मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कळतच नाही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कळतच नाही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कळतच नाही मतदाराला

कोणता झेंडा घ्यावा हाती

नेम नाही उमेदवाराचा आता

कोणत्या पक्षात कोण जाती!

*

देशभक्ती अन देशप्रेम हे

उमेदवारा असते वा नसते

सत्ता मिळविणे अन भोगणे

प्राधान्य केवळ हेच असते!

*

मतदार आता शहाणा होवो

व्यक्ती नव्हे देशभक्ती पाहो

जाती, भाषा, धर्मापलीकडे

देशहिताचाच विचार होवो!

*

 जाती, भाषा, धर्मापलीकडे

 देशहिताचाच विचार होवो!!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

राठी साहित्य – कविता ☆ श्री स्वामी समर्थ आरती… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

साकव्य विकास मंचने आयोजित केलेल्या आरती लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

आरती लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक प्राप्त आरती “श्री स्वामी समर्थ आरती” आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “श्री स्वामी समर्थ आरती” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

!! श्री !!

  जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जय देव जय देव ||ध्रु||

 *

भक्तांचा तारक तू सागर करुणेचा

मार्ग दावी सकला अनन्य भक्तीचा

दत्तात्रय अवतारी हे जगत उद्धराया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया

जयदेव जयदेव ||

 *

भिऊ नको पाठीशी मीस्फूर्ती देतसे

श्री स्वामी समर्थमंत्र तारक होतसे

नाम मुखी वसो सदा मोक्षाप्रत जाया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया

जयदेव जयदेव ||

 *

अगाध महिमा तुमचा दयाघन स्वामी

मायपिता आमुचे तुम्हीच हो स्वामी

श्रद्धेचे बळ मिळो भवसागर तराया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जयदेव जयदेव ||

 *

जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जयदेव जयदेव ||ध्रु||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

उत्पत्ती तेथे लय

लय तेथे उत्पत्ती

वर्ष बाविसचा लय

वर्ष तेविसची उत्पत्ती…

*

आत्मा तोच

वसन बदलले

तैसेचि हेही वर्ष

आकडे बदलले..

*

गताची नको खंत

स्वागतम् येणा-याचे

नवी उभारी, नवे संकल्प

कवच आहे सद्गुरुंचे…

*

किती गेले, येणार बरेच

भूतकाळात जमा हे वर्ष

असतील केल्या चुका अनेक

सुधारून त्या क्रमूया नववर्ष…

*

आणू तिव्रता साधनेत,

रिपूंना देवू मूठमाती,

नका दवडू वेळ,

सदगुरु आहेत सांगाती…

* नववर्षाच्या मन: पुर्वक शुभेच्छा *

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७६ – द्राक्ष…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७६ – विजय साहित्य ?

☆ द्राक्ष…!

(अष्टाक्षरी.)

द्राक्ष कोल्ह्यासी आंबट

आजी सांगायची मला

द्राक्ष आवडीचे फळ

पाहू बाग मळा चला.

*

बिया नसलेले द्राक्ष

वाटे रत्न अनमोल

किती खाऊ किती नको

द्राक्ष फळ लंबगोल.

*

बाग द्राक्षाची पाहून

पाणी‌ सुटते तोंडाला

काळी,लाल,हिरवीशी

घोस लोंबती वेलाला.

*

तासगांव नाशिकची

पहा द्राक्षे चवदार

रोग प्रतिकार शक्ती 

असे गुणकारी फार.

*

डोळे,हृदयाच्यासाठी

आहे द्राक्ष गुणकारी

द्राक्षासव,ताजारस 

असे मात्रा गुणकारी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ शेकोटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ शेकोटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

थंडी वाढली वाढली

चला शेकोटी पेटवू

हुडहुडी भरलीय

तिला पळवून लावू ll १ ll

*

गोळा करू काटेकुटे

पाला पाचोळा वाळला

कडाक्याची थंडी पळे

पेटविता शेकोटीला ll २ ll

*

शेकोटीच्या भोवताली

बसू मित्रांच्या सोबत

उबदार करू तन

मन मोकळे बोलत ll ३ ll

*

कधी शेतात रानात

येते मैफिल सजून

गप्पा गोष्टी गाणी आणि

होते पौष्टिक भोजन ll ४ ll

*

अशी शेकोटी स्नेहाची

सुख दुःख वाटणारी

सगे सोयरे मित्रांना

एकत्रित आणणारी ll ५ ll

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवं वर्ष… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ नवं वर्ष ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

जाणारे जुने असते

येणारे नाविन्यानी नटते

तारीख, वार, महिने

आपल्या क्रमानेच येत असतात

येणाऱ्या दिवसाला मात्र

काळाचं लेबल देऊन जातात

पलटलेल्या पानासोबत

काळ पुढे सरकतो

बघता बघता नाही कळत

कधी वर्षाचा शेवट येतो

नव्या वर्षांच्या स्वागताला

एका रात्रीचा जल्लोष होतो

कधी श्वास मुठीत घेऊन

तर कधी कष्टात झिजून

कधी दु:खात कधी सुखात

वर्षातला प्रत्येक दिवस

दिवसातला क्षण क्षण जगला जातो

कधी जीव टांगणीला लावून.

आणि किती सहजतेनी त्याला

आपण टाटा, बाय-बाय करतो

जुनं कॅलेंडर उतरून

भिंतीवरती नवे टांगतो

खरोखर इतके का सोपे असते

जुन्याला सहज घालविणे

नव्याला सहजतेनी स्विकारणे

काळजातला अंधार मिटवून

सुंदर पहाटेला जागविणे

तितकेच सोपे झाले नसते का

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक

घटका, दिवस, वार, महिने यांना

तितक्याच सुंदरतेनी नटविणे

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९७ ☆ जिद्द… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९७ ?

☆ जिद्द… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

** 

 

ही जिद्दच तर होती,

जीवनाची प्रत्येक लढाई

जिंकण्याची!

हवे ते मिळविण्याची !

किती मिळाले, किती निसटले

आठवत नाही ….

पण आठवते,

अथांगतेचा तळ गाठल्याचे,

आकाशात मुक्त विहरल्याचेही ! 

 

कोण काय बोलले,

कोण काय म्हणाले, आठवत नाही….

पण किती तरी क्षण 

कुणी कुणी—

डोक्यावर ताज ठेवल्याचे,

आठवतात, आठवत रहातात!

 

ती जिद्दच तर होती—

उंबरठ्याच्या बाहेर पडण्याची,

नको ते नाकारण्याची, 

 

हातातली कांकणे,पायातली पैंजणे, 

किणकिणत राहिली, छुमछुमत राहिली…

पण ही जिद्दच होती

‘माणूसपण’ जपण्याची, 

‘स्व’त्व टिकवण्याची…

सारे पसारे मांडून, 

सम्राज्ञी सारखं जगण्याची!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झुळुक… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झुळुक… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

नक्की भेटू पुन्हा.. ” असे तो म्हणून गेला

क्षणभर आला, मनभर पण दर्वळून गेला

खळखळ हसला, बोललाच; पण डोळ्यामधुनी

बरेच काही कळून आला.. छळून गेला

 *

थांबायाचे नव्हते त्याला कसे म्हणू मी?

रेंगाळुन, वळणावरती तो वळून गेला

 *

त्यालाही अन् मला वाटले खुशाल सारे

जाताना माझ्यासम तो हळहळून गेला

 *

झुळकीसम आलीस, पुन्हा गेलीस तशी तू

झुळकीने त्या जन्म पुरा वादळून गेला

 *

युद्ध संपले तरी छुपे हे हेर भोवती

नकोस समजू धोका सारा टळून गेला

 *

जरा कुठे निर्धास्तपणे मी होतो चालत

तोच’ नाग पाचोळ्यातुन सळसळून गेला

 *

अजुन पेंगते रात्र सुगंधी कुशीत त्यांच्या

पुनवेचा तो चंद्र कधीचा ढळून गेला

 *

बहर होऊनी येता तू, मी कसा मोहरू?

वाट तुझी बघण्यात बहर हा जळून गेला

 *

किती विदारक चित्र अरे त्याच्या दु:खाचे

दुःखाश्रू शत्रूचा ही ओघळून गेला

 *

अता शांतता.. निवांतता.. अन् प्रसन्नता ही

उत्कट पाऊस मघाशीच कोसळून गेला

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३११ ☆ फुलांना वेचल्यानंतर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३११ ?

☆ फुलांना वेचल्यानंतर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सुखाने मी निघालो बघ यमाने गाठल्यानंतर

जराही दाह होईना कलेवर पेटल्यानंतर

*

असे चटके दिले त्यांनी इथे सोशीक लोकांना

जखम होते बरी म्हणती मिठाने शेकल्यानंतर

*

किती गर्दी इथे केली बघ्यांनी रंजनासाठी

कुणीही थांबला नाही तमाशा संपल्यानंतर

*

अनोखी कल्पना शक्ती जिथे रचनेत सापडते

कवीला वाचता येते कवन हे वाचल्यानंतर

*

इथे तर रानमेव्याला कुणीही मोल देईना 

सुक्यामेव्यास या किंमत बघाना वाळल्यानंतर

*

फुले रस्त्यात पडलेली चुरडली ना कधी पायी

सुगंधी हात झाले रे फुलांना वेचल्यानंतर

*

सुखाचा शोध घेताना भटकलो काल मी होतो

सुखाला जाणता आले समाधी लागल्यानंतर

*

कसे घरट्यात ते घुसले किती दादागिरी केली

अता बंदिस्त हे पाणी जहाले गोठल्यानंतर

*

दुधाची काळजी नाही जरी ते नासले आहे

कलाकंदामधे गोडी जरासे आटल्यानंतर

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसरिता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसरिता… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मनातल्या वेदनांना न ठावे

अश्रुंना अक्षरांचेच किनारे

शब्दभाव नभरात्रीचे तारे

 स्पंदनांच्या लहरी प्रवाहात

 जीवनाचा निवांत स्मृतीप्रांत

 किती प्रीय भासे तरी एकांत

 विरल्या क्षणांचे कवण शांत

चंद्रप्रतिमा साकारावी खास

आसुसलेले प्रतिभेचे श्वास

पौर्णिमेचा प्रकाश तो उदास

 हाकते कल्पीत धोटी मंद-मंद

 हलके स्वप्न ओहोटी प्रेम छंद

 दुःखास सांत्वने विरह आनंद

 तेच गान स्फुरावे जपूनी बंध.

नेत्रातले भास काजवे ओळी

सत्य कधीचे मांडते काव्य वेळी

जणू पांघरुनी शृंगारली कळी

सुखांनी भारली कविता ओंजळी.

 गीतप्रहर मैफल जी रंगता

 प्रेम कौतुकावे शब्दात झिंगता

 कवण हृदयी ती प्रीत भंगता.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares