आपण बरेच शब्द, वाक्य मुद्दाम वापरतो. यात आदर, निंदा, अपमान, आपलेपणा, गौरव, प्रेम, कटूता अस सगळं काही असतं. काही वेळा यात दोन वेगवेगळ्या भावना असतात. यातल्या नक्की कोणत्या भावना पोहचवायच्या हे बोलणारा व्यवस्थित साधत असतो.
तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे वाक्य भरपूर वेळा ऐकून झाल असलं तरी त्यात भरपूर अर्थ पुरेपूर भरला आहे अस बोलणार्याला कायम वाटतं. तर यात काहीच अर्थ नाही अस ऐकणार्याला वाटतं.
पण बाप हा असा शब्द आहे ज्यात गौरव, अभिमान, आदर, अपमान, निंदा अस सगळं काही आहे. आपली चांंगली ओळख सांगणारा आणि आपला अपमान सांगणारा एकच शब्द कुठला असेल, तर तो म्हणजे बाप.
कोणाच्या बापाला घाबरत नाही. यात अभिमान आणि मग्रुरी दोन्ही जाणवतं. तर बापानं काही शिकवलं नाही का… यात सहज पण खोचखपणे ऊध्दार होतो तो बापाचा. आणि अपमान होतो दोघांचा. आपला आणि…
आपल्या चांगल्या कामाने मान उंचावते ती बापाची, आणि आपल्या चुकीमुळे मान खाली घालावी लागते ती बापाला. (अर्थात हेच त्याच्या कामावर आपल्या बाबतीत पण असतं.)
लहानपणी आधार, प्रेम, संयम, हिंमत शिकवणारा असतो तो बाप. आणि उतार वयात याच सगळ्या किंवा काही गोष्टींची अपेक्षा ठेवणारा असतो तोही बापच. असतांना आधार असतो, आणि नसला तर सगळं असून निराधार वाटतं.
बापाचा ऊल्लेख कसा, कधी, आणि कोणत्या अर्थाने होतो यावर अभिमान वाटतो, किंवा संताप होतो. कठोर, तापट, रागीट वाटणारा बाप कधीकधी आपल्या मुलांसाठी खूपच हळवा झाल्याच लक्षात येत. आपल्याच मुलांना खडेबोल ऐकवणारा बाप मुलीच्या लग्नात डोळ्यात साठलेलं पाणी अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
हे सगळं बापा बद्दल आहे म्हणून आईचा भाग काहीच नाही अस मुळीच नाही. ती सुध्दा या प्रवासात बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. वरच्या सगळ्या गोष्टीत आदर आणि ऊध्दार यात ती पण असतेच.
घर (कुटुंब) बांधणीत भक्कम भिंतीच्या विटांचा भाग बाप असेल, तर भिंत विटा विटांनी जोडणारा मधला सिमेंटचा भाग हा आईचा असतो. जो सहज दिसत नाही पण जोडण्याच काम त्याच्याच मुळे झालेलं असत.
त्या वर्षी मंगळवारी भरणी श्राद्धाचा मुहूर्त निघाला होता. गावातल्या मोठ्या वाड्यात त्या श्रीमंताच्या आई-बापाच्या आत्म्यांना सदगती लाभावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वयंपाकाचा घाट घातलेला होता.
ओली बाळंतीण आणि गेली दीड दिवस उपवाशी असलेल्या शालिनीबाईला तो दिवस ठाऊक होता. नवरा दोन दिवस झालं कुठं पिऊन पडलाय, तिला शोधायला जाता येणार नव्हतं. तीन पोरांच्या पाठीवर चौथं बाळंतपण दोनच दिवसांपूर्वी तिच्या आईनं घरी येऊन करून दिलं होतं… आणि तिची आई तिच्या रोजगाराला गेली होती. गावातल्या लांबवरच्या दुस-या वस्तीत तर होतं शालिनीबाईचं माहेर.
… आज कुठं नाही काही मिळालं पोरांना तरी वाड्यात नक्की मिळेल, अशी तिची खात्री होती. वाड्यावरून सांगावा येईल याची तिने सकाळपासून वाट पाहिली. पण मोठी माणसं… त्यांच्यात पै-पाहुण्यांची गर्दी असेल, विसरली असतील निरोप द्यायला असं वाटून शालिनी वाट बघत थांबली… रात्रीच्या जेवणापर्यंत तरी कुणीतरी पितरं जेवायला पोरांना पाठवून द्या… असं सांगायला येईल… अशी आशा तिला होती.
घरात कुठल्याशा डब्यात दोन मुठी तांदूळ असतील पण ते करून देणार कोण? शरीराचं दुखणे बाजेवरून खाली उतरू देत नव्हतं… त्यात नवं बाळ अंगाला झटत होतं… आईच्या पोटातच काही नसल्यावर बाळाच्या ओठावर तर काय पोहोचणार? पण बाळ प्रयत्न सोडत नव्हतं… आणि आईच्या पोटात तर भुकेचा आगडोंब उसळला होता!
… शेजारी-पाजारी कुणी देतील असं नव्हतं. ते तरी कितीवेळा देणार? नवरा त्यांच्याशी भांडून बसलाय दारुच्या नशेत. आता कोणत्या तोंडाने काय मागायचं कुणाला? शालिनी गप्प राहिली… थोरल्या पोराकडून पाण्याचा तांब्या तेवढा भरून घेऊन जवळ ठेवला होता… भुकेसाठी पाणी तारक असतं… बुडू देत नाही जीवाला!
शालिनीची आई आज रात्री तर काय येऊ शकणार नव्हती. त्यात पावसाची रिमझिम दिवसभर सुरु होती. पोरांना तिच्याकडे पाठवायचं तरी कसं भिजत. वाटेने विचूकाट्याचं भ्या तर होतंच. आई जिथे रहायची तिथल्या मालकाचा कुत्रा होता भलामोठा… तो अंगावर यायचा पोरांच्या. नकोच ते.. शालिनी विचार करीत तळमळत राहिली.
दुपार उलटून गेली. पोरं भूकेकडे काणाडोळा करीत काहीबाही खेळत राहिली शेजा-याच्या अंगणात. संध्याकाळ सरली आणि रात्र होऊ लागली. आठ वाजता कुणीतरी बोलवायला आलं वस्तीत… पितरं जेवायला पाठवा पोरांना… असा निरोप आला. दुपारचा स्वयंपाक बराच शिल्लक असेल बहुदा. वाड्यातून मोठ्या लोकांना बोलावण्याचे निश्चित नसे. किती माणसं येतील कुणास ठाऊक… बहुदा सगळीच जात असत… म्हणून त्यांनी फक्त पोरा-सोरांनाच बोलावयाचा प्रघात पाडला होता.
शालिनी थोरल्याला म्हणाली, ”सोन्या, वाड्यातून येताना थोडं माझ्यासाठी आणशील का रे खायला! काकूला म्हणावं… आई बाळंत झालीय… भूक लागली आहे तिला… आणि तुझा बाप दोन दिवस झालं घरी आला नाही म्हणून सांग… त्या नाही म्हणायच्या नाहीत! “
शालीनीची तिन्ही पोरं आणि शेजारची तीन चार अशी मिळून सातजण गेले वाड्यावर. शालिनीच्या थोरल्या मुलाला मोठा प्रश्न पडला… मागायचं कसं त्या मोठ्या माणसांना. त्यात खिरीचं पातेलं तळाशी गेलेलं दिसलं… आज बहुतेक खीर लवकर संपली असावी. आणखी काही माणसं जेवायला यायची होती. त्यावर काकू सुनांना म्हणाल्या… ”खीर, आमटी संपत आलीये… परत करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तीच वाढा पातळ करून जराशी. आणि कुणाला घरी नका देऊ… अजून बरेच लोक यायचेत. उरलंच तर सकाळी नेऊन देऊ वस्तीवर! ” यावर सुनांनी माना डोलावल्या! शालिनीचा थोरला कसंबसं जेवला… भूकेपुढे काहीही गोडच लागतं… खीर पातळ असली तरी गोडवा होताच.
… त्याने हात धुतल्यावर घरातल्या बाईला म्हटलं… ”काकू, आईनं थोडं वाढून मागितलंय! ” त्यावर ती फणका-याने म्हणाली… ”आता बाकीच्या लोकांना काय वाढू मग? ते काय नाही… जो हाजीर तो वजीर. तुझ्या आईला म्हणावं… सकाळी पाठव कुणाला तरी… उरलं काही तर देईन! ”
थोरल्या आधीच मुखदुर्बळ. लोकांकडे इतक्या वेळा मागण्याची वेळ आली होती आयुष्यात की आता त्याची लाज वाटू लागली होती त्याला. कधी एकदा मोठा होतोय आणि भाकरी कमवायला लागतोय असं झालं होतं त्या लहानग्या जीवाला.
पोरं घरी आली… शालिनी वाट पहात होती… पोरांच्या रिकाम्या हातांकडे बघून तिचा बांध फुटला! पोरानं लाजून मागितलं नसावं… तिला वाटलं. ती थोरल्याला नको तसं बोलली… जीव चाललाय भुकेनं इथं आणि याला लाज वाटतीय… आता काय माती खाऊ का? बाळाला दूध कसं पाजू?
थोरला आणि सर्वच मुलं रडू लागली… त्यांना आपण जेवून आल्याचं वाईट वाटू लागलं होतं.. पहिल्यांदाच. शालिनी तोंड लपवून रडत राहिली. बाळ तर केंव्हाचंच रडत होतं… भुकेनं!
रात्रीचे दहा वाजत आले होते. थोरला उठला… पायांत चपला असण्याचा संबंधच नव्हता… त्या नव्हत्याच घेतल्या कित्येक दिवसांत. तो थेट अंधारात चालू लागला… दगडधोंडे तुडवीत त्या गावाबाहेर दूरवर असलेल्या अंधा-या वस्तीकडे निघाला. वस्तीवरची कुत्री चाहूल लागताच भुंकू लागली… त्यात आजीच्या घरमालकाचं कुत्रं मोठं अफाट रागीट होतं… ते धावून आलं… थोरला मोठ्या आकांताने किंचाळू लागला… आणि झोपायला निघालेली वस्ती जागी झाली… नशीब मालक जागाच होता.. त्याने त्याच्या कुत्र्याला आवरलं… नाहीतर या पोराचा लचका तुटलाच असता आज.
शालिनीच्या आईनं फडक्यात घरात उरली होती ती दीड भाकरी आणि तिळाची चटणी बांधून घेतली आणि ती लगोलग शालिनीच्या घरी पोहोचली. त्या अंधा-या खोलीत त्या दीड भाकरीच्या चंद्राने मोठा उजेड पाडला… डोळ्यांतून आसवांच्या आणि उरातून दुधाची धार वाहू लागली… आई आणि बाळ… दोघांची भूक पौर्णिमेच्या चांदण्यासारखी आभाळभर पसरली होती.
शालिनीचा नवरा कधीतरी पहाटे येऊन अंगणात झोपला. त्याने येताना पोरांसाठी कसं कुणास ठाऊक खाऊचं एक पुडकं आणलं होतं… त्याला मुंग्या लागून गेल्या होत्या.
दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षे झाली. शालिनी आधी म्हणजे अहेव गेली. त्यामुळे घरी अहेव नवमी जोरात व्हायची. पुढे नवरा गेला आणि मग दोघांचे श्राद्ध एकत्रच करावे लागू लागले. बाईचं श्राद्ध नव-याच्या श्राद्धात उरकून टाकण्याची रीत पडली आहे… असेल काही कारण त्यामागे. पण पितृ म्हणजे एक अर्थ बाप असा असतो… आईचा क्रमांक बोलताना आधी केवळ.
.. थोरला आता खरोखरच मोठा झाला आहे. बहिणी लग्न होऊन सासरी गेल्यात. त्यांना तो भरणीसाठी आग्रहाने बोलावून घेतोच. त्यादिवशी नातलग नंतर जेवतात… वस्तीवर निरोप आधी जातो… जे जेवायला येऊ नाही शकले… त्यांच्यासाठी स्वयंपाक बांधून दिला जातो… नेहमीच!
… आणि… थोरला रात्री सर्वांत शेवटी जेवतो… त्याआधी वस्तीत जातो… एखादी शालिनी जेवायची राहिली आहे का? हे पाहून येतो!
काल अनंत चतुर्दशी. सगळ्यांनीच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पांना प्रार्थना करत विसर्जनाच्या कार्यक्रमात भाग घेतला असणार.
काल सकाळपासूनच आमच्या भागामध्ये कर्कश्य आवाजात गाणी, ढोल ताशे सुरू होते. दारं खिडक्या बंद केल्या तरी आवाजाची कर्कश्यता कमी होत नव्हती. त्यामुळे घरात कुठलंही काम करताना लक्ष लागत नव्हतं. कानावर सारखे ताड ताड ताड वाजत येत होते.
अशा वेळेस नकारात्मक विचार मनात विचार येत होते की ज्यांनी लाऊड स्पीकर चा शोध लावला तो जर लावला नसता किती मजा आली असती. डीजे चा शोध नसता लागला तर किती मजा आली असती. गणपती बाप्पा हा कर्कश्य आवाज कसा सहन करत असतील, ते हा आवाज बंद का करत नाहीत. आसपास आजारी माणसं असतील, त्यांचे काय हाल होत असतील. सारखे असे विचार मनात येत होते आणि कुठेच लक्ष लागत नव्हतं. आणि रोजची कामे पण करता येत नव्हती.
_आणि अचानक मनात विचार आला – negativity always increases the problem and positively can always solve the problem. _
आणि लगेच विचार आला की गणपती बाप्पा मिरवणुकीमध्ये खूप खुश असणार. सगळे लोक आनंदात एकत्रपणे ढोल ताशे वाजवत आहेत, लाऊड स्पीकर वरची गाणी ऐकत त्यांचा आनंद घेत आहेत. बाप्पाची एकच इच्छा असते की सगळ्यांनी
एकत्र यावं आणि आनंदी राहावं. कर्कश्य आवाज वगैरे ही गौण बाब आहे.
पूर्वी केव्हातरी वाचलेलं आठवलं की जेव्हा असे कर्कश्य आवाज वातावरणात असतात तेव्हा त्या आवाजांमुळे वेगळ्या प्रकारच्या लहरी waves तयार होतात. आणि त्या लहरींमुळे वातावरणात असलेले/ जमिनीवर असलेले रोगजंतू नष्ट होतात. त्या लहरींमुळे आसपासच्या प्राणीमात्रांना/ पक्षांना पण एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते खुश होतात. लहरींमुळे आसपासच्या वृक्षांपासून मिळणारे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे वातावरणातील प्रसन्नता वाढते आणि वृक्ष पण खुश होतात.
अशा छान छान विचारांमुळे माझे कर्कश्य आवाजां वरचे लक्ष आपोआप कमी झाले.
घराच्या खिडक्या उघडल्या तरी आवाजाकडे लक्ष जात नव्हते. बाप्पांचे नाव घेत घेत कालची रुटीन कामे मस्त झाली. कर्कश्य आवाज जाणवलाच नाही.
ज्याने कोणी positivity can solve any problem हे विचार मांडले असतील त्यांना धन्यवाद दिले.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
सोमवार दिनांक 14 जून 2021… संध्याकाळी सहा वाजता फोनची रिंग वाजली. फोन चार्जिंगला लावलेला, पीन काढून हातात घेतला. ‘हॅलो… ‘
‘Is it Dr. Abhijit Sonawane there? ‘ पलीकडून अनोळखी आवाज आला.
‘Yes sir, speaking, Dr. Abhijit here…! ‘
‘Oh great… doctor my name is XXX, I need your help… I am helpless and lying on the road, since very long time… ” अत्यंत सफाईदारपणे इंग्लिश मध्ये एक गृहस्थ माझ्याशी संवाद साधत होते.
अर्ध्या तासाच्या संभाषणातून कळलं ते असं… हे एक गृहस्थ, पॅरालिसीस मुळे डावा हात नीट काम करत नाही आणि त्याच सोबत दोन्ही पायही. उच्चशिक्षित आहेत. एका नामांकित बँक मध्ये काम करणारे हे गृहस्थ परिस्थितीच्या एका फटक्याने रस्त्यावर आले आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटपाथवर पडून आहेत निराधार…! मी त्यांना काय मदत करू शकतो हे ते अजीजीने विचारत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला विनंती करून त्यांनी मला फोन केला होता.
‘उद्या मंगळवारी दुपारी बारा वाजता मी तुम्हाला येऊन भेटतो मला पत्ता द्या’ मी म्हणालो. ते पडून असलेल्या ठिकाणचा पत्ता त्यांनी मला खाणाखुणा सकट दिला. पुण्यातील नामांकित रस्ता… या रस्त्याचा अभिमान नाही असा एकही पुणेकर सापडणार नाही. पत्ता शोधणं अवघड नव्हतं. मंगळवारी 15 जूनला बरोबर बारा वाजता मी दिलेल्या पत्त्यावर गेलो.
पुण्यातला हा रस्ता म्हणजे नटलेल्या नववधूसारखा…! आजूबाजूला लाईनशीर असलेली झाडं, म्हणजे तिच्या कपाळापर्यंत आलेल्या बटा जणू… इथली भव्य शोरूम्स आणि हॉटेल्स म्हणजे तिने घातलेले दागिने… सरळ जाणारी, कुठेही वक्र नसलेली ही वाट म्हणजे तीचं सरळ धारदार नाक… इथेच असणारं सांस्कृतिक कला जपणारं एक स्थळ, म्हणजे तीच्या कपाळावर तीनं ल्यालेलं सौभाग्याचं लेणं जणू…!
अरे पण हे काय? रस्त्यावर ज्या ठिकाणी मला यायला सांगितलं होतं तिथे तर उकीरडा होता.. हा उकिरडा म्हणजे… नटलेल्या या नववधूच्या गालावर उमटलेला बटबटीत काळा चट्टा वाटला मला!
रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त विखुरलेल्या बाटल्या, कचरा, विष्ठा आणि आणखीही बरंच काही… नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे या सर्व कचऱ्याचा अक्षरशः चिखल झाला होता. यामुळे आजूबाजूच्या वातावरणात दुर्गंधी पसरली होती. येणारे जाणारे लोक या ठिकाणाला टाळून वळसा घालून पुढे जात होते.
उकिरड्यापासून दहा फूट अंतरावर मी बुलेट थांबवली. गाडीवरून न उतरताच आजूबाजूला ते गृहस्थ कुठे दिसतात का हे पाहू लागलो. उकिरड्याकडे पुन्हा लक्ष गेलं… याच कचऱ्यावर अर्धवट पसरलेला फाटलेल्या फ्लेक्सचा एक तुकडा कोणीतरी झाकून ठेवला होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून किंवा हा कचरा दिसू नये म्हणून कुणीतरी ही शक्कल लढवली असावी.
मला हसू आलं… दुर्गंध झाकून लपतो काय? आणि सुगंध… झाकला तरी दरवळायचं सोडतो काय…?
बराच वेळ शोधुनही, त्या गृहस्थांचं नामोनिशाण मात्र कुठेही दिसलं नाही. मनात विचार केला, इथून ते काही कारणासाठी दुसरीकडे कुठेतरी गेले असतील, येतील परत… आपणही येऊ पुन्हा परत कधी तरी… हा विचार करून मी बुलेट स्टार्ट करून गाडी आणि माझ्या अंगाखांद्यावर असणारं शंभर-दीडशे किलोचं साहित्य सावरत पुढे निघालो.
थोडंसं अंतर पुढे गेलो आणि मनातल्या विचाराने गाडीला कचकन ब्रेक लागला. पॅरालिसीस झालेला माणूस जाईल कुठे…? पत्ताही बरोबर दिला होता. मग तीथंच कुठंतरी असणार ते.. मनात शंकेची पाल चुकचुकली… गाडी वळवून, नो एन्ट्री मधून मी पुन्हा उलट्या दिशेने उकिरड्याकडे निघालो.
यावेळी गाडी उभी केली. अंगाखांद्यावरचं सामान रस्त्यावर काढून ठेवलं. पाऊस भुरभुरत होताच. मी नाक दाबत उकिरड्याजवळ आलो… दुर्गंध आणखी तीव्र झाला होता. डाव्या हाताने नाक दाबत, उजव्या हाताने, उकीरड्यावर अंथरलेला फ्लेक्सचा तुकडा सहज म्हणून मी बाजूला केला. आणि विजेचा धक्का बसावा त्याप्रमाणे माझा हात आपोआप मागे फेकला गेला.
मी हादरलो…! फ्लेक्सच्या या तुकड्याखाली, अंगाचं मुटकुळं करून एक व्यक्ती उजव्या कुशीवर, पाय पोटाजवळ दुमडुन शांतपणे झोपली होती, नमस्कारासाठी जोडतात तसे हात जोडुन ते उजव्या गालाखाली दडपून ठेवले होते… आईच्या पोटात बाळ याच अवस्थेत असतं! परिस्थितीमुळे उकिरडा हिच या बाळाची आई झाली होती इतकंच…
अंगावरचा फ्लेक्स काढल्याबरोबर दुर्गंधी मध्ये आणखी वाढ झाली… दुर्गंध सुद्धा इतका दुर्गंधीत असू शकतो हे आज प्रथमच जाणवलं.
तो अजूनही शांत झोपला होता. उकिरड्यात असलेल्या दुर्गंधाचा त्याला “गंध” सुद्धा नव्हता, कसलीही किळस चेहऱ्यावर नव्हती! अर्थात जीने पोटात घेतले तिची कसली किळस? आईच ती शेवटी!
मी याच्याकडे नीट पाहिलं. रान माजावं, तसे डोक्यावर केस माजले होते. पिकतं ते शेत, माजतं ते रान! शेताची मशागत केली जाते… माजलेल्या रानाची मशागत करायचीच नसते, त्याला उखडून फेकूनच द्यावं लागतं! गालावर वाढलेली दाढी अशी, जणू कुणीही न पेरता उगवलेल्या काटेरी बाभळी…! मान ना मान… म्हणत, खऱ्या अर्थानं या गळ्यात पडल्या होत्या…!
अंगावर कळकट्ट शर्ट… कधीकाळी यालाही कुठलातरी रंग नक्कीच असेल… आज तो “बेरंग” होता! त्याखाली पॅन्ट. पॕन्टला बक्कल नव्हतंच… पण, कमरेपासून खाली येऊ नये म्हणून सुतळीने तीला बांधून ठेवलं होतं.
“आपले” म्हणणारे लोक सुद्धा जीथं आपल्याला “नागवं” करायला कमी करत नाहीत, तीथं ही क्षुल्लक अशी सुतळी कोणाची तरी लाज वाचवू पाहत होती! वाह रे दुनिया!
मल – मूत्र – विष्ठा याने ही संपूर्ण पॅन्ट भरून गेली होती. तो उठून चालूच शकत नाही… सर्वकाही जागेवरच! करणार काय? मल – मूत्र – विष्ठा यांची संपुर्ण जबाबदारी या पॅन्टने घेतली होती, बिनबोभाट!
एरव्ही, हे माझं काम नाही, ही माझी जबाबदारी नाही, असं म्हणणारी अनेक मंडळी भेटतात… त्यांच्यापेक्षा हि वास मारणारी, पण जबाबदारीचं भान ठेवणारी पॅन्ट लाखमोलाची! एकुणच, संपूर्ण जगात असलेला दुर्गंध जणू तीथे एकवटला होता… या गृहस्थाला सोबत करण्यासाठी!
याचं वय असावं 40 वर्षे! फोनवरील बोलण्यावरून मला कुणीतरी पोक्त गृहस्थ असावेत असं वाटलं होतं. तो अजुनही गाढ झोपेत होता. आलिशान घरात गाद्या गिरद्यांवर झोपेवाचून तळमळत पडलेले लोक मी पाहिले आहेत… तीथं हा मनमौजी मात्र या उकिरड्यात गाढ झोप घेत आहे… स्वर्गीय सुख अनुभवत आहे! खरा नशीबवान तो!
मी त्याला खांद्याला धरुन हळूच हलवलं. खरंतर कुणालाही झोपेतून उठवायला मला आवडत नाही. यांच्या आयुष्यातली स्वप्नं भंगलेलीच असतात.. किमान झोपेतली स्वप्नं आपण कशाला तोडावीत? याचवेळी, डोळे चोळत तो जागा झाला.
मी म्हटलं, ‘काल तुम्ही मला फोन केला होतात. ‘
‘Oh… yes.. yes… I remember. You are Dr. Abhijit, right sir? ‘
‘Yes. मित्रा तू मुळचा कुठला? ‘ अहो जाहो चे बांध तोडून आमच्यात मैत्री निर्माण व्हावी यासाठी मी सरळ एकेरी हाक मारली.
त्याने गावाचं नाव सांगितलं. कोकण संपून एक राज्य सुरू होतं, त्या राज्यातल्या एका गावाचा तो रहिवासी.
‘तुला या घाणीचा त्रास होत नाही? ‘
‘कोणती घाण, कसली घाण? ‘ त्याने आजुबाजुला पहात अत्यंत निरागसपणे विचारले. त्याच्या या “निरागस” प्रश्नातच उत्तर दडलं होतं!
प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो. ताटात असलेलं आजच पक्वान्न दुसऱ्या दिवशी खराब होतं, नासतं… तेव्हा त्याला उकिरड्यावर फेकून दिलं जातं… फेकणारा ती घाण म्हणून फेकतो. पण उकिरडे धूडाळणाऱ्या कुत्र्या मांजरांना मात्र ही फेकलेली घाण म्हणजे मेजवानी असते… त्यांच्यासाठी ते अन्नच असतं! काल जे पक्वान्न ताटा ची “शान” होतं, आज उकिरड्यावर पडल्याबरोबर ते “घाण” होतं! प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो हेच खरं…! ताटापासून उकिरड्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच माणसाचं आयुष्य असावं का?
बोलता बोलता मी त्याच्या भूतकाळामध्ये शिरलो.
आई-वडिलांसह हा एके दिवशी पुण्यात आला. याचं शिक्षण बीकॉम. एका बँकेमध्ये काम करू लागला. सर्व काही सुरळीत होतं. कालांतराने आई आणि वडील दोघेही वारले. मधल्या काळात याला पॅरालीसीसचा झटका आला. त्यात डावा हात आणि दोन्ही पाय निकामी झाले. नोकरी गेली… संसार कधी फुलला नाही.
रेस मधला नामांकित घोडा हि लंगडा झाला की त्याची किंमत त्याक्षणी संपते, याचं ही तसंच झालं. घराचं भाडं द्यायला पैसे नाहीत आणि हा आता कोणतंही काम करू शकत नाही… यात ते भाड्याचं घर सुद्धा सुटलं. आणि मग सुरू झाला आयुष्याच्या नाटकाचा दुसरा अंक…
जागा मिळेल तिथे दुकानाबाहेर रस्त्यावर किंवा इतर कोणत्या तरी ठिकाणी येऊन तो झोपायचा… खुरडत चालायचा… कोणी काही देईल ते खायचा. असली घाण दारात नको म्हणून प्रत्येकाने त्याला दारासमोरून हाकलून दिलं.
प्रत्येकाच्या दारावर त्याच्या नावाची ठसठशीत पाटी असते.. “ओळख” नावानं होत असेलही… “परिचय”, आपल्या वागण्यामुळं होतो! मोठ्ठं नाव असलेल्या परंतु, परिचय हरवुन बसलेल्या लोकांनी याला सगळीकडुन हाकलुन दिलं.
हा आला मग आपलं गाव शोधत… त्याला ध्रुवासारखं अढळ स्थान हवं होतं, जिथून त्याला कुणीही उठवणार नाही… आणि मग त्याला हा उकिरडा सापडला.
☆ Senior Care Services एक अनुभव… – लेखिका : सुश्री मानसी कुलकर्णी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
“आता या म्हातारपणात आवड-निवड नाही… सोय महत्त्वाची आहे.”
एक ८५ वर्षांच्या आजोबांसोबत follow-up visit ला गेलो होतो. Doctor ना वेळ होता, म्हणून आम्ही बाहेर बसून गप्पा मारत होतो.
ते म्हणाले, “मी सध्या एका care center मध्ये राहतो. सकाळी उठतो, नाश्ता, औषधं, जेवण, थोडी विश्रांती, TV, room partner सोबत गप्पा… असा दिवस जातो.”
मी विचारलं – “तुम्हाला तिथे आवडतं का?”
ते हसले आणि म्हणाले,
“माझी मुलगी मला घरी एकटं ठेवायला घाबरते. तिचा संसार आहे. सतत माझ्याजवळ राहणं शक्य नाही. बायकोलाही वयामुळे त्रास होतो. म्हणून मुलीने हा निर्णय घेतला.”
“घराची आठवण येत नाही का?” मी विचारलं.
ते काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले –
“आठवण येते… पण घरी पडलो आणि उठता आलं नाही तर? रात्री काही झालं तर? इथे कोणीतरी जवळ असतं. वेळेवर जेवण-औषध मिळतं. माझ्यासारखी माणसं आहेत बोलायला.”
आणि मग त्यांनी ते वाक्य म्हटलं जे कायम लक्षात राहील –
“आता या म्हातारपणात आवड-निवड नाही बघा… सोय महत्त्वाची असते.”
खरंच आहे.
तरुणपणी आपल्याला आवडीचं घर, आवडीचं जेवण हवं असतं. पण वय झाल्यावर गणित बदलतं…
घर किती सुंदर आहे यापेक्षा – सुरक्षित आहे का? हे महत्त्वाचं. जेवण किती आवडतं यापेक्षा – वेळेवर मिळतं का? हे महत्त्वाचं. घर किती मोठं आहे यापेक्षा – बाथरूम पर्यंत सहज जाता येतं का? हे महत्त्वाचं. Care Center मध्ये जाणं म्हणजे घर सोडणं नाही, तर परिस्थितीला समजून घेऊन जगण्याचं शहाणपण आहे.
मुलांनी आई-बाबांना तिथे ठेवलं म्हणजे सोडून दिलं असं नाही. ते सुरक्षित राहावेत म्हणून घेतलेला तो एक जबाबदार निर्णय असतो. कारण म्हातारपणी माणूस फार काही मागत नाही. वेळेवर औषध, वेळेवर जेवण, दोन शब्द बोलायला कोणीतरी आणि पडल्यावर उठवायला एक हात.
आवडी-निवडी संपत नाहीत, फक्त गरजा बदलतात. आणि त्या बदललेल्या गरजा समजून घेणं… हेच खरं Care आहे.
***
लेखिका : मानसी कुलकर्णी
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
बाहेर प्रचंड थंडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोक अंगात स्वेटर चढवून घराच्या उबदार कोपऱ्यात विसावले आहेत. कुठे दूरचित्रवाणीवरील मालिकांचा आस्वाद घेतला जातोय, तर कुणी आपल्या मोबाईलच्या आभासी जगात व्यस्त आहे. पण अशा गारठलेल्या संध्याकाळीही चाळीसगावच्या एका कोपऱ्यात दोन-अडीचशे लोक आनंदाने एकत्र आले आहेत. निमित्त आहे एका आगळ्यावेगळ्या यज्ञाचे! हा यज्ञ म्हणजे ‘ज्ञानयज्ञ’. दररोज निरनिराळे वक्ते आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या समिधा या यज्ञात अर्पण करत आहेत आणि हे सुंदर दृश्य पाहायला मिळत होते चाळीसगाव येथील आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात, जिथे शेठ नारायण बंकट वाचनालयाची ‘सरस्वती व्याख्यानमाला’ काही दिवसांपूर्वी दिमाखात सुरू होती. तिची सांगता नुकतीच झाली आहे. (२ ते ११ जानेवारी २०२६)
तब्बल ८७ वर्षे एखादा उपक्रम अव्याहतपणे चालवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्राला व्याख्यानमालांची मोठी परंपरा आहे. पुण्याची ऐतिहासिक ‘वसंत व्याख्यानमाला’, नाशिकची ‘सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला’ किंवा सांगलीची ‘व्याख्यानमाला’ ज्याप्रमाणे शहराची ओळख बनली आहे, त्याचप्रमाणे चाळीसगावची ही ‘सरस्वती व्याख्यानमाला’ आता उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरली आहे.
यंदाच्या व्याख्यानमालेत विषयांचे जे वैविध्य होते, त्याने श्रोत्यांना नक्कीच समृद्ध केले.
ठाण्याच्या डॉ. अरुणा टिळक यांनी आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून सोपे उपाय सुचवले. पुणे येथील मुक्तांगण परिवारातील माधव कोल्हटकर आणि मानवेंद्र जोगदेव यांनी व्यसनाधीनतेच्या सामाजिक प्रश्नावर परखड प्रबोधन केले. जळगावहून आलेले रामचंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य गुणांचे दर्शन घडवले, तर बारीपाडा येथील पद्मश्री चैतरामजी पवार यांच्या मुलाखतीतून त्यांच्या निस्पृह कार्याची गाथा समोर आली. जबलपूरच्या प्रशांतजी पोळ यांनी ‘इंडिया ते भारत’ या प्रवासातून देशाच्या प्रगतीचा गौरवशाली आढावा घेतला.
सातारा येथील प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांनी ‘सुंदर जगण्यासाठी’ लागणारे मौलिक विचार मांडले. मुंबईच्या अविनाश कोल्हे यांनी साहित्यिक व कलाकारांच्या आठवणी जागवल्या, तर नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ‘समकालीन जीवन वास्तव’ प्रभावीपणे मांडले. ‘बर्ड मॅन ऑफ ताडोबा’ सुमेध वाघमारे यांनी पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून साक्षात जंगलच उभे केले, तर नाशिकहून आलेल्या प्रवीण मानकर यांच्या ७५ देशांच्या रोमांचक प्रवासाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वाचनालयाने या ज्ञानयज्ञाला कृतीची जोड दिली आहे. व्याख्यानांचे सुंदर वृत्तांत लिहिणाऱ्या ‘उत्कृष्ट श्रोत्याचा’ सन्मान करणे असो, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सुरू केलेली ‘वाचक वीर योजना’ असो किंवा मुलांसाठीची ‘वाचन शिबिरे’ असोत; शेठ नारायण बंकट वाचनालय केवळ माहिती देत नाही, तर सुजाण नागरिक घडवत आहे.
पूर्वीच्या काळी कीर्तन-प्रवचनांतून जे संस्कार मिळायचे, तेच कार्य आज ही व्याख्यानमाला करत आहे. या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना या ओळी आठवतात:
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे! “
हे ‘देणे’ केवळ पैशांचे नसून विचारांचे आहे. जेव्हा एक वक्ता आपले आयुष्यभराचे ज्ञान दीड तासात देतो, तेव्हा तो समाज घडवत असतो. चाळीसगावचा हा ८७ वर्षांचा अखंड ज्ञानयज्ञ असाच तेवत राहो, हीच सदिच्छा!
“ज्ञान हाच मानवाचा खरा डोळा आहे आणि वाचन हे त्या डोळ्याचे तेज आहे. “
☆ स्वतःच्या पायावर उभं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर☆
☆
“मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. पण तू नसलास तरीही मला माझ्या पायावर उभे राहायला शिकायलाच हवे! ” प्रत्येक नवरा-बायकोने हे एकदा नक्की वाचावे.
बायको म्हणाली, “अहो, तुम्हाला एक विचारू का? रागावू नका. मला खरं खरं उत्तर हवंय. “
नवरा म्हणाला, “परत काही अवघड प्रश्न विचारणार आहेस का? ठीक आहे, विचार! “
बायको: “आपली मुलं परदेशात स्थिर झाली आहेत. आपण दोघे इथे एकटेच राहतोय. देवाच्या कृपेने आपल्याला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची काहीच कमी नाही. आपण एकमेकांसाठी आहोत आणि शांततेत आयुष्य घालवतोय. पण जसजशी वर्षे जात आहेत, वय वाढतंय आणि शक्ती हळूहळू कमी होतेय. आपण पूर्वीसारखे नेहमी मुलांकडे जाऊन राहू शकत नाही. त्यांनाही त्यांच्या नोकऱ्या, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत. ते नेहमी येऊन आपल्याबरोबर राहू शकत नाहीत. म्हणूनच मला काळजी वाटते. मला काही झालं तर तुम्ही एकटे कसे राहाल?
कधीकधी ह्याच विचाराने मला रात्री झोप लागत नाही. “
नवरा क्षणभर शांत राहिला आणि मग म्हणाला,
“मलाही तीच भीती वाटते. पण त्यात एक छोटासा फरक आहे. तू विचार करतेस – ‘तू नसशील तर मी कसा जगेन? ‘ आणि मी विचार करतोय – ‘मी नसेन तर तू कशी जगशील? ‘ मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. कोण आधी जाणार हे कुणालाच माहीत नाही. म्हणून आज आपल्याला एक गोष्ट बोलायची आहे.
प्रेम म्हणजे फक्त एकमेकांवर अवलंबून राहणे नाही. तर एकजण नसताना दुसऱ्याने खंबीरपणे उभे राहण्यासाठी एकमेकांना तयार करणे सुद्धा प्रेमच आहे. तू नेहमी मला म्हणतेस – ‘तुम्ही नसाल तर मी काय करू? ‘ पण मला तुला विचारायचंय – ‘मी नसेन तर तू काय काय करू शकशील? ‘
तू आपल्या गल्लीच्या शेवटी असलेल्या ATM मधून पैसे काढू शकतेस का? UPI ने पैसे पाठवू शकतेस का?
फोनवर येणारा OTP म्हणजे काय हे तुला माहीत आहे का? Google Pay, PhonePe किंवा Net Banking कसे वापरायचे हे तुला येते का?
अडचणीच्या वेळी कॅब बुक करू शकतेस का? 108 नंबरवर रुग्णवाहिका बोलावू शकतेस का? माझ्या फोनमध्ये Emergency Contacts कुठे सेव्ह केले आहेत हे तुला माहीत आहे का?
तू मुलांना व्हिडिओ कॉल करू शकतेस का? WhatsApp वरून तुझे लोकेशन शेअर करू शकतेस का? Google Maps वरून आपल्या घराचे लोकेशन पाठवू शकतेस का?
माझ्या हॉस्पिटल, डॉक्टर आणि विम्याची माहिती कुठे ठेवली आहे हे तुला माहीत आहे का? आपले हेल्थ इन्शुरन्स कार्ड कुठे आहे आणि ते कसे वापरायचे हे माहीत आहे का?
गॅस सिलेंडर संपल्यावर बुक कसा करायचा हे तुला येते का? लाईट बिल भरू शकतेस का? मोबाईल रिचार्ज करू शकतेस का?
आपली बँक खाती कुठे आहेत हे तुला माहीत आहे का? आपल्या किती ठेवी आहेत आणि त्या कधी पूर्ण होणार आहेत हे माहीत आहे का?
आपली महत्वाची कागदपत्रे – आधार, पॅन, विमा, घराची कागदपत्रे आणि बँकेचे तपशील – कुठे सुरक्षित ठेवले आहेत हे तुला माहीत आहे का?
आपण नेहमी म्हणतो आपली मुलं परदेशात आहेत. पण कधी त्यांना आपली गरज लागली तर आपण त्यांना व्हिडिओ कॉल करून आपली परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगू शकतो का?
ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात. पण आणीबाणीच्या वेळी ह्याच छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या बनतात. “
बायको हळूच म्हणाली: “तुम्ही मला बऱ्याचदा सांगितले, पण हे सगळं मला शिकण्याची गरज आहे, असा मी कधी विचारच केला नाही. तुम्ही आहात ना? तुम्ही सगळं सांभाळून घ्याल, असाच मी नेहमी विचार केला”.
नवरा हसला. “हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. आयुष्यभर आपण ‘तो आहे, ती आहे’ म्हणून एकमेकांवर अवलंबून राहिलो.
पण आयुष्याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून आजपासून, तू मला शिकव, मी तुला शिकवतो. तू UPI शिक, मी थोडा स्वयंपाक शिकतो. तू बँकेची कामे शिक, मी घरातली काही कामे शिकतो.
तू Emergency Contacts शिक, मी विम्याची कागदपत्रे कुठे आहेत ते दाखवतो. तू ऑनलाईन पेमेंट शिक, मी औषधे आणि मेडिकल रिपोर्ट कुठे ठेवले आहेत ते दाखवतो.
आपण एकत्र राहायचंच. पण त्याचबरोबर एकजण नसेल तरी दुसरा खंबीरपणे उभा राहू शकेल इतका सक्षम असायला हवा. “
बायकोच्या डोळ्यात पाणी आले. “हे ऐकून मला भीती वाटतेय”. नवऱ्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “घाबरण्याची काहीच गरज नाही. जे आपल्या हातात नाही त्याची भीती बाळगण्यापेक्षा, जे आपल्या हातात आहे ते शिकणे चांगले.
देवाने आपल्याला किती दिवस दिले आहेत, हे आपल्याला माहीत नाही. पण प्रत्येक दिवस आत्मविश्वासाने, धैर्याने आणि एकमेकांना साथ देत घालवणे हे आपण ठरवू शकतो.
केवळ भगवद्गीता वाचणे पुरेसे नाही. ती जो धैर्याचा धडा शिकवते तो आपल्या आयुष्यात आचरणात आणला पाहिजे. लहानपणापासून आपण आपल्या मुलांना सगळं शिकवतो. शिक्षण, नोकरी, गाडी चालवणे, स्वयंपाक, पोहणे, तंत्रज्ञान, पैशांचे व्यवस्थापन, सगळं.
पण आपण मोठे झाल्यावर ‘मला हे कशाला शिकायला हवं? ‘ असे म्हणण्याऐवजी, ‘उद्या मला याची गरज लागली तर मी ते स्वतः करू शकेन का? ‘ असा विचार केला पाहिजे.
नवरा बायकोची जागा घेऊ शकत नाही. बायको नवऱ्याची जागा घेऊ शकत नाही. पण ते आयुष्यात एकमेकांचा सर्वात सुंदर आधार बनू शकतात. जोपर्यंत तो आधार आपल्याबरोबर आहे, तोपर्यंत प्रेमाने जगूया.
त्याचबरोबर एकमेकांना असे तयार करूया की, एक दिवस जर एकजण नसेल तर दुसरा खचून न जाता खंबीरपणे उभा राहील. “
तंत्रज्ञान शिका. डिजिटल पेमेंट शिका. बँकेची कामे समजून घ्या. आणीबाणीच्या सेवा माहीत करून घ्या. महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवा. मुलांशी नियमित संपर्कात रहा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांवर प्रेम करा आणि एकमेकांचा आदर करा.
शेवटी फक्त एकच विचार; “मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” – हे प्रेम आहे. “तू नसशील तरीही मी उभा राहू शकतो” – हे जीवन समजून घेणे आहे. “जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहेस, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन” – हीच खरी जीवनाची साथ आहे.
आपले कर्तव्य करणे हे आपल्या हातात आहे. आपले रक्षण करणे हे त्याच्या हातात आहे.
ह्या छोट्याशा गोष्टीने प्रत्येक नवरा-बायकोला क्षणभर थांबून विचार करण्याची आठवण करून द्यावी. आणि जोपर्यंत आपण एकमेकांसोबत आहोत, तोपर्यंत एकमेकांसाठी काय शिकायला हवे, काय तयारी करायला हवी आणि काय करायला हवे याचा विचार करावा.
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शीर्षकामागीलसंकल्पना: चंदन जसे स्वतः झिजून आसमंतात सुगंध पसरवते, तसेच या महापुरुषांनी आपल्या त्यागाने, विचारांनी आणि कार्याने समाजाला विचारांचा सुगंध दिला आहे; याच विचारावर या ग्रंथाचे शीर्षक आधारित आहे.
४९ महापुरुषांचा व्यक्तिवेध: यात संतपरंपरा, समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी आणि विचारवंत अशा विविध क्षेत्रांतील ४९ उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचे सखोल विश्लेषण केले आहे.
अभ्यासपूर्णवओघवतीशैली: डॉ. विश्वास पाटील यांची ऐतिहासिक संशोधनदृष्टी आणि त्यांची नाट्यमय, रसाळ भाषा शैली यामुळे प्रत्येक व्यक्तिचित्र वाचकांसमोर हुबेहूब उभे राहते.
सामाजिकवनैतिकमूल्ये: केवळ ऐतिहासिक माहिती न देता या महापुरुषांच्या जीवनमूल्यांची, त्यागाची आणि सामाजिक बांधिलकीची ओळख आजच्या पिढीला करून देणे हा या ग्रंथाचा मुख्य हेतू आहे.
हा ग्रंथ मराठी साहित्यात वैचारिक आणि व्यक्तिचित्रात्मक लेखनाचा एक आदर्श नमुना मानला जातो.
पुस्तकाचीअनुक्रमणिकापुढीलप्रमाणे :
कवष ऐलुषाला नमन.
ब्रह्मवादिनी मैत्रेयी
वाल्मिकीचा रामजप
व्यासप्रतिभेचा आदर्श
गुनाद्याची जळती उजळती कविता.
संस्कृतीची काकड आरती: भारती
भामतीचे अभिनव प्रकाश दान
वैशंपायन चा शिष्य याज्ञवल्क्य
वाणीचे आराधक भगवान पाणीनी.
एका संन्याशाचे मातृ पूजन: आद्य श्री शंकराचार्य.
वैष्णव परंपरेचे अभिमानी रामानुजाचार्य.
अद्वैती गुरूंचा द्वैती शिष्य माधवाचार्य
शुद्धद्वैत परंपरेचे कृष्ण उपासक वल्लभाचार्य
युग धर्माची स्पंदने टिपणारा आचार्य रामानंद.
नार नारद शिषोत्तम निंबाळकाचार्य.
जळ निळावंतीच्या तळीचा ग्रंथकार चैतन्य महाप्रभू.
भगवान महावीर.
भगवान गौतम बुद्ध.
प्रेम धर्माचा पाईक येशू ख्रिस्त.
पारशी धर्मसंस्थापक झर थूष्ट
नव समाज प्रवर्तक संत बसवेश्वर.
सर्वज्ञ महात्मा चक्रधर.
महानुभाव महदंबेची महती.
किर्तनरंगी नाचणारे संत नामदेव.
संत जनाबाईची वैष्णव साधना.
ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर.
संत योगिनी मुक्ताबाई.
संत कबीर.
रामकथागायक गोस्वामी तुलसीदास
प्रज्ञाचक्षु सूरदास.
सुफी कवी जायसी.
भक्तीमती संत मीराबाई.
लोकनाथ संत एकनाथ.
जगद्गुरु तुका आकाशाएवढा.
तुकारामाच्या शिष्या संत बहिणाबाई.
समर्थ संत गुरु रामदास.
समर्थशिष्या संत वेनाबाई.
रंगनायकी संत आडाळ.
संत अक्कमहादेवी.
संत कवयित्री लल्लेश्वरी.
वैष्णव कवी संत नरसी मेहता.
संत श्रीगुरु नानकदेवजी.
आसामचे थोर वैष्णव संत शंकरदेव.
महाकवी संत कंबन.
शेख सादि शिराजी.
गुरुदेव रा. द. रानडे.
ज्ञानमार्गी रमण महर्षी.
संत गाडगेबाबा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लेखक परिचय.
– – सर्वांच्या संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे।
आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – “साँसों के हत्यारे हैं “।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १६५ ☆
☆ बुन्देली कविता – “साँसों के हत्यारे हैं “☆ आचार्य भगवत दुबे
हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल (म.प्र).
नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए, मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।
आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – बैर को भुलाकर…!
☆ ॥ कविता॥ बैर को भुलाकर…!☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆