सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 276
☆ वारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
पंढरीच्या वाटे॥निघे वारकरी
भक्ती त्याची खरी ॥ पांडुरंगा॥
*
पाऊले थकली ॥ जड झाला जीव
दैना ही थांबव ॥ देवा त्याची॥
*
“तुझ्या दारी आलो” ॥ म्हणे वारकरी
भिस्त त्याची सारी ॥ तुझ्यावरी ॥
*
जरी दुःखी कष्टी ॥ गरीब बिचारा
घाली येरझारा ॥ पंढरीला ॥
*
भोळा शेतकरी ॥ असे वारकरी
करतो चाकरी ॥ जमीनीची ॥
*
शेतमळा त्याचा ॥ राखी विठूराया
कर तू किमया ॥ वावरात ॥
*
याच साठी वारी ॥ कर त्याची मान्य
शेतातले धान्य ॥ टिको आता ॥
*
अवेळी पाऊस ॥ करी दाणादाण
जीणे हे भयाण ॥ विठ्ठला रे ॥
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

















