मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तोल… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ तोल… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

गिरीशिखरांवर उंच दोन आयुष्य पेलले आहे

जाईल कधी मम तोल याची वाट जमाना पाहे

कर्तृत्वाच्या शिखरासाठी घाम कितीतरी वाहे

घामाने निसरड्या घसरणे वाट जमाना पाहे

 *

कीर्तिचे शिखर मम आपले आपण वाढत आहे

सुरुंग त्याला कधी लागतो वाट जमाना पाहे

 *

जाण कधी न झाली यांची उंची वाढत आहे

खोल दरी केव्हा बोलावे वाट जमाना पाहे

 *

सम्यक विचार ही काठी तोल सावरत आहे

काठी सुटण्याची हातातून वाट जमाना पाहे

 *

क्षितिजावरती नजर लागली अनिमिष खिळूनी राहे

दूर दूर ते पुढे पळावे वाट जमाना पाहे

 *

उंचीच्या दोन्ही शिखरांची जाण अंतरी नोहे

पुढे पाहणे पुढेच जाणें भले जरी वाट जमाना पाहे

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०३ आणि १०४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०३ आणि १०४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १०३ – – – 

हरिकीर्तने प्रीती रामीं धरावी ।

देहेबुद्धि नीरूपणी विसरावी ।

परद्रव्य आणिक कांता परावी ।

येदर्थी मना सांडि जीवीं करावी ।।१०३।।

अर्थ :  श्रीरामाबद्दल प्रेमभाव ठेवून हरिकीर्तन आणि निरूपणात देहबुद्धीचा त्याग करून स्वतःला विसरून जावे. परद्रव्य आणि परस्त्री यांचा अगदी मनापासून त्याग करावा.

(हरिकीर्तन – भगवंताचे गुणगान, निरूपण – तात्विक चर्चा, येदर्थी – या कारणाने, सांडि जीवीं करावी –मनापासून त्याग करावा)

 विवेचन :या श्लोकात साधकाने कसे वागावे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण एक लक्षात घेतली पाहिजे की साधक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपण आहोत. आपण त्या मार्गावर वाटचाल करायचे ठरवली म्हणजे आपण साधकच झालो. आपण प्रापंचिक माणसे. आपली देहबुद्धी प्रबळ असते. ही देहबुद्धी कमी होऊन भगवंताकडे आपले चित्त लागावे यासाठी हरिकीर्तन आणि निरूपण यासारखा सहज उपाय दुसरा नाही. हरिकीर्तन करणे म्हणजे भगवंताच्या गुणांचे गुणगान करणे. त्याच्या गुणांचे जेव्हा आपण वर्णन करू तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे निरूपण. म्हणजे तर्काच्या, बुद्धीच्या साहाय्याने भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या अवतारकार्याबद्दल, त्याने जो उपदेश केला आहे त्याबद्दल जाणून घेणे. भक्ती आणि ज्ञान इथे हातात हात घालून चालतात. हृदय आणि मेंदू एकत्र येतात. कोरडे ज्ञान उपयोगाचे नाही. भक्ती जेव्हा ज्ञानासहित केली जाते तेव्हा ती डोळस भक्ती असते. म्हणून समर्थ आपल्याला हरिकीर्तन आणि हरिकथा निरूपण असे दोन्ही करायला सांगतात.

भगवंत निर्गुण आणि सगुण असा दोन्ही आहे. भक्तीच्या शक्तीने तो निर्गुणातून सगुणात येतो. म्हणून साधकाला आधी त्याचे सगुण रूपात प्रेम निर्माण होणे आवश्यक असते. त्यातूनच मग पुढे निर्गुणाकडे जाता येते. सगुणाचे प्रेम निर्माण होण्यासाठी त्याच्या रूप गुणांचे गुणगान करता आले पाहिजे. भगवंताबद्दल तात्विक चर्चा करून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेता आले पाहिजे. आणि यामध्ये दांभिकता नको. कोणतीही गोष्ट मनापासून असावी.

साधकासाठी आणखी दोन महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या श्लोकात आपल्याला सांगितल्या आहेत. परद्रव्य आणि परस्त्री यांची अभिलाषा धरू नये. तसा विचार मनात देखील आणू नये. या दोन गोष्टी वरवर करायला सोप्या वाटल्या तरी आपल्या देहबुद्धीमुळे त्यावर नियंत्रण मिळवणे फार कठीण जाते. कनक आणि कांता या दोन गोष्टी माणसाला मोहात पडतात. त्यामुळे तो जर परमार्थ मार्गावर वाटचाल करीत असेल तर त्याचा परमार्थ निष्फळ ठरतो. कारण काम, वासना, द्रव्यलोभ या गोष्टी भगवंत प्राप्तीच्या आड येतात. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत हवा असेल तर या गोष्टींचा त्याग करायला हवा. आपल्या संसारापुरते आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा परंतु दुसऱ्याच्या पैशावर डोळा नको. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… ‘ त्याचप्रमाणे परस्त्री मातेसमान मानावी असं आपली संस्कृती सांगते. परमार्थात तर ही गोष्ट फार महत्वाची आहे.

तेव्हा देहबुद्धी कमी करण्यासाठी परमेश्वराच्या गुणगायनात आणि निरूपणात आपला वेळ व्यतीत करावा. ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो.. जगी तोचि तो मानवी धन्य होतो ‘ हे समर्थांचे वचन लक्षात ठेवावे.

स्वसंवाद 

१. मी माझी भक्ती केवळ ‘कोरडी’ किंवा भावनिक करतोय, की संतांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि निरूपणाच्या साहाय्याने ती ‘डोळस’ करण्याचा प्रयत्न करतोय?

२. “एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत” हे लक्षात ठेवून, मी भगवंताची आस धरताना मनातल्या कनक आणि कांतेच्या (लोभ आणि वासनांच्या) तलवारी बाजूला ठेवायला तयार आहे का?

३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माझा प्रपंच चालवण्यासाठी पैसा मिळवताना माझा व्यवहार ‘उत्तम आणि प्रामाणिक’ आहे का? मी नकळत परद्रव्याची अभिलाषा तर धरत नाहीये ना?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनातील ‘देहबुद्धी’ (अहंकार) कमी करण्यासाठी मी दिवसातील काही वेळ तरी हरिकीर्तनात किंवा चांगल्या तात्विक विचारांच्या निरूपणात घालवतो का?

– – – – – – –

श्लोक क्र. १०४ – – –

क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।

परी चीत दुश्चीत ते लाजवीते ।

मना कल्पना धीट सैराट धावे ।

तया मानवा देव कैसेनि पावे ।।१०४।।

अर्थ : मनुष्य निरनिराळ्या प्रकारे बोलतो. परंतु बोलण्याप्रमाणे त्याचे स्वतःचेच वागणे नसल्याने त्याचे मनच त्याला आतून लाजवते. प्रत्यक्ष आचरण न करता ज्याचे मन नुसत्या स्वैर कल्पना करण्यात दंग असते अशा मनुष्याला परमेश्वर कसा प्रसन्न होईल?

(नानापरी – विविध प्रकारे, चीत – चित्त, दुश्चित – वाईट विचारांनी दूषित झालेले मन, सैराट – स्वैरपणे/बेलगाम, धीट – अनियंत्रित)

विवेचन : व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांचे बोलणे मोठे आकर्षक असते. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. परंतु ज्यावेळी त्यांच्या परीक्षेचा प्रसंग येतो, तेव्हा अशी माणसे उघडी पडतात. अशी माणसे लोकांना आपल्या बोलण्याने काही काळ प्रभावित करण्यात यशस्वी देखील होतात पण त्यांचे अंतर्मनच त्यांना सांगत असते की तू खोटे बोलतो आहेस, लोकांना फसवतो आहेस. अशा वेळी त्यांचीच त्यांना लाज वाटते. पण हा आतला आवाज ऐकून जे सावध होतात त्यांना प्रगतीची काहीतरी संधी नक्कीच असते. पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जे आपले वागणे सुरूच ठेवतात, अशा व्यक्ती परमेश्वरापासून लांबच जातात. जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, ते परमेश्वराला कसे प्रसन्न करून घेणार?

महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे उदाहरण या बाबतीत सांगता येईल. त्यांच्या कीर्तनाला अक्षरश: हजारोंचा जनसमुदाय जमत होता. आपल्या कीर्तनात हे बुवा आपल्या मुलामुलींचे लग्न अत्यंत साधेपणाने करा. अवास्तव खर्च, थाटमाट या सगळ्या गोष्टींना फाटा द्या असे आवाहन करीत. आजची परिस्थिती पाहता सामाजिक बदलाच्या दृष्टीने त्यांची ही सूचना योग्यच होती. कारण सामान्य परिस्थितले अनेक लोक किंवा गरीब शेतकरी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून अडचणीत येतात. पण ज्यावेळी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी साखरपुड्यालाच एवढा प्रचंड खर्च आणि थाटमाट केला की त्यापुढे श्रीमंतांकडील लग्नही फिके पडावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ‘ म्हणून प्रत्यक्ष आचरणाला अतिशय महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ यांच्यासारखे आमचे अनेक संत जसे बोलले तसेच वागले. म्हणूनच ते अवघ्या जगासाठी वंदनीय ठरले.

त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, ‘ नसत्या कल्पना करू नये. ‘ बऱ्याच वेळा माणूस भूतभविष्याचा विचार करून नको त्या कल्पना करत बसतो. बऱ्याच वेळा या कल्पना मोहाच्या वा विषयांच्या संदर्भात असतात. कल्पनेचा अश्व चौखूर दौडत असतो. कल्पनांना देखील काही एक महत्व निश्चितच आहे. पण त्या वास्तवतेवर आधारित असाव्यात. त्यांच्या साहाय्याने सत्याचा शोध घेण्यात मदत व्हावी. अशा त्या असल्या तर जीवनात अत्यंत उपयोगी ठरतात. पण कोणताही वास्तविक आधार नसताना सैराट म्हणजे सैरावैरा धावणारे मन नको त्या कल्पना करते. त्यातून माणूस नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा गोष्टींचा सुद्धा संसारात ताप होतो. परमार्थात तर अशा कल्पनांना थारा नाही. समर्थ आधीच्या एका श्लोकात म्हणतात, “जनीं बोलण्यासारिखे चाल बापा। मना कल्पना सोडी संसारतापा॥ 

म्हणूनच माणसाने बोलण्यासारखे वागावे. आपल्याच वागण्याने आपल्याला लाज उत्पन्न होईल असे कर्म करू नये. चित्त दूषित करणाऱ्या अशा गोष्टींपेक्षा आपले चित्त ईश्वराकडे लावावे.

स्वसंवाद : 

१. मी समाजमाध्यमांवर किंवा चार लोकांमध्ये जे मोठे आणि आदर्श विचार मांडतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंग आल्यावर मी स्वतः खरोखरच त्याप्रमाणे आचरण करतो का?

२. “बोले तैसा चाले” या तुकाराम महाराजांच्या सूत्राचा आदर राखताना, माझे अंतर्मन कधी माझ्याच एखाद्या ढोंगी वागण्यामुळे मला आतून ‘लाजवते’ का?

३. भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंता यांमुळे माझे मन ‘सैराट’ (बेलगाम) धावत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालून वास्तवतेच्या भूमीवर आणतो का?

४. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी बाह्य देखावा किंवा कोरडी बडबड करण्यापेक्षा, मी माझे चित्त ‘दुश्चींत’ (दूषित) होण्यापासून वाचवून देवाकडे लावायला तयार आहे का?

– क्रमशः श्लोक १०३ आणि १०४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०६ – मृत्यू नंतर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०६ – विजय साहित्य ?

☆ मृत्यू नंतर…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अक्षर छंद – १७ अक्षरी द्विपदी. वीस ओळी.)

‌मृत्यूनंतर, यमलोकाचा,

प्रवास होतो, सुरू

आठवणींना, काळीज वेडे,

पहा लागते, स्मरू.

*

यमदूताच्या, सवे निघाली,

आत्म ज्योतीची, यात्रा

तिथे न चाले, कलेवरी त्या,

इहलोकीची, मात्रा.

*

मृत्यू नंतर, हिशेब होतो,

पदा पदांचा, जेव्हा

गंगा यमुना, गालावरती,

खळाळ धावे, तेव्हा…!

*

नश्वर देहा, सोडून जाते,

व्यक्ती ‌लाडकी, जेव्हा

प्रवास चालू, परलोकीचा,

आज्ञातातील, तेव्हा.

*

मृत्यू नंतर, सरते सारे,

उरे न काही, मागे

आप्त मंडळी, करती चर्चा,

आठवणींना, जागे

*

मृत्यू नंतर, फिरतो आत्मा,

मागे उरते, माया

दहा दिसांनी, पिंडदान ते,

श्रृती स्मृतींची, छाया.

*

आला एकटा, जाई एकटा,

कैक जोडली, नाती

काळ घेऊनी, पहा धावतो

कुणा न लागे, हाती.

*

मृत्यू नंतर, कुणी पाहिला,

प्रवास ज्याचा, त्याचा

ज्ञात क्षणांनी, कर्म फलाचा

संचीत केला, साचा.

*

असा प्रवासी, सखा सोबती,

दूर देशी त्या, राही

हळव्या नेत्री, दुनिया त्याची,

कशी वागते, पाही.

*

अंतरातले, आभास त्याचे,

पहा सांगती, काही

संपून गेला, प्रवास आता,

मागे फिरणे नाही.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रिमझिमल्या सरी… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ रिमझिमल्या सरी ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

रिमझिमल्या सरी माझ्या अंगणात

मृगाच्या आठवणी भरल्या मनात

गेल्या चिऊ काऊ आपल्या घरी

माती गंधाळली साऱ्या शिवारी

 *

भरे आनंद शेतकऱ्याच्या घरात

उद्याले पेरणी बीज पडेल शेतात

 *

हात जोडुनी बीज येई तरारुनी

शिवार फुलते गात अभंग गाणी

 *

पाऊस वाऱ्याने झाड लागे बोलू

हिरवं शिवार पिक लागले डोलू

 *

 शिवारात चालू झाली भांगलण

आनंदे माय येई वाऱ्याला उधाण

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ धोंडे आणि दगड ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? धोंडे आणि दगड ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

७) चित्रकाव्य —

 “ धोंडे आणि दगड.. “ कवी : प्रमोद वर्तक 

चित्रकाव्य :  .

दशम ग्रहाच्या शांतीसाठी 

चप्पल बनवली चांदीची 

ऐशीतैशी त्या महागाईची 

लाज राखली कोल्हापूरची

आठ दिवसात मेहनतीने 

केला विक्रांतने नवा विक्रम 

चपलेसाठी साडेचार लाख 

ही तर केवळ मामुली रक्कम

धोंड्या मासाचे खरे महत्व 

बाकी दगडांना काय कळणार

तेहतीस अनारसे देऊन 

जावयाची बोळवण करणार

जावयाची बोळवण करणार

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फूल ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ फूल ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

प्रत्येक फूला -फूलास असतो

फूलण्याचा आनंद

वारा दूरवर वाहून नेतो

दरवळणारा सुगंध

एक दिवसाच्या आयुष्याची

कधी फूलास नसते चिंता

सुकलेल्या पाकळ्यांची फूल

कधी मांडत नाही व्यथा

फूलून सदाची हसावे

काट्या -कुट्यांत सजून रहावे

कधी हारामध्ये गुंफून घ्यावे

कधी पायरीचे प्राजक्त व्हावे

हाच फूलास फूलण्याचा छंद

क्षणभर फुलण्याचा सुध्दा

फूल जपत असते आनंद

 

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – शब्देविण संवादू – ☆ ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – शब्देविण संवादू – ☆ ज्योत्स्ना तानवडे ☆

बाळ बोलते आईसंगे 

कसे मूक संवादातुनी 

भाव समजती आईचे 

गोड बोलक्या डोळ्यातुनी 

*

स्पर्श बोलती दोघांचेही 

एकमेका आनंद होई 

जवळीक आईची अशी 

बाळाला आश्वासून जाई 

*

सुखावते बाळ ऐकुनी 

लाडिकसे बोल आईचे 

हुंकार देऊनी तिजला 

प्रतिसाद गोड बाळाचे 

*

माय लेकरांचे हे नाते 

शब्दाविना रंगून जाते 

काळवेळाचे भान कसे 

दोघांनाही आता नुरते ||

©  ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२९ ☆ गीत – प्रेमभावना… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२९ ?

☆ गीत – प्रेमभावना ☆  प्रभा सोनवणे ☆

स्वप्नात साजणा येऊ नको

अन साद मला तू घालू नको ॥धृ॥

*

ही अवखळ माझी प्रीत

कशी पाळू मी जनरीत

होईल बोभाटा नगरीत

बदनाम मला तू करू नको… १

*

हा कसा प्रीतीचा ध्यास

एक जीवघेणा हव्यास

चहूकडे तुझाच रे भास

हे वेड जीवाला लावू नको… २

*

विसरणे तुला अशक्य जरी

प्रीत तुझी अप्राप्य परी

ही प्रेमभावना धुमसते उरी

तू फुंकर त्यावर घालू नको… ३

*

मी जळून झाले खाक

मज माझाच वाटे धाक

राहिली चुकून ठिणगी एक

तू वणवा आता चेतवू नको… ४

*

स्वप्नात साजणा येऊ नको

अन साद मला तू घालू नको ॥

जुन्या डायरीतून… अप्रकाशित रचना

© प्रभा सोनवणे

२५ नोव्हेंबर १९९२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुक्काम दो घडीचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मुक्काम दो घडीचा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 

मुक्काम दो घडीचा, यात्रा परी निरंत

तो दूर दूर अजुनी, पांथा तुझा दिगंत

 *

पक्ष्यास ज्ञात माझ्या, घरटेच दैव त्याचे

पंखांस रोज चळवी, आकाश ते अनंत

 *

आभाळ फाटताही, ज्याचा ढळे न तारा

परदु:ख दुःख ज्याचे, तो एक भाग्यवंत

 *

तिमिरास तिमिर घेतो, कवटाळुनी उराशी

होतो जराजरासा, काळोख तेजवंत..

 *

रानात दाटलेली, हिमरात्र आरपार

सूर्योदयात एका, फुलतो कधी वसंत

 *

लावण्य जीवनाचे, घे भोगुनी मनस्वी

व्हावा तुझ्या व्यथांचा, शृंगार शोभिवंत

 *

अंतागणीक माझ्या, मी जन्मतो नव्याने

आरंभ हा नवा अन् आता नवीन अंत

  (आनंदकंद)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लहानपण, बालपण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

लहानपण, बालपण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कशाचीच फिकीर नसते.

मजा असते सगळी, खेळण्यात,

मित्रांसोबत शिवारभर हुंदडण्यात,

निसर्गाच्या सानिध्यात.

छानछान खायला मिळतं. कोडकौतुक अमाप होतं, म्हणूनच लहानपण सगळ्यांनाच कायमच हवंहवंसं वाटत. पण त्याची मजा लुटता येण्यासाठी तुमच्या जवळ निसर्गाची आवड, मित्रपरिवार, घरच्यांचं पाठबळ, आणि तुमच्या तना मनातलं अमाप चैतन्य असावं लागतं. हे फार उशिरा म्हणजे बालपण निघून गेल्यावर कळतं. तेव्हा मन खट्टू होत. अपराधीपणाची भावना निर्माण होते मनात. एक छानशी संधी हकनाक हुकल्याची. तेव्हा कुठलाच पर्याय हातात नसतो… जुन्या आठवणीं आठवण्या शिवाय.

पण ज्यांनी आपलं बालपण घरच्यांचे पाठ शेकणारे धपाटे खाऊन ही मनसोक्त उपभोगलय, अनुभवलय ते भाग्यशाली ठरलेत.

कारण त्यांच्या जवळ आहे आठवणींचा जादुई पेटारा. तो उघडून ते कुठेही केव्हाही आपला स्वतःचा आनंदी कोश निर्माण करून तल्लीनतेने तेथे समधीस्त होऊन, गेल्या दिवसांच्या चित्रफितींचे अवलोकन करत असतात. अशा अनेकानेक चित्र फिती ज्यांच्या पोतडीत ठासून भरून ठेवल्या आहेत त्यांना एकांतवासाने कधीच छळले नाही. तर आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्याची संधी वारंवार उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच आठवणीच्या इलाख्यातले हे मुसाफिर कायम हसतमुख राहून इतरांना ही हसमुख बनवण्यात तरबेज असतात.

प्रत्येकाला आपलं लहानपण आठवत असेल. त्यातला आपला मोलाचा वाटा त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या काळजावर कोरून ठेवला असेल. त्यांच्यावर साठलेली वयाची धूळ जराशी झटकली की कुबेराला ही देता येणार नाही असा अविनाशी खजीना त्याच्या पुढ्यात अवतरतो.

मग त्यातला प्रत्येक दस्तऐवज त्याच्या गतकाळातील वैभवाला त्याच्या समोर प्रस्तुत करतो आणि आनंदी बनवून स्वप्नसश्रृष्टीची सफर घडवून आणतो. हे गतवैभव प्रत्यक्षात उपभोगता येणं दुरापास्त असलं तरी त्याला आठवून पंख लावून भुतकाळाची अविस्मरणीय सफर नक्कीच करता येते. म्हणूनच बालपणाला, लहानपणाला आपापल्या पासून कधीच दूर लोटून देवू नका. त्याच सतत चिंतन मनन तुम्हाला एक नवी ऊर्जा बहाल करून नवचैतन्य बहाल करील यात काही शंका नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares