मराठी साहित्य – विविधा ☆ “Self-deception म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “Self-deception म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

“Self-deception” म्हणजे स्वतःची फसवणूक करणे किंवा स्वतःलाच चुकीचा विश्वास खरा आहे असे पटवून देणे होय. पण हे फक्त नैतिकदृष्ट्या चुकीचे वर्तन नसून, माणसाच्या मेंदूतील ती एक अतिशय गुंतागुंतीची संरक्षण यंत्रणा आहे. जेव्हा सत्य माणसाला भावनिकदृष्ट्या त्रासदायक वाटते, तेव्हा त्याचा मेंदू त्या वेदनेपासून स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या विश्वासांची निर्मिती करतो. म्हणजेच, मेंदूचा एक भाग सत्य जाणतो, परंतु दुसरा भाग ते नाकारतो. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, व्यक्तीला स्वतःलाही समजत नाही की, तो स्वतःलाच फसवत आहे.

मानवाच्या मेंदूत प्रिफ्रंटल कोर्टेक्स, अमिंग्डाला आणि इंटेरियर सिंग्युलेट कोर्टेक्स हे भाग वस्तुस्थिती तपासणे, भावनांचे नियमन करणे आणि आत्मसन्मान टिकवणे यासाठी जबाबदार असतात. जेव्हा एखादे सत्य आपल्या स्वप्रतिमेला धक्का देणारे असते, तेव्हा अमिंग्डाला मेंदूला भावनिक धोक्याचा सिग्नल देते. त्यामुळे प्रिफ्रंटल कोर्टेक्सचा तर्कशक्तीवरील प्रभाव कमी होतो. या अवस्थेत माणूस तर्क बाजूला ठेवून स्वतःलाच खोटा विश्वास देतो, जसे की “मी काही चुकीचे केले नाही” किंवा “मी अपयशी नाही, परिस्थितीच चुकीची होती. ” त्यामुळे मेंदूतील तात्पुरता भावनिक तणाव टाळला जातो. पण हीच सवय दीर्घकाळ सुरू राहिली तर ती माणसाला वास्तवापासून भरकटवते आणि स्वतःला भ्रमाच्या जाळ्यात अडकवते.

मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ट्रिव्हर्स यांनी या प्रक्रियेचा उत्क्रांतीदृष्ट्या अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, स्वतःला फसवणे ही माणसाची जीव रक्षणासाठी विकसित झालेली युक्ती आहे. जर आपण आपल्याबद्दल एखादी गोष्ट खरी समजून सांगितली, तर ती सांगताना आपल्यामध्ये खोटेपणाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे इतरांना फसवताना आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण, खात्रीशीर आणि प्रभावीपणे फसवायला लागतो. मग समाजात काही प्रमाणात स्वतःची फसवणूक करणे हेच त्याला सामाजिक अस्तित्वासाठी उपयुक्त वाटू लागते.

फ्रॉईडच्या मनोविश्लेषणानुसार, स्वतःची फसवणूक ही ego defense mechanism म्हणजे अहंकाराचे संरक्षण करणारी प्रक्रिया आहे. ती माणसाला अपराधभाव, भीती, अपयश आणि आत्मनिंदा यांपासून वाचवते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी नापास झाल्यावर म्हणतो, “मी अभ्यास केला असता तर नक्की पास झालो असतो. ” तो प्रत्यक्षात अभ्यास करत नाही, पण असे म्हणणे त्याला आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक वाटते. तसेच एखादी व्यक्ती प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे दुखावली गेली तरी स्वतःला समजावते की, “ती व्यक्ती व्यस्त आहे, म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करते आहे, ती काही रागावलेली नाही. ” हे तर्क खोटे असले तरी माणसांमध्ये भावनिक संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरतात.

वैज्ञानिकांनी Functional MRI तंत्राचा वापर करून असे सिद्ध केले आहे की, जेव्हा माणूस स्वतःलाच खोटा विश्वास देतो, तेव्हा मेंदूतील बक्षीस देणारी यंत्रणा म्हणजेच अधोस्ट्रायटम सक्रिय होते. त्यामुळे हा खोटा विश्वासही मेंदूला सुखद वाटतो. म्हणजेच सत्य टाळणे मेंदूसाठी थोडा वेळ आरामदायी ठरते. परंतु कालांतराने ही अवस्था कॉग्नेटिव्ह डीसओनन्स निर्माण करते, म्हणजेच त्यावेळी मनात दोन परस्परविरोधी विचार एकाच वेळी सक्रिय असतात, एक विचार सत्य दाखवत असतो तर दुसरा विचार दुसरा असत्य वा खोटेपणा. या विसंगतीमुळे व्यक्ती गोंधळते, अस्वस्थ होते आणि आत्मभ्रमित होते.

अनेक माणसांमध्ये त्यांनी केलेली स्वतःची फसवणूक आपल्याला अनेक स्वरूपात दिसते. काहीजण पूर्णपणे सत्य नाकारतात, काहीजण चुकीचा तर्क लावून आपल्या म्हणण्याला योग्य ठरवतात, काहीजण स्वतःच्या कमतरता इतरांवर ढकलतात, तर काहीजण फक्त आपल्याला सोयीस्कर असेल अशीच माहितीच स्वीकारतात. या सर्व प्रकारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे सत्य टाळून स्वतःचे भावनिक रक्षण करणे. ह्यालाच वैज्ञानिक भाषेत “self-deceptive bias” म्हणजे स्वतःलाच फसवण्यासाठी केलेला युक्तिवाद असे म्हणतात.

या प्रक्रियेचे सामाजिक आणि वैयक्तिक दोन्ही परिणाम होतात. अल्प प्रमाणात स्वतःची फसवणूक मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते, कारण ती आपल्याला भावनिक आघातांपासून वाचवते आणि आत्मसन्मान टिकवते. पण जास्त प्रमाणात ती हानिकारक ठरते. सतत स्वतःलाच खोटा विश्वास देणारा माणूस वास्तवापासून तुटतो, स्वतःच्या चुका दुरुस्त करत नाही आणि नात्यांमध्ये अप्रामाणिकपणाने जगू लागतो. परिणामी, त्याचे निर्णय चुकीचे ठरतात, आत्मविकास थांबतो आणि सत्याशी असलेले नाते कमकुवत होते.

अशी माणसे अर्धवट ज्ञानामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होत आपण अगाध ज्ञानी झालेलो आहोत असे समजत स्वतःलाच फसवू लागतात. तसेच एखादे सामान्यीकरण केलेले विधान आपल्यालाच उद्देशून केले आहे असे समजून ते थयथयाट करू लागतात. यावरून हे स्पष्ट होते की, “Self-deception” म्हणजे केवळ स्वतःची फसवणूक नव्हे, तर मेंदूची एक जटिल भावनिक आणि संज्ञानात्मक प्रक्रिया आहे. ती माणसाला तात्पुरता मानसिक आराम देते, पण ती सत्य नाकारण्याची सवय लावू शकते. या प्रक्रियेचा योग्य वापर म्हणजे स्वतःला भावनिकदृष्ट्या सावरणे, वास्तवाचे भान न हरवणे. जेव्हा आपण स्वतःविषयीचे खोटे वलय नाकारून आणि सत्य स्वीकारून त्यावर उपाय शोधतो, तेव्हाच आपण स्वतःची खरी प्रगती साधतो. अशा प्रकारे स्वतःची फसवणूक ही माणसाच्या मानसिक उत्क्रांतीचा भाग असली तरी तिच्यावर नियंत्रण ठेवणे हेच खऱ्या अर्थाने बौद्धिक प्रामाणिकतेचे लक्षण आहे.

*

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागा!! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🙏 जागा! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

*

हृदयी जागा तू अनुरागा

प्रीतीला या देशील का

*

हे शांता शेळके यांनी लिहिलेलं आणि लताबाईंनी गायलेलं भावगीत कितीही जुन झालं, तरी माझ्या पिढीतील लोकांच्या मनांत अजूनही रुंजी घालत आहे. आता माझ्या पिढीतील म्हटल्यावर, इथं मी माझं वय सांगणं अपेक्षित आहे, पण ते सांगण्याची ही जागा नाही! बायकांनी आपलं वय लपवू नये असा जरी खरा-खोटा अलिखित दंडक असला, तरी तो पुरुषांना लागू नाही असं म्हणतात (कोण ते माहित नाही! ) तरी माझं वय सांगण्याची घाई मी या जागी नक्कीच करणार नाही मंडळी!

तर त्या भावगीतात म्हटल्या प्रमाणे त्या गाणाऱ्या नायीकेची आपल्या प्रियकराकडून जागेच्या बाबतीत त्या काळी किती माफक अपेक्षा होती बघा! ती फक्त त्याच्या हृदयात जागा मागत्ये, आत्ताच्या लग्नाळू मुलींसारखी ३ बीएचके असेल तरच तुझ्याशी लग्न करीन, असं म्हणायचं धाडस तेव्हाच्या मुलीत नव्हतं! किंबहुना २- ३ बीएचके ही जागेच्या बाबतीतली कन्सेप्टच त्याकाळी अस्तित्वात नव्हती! चाळीतली एखादी जिन्याखालची सिंगल रूमची जागा, ज्या जागेत धडपणे उभं सुद्धा राहता येणार नाही अशी जागा सुखाचा संसार फुलवायला पुरेशी होती! कारण तेंव्हा जागा कितीही मुबलक असल्या तरी खिशात नगद नारायणाचा ठणठनाट! त्यामुळे मिळेल त्या इतकुश्या जागेत सुद्धा अनेकांचे संसार नेटाने आणि आनंदाने फुलत होते. नुसते फुलत नव्हते, तर आपण आता गिरगांव किंवा दादरच्या एखाद्या चाळीतल्या सुखवस्तू जागेत रहायला आल्यावर, गावात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपल्याच चाळीत एखादी जागा कशी मिळेल, याच विचारात मग घरचा कर्ता पुरुष असायचा आणि त्या कर्त्या पुरुषाच्या त्या विचाराला, त्या घरातली कर्ती बाई मनापासून दाद देत सर्वार्थाने मदत करायची. हे असं सगळं तेंव्हा असायचं कारण म्हणजे रहायची जागा कितीही लहान असली, तरी सगळ्यांच्या हृदयात आपल्या माणसांसाठी खूप मोठी जागा होती! आणि आता…..   ४ बीएचके असला तरी, कोणी पै पाहुणा येणार म्हटल्यावर आपली बेडरूम त्यांच्या बरोबर कोणी शेअर करायची यावरून घरात भांडण होण्या पर्यंत मजल जाते. काही माणसांची रहायची जागा कितीही मोठी असली तरी त्यांच्या ह्रदयात चार दिवसासाठी आपल्याकडे येणाऱ्या जवळच्या नातलगांसाठी तसूभर सुद्धा जागा उरली नाही, हे आजच एक कटू वास्तव आहे!

जागा मग ती कुठलीही असो, ती मानवाला नेहमीच कमी पडत आलेली आहे, हे त्रिवार सत्य आहे! म्हणजे चाळीत रहाणारा जरा सधन झाल्यावर वन रूम किचन का होईना पण फ्लॅट घ्यायचा ध्यास घेतो. मग वन नंतर टू, थ्री, फोर…..   जसा खिसा मोठा तशी जागा! काही काही धनाढ्य लोकांच्या स्वप्नांना इतके पंख फुटतात की तो फक्त चार पाच लोकांच्या संसारासाठी एक सत्तावीस मजली राजवाडासदृश इमारतच बांधतो!

जागा हा शब्दच जणू माणसाच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणजे असं बघा मंडळी, त्याच्या जन्माच्या आधी होणाऱ्या आईच नांव एखाद्या नर्सिंग होम मध्ये घालून येणाऱ्या बाळाची जागा तिथे बुक करावी लागते, म्हणजे आयत्यावेळी उगाच धावपळ नको! हे असे बाळावर त्याच्या जन्माच्या आधीपासून जागेबाबत झालेले संस्कारच त्याला पुढील संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडतात, असं माझं तरी ठाम मत आहे बुवा! म्हणजे बाळ थोडं मोठं झाल्यावर, आई वडील नोकरीला जाणार, मग बाळाला दिवसभर सांभाळण्यासाठी एखाद्या चांगल्याशा, घराजवळ असलेल्या पाळणाघरात जागा बघा. ते आणखी थोडं मोठं झाल्यावर घराजवळच्या इंग्लिश मिडीयमच्या शाळेत कधी ओळख काढून, कधी डोनेशन देऊन जागा मिळवा. आता बाळाचा बाळ्या झाल्यामुळे त्याला दाढी मिशीबरोबर थोडी जास्तच अक्कल आलेली असते, त्यामुळे मी जाईन तर अमुक तमुक कॉलेजला नाहीतर मला पुढे शिकायचंच नाही असा हट्ट तो करू लागतो. मग त्याच्यावरील प्रेमापोटी त्याची लायकी नसतांना मॅनेजमेंटच्या कोट्यातून(? ) त्याच्यासाठी त्या कॉलेजला सीट (जागा) मिळवली जाते!

शिक्षण पूर्ण करून मग नोकरी मिळाल्यावर ट्रेन मध्ये चौथी जागा मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड, कधी कधी त्यासाठी कारशेड पर्यंत करावा लागणारा प्रवास, नोकरीतल्या अस्थिर वातावरणात आपली जागा पक्की करण्यासाठी करावे लागणारे लांगूलचालन! एक ना अनेक प्रकारे मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, बाळावर त्याच्या जन्माधीपासून झालेले जागे बाबतचे संस्कार, त्याला असे पुढील आयुष्यात उपयोगी पडतात!

जागेच महात्म्य अगदी आपण रोज कुठे झोपतो इथपासून सुरु होतं. खरं नाही वाटत? मग जरा आठवून बघा, कधीतरी तुमची रोजची झोपायची जागा जरी बदलली तरी निद्रादेवी निदान काहीकाळ तरी तुमच्यावर रुसून बसते की नाही? इतकी सवय आपल्याला त्या जागेची झालेली असते हे ही तितकंच खरं.

आता टू व्हीलर म्हटली की ती फक्त दोन माणसांनी एकामागे एक असलेल्या सीटवर बसून, पुढच्या व्यक्तीने चालवायची, असा आपला समज! पण तो समज हल्ली सर्रास पायदळी तुडवला जातोय हे आपण सगळेच नाईलाजाने आणि उघड्या डोळ्यांनी बघतोय. बरं अशा एखाद्या ३-४ माणसं घेऊन जाणाऱ्या कसरतपटूला तुम्ही चार गोष्टी सांगायला गेलात, तरी त्याच्या मेंदू नसलेल्या डोक्यातील रिकाम्या जागेत ते शिरेल याची खात्री नाही. पण मंडळी तुम्हाला सांगतो, अशाच एका बाईक स्वाराला बघून स्व. रतन टाटा यांच्या कल्पक मेंदूत फक्त एक लाख किंमत असलेली “न्यानो” फोर व्हीलर बनवण्याची कल्पना स्फूरली व त्यांनी ती प्रत्यक्षात आणून अनेक मध्यम वर्गी्यांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून, त्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक वेगळीच जागा निर्माण केली, हा इतिहास तसा ताजा आहे!

मंडळी माझ्या हृदयात एक जागा मी एका माणसासाठी राखून ठेवली आहे. आपण विचाराल कोण तो माणूस? सांगतो सांगतो. आपण सगळ्यांनीच कधीतरी एसटीने प्रवास केलेला असेल. तर एसटी स्थानकात एसटी थांबल्या थांबल्या खिडकीच्या दांड्याला एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने आपला रुमाल आत टाकून, जागा अडवण्याची क्लूप्ती ज्याच्या डोक्यातून आली त्या माणसाला मला भेटायची फार म्हणजे फारच इच्छा आहे मंडळी. मला तर वाटतं कमी अधिक फरकाने एखाद्या फुकटच्या कार्यक्रमात आपल्या पत्नीसाठी किंवा मित्रासाठी बाजूच्या रिकाम्या खुर्चीवर रुमाल किंवा आपली बॅग ठेवून जागा अडवायची या आयडियेचा तोच बहुदा प्रणेता असावा, अशी मला खात्री आहे!

मुबंईसारख्या ठिकाणी भीक मागणाऱ्या लोकांची रोजची बसायची जागा सुद्धा ठरलेली असते, हे मी काही नव्याने सांगायला नको. आणि ती आपली जागा ही जणू आपलीच जहागिरी आहे अशा थाटात तो भिकारी वावरत असतो. मध्यंतरी मी पेपरला एक बातमी वाचली होती, एका भिकाऱ्याने त्याच्या जागेवर दुसऱ्या भिकाऱ्याने येऊन भीक मागितली म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

“मानलं बुवा साहेबांना, त्याला त्यांनी पक्षातली त्याची जागा आपल्या भाषणातून काय दाखवून दिली, खरंच कमाल आहे साहेबांची! ” हे असले संवाद आपण कुठल्याही पक्षाच्या आतील गोटात असाल तर नक्कीच ऐकायला येतील. आपल्या भाषणातून किंवा कृतीतून कोणाला तरी कधीतरी त्याची खरी जागा दाखवून द्यायला फार पूर्वी लोकांना आवडायचं. पण हल्ली तेवढी प्रगल्भ भाषा ना नेत्यांच्या ना सामान्य माणसाच्या मुखातून बाहेर येते. हल्ली भांडणाच्या जागेवरच स्वतःच्या कुवती नुसार आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याची जागा दाखवली जाते!

मुंबईकर आणि जागा यांचा एक अतूट संबंध आहे मंडळी. हां आता खरे मुंबईकर कोणाला म्हणायचं यावरून वाद नक्कीच होऊ शकतो, कारण मुंबई ही एक भली मोठी गुळाची ढेप म्हटल्यावर साऱ्या देशातून निरनिराळे काळे लाल मुंगळे त्या ढेपेत आपापली जागा निर्माण करण्यासाठी त्या ढेपेला डसू लागल्यावर मुंबईचे असे हाल होणार हे स्वाभाविकच आहे. मग तिच्या विस्तारासाठी समुद्राला मागे हटवून नरिमन पॉईंट सारखी जागा निर्माण करण्यात आली. पण ती जागा सुद्धा कमी पडत्ये असं लक्षात आल्यावर नवी मुंबई निर्माण करून अधिक जागेची निर्मिती करण्यात आली. पण मानवाची जागेची भूक थांबायचं काही नांव घेत नाही, त्यामुळेच आता तिसरी मुंबई निर्माण करून अधिक जागा निर्माण केली जाणार आहे, आता बोला!

आता तर पृथ्वीवरची जागा कमी पडत्ये म्हणून की काय मानव चंद्रावर आणि मंगळावर वस्ती करण्याची स्वप्नं बघू लागला आहे! अर्थात स्वप्न बघण्यासाठी कोणाला कुठल्याच जागेची अडचण असण्याचा प्रश्नच नाही, पण हे स्वप्नरंजन करत असतांना आपल्यावर राज्य करणाऱ्या निसर्गाचा मानवाने जरा तरी विचार करावा, नाहीतर अधिक जागा मिळवण्याच्या मानवाच्या प्रयत्नांना तो मानवाची या पृथ्वीवरील योग्य ती जागा दाखवण्यास पुढे मागे बघणार नाही हे ही तितकच खरं!

मला असं मनापासून वाटत की प्रत्येकानेच स्वतःच्या चांगल्या वागणुकीने, जमेल तशी जमेल तेंव्हा इतरांना मदत करून लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक छोटीशी का होईना पण कायमची एक जागा निर्माण करायचा प्रयत्न आयुष्यभर करत रहावा!

शेवटी, माणूस कितीही धनाढ्य असला, अगदी जगातील सर्वात श्रीमंत असला तरी त्याला त्याच्या मृत्यूनंतर फक्त तीन बाय सहाची जागा पुरते, हे जेंव्हा त्याला उमगेल तो खरा सुदिन म्हणायचा! बघा पटतंय का?

शुभं भवतु!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

कोणी साद घातली तर प्रतिसाद द्यायला हवा. कुणी प्रतिसाद दिला तर आभार मानायला विसरू नये. याला संवाद म्हणता येईल. सुसंवादासाठी साद-प्रतिसाद-दाद-धन्यवाद यामधे सातत्य असावे.

एखाद्याच्या कलाप्रदर्शनाला रसिकांनी -दर्शक, प्रेक्षक, श्रोत्यांनी -दाद देणे फार महत्त्वाचे असते. कलानिर्मितीमागे कलाप्रदर्शन अंतर्भूत आहेच. ‘कलेसाठी कला’, ‘स्वान्तसुखाय कला’ हे म्हणणे सत्य नाही. कलाविष्कारासाठी कलाकार आणि कलाकृतीचा रसस्वाद घ्यायला रसिक हवेतच. रसिकांखेरीज कला व कलाकृती अपूर्ण आहेत. म्हणून कलाकाराला व त्याच्या कलाकृतीला रसिकांचा रसरशीत प्रतिसाद आवश्यक आहे. कोणत्याही कलाप्रदर्शनाला भरभरून दाद द्यायला हवी. दाद देणे हे जिवंतपणाचे, जिंदादिलीचे लक्षण आहे! कलाकार अशा जिंदादिल रसिकासाठी हापापलेला असतो मित्रहो.

जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याची एखादी गोष्ट आवडेल, त्या त्या क्षणी तात्काळ त्या माणसाला लगेच सांगा. व्यक्त व्हा, त्याचे कौतुक करा, त्याला दाद द्या. अशी दाद कधी शब्दाने, कधी कटाक्षाने, कधी स्पर्शाने तर कधी एखाद्या स्मिताने देता येते.

एखादी कविता, तुम्हाला आवडलेले एखादे चित्र, एखाद्या फुलाचा वास, बायकोची नवी साडी, एखादी रंगलेली मैफिल, एखाद्याचा फोटो, पहिल्या पावसाचा गंध, नव्या पुस्तकाचा वास, ओली भेळ, कांदा भज्यांचा किंवा बटाटेवड्याच्या तळण्याचा रसना चाळवणारा खमंग वास इ. इ. इ. जे जे आवडेल त्याला मोकळेपणे दाद द्या.

आपण दररोज किती तरी गोष्टी करत असतो. कितीतरी घटना, व्यक्ति पहात असतो, अनुभवत असतो. कधी त्या गोष्टी आपल्याला आवडतात, भावतात, आनंद देतात. पण त्याविषयी आपण सहसा कोणाला काही सांगतच नाही. मी काय म्हणतो, एकदा संबंधिताला सांगून तर पहा. त्याचं कौतुक करून तर पहा. आहो, याने त्याला आनंदच होईल आणि तुम्हालाही.

मला सवय आहे. माझी बायको खरेच सुगरण आहे. तिने केलेली प्रत्येक पाककृती रुचकर असते. (हे दांभिकपणे नाही, मनापासून सांगतोय बरं का! ). तिने सिद्ध केलेल्या रोजच्या पोळी-भाजीचा पहिला घास घेताना ती माझ्याकडे अपेक्षेने पहाते. मुखी तो प्रथम सुग्रास पडताच जेव्हा मी तिला म्हणतो, ” वा! क्या बात है! ” तेव्हा ते ऐकून ती सुखावते, हसते आणि मग स्वतः जेवायला वाढून घेते. खूप समाधान दिसते तिच्या मुद्रेवर. जरा अलंकारिक पद्धतीने सांगायचे झाल्यास मी म्हणेन, अशा वेळी जर स्वतः साक्षात् समर्थांनी विचारले, “जगी सर्व सुखी असा कोण आहे रे? ” तर मी नक्कीच हात आणि हातातला सुग्रास वर करून म्हणेन “मी”!

कधी कधी कलाकार एवढा मोठा असतो की त्याला आपण दाद देणे म्हणजे सूर्याला कंदिल दाखवण्यासारखे असते. म्हणून आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण हे योग्य नाही. कलाकार मोठा असला तरी तुम्ही दाद द्या. कलाकार तिच्या प्रतिक्षेत असतो. दाद न देणे म्हणजे कलाकाराच्या कलेची प्रतारणा आहे.

आपण एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचतो, तो आपल्याला आवडतोही पण आपण ते कवीला किंवा लेखकाला सांगत नाही, सांगायचे विसरून जातो किंवा टाळतो. एखादे गीत काळजाचा ठाव घेते पण त्याला साधी दाद न देण्याने आपण आपल्या कृपणतेचेच प्रदर्शन करतो.

मी अनुभवाने सांगतो, कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला दाद हवीहवीशी वाटते. अगदी लतादिदी, आशाताई, माधुरी दीक्षित, रेखा, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे इ. सारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या या व अशा अर्थाच्या भावना प्रकट मंचांवरूनही व्यक्त केल्या आहेत अनेकवेळा.

शेरोशायरी, गझल यात दोन वाक्यांचा एक शेर असतो. हा त्या काव्यप्रकाराचा आकृतिबंध आहे. दोन ओळीनंतर शेर, गझल आवडली तर दाद द्यायची असते हे सांगावे लागते यासारखे दुर्दैव नाही. शायरी, गझल ऐकताना लोक निर्विकार चेहऱ्यांनी बसलेले असतात हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटते. लोकांच्या रुक्षतेचे वाईट वाटते. प्रसिद्ध शायर अँड. भाऊसाहेब पाटणकर तर आपल्या मैफिलीच्या आरंभीच श्रोत्यांना म्हणायचे,

दोस्तहो, मैफील आपुली रंगण्या जर का हवी

आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी।

ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा

ती ही अशी, ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा! ।।

पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे पूर्वी एकत्र गायनाचे कार्यक्रम करायचे. त्यात बऱ्याच वेळा पुल गायचे आणि वसंतराव तबल्याची साथ करायचे.

ते दोघे एके ठिकाणी मैफिल करण्यासाठी, गाणे सादर करण्यासाठी गेले होते. चांगली उच्चभ्रू, धनिक, श्रीमंत श्रोतेमंडळी मैफिल ऐकायला जमली होती. या मैफिलीत वसंतराव गाणार होते.

मैफल सुरू झाली. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी वसंतरावांच्या एकही आलापीला, तानेला, समेवर येण्याला श्रोत्यांकडून ना दाद ना प्रतिक्रिया ना टाळी. सगळी मंडळी मठ्ठपणे, पुतळ्यासारखी बसून होती. असा प्रतिसादशून्य श्रोतागण समोर आहे हे लक्षात येताच वसंतरावांनी पुलं कडे पाहिले आणि हळूच म्हटले, ” पी एल आज रियाजच करून घेऊ. मनसोक्त.”

एवढ्यात अगदी मागच्या कोपऱ्यातून, “वाह, बहुत खूब, बहुत अच्छे! ” अशी सणसणीत दाद आली. पुलंनी दाद देणाराकडे चमकून पाहिले तर काय, सकाळी त्यांना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता! पुलंना एवढा आनंद झाला, वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा तसा! त्यांनी त्या माणसाला सन्मानाने पुढे येऊन बसायला सांगितले. पुढची सारी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली कारण दिलखुलास दाद देणारा तो एकच रसिकराज मैफिलीत उपस्थित होता!

एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन द्या अन् बघा त्याचा चेहरा किती खुलतो ते. लहान मुलांना तर प्रोत्साहनाची खूप आवश्यकता असते. बालवयात यथोचित कौतुक झाले नाही, वेळीच दाद मिळाली नाही तर मुले हिरमुसली होतात. येवढेच नव्हे तर त्यांच्या मनात न्यूनदंड निर्माण होतो. त्या कळ्या अवेळीच सुकू लागतात. मुलांचेच काय मोठ्यांचेही असेच असते. प्रत्येकाला स्तुती प्रिय असते. ती माणसाची मानसिक गरज आहे.

वास्तविक आपल्या सगळ्यांनाच कौतुक, स्तुती, प्रिय वाटते. आपल्या कृतीवर इतरांनी दिलेली दाद हवीशी वाटते. त्याने आपण उत्साहित व प्रोत्साहित होतो. त्यातूनच अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जसे आपल्याला वाटते तसेच इतरांना, विशेषतः कलाकारांना वाटत असते. दाद न मिळाल्यास कलावंत निरुत्साही होतो, व्यथित, निराश, उद्विग्न होतो.

प्रतिसादशून्य, अरसिकांविषयी संस्कृत कवी भवभूति काहिशी अशीच भावना पुढील श्लोकातून मांडतो….

इतरतापशतानि यदृच्छया

वितर तानि सहे चतुरानन l

अरसिकेषु कवित्वनिवेदनं

शिरसि मा लिख मा लिख मा लिख।।

भावार्थ:-

इतर ताप शतानी खुषाल दे बा चतुरानना

परि, अरसिकास कवित्वनिवेदन नको लिहू भाळी, नको लिहू, नको लिहू!

म्हणून दुसऱ्याचं कौतुक करा, करायला शिका. दाद द्या, दाद द्यायला शिका.

कलावंत आपल्या कलाकृती सादर करून तुम्हाला साद घालीत असतात, ‘या आणि पहा माझा प्रतिभाविलास’. बेगम परविन सुलताना पुण्याच्या ‘सवाई गंधर्व संगित महोत्सवा’त गंगाधर महांबऱ्यांचे एक मराठी गीत अवश्य सादर करतात, ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते. ‘ हे गीत त्या गातात वाहवा करणाऱ्या जिंदादिल रसिकांसाठी!

मित्रहो, आपणही इतरांना उत्फूर्त प्रतिसाद द्या. ‘साद-प्रतिसाद-दाद’ हे आदान-प्रदान अखंड चालू ठेवा. त्याने आपले तसेच इतरांचेही जीवन समृद्ध होईल, आनंदमय होईल.

अखेर येवढीच विनंती की, जर आपल्याला हा लेख आवडला, यातले विचार पटले तर नक्की दाद द्या. मी वाट बघतोय आपल्या प्रतिसादाची.

🙏🏼🙏🏼🙏🏼

©️दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

🌼🌼

याच अभिप्रायाची आरती प्रभू यांची एक कविता आठवते…

ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा

सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा।।१।।

*

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली

न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी।।२।।

*

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट

गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट।।३।।

*

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा

साजरा उधळून आयु हो करावा संग हा।।४।।

*

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही

आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही।।६।।

*

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा

सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा।।७।।

आरती प्रभू

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डोक्यावर पडलाय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “डोक्यावर पडलाय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही वाक्यांचा अर्थ कसा निघतो नं……. डोक्यावर पडलाय….. हे वाक्य सहज जरी ऐकलं तरी आपण थोडा विचार करतो, आणि असं समजतो कि वातावरण थोडंस तापलेलं आहे, आणि काहीतरी चूक झालेली आहे.

पण एखादा खरोखरच पडला असेल, आणि त्यावेळी डोक्याला अगदीच थोडसं लागलं असेल. म्हणजेच गंभीर नसेल व नंतर सगळं वातावरण निवळल्यावर हेच वाक्य म्हटलं तर….. त्यावेळी या वाक्यामुुळे गंमत तर होतेच. पण गमतीतही नंतर ते वाक्य कायम वापरायचा अधिकार मिळतो.

काय झालं,….. आम्ही मित्रमंडळी आपापल्या कुटुंबासह पावसाळी सहलीसाठी एक दिवस बाहेर फिरायला गेलो होतो. काही देवस्थानं पाहण्यासाठी ही सहल होती.

तिथे पोहोचल्यावर देेवदर्शन झाल्यावर, निसर्ग सौंदर्य बघत चेष्टा, थट्टा, मजा, खाणं अशा सहलीत अपेक्षित आणि हव्या असलेल्या सगळ्यागोष्टी खेळीमेळीने सुरु होत्या. त्याच वेळी एका ठिकाणी झाडाच्या आडव्या असलेल्या फांदीवर सगळ्यांनी बसून फोटो काढावा असं ठरलं. जमीनीवरच पाय टेकवून सगळ्यांंना सहज बसता येईल इतकी खाली ती फांदी होती. फांदी कसली खोडचं होत ते.

या फांदीवर बसून फोटो काढून झाल्यावर माझा आणि एका मित्राचा एकमेकांना धक्का लागला. आणि हा धक्का लागल्यावर मी त्या आडव्या फांदीसमोरच जमीनीवरच आडवा झालो. मी आणि फांदी यात खालच्या बाजूला जास्त कोण आडवा होऊ शकतो याची जणूकाही स्पर्धाच लागली होती. स्पर्धा मीच जिंकली. पडला म्हणजे पराभव झाला असं आपण म्हणतो. पण इथे आडवं होण्यात मीच आडवा झालो, म्हणजे पडलो तरी जिंकलो होतो. सुदैवाने मी आडवा होत असतांना कोणी मधे आलं नाही. नाहीतर त्याला सुुध्दा नाईलाजाने आडव्या हातानेच घ्यावं लागलं असतं.

पडतांना मी आधी खांद्यावर पडलो, आणि मग डोकं आपटलं. डोक्यावरचा भार खांद्यावर याचा अनुभव मी पडता पडता घेतला.

पडल्यावर थोडावेळ वातावरणात गंभीरपणा आला होता. रेेल्वेेस्टेेशनवर जशी एकामागूून एक माहिती व सुुचना ऐकू येतात त्याच पध्दतीने, अरे ऊठवा त्याला,…. थोडावेळ बसू द्या,…. पाणी द्या,…

गर्दी करु नका,….   मोकळी हवा येऊ द्या…… अशी अनेक काळजी घेणारी वाक्यं पटापट ऐकायला आली. यात मला ऊठवून बसवलं केव्हा, आणि ऊभं केलं केव्हा हे लक्षातच आलं नाही.

तेवढ्या गदारोळातसुध्दा पाण्याबरोबर एक पेन कीलरची गोळी माझ्या पोटात विसावली. सहलीत खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबत आंबटगोड चवीच्या चघळायच्या गोळ्यांबरोबरच अशा डोळे मिटून गिळायच्याही गोळ्या असतात हे काहीवेळा बरं असतं.

कुठून फोटोसाठी त्या आडव्या फांदीच्याफंदात पडलो असाही विचार आला. किंवा त्याला खोड म्हणावं तर खोडावर बसून फोटो काढायची खोड जिरली असं म्हणावं लागेल. पण पडल्यावर काही झालं नाही या बद्दल सगळ्यांनीच समोरच्या देवासह जो देव आठवेल त्याचे आभार मानले. देवाचीच कृपा असं म्हणत घेतलेला प्रसाद परत एकदा खाऊन झाला.

अगोदर घेतलेली पेन किलर आणि आता ग्रहण केलेला प्रसाद या मुळे पडतांना लागलेलं ग्रहण हळूहळू सुटत असल्याच जाणवलं. पण संध्याकाळपर्यंत खांदा आणि हात दुखायला लागला होता.

नंतर पुढची देवस्थान पण पाहिली, पण हाताला काही होऊ देऊ नको, हिच विनंती हात दुखत असतांना हात जोडून केली.

दुसर्‍या दिवशी सकाळी डाॅक्टरांकडे. त्यांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. ते म्हणाले चला. काल रंगीत फोटो काढलाय, आज आता फक्त हाताचा आणि खांद्याचा काळा फोटो एक्स रे काढू. पण त्या काळ्या फोटोत सुध्दा काही काळेबेरे दिसले नाही.

पण त्या दिवसापासून मी त्याच मित्रांमधे  काय कुठेही काही चुकीचं बोलतोयं असं बायकोला वाटलं तर ती ठामपणे आणि खरं बोलते, मनावर घेऊ नका, ते जरा डोक्यावर पडले होते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आज माझ्यासाठी सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडी कां होईना किलकिली झालेली होती. त्यामुळेच त्यांच्या घरून बाहेर पडताना फारसं काही हाती लागलेलं नसतानाही बरंच कांही गवसल्याचं समाधान माझ्या मनात भरून राहिलं होतं..!)

 पण ते समाधान अल्पजीविच ठरलं. याला निमित्त झालं ते ज्यांच्याविरुद्ध ही तक्रार होती त्या आमच्या ब्रॅंच-मॅनेजर प्रभुदेसाईंचंच. या संदर्भात आम्हा दोघांचं बोलणं झालं होतं, तेव्हा तोवर त्यांच्या मनात कोंडून राहिलेला सहस्त्रबुध्देंबद्दलचा संताप त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत होता. नेमकं काय घडलं होतं ते सगळं प्रभूदेसाई झपाटल्यासारखं सांगत राहिले होते. त्यातून आपोआपच ‘तक्रारदार सहस्त्रबुद्धे’ या व्यक्तीची एक नकारात्मक प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली होती! म्हणूनच एका अतिशय हेकट, संतापी आणि आतयायी अशा म्हाताऱ्या माणसाला मी भेटायला जातोय याचं भान काल सकाळी त्यांच्या दाराची बेल वाजवताना मी घट्ट धरूनच ठेवलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी अपेक्षित केलेला आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखवलेला नव्हता हे आश्चर्य वाटावं असंच होतं. शिवाय ते दत्तभक्त आहेत हे त्यांच्या गुरुचरित्र वाचनाच्या संदर्भामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे निघताना मी कांहीसा समाधानी होतो हे खरं पण ते समाधान मनात सुरू झालेल्या त्या आजोबांबद्दलच्याच उलटसुलट विचारांमुळे जवळजवळ नाहीसंच झालं होतं. मनात गर्दी करू लागलेल्या त्या विचारांमधे मला तीव्रतेनं त्रास देत राहिला तो माझ्या मनात आधीच ठाण मांडून बसलेला सहस्त्रबुद्धे आजोबांचा तो नकारात्मक ठसाच! ती संपूर्ण रात्र या विचारांच्या गदारोळात अधांतरीच गेली. या माणसाकडून फार कांही अपेक्षा करण्यात अर्थ नाही ही स्पष्ट जाणीव मग सकाळपर्यंत अधिकाधिक दृढ होत गेलेली होती!

 अर्थातच अशा मन:स्थितीत निर्माण झालेले विचारतरंग माझी उमेद आणि उत्साह प्रदूषित करणारेच ठरले. ‘त्यांनी प्रभूदेसाईंविरूध्द केलेली ती लेखी तक्रार, सातत्याने त्याचा केलेला शिस्तबध्द पाठपुरावा आणि प्रभूदेसाईंना कठोर शिक्षा होण्यासाठीचा यांचा टोकाचा आग्रह हे सगळं विचारपूर्वक रचलेल्या षडयंत्राचाच एक भाग नसेल कशावरून?’ हा प्रश्न तर माझी पाठच सोडेना. आता ठरल्याप्रमाणं त्यांना भेटायचं तर लगेचच निघायला हवं होतं पण जाऊन करायचं काय?सहस्त्रबुध्दे आजोबांना त्यांचं काय आणि कसं चुकलंय हे सांगायचं कसं? कांही करून त्यांना ती तक्रार मागं घ्यायला लावायचीच ही माझ्यावरची मुख्य जबाबदारी पार पाडणं आणि तेही दोन-चार दिवसांच्या अत्यल्प मुदतीत हे अशक्य कोटीतलंच होतं हे लख्ख जाणवलं आणि मी निराश झालो. अशा बिकट वाटेवर याच अस्वस्थ मनानं मी त्या सकाळी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच आत्मविश्वास हरवल्यासारखं लटपटत होतं आणि नंतर सहस्त्रबुद्धेंच्या दारावरची बेल वाजवताना माझा हातही थरथरत होता!

 ” या..” माझं स्वागत केलं ते दस्तुरखुद्द सहस्त्रबुध्दे आजोबांनीच. त्यांच्या चेहऱ्यावर ना हसू होतं ना मी आल्याचं समाधान. तरीही त्यांचा चेहरा शांत होता आणि माझ्यासाठी तेच खूप होतं.

 “आज लवकर आवरलं कां गुरुचरित्र वाचन?” मी सहजच विचारलं.

 “नाही. हीच माझी रोजची वेळ. काल अध्याय मोठा होता म्हणून थोडा उशीर झाला होता ” ते म्हणाले. त्यांचा मूड कसा आहे याची एवढी चाचपणी पुरेशी होती.

 “तुम्ही केलेल्या तक्रारी बद्दल मी आवर्जून बोलायला आलोय याचं आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला?” मी फार वेळ न दवडता मुद्यालाच हात घातला.

 “नाही.” माझ्याकडे रोखून पहात ते ठामपणे म्हणाले. “तसंच काही कारण असल्याशिवाय बँक तुम्हाला पाठवणार नाही हे ठाऊक आहे मला.”

 हे ऐकून मी भांबावलोच.हे यांना कसं समजलं? मला प्रश्न पडला. ‘आपल्या ऑफिस मधल्याच कुणाशी संपर्क, साटंलोटं नसेल ना यांचं?’ या विचाराने क्षणभर अस्वस्थही झालो आणि तीच अस्वस्थता लपवण्यासाठी मी मोकळेपणानं हसलो. तसं कांही असण्याची शक्यता नाही हे माहित असूनही ती शक्यता गृहित धरूनच मी सहज हसण्यासारखी प्रतिक्रिया देणं आवश्यकच होतं. संवादाची सुरूवात अशी निसरड्या वाटेवरूनच झाली त्यामुळे पुढची पावलं मला हुशारीनेच टाकायला हवी होती.यांना मी इथं येण्यामागचं खरं कारण सांगणं योग्य नव्हतं हे खरं पण त्यासाठी खोटं बोलणंही मला योग्य वाटेना. आजोबा मी कांही बोलेन त्याची वाट पहात माझंच निरीक्षण करीत होते.

 “तसंच काहीतरी कारण आहे हे खरं आहे आजोबा, पण मला बँकेनं पाठवलेलं नाहीय. तुम्हाला आवर्जून भेटावं आणि या विषयावर तुमच्याशी बोलावं असं मलाच मनापासून वाटलं आणि मी तसं सांगितल्यावर डीजीएम्. साहेबांनी मला परवानगी दिली एवढंच.”

 ” कमालच आहे. मला आवर्जून भेटावं असं कां वाटलं तुम्हाला?”

 “या सर्व प्रकरणात ‘ह्युमन रिलेशन्स आस्पेक्ट’ कडं जाणीवपूर्वक नसेल पण थोडं दुर्लक्ष झालंय हे मला जाणवलं म्हणून तुमची भेट घ्यावी असं वाटलं.”

 “यासाठी त्या मॅनेजरशीच बोलायचंत ना?वाट वाकडी करून इथं कशाला यायचं?”

 ” मी त्यांच्याशीही बोललोय ना. त्यांनी त्यांची बाजू सांगितली, पण ती त्यांच्या दृष्टिकोनातून. हा प्रश्न योग्यरितीने सोडवण्यासाठी कुणावरही अन्याय होऊ नये याची काळजी मीच घ्यायला हवी ना?”

 “तो प्रभूदेसाई काय म्हणाला ते कळू दे तरी मला एकदा. माझ्या तक्रारखोर स्वभावावर ताशेरे ओढले असतील त्यानं. मी इतर कस्टमर्ससमोर त्याचा अपमान केला असंही तो म्हणाला असेल. स्वतःची कातडी बचावण्यासाठी तो यापेक्षा वेगळं करूच काय शकतोs..? ” संतापाने थरथरत ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून कानोसा घेत आत उभी असल्यासारखी त्यांची मुलगी धावत बाहेर आली.

 ” बाबाss, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? जे बोलायचंय ते शांतपणे बोला. तेव्हासारखं आताही बीपी शूट झालं, तर त्रास बँकेला नाहीs तुम्हालाच होणाराय…” सात्विक संतापाने तिचा आवाज भरून आला.

 आजोबा वरमले.

 ” हो गं बाई, शांतपणे बोलतो. मग तर झालं? तू आत जा बरं. यांच्यासाठी चहा टाक.” ते म्हणाले. ती क्षणभर घुटमळली न् आत निघून गेली..

 “त्या दिवशी बी.पी. शूट झालं होतं?’त्या’ दिवशी म्हणजे कधी…?”

 “या तक्रारीमागचं रामायण घडलं त्या दिवशी. तुमच्या बँकेतच. त्या प्रभूदेसाईच्या केबिनमधे…” बोलतानाही त्या आठवणींनी आजोबांचा आवाज थरथरत होता. ” प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला त्याबद्दल?” त्यांनी कडवटपणे विचारलं.

 प्रभुदेसाई मला खूप कांही बोलले होते. ते सगळं त्यांच्याच शब्दांत यांना सांगणं मला शक्यच होणार नव्हतं. हे सहस्त्रबुध्दे एक रेल्वे पेन्शनर. प्रभूदेसाईंच्या ब्रॅंचमधे यांचा पेन्शन अकाऊंट होता. एक तारखेच्या पेन्शनसाठी होणाऱ्या गर्दीच्या वेळी, किंवा एरवीही इतर पेन्शनर्सच्या बाबतीतले कांही प्रश्न असले तरी हे केबिनमधे येऊन तावातवाने भांडायचे. बँकेत मॅनेजरशी किंवा स्टाफशी कसं बोलावं याचा त्यांना कांही विधिनिषेधच नसायचा. असं बरंच कांही

प्रभूदेसाई बोलले होते. सतत तक्रार करणारे कस्टमर्स सहसा बॅंकस्टाफच्या दृष्टीने अप्रिय असतात हे ओघानं आलंच. हे सगळं सांगून त्यादिवशी नेमकं काय झालं हे सांगताना प्रभूदेसाईना स्वतःच्या रागावर ताबा ठेवणंही मुश्किल झालं होतं.

 “हवं तर माझ्याआधी त्या ब्रँचला काम केलेल्या इतर मॅनेजरना विचारा. ते हेच सांगतील. आजपर्यंत मी इतक्या ब्रॅंचेसमधे मॅनेजर म्हणून काम केलंय, तिथं एकाही ठिकाणी माझ्याबद्दल तक्रार आहे कां ते बघा.” प्रभुदेसाई जीव तोडून सांगत होते…..

 ” त्यादिवशी मी सकाळी नुकताच केबिनमधे गेलो असताना आपले एक चांगले डिपॉझिटर सपत्नीक केबिनमधे आले. त्यांची प्रॉपर्टी विकल्यानंतर येणारी ह्यूज अमाऊंट आपल्या बँकेत डिपाॅझीट करण्याबाबत त्यांना माझा सल्ला हवा होता. आमचं बोलणं सुरू असतानाच हे महाशय माझ्या केबिनमधे घुसले. मी त्यांना पाच मिनिटं बाहेर बसायची विनंती केली. हातातलं काम संपलं की तुम्हाला बोलावतो असं सांगितलं. त्यांना तो त्यांचा अपमान वाटला. डोकं फिरल्यासारखं ते चिडून मला अद्वातद्वा बोलू लागले. त्यांची समजूत घालून त्यांना शांत करायचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा आमचे अकौंटंट पुढे झाले. यांना केबिनमधून बाहेर घेऊन गेले, स्वत: त्यांचं काम करून दिलं. मी त्यांच्याविरूध्द तक्रार करेन या भितीपोटी माझ्याविरुद्धच खोटी तक्रार करून स्वतः साळसूद असल्याचा आव आणतायत ते.” प्रभूदेसाई म्हणाले होते.

 बँक म्हटलं की अशी वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य माणसं ग्राहकरूपांत संपर्कात येणं ही तशी माझ्यासाठी इतकी वर्षं नित्याचीच बाब होती. हे असं चिघळलेलं प्रकरण मात्र मी प्रथमच अनुभवत होतो.

 प्रभूदेसाईंनी सांगितलेलं हे असंच सगळं मनात भिरभिरत असताना आजोबांच्या शब्दांनी मी भानावर आलो.

 “त्यादिवशी नेमकं काय घडलं ते तो प्रभूदेसाई बोलला असेलच ना तुम्हाला..?” आजोबांनी पुन्हा विचारलं.

 त्यांना काय उत्तर द्यावं तेच मला कळेना.

 “हो, सांगितल़य ना…” मी कसेबसे शब्द जुळवू लागलो. ” पण त्यांनी जे सांगितलंय ते त्यांच्या स्वतःच्या वागण्याचं समर्थनही असू शकतं ना? रूजवात न करता मला ते खरं मानून नाही ना चालणार?” मी म्हणालो. ते समाधानाने हसले. सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. पहाता पहाता त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागल्यासारखी ती जखम भळभळून वहात राहिली ….!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परतीचा फराळ!… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? विविधा ?

☆ परतीचा फराळ!… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा…!

घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते. ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो, पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा… जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा… आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा…

तर मग एन्जॉय तुमचा परतीचा फराळ!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रकाश ते प्रज्ञा – लेखक : श्री संतोष गजानन खाडये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

?  विविधा ?

☆ प्रकाश ते प्रज्ञा – लेखक : श्री संतोष गजानन खाडये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

दिवाळीची धावपळ, घराघरातील जल्लोष आणि रात्र उजळवणारे अनंत दिवे थांबले की आयुष्य एका गूढ शांततेत शिरतं. फुलबाजे, आकाश उजळवणारे कंदील, फटाके, विविध आवाज करणारे फटाके यांच्या किरर्र आवाजानंतर आकाशात उरलेली ती धुरकट झाक जणू मनावरही पसरते, पण त्या धुक्याच्या पलीकडे एक नवा प्रकाश उमलत असतो. तो दिव्यांचा नाही, आत्म्याचा असतो. घरभर उरलेले दिवे मंदावलेले असतात, पण त्यांचा उजेड अजूनही भिंतींवर पसरलेला असतो, आणि कदाचित मनातही. त्या प्रकाशात माणूस स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागतो. सणाच्या गडबडीत विसरलेली आत्मशांती पुन्हा जागी होते. गोडधोडाचे डबे रिकामे झालेले असतात, पण हृदय गोड झालेलं असतं, कारण सणानंतरही राहते ती एकच भावना : कृतज्ञतेची.

दिवाळी ही केवळ प्रकाशाचा सण नाही; ती प्रज्ञेचा आरंभ आहे. जेव्हा आपण घर झाडून, रंगवून, सजवतो, तेव्हा नकळत आपलं अंतःकरणही त्या उजेडासाठी तयार होतं. त्या तयारीत प्रेम, सहकार्य, क्षमा आणि आशेचे नवे रंग मिसळलेले असतात. सण संपल्यावर अचानक मनात एक प्रश्न जागा होतो — “या उजेडाचं पुढे काय करायचं? ” आणि इथूनच सुरू होतो प्रकाश ते प्रज्ञेचा प्रवास.

प्रकाशाचं खरं सार हे पाहण्यात नाही, तर जाणण्यात आहे. बाहेरच्या दिव्यांनी अंधार हटतो, पण आतल्या अंधारावर फक्त प्रज्ञेचा प्रकाश चालतो. ती प्रज्ञा म्हणजे विवेक — काय टिकवायचं, काय सोडायचं, कोणावर प्रेम करायचं, आणि कोणत्या मार्गाने पुढे जायचं, हे समजणं. गावातल्या शेतकऱ्याला जेव्हा दिवाळीनंतर पुन्हा मातीचा वास जाणवतो, तेव्हा तो जाणतो की हा हंगाम फक्त पिकांचा नाही — तो मनाचाही आहे. माती जशी जुन्या तणांपासून मुक्त होऊन नव्या पेरणीसाठी सज्ज होते, तसंच माणसाचं मनही जुन्या विचारांचं ओझं झटकून नव्या विचाराचे स्वागत करते. हीच दिवाळीनंतरची नवचेतना — अंतर्मनातील नव्या अंकुरांची सुरुवात.

शहरात ही नवचेतना वेगळ्या रूपात प्रकटते. गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांतून येणारा दिवाळीनंतरचा सकाळचा प्रकाश शांत असतो, पण अर्थपूर्ण. रात्रीच्या फटाक्यांच्या तेजानंतर आता तो प्रकाश स्थिर आहे, जणू सांगतो, “आता बाहेरचं पुरे, आता आत डोकाव. ” त्या क्षणी माणूस थोडा थांबतो — ऑफिसला निघताना आरशात स्वतःकडे पाहतो आणि मनात विचारतो, “मी खरंच समाधानी आहे का? ” हीच आत्मप्रज्ञेची पहिली ठिणगी असते.

दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश जर बाहेर उजळत असेल, तर त्यातून प्रज्ञा जन्म घेते — जी विचार उजळवते. प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही, तर समज. ती सांगते — संपत्तीपेक्षा समाधान मोठं आहे, प्रसिद्धीपेक्षा प्रेम अधिक मूल्यवान आहे, आणि अंधाराला शाप देण्यापेक्षा एक दिवा पेटवणं अधिक अर्थपूर्ण आहे. जगातील मानवजातीच्या विभिन्न विचारांचे स्वागत, डावे उजवे सारेच विचार मानवीय प्रगतीचे द्योतक आहेत तेव्हा कुणाचा द्वेष नको तर सर्वांनीच एक दुसऱ्याच्या विचाराचा अस्तित्वाचा दिवा एकमेकात उजळायला हवा. प्रज्ञेचा मार्ग म्हणजे अंतर्मनातील प्रकाशाकडे प्रवास. त्या प्रवासात ना गडबड असते, ना गर्दी — फक्त स्वतःशी संवाद असतो. “माझं आयुष्य फक्त उपभोगासाठी आहे का, की काहीतरी निर्माण करण्यासाठी? ” या प्रश्नाचं उत्तरच माणसाला नव्या चेतनेत नेऊन ठेवतं.

दिवाळीनंतरची नवचेतना म्हणजे बदलाची भीती नाही, तर बदलाची ओढ. ती सांगते — जसा दिवस रात्र ओलांडून उजाडतो, तसंच मनाचंही पुनर्जन्म घेणं आवश्यक आहे. अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत नाही, आणि संघर्षाशिवाय प्रज्ञा जागृत होत नाही. खरी संपत्ती तीच, जी अनुभवातून मिळते. खरं यश तेच, जे मनाला स्थैर्य देतं. आणि खरी दिवाळी तीच, जी प्रत्येक दिवशी आपण मनात साजरी करतो.

आज दिवाळी संपलेली नाही, तर आरंभ आहे नव्या विचारांचा, नव्या दृष्टिकोनाचा, आणि नव्या जीवनदृष्टीचा. आपण बाहेरचे दिवे विझवले असले, तरी मनातला दिवा जपला, तर संपूर्ण वर्ष प्रकाशमान होईल. जर मन मोठं असेल, तर घरातील प्रत्येक कोपरा मंदिर बनतो. आणि तोच क्षण असतो, जेव्हा प्रकाश प्रज्ञेत रूपांतरित होतो.

दिवाळीच्या सणानंतर दिवाळी बाहेर नव्हे, आत उजळते.

लेखक – श्री संतोष गजानन खाडये 

प्रस्तुती – सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वायुतत्व… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ वायुतत्व… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सर्व भौतिक जग ज्या तत्वांपासून निर्मिल गेले आहे, ती पाच तत्वे म्हणजे – पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश. यांना ‘पंचमहाभूते’ असे म्हणतात हे बहुतेकांना माहिती असते. ‘वायुतत्व’ हे यातील एक महत्त्वाचे तत्व. वायू – वात – वारा – हलणारी हवा अशी अनेक नावे या तत्वाबद्दल बोलतांना सामान्यत: वापरली जातात. पण नाव कुठलेही वापरले, तरी तत्व एकच – “वायुतत्व”.

या तत्वाचे महत्त्व वेगवेगळ्या संदर्भात, पण विशेषत्त्वाने सांगता येते. माणसाच्या अस्तित्त्वाशी निगडीत असणारा ‘प्राण-वायू’ हा वायूचा अतिमहत्त्वाचा विशेष… शरीरात प्राण तेवता ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतो तो ‘प्राण-वायू’– आणि तो मिळेनासा झाला, तर प्राणाचा अन्त– अशी याची थोडक्यात महती सांगता येईल. माणूस श्वास घेतो, म्हणजे नाकातून हवा शरिरात ओढतो, आणि उच्छवासातून ती बाहेर टाकतो… पण इथे सर्रास ‘हवा’ असे म्हटले जाते, ते मात्र “म्हणायला सोपे” म्हणून असावे. कारण नुसती हवा सर्वत्र असली, तरी ती आपणहून कोणतीच हालचाल करत नाही. तिला हलवले की मग तिलाच वायू.. वारा म्हटले जाते. म्हणूनच “वारा अर्थात वायू म्हणजे हलणारी हवा” अशी कुणालाही समजेल अशी सोपी व्याख्या केली जाते. अर्थातच, श्वास म्हणजे खरे तर नाकाद्वारे शरीरात ओढून घेतलेला वायूच —शरीरात चालू असणाऱ्या प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या वायूमार्फत सुरु असणाऱ्या क्रिया –म्हणजे शरीरातील वायुतत्वाचे पाच भाग मानले जातात, ज्यांनाच ‘ पंचप्राण ‘ म्हटले जाते, आणि ते शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणालीला जणू इंधन पुरवतात. “वायू म्हणजे गती” हे सर्वज्ञातच आहे. श्री समर्थांनी दासबोध-ग्रंथात वायूचे असे वर्णन केले आहे की —

चैतन्य आणि चंचळ ।

तो हा वायोजि केवळ ।।

या पंचतत्वांचा संबंध माणसाच्या पंचेंद्रियांशी असतो हे तर खरेच. आणि ही पाचही तत्वे शरीरात संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यकच असते. पण श्वसनक्रियेसाठी अव्याहत कार्यरत असणारे ‘वायुतत्व’, त्याद्वारे शरीरातील सर्व कार्ये निरोगी ठेवण्याचे काम प्रामुख्याने करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही —-”श्वास थांबला-माणूस संपला” असेच तर म्हटले जाते नेहेमी.

योगशास्त्रात मानवी शरीरातील जी सात योगिक-चक्रे सांगितली आहेत, त्यातील ‘अनाहत’ चक्राशी (याला ‘हृदयचक्र’ असेही म्हटले जाते) हे वायुतत्व संबंधित असते. हे अनाहत चक्र मुख्यतः हृदय आणि फुप्फुसे यांचे कार्य नियंत्रित करते. त्यामुळे अर्थातच ‘प्राणवायू’च्या रूपाने ‘वायुतत्व’, हाच या कामासाठी अत्यावश्यक असणारी शक्ती देणारा अत्यावश्यक घटक असतो. या तत्वाचा उपयोग योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे शरिरासाठी होत असेल, तर पर्यायाने शरीर निरोगी रहाण्यास मोठाच हातभार लागतो. अन्न-पाण्यावाचून माणूस काही दिवस जिवंत राहू शकतो, पण ‘प्राणवायू’वाचून तो फार तर ३ ते ५ मिनिटेच जिवंत राहू शकतो. म्हणूनच मानवी देहाच्या बाबतीत, वायुतत्व हे सर्वात जास्त सामर्थ्यवान आहे असे म्हटले जाते. शरीराला पुरेसा प्राणवायू मिळाला नाही, तर एखादे दुखणे कसे जिवावरच उठते, हे तर सध्या आपण बघतोच आहोत…करोनासारख्या साथीच्या आजारांच्या निमित्ताने. अशावेळी तर प्राणवायूचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. सगळ्या जगाला व्यापून राहिलेले हे वायुतत्व, अशावेळी माणसांना चांगलाच धडा शिकवते, हे नक्कीच लक्षात येते. याचबरोबर, शरीरात चुकीच्या जागी वायू किंवा ‘हवा’ म्हणूया, साठून रहाणे किती त्रासदायक ठरू शकते हे सांगण्याची गरज नाही.

या संदर्भाने इथे एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की, योगसाधनेने प्राणवायूवर प्रभुत्व मिळवता येते हे आता सर्वमान्य झालेले आहे. योगसाधना म्हणजे संयम… अनेक बाबतीतला संयम… ज्यामुळे… मन जास्त संतुलित रहाते, ज्यामुळे आयुष्य जास्त संपन्न – समृद्धरित्या जगण्यास मोलाची मदत होते. इतकेच नाही तर मानसिक समस्याही कमी होतात. कारण या साधनेतील प्राणायामामुळे परिणामत: वायुतत्वाचा प्रभाव वाढवता येतो, आणि संतुलन सहजरित्या वाढते.

हे झाले प्राणवायूच्या रूपातील वायुतत्त्वाचे महत्त्व. आता वाऱ्याच्या रूपातल्या वायू-तत्वाबद्दल— याबाबत तर बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. या रूपातला त्याचा एक विशेष गुणधर्म हा आहे की, वाऱ्याला ‘सरळ-वाकडं’ यातला फरक कळतच नाही. जशी दिशा मिळेल, जिथे जागा मिळेल, तिथे तो वहात जातो – वहात राहतो. थोडक्यात, ‘सारासार-विचार’ हा प्रकार त्याच्या बाबतीत नसतोच असे गंमतीने म्हणावेसे वाटते….मग कुठे ‘आला आला वारा…संगे पावसाच्या धारा…’ असं प्रसन्नपणे म्हणावंसं वाटतं, तर कधी–‘थंडगार ही हवा—’असं म्हणत तो अनामिक हुरहूर लावून जातो –शांतपणे झुळझुळत, जणू गुणगुणत आला, तर तो कधीच लांब जाऊ नये, इतका हवाहवासा, इतका आपलासा वाटायला लागतो. माणसाच्या चित्तवृत्ती आपोआप प्रसन्न होऊ लागतात, उष्णतेचा दाह शमायला लागतो… ‘पाऊस आला, वारा आला… पानं लागली नाचू’… असं काही सुचायला लागतं.

… पण कधीकधी मात्र तो इतका वेडावाकडा, इतका नकोश्या वेगाने येतो, की त्याला ‘वारा’ न म्हणता ‘वादळ’ असंच म्हणावं लागतं. कुठे हवेचा कमी दाबाचा पट्टा –कुठे जास्त दाबाचा पट्टा अशा स्वतःच स्वतःला उपाध्या देत हे वायुतत्व मग ‘वादळ’ या नावाने बरेचदा खूप मोठं नुकसान करणारं ठरतं, नकोसंच वाटतं. थोडक्यात ‘भीक नको पण कुत्रा आवर’ – अशी अवस्था होते. फक्त मानवाचीच नाही, तर सगळ्याच सजीवांची, सुंदर निसर्गाची जोपासना, निगराणी आणि संवर्धन जिव्हाळ्याने करणारे हे तत्व, बघताबघता संहारक होते आणि जणू निसर्गाला आणि त्याचसोबत इतर सजीवांनाही उन्मळून- उखडून टाकते.—–आणि याउलट जिथे ते स्वतःचा मागमूसही ठेवत नाही तिथे तर सजीवांचे अस्तित्वच संपते— सगळीकडून गच्च बंद असणाऱ्या खोलीत एखाद्या रोपाची कुंडी ठेवली तर दोन दिवसात ते रोप मरून जातं. बघा ना … म्हणजे खोलीत हवा असते पण हे “वायुतत्व” नसतं. याच्या विरुद्ध उदाहरण असं की वाफेच्या रूपातला वायू कोंडून ठेवून त्याचा दाब निर्माण करून त्यावर अनेक डबे जोडलेल्या आगगाड्या चालवून माणसाने कौतुकास्पद कामगिरी केली खरी. पण वायूचा असाच दाब जेव्हा प्रचंड वाढून अनावर होतो तेव्हा त्याचा स्फोट होतो — हाच वायू विध्वंसक होतो, आणि माणूस हतबल होतो——- अर्थात, या पंचमहाभूतांपैकी कोणावरच कुठल्याही सजीवाचे नियंत्रण नसते. ‘वायूतत्व’ हे त्यातलेच एक ‘महाभूत’… गंमतीचा भाग सोडून देऊ. पण अशावेळी या मूळ तत्वांचे सामर्थ्य, आणि मानवाची अगतिकता प्रकर्षाने जाणवते, हे खरे.

वाऱ्याचा आणखी एक विशेष गुणधर्म म्हणजे, त्याला ‘सुगंध आणि दुर्गंध’ यातला फरकच कळत नाही. याबाबतीत ‘सर्वधर्मसमभाव’ या गुणवैशिष्ट्यानुसार तो आचरण करतो, अशी समजूत करून घेतलेली बरी असते. ‘वाऱ्यावरती गंध पसरला… नाते मनाचे’… असं सुगंधाच्या बाबतीत म्हणता येतं – दुर्गंधाच्या बाबतीत नाही. पण तरीही दुर्गंधाचे खापर माणूस सहसा वाऱ्यावर फोडत नाही, हे त्याचे भाग्यच म्हणायला हवे. कारण या रूपातले वायूतत्व फक्त वहाण्याचे काम करते… सुगंध आणि दुर्गंध – निर्मितीचे काम वारा कधीच करत नाही; म्हणून त्या दोन्हीतला फरकही त्याला कळत नाही.

वैयक्तिक पातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे हे वायूतत्व, मानवजातीच्या भौतिक प्रगतीसाठीही खूप मोलाचे ठरले आहे. हवेच्या, पर्यायाने वाऱ्याच्या सक्रीयतेच्या प्रक्रियेचा अभ्यास करून मानवही पक्ष्यांसारखा हवेत उडू लागला आहे… पॅरा-ग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे प्रयोग यशस्वीपणे करू लागला आहे. विमाने, रॉकेटस्, अवकाशाला गवसणी घालणारी वेगवेगळी याने, ही सगळी याचीच तर उदाहरणे आहेत. पण ‘वायूतत्व’ जाणून घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.

… तर असे हे सजीव-सृष्टीचा जीव जोपासणारे अतिशय महत्त्वपूर्ण वायुतत्व…जे सजीवाला जगण्यासाठी थेटपणे आवश्यक असते. एक दिवस जरी या तत्वाने असहकार पुकारला, तर साऱ्या सृष्टीत केवढा हाहा:कार माजेल, संपूर्ण जगावर किती दुर्दशा ओढवेल…खरे तर सगळे सजीव जगच कसे मरणाच्या खाईत कोसळेल, याची कल्पना करणेही भीतीदायक आहे. म्हणूनच आपण या वायुतत्वाचे कायमच अगदी मन:पूर्वक ऋणी असायलाच हवे.

– – – या संदर्भात माणसाने आवर्जून लक्षात घ्यायलाच हवी अशी एक गोष्ट आहे — ती म्हणजे ऋण फेडण्याची —- एखाद्या बीजात या तत्वाने प्राण फुंकले, की पहाता पहाता त्या बीजाचा सुंदर वृक्ष होतो, जो न मागताही माणसाला सुखद गार सावली देतो–न मागताच आपली फुले त्याच्या ओंजळीत टाकतो –फळांनी फक्त त्याची भूकच नाही, तर ताकदही वाढवतो. आणि या सगळ्यापेक्षाही महत्वाचे आहे ते हे सत्य की, वायुतत्वाने त्याच्या बीजात फुंकलेल्या जराशा प्राणवायूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तो वृक्ष अगदी निरपेक्ष भावनेने त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्राणवायूचे उत्सर्जन करतो–वायुतत्वाचा समतोल राखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतो…आणि आपण माणसे? अतिशय स्वार्थी, क्षूद्र हेतूने प्राणवायूचा तो स्रोतच बेफामपणे वृक्षतोड करून बंद करून टाकतो. चोंच कितीही वासता येत असली तरी पोटापुरतेच घ्यावे हा पोंच इवल्याश्या पाखरांनाही असतो. पण स्वतःला सर्व प्राणिमात्रांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान समजणाऱ्या माणसाला तो नसावा, ही बाब फक्त काळजी किंवा खंत वाटावी आणि सोडून द्यावी अशी नाही. तर असे वागणाऱ्याचा संतापच यायला हवा–आणि त्याला रोखायलाच हवे. आणि फक्त वायुतत्वच नाही, तर पाचही मूलतत्वांचा गैरफायदा कुणीही कधीही घ्यायचा नाही असा कडक निर्बंध प्रत्येकाने स्वतःच स्वतःला घालून घ्यायलाच हवा.

म्हणूनच सर्वात महत्वाचे हे की, जागतिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून या पंचमहाभूतांचे मूळ स्वरूप आणि प्रमाण, तसेच त्यांचे संतुलन अबाधित राखण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न करणे आणि त्यायोगे निसर्गाचे संतुलन राखणे, हे माणसाच्या सुखी आणि आनंदी जगण्यासाठी अत्यंत गरजेचे असणारे मूलभूत कर्तव्य आहे, आणि ते पार पाडण्यासाठी प्रत्येकानेच सदैव स्वतः डोळस प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे — अगदी श्वास घेण्याइतकेच अत्यावश्यक…

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘क्षण सत्याचा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘क्षण सत्याचा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(Moment of Truth)

ईश्वर अनादि आहे, अनंत आहे!

कृतांत, काळ ही ईश्वराची ‘विभूति’ आहे.

“अहं कालोस्मि”, ”मी काळ आहे” असे भगवंताने स्वतःच गीतेत म्हटले आहे.

काळ ‘जातो’ हा भ्रम आहे.

काळ जात नाही तर आपणच काळातून जात असतो.

जन्म-बाल्य-तारुण्य-वार्धक्य-मृत्यु हा आपला जीवनप्रवास आहे, काळाचा नाही. काळ आहे तसाच आणि आहे तिथेच आहे, स्थिर, अचल, अपरिवर्तनीय, अपार, अनंत, अवध्य!

ईश्वराखेरीज सर्व वस्तुमात्र आणि जीवमात्र मर्त्य, विनाशी, विघटनशील, विरी जाणारे, वध्य, मिथ्या आहेत.

“यदृष्टं तं नष्टम्” हे श्रुतिवचन आहे. जे दिसते ते नष्ट होते. जे जन्मते, ते मरते आणि जे मरते ते जन्मतेही!

जन्म आणि मृत्यु या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सर्व दृष्य वस्तूत सतत, प्रत्येक क्षणी, परिवर्तन होत असते.

काळ अदृष्य आहे म्हणून अपरिवर्तनीय आहे.

दोन नजिकच्या परिवर्तनातील अंतर म्हणजे ‘क्षण’.

गेलेला क्षण हा ‘भूतकाळ’, येणारा क्षण हा ‘भविष्यकाळ’ आणि आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो तो ‘वर्तमानकाळ’ होय.

गेलेला क्षण हातातून पाऱ्यासारखा निसटलाय् परत कधीही वाट्याला न येण्यासाठी! येणारा क्षण कसा असेल, किंबहुना तो अनुभवता येईल याची शाश्वती नाही. म्हणूनच या भूत आणि भविष्यातील क्षणांचा आपल्याला काहीही उपयोग नाही.

मग ज्याचा उपयोग नाही त्याचा का विचार करायचा? त्याचा विचार करणे हा निव्वळ कालापव्यय!

हातातला आत्ताचा, वर्तमानातला क्षण मात्र संपूर्ण आपला आहे. कसाही उपयोगात आणा, कसाही उपभोगा, त्याचे स्वामी तुम्हीच, केवळ तुम्ही.

म्हणून वर्तमानातील हा क्षण म्हणजे “क्षण सत्याचा”. वर्तमान हेच सत्य!

जो हा ‘सत्याचा क्षण’ सत्कारणी लावतो त्याचे जीवन कृतार्थ होते, गंगौघासारखे पवित्र होते.

ज्याने तो वर्तमान गमावला त्याने आत्मघात केला असे निश्चित समजावे.

त्याचे जीवन फुटलेल्या सांडपाण्याच्या नळासारखे. त्यातले दूषित पाणी झिरपून, पाझरून सर्व आयुष्य शेवाळवते, नासवते!

जे वर्तमानात रमून अन् जगून प्रत्येक “सत्याचा क्षण” सत्कारणी लावतात तेच जीवनमुक्त. केवळ त्यांनाच तो सच्चिदानंद प्राप्त होतो!

ओम शांति, शांति, शांतिः!!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ 

(काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.)

(१)

भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती

पंचप्राण जीव भावे ओवाळू आरती*

*

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा

दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा

*

काय महिमा वर्णू आता सांगणे किती

कोटी ब्रम्ह हत्या मुख पाहता जाती

*

राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही

मयूर पुच्छे चामरे ढाळती ठाईच्या ठाई

*

सत्व रजतमात्मक काकडा केला

भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला

*

तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा

विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥

(२)

सहस्र दीपै दीप जैसी प्रकाशली प्रभा

उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा

*

काकड आरती माझ्या कृष्णसभागीया

चराचर मोहरले तुझी मूर्ति पहाया

*

कोंदलेसे तेजे प्रभा आलीसे एक

नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख

*

आरती करता तेज प्रकाशले नयनी

तेणे नेत्रे मिळाला एका एकी जनार्दनी ॥

*

अशा अनेक आरत्या होऊन शेवटी तुळशीची आरती होते.

*

जय देवी जय देवी जय माये तुळशी

निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी

*

ही आरती सर्वांना ठाऊक आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही विठ्ठल मंदिरात काकड आरतीला जात होतो, तेव्हा तुळशीची एक वेगळी आरती म्हटली जायची. ती छोटीशी आरती या ठिकाणी देते आहे.

*

श्री तुळशी जय तुळशी मानव बोलता वदनी

ऐकून यमदुत बहु दूर पळती दिशा उल्लंघुनी

*

कोमल तुळशी वनी पाहुनिया हरीशी आनंद

अखंड राहे तेथे राधा रमणा गोविंद

*

या तुळशीची सेवा करता पुण्याच्या राशी

अपार संकट भोगुनी प्राण्या जाय मुक्तिशी

*

ओवाळू आरती तुळशी हरी पंकजनयना

कृष्ण तनया म्हणे सरली भ्रांतीची भ्रमणा ॥

*

यानंतर नियमितपणे सद्गुरुची आरती, कापूर आरती होत असे. याच ओघात सर्वांसाठी एक मागणं मागितलं जायचं.

*

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा /माझीया सकळा हरीच्या दासा

 कल्पनेची बाधा न हो कोणे काळी /ही संत मंडळी सुखी असो

अहंकाराचा वारा न लागो राजसा/ माझ्या विष्णू दासा भाविकाशी

नामा म्हणे जया असावे कल्याण /द्या मुक्ती निधान पांडुरंग ॥

*

नंतर सगळ्यांना आरती दिली जायची. सर्वांचा सुका प्रसाद, फळं, तीर्थ एकत्र करून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जायचा आणि हळुवार पूर्वेला सूर्यबिंब प्रकट व्हायचं. आजही ही प्रथा खेड्यापाड्यांमधून आणि मंदिरांमधून सुरू आहे. मात्र तथाकथित आधुनिकतेचा वारा लागलेले लोक यापासून दूर आहेत. काही लोकांनी तिथेही ह्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. त्याला यश देणं हे आपल्याच सर्वांच्या हातात आहे !

विस्तारभयास्तव आज इथेच थांबते. अजून अनेक काकडआरत्या आणि भुपाळ्या आहेत. त्या आपल्यालाही ठाऊक आहेत.तुळशी विवाह होतो. नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीची समाप्ती ही सहसा गोपालकाल्याने केली जाते. यावेळी कुठे कुठे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह ही आयोजित केला जातो. येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आश्विन /कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद !

 – समाप्त – 

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares