कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०५ – विजय साहित्य ?

☆ नारळी पुनव…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

आली श्रावण पौर्णिमा

कोळी बांधवांचा सण

शांत झाला दर्या राजा

देई रोजी रोटी धन…!

*

सुरू झाली मासेमारी

शिरे दर्यामधे होरी

बघ नटल्या सजल्या

गोड कोलियाच्या पोरी.

*

रंग रंगोटी करून

बघ सजविली नाव

पूजा करू सागराची

मिळो अंतरात ठाव…! ‌

*

दर्या राजा द्येव त्याचा

आहे नारळाचा मान

भात नारळाचा केला

सजे नैवेद्याचे पान…!

*

गंध फूल अक्षतांनी

होई सागराची पूजा

कर आमुचे रक्षण

ठेव बळकट भूजा…!

*

मासेमारी करताना

ठेव सुरक्षित धनी

तुझ्या पुजेसाठी बघ

किती जमल्या साजणी..!

*

कृपा प्रसादाने तुझ्या

राहो भरलेले घर

होरी खेळू देत माझी

तुझ्या लाटा लाटांवर…!

*

तुझ्या जीवावर करे

कोळी बांधव संसार

आली नारळी पुनव

कर पुजेचा स्विकार…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted