मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ आदित्य हृदय स्तोत्र ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रभू रामचंद्र रणांगणात चिंतित अवस्थेत असतांना रावण शस्त्रसज्ज होऊन रणांगणात उतरला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी रामापाशी जाऊन त्याला ‘आदित्यहृदय स्तोत्र’ सांगितले.

आदित्य ह्रदय स्तोत्र 

ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम्‌ । 

रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्‌ ॥१॥

 *

दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम्‌ । 

उपगम्याब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा ॥२॥

 *

राम राम महाबाहो श्रृणु गुह्मं सनातनम्‌ । 

येन सर्वानरीन्‌ वत्स समरे विजयिष्यसे ॥३॥

 *

आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम्‌ । 

जयावहं जपं नित्यमक्षयं परमं शिवम्‌ ॥४॥

 *

सर्वमंगलमागल्यं सर्वपापप्रणाशनम्‌ । 

चिन्ताशोकप्रशमनमायुर्वर्धनमुत्तमम्‌ ॥५॥

 *

रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम्‌ । 

पुजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम्‌ ॥६॥

 *

सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावन: । 

एष देवासुरगणांल्लोकान्‌ पाति गभस्तिभि: ॥७॥

 *

एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: । 

महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्यापां पतिः ॥८॥

 *

पितरो वसव: साध्या अश्विनौ मरुतो मनु: । 

वायुर्वहिन: प्रजा प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥९॥

 *

आदित्य: सविता सूर्य: खग: पूषा गभस्तिमान्‌ । 

सुवर्णसदृशो भानुर्हिरण्यरेता दिवाकर: ॥१०॥

 *

हरिदश्व: सहस्त्रार्चि: सप्तसप्तिर्मरीचिमान्‌ । 

तिमिरोन्मथन: शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान्‌ ॥११॥

 *

हिरण्यगर्भ: शिशिरस्तपनोऽहस्करो रवि: । 

अग्निगर्भोऽदिते: पुत्रः शंखः शिशिरनाशन: ॥१२॥

 *

व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजु:सामपारग: । 

घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवंगमः ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यु: पिगंल: सर्वतापन:। 

कविर्विश्वो महातेजा: रक्त:सर्वभवोद् भव: ॥१४॥

 *

नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावन: । 

तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्‌ नमोऽस्तु ते ॥१५॥

 *

नम: पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नम: । 

ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नम: ॥१६॥

 *

जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नम: । 

नमो नम: सहस्त्रांशो आदित्याय नमो नम: ॥१७॥

 *

नम उग्राय वीराय सारंगाय नमो नम: । 

नम: पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ॥१८॥

 *

ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे । 

भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नम: ॥१९॥

 *

तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । 

कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ॥२०॥

 *

तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । 

नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ॥२१॥

 *

नाशयत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभु: । 

पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभि: ॥२२॥

 *

एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठित: । 

एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम्‌ ॥२३॥

 *

देवाश्च क्रतवश्चैव क्रतुनां फलमेव च । 

यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमं प्रभु: ॥२४॥

 *

एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । 

कीर्तयन्‌ पुरुष: कश्चिन्नावसीदति राघव ॥२५॥

 *

पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगप्ततिम्‌ । 

एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ॥२६॥

 *

अस्मिन्‌ क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । 

एवमुक्ता ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम्‌ ॥२७॥

 *

एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत्‌ तदा ॥ 

धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान्‌ ॥२८॥

 *

आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्‌ । 

त्रिराचम्य शूचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्‌ ॥२९॥

 *

रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागतम्‌ । 

सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधेऽभवत्‌ ॥३०॥

 *

अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमना: परमं प्रहृष्यमाण: । 

निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ॥३१॥

 — — 

आदित्यहृदय स्तोत्र : भावानुवाद

 ☆ 

चिंतेने ग्रस्त श्रीरामचंद्र युद्धश्रमाने थकून रणी

युद्ध करण्या प्रत्यक्ष ठाके रावण समरांगणी ॥१॥

 *

देखूनिया तया रणी मुनी अगस्ती सरसावले 

भगवंत श्रीरामासमीप जाउनिया वदले ॥२॥

 *

महावीरा हे श्रीरामा गुपित सनातन ऐकशील

युद्धात सर्वांवरती विजयश्री प्राप्त करशील ॥३॥

 *

पावन आदित्यहृदय स्तोत्र सर्वशत्रूविनाशक

परम शिव नित्य अक्षय जपावे विजयदायक ॥४॥

 *

समग्र मंगलांमधील मंगल सर्वपापविनाशक

चिन्ताशोक शमन करी आयुष्य वृद्धीदायक ॥५॥

 *

सुर-असूर नित्य पूजिती किरणोमयी उदय होता 

विवस्वान भास्कर भुवनेश्वराचे पूजन करी आता ॥६॥

 *

आभा सकल देवांची तेजस्वी किरणकारण

सुर-असुरसहित समस्त लोकांचे करती पालन ॥७॥

 *

हाचि ब्रह्मा विष्णु हा शिव कार्तिकेय तथा प्रजापति

महेंद्र कुबेर काल हा यम विधु हाचि तेजाचा पती ॥८॥

 *

पितर वसू साध्य मरूद्गण मनु तथा अश्विनीकुमार

पवन वन्ही प्रजा प्राण ऋतू नियामक तेजस्वी प्रभाकर ॥९॥

 *

आदित्य खग सूर्य सविता गभस्तिमान पूष 

भानु हिरण्यरेत प्रभाकर सुवर्णसदृश ॥१०॥

 *

हरिद्रश्व सहस्रार्चि सप्तसति मरीचिमान

तिमिरोन्मथन शंभू त्वष्टा अंशुमान मार्तंड ॥११॥

 *

हिरण्यगर्भ शिशिर तपन दिनकर विवस्वान 

अदितीपुत्र अग्निगर्भ शंख शिशिरनाशन ॥१२॥

 *

व्योमनाथ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पारगमनी

जलमित्र घनवृष्टी विन्ध्यवीथीप्लवंग तमोभेदनी ॥१३॥

 *

आतपी मण्डली मृत्यू पिंगल सर्वतापन

कवि विश्व महातेज रक्त समस्त चरजनन ॥१४॥

 *

नक्षत्रतारांगणस्वामी तथा असुन विश्वभावन

तेजस्वीत तेजोमयी द्वादशारिक्त नामे तुज नमन ॥१५॥

 *

उदयाचल अस्ताचल रुपे नमन तुजला

नमन तारांगण स्वामी तथा दिनाधिपतीला ॥१६॥

 *

जयासी जयभद्रासी हरिताश्वासी असो नमन

सहस्ररश्मी शोभित आदित्यदेवा वारंवार नमन ॥१७॥

 *

उग्रासी नमन वीरासी सारंगासी पुनर्नमन

पद्मप्रबोधासी नमन प्रचंडासी असो नमन ।१८॥

 *

ब्रह्मा विष्णु महेश तुम्ही किरणांची प्रभा तुम्हा 

तेजःपुंजा सर्वभक्षका हे रौद्रा नमन तुम्हा ॥१९॥ 

 *

तम विनाशक अनुपमरूपी शत्रुनाशका विनाशक हिम

कृतघ्न नाशक देवा ज्योतिषपते तव चरणी प्रणाम ॥२०॥

 *

हरे विश्वकर्मा प्रभा तप्त सुवर्णासमान

तमारि प्रकेशरूपा सर्वसाक्षी तुला नमन ॥२१॥

 *

सर्व जीव संहारक समस्त सृष्टीचे पालक ईश

देव तापाचा सूर्य पर्जन्याचा नमन गभस्ती ईश ॥२२॥

 *

सुप्तरूपे समस्त जीवांच्या अंतर्यामी जागृत 

अग्निहोत्र्यांसी अग्निहोत्राचे फल हाचि अर्पित ॥२३॥

 *

देव हाचि यज्ञ हाचि यज्ञाचे प्राप्त फल

समस्त कर्मांचे विश्वातील हाचि देई फल ॥२४॥

 *

कष्ट असो वा आपत्ती दुर्गम मार्ग भय वा

याचे करता कीर्तन होईल निवारण राघवा ॥२५॥

 *

एकाग्र होउनी जगदीश्वराची करावीसी अर्चना

युद्धे विजय प्राप्ती करिता स्तोत्रा त्रिवार पठणा ॥२६॥

 *

वीरश्रेष्ठा युद्ध करुनी या क्षणी पराजित करशील दशानना

निघून गेले ऋषी अगस्ती देउनिया रघुनायका आश्वासना ॥२७॥

 *

चिंतामुक्त जाहले रघुवीर ऐकुनिया वचना

प्रसन्न चित्ते धारियले रघुनाथे ऋषीवचना ॥२८॥

 *

 नेत्र लाविले आदित्यावर त्रिवार आचमन 

शुचिर्भूत राघव सज्ज हाती कोदंडा धरून ॥२९॥

 *

समोर बघता दशाननाला राघव सरसावले

अरीवधाचा निश्चय करूनी युद्धसिद्ध जाहले ॥३०॥

 *

देवगणांसमवेत ठाकल्या आदित्यरविदेवाने

समरसज्ज श्रीरामास पाहिले मोठ्या हर्षाने

निशाचरपति रावणवधास सज्ज पाहुनी राघव

हे रघुनंदन त्वरा करावी वदले भास्करमित्रदेव ॥३१॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१५ ☆ सत्तरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१५ ?

☆ सत्तरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सत्तरी आली आहे आणि मी तर—

अजून तिथेच घुटमळतेय,

तू आलास आयुष्यात,

त्या वळणावर,

आणि सगळा आसमंत…

घमघमून गेला तुझ्या येण्याचे !

गुणगुणत होते,

“सब कुछ लागे नया नया”

 

काहीतरी कारण हवे असते–

जगण्याला!

लग्न हे ही एक कारण!

 

आयुष्य पुढे पुढे सरकत राहिले,

काय खरे काय खोटे ?

मूक स्वीकारले पदरात पडलेले,

प्रत्येक दान—

ईश्वरी संकेत समजून!

 

आज तू नाहीस,

पण माझ्या सगळ्याच,

विशीतल्या आठवणी–‘

“तरोताज़ा” —-

मी उगाचच लावतेय हिशेब,

असे झाले नसते तर —-

तर तसेही झाले नसते!

आता सत्तरीत केली जरी–

परतीच्या प्रवासाची तयारी,

तरी मन आसक्तच!

भविष्याच्या गडद अंधारात,

हवाय मला चिमूटभर प्रकाश!

तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून–

मी येतेच आहे,

पण —

गतजन्मीचे हे सारे पाश,

जेव्हा सुटतील तेव्हाच!!

कुणीतरी म्हटलंय ना —

“खाली हाथ आए है, खाली हाथ जाना है !”

तरीही—

आज सत्तरीत मी माझी विशी आठवतेय!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || स्वप्ने पैशाची || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

|| स्वप्ने पैशाची || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

सर पावसाची येते, तसा येत राहो पैसा

कष्ट छोटे फळ मोठे, काही मार्ग मिळो ऐसा

बिछान्यात अंथराया, हवी चादर पैशांची

हाक नुसती मारता, पायी लोळण सुखांची

 *

ऐन उन्हाळ्यात वाहो, खोली भर गार वारा

घशा कोरड पडता, थंड थंड जल धारा

 *

चार नोकर चाकर, फिरण्यास चार चाकी

कुठे दिसता वाटेत, सारे आदराने वाकी

 *

काय तोशिक खर्चाची, स्वप्ने पाहण्यास छान

जरी आज पायथ्याशी, वर उंचावून मान

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

कावेरी सुतार

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ नाच ग घुमा नाच॥ ☆ कावेरी सुतार ☆

ती रोज येते.. अंगावरचे निळे वळ लपवून,

मालकीण बघते घड्याळाकडे, स्वतःचा तोरा जपून.

मोलकरणीचा उंबरठा रोज, नवऱ्याच्या मारहाणीने रडतो,

आणि इकडे मालकिणीचा चहा, फक्त वेळेअभावी अडतो.

नाच गं घुमा नाच, तू काळजावर दगड ठेवून नाच, 

त्याच्या मारहाणीच्या खुणा, पदराखाली झाकून नाच… 

*

मालकिणीला वाटतं, ही उशिरा येते आणि ‘नाटकं’ करते,

पण तिला काय माहीत, ती रोज मरणाशी झुंज देऊन घर भरते.

घर तिचंही आहे आणि काम या घराचंही तीच करते,

दोन घरांचा डोलारा, ती एकाच तुटलेल्या कंबरेवर धरते.

एके दिवशी पदर सरकतो, अन् वळ मालकिणीला दिसतात,

तिच्या मग्रुरीचे सगळे हिशोब, एका क्षणात विरून जातात.

ज्या हातांनी ती भांडी घासते, ते हात कुणीतरी सोललेत,

मालकिणीचे डोळे आज पहिल्यांदा, माणुसकीने ओले झालेत.

नाच गं घुमा नाच, आता सन्मानाचा गुलाल उधळून नाच, 

मालकिणीच्या डोळ्यांतलं ते, पश्चात्तापाचं पाणी घेऊन नाच…

*

मालकीण हळूच पुढे येते, तिची जखम हातात घेते,

आज मोलकरणीला नाही, तर एका ‘बहिणीला’ ती साथ देते.

ती मालकीण विसरते सत्ता, अन् मोलकरीण विसरते पीडा,

माणुसकीच्या नात्याने सुटतो, पिढ्यानपिढ्यांचा हा वेढा.

दुसऱ्याचं घर सावरणारी, ती कुणी ‘कामवाली’ नसते,

ती स्वतःला जाळून, दुसऱ्याचं घर उजळवणारी वात असते.

मालकिणीने झुकून आज, तिचे हात हातांत घेतले,

आणि खऱ्या अर्थाने मोलकरणीचे, उपकार आज मानले !

*

नाच गं घुमा नाच, आता मस्तक ताठ करून नाच, 

अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच.

.. अन्यायाचा तो पिंजरा, पायाखाली तुडवून नाच… 

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथ टागोर व संगीत

रविंद्रनाथांना जन्मजात लाभलेल्या रूपसौंदर्यासारखंच सूर सौंदर्य देखील लाभलं होतं. ब्राह्मो समाजाचे आद्य गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायन गुरू. यदुभट्ट यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले मात्र कोणत्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. त्यांनी जवळ जवळ २२३० स्वरचित गाण्यांना चाली लावल्या.

रविंद्रनाथांच्या कविता; नाद, सूर, लय घेऊनच त्यांच्या लेखणीतून प्रकट होत. ते त्यांच्या कवितेला कधी कविता म्हणत नाहीत, गीत म्हणतात. इंग्रजी गीतांजलीतील कविता खरंतर prose poetry किंवा गद्य काव्य या प्रकारातील आहेत पण तरीही त्यांनी तिला ‘गीतांजली, song offering’ म्हटलंय. कदाचित मूळ बंगाली कविता, ह्या गेय असल्यामुळे असेल. कविता व गेयता यांचं नातं अनादि कालापासून भारतीयांनी अनुभवलेलं आहे. आपली वेद, उपनिषदे सुद्धा गेय काव्य रूपातच आहेत.

रविंद्रनाथांनी सुरांचे सामर्थ्य लहानपणीच ओळखलं होतं. त्यांच्या कवितेचा भाव; सुख-दु:ख, हर्ष- शोक, भक्ती- प्रीती कोणताही असो, त्यांचे शब्द, सुरांचा साज लेऊनच वहीच्या मंचावर नर्तन करीत प्रवेश करत. कवितेचं गाणं होताना सुरांतून इंद्रधनुष्य निर्माण होत असतं असं त्यांना वाटे.

“मला गायला कधी येत नव्हतं असं मला आठवतच नाही. ” असं ते म्हणायचे. गाणं रचताना ते गात गात रचावं व रचता रचता तद्रूप होऊन जावं अशी तन्मयता, उन्मादावस्था त्यांनी अनेकदा अनुभवली व एकदा एका खाजगी पत्रात वर्णिली पण आहे. ही अलौकिक अशी अध्यात्मिक परमावस्था नाही काय?

रविंद्रनाथांना भारतीय अभिजात संगीताची चांगली जाण होती. अनेक रागरागिण्यांचे संस्कार घेऊन त्यांची गीतं प्रकट होत. पण लोकसंगीताच्या देखील असंख्य चाली त्यांच्या गीतांमध्ये दिसतात. बंगाली लोकसंगीत मुळात अतिशय समृद्ध आहे. बाऊल, भटियाली, कीर्तन, काका, कविगान, श्यामा संगीत, फकिरांची गाणी, सूफी गाणी, वैष्णव भक्तांची गाणी, भादू सारखी कहाण्यांची गाणी, पाँचालि, जात्रापाला असे अनेक प्रकार त्यात आहेत. आपल्या संगीतासाठी ख्याल, ध्रुपद, ठुमरी, दादरा, टप्पा इथपासून लोकसंगीतापर्यंतच्या; इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देखिल वापरण्याची रविंद्रनाथांची प्रतिभा पाहून अभ्यासक देखील चकित होतात.

रविंद्र संगीताचा बंगाली संगीतावरील प्रभाव आज देखील ठळकपणे जाणवतो किंबहुना खरंतर रविंद्र संगीतापासून बंगाली संगीत वेगळं करताच येणार नाही. त्यांच्या संगीताकडे चित्रपट क्षेत्रातील सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, नितीन बोस, तपन सिन्हा, कुमार साहनी यांच्यासारखे अतिरथी, महारथी आकर्षित झाले नसते तरच नवल! त्यांनी आपल्या चित्रपटात रविंद्रनाथांची गाणी वापरली. इतकेच नव्हे तर कांही ब्रिटिश, युरोपियन व ऑस्ट्रेलियन चित्रपटांत देखील त्यांची गाणी वापरली गेली आहेत. मात्र आपल्या गीतातील शब्दच काय पण सूर देखील बदलणं त्यांना मंजूर नव्हतं. आज सुध्दा त्यांची गाणी जशीच्या तशी गायली जातात.

 (संदर्भ: रविंद्रनाथ तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

——

गीत : ७३

DELIVERANCE is not for me in renunciation. I feel the embrace of freedom in a thousand bonds of delight.

Thou ever pourest for me the fresh draught of thy wine of various colours and fragrance, filling this earthen vessel to the brim.

My world will light its hundred different lamps with thy flame and place them before the altar of thy temple.

No, I will never shut the doors of my senses. The delights of sight and hearing and touch will bear thy delight.

Yes, all my illusions will burn into illumination of joy, and all my desires ripen into fruits of love.

——

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७३

☆ 

सर्वसंगपरित्याग करुनि

कशास मी मुक्त व्हावे ?

हजार बंधनात सुखाच्या,

मुक्तीला आलिंगन द्यावे॥

 *

काठोकाठ रस तू भरिशी 

मातीच्या या घटाघटातुनी

अनेक रंगी तिला रंगविशी,

अनेक तशा सुवासातुनी॥

 *

तव ज्योतीने दीप उजळतील

मम जगती, राऊळी लावण्या

पंचेंद्रिये मम सजग राहतील

तुझे शब्द, स्पर्श जाणण्या॥

 *

तव दर्शनास आसुसलो रे,

कसा करीन मी बंद लोचना

सारी सुखे ही तुझी देणगी

याच जाणीवा आणि भावना॥ 

 *

आनंद इतुका मला हवा की

आभास सारे त्यात मिटावे

तव प्रेमाच्या अंतर्यामी

मनोरथ माझे फलित व्हावे॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆  गीत : ७४ ☆ 

THE day is no more, the shadow is upon the earth. It is time that I go to the stream to fill my pitcher.

The evening air is eager with the sad music of the water. Ah, it calls me out into the dusk. In the lonely lane there is no passer by, the wind is up, the ripples are rampant in the river.

I know not if I shall come back home. I know not whom I shall chance to meet. There at the fording in the little boat the unknown man plays upon his lute.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७४ ☆ 

☆ 

लांब गेल्या सावल्या अन्

क्षितिजी टेकला दिनमणी

मावळतीची सुवर्णलाली

जलात नदीच्या आरसपानी॥

 *

सांजवेळी नदी किनारी,

घडा भराया जाईन म्हणते

उत्सुक सायंकाळ परंतु 

उदासवाणे गीत गाते॥

 *

तिन्हीसांजेच्या या प्रहरी

दूर कोण मज साद देते

वात लहर ती अवखळ भारी

पाण्यावर तरंग उठविते॥

 *

जाईन म्हणते, नसे माहिती 

परतुनि येईन की नाही

नदी किनारी, कुणा भेटण्या

जीव अनावर होतच राही॥

 *

गेले धावत निर्जन मार्गे

तोच उमटले मधु सूर बासुरी

एकल नावेमधे बैसला

अनोळखी जरी, खचित मुरारी॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆   गीत : ७५ ☆ 

THY gifts to us mortals fulfil all our needs and yet run back to thee un-diminished.

The river has its everyday work to do and hastens through fields and hamlets; yet its incessant stream winds towards the washing of thy feet.

The flower sweetens the air with its perfume; yet its last service is to offer itself to thee.

Thy worship does not impoverish the world.

From the words of the poet men take what meanings please them; yet their last meaning points to thee.

—–

☆   मराठी भावानुवाद : गीत : ७५ ☆ 

☆ 

 दान तुझे तुळस मंजिरी

उणे न कांही तुझ्या मंदिरी

भरभरुनि तू देतच जाशी

परतुनि ये ते तुझ्याच पाशी॥

 *

नदी वाहते शेतामधुनी

शमते तृष्णा गावामधुनी

अविरत वाहे, अखेर सरिता,

पादाभ्यंगा तुझ्याच करिता॥

 *

कुसुम गंधा पवन वाहतो

आसमंत हा पुलकित होतो

ध्येय अंतिम परंतु त्याचे

तुझ्याच पायी लीन व्हायचे॥

 *

तुझ्या पूजना सर्वस्व वाहतो

इथे परि कुणी नच गरीब होतो

भरभरून सुख जीवनी वेचतो

तुझीच किमया हे ही जाणतो॥

 *

 कवीच्या गीतांमधुनी अर्था

जो तो शोधी, पुरवित स्वार्था

परि अखेर जी गीते बोलती

कृष्ण भावना तुझीच की ती॥

☆ 

– क्रमशः भाग २५..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृती जपावी – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी वदनी कवळआणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो llll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो llll

 *

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो llll

 *

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ll

 *

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो llll

 *

बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो llll

 *

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो llll

 *

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो llll

 *

सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो llll

 *

इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,

आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

 *

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले,

फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ll११ll

 *

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली,

अन स्वीट स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

 *

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो,

पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

 *

फॉरवर्ड झालो, फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना,

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणून बुजून) विसरलो…

*

कवी : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२८ ☆ पाळतात साप… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२८ ?

☆ पाळतात साप… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज वावरत आहे, किती रुबाबात साप

कात टाकुन कोडगे, काही फिरतात साप

*

पाय जपुन टाकावा, जंगलात फिरताना

पाय चुकीचा पडता, येथे डसतात साप

*

जात बहिरीच त्यांची, भाषा समजत नाही

काठी पाहुन बिळात, सारे शिरतात साप

*

असो सागर वा भूमि, न्याय सर्व जगी एक,

छोट्या सापास सहज, मोठे गिळतात साप

*

किडा सावध नसावा, घात म्हणूनच झाला

दबा धरूनच येथे, काही असतात साप

*

गावामध्ये शिरतात, काही घुसखोर साप

फकिराच्या वेषातच, काही फिरतात साप

*

फार विषास मागणी, काळ्या बाजारी ह्या

नसतात ते गारुडी, तरी पाळतात साप

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – हायकू – ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ – हायकू –  ☆ श्रीशैल चौगुले ☆

१.

 वैशाखी झळ

 धरित्री तळमळ

 कलीस बळ

२.

 मनास तडा

 हळदि अंग पाढा

 ऊन्हाळी विडा.

 ३.

 अंतरी लाव्हा

 काळजाची स्पंदने

 ऋतूचे साम्राज्य

 ४.

 पक्षांचा शोध

 सावलीही दुर्मिळ

 पारधी तृष्णा.

 ५.

 संघर्ष मन

 मृदा भंग निर्धन

 आक्रोश भाव.

 ६.

 कुणास कसा

 नसावा मागमूस

 जळ थेंबाचा

 ७.

 गळती घाम

 अस्वस्थ लाही-लाही

 निरभ्र नभ.

 ८.

 भडक लाल

 हिरवे जर्द हात

 काटेरी मुखे.

 ९.

 स्वरल ध्वनी

 आम्रवनी उगीच

 स्मृतींना साद.

 १०.

 प्रेम बहर

 याद ती पांघरुन

 सदैव ऋतू

 ११.

 धुंद नजर

 पालवीत वेदना

 जूनेच बेट.

 १२.

 अथांग लाटा

 कोरडीच तहान

 समुद्रच का… ?

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ना उरला कोणी वाली… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ना उरला कोणी वाली... ? श्री आशिष  बिवलकर ☆

शिक्षणाचा बाजार मांडला,

उमेदींना ना उरला कोणी वाली |

अंगठा मागणारे द्रोणच सारे,

एकलव्या सांग रे तुझी खुशाली |

*

रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून,

किती रे केला होतास अभ्यास |

शिक्षण व्यवस्थेतल्या मंथरेमुळे,

रामाच्या नशिबी पुन्हा वनवास |

*

कोणी विकली शेतीभाती,

कोणी गहाण ठेवले घरदार |

ऋण मुलांच्या शिक्षणासाठी,

सणवार विसरून उसन उधार |

*

उज्वल भवितव्याचे स्वप्न उराशी,

मार्ग तो धरला सरळ असा तो नीट |

कुंपणानेच शेत फस्त केलं आता,

भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचा आलाय वीट |

*

आई वडिलांची भिस्त तुझ्यावर,

टोकाचं पाऊल तू उचलू नकोस |

हातातोंडाशी आलेला घास त्यांचा,

अविवेकाने हिरावून घेऊ नकोस |

*

नीटच्या दलालांनी दिला धोका,

धीट राहून प्रयत्न तू करत रहा |

रात्रीच्या गर्भात उष:काल उद्याचा,

उज्वल भविष्याचे स्वप्न पहात रहा |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संचार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ संचार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

लाख नखरे यार करते

बायको बेजार करते

*

सोबती राहून माझ्या

संकटे ही पार करते

*

आळशी वृत्तीच माझी

ठेव माझी गार करते

*

वासना वैरीन होता

मागण्या ही फार करते

*

शुद्ध बुद्धी ठेवली की

चांगला व्यवहार करते

*

जवळची व्यक्तीच अंती

नेटका उपकार करते

*

व्यर्थ चिंता जाळणारी

काळजावर वार करते

*

धावणे होता अघोरी

माणसाला ठार करते

*

अंधश्रद्धा माणसाची

आंधळा संचार करते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares