एक मुलगा आपल्या लहान भावाला पाणी भरलेल्या टॅंक मध्ये ढकलून देतो. तो मुलगा बु डायला लागतो आणि त्याच क्षणी त्याचे लक्ष आकाशाकडे जाते. तिथे त्याला झगझगता प्रकाश दिसतो आणि त्यामध्ये एक आश्वासक चेहराही दिसतो. त्याचवेळी पाण्यामध्ये त्याच्या हाताला एक काठी लागते आणि मित्र त्याला ओढून घेतात आणि त्याचा जीव वाचतो..
त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी तो मुलगा आपल्या आईबरोबर शिकागो येथे चाललेला असतो. त्यात वेळी त्याला समोर तसाच झुक झुकता प्रकाश पुन्हा दिसतो आणि तोच आश्वासक चेहरा असलेली व्यक्ती पण दिसते. तो त्यांच्याकडे जायचे ठरवतो तेवढ्यात ती व्यक्ती पायऱ्या चढून एका मोठ्या हॉलमध्ये जाते. तोही त्या हॉलमध्ये जातो आणि पाहतो तो हॉल गच्च भरलेला असतो आणि त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरलेली असते.
केशरी फेटा आणि अंगभर केशरी कपनी घातलेली ती व्यक्ती म्हणजे भारतामधून आलेले स्वामी विवेकानंद होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर तो त्यांना शेक हँड करून यावे असे मनाशी ठरवतो. त्यांच्या जवळून जाताना त्याच्या मनात येते की आपल्याला असे मोठे गुरु पाहिजेत. यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळावे. तो जवळ गेल्यावर स्वामीजी त्याच्याकडे पाहून त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,, ” अरे मी तुझा गुरु नाही. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये जे तुला चांदीचा पेला देतील, ते तुझे गुरु असतील.”
25-30 वर्षांनी त्या व्यक्तीला, भारतातूनच आलेल्या परमहंस योगानंदानी चांदीचा पेला दिला.
.. हा प्रसंग वाचल्यानंतर मी थक्क होऊन गेले. अशा द्रष्ट्या, दैवी शक्ती लाभलेल्या स्वामीजींची आपण पूर्ण ओळख करून घ्यावी, त्यांचे विचार समजून घ्यावेत, असे मी नक्की केले. आणि त्यांची पुस्तके वाचण्याचा सपाटा सुरू केला. अशी मोठी पंधरा-सोळा पुस्तके वाचल्यानंतर सोप्या भाषेत स्वामीजींवर पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले आणि त्यातून तयार झाले ” हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद “हे स्वामीजींवरील पुस्तक.
…. स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे आणि जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली केली, तसेच होते स्वामीजी. त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले तसेच घडले स्वामीजी.
…. सद्गुरु रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या पट्ट शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी.
…. आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी.
…. आपल्या मातृभूमी बरोबर सगळ्या जगाच्या हितासाठी झटले स्वामीजी.
…. ” हे विश्वची माझे घर ” म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची
अक्षरशः आहुती दिली ती स्वामीजींनी.
…. फक्त भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड येथेही हिंदुध्वज रोवून तो ध्वज फडकवला तो स्वामीजींनी.
अशा स्वामीजींचे सर्व पिढीला आदर्श असेच आहे.
म्हणूनच – –
“हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद”हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे आणि आचरणात आणावे असे मला मनापासून वाटते.
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अर्चना देशपांडे यांचा “मोगरा फुलला” हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐
आजच्या व उद्याच्या अंकातील जीवनरंग सदरात वाचू या याच संग्रहातील त्यांची कथा – “नवं नातं”… दोन भागात.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती सुरेखा कुलकर्णी यांचा ‘नंदादीप’ हा काव्यसंग्रह वल्लरी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे.यापूर्वी त्यांचा एक प्रातिनिधिक व एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.
त्यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
।। छत्तीसगढ़ के प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी का दुखद निधन – भावपूर्ण श्रद्धांजलि ।।
छत्तीसगढ़ की माटी से लेकर विश्व मंच तक अपनी विशिष्ट एवं हास्य-व्यंग्य की कविताओं से पहचान बनाने वाले महान कवि पद्मश्री डॉ. सुरेन्द्र दुबे जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।आपका जन्म 8 जनवरी सन 1953 को छत्तीसगढ़ राज्य के दुर्ग जिले में बेमेतरा गाव में हुआ था। आप पेशे से एक आयुर्वेदिक चिकित्सक भी रहे। आपको भारत सरकार द्वारा 2010 में भारतीय नागरिक पुरस्कार पद्मश्री से सम्मानित किया गया था। आपको “काका हाथरसी पुरस्कार” से भी सम्मानित किया गया था।
🙏🌹 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी को विनम्र श्रद्धांजलि 🌹🙏
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग, यांच्यातर्फे, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त राज्य स्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे यांच्या कवितेस लक्षवेधी रचनेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
त्याबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता मन पाखरू पाखरू…
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ मन पाखरू पाखरू… ☆ श्रीमती उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धा… लक्षवेधी रचना पुरस्कार प्राप्त कविता)