मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य… ☆ आनंदराव रघुनाथ जाधव ☆

श्री आनंदराव रघुनाथ जाधव

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य… ☆  आनंदराव रघुनाथ जाधव ☆

मन भरून आलं तर

मन जाणणार

एक तरी आपला असावा

*

मित्र भरपूर असतात

आयुष्यभर साथ देणारा

एक तरी मित्र असावा

*

प्रेम तर सर्वच करतात

पण हळव्या मनाला जपणारा

एक तरी जीवलग असावा

*

सभोवताली भावकी

भरपूर असते पण

एक तरी निस्वार्थी नातलग असावा

*

आयुष्याच्या वाटेवर

अनेक भेटतात पण आधार देणारा

एक तरी वाटसरू असावा

*

उन्हं वारा थंड सोसताना

सोबतीला हक्काचा

एक तरी माणूस असावा

*

धावपळीच्या जगात

दमल्या नंतर विश्रांती घे म्हणणारा

एक तरी घरचा प्रेमळ असावा

*

भरल्या संसारात मुलं मुली असतात

पण दुःखी मनाला फुंकर घालणारा

एक तरी जीवाचा तुकडा असावा

© श्री आनंदराव रघुनाथ जाधव

सांगली ८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पदर… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पदर… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

माझ्या आईचा पदर रान गवतांचा तुरा

जसा वा-यांने उडतो गंध मकरंद चुरा

 *

मोर नाचतो पानात पंखी पिसारा फुलतो

मऊ पदर झुल्यात वारा हसत झुलतो

 *

रोज आईच्या गाण्यात पीक आनंदी डोलते

फुल सुगंध पेरत फुल वा-याशी बोलते

 *

टच् भरलं कणीस चोच पाखरु मागते

आई कणीस देताच प्रेम ह्दयी जागते

 *

काळ्या मातीचं ढेकूळ गंध सुगंध माखते

पान पानात साखर आई स्पर्शाने चाखते

 *

पान वाजवीते टाळी भुंगा अंभग आळवी

आई आल्याची चाहुल रान पक्षांना कळवी

 *

एक उनाड वासरु खुल्या रानात नाचते

आई जाताच समोर प्रेम वात्सल्य वाचते

 *

आई रानात असता झुंड पाखराची फिरे

ताल तो किलकिलाट वाटे वेदमंत्र कि रे

 *

अशी आईची महिमा रोज रानातच हसे

माय फातीमा सोबत ज्योती सावित्री वसे

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुरंगीचा गंध वारा ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुरंगीचा गंध वारा ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत – वर्ण संख्या 16 यती 8 व्या अक्षरावर) 

माझ्या मनात बसला तळ कोकण हा सारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||ध्रु||

फांदी फांदीवर आली सोनपिवळी तकाकी

सर्प हिच्या संगतीत कोकणचा मेवा चाखी

वसंताच्या स्वागताला सारा फुलला नजारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||1||

*

सुरंगीची पूजा बांधू आरवली वेतोबाला 

वळेसार देखणासा सजवतो कुंतलाला

नाव सुरंगी बुरंगा चमचम जणू तारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||2||

*
रवी तळपतो वर खाली सुगंध बहर 

वसंताचं आगमन किती साजरं सुंदर 

अत्तराची खाण आहे कोकणचा हा गाभारा 

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||3||

*
घमघम करणारे श्वेत पाकळ्यात तुरे

सुकलेल्या फुलाचाही गंध कुंतलात उरे 

शब्दा शब्दात माळला किती नाजूक हा तारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||4||

*
मला म्हणते सुरंगी माझ्यावर बोल काही

मधुमासी उमलून मी गं देते नवलाई 

झरझर उतरला शब्द फुलांचा पिसारा

देवराईत सुटला सुरंगीचा गंध वारा ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “एकच इच्छा“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – एकच इच्छा – ? ☆ श्री सुहास सोहोनी

भूतकाळ संपला, अजून

वर्तमान उभा आहे

आर्त भविष्याचं चित्र

डोळ्यांसमोर स्पष्ट आहे….

*

इच्छा एकच या जागेवर

एक झाड रुजून यावं

पानसळीच्या आडोशाला

चिऊताईचं घरटं व्हावं…

🌹

कवी : मेधानुज

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९३ ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९३ ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

भावनांचे चक्र येथे ना कधीही थांबते

जीवनाचा खेळ आता मी नव्याने खेळते

*

मी कशी सांगू कुणाला वेदना हृदयातली?

कसनुसे आणून हासू चेहरा सांभाळते

*

भाळले होते तुझ्यावर, हे तुला कळलेच ना ,

मी उगाचच हे जगाला सांजवेळी सांगते

*

चेहरा माझा कधीचा पाहिला ना दर्पणी

कालचे प्रतिबिंब माझे मी तुझ्यातच पाहते

*

वादळाची ना तमा, ना आसऱ्याची लालसा

मुक्त झाले या क्षणाला, ही कुडीही त्यागते

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीत मंजुषा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गीत मंजुषा… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

 गीत मंजुषा आवडीची

मनामनांत गुंजन करी

शब्द मंजुषा भावनांना

मनापासून स्पर्श करी

*

प्रश्न मंजुषा सोडविता

ज्ञानलालसा उमलते

धन मंजुषा मिरवणे

सर्वथा अयोग्य असते.

*

चैतन्य मंजुषा सर्वांची

सदा फुलत राहताना

नित्य नवे शिकत राहू

सोनं चांदणे वेचताना.

*

आपणच भाग्यविधाते

जीवनाचे ही शिल्पकार

मंजुषा सोबतीला आहे

स्वप्नांना करण्या साकार.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०८ ☆ रातभर जागलात का?… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०८ ?

☆ रातभर जागलात का? ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

चांदोबा रातभर जागलात का?

चुकीचं असं तुम्ही वागलात का?

यानाने येण्याची दिली संधी

तिथे नाही वाडा चिरेबंदी

*

आम्हा खाली बघून हसलात का?

आमची वाट बघत बसलात का?

ढगाच्या मागुन निघताल का?

गोरा गोरा चेहरा दावताल का?

*

चांदोबा एकटे फिरता तुम्ही

सोबत का हो नसते मामी

सांगा तिला माहेरी धाडलंत का?

वा कुठं दडवून ठेवलंत का?

*

अवचीत पाऊस कसा आला

आणि तुम्ही गायब कुठे झाला

दामिनीला पाहून दडलात का?

खरं सांगा चांदोबा रडलात का?

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दूर अजून रात्र…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दूर अजून रात्र…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

दूर अजून रात्र आहे

चांदण्यांनो उगवू नका

मनातल्या आठवांना

सांजवेळी जागवू नका.

*

काळजात हुरहुरते

गेले क्षण पांगवू नका

राहू द्या स्तब्ध सावल्यांना

निरवता भंगवू नका.

*

डोळ्यात ऊतरले रंग

आसवात भिजवू नका

विरहातली ही घटीका

शपथांनी सजवू नका.

*

भरभरु देत किनारे

संथ लाटा गाजवू नका

रेतीतले स्वप्न दिवस

रमल त्या मुजवू नका.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ? श्री आशिष  बिवलकर ☆

संत उपदेश | बीज अध्यात्माचे | 

कल्याण जगाचे | निरंतर ||१||

*

एक एक शब्द | अर्थ त्याचा जाण |

सुवर्णाची खाण | हाती लागे ||२||

सोसूनिया कळा | जन्म देते माय |

दुधावरी साय | जैसी यावी ||३||

*

संताचे जीवन | जैसे मातेपरी |

निरपेक्ष सारी | अंगी सेवा ||४||

*

आंधळ्याच्या हाती | मार्ग दावी काठी |

तैसी जगजेठी | संतजन ||५||

*

संतांचीया देखी | रंक आणि राव | 

नसे भेदभाव | अंतरीसी ||६||

*

आशिष वंदितो | संताचे वचन |

ज्ञानाचे लोचन | उद्धारासी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वादळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वादळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

असणे नसणे यांच्या मधले अंतर कळते आहे

मानवतेचे या निकशावर नाते झुलते आहे

*

कोण कोठला कुठून आला याची पर्वा नाही

खला सोबती खल होताना सगळे जमते आहे

*

तो पैशाला देव मानतो चुकते कोठे त्याचे

गोळाकरण्या धनदौलत मग नाते तुटते आहे

*

अधिकारानी गळा घोटला स्वातंत्र्याचा येथे

न्यायदेवता डोळे झाकत मौनी बनते आहे

*

भ्रष्टाचारी जमले येथे करती सारे घपले

त्याच मुळे तर सामान्यांचे जगणे मरते आहे

*

भले पुढारी झाले त्यांना का हे दिसले नाही

दुर्बलतेचे रोज कलेवर येथे जळते आहे

*

खाणारानी खात जायजे दिसेल जे जे ते ते

सत्तेच्या मग बुरख्यात खाली सारे खपते आहे

*

समोर दिसतो विनाशकारी काळ मातला वेडा

रुपात त्याच्या विध्वंसाचे वादळ फिरते आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares