पुढेही असेच अनुभव आल्याने नातवंडांच्या सोबत टीव्ही बघणं आजीनं सोडूनच दिलं .
“या आपल्या चार अन् सहा वर्षाच्या छोट्यांमध्ये क्युरिआसिटी फार आहे नाही.. .! त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची म्हणजे…. आजी भयभीत झाल्यासारख्या बोलल्या.”हो ही नवी जनरेशन अतिशय स्मार्ट आहे .आपल्या मुलांच्या पेक्षाही” आजोबांनी दुजोरा दिला.
” ही दोघं मुलं बाहेर तर इंग्रजी बोलतातच…आणि घरात पण ..घरात तरी चांगलं मराठी बोलायला हवं नाही का…!” आजीबाई आजोबांचे मत घेत होत्या.
“अगं त्यांची तरी यात काय चूक आहे.. ?त्यांच्या लालन -पालनमधेही … मी मागच्या दोन तीन वेळा पाहिलंय नं सगळे किडस् इंग्लिश मध्येच बोलतात. त्यातनं ह्यांच्या बाबाची सारखी ट्रान्सफर होते. कधी चेन्नई तर कधी बेंगलोर तर कधी हैदराबाद.. मुलं सारख्या नव्या लॅंग्वेज कशा शिकू शकतील? इथल्या सगळ्याच लहान मुलांची कॉमन लैंग्वेज आहे इंग्लिश.शाळेत पण इंग्लिश बोलणे कंपल्सरी ..घरात त्यांच्याशी चांगलं मराठी बोलायला वेळ कोणाकडे आहे? त्यामुळे घरात इंग्रजी, मराठीची खिचडी लैंग्वेज ती दोघं बोलतात.”हे बोलताना आजोबाही खिचडी भाषाच शिजवत होते.
आता संध्याकाळी हात-पाय धुऊन देवाची स्तोत्रं ,परवचा म्हणून झाल्या की त्यांना गोष्टी सांगायचा उपक्रम आजीने सुरू केला.मुलगा-सून खुश झाली.
“अरे आजीकडून सगळं शिकून घ्या बरं… संस्कृत स्तोत्रेपण…आम्ही पण लहानपणी संस्कृत श्लोक म्हणायचो. संस्कृत पाठांतराने वाणी कशी शुद्ध होते.” मुलगा म्हणाला. ” मग बाबा तू का नाही आम्हाला शिकवलंस?” धाकट्याच्या प्रश्नाकडे अर्थात् त्यानं कानाडोळा केला. तोपर्यंत थोरला विचारता झाला,” वाणी म्हणजे?… संस्कृत म्हणजे?… शुद्ध म्हणजे ?”
“आजीबाई या प्रश्नांच्या एके फोर्टी सेवनला तुम्हीच तोंड द्या इथे असेपर्यंत .”म्हणत,हसत हसत मुलगा तिथून निघून गेला.
मुलगा सुनेचा हाय प्रोफाईल जॉब .त्यांना नव्हता जादा वेळ मुलांसाठी द्यायला. ‘ ‘लालन-पालन’च त्यांच्यावर जे संस्कार करायचे ते करायचा. पण सध्या आजी-आजोबा आल्यामुळे तेही बंद केले होते. आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम क्लब मध्ये रमायला सुरुवात केली. त्यामुळे बिचारीआजीच ” का ?कोण? कसं? केव्हा? किती?” यासारख्या प्रश्नांच्या बाराखडीत अडकून पडली गेली.
पण आजीही डोकेबाज होती. नातवंडांसाठी गोष्टी सिलेक्ट करताना जास्त प्रश्नांच्या तावडीत आपण सापडणार नाही अशी काळजी ती घेऊ लागली.
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
व्रत म्हटले की साधारण स्रियांची व्रते डोळ्यासमोर येतात. पण पुढे जाऊन पुरूषांचीही,अगदी लहान मुलांची आभ्यासाची व्रतेही यामधे अंतर्भूत होऊ शकतात .अगदी आता सध्याच्या काळात कोणी अध्यात्माच्या माध्यमातून, मनोकायिक स्वास्थ्य ,आनंद,शांती ,समाधान प्राप्त करण्याच्या कलेच्या प्रसाराचे व्रत घेतले आहे. किती व्रते सांगावी तितकी कमीच .पण मला आज व्रतस्थ अशा माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या माणुसकीच्या व्रताचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .काल व परिस्थिती अनुरुप त्यांचे व्रतही कमी लेखता येणार नाही.
माझे वडील, तात्या पूर्वीच्या बार्शी लाईट रेल्वे मार्गावरील ‘ढोकी ‘या स्टेशन वर ,स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते .भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा होत होती. हैदराबाद संस्थानचा निजाम भारतीय संघराज्यात यायला तयार नव्हता. ‘ढोकी’ हे दोन्हीकडील सरहद्दीवरील स्टेशन! गावात आजूबाजूला, खेडोपाडी रझाकारांच्या धुमाकूळ चालू होता. गावागावातील पुढाऱ्यांना धमक्या येत होत्या. खूनही पडत होते. हिंदूंची ही आंदोलन चालू होती .तेही आक्रमक व्हायला लागले होते .सर्वत्र मारामाऱ्या, दंगे, जाळ पोळी सत्र चालूच होते. गावचा पाटील, ‘ किशनदास गराडे ‘,धमकीने घाबरून साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. तेथूनही तो सुटू शकला नाही. रझाकारांनी त्याच वेषात ओढत बाहेर आणून ठोकून काढले. खूप आरडाओरडा झाला .अखेर खच्च. संपवला त्याला—. जाळपोळीही चालू होत्या. ‘जवळा’ नावाचे गावच्या गाव जाळून टाकले. अगदी खोपटी ही त्यातून सुटली नाहीत. मुक्या जनावरांसाठी ठेवलेल्या गंजीची जळून राख व्हायची. शेतात उगवलेली उभी पिकच्या पिकं कापली जायला लागली. अनेकांनी आपले वैयक्तिक हेवेदावे ही यातच वापरून घेतले. हे सगळं सांगण्याच प्रयोजन काय तर अशा खडतर पण नाजूक वातावरणात , तात्या स्टेशनचे काम करीत होते एकनिष्ठेने, आणी तणावपूर्ण परिस्थितीत,! स्टेशन सांभाळण्याच्या कर्तव्याचे व्रत घेऊन!
हे स्टेशन दोन्हीकडील लोकांना हवे असल्याने, ते सांभाळण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती .स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम हा फौजदार, रसूल आणि मोहम्मद हे हवालदार रुजू होते. तात्यांना इकडून, तिकडून सर्व नातेवाईकांकडून तारा येत होत्या. निरोप ,पत्र, चिट्ठया,—–नोकरी सोडून या. जीवावर उदार होऊन राहण्याची गरज नाही. इकडे दुसरे काहीही पाहू. सर्वांना काळजी वाटते .पण मोडल तर ते व्रत कसलं? तात्या नोकरीशी एकनिष्ठता सोडायला तयार नव्हते. ते सतत आईला सांगायचे ‘मुलांना घेऊन तू माहेरी गणेशवाडीला ,नाहीतर सासरी जमखंडीला जा, या दंगलीत भडकलेली डोकी काय करतील सांगता येत नाही”. ती म्हणायची “आम्ही परगावी जाऊन काळजीत अर्धमेले होण्यापेक्षा सर्वांचंच इथंच काय व्हायचे ते होऊ दे. आणि आपली गोठ्यातली जनावरं ,कुत्री ,मांजर, हरीणी, शेळी ही आपली मुलंच ना! त्यांचं काय करायचं? या सगळ्यांबरोबर मीही इथच राहणार.” असं म्हणून तात्यांना गप्प करायची. या मुक्या जनावरांवर दोघांचाही खूपच प्रेम होत. त्यांच्या सेवेच जणू व्रतच दोघांनीही घेतल होत. उतू नको, मातू नको घेतला वसा टाकू नको ही संस्कृती तिच्यावर बिंबलेली होती.
दररोज नवीन नवीन घटनांना सामोरं जावं लागत होतं. स्टेशन मध्ये तात्या काम करत असताना, आप्पा पोर्टर कोणाशी तरी भांडत भांडत आत आला. तावातावाने बोलायला लागला. चिडलेल्या रझाकारांनी स्टेशन मध्येच त्याला कापून काढला. “मारू नका, मारू नका” तात्या सांगत होते. पण ” जास्त बोलाल तर फुंकून टाकू.” अस उत्तर आल. खुर्ची, टेबल ,वह्या सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडले. भयानक दृश्याला सामोरे जावे लागले. अधून मधून तात्यांना तारखांना निजामाबादला जावे लागायचे .तात्या स्टेशन मध्ये ,आई मुलांना,( छोटे उषा व प्रकाश) घेऊन घरात आणि जनावरं गोठ्यात सगळेच तणावाखाली राहात होते .इब्राहिम रसूल आणि मोहम्मद तिघेही सतत सांगत असत —
” चिंता मत करो ।जब तक हम है तब तक कोई आपका बाल भी बाका नही कर सकता”.। असं ऐकलं की थोडा धीर यायचा. पण तरीही पुन्हा कधीतरी मनात पाल चुकचु कायची. आपण जे अन्न खातो, तेच त्यांनाही द्यायची .अधून मधून काही ना काही देत रहायची. माणुसकी जपायची. तिघांनाही विशेषतः इब्राहिमला तात्यां बद्दल फार आदर होता. आपुलकी होती. कौतुकही होते. तात्यानाही, त्यांच्याबद्दल ओढ वाटायची .बाहेर घडणाऱ्या ( दोन्हीकडील) बारीक-सारीक गोष्टी तो तात्यांना येऊन सांगायचा.
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ५ ☆
जवळचे लोक मला नेहमी विचारतात, “ आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस—-?”
मी खूप काही कमावलंय—–
—-आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं, हे पुत्रत्व मी कमावलं !
—-आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला, तो मायेचा हात मी कमावला …!
—-आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले, हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली…!
—-शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले–” I am proud of you my child “ हे शब्द — या शब्दांतुन child असणं मी कमावलं !
—-सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, “ मी कॉम्प्युटर बनवला, पण तू माणूस घडवतो आहेस— “ –मी हा “विजय” कमावला…!
—-विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते, ” भारीच करतोय तु राव कायतरी, आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर… हा घे माझा पर्सनल नंबर–” हा “विश्वास” मी कमावला… !
—-तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले… !
—-जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो… परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो… माणुस म्हणुन चेहरा मी कमावला… !
—” ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तू गमावलंस किती… ? “
— अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे —-
—ह्या कामानं मी…’ मी ‘पणा गमावला !
—आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला !
—केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामामध्ये गमावला !
—स्वतःच्या चेहर्यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला !
—सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली—!
पोरा – लेकरा- बाळा या उबदार शब्दात मी विसावलोय आता—-
मला खुर्चीपेक्षा — उकीरडा आवडायला लागलाय आता !
मला उष्टं… खरकटं… शिळं … आणि नासकं जेवण आवडतं हल्ली, आणि आवडत राहील
—-तोपर्यंत —–
—-जोपर्यंत माझ्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत !
—-जोपर्यत माझा भिक्षेकरी कष्टकरी होत नाही तोपर्यंत !
—-जोपर्यंत तो गांवकरी होणार नाही तोपर्यंत !
—–माझ्या आईबापाला जेव्हा मी “ भिक्षेकरी “ या संबोधनापासून स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल … !
सकाळचा नेत्र सुखद मॉर्निंग वॉक…… याच्या पुढचं, हे चौथे चं म त ग असल्यामुळे तुम्हांला एव्हाना पाठ झालेलं असणारच, अशा माझ्या खात्रीलायक (?) समजूतीतूनच आजच हे चं म त ग सादर करतोय !
तर नेहमीप्रमाणे सोफ्यावर पेपर वाचत, बोक्या सारखा (कोब्रा असल्यामुळे डोळ्याचा रंग त्याच्या डोळ्याशी मिळता जुळता असणारच!) तो जशी दुधाची वाट बघत बसतो तसा, एक डोळा किचनकडे ठेवून, बायकोच्या हातच्या पहिल्या गरमा गरम चहाची वाट बघत बसलो होतो ! पण दहा मिनिट झाली तरी जमीन हादरली नाही ! मग मीच पेपर पुन्हा पुन्हा उघडझाप करून त्याचा आवाज किचन मधे ऐकू जाईल इतपत करून बघितला ! तरी पण टाचणी पडून त्याचा सुद्धा आवाज ऐकू येईल इतकी किचन मधे शांतता ! आता हा pin drop silence आपल्या भाषेत कोणी आणला, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल, कारण माझ्या मते अशी एखादी टाचणी खरंच जमिनीवर टाकून, त्याचा कोणी आवाज ऐकला असेल, यावर शेंबड पोर पण विश्वास ठेवणार नाही ! असो ! साहेब जाताना ज्या अनेक गोष्टी सोडून गेला त्यातलीच त्याची ही एखादी पिन मागे राहिली असावी, असा आपला माझा अंदाज ! यावर पिना मारण्यात पटाईत लोकंच जास्त पिना, सॉरी (हा आणखी एक साहेबाने आपल्याला बहाल केलेला तोंडाचा दागिना !) प्रकाश टाकू शकतील, या विषयी माझ्या मनांत कसलीही शंका नाही ! तुम्हांलाच काही शंका असेल तर स्वतःच एखादी पिन टोचून, सॉरी, जमिनीवर पाडून तिचा आवाज येतोय का ते बघा आणि मला कळवा म्हणजे झालं !
आता चहासाठी बायकोला स्वतःहून बोलावण्याशिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नव्हता, कारण सकाळचा पहिला चहा पोटात गेल्याशिवाय पुढची ‘सगळीच आन्हीक शब्दशः अडकणार होती’ ! शेवटी, मी जशी रडणाऱ्या लहान मुलाची ज्या आवाजात समजूत काढतात, तो आवाज माझ्या गळ्यातून काढायचा प्रयत्न केला आणि “अगं ऐकलस का, मला जरा च…….” माझा हा उच्चारायच्या आत बायको कधी नाही तो ट्रे मधे चहा बरोबर, माझ्या आवडत्या गूड डेच्या बाजूला उपम्याची डिश अशा सरंजाम्यात माझ्या समोर हसत हसत हजर झाली ! काय सांगू तुम्हांला मंडळी, माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना ! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, with Rayban गॉगल अशी माझी अवस्था झाली ! “अहो, सॉरी हं !” बघा मगाशीच मी म्हटलं नां, साहेबाने दिलेला तोंडाचा दागिना, लगेच हिच्या मुखातून माझ्यासाठी कधी नव्हे तो पहिल्यांदा बाहेर पडला ! मी पण वरकरणी “अगं सॉरी कशाला म्हणायला हवं, रोज तू मला न मागता लगेच चहा आणून देतेस आणि आज एक दिवस उशीर…..” “देते हो, पण म्हटलं आज तुम्हाला थोडं ट्रे मधून surprise पण द्यावं, म्हणून उशीर झाला !”
आता मला सांगा, मी आज मला मिळालेल्या पहिल्या टीच्या, ट्रे ट्रीटमेंटच्या सरप्राईज मधून अजून सावरलो नव्हतो, तर बायको म्हणत होती तुम्हाला आज सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे म्हणून ! अरे बापरे, आता हे तिचं आणखी नवीन सरप्राईज माझ्या खिशातल्या पाकिटाला किती जड जाणार आहे, असा मनांत विचार करत “कसलं गं सरप्राईज ?” असं म्हणत चहाचा कप हातात घेऊन एक घोट घेतला आणि तोंडातून नकळत खरोखरचा “व्वा !” आला. त्याला कारण आजच्या चहाची चव खरंच अमृततुल्य होती ! माझा “व्वा” ऐकून बायकोने माझ्या मागे येवून माझ्या गळ्यात लाडाने हात टाकले ! “अगं मुलं मोठी झाली आपली आता आणि तू असं…” “आई येणार आहे पंधरा दिवस रहायला !” तिचे ते शब्द मी पीत असलेल्या गरम चहा सारखे माझ्या कानात गरमा गरम शिरले आणि मी “काय s s s s ?” असं तितक्याच गरम आवाजात उच्चारता झालो ! “म्हणजे ?” “अगं तसं नाही, मला ‘कधी’ म्हणायचं होतं, पण चुकून ‘काय’ असं आलं तोंडातून !” “मग ठीक आहे !” असं म्हणत ती माझ्या समोर येवून बसली. माझा शब्दखेळ बहुतेक तिच्या पचनी पडला असावा असं समजून मी परत एकदा “कधी येणार आहे आई ?” असं जमेल तितक्या मऊ मुलायम स्वरात तिला विचारलं. “या पंधरा तारखेला आणि तीस तारखे पर्यंत परत जाणार आहे !” बायको मला आनंदाने सांगती झाली. “अगं पण तेंव्हा तर आपण दोघ महाबळेश्वरला जाणार आहोत !” मी पुडी सोडून दिली. “काय s s s ? हे कधी ठरलं, तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत महाबळेश्वरच्या या आपल्या प्लॅन विषयी !” “तूच नेहमी सरप्राईज द्यायच असं थोडंच आहे, कधीतरी या पामराला तो चान्स मिळू दे की !” मी हसत हसत गुगली टाकली.
त्यावर लटक्या रागाने खूष होऊन बायको मला विचारते कशी “हे मधेच काय तुम्ही महाबळेश्वरचे काढलंत आणि ते सुद्धा मला मेलीला जराही थांगपत्ता न लागू देता ! अगदी कमालच झाली बाई तुमच्या या अनोख्या सरप्राईजची !” “अगं कमाल वगैरे काही नाही ! बँकेने नवीन हॉलिडे होम बांधलं आहे महाबळेश्वरला आणि पेन्शनर लोकांना पण त्याचा स्वस्तात लाभ घेता येतो असं परवाच मला लेल्या म्हणाला.” “असं होय, नाहीतर सिझनमधे तिथल्या हॉटेलात रहाणं म्हणजे कठीणच होतं आपल्याला.” “अगं म्हणून तर चांगल पंधरा दिवसाचं बुकिंग केलय आपल्या दोघांच !” “नाही, पण बुकिंग confirm आहे नां आपल्या दोघांच ?” “म्हणजे काय, तू काळजीच करू नकोस, बिनधास्त लगेच तयारीला लाग !” असं म्हणून उरलेला चहा मी संपवला आणि ओला नारळ आणि कोथिंबीरीने सजलेली उपम्याची डिश हातात घेतली ! ते बघून, “मी आलेच हं आईला फोन करून !” असं अत्यानंदाने घोषित करून बायको बेड रूम मधे पळाली पण ! ते बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. आता तुम्ही मला विचाराल सुटकेचा निश्वास का टाकला तुम्ही ? तर काय सांगू तुम्हांला मंडळी, आमच्या सासूबाई म्हणजे मोठं खटलं आहे ते ! अतिशय कर्मठ, या कलियुगात पण सोवळ ओवळ पाळणाऱ्या, इतकं की सकाळी अंघोळ झाल्याशिवाय कुणीही चहाच काय, पाणी पण प्यायचं नाही असा त्यांचा दंडक ! या वरून तुम्हांला कल्पना येईल की मी सुटकेचा निश्वास का टाकला ते !
मी बायको आत गेल्याचे बघून उपम्याचा पहिला घास घेणार इतक्यात, बायको हातात मोबाईल घेऊन बाहेर आली आणि मला म्हणाली “अहो आईचा नंबर बदलला आहे का ? लागत नाहीये !” “अगं मला कसं माहित असणार तुझ्या आईचा नंबर बदलला असेल तर ? ती तुलाच आधी सांगेल नां ?” त्यावर थोडं वैतागून मला म्हणते कशी “अहो माझ्या आईचा नंबर मला तोंड पाठ आहे, तो अजिबात बदललेला नाही, कळलं ? मी तुमच्या आईचा मोबाईल नंबर बदलला आहे का असं विचारत्ये ?” मी पण तेवढ्याचं शांतपणे तिला म्हटलं “नाही गं, माझ्या आईचा पण जुनाच नंबर आहे, कळलं ! अगं पण माझ्या आईचा मोबाईल नंबर कशाला हवाय तुला ?” यावर ती तितक्याच थंडपणे मला म्हणाली “अहो असं काय करता, तुमची आई येणार होती नां आपल्याकडे पंधरा दिवस रहायला ? पण आता आपण तेंव्हा तर महाबळेश्वरला असणार, मग तिला तसं सांगायला नको का, आत्ता येऊ नका, नंतर कधीतरी या म्हणून ?” तीच ते बोलणं ऐकून, माझ्या पहिल्या वहिल्या उपम्याच्या घासाचा चमचा, माझ्या ओठाजवळ येता येता, हवेतल्या हवेत राहिला आणि बायकोच्या या कुटील सरप्राईज मुळे त्याच अवस्थेत मी फक्त बेशुद्ध व्हायचा बाकी राहिलो !
नातवंडांच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे होता. त्यामुळे आजी- आजोबा मोठ्या उत्साहानं मुलाकडं जायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ,नातवंडांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके, इतर सटरफटर वस्तू… आजोबांच्या सूचना डावलून आजीबाई सामान वाढवतच चालल्या होत्या. गाडी सुरु झाली तशी आजोबांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मुलाच्या घरी पोहोचता क्षणीच ,”आजी- आजोबा” म्हणत चार बाल हातांनी त्यांच्या कमरेला विळखा घातला.’सुख- सुख म्हणजे वेगळं काय असतं!’ विचारानं दोघेही गहिवरली. नवे- नवे कपडे, खेळणी यात गुरफटलेल्या नातवंडांना इकडे तिकडे बघायला फुरसतच नव्हती .
दुसऱ्या दिवशी नातवंडांच्या कार्यक्रम बघून त्यांना खूप धन्यता वाटली. डान्स ,गाणी, फनी गेम्स स्पर्धा त्यांनी सगळं खूप एन्जॉय केलं.
” छान ,अगदी दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम होता नाही? किती स्मार्ट असतात हल्लीची मुलं, नाही तर आपल्या वयाच्या लोकांचं बालपण….” आजी म्हणाल्या. आजीच्या म्हणण्याला आजोबांनी ही दुजोरा दिला.
पुढच्या दिवशी मुलांचे आई बाबा गेले ऑफिसला. मुलांना गॅदरिंग संपल्याची सुट्टी होती आणि आजी आजोबा घरी असल्याने लालन-पालनमधे… (पाळणा घराचे नाव)… जायचा पण प्रश्न नव्हता. आजोबा पेपरात डोकं घालून बसले आणि आजींचा आवडता टाइमपास सुरू झाला…. टीव्ही सिरीयल बघण्याचा…, ‘नवऱ्याची बायको’ चालू होतं! शनायाशी गुरुचं लग्न लागत होतंआणि राधिकाचं रडणं सुरू होतं. थोरला नातू जवळ येऊन बसला होता. “आजी ती गर्ल का रडतेय ?ती त्या अंकलची वाईफ आहे का? मग तो दुसऱ्या गर्लशी लग्न का करतोय ?..म्हणजे तो गुरु अंकल बॅड बॉय आहे का?”प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
” हो रे बाबा, “आजी टीव्ही वर टिकवलेली नजर न काढता उत्तरली… ‘ठाय्-ठाय’ टी.व्हीवर खोट्या खोट्या गोळ्या झाडत तो पळून गेला.
मुलगा सुनेला कामापुढे टीव्ही बघायला वेळच नसायचा. आणि नातवंडांना लालन पालन मधे फक्त बेबी टीव्ही, किंवा छोटा भीम या सारख्या मालिकाच दाखवायचे ,ते पण थोडाच वेळ !
रात्री आजीने कोणती तरी राजा राणी ची मालिका लावली होती. थोरला- धाकटा दोघंही बघायला बसले… आणि त्यांचे प्रश्न सुरु झाले ,”आजी हाअंकल कोण आहे ?” ..”राजा चंद्रसेन.”..” ती क्वीन आहे का..?”..”हो .”आणि ती दुसरी गर्ल?..ओह! ती पण क्वीन ?..”एक किंगच्या दोन-दोन क्विन ?”नातवंडांचे प्रश्न !
“अरे पौराणिक ,ऐतिहासिक अशा पूर्वीच्या काळात एका राजाच्या दहा दहा पण क्विन्स असायच्या. “आजोबांनी नको तेव्हा नाही ती माहिती पुरवली. “ओ माय गॉड!” दोघं एक सुरात ओरडली, “आजी म्हणजे तो चंद्रसेन किंग,तो पण बॅड बॉय आहे का त्या गुरुसारखा?”
बिचाऱ्या आजीला उत्तर सुचले नाही. तेवढ्यात थोरला म्हणाला , “आजी हे नको बघायला. त्यापेक्षा क्रिकेट लावूया.” चॅनल बदलून क्रिकेट, न्यूज वगैरे बघण्यात नातवंडं आणि त्यांचे आई-बाबा गुंग झाले.
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ४ ☆
—आज सहा वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब 1100 इतक्या लोकांचं आहे. यात मला 200 ते 300 इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला 200 ते 300 पोरं सुद्धा आहेत !
—–आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं !
या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता 1100 भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत.
यांच्या, म्हणजेच आमच्या 52 पोराबाळांचे शिक्षण करत आहोत, याहून आनंद कोणता ?
डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजीआजोबांचे रस्त्यांत अपघात होतात, यात त्यांचे जीव जातात, हातपाय मोडतात…. ते टाळावे म्हणून अशा 950 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे.
रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या 22 आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे. ते तिथे माझे आई बाप – आजी आजोबा म्हणूनच राहतात. स्वतःचं नाव आणि आडनाव सुद्धा ते विसरून गेले आहेत…आता ते आडनाव सुद्धा “सोनवणे” म्हणुन लावतात ! ‘ सोनवणे ’आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता… !
पण, आईबापाला आधार दिला म्हणून स्वतःला सुदैवी समजू , की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू—-?——-या विचारांत आजही झोप लागत नाही मला !
हा भीक मागणारा समूह जर कष्टकरी झाला, तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणीव झाली .—मग भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवून ” भिक्षेकरी ते कष्टकरी “, आणि “ कष्टकरी ते गावकरी ” ही आमच्या कामाची टॕगलाईन मी ठरवली !
——माझ्या शब्दांना भिक्षेकरी गटामध्ये थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर, मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, आणि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यास सुरुवात केली– याला यश येऊन 105 कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे , आणि ही कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.
रस्त्यावर चालणार्या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली——
—-पब्लिक चॕरिटी कमिशनर आॕफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल, लेले हाॕस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकित संस्था आणि व्यक्ती !
अशा संस्थांमधील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणंसुद्धा “मुश्कील ही नही नामुमकीन है” . —तरीही ही मंडळी मला लहान पोरगं समजून मला वेळ देतात— माझं ऐकून घेतात—मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात ! लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच…!!! —–कसे ऋण फेडावे यांचे ?
याच प्रवासात आपल्यासारखे सुहृद भेटले आणि आपण माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली.
मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी, करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सुहृदांना पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो, आणि सल्ला सुद्धा घेतो.
——-यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली. शिवाय हे काम फक्त डॉक्टरचं नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं !
न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी,— माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा !
हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा… !
भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले.
शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने माझा हुरूप आणखी वाढला.
काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात. या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही—–पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात. माझं काम नाही… !
——ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच, माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा !
भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता……..
‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.
मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती.
पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो.
कितीला देणार ?
क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.
त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस ?
तर म्हणाला, पुस्तकच नाही तर मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.
मला जाता जाता ‘सेल्स’ मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.
मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.
त्याला म्हणालो, “काही खाणार ?”
बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला
‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर ?’
हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले.
वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.
एक मिनिट तो शांत झाला आणि म्हणाला, ‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’.
अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. त्याच्याबरोबर आत शिरताना मला काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं.
आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली. वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती.
आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती.
मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी) मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो, “काय रे दत्तू, पुण्यात कधी आलास ?”
२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चार भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”
आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो.
त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी ?’
म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”.
रोज सकाळी ‘बॉम्बे’ वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.” आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूडमध्ये आला होता.
मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का ?’
तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो”
मी विचारलं, बहिणीचं काय ? तिला तरी शाळेत पाठवता का ?
हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो.
सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिश भाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई ? पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.
मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स” करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आले तर ? आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला ?
तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटा-चमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी,सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला,”साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.
क्षणभर विचार आला; श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.
सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे ?
म्हणाला,”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो”
मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार ?
आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.
मनात म्हणलं, “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस ? तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार ?
म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब ?
मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे, तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू.
दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे ? आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी.
मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे ?
मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार ?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण”
बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको । आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया ।बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है । लेकीन क्या करे साब, हम लोग का भी धंदा है ना ? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा ।” मला त्याचंही पटले.
पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना ? जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते, त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.
बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, “मारायची का एक चक्कर गाडीतून ?”
तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.
त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता. उतरल्यावर बघून समाधानानी हसला. म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?”
म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की.
“हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले”
नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.
तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत?
याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे……
पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते…..!!
हा पोरगा नक्की पुढे जाणार, आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला, नेमकं अनाडी मधलं ‘किसी की मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं. योगायोगच म्हणायचा नाहीतर काय….!
णूस किती शिकला याला महत्त्व नाही तर त्याचे आचरणात किती शिक्षितपणा आहे हेच महत्वाचे नाही का ??
साभार – अंतरजाल (Internet)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆
मित्र म्हणायचे, “ काय बे आब्या , उतरली का रे मस्ती तुजी ? साल्या, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तू मोटा तीसमारखान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ? एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता, नोकरी सोडून जो शहाणपणा केला आहेस—भोग त्याची फळं… त्याच लायकीचा आहेस xxxx तू … ! ”
——ही xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी … !——-ही शिवी मी मनात जपुन ठेवलीय—–फ्रेम करुन– आणि या फ्रेमवर मी खूप प्रेम करतो !
——मी पूर्ण डिप्रेस झालो होतो, डिप्रेस करणारे माझेच होते…!
——बुडण्याचं दुःखं नसतं—-मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही– याचंही दुःखं मुळीच नसतं—पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !
मी या दुःखात बुडुन गेलो !
तरीही निर्लज्जासारखं मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये मी रोज रोज जायचो.
नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो, त्यांच्या पोटभर शिव्या खायचो, रात्री झोप लागायची नाही, कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं…. !
——हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 31 महिने चाललं—–!
एकेदिवशी, अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर 24 वर्षे पडलेले एक आजोबा दिसले. त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे. त्यांचं सर्व ड्रेसिंग करून, त्यांना स्वच्छ करून
“आपलं घर” च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं.
–या बाबांना पूर्ण माणसात आणलं….! ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले——!
भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं… !
यानंतरही या भिक्षेकर्ऱ्यांनी मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या—- !
—आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं…!—-
—–इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला 31 महिने गेले होते—आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो—-!
—-हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासून परवानगी दिली.
आॕगस्ट 2015 ते मार्च 2018 अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो—!
हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता… खडतर होता… ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच वर्षे झुंज द्यावी लागली.
या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे, खात असे—!
भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली—- !
—–भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात—-MPSC आणि UPSC पेक्षा अवघड ! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!!
—–आणि मग साधारण एप्रिल 2018 पासून माझं “ डॉक्टर फाॕर बेगर्स “ म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं.
डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार – पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो, आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते.
मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो !— होय—-मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो… !
——–ही पदवी एकदा हातात पडल्यानंतर मात्र, मी मागं वळून पाहिलंच नाही.
आम्ही आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे—-
बिन बाळंतपणाची मनिषा… आई झाली त्यांची !
लगीन झालेली बाई सर्व गोष्टीं आपल्या नव-याला, नाहीतर आपल्या बापाला सांगते..
——–सांगायला अभिमान वाटतो की, आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे.
मला विचारल्याशिवाय आज कोणतीही गोष्ट यांच्यात होत नाही—- यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो. यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात—! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात—पण आज भिक्षेकरी पोरी मला नि मनिषाला त्यांच्या आई अगोदर आम्हाला सारं सांगतात —–
पोरी मलाच बाप समजाया लागल्या—-आईशप्पथ –मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा पण बाप झालो—-! बापापेक्षा पोरगी वयानं मोठी… पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं… आणि नात्याला वय नसतं !
भिक्षेक-यांच्या शंभराहून अधिक पोरांची नावं आज “अभिजीत” आहेत—पन्नासहून अधिक पोरींची नाव आज “मनिषा” आहेत… !
परंपरा या नावाखाली आपण बऱ्याचदा सारासार विवेकबुद्धी हरवतो आणि भले -बुरे याचा विचार न करताच परंपरेशी बुद्धी गहाण ठेऊन एकनिष्ठ रहातो, मनाला न पटले तरी मनाचा दगड करतो, ज्या समाजात फुले, आगरकर, कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक आयुष्याची होळी करून गेले असले तरी !
परवा एका नातेवाईकांच्या घरी माती सावरणेच्या प्रसंगाला गेल्यावर मन पेटून उठवणारा पण हतबलता लक्षात येऊन मन विषण्ण झाले तो प्रसंग असा..नवरा कावीळ ने गेला लग्न होऊन अवघे दोन वर्षे झालेले, लग्न जोडीदार याचा अर्थ कळायच्या आतच मुलीवर हा प्रसंग, त्यातच मुलगी शामळू, भित्री, नुकतेच कॉलेजचे शिक्षण संपवून हात पिवळे झाले, हळदीचा रंग अजून फिकट व्हायचा होता तोपर्यन्त तिच्यावर आलेला हा प्रसंग ती कोलमडली या अनपेक्षित धक्क्याने, मानसिक अवस्था बिकट झाली, ती नुसतं रडतच होती … विधिलिखित कुणी बदलू शकत नाही, हेच खरे !तिसरा दिवस …नातेवाईक गोळा झाले, नैवेद्य भरला अन …अन तो प्रसंग आला कुणाही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये असा …तिचं अहेव लेण उतरून नैवेद्यावर ठेवण्याची घाई ..कुणी जायचे मंगळ सूत्र तोडायला ? कुजबुज वाढली ..”आवरा …”पुरुषमंडळी बाहेरून ओरडत होती …इतक्यात एक विधवा वृद्धा धीर धरून पुढे आली …खरेच किती विदारक हे …पहिले मंगळसूत्र ….ती मुलगी तोंड लपवून हुंदके दाबत होती तिचा श्वास घुसमटला …ते चित्र मला पाहवेना ..मी उठले न जमलेल्या सर्व जमावाला उद्देशून म्हणले, ” खरेच याची गरज आहे का ?? आपण सगळे सुशिक्षित आहात मग का अश्या पद्धतीने मंगळसूत्र तोडत आहात ? मुलीची मानसिक अवस्था तर पहा ! “
क्षणभर एकदम स्तब्धता पसरली माझं बोलणं अनपेक्षित होतं …कुजबुज सुरु झाली …”ही कोण ?काय करते ?” बऱ्याच स्त्रियांना विचित्र वाटले त्या विचित्र नजरेने पाहू लागल्या, पण मला फिकीर नव्हती .”ठीक तुमची मर्जी … ” एक पुरुष बोलला पण मंगळसूत्र तोडलेच, जोडवी उतरली, बांगडी फोडली अन नैवेद्य असा सजून गेला .गर्दीतली एक बाई उठली अन माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाली, “बाई माझे …मनातलं गं बोललीस …लाखातलं एक …”अन ती धाड धाड रडू लागली जणू त्यांच्या ठसठसत्या वेदना मी आज मुक्त वाहू दिल्या होत्या !
पण माझं विचारी मन अस्वस्थ झालेय, राहून राहून प्रश्न पडतो, की आपण आज शिकलो, प्रगत झालो, पण अश्या परंपरेच्या मानसिक गुलामीतून का मुक्त होऊ शकत नाही ? का अजूनही स्त्रीला जबरदस्तीने अहेव लेण उतरून ठेवायला लावले जाते ? का नवऱ्याच्या आत्म्यालाही या सगळ्यांची आवश्यकता असते ?? बऱ्याचदा ग्रामीण भागात असे चित्र दिसते, शेतकरी कामकरी महिलांची पायांची बोटे कष्टाच्या कामाने रापतात जोडवी करकचून फिट्ट झालेली असते, आणि ती सहजा सहजी निघत नाहीत, अशात ज्या महिलेवर असा प्रसंग ओढवलेला असतो तिला हा प्रसंग नको, ते लेण उतरवायला नको असे वाटत असते, ती अंग चोरते, तोंड लपवते आणि जोडवी हिसकावून काढताना जखमा होतात किती विचित्र ! कोणतीही स्त्री परंपरेच्या विरुद्ध सहजासहजी जात नाही मग तिला जेव्हा ते उतरावे वाटेल तेव्हा ते उतरून द्यायची मुभा का नसावी ? समाजातील हे चित्र आता तरुणानीच बदलायला हवे , (कारण स्त्रिया दुःखामुळे पतीवरील प्रेमामुळे असा निर्णय नाही घेऊ शकत )
चंद्रकोर कपाळी मिरवून शिवबाचे पाईक आहोत हे दाखवण्यापेक्षा विचारांचे जरूर पाईक व्हावे, आठवा, शिवरायांनी आपल्या मातेला सती जाऊ दिले नव्हते ! प्रत्येकाने आपल्या नातेवाईक महिलांवर असे प्रसंग आले तर अश्या निरर्थक प्रथेला विरोध करायला हवा, पहिला दगड कुणीतरी उचलल्याशिवाय समाजाला आत्मबल आणि आत्मभान येणार नाही होय ना ??
आठवावे, मंगळसूत्र घालतानाचा विधी किती पवित्र, शुभ मुहूर्त पाहून केला जातो ! मग ते काढताना इतका विदारकपणा अन अमानुष पणा अन भयानकता का ?? कोल्हापूर जिल्ह्यातील एका थोर विचारवंताने आपल्या पत्नीला सांगून ठेवले होते की ‘त्यांच्या माघारी पत्नीच्या आचरणात कोणताच बदल न व्हावा अन अहेव लेणी, कुंकू तसेच ठेवावे ‘
माणूस किती शिकला याला महत्त्व नाही तर त्याचे आचरणात किती शिक्षितपणा आहे हेच महत्वाचे नाही का ??
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆
दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.
15 ऑगस्ट 2015 ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी !
आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे——
वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली व्हायची, म्हणून भीक मागणा-या समूहासाठी मी काम करायचं ठरवलं.
ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजून खूप आहेत—त्यांतल्या एखाद्याला हात देवू, या विचारांतुन—-!
या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून मग मी रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.
सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणाऱ्यांमध्ये मिसळायचा प्रयत्न करु लागलो.
सुरूवातीला लाज वाटायची…! डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.
मुखवटा लावला होता… !
पण मला भीक मागणा-या लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही. त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन … ! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं )
किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा …!– डाॕक्टर आहे हा xxx—गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजून काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल— यांत आपण मरुन जाऊ—-या डॉक्टरचा भरवसा काय ?
किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन “धंद्याला” लावेल. (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो— शरीर विक्रय करणा-या या ताईंमध्ये माझी उठबस होती. काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल ! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)—-
या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे…! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे !
मी पूर्णपणे निराश झालो होतो. या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं…
मी पूर्णपणे निराश झालो !
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणत का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना !
एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणून नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते– नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो… !
या काळात भिक्षेक-यांपेक्षा वाईट अवस्था झाली माझी ! मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम झालो होतो…
14 आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेऊन आदरानं भेटायला यायचे —–
15 आॕगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलून द्यायचे… माझ्यावर थुंकायचे !
किती विरोधाभास !
लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं—- कालचा साहेब, आज भिकारी झाला !
एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवू शकतो… ही म्हण मला माहीत होती… !
मी रावाचा रंक झालो होतो. त्या काळात, एका भिका-याचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं … !