☆ कृष्णसखी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
गोरी सलोनी राधाराणी
यमुनेवर पाण्यास निघाली
अवचित आली कानी धून बासरीची
शोधत राही कृष्ण मुरारी
*
दिसला मग तो बासरीवाला
प्राणप्रिय तो राधेचा सखा
कामधाम सारे विसरली
बासरीच्या सुरात गुंगली
*
तनमन सारे झाले सुरमयी
कृष्ण रंगी राधा रंगून गेली
☆
© सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





