मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ अथ देवीस्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ अथ देवीस्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

।। अथ देवीस्तोत्रम् ।।

श्री भगवानुवाच: 

नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नम: ।

कल्याण्यै कामदायै च वृद्धयै सिद्धयै नमो नम: ।।१॥

*

सच्चिदानन्दरूपिण्यै संसारारणयै नम: ।

सच्चिदानंदरूपी भवसागरतारिणी नमन ।।२॥

*

सर्वाधिष्ठानरूपायै कूटस्थायै नमो नम: ।

अर्धमात्रार्थभूतायै हृल्लेखायै नमो नम: ।।३॥

*

ज्ञातं मयाsखिलमिदं त्वयि सन्निविष्टं ।

त्वत्तोsस्य सम्भवलयावपि मातरद्य ।

शक्तिश्च तेsस्य करणे विततप्रभावा ।

ज्ञाताsधुना सकललोकमयीति नूनम् ।।४॥

*

विस्तार्य सर्वमखिलं सदसद्विकारं ।

सन्दर्शयस्यविकलं पुरुषाय काले ।

तत्त्वैश्च षोडशभिरेव च सप्तभिश्च ।

भासीन्द्रजालमिव न: किल रंजनाय ।।५॥

*

न त्वामृते किमपि वस्तुगतं विभाति ।

व्याप्यैव सर्वमखिलं त्वमवस्थिताsसि ।

शक्तिं विना व्यवहृतो पुरुषोsप्यशक्तो ।

बम्भण्यते जननि बुद्धिमता जनेन ।।६॥

*

प्रीणासि विश्वमखिलं सततं प्रभावै: ।

स्वैस्तेजसा च सकलं प्रकटीकरोषि ।

अस्त्येव देवि तरसा किल कल्पकाले ।

को वेद देवि चरितं तव वैभवस्य ।।७॥

*

त्राता वयं जननि ते मधुकैटभाभ्यां ।

लोकाश्च ते सुवितता: खलु दर्शिता वै ।

नीता: सुखस्य भवने परमां च कोटिं ।

यद्दर्शनं तव भवानि महाप्रभावम् ।।८॥

*

नाहं भवो न च विरिञ्चि विवेद मात: ।

कोsन्यो हि वेत्ति चरितं तव दुर्विभाव्यम् ।

कानीह सन्ति भुवनानि महाप्रभावे ।

ह्यस्मिन्भवानि रचिते रचनाकलापे ।।९॥

*

अस्माभिरत्र भुवे हरिरन्य एव ।

दृष्ट: शिव: कमलज: प्रथितप्रभाव: ।

अन्येषु देवि भुवनेषु न सन्ति किं ते ।

किं विद्य देवि विततं तव सुप्रभावम् ।।१०॥

*

याचेsम्ब तेsड़्घ्रिकमलं प्रणिपत्य कामं ।

चित्ते सदा वसतु रूपमिदं तवैतत् ।

नामापि वक्त्रकुहरे सततं तवैव ।

संदर्शनं तव पदाम्बुजयो: सदैव ।।११॥

*

भृत्योsयमस्ति सततं मयि भावनीयं ।

त्वां स्वामिनीति मनसा ननु चिन्तयामि ।

एषाssवयोरविरता किल देवि भूया- ।

द्वयाप्ति: सदैव जननीसुतयोरिवार्ये ।।१२॥

*

त्वं वेत्सि सर्वमखिलं भुवनप्रपंचं ।

सर्वज्ञता परिसमाप्तिनितान्तभूमि: ।

किं पामरेण जगदम्ब निवेदनीयं ।

यद्युक्तमाचर भवानि तवेंगितं स्यात् ।।१३॥

*

ब्रह्मा सृजत्यवति विष्णुरुमापतिश्च ।

संहारकारक इयं तु जने प्रसिद्धि: ।

किं सत्यमेतदपि देवि तवेच्छया वै ।

कर्तुं क्षमा वयमजे तव शक्तियुक्ता: ।।१४॥

*

धात्री धराधरसुते न जगद् बिभर्ति ।

आधारशक्तिरखिलं तव वै बिभर्ति ।

सूर्योsपि भाति वरदे प्रभया युतस्ते ।

त्वं सर्वमेतदखिलं विरजा विभासि ।।१५॥

*

ब्रह्माsहमीश्वरवर: किल ते प्रभावा-।

त्सर्वे वयं जनियुता न यदा तु नित्या: ।

केsन्ये सुरा: शतमखप्रमुखाश्च नित्या ।

नित्या त्वमेव जननी प्रकृति: पुराणा ।।१६॥

*

त्वं चेद्भवानि दयसे पुरुषं पुराणं ।

जानेsहमद्य तव सन्निधिग: सदैव ।

नोचेदहं विभुरनादिरनीह ईशो ।

विश्वात्मधीरति तम:प्रक्रति: सदैव ।।१७॥

*

विद्या त्वमेव ननु बुद्धिमतां नराणां ।

शक्तिस्त्वमेव किल शक्तिमतां सदैव ।

त्वं कीर्तिकान्तिकमलामलतुष्टिरूपा ।

मुक्तिप्रदा विरतिरेव मनुष्यलोके ।।१८॥

*

गायत्र्यसि प्रथमवेदकला त्वमेव ।

स्वाहा स्वधा भगवती सगुणार्धमात्रा ।

आम्नाय एव विहितो निगमो भवत्या ।

संजीवनाय सततं सुरपूर्वजानाम् ।।१९॥

*

मोक्षार्थमेव रचयस्यखिलं प्रपंचं ।

तेषां गता: खलु यतो ननु जीवभाम् । 

अंशा अनादिनिधनस्य किलानघस्य ।

पूर्णार्णवस्य वितता हि यथा तरंगा: ।।२०॥

*

जीवो यदा तु परिवेत्ति तवैव कृत्यं ।

त्वं संहरस्यखिलमेतदिति प्रसिद्धम् ।

नाट्यं नटेन रचितं वितथेsन्तरंगे ।

कार्ये कृते विरमसे प्रथितप्रभावा ।।२१॥

*

त्राता त्वमेव मम मोहमयाद्भवाब्धे- ।

स्त्वामम्बिके सततमेमि महार्तिदे च ।

रागादिभिर्विरचिते वितथे किलान्ते ।

मामेव पाहि बहुदु:खकरे च काले ।।२२॥

*

नमो देवि महाविद्ये नमामि चरणौ तव ।

सदा ज्ञानप्रकाशं मे देहि सर्वार्थदे शिवे ।।२३॥

*
।। इति श्रीमद्देवीभागवते महापुराणे तृतीयस्कन्धे विष्णुना कृतं देवीस्तोत्रं ।।

☆
☆ मराठी भावानुवाद ☆

*
कथित श्रीभगवान

विधात्री देवी प्रकृतीला माझे सदैव नमन

कामना शुभदायिनी वृद्धी-सिद्धीदात्री नमन ॥१॥

*

सच्चिदानंदरूपी संसारार्णवतारिणी नमन

सच्चिदानंदरूपी भवसागरतारिणी नमन ॥२॥

*

सकलाधिष्ठानरूपिणी अविकारी नमन

अर्धमात्रास्थ हृदये लिखित नमो नमन ॥३॥

*

ज्ञात मला संचार तुझा स्वैर समस्त जगती

विश्वाच्या माते तूच उत्पत्ती लय तथा स्थिती 

विश्वरचनेची अतिप्रभावी महान तव शक्ती

तव कारणे विश्व ज्ञात सर्वलोके तव व्याप्ती ॥४॥

*

सदसद्विकारे विस्तारिले तू या जगतासी

अविकल दर्शन देशी कालासंगे पुरुषासी

षोडश तत्वे सप्तविकारे प्रतीत तव शक्ती

चंद्र चांदणे इंद्रजालसम रंजवीते तव शक्ती ॥५॥

*

तुझ्याविना साक्षात न होई काही जगतात

तव शक्तीने व्यापियलेले समस्त हे जगत

शक्तिविना तव शक्तीहीन पुरुषकार्य व्यर्थ 

मेधावी पंडीत करिती स्तवन तुझे सार्थ ॥६॥

*

अपुल्या प्रभावे जगता सदैव प्रसन्नता देशी

अपुल्या तेजे समस्त जगता तूचि प्रकट करीशी

कल्पकालेही तव शक्ती अविचल शाश्वत नित्य

तव वैभव चरित देवी कोण्या वेदा नाही ज्ञात ॥७॥

*

संरक्षिलेस आम्हा मधुकैटभासुरांपासुन

सक्षम केले सकलांसी तव कृपेचे दर्पण

सुखानुभूती अनुभुती माते परम कोटी देशी

दर्शन देउन महाप्रभावी भवानी धन्य करिशी ॥८॥

*

मी न ब्रह्मा विष्णु महेश मी तव केवळ पुत्र

कोणा न ज्ञात तव अगाध अनाकलनीय चरित्र

महाप्रभावे तव त्रिभुवनांचे अस्तित्व जागृत

भवानी देवी सृष्टी ही तू कलात्मकतेने रचित ॥९॥

*

हरीविना अमुचा कोणी रक्षणकर्ता नाही अन्य

महिमा तव कीर्ति ब्रह्माची थोर झाले शिवदर्शन

तुझ्यासारखे गुण हे देवी नाही दुजा कोणात

थोरवी तुझी कोणी ना जाणे मतीच्याही अतीत ॥१०॥

*

मनोकामना पूर्ण करावी तव चरणी नमन

तव रूपाचा वास असावा धन्य होउ दे मन

अखंड हृद्गुंफेतुनिया मम असो नाम वास 

सदैव दर्शन तव चरणांचे हीच मनी आंस ॥११॥

*

सेवक मी तर तुझाच असु दे मनी तुझी भक्ती

तूच स्वामिनी तुझेच केवळ स्मरण माझिया चित्ती 

तुझे जागरण अंतर्यामी माझ्या हेचि नित्य कर्म

पुत्र तुझा मी मातपिता सेवा हाच असो धर्म ॥१२॥

*

संसारातील प्रपंच सारा तुला पूर्ण ज्ञात 

असीम सर्वज्ञता तुझी गे तुझे ज्ञान अनंत

म्या पामरे श्रीजगन्माते काय तुला मागावे

पालन तव आज्ञेचे करिता जीवन मंगल व्हावे॥१३॥

*

ब्रह्मा उत्पत्ती विष्णु स्थिती उमापती विनाशक

समस्त जगताला ज्ञात तव शक्ती संहारक

तव इच्छेनेच होते नियंत्रण अखिल जगताचे 

सक्षम आम्ही सामर्थ्य अम्हा वरदान तुझ्या कृपेचे ॥१४॥

*

धराधरसुते धारण करिशी समस्त जगताला

तव शक्ती अखिल जगता आधार धारण्याला 

तव शक्तीने भास्कराची प्रभा उजळते जगताला

तव शक्तीवर अवलंबुन विश्व प्रकाशित व्हायाला ॥१५॥

*

विरंची नारायण महादेव तुझिया अंकित असती

समस्त जीव तुझीच सृष्टी तूच राखिशी स्थिती

देवेंद्र देवता असुरांना नित्य राखिते तव शक्ती

तुझ्या कारणे हे जननी प्राचीन जाहली सृष्टी ॥१६॥

*

करुणेने तव प्राचीनत्व प्राप्त होतसे पुरुषाला

अस्तित्व तुझे माझ्या ठायी तव सन्निध मी ज्ञात मला

कृपेविना तव ईशा अनंत विभु ना निरंकार ना मी

तुझ्या प्रभावे अज्ञाना हटवुन विश्वात्म्या जाणितो मी ॥१७॥

*

बुद्धिवंत मानवास कृपेने तुझ्या प्राप्त विद्या ज्ञान

बलवंतांना तुझ्या प्रभावे प्राप्त होई शक्तीचे दान

कीर्ति कांती निर्मल तुझी रूप तसेच तुष्टी

तुझ्या कृपेने वैराग्याने मनुष्यलोकातुन मुक्ती ॥१८॥

*

वेदांची प्रथम कला गायत्री मंत्र तूच असशी

स्वाहा तूचि स्वधा तूचि सगुण अर्धमात्राअसशी

निर्धारित वेदार्थ प्रकटला तुझियाची प्रभावे

पूर्वजांना देवतांना संजीवन प्राप्त तुझ्या प्रभावे ॥१९॥

*

रचिलीस अखिल सृष्टी मोक्ष व्हावा सर्वा प्राप्त

जीवनयात्रेचा प्रारंभ जेथ तेथे तव ऊर्जेचा स्रोत

ऊर्जा तव अंश ब्रह्माचा पावन अनादि अनंत 

सागर लाटांसम व्याप्ती तव ऊर्जेची विश्वात ॥२०॥

*

जीवा लाभता तव सामर्थ्य जीवनाचे कर्म

सकला ज्ञात तव शक्तीने सृष्टीसंहार तव वर्म

सृष्टीनाट्य रचियले नटाने अंतरंगे भावव्यथित 

विराम प्रभावा पूर्ती होता कार्याची विहित ॥२१॥

*

मोहार्णवात जीवनाच्या या तुझाच तारक हात

शरण तुला मी अंबिके जीवनक्लेश तू निवारत

तुझ्यामुळेच शांती रागद्वेषादि विकारी मनास

दुःखकारी जीवनी अमुचे तूचि रक्षण करावेस ॥२२॥

*
नमन देवी महाविद्ये तव चरणांसी अर्पण नमन

शिवे सकलार्थदे सर्वदा ज्ञानप्रकाश करी प्रदान ॥२३॥

*
।। इति श्रीमद्देवीभागवते महापुराणे तृतीयस्कन्धे विष्णु कृत निशिकान्त भावानुवादित देवीस्तोत्रं संपूर्ण।।

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आजच्या चौथ्या भागात मळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेने जाणाऱ्या दुर्गा, नव्या पिढीच्या वाटसरु ठरतील.

१) स्नेहा पार्थिवराजा

वेल्लोर येथील ३५ वर्षीय वकील स्नेहा पार्थिवराजा ‘धर्म नाही, जात नाही’ असे अधिकृत प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

स्नेहा ही तिरुपत्तूर येथील एक वकील, कार्यकर्त्या व एक प्रेरणादायी व्यक्ती आहे, जिच्या शब्दांनी  श्रोते मंत्रमुग्ध होतात. वर्ण व्यवस्थेच्या अविवेकीपणाविरुद्ध तिचे प्रभावी युक्तिवाद, सामाजिक न्यायाप्रती तिची अढळ वचनबद्धता दिसते. ती एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते, “आपल्या धार्मिक ओळखी किंवा जातीने आपण का स्वतःला परिभाषित केले पाहिजे? आपण फक्त अभिमानी भारतीय असू शकत नाही का?” सरकार कास्ट सर्टिफिकेट देऊ शकतं, पण ‘नो कास्ट’ सर्टिफिकेट नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. अखेर फेब्रुवारी २०१९ रोजी  बहुप्रतिक्षित ‘नो कास्ट नो रिलिजन’ प्रमाणपत्र मिळालं. त्यासाठी स्नेहाला ९ वर्षांची न्यायालयीन लढाई लढावी लागली.

२) अनुप्रिया लाक्रा 

आकाशाला स्पर्श करण्याच्या तिच्या स्वप्नामुळे ओडिशाच्या माओवादग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेला मागास प्रदेशातील पहिली महिला वैमानिक बनण्याची संधी मिळाली आहे.

तेवीस वर्षीय अनुप्रिया लाक्रा हिचे पायलट होण्याचे स्वप्न सात वर्षांनी पूर्ण झाले. तिने २०१२ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून एका विमान अकादमीत प्रवेश घेतला. आणि 

आदिवासी बहुल जिल्ह्यातील ही महिला एका खाजगी विमान कंपनीत सह-पायलट म्हणून रुजू होण्यास सज्ज झाली .

३) सुरेखा यादव

सुरेखाचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे सोनाबाई आणि रामचंद्र भोसले यांच्या पोटी झाला. तिचे वडील स्वर्गीय रामचंद्र भोसले शेतकरी होते. तिचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने सातारा जिल्ह्यातील कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. भारतीय रेल्वेत नोकरीची संधी मिळाली.सुरेखा मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक ठरल्या. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम केल्यानंतर यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.

मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर त्या लोकल चालवतात. त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली व त्यानंतर ८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजला जातो. त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत. १३ मार्च २०२३ रोजी, सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणारी ती पहिली महिला होती.

मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी, ३६+ वर्षांच्या दीर्घ सेवा कारकिर्दीनंतर, त्या वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आपली प्रार्थना!!

४) शीला डावरे 

या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. शीला यांनी १२वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुणे शहरात ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली.  सुरुवातीला  भाड्याने ऑटोरिक्षा घेऊन चालवत असे. पण महिला असल्यामुळे त्यांना लोक भाड्याने ऑटोरिक्षा देत नसत. मग पैसे जमवून त्यांनी स्वतःची ऑटोरिक्षा खरेदी केली. १९८८ मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. रिक्षाचालकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी, सामाजिक दृष्टिकोन यामुळे त्यांना  सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. योग्य प्रशिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या या कृतीची नोंद त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये झाली.

४) योगिता सूर्यवंशी

ट्रक चालवणे म्हणजे अत्यंत कष्टाचे काम. घरापासून सतत दूर राहायचे असल्यामुळे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. योगिता ही पहिली महिला, दहा चाकांचा 73 टनाचा ट्रक चालवणारी. एका दुर्घटनेत पतीचे निधन झाले. त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी होती. चार ट्रक ड्रायव्हर होते. त्यातील एक त्या अपघाताच्या वेळी ट्रक सोडून पळून गेला. स्त्री ट्रान्सपोर्ट कंपनी चालवणार म्हणून नवीन ट्रक ड्रायव्हर मिळेना व त्याचा खर्चही परवडणार नाही असे वाटून तिने स्वतः चौथा ड्रायव्हर व्हायचे ठरविले . हे काम तेवढे सोपे नव्हते. मुलांची संसाराची जबाबदारी सांभाळून, रात्रभर ट्रक चालवायचा, माल भरायचा, अशी अवजड कामेही करायची. त्यातच महिला असल्यामुळे वाटेत झोपण्याचा, स्नानाचा, सुरक्षेचा प्रश्न होता. पण ती डगमगली नाही. सर्व अडचणींवर मात करुन उभी राहिली.

६) मदुरै सुब्बुलक्ष्मी

मदुरै या १६ सप्टेंबर १९१६ ला जन्म झालेल्या तामिळनाडू मधील,कर्नाटक परंपरेतील शास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय गीत गायिका. तसेच त्या संगीतकारही होत्या. त्या काळात गायिका असणे ही फार चांगले मानले जात नव्हते. संगीतकार हे क्षेत्र तर स्त्रियांसाठी नव्हतेच. पहिली भारतीय महिला संगीतकार म्हणून त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरीक सन्मानाने सन्मानित केले आहे. १९७४ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला संगीतकार! १९६६ च्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आपली कला सादर करणाऱ्या  भारताच्या पहिल्या महिला होत्या व पहिल्या भारतीय शास्त्रीय संगीतकार होत्या.

७) कल्पना चावला 

जन्म १७ मार्च १९६२ रोजी, हरियाणा येथील कर्नाल येथे टायर उत्पादन कारखान्याचे मालक, बनारसी लाल चावला आणि संजोगता खरबंदा यांच्या पोटी झाला. जे १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून पूर्व पंजाबमध्ये गेले होते. लहानपणी, तिने एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये रस दाखवला, परंतु तिच्या वडिलांनी त्यासाठी नकार दिला, कारण फक्त पुरुषच [एरोस्पेस अभियांत्रिकी] हे करू शकतात आणि त्याऐवजी तिला डॉक्टर किंवा शिक्षिका बनण्याचे  सुचवले. तिने कर्नालमधील टागोर बाल निकेतन वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि १९७६ मध्ये ती वर्गात प्रथम आली.

चावला यांनी करनालमधील दयाल सिंग कॉलेजमधून मूलभूत अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चंदीगडमधील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील वैमानिक अभियांत्रिकी शाळेत प्रवेश घेतला , जिथे त्यांनी सैद्धांतिक वायुगतिकीच्या तत्त्वांचा अभ्यास केला.  त्या या कार्यक्रमातील चार महिलांपैकी एक होत्या आणि महाविद्यालयात एरोस्पेस अभियांत्रिकी  घेणाऱ्या पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या. काही प्राध्यापकांनी त्यांना एरोस्पेस अभियांत्रिकी शिकण्यापासून परावृत्त केले, कारण ते महिलांसाठी योग्य नाही आणि त्याऐवजी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सुचवली. पण त्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.

भारतात पुढील विशेष एरोस्पेस अभियांत्रिकी अभ्यासक्रम घेऊ न शकल्यामुळे, १९८२ मध्ये अमेरिकेत गेल्या. तिथे MSc व PhD पदवी मिळवली.१९९० ला तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.१९ नोव्हेंबर १९९७ रोजी चावलाची पहिली अंतराळ मोहीम सुरू झाली, ती सहा अंतराळवीरांच्या क्रूचा भाग म्हणून, ज्यांनी स्पेस शटल कोलंबिया फ्लाइट STS-87 मधून उड्डाण केले. तिने टेकऑफ दरम्यान मिशन स्पेशालिस्ट आणि बॅकअप फ्लाइट इंजिनिअर म्हणून काम केले. जेव्हा STS-87 लाँच केले गेले तेव्हा चावला अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला बनली.

८) कार्नेलिया सोराबजी

१५ नोव्हेंबर १८६६ ला नाशिक मध्ये तिचा जन्म झाला. १८९२ ला ‘नागरिक विधी’ या विषयाचा परदेशात अभ्यास करून १८९४ ला ती भारतात परत आली. पण त्या काळात महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून तिने महिलांसाठी स्वतंत्र सल्ला केंद्र स्थापन केले. विशेषतः ज्यांच्याकडे पडद्यात राहणे बंधनकारक होते अशा स्त्रियांना ती त्यांचे अधिकार सांगत असे. पण त्यांना न्याय देऊ शकत नव्हती. तिने  महिलांना या क्षेत्रात सामावून घेण्यासाठी लढा आरंभला. अखेर तिची १९०७ नंतर बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम या ठिकाणी महिला वकील म्हणून नियुक्ती केली. तिच्या या लढ्यामुळे महिला या व्यवसायात उतरू शकल्या. १९२९ मध्ये ती हायकोर्टाची वरिष्ठ वकील या पदावरून सेवानिवृत्त झाली. ती पहिली भारताची महिला वकील ठरली.

९) वनिता बोराडे 

२५ मे १९७५ रोजी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात वनिताचा जन्म झाला.त्यांच्या शेतात तिने वयाच्या बाराव्या वर्षी पहिला साप पकडला. कोणता साप विषारी असतो, कोणता बिनविषारी असतो,विषारी साप चावला तर काय करायचे, या सर्वांची उत्तरे तिच्याकडे आहेत. तिला सर्पमित्र म्हणतात. सापांच्या प्रजाती वाचविण्यासाठी, वाढविण्यासाठी ती काम करते. तसेच वने व वन्यजीव यांचे संरक्षण, संवर्धन व संशोधनाचे कार्य करते. तिने आजपर्यंत वनविभागाच्या सहाय्याने 51 हजार पेक्षा जास्त साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत.  त्यासाठी सापांचे कधीही दात तोडले नाहीत. त्यांना यासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावे सरकारने टपाल तिकीटही काढले आहे. त्या देशातील पहिल्या सर्प रक्षक महिला आहेत. सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन ही पर्यावरण संस्था त्यांनी स्थापन केली आहे.

– भाग ४ 

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २२ व २३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २२ व २३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

|| श्री नारद उवाच || 

भक्ती स्तोत्र २२ – २३ 

*

तत्रापि न माहात्म्यज्ञानविस्मृत्यपवादः ॥ २२ ॥

तद्विहीनं जाराणामिव ॥ २३ ॥

*
अर्थ : श्रीकृष्णावर प्रेम करताना त्याच्या महानतेची पूर्ण जाणीव गोपींना होती, त्यामुळे त्यांचा प्रेमात कधीही देहभावना आली नाही, त्यांचे प्रेम कायम उच्च दर्जाचे राहिले….!!

विवरण – भक्तिप्रेमाला महात्म्यज्ञानाची जोड असावी, नसता त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. त्यातून भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी दोष  निर्माण होऊ शकतात. गोपिकांना बालकृष्ण साक्षात भगवंत आहे याचे यथार्थ ज्ञान नसते तर त्या प्रेमाभक्ती या संज्ञेस प्राप्त झाल्या नसत्या. तसेच मागील सूत्रात गोपिकांचे जे वर्णन केले आहे ते सर्व व्यर्थ झाले असते. 

गोपिकांच्या महात्म्यज्ञानाचे श्रीएकनाथमहाराज, श्रीकृष्ण-उद्धव संवाद प्रसंगी गोपींचे वर्णन करीत आहेत –

“विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख । विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासें ॥८४॥ जेणें देहें पतिपुत्रांतें । आप्त मानिलें होतें चित्तें ।तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनी ॥८५|| विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख । विसरल्या नामरूप देख । माझें ध्यानसुख भोगितां ॥८६॥ निरसोनि तत्त्वांचे विकार । समाधि पावे मुनीश्वर । तो विसरे जेवीं संसार । तेवीं मदाकार गोपिका ॥८७॥ मी भ्रतारू नव्हें शास्त्रविधी । रूपें मदनमोहन त्रिशुद्धी । मज रतल्या ज्या अविधी । जारबुद्धीं व्यभिचारें ॥९२॥ चौं प्रकारींच्या कामिनी । हस्तिनी इत्यादि पद्मिनी । चौघींसी चौं मुक्तिस्थानीं । काममोहनीं मी रमवीं ॥९३॥ इतर पुरुषांचे संगतीं । क्षणभंगुर सुख भोगिती । अविनाश निजसुखप्राप्ती । कामासक्ती माझेनि ॥९४॥”

 (एकनाथी भागवत, अ. १२.)

श्री तुकाराम महाराज ही म्हणतात –

“चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥ घरोघरीं झाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥ लोकां गोकुळींच्या झालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥ जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥ नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥ याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥ लोका गोकुळीच्या झालें ब्रह्मज्ञान ||१३ || केलिया वांचून जपतपें ॥ जपतपे काय करावी साधनें । जंव नारायणें कृपा केली||१४|| सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ||१५||”

(अभंग क्रमांक ३८११, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

श्रीकृष्ण उद्धवास सांगतात –

“अंधारीं गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा । तेवीं नेणोनि माझी सच्चिदानंदता । मातें सेवितां मी जाहल्या ॥२०५॥ परिस मानोनि पाषाण । फोडूं जातां लोहाचा घण । लागतांचि होय सुवर्ण । तैशा जाण गोपिकां ॥६॥ विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जा‌ऊनि ये अमरता । तेवीं जारबुद्धीं मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥७॥ म्यां गोपिकांसी कामू केला । कीं त्यांचा सर्व कामू हरिला । विचारितां अर्थ एथिला । मोक्ष फावला मत्कामें ॥८॥ ज्यांसी झाली माझी संगती । त्या एक दोन सांगों किती । शत सहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥९॥ वैरागराच्या मणीप्रती । खडे लागले हिरे होती । तैशी गोपिका माझ्या संगतीं । नेणों किती उद्धरल्या ॥२१०॥ मी परब्रह्ममूर्ति चोखडी । माझिया व्यभिचारपरवडी । धुतल्या अविद्यापापकोडी । मुक्ती रोकडी पावल्या ॥११॥ मी अथवा माझे संत । संगती हो‌ईल ज्यांसी प्राप्त । ते मज पावले निश्चित । संदेह येथ न धरावा ॥१२॥ माझे स्वरूपावरी लोक । विकल्पें ठेविती नाना दोख ।नसंत माझे निर्दोख । तत्संगें सुख निर्दुष्ट ॥१३॥ उद्धवा त्वांही येचि अर्थीं । बहुत न करावी व्युत्पत्ती ।धरोनियां सत्संगती । संसारगुंती उगवावी ॥२१४॥”

(संदर्भ : एकनाथी भागवत अध्याय १२)

भगवत्प्रेमस्वरूप तर हृदयाला निर्मल पवित्र करणार आहे. ‘जाराणा’ हे अनेकवचन अनेक घातक गोष्टी येथे एकत्रित आल्याप्रमाणे होईल हे सांगत आहे. सूत्रातील ‘इव’ हे पदही दृष्टान्त जसाच्या तसा अक्षरशः घेऊ नये हे सुचवीत आहे. जार किंवा जारिणी हे केवल ऐंद्रिय सुखाची अपेक्षा करत असतात. ते सुख मिळत राहील तोपावेतोच त्यांचा समागम असतो, ते न मिळाल्यास परस्परांचा त्याग होतो, श्रीकृष्ण व गोपिकांचे अन्योन्य प्रेम अखंड, अबाधित व अव्यभिचारी होते, जार-प्रेम व वास्तव प्रेमातील भेद पुढील सूत्रामध्ये दाखविला आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 

नारद महाराज की जय!!!

 – भक्ती सूत्रे क्र. २२-२३. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ कालिका अष्टकम् ॥ — रचना : आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ कालिका अष्टकम् ॥ — रचना : आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

ध्यान

*
ग्लद्रक्तमुंडावलीकंठमाला

महोघोर्रावा सुदंस्त्र करला ।

विवस्त्र श्मशानालय मुक्ताकेशी महाकालकामकुल कालिकेयम् ॥१॥

*

भुजेवंयुग्मगे शिरोऽसिं दधाना

वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।

सुमध्याऽपि तुङ्गस्तना भ्रम्रा

लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥२॥

*

शवद्वन्द्वकर्णवतंसा सुकेशी

लस्तप्रेतपाणिं संयुक्तैकाञ्ची ।शवाकारमञ्चाधिरूढ़ा शिवाभिष_

चतुर्दिक्षुशब्दायमानाऽभिरेजे ॥३॥

*

स्तुतिः

*

विरञ्च्यादिदेवास्त्रयस्ते गुणांस्त्रीन्

समाराध्य कालीं प्रधाना बभूवुः ।

अनादिं सुरादिं मखादिं भवादिं

स्वरूपं सत्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥१॥

*

जगन्मोहनीयं तु वाग्वादिनीयं 

सुहृत्पोषिणीशत्रुसंहारणीयम् ।  

वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयं

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥२॥

*

इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्ली

मनोजांस्तु कामान् यथार्थं प्रकुर्यात् ।

तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥३॥

*

सुरापानमत्ता सुभक्तानुरक्ता

लसत्पूतचित्ते सदाविर्भवत्ते ।

जपध्यानपूजासुधाधौतपङ्का  

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥ ४॥

*

चिदानन्दकन्दं हसन् मन्दमन्दं 

शरच्चन्द्रकोटिप्रभापुञ्जबिम्बम् ।

मुनीनां कवीनां हृदि द्योतयन्तं

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥५॥

*

महामेघकाली सुरक्तापि शुभ्रा

कदाचिद् विचित्राकृतिर्योगमाया ।

न बाला न वृद्धा न कामातुरापि

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥६॥

*

क्षमस्वापराधं महागुप्तभावं

मया लोकमध्ये प्रकाशीकृतं यत् ।

तव ध्यानपूतेन चापल्यभावात्

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥७॥

*

यदि ध्यानयुक्तं पठेद् यो मनुष्य-

स्तदा सर्वलोके विशालो भवेच्च ।

गृहे चाष्टसिद्धिर्मृते चापि मुक्तिः

स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥८॥

*

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीकालिकाष्टकं सम्पूर्णम् ॥

*

मराठी भावानुवाद —

*

ध्यान

कंठात  रक्तरंजित नरमुंडमाळ

ध्वनी भयाण  सुदंत महाकराल

निवास स्मशाने  विवस्त्र मुक्तकुंतल

कालिकेय काम कुले महाकाल ॥१॥

*

वामहस्ते नरमुंड  खड्ग भयाण

दक्षिणहस्त अभयमुद्रा प्रसन्न

कटीत झुकविती विशाल स्तन

रक्तवर्ण अधरांवर हास्य मोहन ॥२॥

*

सुकुंतला दक्षिण कर्णे शवमुद्रा मृत्यूची  

मेखला कटीवरी  शोभे शवहस्तांची

आरूढ जाहली पहा भीषण शवमंची

चारी दिशांत  दाटी भयाण रवाची ॥३॥

*

स्तवन

*

त्रिदेव ब्रह्मादि छाया तव त्रिगुणांची

प्रमुख जाहली आराधना देवी कालीची

अनादि सुरादि यागप्रधान विश्वमूळाची

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥१॥

*

वाचास्तवनीय मोहविते जगाला

सज्जन पालक संहारक शत्रूला

उच्चाटन  स्तंभन करिशी वाणीला

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥२॥

*

स्वर्गदात्री देवी कल्पलतेसमान

मनोकामना यथार्थ करीतसे पूर्ण

समस्त तुझिया चरणी कृतार्थ धन्य

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥३॥

*

मत्त सुरापाने भक्तांवर अनुरक्त

अधिवास सदैव पावन भक्तचित्त

जप ध्यान पूजामृते अज्ञानपंकमुक्त

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥४॥

*

चिदानंद चेतना मंद मधुर हास्यातुन

शरदकोटीचंद्र तेजोमय प्रभेसमान

कवींची मुनींची उजळित हृद्पावन

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥ ५॥

*

श्वेता कधी प्रलयमेघांसम कृष्ण वर्णी  

रक्तवर्णी विचित्र योगमायास्वरूपिणी

बालक ना वृद्धा नाही कामातुर तरुणी

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥६॥

*

होऊनी उन्मनी चंचलता ध्यानात

रूप तव गुप्त प्रकट केले जनात

क्षमा करी  मजसी झाले दुर्वर्तन

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥७॥

*

लावुनी ध्यान  करेल जो पठण

सर्वलोकात तो होईल महान

प्राप्त अष्टसिद्धी त्यासी गृहातची

स्वरूप देव न जाणत महती कालीची ॥८॥

*

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित श्रीकालिकाष्टक सम्पूर्ण ॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३/१ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आजच्या तिसऱ्या भागात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या दुर्गा ज्यांना इतिहासाने महत्वाचे स्थान दिले नाही.त्यांनी बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ अबाधित  ठेवण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढ्यांनी घेणे हीच त्यांना श्रद्धांजली!!

१) झलकारी बाई

यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. लहान असतानाच आई वारली. झलकारी बाई मुळातच धाडसी शूर होती. तिने कुऱ्हाडीने कसे वाघाला मारले, काठीने कसे चित्त्याला मारले, अशा तिच्या कथा फार प्रसिद्ध होत्या. तिने मग युद्ध कलेचे शिक्षण घेतले. तिचा विवाह राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यातील सेनापती पुरण  कोरी यांच्याशी झाला. तिच्या शूर पणाच्या कथा ऐकून राणी लक्ष्मीबाई यांनी तिला ‘दुर्गा’ या महिला तुकडीच्या विभागाचे प्रमुख केले. हळूहळू ती राणीची विश्वासू सल्लागार झाली. तिचा चेहरा मोहरा, शरीराची ठेवण ही राणी लक्ष्मीबाईंसारखी होती. १८५७ च्या युद्धात तिचे पती किल्ल्याचे रक्षण करताना हुतात्मा झाले.आता शत्रू आत शिरणार हे लक्षात येताच  झलकारीने राणीचा पोशाख घातला व युद्धाला सज्ज झाली. राणी लक्ष्मीबाईंना तिचा पोशाख दिला व मुलाला घेऊन पळून जाण्याचे सुचवले. शत्रूला व त्यांच्या सैन्यालाही राणी लक्ष्मीबाईच आहेत असे वाटल्याने कांही गोंधळ न होता घनघोर युद्ध झाले. त्यात झलकारी हुतात्मा झाली. पण राणी पळून जाण्यात यशस्वी झाली. केवढा हा त्याग,आपल्या राणी प्रती असणारी निष्ठा!!

झलकारीने युद्धात मोठी मदत केली असली तरी इतिहासाने तिला कुठेही स्थान दिले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या समाजाच्या कथातून, गीतातून ती अजून त्यांच्या हृदयात शूर झलकारी  स्थान निर्माण करुन आहे. झलकारीच्या स्मरणार्थ सरकारने तिचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे.

२) दुर्गा भाभी

यांचा जन्म अलाहाबाद येथे गुजराथी कुटुंबात झाला. अकराव्या वर्षी त्यांचा विवाह, भगवती चरण वोहरा, या सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन च्या सदस्याशी झाला. त्यांची दुर्गा ही पत्नी, म्हणून त्या सर्वांच्या दुर्गाभाभी झाल्या. त्या असोसिएशन बरोबरच त्या  नौजवान भारत  सभेच्या पण सक्रिय कार्यकर्त्या होत्या.त्या सभेचे प्रमुख, लाला लजपत राय, यांच्यावर लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर जतिनदास यांनी लाठीचार्ज विरोधात उपोषण सुरू केले. 63 दिवसांच्या उपोषणानंतर तेही मृत्यूमुखी पडले. त्यांच्या लाहोर ते कलकत्ता अंत्ययात्रेचे नेतृत्व दुर्गा भाभींनी  केले. प्रचंड जनसमुदाय सामील झाला होता.

विधानसभेच्या घटनेनंतर त्यांनी लॉर्ड हेलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या पकडल्या गेल्या व तीन वर्षे तुरुंगवास भोगावे लागला. आणि त्या खटल्यात आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले. पतीसोबत दिल्लीतील ‘हिमालयीन टॉयलेट्स’ नावाचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना चालविण्यास मदत केली. सॅंडर्सला मारल्यानंतर सुखदेव, राजगुरू यांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी त्या भगतसिंग ची पत्नी बनल्या व आपल्या तान्ह्या मुलालाही बरोबर घेतले, कुटुंब खरे वाटावे म्हणून! राजगुरू हा नोकर म्हणून बरोबर घेतला. असे नावे बदलून, वेष बदलून ट्रेन मधून ते पळून गेले. व दुर्गा भाभी नंतर बाळासह परत आल्या. नंतर  भगतसिंग पकडले गेले. त्यांना सोडविण्यासाठी बॉम्ब चा वापर करताना दुर्गा भाभींच्या  पतीच्या हातातच बॉम्ब फुटला व त्यातच ते मृत्युमुखी पडले. पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या गव्हर्नर वर गोळ्या झाडण्यासाठी गेल्या, पण ते सापडले नाहीत. पण सार्जंट टेलर व त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून त्यांनी आपल्या पतीला श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी मुलांसाठी शाळा काढली व त्यातच त्या रमल्या. 92 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. अशा धाडसी, शूर दुर्गाभाभींना मानाचा मुजरा!!

३) राणी अवंतीबाई

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात मोहिनीचा जन्म झाला.लहानपणापासून  तिरंदाजी, अश्वसंचलन याची तिला आवड होती. 17 व्या वर्षी तिचा विवाह रायगडचे महाराजा लक्ष्मणसिंह यांचे पुत्र विक्रमादित्य यांच्याशी झाला.व मोहिनी ची अवंती झाली. तिला दोन मुलगे झाले. लक्ष्मणसिंहांच्या  मृत्यू नंतर विक्रमादित्य राजा म्हणून राज्यकारभार पाहू लागले. पण त्यांचे काही वर्षातच मानसिक संतुलन बिघडत गेले. ईस्ट इंडिया कंपनीने राजाला वेडा घोषित करून राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला.  पण अवंतीने प्रसंगावधान राखून पतीला व पुत्राला हाताशी धरून शासनाची धुरा सांभाळली. नंतर राजाच्या मृत्यूनंतरही तिने धैर्य व चातुर्याने राज्य सांभाळले. तेवढेच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीचे मनसुबे पूर्ण होऊ नयेत म्हणून आसपासच्या राजांना पत्र पाठवून, काहींना बांगड्या पाठवून सजग राहण्याचा संदेश दिला. इंग्रज सेना व क्रांतिकारी यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. त्यात अवंतीबाईंची सेना वरचढ ठरली. त्यामुळे वाडिंग्टन रणक्षेत्र सोडून पळून गेला. पण त्याला काही फितुरांची मदत मिळाली. ती घेऊन तो पुन्हा चालून आला. अवंतीबाई इंग्रज सैन्यावर तुटून पडल्या. पण तेवढ्यात त्यांच्याच सैन्यातील फितूराने पाठीमागून तलवारीचा घाव घातला व राणी धारातीर्थी पडली.

देशाचे स्वातंत्र्य अशा फितुरांनीच घालवले हा इतिहास आहे. त्यावरून पुढील पिढीने सजग राहून ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ स्वातंत्र्य सूर्य तळपत ठेवला पाहिजे. ही राणी अवंतीबाईंना योग्य श्रद्धांजली ठरेल.

४) राणी गाइदिनल्यू

यांचा जन्म 26 जानेवारी 1915 ला मणिपूर येथील गावात झाला. त्यावेळी मणिपूर हे ब्रिटिश राजवटीखाली होते. त्या तेरा वर्षाच्या असताना त्यांची भेट जदोनांग यांच्याशी झाली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या क्रांतिकारी आंदोलनात सहभागी झाल्या. नंतर ते आंदोलन मणिपूर व नागा गावांमध्ये पसरले. या आंदोलनात क्रुर ब्रिटिश नीती विरोधात शस्त्रांचा वापर केला गेला. 1931ला जदोनांग यांना अटक झाली व फाशी देण्यात आली.नंतर राणी गाइदिनल्यू नेता बनल्या. अवघी १६ वर्षांची मुलीने अवघे चार हजार सशस्त्र नागा सैन्य घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात विद्रोह केला. लोकांना कर न भरण्याची विनंती केली. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस ठेवले होते. पण त्या सापडल्या नाहीत.एकदा अचानक नागा सैन्याने आसाम रायफल्स वर हल्ला केला.इंग्रजांनी चिडून नागांची गावेच्या गावे बेचिराख केली. एकदा अचानक इंग्रजांनी प्रति  हल्ला करुन राणीला  अटक केली व जन्मठेपेची शिक्षा दिली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर राणीची सुटका झाली.१९९३ला त्यांचा मृत्यू झाला.त्यांना अनेक पुरस्कार दिले, त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट व एक नाणेही काढले.जवाहरलाल नेहरू त्यांना ‘पहाडाची कन्या’ म्हणत. तिच्या धाडसाला त्रिवार वंदन!!

५) मातंगिनी हाजरा

यांचा जन्म १९  ऑक्टोबर १८६९ मध्ये बंगालमधील  होलगा गावी झाला. बारा वर्षाची असताना त्रिलोचन हाजरा यांच्याशी विवाह झाला. सहाच वर्षात त्या विधवा झाल्या. मजुरी करून उदरनिर्वाह करू लागल्या. गावाच्या सुखदुःखात सहभागी झाल्यामुळे लोक त्यांना ‘माॅं’ म्हणत.

स्वतंत्रता आंदोलनाच्या मोर्चाच्या वेळी  शंख ध्वनी करून त्यांनी मोर्चाचे स्वागत केले व सभेमध्ये तन- मन-धनाने संघर्ष करण्याची शपथ घेतली. मिठाचा सत्याग्रह, कर बंदी आंदोलन यात त्या सहभागी झाल्या. आंदोलन दाबून टाकण्यासाठी गव्हर्नर अँडरसन आले. त्यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यावेळी या सर्वात पुढे होत्या. पोलिसांनी त्यांना पकडले व सहा महिन्यांचा सश्रम कारावास झाला. भारत छोडो आंदोलनात रॅलीसाठी पाच हजार लोकांना त्यांनी गोळा केले. सरकारी डाक बंगल्यावर रॅली नेली. पोलिसांनी बंदूक रोखल्या. मातंगिनी एका कठड्यावर उभी, हातात झेंडा घेऊन घोषणा देत होती. गोळ्या सुटत होत्या मातंगिनी जखमी होत होती. पण तिने शेवटपर्यंत झेंडा पडू दिला नाही. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणा देणे बंद केले नाही. तिथेच ती शहीद झाली. अशा या शहीद क्रांतिकारक महिलेस आमचा सलाम!!

– क्रमशः भाग ३/१

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३/२ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आजच्या तिसऱ्या भागात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या दुर्गा ज्यांना इतिहासाने महत्वाचे स्थान दिले नाही. त्यांनी बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ अबाधित  ठेवण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढ्यांनी घेणे हीच त्यांना श्रद्धांजली!!

६) कनकलता बरुआ

यांचा जन्म 22 डिसेंबर 1924 ला आसामच्या दरांग जिल्ह्याच्या बोरंगबाडी गावात झाला. त्या पाच वर्षाच्या असताना आईचा मृत्यू झाला. तर तेरा वर्षाच्या असताना वडील गेले. आपल्या लहान भावा बहिणींचे पालन पोषण करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली.

भारत छोडो आंदोलनाच्या वेळी अवघ्या 18 वर्षाच्या होत्या आणि मृत्यू वाहिनी मध्ये त्या सामील झाल्या. वाहिनीने स्थानिक पोलीस स्टेशनवर राष्ट्रीय ध्वज  फडकवायचा असे ठरविले  यावेळी निशःस्त्र ग्रामीण लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व कणकलताने केले.त्यावेळी तिने केलेले भाषण सर्वांना प्रेरणा देणारे होते. पोलिसांनी गंभीर परिणामाची चेतावणी दिली पण त्याकडे दुर्लक्ष करून मोर्चा पुढे जातच राहिला. पोलिसांनी गोळ्या झाडल्या पण कनकलतेने  तिच्या हातातील झेंडा मुकुंद काकोटीला दिला व आपण शहीद झाली. त्यालाही गोळी लागली तोही पडला पण शेवटी रामपति राजखोवाने तो झेंडा अखेर पोलीस स्टेशनवर फडकवला. अशा या वीरबालेला सलाम!!

७) उदादेवी

1857 च्या उठावाच्या वेळी लखनऊच्या सिकंदर बागेत दोन हजार लोकांचा जमाव जमला होता. इंग्रज सैनिक सिकंदर बागेत घुसले पण बागेच्या जवळ असणाऱ्या झाडापाशी गेलेला ब्रिटिश सैनिक जिवंत परत येत नव्हता. एक-दोन नव्हे 36 ब्रिटिश सैनिक मारले गेले. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्याला कळेना की सैनिक झाडाजवळ गेल्यावर का मरतो? त्याने झाडावर बघितले तर त्याला कोणीतरी बसलेले दिसले. लगेच त्याने तिथे गोळ्या झाडल्या आणि लष्करी गणवेश घातलेली एक महिला खाली पडली. ही महिला म्हणजेच 1857 च्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारी उदादेवी होती. जखमी उदादेवी खाली पडल्यावर सैनिकांनी तिला गोळ्या घालून तिच्या शरीराची चाळण केली. आणि नंतर सर्व दोन हजार लोकांना मारले. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या उदादेवीला योग्य ती प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला नाही. उदादेवी यांचा जन्म अवध येथे झाला. इतिहासात हिच्याबद्दल फारशी माहिती लिहिली गेली नाही. 1856 मध्ये अवधचा नवाब वाजिद अली शाह हद्दपार झाला आणि अवधचा लगाम त्याची बेगम हजरत महल च्या हातात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महिलांची लष्करी तुकडी तयार केली. उदादेवी त्यामधीलच एक होती. या तुकडीत सामील होऊन उदा देवीने  इंग्रजांशी लढा दिला व त्यातच आपल्या प्राणांची आहुती दिली.

वंदे मातरम्!!

८) कुमारी मैना

1857 च्या कानपूरच्या उठावाचे नेतृत्व नानासाहेब करत होते. त्यांची दत्तक मुलगी कुमारी मैना होती. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील बिठूर येथे 1844 मध्ये झाला. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेब भूमिगत होते. त्याच्या अटकेवर आणि माहितीवर ब्रिटिश सरकारने एक लाखापर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. इंग्रजांनी नानासाहेबांची मुलगी कुमारी मैना हिला बिठूर येथून अटक करून कानपूरला आणले. ते मैनाला नानासाहेब आणि इतर क्रांतिकारकांचा पत्ता विचारत राहिले. 13 वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधले होते. छळ केला, पण तिने तोंड उघडले नाही. अखेरीस इंग्रजांनी तिला जळत्या चितेत फेकून दिले. आयुष्याची ओळख होण्यापूर्वीच ते संपले. या वीरागंनेच्या बलिदानाचा देशाला अभिमान आहे.

९) सुशीला दीदी

वीरांगना, क्रांतिकारक भगतसिंगांची दीदी सुशीला दीदी.दि. 5 मार्च 1905 रोजी पंजाब येथे एका सैनिकी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते.त्या स्वत: फार सुंदर कविता रचायच्या, ज्यात प्रामुख्याने देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रप्रेम असे विषय असायचे. जालंधरला विद्यालयीन शिक्षण घेताना तिथल्या तत्कालीन मुख्याध्यापिका शन्नो देवी आणि आधीच्या मुख्याध्यापिका लज्जावती ह्या स्वत: क्रांतिकारक विचारांच्या होत्या. त्यामुळे अभ्यासाबरोबरच क्रांतीचे पाठसुद्धा सहज गिरवले गेले. पुढे कालांतराने त्या भगवतीचरण व्होरा आणि दुर्गादेवी व्होरा ह्यांच्या संपर्कात आल्या आणि एका क्रांतिकारक संघटनेचा भाग झाल्या. इथून त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात काकोरी रेल्वे लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली, तेव्हा ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या.वडिलांसाठी मुलीचं इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नोकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होतं, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घराबाहेर पडल्या आणि दोन वर्षं आपल्या घरी परतल्या नाही. दोन वर्षांनंतर तेव्हाच परतल्या, जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्र्यचळवळीचं काम सुरू केलं.

साँडर्स आणि स्कॉर्ट ह्यांच्या हत्येनंतर क्रांतिकारक भगतसिंग आणि दुर्गाभाभी दोघेही लाहोर सोडून कलकत्त्याला आले. सुशीला देवींनी तेव्हा त्यांच्या भूमिगत राहण्याची व्यवस्था केली. आपल्या कलकत्त्याच्या निवास काळात त्यांनी क्रांतिकारक महिलांचं संघटन केलं, ज्याचं नेतृत्व सुभाष चंद्र बोस करत होते. त्याअंतर्गत त्यांनी सायमन कमिशनला जोरदार विरोध केला. दिल्ली बाँबहल्ल्यानंतर भगतसिंग आणि इतर मोठे क्रांतिकारक अटकेत होते, त्याच वेळी व्हाइसरॉय इर्विन ह्यांना मारण्याचा कट रचला गेला. त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती काढायचं काम सुशीला दीदींनी पार पाडलं. त्या वेषांतर करून युरोपियन स्त्री झाल्या आणि इर्विन ह्यांच्या प्रवासाचा बारीकसारीक तपशील गोळा केला. दुर्दैवाने ही योजना सफल होऊ शकली नाही. सुशीलादेवी आपली नोकरी सोडून एका शीख मुलाच्या वेषात लाहोरला दाखल झाल्या. भगतसिंगांना तुरुंग तोडून बाहेर काढायच्या कामात स्वत:ला जुंपून दिलं. हत्यारं गोळा करणं, पैसा जमा करणं, माहिती गोळा करणं, निरोप्याची कामं करणं अशी सगळी जय्यत तयारी केली. एका बाँब परीक्षणाच्या वेळी दुर्दैवाने भगवतीचरण व्होरांना वीरमरण आलं आणि ही योजना थांबवावी लागली.

वकील श्याम मोहन ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1942 सालच्या भारत छोडो आंदोलनातसुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पतीने सक्रिय सहभाग नोंदवला. त्यात त्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सुशीला देवींनी स्वत:ला समाजकार्यात लोटून दिलं. हस्तकला शाळा उघडून महिलांना त्यात निपुण करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, दलित वस्त्यांमध्ये काम करणं असं त्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. त्यांनी देशसेवेचं जे व्रत हाती घेतलं होतं, त्याला 13 जानेवारी 1963 रोजी पूर्णविराम मिळाला.

– क्रमशः भाग ३/२

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आज दुसऱ्या भागात : क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या दुर्गा ( काही अपंगत्वावरही मात करून)

५) दिव्या देशमुख

2005 ला नागपूरमध्ये जितेंद्र व नम्रता देशमुख या डॉक्टर दांपत्याच्या पोटी दिव्याचा जन्म झाला. ऑनलाईन बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या 2020 च्या संघाची ती भाग होती.2021 मध्ये भारताची महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाली. 2022 ला  बुद्धिबळ ओलंपियाड मध्येही कांस्यपदक जिंकले. 2023 मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्य पद जिंकले. टाटा स्टील इंडियन बुद्धिबळ स्पर्धेत महिलांच्या रॅपिड विभागात प्रथम स्थान पटकावले. 2024 च्या शारजा चॅलेंजर्स स्पर्धेची विजेती ठरली. तेव्हाच FIDE वर्ल्डकप ची वीस वर्षाखालील मुलींची विजेती  ठरली.45 व्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये सांघिक तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली.  2025 चा महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.आता तिला candidates स्पर्धेसाठी  तिकीट मिळाले. त्यात जर ती जिंकली तर वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी  पात्र ठरू शकेल.

दिव्याची आक्रमक स्टाईल व फोकस्ड असणं हे तिच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. तिची ओपनिंग ची तयारी खूप चांगली आहे. तिला आपल्याकडून वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी  शुभेच्छा देऊया.

६) दीपा कर्माकर

हिचा जन्म 9 ऑगस्ट 1993 रोजी आगरतळा, त्रिपुरामध्ये झाला. तिने वयाच्या 6 व्या वर्षी जिम्नॅस्टिक्सला सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक होते विश्वेश्वर नंदी. तिची पाऊले सपाट असल्याने ती जिम्नॅस्टिक्स करू शकणार नाही असे तिला सांगितले होते.पायांचे हे आव्हान पेलत असताना तिने जिम्नॅस्टिकसाठीही अत्यंत कठीण प्रकार निवडला होता तो म्हणजे ‘प्रोदुनोव्हा व्हॉल्ट’. समोरच्या बाजूने उडी मारून दोन वेळा हवेत कोलांटी उडी घेऊन जमिनीवर परतताना दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन उतरायचे असा हा अवघड प्रकार होता.

2014 मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली. त्यानंतर आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. या विजयानंतर, 2016 मधील रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या व्हॉल्टिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली. 2018 मध्ये तुर्कीतील मेर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होती.

७) साईखोम मीराबाई चानू

हिचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग या मणिपूरच्या इम्फाळ शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर मेईतेई कुटुंबात झाला. ती फक्त १२ वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने तिची ताकद ओळखली. ती लाकडाच्या मोठमोठ्या मोळ्या सहज  उचलायची. चानूने मणिपूर येथील स्पोर्ट्स अकादमीमध्ये वेटलिफ्टींगचे प्रशिक्षण घेतले.

चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले; गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेच्या २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकून 2017 ची पुनरावृत्ती केली. २०१७ मध्ये तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.२०२० च्या तोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.

अकादमी मध्ये प्रशिक्षण घेताना रोजचा घरापासूनचा प्रवास परवडत नव्हता. म्हणून वाळूच्या ट्रक मधून प्रवास करायची. तिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर कृतज्ञता म्हणून सर्व ट्रक चालकांना बोलावून, त्यांचा सन्मान करून, चरणस्पर्श केला. इतके यश मिळाले तरी तिचे पाय जमिनीवर होते, हे जाणवते.

८) पारूल चौधरी

एप्रिल १९९५ मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठजवळील जैनपूर गावात जन्मलेली पारुल ही कृष्णपाल चौधरी आणि राजेश देवी यांची मुलगी. १६ वर्षांची असताना तिच्या शाळेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने भाग घेतला. आणि तिची गती पाहून तिला प्रोत्साहन दिले गेले.

पारुलची पहिली मोठी कामगिरी म्हणजे २०१९ च्या काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकणे.त्यानंतर तिने त्या वर्षी आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. 2023 ला जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पारुलने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण आणि ५००० मीटर स्प्रिंटमध्ये रौप्य पदक जिंकले. तिने ३००० मीटरच्या  शर्यतीत ९ मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवणारी पहिली भारतीय महिला धावपटू म्हणून इतिहास रचला आहे.इतर अनेक स्पर्धांमध्ये  सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे. तिच्या अतुलनीय यशाचा सन्मान म्हणून 2024 मध्ये तिची उत्तर प्रदेश पोलिस मध्ये DSP म्हणून नेमणूक झाली.

९) वृंदा राठी

ही मुंबईची, जन्म १४ फेब्रुवारी १९८९चा. लहानपणापासून क्रिकेटची आवड होती.मुंबई विद्यापीठाकडून ती क्रिकेट खेळायची. २०१३ च्या Women’s World Cup च्या वेळी तिला स्कोअरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यावेळी न्यूझीलंडचे अंपायर कॅथी क्राॅस यांच्यामुळे ती प्रभावित झाली व आपणही अंपायर होण्याचे मनाने ठरवून टाकले.२०१४ ला राठीने  मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित अंपायर्सची परीक्षा दिली. त्यानंतर चार वर्षांनी बीसीसीआयकडून आयोजित केली जाणारी अंपायरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि मुंबईत झालेल्या  इंग्लंड विरुद्ध भारत या महिलांच्या टेस्ट मॅच चे अंपायरिंग करून कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान पटकावला.

दक्षिण आफ्रिका येथे 2023 मध्ये झालेल्या महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये  वृंदा राठीने अंपायरिंग केलं. ती प्रीमियर लीगची फायनल आणि एशियन्स गेममध्ये देखील अंपायरिंग करणारी भारताची पहिली महिला अंपायर ठरली.

तेव्हापासून 34 वर्षाच्या वृंदाने 13 वनडे आणि 43 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. 2020 मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट पॅनल ऑफ अंपायर्समध्ये तिला बढती मिळाली. वृंदा राठीने 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये,23 च्या बांगलादेश वूमन्स आशिया कप गेम्समध्ये, 24 च्या श्रीलंकेतील गेम्समध्ये,25 साली नवी मुंबई च्या गेम्समध्ये अंपायरिंग  करून तिने जागतिक विक्रम नोंदविला आहे.

अंपायर होण्यासाठी लागणारी चिकाटी, चपळता, एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता, संयम,कोणत्याही हवामानात तासन् तास उभे राहण्याची तयारी असेल तर स्त्रियांना खुणावणारे हे नवे क्षेत्र पादाक्रांत करा.

– भाग २/२.

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मराठा महायोद्धा बाजीराव…” – लेखक: ॲड. राहुल डावरे कात्नेश्वरकर ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मराठा महायोद्धा बाजीराव…” – लेखक: ॲड. राहुल डावरे कात्नेश्वरकर ☆ सुश्री शोभा जोशी ☆

नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…

शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे कोणालाच माहित नव्हती…

.. आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…

हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर…. त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!

बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित होतं…पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?

शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव.. खरोखर किती मोठा होता हे आम्हाला कोण सांगणार?

‘लढवय्या पेशवा’ पेक्षा ‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच

ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

– – ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

“जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज

बाजी जात बुंदेल की, बाजी रखियो लाज!”

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.

संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते… असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव

उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले. बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

“उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून

उशीर झाला!”

.. ह्याला म्हणतात मराठी बाणा!

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

.. अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय

आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…

– – इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला.. जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…

…. घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

.. बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागलं ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही पटाईत! गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारलं..

“इधर कोई समाधी है क्या?”

” सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार? “.. असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड

होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली! कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,

” ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?” रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…

पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…

ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुंदर नक्षीकाम… जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत!

.. सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील! अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला….सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर

नेणारा हाच तो……बाजीराव!

…. गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत विचार शक्ती! कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा पंतप्रधान!……..असो!

– – तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपलं! पुढे नुसती सपाट जमीन!

डोक्यावर अंडं फोडलं असतं तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!

आता काय करायचं ह्या विचारत असताना एक उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी वापरली जात होती बहुदा! म्हटलं पाहू इथे विचा रून! भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू! असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्याअगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची जाणीव त्या दिवशी झाली! आपल्यामध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो! आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता! आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणून देखील घेत नाही! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, “पेशवा बाजीराव की समाधी कहा है?”

असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही गोष्ट घडली खरी! असो! मग मी त्या शेडपाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, “इधर कोई समाधी है क्या?”

“मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!”, असे म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब! नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, ” दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?”

आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले….

“समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो…..”

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!! पेशवा सरकार! पेशवा सरकार!!! इतका मान! इतका आदर!!

ते देखील नांदेडहून शेकडो मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य!

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या कडा पाणवल्या! ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे देखील त्याला इतका मान नाही! महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी…….

“अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?” असे प्रश्न विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा गावठी ‘दादासाहब’ कुठे!

…. मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं, क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश, पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!

….  तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान? कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण

कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा….

पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो! परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!

बाहेर वाऱ्यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत परत ऐकू येत होते….

पेशवा सरकार!

पेशवा सरकार!!

पेशवा सरकार!!!

मित्रांनो नक्की शेयर करा /|\

लेखक: ॲड. राहुल डावरे कात्नेश्वरकर

प्रस्तुती: श्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आज दुसऱ्या भागात : क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या दुर्गा ( काही अपंगत्वावरही मात करून)

१) स्मृती मानधना

सांगलीची शान! स्मिता व श्रीनिवास मानधना यांची मुलगी. जन्म मुंबईत झाला पण दोनच वर्षात ते माधवनगरला आले. तिचा भाऊ क्रिकेट खेळायचा. त्याची 19 वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्राच्या टीम साठी निवड झाली. त्याचा खेळ बघून स्मृतीला प्रेरणा मिळाली. नऊ वर्षाची असतानाच तिची पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड झाली. अकरा वर्षाची असताना 19 वर्षाखालील टीम मध्ये निवड झाली. 2013 ला गुजरात विरुद्ध खेळताना एक दिवसीय सामन्यात तिने 150 बॉल मध्ये नाबाद 224 धावा केल्या आणि ती एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. आणि इथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २०१६ ला सर्वात जास्त धावा करणारी खेळाडू झाली आणि टीमला चॅलेंज ट्रॉफी मिळवून दिली. 2016 ला आयसीसी महिला टीम मध्ये निवड झालेली ती एकमेव भारतीय महिला होती. नंतर दुखापतीमुळे पुढे पाच महिने खेळू शकली नाही पण ती हरली नाही. पुन्हा नव्या दमाने 2017 च्या वर्ल्ड कप साठी सज्ज झाली. 2019 ला सर्वात जलद 24 बॉल मध्ये 50 धावा करणारी पहिली महिला ठरली. 2019 चा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा तिला मान मिळाला. ODI मध्ये सर्वात जास्त म्हणजे 10 शतके करणारी व सर्वात जास्त म्हणजे 4000 धावा काढणारी पहिली महिला खेळाडू ठरली. 2025 ला तिने T20 मध्ये पहिले शतक झळकवले व ती T20, ODI, व टेस्ट या तीनही प्रकारात शतके झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली.

२ )सायना नेहवाल

हरियाणातील हिसार मध्ये राहणारे डॉक्टर हरवीर सिंह व उषा रानी नेहवाल  यांची सायना ही मुलगी. ती लहान असतानाच ते हरियाणा मधून हैदराबादला आले. तिची आई, वडील दोघेही हरियाणातील राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होते. सायना साधारण आठ वर्षाची असतानाच सायनाला तिचे आई-वडील बॅडमिंटन खेळण्यासाठी आपल्याबरोबर  घेऊन जात होते. बॅडमिंटनची आवड ही वारसा हक्कानेच मिळालेली होती. 2006 मध्ये प्रतिष्ठित आशियाई उपग्रह बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू बनली. फिलिपिन्स ओपन मधील फोर स्टार स्पर्धा जिंकणारी तसेच ती स्पर्धा जिंकणारी आशियातील सर्वात तरुण खेळाडू असणारी ती पहिली भारतीय महिला. 2008 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला. ऑलिंपिक गेम्स मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली भारतीय बॅडटमिंटनपटू ठरली. सायना नेहवालच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच देशात बॅडमिंटनचे महत्त्व आणि लोकप्रियतेत वाढ झाली. सायनाच्या खात्यात तब्बल २१ आंतरराष्ट्रीय विजेतेपदं जमा आहेत. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद दोनवेळा जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे.

३ ) ओइनम बेम्बेम देवी

इम्फाळमध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या बेम्बेम देवी यांनी लहानपणीच त्यांच्या परिसरातील मुलांसोबत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. स्वतः फुटबॉलचे चाहते असूनही, बेम्बेमचे वडील, ओइनम नागेशोर सिंग, त्यांच्या मुलीला हा खेळ खेळण्यास विरोध करत होते आणि त्यांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.तथापि, बेम्बेमला फुटबॉलची आवड होती. तिचे वडील नसताना घराबाहेर पडायची, तिची किट बॅग उचलायची आणि फुटबॉल मैदानावर धावायची. मैदानावर दुखापती होत,मग वडील रागवायचे. तिने  दुखापती लपवण्यासाठी पूर्ण पँट घालण्यास सुरुवात केली.

१९९१ मध्ये, तिला स्थानिक क्लब YAWA ने सामील केले आणि चार वर्षांच्या आत, ती मणिपूर पोलिस फुटबॉल संघाकडून खेळू लागली. तिच्या कुटुंबासाठी किटसारखी मूलभूत वस्तू परवडणे कठीण होते, स्पर्धांसाठीचा प्रवास खर्च तर दूरच होता, आणि दुसऱ्या खेळाडूकडून मिळालेला ट्रॅकसूट बेम्बेमसाठी मौल्यवान वस्तू बनला.

१९९४ पर्यंत, तिच्या उत्कृष्ट कामगिरीने राष्ट्रीय प्रशिक्षकांचे लक्ष वेधले होते. १९९५ मध्ये, वयाच्या १५ व्या वर्षी, बेम्बेम हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय जर्सी घालून  मैदानात उतरली. तिथून, तिला मागे वळून पाहावे लागले नाही. स्पर्धेनंतर जेव्हा बेम्बेम मणिपूरला परतली तेव्हा तिला स्थानिक फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक एस. एकेंद्र सिंग यांच्या रूपात एक मार्गदर्शक मिळाला. त्यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली, बेम्बेम एक खेळाडू म्हणून बहरली.

१९९६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत  बेम्बेनने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच वर्षी, ऑल मणिपूर फुटबॉल असोसिएशन (एएमएफए) ने तिला वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार दिला.१९९८ मध्ये, बेम्बेमला मणिपूर पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून भरती करण्यात आले. या नोकरीतून तिला मिळणारा पगार तिच्या कारकिर्दीला चालना देण्यासाठी खूपच कमी होता, परंतु बेम्बेमने तिच्या आर्थिक अडचणींचा तिच्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर बेम्बेमने पहिल्यांदाच राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला तेव्हा मणिपूर संघाने ही स्पर्धा जिंकली. बेम्बेमने ज्या १९ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यापैकी तिने १६ विजेतेपदे जिंकली, ज्यात तिच्या राज्य संघाची कर्णधार म्हणून ९ विजेतेपदे आहेत. तिने भारतीय पुरुष संघापेक्षा महिला संघाला उच्च जागतिक क्रमवारीत नेले.

४ ) शीतल देवी

तिला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. फोकोमेलिया या दुर्मीळ आजारानं तिला ग्रासलं होतं. या आजारात अवयवांची एकतर वाढच होत नाही किंवा ते अर्धवटच राहतात. तिच्या बाबतीतही तेच झालं. निसर्गाचा हा ‘न्याय’ हसतमुखानं तिनं स्वीकारला. दोन्ही हात नसले तरी आजही सर्व गोष्टी ती स्वत:च करते.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात १० जानेवारी २००७ रोजी तिचा जन्म झाला. २०१९ मध्ये किश्तवार येथे झालेल्या एका युवा कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता. लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी तिला तिथे पाहिलं. प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांनी तिचा आत्मविश्वास पाहून तिला तिरंदाजीचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं.

तिला काही कृत्रिम अवयव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण, तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, कोणत्याही कृत्रिम अवयवांचा तिला काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळी तिनं प्रशिक्षकांना सांगितलं, माझे पायच माझे हात आहेत. पायांनी मी अनेक गोष्टी करू शकते. एवढंच काय, मी झाडावरही चढू शकते! शीतलनं हे सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दोन्ही हात नसतानाही कोणी झाडावर कसं चढू शकतं? शीतलची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून प्रशिक्षकांचाच हुरूप वाढला. पण, याआधी दोन्ही हात नसलेल्या कोणत्याच विद्यार्थ्याला त्यांनी प्रशिक्षण दिलेलं नव्हतं. त्यांनाही खूप अडचण येत होती.

२०२२ मध्ये चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात तिनं तब्बल दोन सुवर्णपदकं जिंकून पदकांची लयलूट केली.

पॅरिसमध्ये  पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत राकेशकुमारच्या साथीनं तिनं कांस्यपदकही पटकावलं. एकलव्याला तर फक्त उजव्या हाताचा अंगठाच नव्हता, पण या तरुणीला दोन्ही हात नसतानाही धनुर्विद्येत कोणालाही लाजवेल असं कौशल्य तिनं प्राप्त केलं.  अतिशय उत्कंठावर्धक स्पर्धेत इटलीवर मात करून भारतानं कांस्यपदक जिंकलं! दोन्ही हात नसतानाही तिरंदाजी करणारी, अंतरराष्ट्रीय आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं पटकावणारी ती भारताचीच नव्हे, तर जगातली पहिली महिला आहे!

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी  शीतलला त्यांच्या कंपनीच्या कोणत्याही श्रेणीची कोणतीही कार निवडण्यास सांगितलं होतं. हवे ते बदल करून ही कस्टमाइज कार ते तिला भेट देणार होते. पण, स्वाभिमानी शीतल म्हणाली होती, १८ वर्षांची झाल्यावर मी तुमची ही भेट स्वीकारेन! ते म्हणाले, शीतल, माझं आश्वासन पूर्ण करण्याची वाट मी पाहतो आहे!

– भाग २/१.

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा पुण्यातला शारदीय नवरात्रोत्सव… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा पुण्यातला शारदीय नवरात्रोत्सव… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

अनंत चतुर्दशीला निघालेली सार्वजनिक गणेश विसर्जनाची मिरवणूक रात्री तीन-साडेतीन वाजेपर्यंत चाले. गावातील अबालथोर आणि विशेषतः तरुणाई मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होई. दिवसभर गुलाल उधळत, ढोल, ताशे, वाजवत, लेझीम व इतर खेळ खेळलेली मुले गणेश विसर्जननंतर मात्र अगदी थकून जात. घरी परतताना दोन पावलं उचलण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरलेले नसत. घरी गेल्यावर जागा मिळेल तिथे अंग टाकून क्षणात ढाराढूर झोपून जात, पुढचे चोवीस तास! काही मुले तर रस्त्यातील दुकानांच्या फळ्यांवरच विसावत तर काही तालमींच्या कट्ट्यांवर अंग झोकून देत.

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होई. एक-दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मंडळी पितरांच्या सरबराईला लागत कारण त्यांचे दिवंगत पूर्वज, पितर आता जेवायला खाली पृथ्वीवर येणार असायचे त्यांच्या घरी!

कसबा गणपतीच्या कट्ट्यावर, ओवऱ्यांवर भटभिक्षुक आणि पौरोहित्य करणारी ब्राह्मणमंडळी जमत. बल्लव, आचारी, वाढपी, स्वयंपाकात मदत करणाऱ्या बाया जोगेश्वरी मंदिरच्या परिसरात उपलब्ध असत. कोणीही इच्छुक, गरजू यजमान तिथे जाऊन त्यांना भेटून पुढचे दिवस, मुहूर्त, वेळा ठरवीत आणि भक्तिभावाने ब्राह्मणरूपात असलेल्या आपल्या पितरांना घरी आमंत्रित करून श्रद्धांजली वहात, त्यांना यथेच्छ जेऊ-खाऊ घालीत. यथाशक्ती दक्षिणा देत. या दान, तर्पणादि क्रियाकर्मांनी आणि सुग्रास भोजनाने तृप्त होत्साते हे सर्व पितर आपल्या पुत्रपौत्रादिकांना आशीर्वाद देऊन, संचिताचा उर्वरित कर्मभोग भोगण्यासाठी पितृलोकाप्रत निर्गमन करीत. पुढचे पंधरा दिवस घरोघर ही धांदल चाले.

श्रावण-भाद्रपदात सकाळी डोईवर टोपल्या – दुरड्या – पाट्या – हारे घेऊन ‘आघाडा, दूर्वा, फुले घ्या’ म्हणून गल्ली -बोळातून, आळी-आळीतून, हाळ्या घालत फिरणाऱ्या कष्टकरी महिलांच्या टोपलीत आता एक नव्या द्रव्याची भर पडलेली असे. ते पूजाद्रव्य असे ‘वावरी’, म्हणजे शेतातील माती. फुलांमधे तेरड्याऐवजी तीळ -जवसाची फुले दिसत. घटस्थापनेला त्याची आवश्यकता असते. पंचधान्ये प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असत पण वावरी विकत घ्यावी लागे. त्यासाठी विनियमाचे माध्यम असे केवळ पसाभर धान्य. त्याबदल्यात यजमानीणबाईंना मिळे आघाडा, दूर्वा, फुले आणि घटाला वावरी!

घटस्थापनेपूर्वी नगरातील सर्व मंदिरे धुऊन, झाडून, पुसून लख्ख केली जात, सुशोभित केली जात. यापुढील दहा दिवस सगळ्याच मंदिरात भक्तांची गर्दी होणार असे. त्यावेळी पुण्यात एक सुंदर प्रथा होती. बहुतेक प्रमुख मंदिरांच्या प्रांगणात किंवा सभामंडपात नगरातील विविध कलाकार विविध रंगांनी चितारलेल्या विविध विषयांवरील रांगोळ्या रेखाटत. त्यांना ‘गालिचे’ म्हणत. या रांगोळ्या कधी शिरगोळ्याच्या चूर्णापासून, रांगोळीपासून तर कधी पाना – फुलांपासून काढल्या जात. पाण्यावरच्या तरंगत्या रांगोळ्या हे विशेष आकर्षण असे. रोज नवे चित्र काढले जाई. नवरात्रीचे नऊ दिवस व काही ठिकाणी तर कोजागिरीपर्यंत असे कलाप्रदर्शन चाले. नगरातील रसिक नागरिक सहकुटुंब सहपरिवार हे गालिचे पहायला प्रत्येक मंदिरात आवर्जून जात. कलाकृतीचे व कलाकाराचे कौतुक करीत.

अश्विन प्रतिपदेला पुण्याचे ग्रामदैवत असलेली तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी, भवानी माता, त्वष्टाकासार समाजाची अष्टभुजा, इ. सार्वजनिक अथवा खाजगी देवींच्या मंदिराबाहेर हळद-कुंकवाचे सडे शिंपडले जात. मंदिरे फुलांच्या माळांनी, तोरणांनी सजवली जात. सर्व देवदेवतांच्या मंदिरांमधे जसे घट बसत तसेच देवींच्या मंदिरातही स्थापिले जात. मंदिरातील देवी विविध मौल्यवान वस्त्रालंकारांनी सजवल्या जात. भोवतालचे देखावे आणि देवींची वाहने नित्य नवी, वैविध्यपूर्ण व आकर्षक असत. सकाळपासूनच भक्त देवीदर्शनाला येऊ लागत. संध्याकाळी गर्दी वाढत असे. देवीदर्शनाबरोबर मंदिरातले गालिचे पाहणे हे ही एक महत्वाचे आकर्षण असे.

अशी गर्दी होत असली तरी कोणत्याही मंदिरात केव्हाही सहज व सुलभ प्रवेश मिळे. मंदिरात धक्काबुक्की, रेटारेटी, चेंगराचेंगरी असले प्रकार घडत नसत. चोऱ्यामाऱ्या होण्याचे प्रमाणही नगण्य असे. पोलिसांच्या संरक्षणाची व अनुशासनाची सहसा आवश्यकता भासत नसे. महिलांची टिंगलटवाळी, छेडछाड कोणी काढीत नसे.

घरोघर थाटामाटात घट बसवले जात. नंदादीप प्रज्वलीत केले  जात. कर्ती मंडळी, ज्यात महिला व पुरुष दोघेही असत, या पुढचे नऊ दिवस उपवास करीत. या उपवासांचे काही प्रकार असे – केवळ फलाहार, केवळ जलपान, केवळ दुग्धपान, धान्यफराळ, दिवसातून एकदाच भोजन करणे म्हणजे एकभुक्त राहणे इ. इ.

या नऊ दिवसात अनेकजण देवी सप्तशतीचा पाठ करीत. यजमान स्वतः पाठ करू शकत नसेल तर ब्राह्मणाकडून करवून घेत. काहींच्या घरी चंडियाग केले जात. काही धनिक भाविक सप्तचंडी,नवचंडी, शतचंडी असे यज्ञयाग करीत. देवीचे गोंधळ घातले जात. डफ, तुणतुणी आणि संबळी कडाडत. भुत्ये नाचवले जात. सा-या गावाचा आसमंत धुपाच्या गंधाने कोंदाटून जात असे. सकाळी मोरपिसांची टोपी घातलेले वासुदेव दारी येत तर रात्री गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हाती पेटतलेले पोत नाचवणारे भुत्ये अवतरत. रात्रीच्या मंद मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात पेटते पोत हाती घेऊन फिरणारे भुत्ये मोठे चमत्कारिक, गूढ, रौद्र पण तरीही आकर्षक दिसत.

संध्याकाळी मंदिरामंदिरात व  वाड्यावाड्यात भोंडले आयोजित केले जात.  पाटावर हत्तीचे चित्र काढून त्या पाटाभोवती महिला, मुली फेर धरून, गाणी गात. दर दिवशी गाण्यांची संख्या वाढविली जाई.

त्या गाण्यांत गणेशदेव, लिंबांचे एकापाठोपाठ घेतलेले झेल, मामंजी, सासरे, त्यांची शेंडी, चंपी, गावच्या वेशीपर्यंत वहात गेलेला तेलाचा ओघळ, त्यात वाहून गेलेला हत्ती, सुनेने लावलेला कार्ल्याचा वेल, खट्याळ भाऊजी, कुजकट वन्सबाई,  वेडा आणि त्याची बायको, सासरचा व माहेरचा वैद्य, लोळण घेणारा कृष्ण इ.इ. अशी अनेक पात्रे, व्यक्तिमत्वे एकत्र, एकाच भोंडल्याच्या मंचावर जमत आणि स्त्रिमनातील उसासे – उमाळ्यांना वाट मोकळी करून देत.

शेवटी ‘खिरापती ओळखण्याचा’ उत्कंठावर्धक खेळ संपन्न होऊन, खिरापतींचे वाटप होई. खिरापत वाड्यातल्या प्रत्येकाला मिळे. त्यात मुले, पुरुष, जेष्ठ, अभ्यागत, वृद्ध या साऱ्यांचा समावेष असे.

रात्री मंदिरात, चौकाचौकात, वाड्यातील अंगणात, ओसऱ्यांवर, पेट्रोमँक्सच्या प्रकाशात पट, सारिपाट, गंजिफे खेळले जात. हे खेळ रात्री उशिरापर्यंत चालत, ते उत्तरोत्तर रंगत जात. या खेळात स्त्री व पुरुष दोघेही सहभागी होत. सामुदायिक गरबा, टिपऱ्या, दांडिया खेळण्याची गुजराथी पद्धत महाराष्ट्रात पोहोचली नव्हती.

काहीसा रेंगाळलेला ‘भादवी ताप’ दिवसा जाणवे पण सूर्यास्तानंतर वायुमानातील शीतलताही जाणवू लागे. हवेतला गारवा क्वचित अंगावर काटे उठवी. या दहा दिवसात दोन तीन वेळा तरी विजांचा कडकडाट होऊन आकाशातून ‘हत्ती बरसत’ पण तरीही सकाळी नदीपात्रावर, जलाशयांवर, वृक्षावृक्षातून धुके तरंगताना दिसे.

सार्वजनिक गणेश मंडळे व तालमीतील उत्साही तरुण देवीभक्त भल्या पहाटे फुलांच्या माळा घेऊन, त्या चतुःशृंगी देवीला अर्पण करण्यासाठी रस्त्याने वाजत-गाजत, नाचत, मातेच्या नामाचा जयघोष करीत घेऊन जात.

पुण्याजवळ पण थोडीशी गावाबाहेर असलेली पद्मावती व चतुःशृंगी ही दोन मंदिरे आहेत. पद्मावती सपाटीवर आहे पण चतुःशृंगी देवी मात्र एका टेकडीवर विराजमान आहे. नवरात्रीत तिचे विशेष महत्व आहे. दरवर्षी यानिमित्त तिथे जत्रा भरते. गावोगावच्या जत्रेसारखेच या जत्रेचेही स्वरूप असते. टेकडीच्या पायथ्याशी खाऊ खेळण्यांची दुकाने थाटली जात. नवरात्रींच्या दिवसात खरे पुणेकर एकदा तरी या जत्रेला जातात. एकेकाळी गावाबाहेर असलेले हे स्थान आता गावाच्या अगदी मध्यभागी आले आहे. मंदिराच्या टेकडीला आय टी क्षेत्रातील आँफिसाच्या उंच उंच इमारतीचा वेढा पडलाय. नवरात्रीत आजही तिथे जत्रा भरते पण पूर्वीची मौज आता राहिली नाही.

मी चार-पाच वर्षांचा असताना मला आमच्या शेजारचा गजानन अभ्यंकर काका सायकलवरून चतुःशृंगीला घेऊन गेला होता.

सिमला आँफिसवरून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या हाताला हे चतुःशृंगीचे मंदिर आहे. शनिवारवाडा ते मंदिर तीन चार कि. मी. अंतरावर असावे. या विद्यापीठ रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुने, प्रौढ अनेक वटवृक्ष होते. त्यांच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबलेल्या होत्या. ही झाडे इतकी दाट होती की दिवसा सूर्याची उन्हे सुद्धा रस्त्यावर पडत नसत. आता मात्र हे सगळे वृक्ष छाटले गेले असून दुतर्फा भव्य औद्योगिक कार्यालयांचे प्रासाद  उभारले गेले आहेत.

तर, गजानन काकाबरोबर जाताना त्याने अर्धे अंतर पार केल्यावर सायकल थांबविली आणि सायलवरून मला उतरवले. सायकल एका झाडाला टेकवून, मला बोटाला धरून तो रस्त्याच्या कडेला काहीश्या आतल्या भागात  घेऊन गेला. तिथे काही न बोलता भक्तिभावाने क्षणभर हात जोडून उभा राहिला.  पुढच्या क्षणी त्याने जमिनीवर साष्टांग दंडवत घातला. मी त्याची ही कृती न्यहाळत उभा होतो.  उठून उभा राहिल्यावर मी त्याला विचारले, ” हीच का चतुःशृंगी? इथे मंदिर कुठंय? देवी कुठंय? जत्रा कुठंय?” त्यावर तो हसला आणि उत्तरला, “मंदिर पुढे आहे. जाऊ आपण. आत्ता उभे आहोत ते आपल्या स्वतंत्र भारताचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथेच ‘रँड’ नावाच्या गोऱ्या दैत्याचा ‘चाफेकर’ नावाच्या महापुरुषाने वध केला होता. चल निघू. पुढची कथा जाताजाता सांगतो. ” त्याने रस्त्यात मला चाफेकरांची थरारक कथा ऐकवली खरी पण मला तपशीलात फारशी कळली नाही. त्यावेळी मला समजले नाही पण आज कळतोय त्यांच्या कृतीचा अर्थ. गजाकाका फारसा शिकलेला नव्हता. कुठल्याश्या हाँटेलात, खानावळीत की दुकानात कामाला होता. पण पुण्यातील एका सामान्य माणसाची ही राजकीय जाण आणि राष्ट्रभक्ती  किती प्रखर होती पहा!

दिवसामागून दिवस उजाडे. घटावर एकेक माळ सोडली जाई. अश्विन अष्टमी हा नवरात्रीतला सर्वात महत्वाचा दिवस. महिला या दिवशी घागरी फुंकत फुंकत देवींच्या मंदिरात जात. तिथेही घागरी फुंकल्या जात. काहींच्या अंगात देवीचा संचार होत असे. खंडेनवमीला यंत्रांची पूजा होई. काहींचे घट या दिवशीच उठत तर काहींचे दशमीला उठत. दशमी हा नवरात्र उत्सवाचा ऊखेरचा दिवस. हीच विजयादशमी, दसरा.

त्या दिवशी सकाळी,  “नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूचा बाप त्याला म्हणाला, मोरू, ऊठ लौकर” या वाक्याने पालक आपल्या झोपलेल्या मुलांना जागे करीत. अभ्यंग स्नान करून, नवे कपडे घालून मुले शाळेत जाण्यासाठी पाटीदप्तर घेऊन निघत. विद्यार्थी आपल्या पाटीवर एकाएकाचे फर्राटेदार  सरस्वतीयंत्र रेखाटत. शाळेत पाटीपूजन, सरस्वतीपूजन होई. शिक्षकांना सोने, म्हणजे आपट्याची पाने देऊन,नमस्कार करून, नाचत बागडत घरी येत.

घरोघर पुरणावरणाचा स्वयंपाक केला जात असे. लोकांचे नऊ दिवसांचे उपवास सुटायचे असंत ना. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला श्रीखंड करण्याची पद्धत होती. चितळे हे नाव रुळायचे होते. श्रीखंडाचा चक्का गोकुळदासकडून आणीत. चक्क्याचा भाव तीन रूपये शेर होता. सोन्यासाठी पी एन गाडगीळ हे नाव नव्हते. लोक सोन्याच्या खरेदिसाठी कन्हैयालालची पेढी गाठीत. सोने साठ रुपये तोळा भावाने मिळे!

दुपारी मुले शेवंती, झेंडू आणि आंब्याच्या पानांची तोरणे करुन घराच्या दाराखिडक्यांवर लावत.  संध्याकाळी पुरुषमंडळी शिलंगणाला घराबाहेर पडत. देव आणि जेष्ठांना सोने देऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन घरी परतत. येताना आठवणीने घरच्या लक्ष्मीसाठी काही खरेदी केली जाई. दारात मालकीण वाट पहात उभी असे. घरधनी येताच त्याला पाटावर बसविले जाई. मग तो आपल्या हातातल्या आपट्याच्या पानांनी समोरच्या पाटावर तांदळापासून बनविलेल्या राक्षचाचे उदर विदारून, त्यात दडविलेले सुवर्णवेढणे बाहेर काढी. पत्नी पतिराजांना औक्षण करी. मग पतिराज कोटाच्या खितातून एक लाल रंगाच्या कागदात गुडाळलेली ओवाळणी व काही आपट्याची पाने ताम्हणात ठेवी. ही असे गृहलक्ष्मीची ओवाळणी, एखादा सोन्यामोत्याचा दागिना किंवा एखाद्या तोळ्याचे पिवळेधमक सुवर्णवेढणे!

त्याकाळी मुलांना दसऱ्याच्या मुहूर्तावर शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश दिला जाई. मी सुद्धा असाच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शाळेत प्रवेश घेतला होता.

तो माझा शाळेचा पहिला दिवस मला स्पष्ट आठवतोय. मोठ्या बहिणीने मला त्या दिवशी स्नान घालते. नवी सदरा-चड्डी नेसवली. केसांना तेल चोपडून, त्यावर निळ्या रंगाची कृष्णछाप जरीची टोपी दडपून, डोळ्यात काजळ फासून मला शाळेत आणून सोडले. हातात काळी कुळकुळीत, कोरी करकरीत दगडी पाटी आणि अंकलिपीचे पुस्तक दिले. वर्गातल्या बाकावर बसून मी बाईंच्या हातात हात देऊन शिक्षणाचा ‘श्री गणेश’ गिरविला. ते साल होतं सन १९५१!

तेव्हापासून आजपर्यंत मी अव्याहतपणे, नित्य नवीन काहीतरी शिकत आलोय, काहीतरी लिहित आलोय! पुढेही हे असेच चालावे ही इच्छा आहे. ईश्वराची इच्छा काय आहे ते त्यालाच ठाऊक!!

वाचकहो, यानिमित्त या शारदीय नवरात्रीच्या व विजयादशमीच्या आपणा सर्वांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares