मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दिसतं तसं नसतं हो… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दिसतं तसं नसतं हो…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

असणं आणि दिसणं यात

खूप काही फरक असतो

फोटोमधे बघत असता

 प्रामुख्याने तो जाणवतो

*

नरम मुलायम रेशीम रेती

त्यावर हटयोग करे युवती

निरखुनी पहाता सारे कळते

समजुन येते आपली फजिती

*

दृष्टीभ्रम हा असेल अथवा

युक्ति फोटो काढायाची 

म्हणून मत देण्याआधीच

सवय करावी निरखायाची

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे + संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ.ज्योत्स्ना तानवडे  यांना मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान ने सन्मानित केले आहे. प्रतिष्ठानच्या लेखन उपक्रमात साप्ताहिक कविता आणि मासिक लेख वर्षभर लिहिल्याबद्दल सातत्यपूर्ण उत्तम लेखनाचा विशेष  पुरस्कार  त्यांना प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ.तानवडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया सुश्री ज्योत्स्ना तानवडे चा चित्रकाव्य – पाऊस आला रे SSSSS…! 

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पाऊस आला रे SSSSS…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

आला पाऊस झिम्माड 

मैदानात पाणी पाणी 

पाण्यामध्ये नाचताना 

मुले गाती गोड गाणी ||

*

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्यात 

येरे येरे तू पावसा 

छत्री उंच उडवूनी 

मुक्त भेटती पावसा ||

*

पावसात भिजण्याची 

मजा वाटे किती न्यारी 

भिजवती एकमेका 

थयथय नाच भारी ||

*

मुले आणि पावसाची 

घट्ट मैत्री आनंदाची 

धुंदी झिरपे मनात 

आठवण आयुष्याची ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठ... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

शुष्क धरेवर शुभ्र घनासह पाय रोवले ज्येष्ठाने

कपाशीपरी मेघ भासती, की पंख पसरले हंसाने

*

वसंत सरला, ग्रीष्म भडकला, आग पेटली चोहीकडे

गुलमोहर हा उतू चालला केशरमिश्रित पडती सडे

*

दिवस लांबले, पवन थांबला, पानोपानी रंग बदलले

सर हलकिशी यावी म्हणूनी आसुसले हे डोळे

*

कुटुंबलत्सल कुठे पक्षिणी घरट्यातून विसावे

मातीमधुनी क्वचित कोठे मृगकीटक खुणावे

*

ज्येष्ठ तपस्वी ‌ऋषी मुनींसम या धवल मेघमाला

श्यामवर्ण मेघांचा होईल सुखवी जो बळीराजाला

*

 सुहास रघुनाथ पंडित. सांगली.

 ९४२१२२५४९१

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 254 – गाथा तुकोबांची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 254 – विजय साहित्य ?

☆ गाथा तुकोबांची…!

गाथा तुकोबांची

अमृताची धारा

प्रबोधन वारा

प्रासादिक..!

*

तुकाराम गाथा

जीवन आरसा

तात्त्विक वारसा

विठू नाम…!

*

दिली अभंगाने

दिशा भक्तीमय

षडरिपू भय

दूर केले…!

*

अभंगांचे शब्द

जणू बोलगाणी

झाली लोकवाणी

गाथेतून…!

*

जीवनाचे सूत्र

महा भाष्य केले

भवपार नेले

अभंगाने…!

*

तुकाराम गाथा

आहे शब्द सेतू

प्रापंचिक हेतू

पांडुरंग…!

*

वाचायला हवी

तुकाराम गाथा

लीन होई माथा

चरणातें…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊसच पाऊस… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊसच पाऊस… ☆ सुश्री त्रिशला शहा

असा कसा रे पावसा आलास तू अचानक

उन्हाळ्याची सुट्टी आमची होती ना रे शिल्लक

*

कित्ती कित्ती होते ठरवले सुट्टीत खूप फिरायचे

तुझ्या अवकाळी येण्याने त्यावर पडले पाणी ना रे

*

डोंगर, दऱ्या, जंगल, रान सारे पालथे घालायचे

सागराच्या लाटांवर मस्त झोकून द्यायचे

*

एक वर्ष वाट पाहिली सुट्टीची या आम्ही

पण तुझ्यामुळे घ्यावी लागली या साऱ्यांशीच कट्टी

*

पावसाळ्याचे चार महिने तुझ्याच हक्काचे

तरीसुध्दा तुझी लुडबुड आमच्या सुट्टीमध्ये

*

खरं सांग रे पावसा असा रे तू कसा?

अवकाळी म्हणून सारे चिडवतात नं तुला

*

तसा तूही आहेस रे खूप खूप चांगला

आमची गरज पाण्याची भागवतोस खरा

*

म्हणूनचं म्हणते रागाला नको येऊ

आमच्या मेच्या सुट्टीत नको बाबा येऊ

*

छत्री, रेनकोट, बुट नवेनवे घेऊ

तुझ्या येण्याचे तेव्हा स्वागत नक्की करु

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ श्रद्धांजली अरण्याची – स्व. मारुती चित्तमपल्ली – ☆ सुश्री शीला पतकी ☆

सूचना/Information 

🙏🏻💐 स्व. मारुती चित्तमपल्ली 💐🙏🏻

🙏🏻 श्रद्धांजली अरण्याची 🙏🏻

अरण्यातील ऋषी तपस्वी आज शांत  जाहले

सारे जंगल आज सकाळी पोरके हो वाटले

*

स्तब्ध झाल्या कोकिळा अन निःशब्द झाले खगगण

सुने सुने आज जाहले जंगलाचे आंगण

*

 माळावरच्या कोळणीने दार आतून बंद केले

 कीटकांनी पंख आपले आज मिटवून घेतले

*

 जंगल वृक्ष ते स्तब्ध झाले सळसळ त्यांची थांबली

खारुताईची ती पळापळ ती ही आज मंदावली

*

 हिरवी पाने कुजबुजुली सांगती काहीतरी

वारा म्हणतो या बसा माझ्या या पंखावरील

*

 वाहूया पाने फुले ती त्या ऋषीच्या चरणावरी

निष्प्राण देह ,तरी कळेल त्यांना कृतज्ञता आपली खरी

*

🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिला थेंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहिला थेंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

वरुण आला झुला झुलवीत

मेघडंबरीत वरात काढीत

नभ फाकीले सौदामिनीने

धरतीलाही तृप्त फुलवित

*

पहिल्या थेंबात पृथा लाजली

मृदुगंधाचे अत्तर सोडीत

आस वाढली दोन्ही जीवांना

 बिलगत आले घट्ट मिठीत

*

धरा भिजली पानोपानी

वरुण आला इंद्रधनू रेखीत

 कणाकणात मने भिजली

 दान टाकले धरेच्या ओटीत

*

ओटी भिजली मोती बीजात

 गर्भात सजले बीज अंकुरित

 हिरवाई पसरली अंगोपांगी

 आंनद झाला साऱ्या सृष्टीत

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रभुजीच्या मना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रभुजीच्या मना…” ☆ सुश्री शीला पतकी 

मन काहुर  काहुर मन उगा धास्तावते

प्रभुजीच्या मना आले तेच तेच रे घडते

*

इस्कटल्या इचाराचा तुझ्या डोक्यात रे गुंता

येड्या सोड हे सगळं शरण जाय भगवंता

*

अंगामध्ये होतं बळ लई मारील्या फुशार्या

क्षणाक्षणाला भगवंत देत होता रे इशारा

*

त्याची करणी का कधी अशी कोणाला कळली

आता होत आता नाही जणू जादू की जाहली

*

सारे सोडावे त्याचे ठाई करा चोख रे विचार

नित्य  नेमाने करावा सदाचाराचा आचार

*

माय माऊली होऊन घेतो भक्ताला पोटाशी

त्याचे करावे स्मरण नव्या प्रत्येक दिवशी🙏🙏

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्षण… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ क्षण☆ श्री अनिल वामोरकर ☆

साधना करतो

ज्या आत्मानंदासाठी

तो क्षण येतो

फक्त काही क्षणासाठी..

*

विचार करतो

तो क्षण कायम पकडून ठेवू

पण नाही, तसे घडत नाही

अगदी क्षणभरच राहतो भाऊ..

*

क्षणिक सुखासाठी

आयुष्य घालवतो,

शाश्वत आनंदाचा क्षण

मात्र आयुष्यभर पुरतो…

*

करू साखळी

शाश्वत क्षणांची

तीच दाविल वाट

अंतिम गंतव्याची…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

? कवितेचा उत्सव ?

☆ आई… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

सोडून हात माझा आई कुठे निघाली

आता व्यथाच सारी माझ्या घरात आली… १

*

आई तुझा दिलासा देतो मला सहारा

माझा तुझ्याविनागे नाही कुणीच वाली…. २

*

आहे तुझी प्रतिमा हृदयामधेच आई

जातील हे जरीही अश्रू सुकून गाली…. ३

*

माहित हे मला की येशील ना कधी तू

तू नेहमीच माझ्या असतेस भोवताली… ४

*

पदरात फाटक्या या माझी असे शिदोरी

मातीत या कुणाची झोळी नसेल खाली…. ५

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares