मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठांशी कसे वर्तणे…… ☆ सुश्री मेधा सिधये ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठांशी कसे वर्तणे…… ☆ सुश्री मेधा सिधये ☆

श्री समर्थ रामदास स्वामींची क्षमा मागून ज्येष्ठांशी कैसे वर्तणें।

ज्येष्ठांशी कैसे चालणें तें युवकें जाणोनि घेणे। नीटपणे।।

ज्येष्ठ असती बालकासम। मनें निर्मळे निष्पाप।

जग वाटे शुद्ध नगर। शिवसुंदराचे माहेरघर।।

देह असती थकलेले। मन मृदुमवाळ फुलपांकळे।

जाणौनि असावे पुत्रपौत्रे। ढका लावो नये कठोर वाचे।।

ज्येष्ठांसंगे चालावे मंदगती। फरफट करू नये कधी।

पाऊले असती श्रमलेली। जीवनवाट तुडवोनी।।

आहार द्यावा सात्विक। ताजा, गरम, सुग्रास।

चित्त त्यांचे व्हावे प्रसन्न। भोजनथाळी देखोनिया।।

दवापाणी वेळे द्यावे। खर्चवेंच जिव्हे न काढावे।

प्रेम माया सुखवी जीव। याचे स्मरण राखावे।।

ज्येष्ठ मने अति कांतर। जिवाची होय थरथर।

मंद ज्योत वार्‍यासवें। जेवीं थरथरे।।

आपुल्या संसारचिंता। ज्येष्ठां सांगो नये वृथा।

प्रेमभरले अश्राप जीव। असती असहाय, अगतिक।।

देह थकले, मन थकले। कार्यशक्ती उणावली।

जगणे केवळ साक्षीभूत। कसली आस न उरली।।

ज्येष्ठां द्यावा उत्साह, आनंद।उरल्या दिनीं समाधान।।

हे वागणें तुम्हां पुण्यप्रद। इयें जीवनीं।।

नसता ‘ अर्थ’ ज्येष्ठांपासीं। रचो नये अपमानाच्या राशी।

उभे आयुष्य आहे समोरी। तुमच्या, पैका मिळवावया।।

जें जें साधलें तें तें त्यांनी केले। जीव वोवाळिला तुमच्यासाठी।

स्मरण तयाचे राखावे ह्रदयीं। तारुण्याचा मद न करावा।।

अहंकार,क्रोध मोठेच रिपू। त्यांना बाळगू नये जवळी कदापीहि।

एक उणा शब्द करी रक्तबंबाळ मन। संध्यावेळीं तयां जराही न साहवे।।

ज्येष्ठही होते कष्टाळू, कर्तृत्ववान। संसारनौकेचे कप्तान।

म्हणौनि सेवाभाव, कृतज्ञता। सदैव चित्ती राखणें।।

ज्येष्ठांचे आशीष ईश्वरी प्रसाद। त्यास डावलू नये वांकुड्या वर्तनें।।

चूकभुलीं व्हावे सानुलें लेकरूं। लाजो नये कधी क्षमायाचने।।

ज्येष्ठांसंगे तुमचे वर्तन। खरी समजशक्तीची पारख।

शिक्षणाचा अर्क । तोचि होय।।

© सुश्री मेधा सिधये

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक झाड गुलमोहोराचं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ एक झाड गुलमोहोराचं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

गुलमोहोराचं एक झाड असतं प्रत्येकाच्या घरात

आपण मात्र शोधत बसतो जाऊन दूर रानावनात

पहाल तेव्हा डवरलेली ,  चैतन्याने बहरलेली

सकाळपासून रात्री पर्यंत कायम असते फुललेली

वाढतो आपण तिच्याच सावलीत गोळा करत पाकळ्या

ती नेहमीच जपत असते फुलं आणि कळ्या

सारं कसं निसर्गाच्या नियमानुसार चाललेलं

मी नाही पाहिलं कधी गुलमोहोराला वठलेलं

दिसताच क्षणी तिच्याकडे आम्ही जातो आपोआप

आपण कसेही वागलो तरी तिच्या मनात नसते पाप.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरोबरी नको… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ बरोबरी नको… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

तू कोणाशी बरोबरी करु नकोस,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जन्मदात्री, तू संगोपन करणारी

तू शेतीचा शोध लावणारी

त्यागाची परिभाषा तू

सती जाणारी ही तूच

युद्धापेक्षा बुद्ध मानणारी तू

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जिजाऊ, तू सावित्री

तू झाशीची राणी, तू रणरागीणी

तू इंदिरा, तू कल्पना चावला,

अनेक रुपात, अनेक क्षेत्रात

पाय रोवून उभी आहेस तू,

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू सुंदर आहेस, कर्तृत्वान आहेस

चेहऱ्याला लेप लावून सजवू नकोस

तू नितळ, निर्मळ, प्रेमळ, आहेस

तू निधर्मी व विज्ञानवादी हो

तू दैववादात अडकू नकोस,

प्रयत्नवाद कधी सोडू नकोस

तूच कुटुंबाचा गाभा आहेस..

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तुला कुणी विकू नये.

तुला कुणी विकत घेऊ नये..

अशी आईच्या हृदयाची माणसं

तूच घडवू शकतेस..

बलात्कार, अन्याय, अत्याचार तू

स्वतःच थांबवू शकतेस…

तू सर्व सामर्थ्याने पेटून उठू शकतेस

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #151 ☆ नरहरी दास…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 151 ☆ नरहरी दास…! ☆ श्री सुजित कदम

विश्व कर्मा ब्राह्मणात

जन्मा आले नरहरी

वंश परंपरा थोर

श्रद्धा भक्ती परोपरी..! १

 

कर्ते मुरारी अच्युत    

आणि कृष्णदास हरी

पणजोबा आजोबांची

कृपादृष्टी सर्वांवरी…..! २

 

सोनाराच्या व्ववसायी

पारंगत नरहरी

मुळ नाव महामुनी

शैव उपासना करी….! ३

 

संत नरहरी यांसी

जाहलासे साक्षात्कार

शिव विठ्ठल एकच

ईशकृपा चमत्कार….! ४

 

पांडुरंग परमात्मा

तोच शिव भगवान

नरहरी सोनारांस

प्राप्त झाले दिव्य ज्ञान. ५

 

शैव वैष्णवांचा  त्यांनी

दूर केला विसंवाद

अध्यात्मिक अभंगाने

नित्य साधला संवाद .. !  ६

 

शतकात  चौदाव्या त्या

शिवभक्ती आचरीली

संसारीक कार्य सिद्धी

सदाचारे स्विकारीली…! ७

 

उदावंत कुलातील 

शिवभक्त चराचरी

संकीर्तनी असे दंग

अहोरात्र नरहरी…! ८

 

असे कुशल सोनार        

 निर्मीतसे अलंकार

हरी आणि हर दोघे

परब्रम्ह अवतार….! ९

 

शिव पिंडीमध्ये पाही

विठ्ठलाचे निजरुप

वैष्णवांचा दास सांगे

हरीहर एकरुप…! १०

 

एका सोनसाखळीने

घडविला चमत्कार

पाही रूप नरहरी

शिव पांडुरंगा कार…! ११

 

समरसतेचा पंथ

नाही मनी कामक्रोध

केला प्रचार प्रसार

भक्ती मार्ग नितीबोध…! १२

 

केली प्रपंचात भक्ती

अक्षरांत विठू माया

अभंगात गुंफीयली

दैवी हरीहर छाया…! १३

 

ज्ञानयोगी कर्मयोगी

नऊ दशके प्रवास

सुवर्णाचे अलंकार

अनुभवी शब्द खास…! १४

 

माघ कृष्ण तृतीयेला

पुण्यतिथी महोत्सव

हरिऐक्य दिन जगी

सौख्य शांतीचा उत्सव…! १५

 

पंढरीत महाद्वारी

समाधिस्थ नरहरी

नोंद भक्ती भावनांची

अभंगात दिगंतरी…! १६

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – प्रवास स्त्री – जीवनाचा ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ प्रवास स्त्री – जीवनाचा ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शतकानुशतकांचा होता स्त्रीस बंदिवास !

स्त्री मुक्तीचा तिने घेतला सतत ध्यास !

घेऊ लागली आता जरा मोकळा श्वास !

उपभोगीत आहे स्त्री म्हणून मुक्त वास!

 

स्त्री आणि पुरुष निर्मिले त्या ब्रह्माने !

विभागून दिली कामे  त्यास अनुरूपतेने!

जनन संगोपन यांचे दायित्व दिले स्त्री ला!

आधार पोषणाचे कार्य मिळे पुरुषाला !

 

काळ बदलला अन् पुरुषी अहंकार वाढला!

पुरुष सत्तेचा जुलूम जगी दिसू लागला !

स्त्री अबला म्हणून जनी मान्य झाली!

अगतिक  दासी म्हणून संसारी ती जगली !

 

स्त्री शिक्षणाचा ओघ जगी या आला!

स्त्री चा चौफेर वावर जनी वाढला!

चिकाटी, संयम जन्मजात लेणे तिचे !

चहू अंगाने बहरले व्यक्तिमत्व स्त्रीचे !

 

सर्व क्षेत्रात मान्य झाली स्त्री पुरुष बरोबरी !

दोन पावले पुढेच गेली पण नारी!

न करी कधी ती कर्तव्यात कसूर !

जीवन जगण्याचा मिळाला तिलाच सूर!

 

स्त्री आणि पुरुष दोन चाके संसाराची !

समान असता वेगेची धाव घेती !

एकमेकास पूरक राहुनी आज संसारी!

दोघेही प्रयत्ने उंच नभी घेती भरारी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 172 ☆ होली पर्व विशेष – रंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 172 ?

💥 होली पर्व विशेष – रंग… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

आजकाल रंग बोलतात माझ्याशी,

गुलाबाचा केशरी मला

खूप आवडतो

खुडताना तीच ती,

काट्याची गोष्ट सांगतो!

मोग-याला माळून होताच

गंधधुंद,

शुभ्र रंग सात्विकतेची

आठवण करून देतो !

प्रत्येक झाड नेहमीच

प्रेमाने साद घालते,

सावलीतली हिरवाई

खूप काही बोलत रहाते !

सृष्टीतील सप्तरंग,

चमकतात तनामनातून…

रंग पंचमी साजरी होतच असते

शब्दा शब्दातून!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ जागर… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ जागर… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

शिक्षण घेऊन सर करूया प्रगतीची शिखरे ll

ज्ञानबळावर घेऊ भरारी होऊ स्वच्छंदी पाखरे ll

 

शिक्षणाची ढाल सदैव पाठीशी ठेवुनी ll

ज्ञानाच्या तलवारी तळपवू होऊ रणरागिणी ll

 

कोमलता नाजूकता भीती बनवू कणखर ll

संकटांशी टक्कर देण्याचा करू निर्धार ll

 

आत्मविश्वासाची चमक साठवू इवल्या डोळ्यात ll

स्वप्नांची पूर्तता जरी खडतर कर्तव्यात ll

 

अनिष्ट रूढी अज्ञानाचा विळखा मोडून काढू ll

सामाजिक न्यायासाठी उभा लढा आपण देवू ll

 

आधुनिक जरी जपू वंदनीय परंपरा संस्कृती ll

उघडून टाकू निर्भया भ्रूण हत्येच्या विकृती ll

 

एक एक पाऊल टाकू उदात्त कर्माकडे ll

स्त्री शक्तीचा जागर बघा दुमदुमतो चोहीकडे ll

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खरी धुळवड !… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? खरी धुळवड !… ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

नाते तुटले जन्माचे

साऱ्या खऱ्या रंगांशी,

डोळ्यांसमोर कायम

काळी पोकळी नकोशी !

काया दिली धडधाकट

पण नयनांपुढे अंधार,

समान सारे सप्तरंग

मनांत रंगवतो विचार !

तरी खेळतो धुळवड

चेहरा हसरा ठेवुनी,

दोष न देता नजरेला

लपवून आतले पाणी !

छायाचित्र – शिरीष कुलकर्णी, कुर्ला.

© श्री प्रमोद वामन वर्तक

०७-०३-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सप्तरंग ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

💐 सप्तरंग 💐 सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(होळीच्या सर्व रसिकांना शुभेच्छा)

कुवासनेची करुनी होळी

दुर्गुणांची ही इंधन मोळी

मानवतेचे चंदन भाळी

उधळवु सप्तरंग आभाळी

 

अंहकारा देऊ मुठमाती

षडविकारा वीर जिंकती

समतेचे झेंडे फडकती

तेथे प्रेमरंग उधळती

 

सप्तरंग प्रतीक असता

संयम,शांती. मिळे शुचिता

सद्भभावनामय ज्याची कांती

रंग धुळवडी जाते भ्रांती

 

दुर्वासना विषाचे दहन

विषयांचे करु उच्चाटन

पर्व पहा प्रकाश पावन

श्रीरंगातच उजळू जीवन ☘️

© सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #178 ☆ भावनांचा रंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 178 ?

भावनांचा रंग… ☆

भावनांचा रंग आहे वेगळा

ओठ माझा त्यास वाटे जांभळा

 

डाग नाही एकही अंगावरी

टाकुनी तो रंग झाला मोकळा

 

काय सांगू मी घरी सांगा मला

खंत नाही त्यास तो तर बावळा

 

पेटते होळी तशी देहातही

साजरा दोघे करूया सोहळा

 

धूळ माती फासली अंगास तू

रंग गोरा जाहला बघ सावळा

 

आग आकाशात होती पोचली

पाहिलेला सोहळा मी आगळा

 

शांत झाली आग आहे कालची

लाकडांचा फक्त दिसतो सापळा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print