मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होरा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ होरा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निरर्थकातून अर्थ काढला

व्यर्थच गेला सारा

चिंतन करूनी चुकला नाही

 या जन्माचा फेरा

 

जगण्यामधले भोग भोगले

जे वाट्याला आले

जाते वेळी हाती उरला

फक्त उतारा कोरा

 

आयुष्याच्या आरशातली

छबी निरखता कळले

अंधुक होते प्रतिमा तेव्हा

उडून जातो पारा

 

खरी स्थिरता होती कोठे

सतत धावणे झाले

रोज नव्याने खेळ रंगला

अद्भुत न्यारा न्यारा

 

कोणासाठी जीव जाळणे

कमी आले नाही

जो तो दिसला वरवरचा अन्

संपूरन गेला तोरा

 

ताळमेळ या आयुष्याच्या

 बसला नाही काही

 कुंडलीतल्या ग्रहमानाचा

 फसला नव्हता होरा

 

जन्म मरण तर अचूक येथे

जाता येता घडते

चिंता कसली करायची मग

मारत राहू चकरा

 

काय खरे अन् खोटे कुठले

कळले नाही काही

भ्रामकतेच्या प्रतिमांचा पण

नाही चुकला मारा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 152 ☆ हास्य कविता, जाडू बाई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 152 ? 

☆ हास्य कविता, जाडू बाई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

 बालपण आठवलं मला

मला माझी शाळा आठवली

शाळेजवळची जाडूबाई

डोळ्यासमोर तरळली…०१

 

शाळेत जायच्या रस्त्यावर

घर होते जाडूबाईचे

अवजड प्रचंड होती ती

सखुबाई नाव तिचे…०२

 

ठेगणी होती खूपच

दिसायला सुद्धा सावळी

आरडायची, ओरडायची

जशी वाघिणीची डरकाळी…०३

 

पोरं तिला चिडवायचे

जाडी जाडी म्हणायचे

ती मागे लागताच मग

लगेच पळून जायचे…०४

 

तिला पाहून खरेच हो

हसायला खूप यायचे

चेष्टा तिची करतांना

हसून हसून पोट दुखायचे…०५

 

होती मात्र खूप प्रेमळ

बोरं, चिंचा खायला द्यायची

तहान लागली उन्हाळ्यात

थंड थंड, पाणी पाजायची…०६

 

आम्ही थोडे मोठे झालो

पश्चाताप आम्हाला झाला

तिची चेष्टा न करण्याचा

संकल्प आम्ही केला…०७

 

सखुबाई आम्हाला बोलायची

मोकळी मुक्त, सहज हसायची

मला जाडी म्हणा रे सर्वजण

स्वतःच निर्भेळ, ठुमकायची…०८

 

एक शिकायला मिळाले

दोष कुणाला न द्यावा

ईश्वराची निर्मिती सर्व

सन्मान सर्वांचाच करावा…०९

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेम रंग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 💃 प्रेम रंग ! 🩷 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

उभी होते आरश्या समोरी

घालण्या दुपेडी छान वेणी,

लक्ष जाता चेहऱ्याकडे

हातून निसटे माझ्या फणी!

खेळले धुळवड सख्यासवे

घरच्यांच्या चुकवून नयना,

पण रंग गुलाबी गालावरला

हसून दावी खट्याळ आयना!

प्रेम रंग तो गालावरला

घात करणार आज बहुदा,

विचार करू लागे मन

टाळू कशी मी ही आपदा!

हपका हलकेच जलाचा

मारला मी जरी मुखावरी,

नांव घेईना प्रेम रंग तो

होण्या गालावरूनी फरारी!

निरखून बघता प्रेम रंगा

झाला माझा मला उलगडा,

आठवून पंचमीचा रासरंग

पडे गाली प्रेम रंगाचा सडा!

पडे गाली प्रेम रंगाचा सडा!

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “चांद उगवला आणि…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चांद उगवला आणि…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

चांद उगवला 

वरती आला

शितल दुधाळ

प्रकाश पडला

तो अवचित 

बाहेरी आला

शितल प्रकाश

भूलवी मनाला

त्याने  प्रियेला

साद घातली 

आले म्हणतच

धावत  आली

 तो नभीचा चंद्र 

 अन हा माझा

 म्हणता त्याने

 चक्क  लाजली

 रोखून  बघता

 मुखास त्याने

 लाजून बाहूवर

मान टेकली

 आगळेच हे

युगुल पाहूनी

 चांदणे उतरून

 आले खाली

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याची उतरंड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ आयुष्याची उतरंड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे,या कार्यक्रमात सादर केलेली माझी कविता : ” आयुष्याची उतरंड)

   आयुष्याच्या उतरंडी मधली,

   किती गाडगी मडकी उरली !

   मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने ,

   कशी रचली अन्  किती दिली!

 

    जन्माला येतानाच मृत्तिका ,

    घेऊन आली तिचे काही गुण!

     फिरता गारा चाकावरती,

     आकारास येई तिचे हे रांजण !

 

    आयुष्याच्या भट्टीमध्ये ,

    भाजून निघते प्रत्येक मडके !

    असेल जरी ते मनाजोगते ,

     कधी लहान तर कधी मोठे !

 

    मंद आचे ही आता होई,

    वाटे शांत होईल ही भट्टी !

    एक एक मडके सरतची जाई,

    हाती राहील त्याची गट्टी !

 

   नकळत कधीतरी संपून जाईल,

    उरात भरली ही आग !

   शांत मनासह निघून जाईल,

    मडक्यांची ही सारी रांग !

 

   बनले मडके ज्या मातीचे,

    त्यातच तिचा असेल शेवट !

   मिसळून जाईल मातीत माती,

     ती तर असेल ‘त्याचीच’ भेट !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 179 – जगण्याचे बळ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 179 – जगण्याचे बळ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

जगण्याचे बळ

माऊलीची माया।

तप्त जीवनात

पिता छत्र छाया।

 

साजनाची साथ

सहजीवनात।

जगण्याचे बळ

विश्वासाचा हात।

 

पाडस धरीते

विश्वासाने बोट।

त्याच्या स्वप्नापुढे

सारं जग छोटं।

 

लाखो संकटांचा

दाटता अंधार।

आशेचा किरण

मनाला आधार।

 

जीवनी संघर्ष 

लागे नित्य झळ।

प्रेम,आशा, स्फूर्ती

जगण्याचे बळ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रस्त्याचे मनोगत ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ रस्त्याचे मनोगत… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

सपाट, सुंदर, नीट-नेटके रूप आमुचे होते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||धृ. ||

तुम्ही तुडवावे, आम्ही सोसावे, ब्र न काढिला कधीही

विस्कळीत, विकलांग जाहलो, केवळ तुमच्या पायी

भरणही नाही, पोषण नाही, बघत राहता नुसते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||१||

खडी पसाभर, सिमेंट चिमूटभर, वरवर भुरभुरता

समजूत काढावयास हलका रोलर फिरविता

आज बुजविले, उद्या उखडले, शासन डोळे मिटते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||२||

रेल्वे स्थानक वा बस डेपो, तुम्हास गाठून देतो

खेड्यामधुनी शहरामध्ये आम्हीच की पोहचवितो

कृतघ्न होऊन कसे विसरला, अपुले अतुट नाते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||३||

धिक्कार असो की प्रकरण अपुले कोर्टामधी जाते

कृध्द होऊनी न्यायदेवता, तुम्हास फटकारिते

फसवी आश्वासने ऐकूनी, मन आक्रंदून उठते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||४||

आमची दुर्दशा, तुम्हास बाधा, जाणून घ्या धोके

अगणित हिसके, कंबर लचके, ढासळती मणके

स्पष्ट बोलतो, राग नसावा, येतो आता नमस्ते

खड्ड्यामध्ये आता राहतो, नाव आमुचे रस्ते ||५||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #199 ☆ वादळातील दीपस्तंभ तू….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 199 – विजय साहित्य ?

☆ वादळातील दीपस्तंभ तू…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

हे भीमराया गाऊ किती रे

तुझ्या यशाचे गान

जगण्यासाठी दिले आम्हाला

अभिनव संविधान… !

 

तूच घडवले  भीमसैनिका

जगती केले रे बलवान

शिका लढा नी संघटीत व्हा

जपला  स्वाभिमान…. !

 

माणूस होतो माणूस राहू

जातीभेदा नाही स्थान

ज्ञानी होऊ ज्ञान मिळवुनी

घडवू देश महान…. !

 

शिक्षण घेऊन झाला ज्ञानी

दिलेस आम्हा धम्माचे वरदान

प्रज्ञा, शील आणि करूणा

जीवनज्योत प्रमाण .. !

 

वादळातील दीपस्तंभ तू

चवदार तळ्याची आण

तुझ्या रूपाने पुन्हा मिळाला

जीवनी हा सन्मान…. !

 

चंद्र, सूर्य, जोवरी अंबरी

आम्हा तुझा  अभिमान

निळ्या नभाचे छत्र आमुचे

तू जगताची शान… !

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ताळेबंद… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ ताळेबंद… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

प्रतिसाद नसता,

थिजल्या हाका.

शब्द थबकला,

ओठावरचा.

बाष्प धुक्याचे,

चष्म्यावरचे.

हिशोब देती,

आयुष्याचा.

थंडीची मग,

नोंद निरर्थक .

थेंब गोठवीत,

पापणीतला.

स्मरणावरती,

हिम साचावे.

असा हिवाळा,

काळजातला.

संध्याछाया,

आता मांडती.

ताळेबंदच की,

सुखदुःखाचा.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ऊसतोड सखी ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “ऊसतोड सखी…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

गारठल्या रात्रीला । स्वेटरची साथ होती.

गरम जेवण उरकून । बेडवर गेली झोपी

मधाळ स्वप्नी रमता । पहाट प्रहर आली

घुंगरु निनादाने । नकळत जागी झाली

हळूच उठून मग  । खिडकीपाशी गेली

ऊसतोड सखी । बैलगाडीत दिसली.

फाटलेले पातळ । गारठा झेलत होती

अंग दूमडून । थंडीशी झुंजत होती.

वाळलेला देह तिचा । चेहरा काळवंडला 

कडब्यासम शरीर । नवजात चिकटलेला

स्तनाग्र चोकत शिशू । निपचित पडलेला

दूध कसे पुरेल । आईचा देह वटलेला 

ती सद्गदित होते । गाडी धुक्यात हरवते.

खिडकीतून गजाआड । वाकून पाहाते.

अस्वस्थ होऊन । पुन्हा पलंगावर येते

पांघरुणात शिरताना । रडवेली होते.

“थोडं झोप” म्हणत । पती कुस बदलतो

 मिठित शिरुन । बोचरी थंडी अनुभतो.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print