मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गगनजाई रूपवती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गगनजाई रूपवती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत)

येता ऋतूगंध खास, फुले येती बहरास 

पाय माझे तिथे घुटमळती

शरदाच्या चांदण्यात, हेमंतातली पहाट 

गगनजाई रूपवती

 

उंच उंच तरू देखणे 

पानात रुपेरी चांदणे

झुपक्यात फुलांचे नांदणे

पाचूला श्वेतांगी गोंदणे

हा वारा येता येता, सुगंधाच दान देता 

माझ्या मनास मोहवती

 

नभात रातीची चांदणी

भुलली पाहून रजनी

भेटण्या आतुर धरणी

सुगंध घेऊन अंगणी

बकावली फुलणारी, फुले भिरभिरणारी

वळेसरात गंधवती

 

पाटलीनबाई दिसते भारी

गगनमल्लीगे चमचमणारी 

धवल चंद्रिका दिसते न्यारी

मन गाभारी रुजली सारी

दृष्ट काढूया का याची, याच्या देखण्या रुपाची

ओंजळीत माझ्या किती खुलती

 

आकाशमोगरा कुणी म्हणे

बुचाच्या फुलात हिला गणे

आकाशनीमास देखणे

लाभले चंदेरी चांदणे

मन बालपणी जाते, त्याचे माझे गोड नाते 

कवने ओठी मज स्मरती

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मनमोहन! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मनमोहन! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दुबोटी गंध भालावरचे

वाढवी मुखाची शान,

धरता अधरी मुरली

शाम विसरे स्वभान!

*

शोभे शिरावर नक्षीदार 

सुवर्ण मुकुट साजिरा,

नाजूक गोंडस मोरपीस 

दावी त्याचा बघा तोरा!

*

कानी डुलती कुंडले 

कंठी नवरत्नांची माला,

नाजूक त्याच्या कटीवर

दिसे शोभून मेखला!

*

सोनेरी घट्ट पितांबर 

माधव आहे नेसला,

स्कंधावरून घेतला 

त्याने साजेसा शेला!

*

पाहून रूप कृष्णाचे 

भान कुणाचेही हरावे,

नयनात साठवून मूर्ती 

दिन रात हरीला भजावे!

दिन रात हरीला भजावे!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०७ ☆ चैत्र गौर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०७ ?

☆ चैत्र गौर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

हे दुर्गादेवी… जगत जननी

सा-या संसाराची वरदायिनी

*

तू शक्ती.तू अंबिका..तू सौदामिनी

माझ्या मनावर सदा तुझी मोहिनी

*

तू सौंदर्या, मृगनयनी , सुकेशिनी

सती, शैलपुत्री,चंडिका, शुभांगिनी

*

आई पार्वती,उमा,गौरी,कात्यायनी

अनेक नावे… परी तू माझी भवानी

*

कलियुगातली तू आहेस तारिणी

अवघ्या विश्वाची तू ….उद्धारिणी

*

आम्ही तहानलेले… तू तरंगिणी

तू कालरात्री आणि तूच शिवानी

*

चैत्र नवरात्रीत तूच माझी स्वामिनी

सदा तू प्रसन्न असावेस या जीवनी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे मृत्यो… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

 

☆ हे मृत्यो... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

फक्त एकदा मला पाहू दे हिमशिखरांच्या उत्तुंग राशी

फक्त एकदा मला पाहू दे तोरण गगनी इंद्रधनुष्यी

फक्त एकदा मला पाहू दे वसंत पुलकित हिरवी राने

फक्त एकदा मला ऐकू दे वसंतातले कोकीळ गाणे

 *

निळ्या नभातील रंगपंचमी मला पाहू दे फक्त एकदा

गिरीशिखरातील निर्झर संगीत मला ऐकू दे फक्त एकदा

शिशिरामधला पहाट वारा मला घेऊ दे फक्त एकदा

रेशीम वस्त्रे चंद्राची ती मला लेऊ दे फक्त एकदा

 *

कोसळणा-या सहस्रधारांमध्ये नाहू दे फक्त एकदा

अन् मातीच्या कुशीत शिरूनी मला राबू दे फक्त एकदा

फक्त एकदा मला पाहू दे अवघ्या सृष्टीमधला ईश्वर

फक्त एकदा मला मरु दे इथले जगणे सरल्यानंतर

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२१ ☆ गुणगान माझे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२१ ?

गुणगान माझे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

(चाल : पुकारता चला हूँ)

विचारणा करायची

माझ्यावरी मरायची

खुशालचेंडू मी असा

उगाच ती झुरायची

*

विचारणा करायची

माझ्यावरी मरायची

खुशालचेंडू मी असा

उगाच ती झुरायची

विचारणा करायची

*

मैत्रिणीच्या सोबती असायची

उठून त्यांत तीच तर दिसायची

मैत्रिणीकडे तिच्या मी पाहता

व्यर्थ का ती दात ओठ खायची

विचारणा करायची

माझ्यावरी मरायची

खुशालचेंडू मी असा

उगाच ती झुरायची

विचारणा करायची

*

मीही चोरुनी तिला पाहातसे

अनंत काळजावरी तिचे ठसे

गप्प ती तरीही कान ऐकती

अखंड गुणगान माझे गायची

विचारणा करायची

माझ्यावरी मरायची

खुशालचेंडू मी असा

उगाच ती झुरायची

विचारणा करायची

माझ्यावरी मरायची

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जैत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जैत... ☆ श्रीशैल चौगुले ☆

अलगद घाट

वळणाची वाट

दूरांतरी काठ

तरावे नित्य.

लहरींचे झेल

पेलीतच जावे

सुख-दुःख यावे

संघर्ष सत्य.

 *

श्वासालाही बळ

वेदनेची कळ

तोडितच गळ

जगणे तथ्य.

 *

सरितेची धार

लोचनांचे सार

नियतीचा भार

संयम पथ्य.

 *

जीवन सफर

समयाचे तर

भयावीना जर

यत्नांचे जैत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपासिंधू… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कृपासिंधू… ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वामी तुम्ही थोर | दावी ऐसी दया |

उद्धरती काया | नश्वरांची ||१||

*

भिऊ नकोस तू | मी आहे पाठीशी |

आशिष गाठीशी | कृपासिंधू ||२||

*

प्रसन्न चित्ताने | करावे स्मरण |

वंदावे चरणं | स्वामीकृपा ||३||

*

चराचरात या | जाणवे अस्तित्व |

हृदयी स्वामीत्व | विराजते ||४||

*

अध्यात्माची गोडी | दावी ऐसी दृष्टी |

सुखमय सृष्टी | चिंतनाने ||५||

*

संकटात तुम्ही | मार्ग दाखविता |

दाह शमविता | वेदनांचा ||६||

*

तिन्ही सांजवेळी | रचना स्फुरली |

तुम्हांस अर्पिली | भक्ती भावे ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वर्णन करण्या शब्द अपुरे… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

? वर्णन करण्या शब्द अपुरे... ? शालिनी जोशी 

ही फुले जुईची कां 

आकाशीच्या चंद्रिका

अवतरल्या वेलीवर 

सुखवावया भूलोका

*

नव्हे नव्हे, त्या चंद्रिका 

असती गंधहीन

सुगंध जुईचा व्यापून टाकी 

सारे गगन

*

धुंदी कळ्या फुलांची 

फोटोतूनही जाणवे

वर्णन करण्या 

शब्दही अपूरे व्हावे

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – गंदगी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – गंदगी ? ?

गंदे फुटपाथ पर

रोज रात सोते हैं

कम उम्र के मर्दनुमा कुछ लड़के,

साथ ही उनींदी रहती हैं

इसी उम्र की कुछ औरतें

क्योंकि

लड़कियाँं किसी भी उम्र की हों

औरतनुमा नहीं होती

बल्कि

केवल औरत होती हैं,

वे परदे में हों, न हों

बेपर्दा आँखें

उन्हें बेलिबास घूरती हैं,

पेवमेंट ब्लॉक से लदे

बगैर पेड़ के ट्री गार्ड से भरे

साफ-सुथरे लम्बे-चौड़े फुटपाथ

अपने एसी बेडरूम में

उठा लाते हैं

रात को गंदे फुटपाथ, 

सारे परदे खींचकर

कई तरीकों से

कई बार

मसली-कुचली

जाती है गंदगियाँ,

भोर अंधेरे उसी

सड़ांध भरे फुटपाथ पर

फेंक दी जाती है गंदगियाँ,

सर्दी, धूप, बारिश में

दिन भर गंदगियाँ

यहाँ-वहाँ असहाय

छितरी पड़ी होती हैं,

ताज़ा अखबारों की

बासी खबरों में

अतिक्रमण के बोझ से दबे

फुटपाथ पर चिंता जताते

एसी बेडरूमों की तस्वीरें

भरी पड़ी होती हैं।

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ गुरुवार 12 मार्च से हमारी आपदां अपहर्तारं साधना आरंभ होगी। यह श्रीराम नवमी तदनुसार गुरुवार दि. 26 मार्च तक चलेगी। 🕉️ 

💥 इस साधना में श्रीरामरक्षा स्तोत्र एवं श्रीराम स्तुति का पाठ होगा‌। मौन साधना एवं आत्मपरिष्कार भी साथ-साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ छंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ छंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आठवणींच्या चांदणराती चंद्र चांदणी बोलत होती

खुल्या दिलाने अनुभवलेली एक कहाणी रंगत होती

*

सूर्य जरासा थकला तेव्हा विश्रांतीला निघून गेला

रात साजणी देत हुंदके विरहामध्ये जागत होती

*

रात्रीची पण त्या सूर्याशी ओळखपाळख कधीच नव्हती

भलती आशा मनी बाळगत रात अशी का वागत होती

*

दरवळणारा गंध सुगंधी वारा घेऊन पळून गेला

बागेमधली कुजबुजणारी फुले फुलांना सांगत होती

*

अधीर वेडे प्रेम पाखरू विसावण्यला झाड शोधते

नजरचत्याची बनून वेडी एकचजागा शोधत होती

*

प्रेमासाठी पतंग सुद्धा ज्योती वरती जळूनमरतो

कधी पासूनी जगात सा-या हीच बातमी गाजत होती

*

फरावलंबी नको जगाया सन्मानाने जगता यावे

म्हणून सारी तरणी पोरे काम सारखे मागत होती

*

जगणे केवळ जगणे नसते असते सुंदर जीवन गाणे

जुनी पिढी हे नव्या पिढीला रियाजातुनी शिकवत होती

*

भविष्यातले स्वप्न पहाणे हा सगळ्यांचा छंदच असतो

कर्तृत्वाने छंद जिंकणे पिढी पिढीतीला घडवत होती

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares