मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झिलमिल झिलमिल… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ झिलमिल झिलमिल… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

झिलमिल झिलमिल पाऊस थेंब कसे हो चकाकती

प्रकाशात हो रात्रीच्या त्या छानच हासती..

डोळे मिटती आणि उघडती तुषार नाचती

फांदी फांदीवर जणू ते झिम्माच खेळती..

*

काचेतून ती नयनमनोहर आरास सजते

पाऊस प्रकाश मिळून नक्षी झाडात शोभते

कडकड बिजली आभाळ कडके नाचत ती येते

झरझर झरझर धारांमधुनी धरेत शिरते..

*

धडधडधुडूम आकाशी ते वाजती नगारे

पाऊस आला पाऊस आला पाऊस आला रे

झाडे निथळती पक्षी भिजती पानात दडती

बिलगून एकामेका फांदी पायात पकडती..

*

धडधडधुडूम आकाशी ते वाजती नगारे

पाऊस आला पाऊस आला पाऊस आला रे

झाडे निथळती पक्षी भिजती पानात दडती

बिलगून एकामेका फांदी पायात पकडती..

*

थेंबांची ती नुपुरे वाजती खळखळ छनछन

सचैल न्हाते धरणी सारी तृप्त हो तनमन

थुईथुई नाचे वसुंधरा ती पदरी घे मोती

पिकणार हो असते आता मोत्याची शेती…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस अवकाळी… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस अवकाळी ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

पाऊस असा अवेळी

गेला पिकांस घेऊन

सारं झोपलं शिवार

डोळ्यात पाणी ठेवून

*

भर पावसाळी तुझं

येणं का बरं नसावं?

आल्या भरी पिकांचं

किती नुकसान व्हावं

*

वर, झणाणता वारा

झाडावेलीं थैथयाट

पिसाटली रानपिकं

तुझी चुकलेली वाट

*

कसं चुकार पाखरू

सापडेना त्याला खोप

दरसाली तुझा फेरा

आणि बिघडतं माप

*

सा-या चराचरीं तू रे

येशी होऊनिया काळ

सांग शिवू कसं आम्ही

सारं फाटकं आभाळ ……

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात् ॥ १५ ॥

अर्थ – भक्तीचे वर्णन अनेक प्रकारे करता येते. अनेक विद्वान भक्तीचे वर्णन त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे, अनुभवाप्रमाणे करतात, अनेक लक्षणे सांगतात.

नाना मतानुसार त्या भक्तीची लक्षणे सांगितली जातात.

विवेचन: कोणतीही गोष्ट लक्षणांनी सिद्ध झाली पाहिजे असा शास्त्रकारांचा दंडक आहे. लक्षणाविना लक्ष्य स्वरूपाचा बोध यथार्थ रूपाने होऊ शकत नाही. येथे भक्ती हे लक्ष्य आहे. कोणी म्हणेल भक्तीचे लक्षण तर पूर्वी सूत्र दोनमध्ये ‘परमप्रेमरूपा’ असे सांगितलेच आहे. पुन्हा लक्षण सांगण्याचे प्रयोजन काय? लक्षण हे सामान्य; विशेष अशा दोन रूपाने कोठे कोठे सांगितले जाते. ‘परमप्रेमरूपा’ हे भक्तीचे सर्वसामान्य लक्षण आहे. पण तेच प्रेम अभिव्यक्त होण्यास कोणती तरी क्रिया कारण होत असते. त्या क्रियेच्या मागे काही विशिष्ट भावना असते. म्हणूनच भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. श्रीमद्भा‍गवतामध्ये प्रल्हादचरित्रात नवविविधा भक्तीचा निर्देश आहे.

श्रीविष्णो श्रवणे परीक्षिदभवद् वैयासकिः कीर्तने।

प्रह्लादः स्मरणे तदङ्घ्रिभजने लक्ष्मीःपृथुः पूजने।

अक्रूरस्त्वभिवन्दने कपिपतिर्दास्ये च सख्येऽर्जुनः।

सर्वस्वाऽऽत्मनिवेदने बलिरभूत् कैवल्यमेषां समम्॥

भक्तीचे नऊ प्रकार वरील सुभाषितामध्ये सांगितले आहेत. (श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन) ह्या नऊ पायऱ्या म्हणजे मनुष्याच्या जीवनविकास आहे असे म्हटले तर अधिक योग्य होईल. मनुष्य सर्वात आधी ऐकायला शिकतो, मग हळूहळू एखादा शब्द बोलायला शिकतो, त्यांनतर बाकीच्या भक्ती मनुष्य क्रमाने आचरण्याचा प्रयत्न करतो. माऊली पहिल्या ओळीत भावेंवीण भक्ति करता येत नाही असे म्हणतात. वरील सर्व प्रकारच्या ‘भक्ती’ आपण परमार्थाच्या पाठशाळेत शिकू शकतो किंवा त्या शिकायलाच हव्यात. मनुष्य दासबोधात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिंचे सर्व समास तोंडपाठ करू शकतो, खरतरं पाठ करतोही. पण त्यामुळे मनुष्याच्या अंतरंगात बदल होत नसेल, ते पाठांतर काय उपयोगाचे? आपण फारतर त्याला घोकमपट्टी म्हणू शकतो. म्हणजे फक्त दमछाक! एखाद्या सुगरणीने उत्तम स्वैंपाक केला, अन्नाचा सुगंधही घरभर पसरला, पण त्या अन्नात जर मीठ नसेल तर त्याचा उपयोग शून्य. भाव हा आपल्या साधनेतील मीठ समजावे. इथे भाव हा शब्द ‘प्रेम’ या अर्थाने आला आहे. हे ‘सैराट’प्रेम नाही. हे ‘खरे’ प्रेम आहे, अर्थात वस्तू निरपेक्ष, व्यक्ति निरपेक्ष आणि परिस्थिती निरपेक्ष प्रेम!!!

“प्रेमेवीण श्रुतिस्मृतिज्ञान। प्रेमेवीण ध्यानपूजन। प्रेमेवीण श्रवणकीर्तन। वृथा जाण नृपनाथा।।”

 एकनाथी भागवत २. ३२

संतांनी जे प्रेम भगवंतावर केले, मिरेने कृष्णावर केले, प्रल्हादाने देवावर केले, हनुमानाने रामावर केले ते हे प्रेम!! या प्रेमाची सर जगातील कोणत्याही प्रेमास येऊ शकत नाही. आई आपल्या बाळाला धोंड्या, दगड्या, पेंद्या किंवा मऱ्या कोणत्याही नावाने हाक मारते आणि ते बाळ सुद्धा लगेच हाक देते, कारण त्या दगड्या, धोंड्या सबोधनातील ‘वात्सल्य’ त्यास कळते. संतांनी विठूरायाला कोणत्या नावाने हाक मारली नाही? कोणी त्यास काळतोंडया म्हटले आहे, तर कोणी त्यास पंढरीचा चोर म्हटले आहे, तर कोणी आणिक काही म्हटलं आहे. पण ह्यामागे निष्काम प्रेम आहे. जन्मभरीच्या श्वासाइतके हरिनाम घेऊन कोणी विठ्ठलास विकत घेतले आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव श्रीखंड्या बनून पाणक्याचे काम केल्याचे वर्णन आहे. खरंतर प्रेमाचे वर्णन करणे शक्य नाही. “प्रेम नये सांगता बोलता दावितां। अनुभव चित्ता चित्त जाणे।।” कणभरही विरह सहन न होणे ही प्रेमाची खरी कसोटी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णाच्या गोपी. त्यांच्या ध्यानीमनी फक्त कृष्णच असायचा.

वरीलप्रमाणे अनेक अंगाने भक्ती होत असते, त्यात कित्येक भक्त म्हणविणार्‍याच्या काही विवक्षित स्वतंत्र भावना असतात, त्या भावनेप्रमाणेच तो तो त्या त्या क्रियांना भक्ती म्हणत असतो. श्रीनारदऋषींनीही ही भक्ती मूळ एकरूपा असूनही अकरा प्रकारची होते असे सूत्र त्र्याऐंशी मध्ये सांगितले आहे. भक्तीची अनेक लक्षणे सांगता येतील.

प्रत्येक आई आपल्या लेखकावर विविध प्रकारे वात्सल्य भाव प्रकट करते. कोणी लेकराला कुरवाळेल, कोणी पाठीवरुन हात फिरवेल, कोणी खाऊ देईल, कोणी पुरणपोळी करेल, तर कोणी आणिक काही करेल….? यात एक गोष्ट मात्र खरी असेल की ती माउली आपल्या लेकरांवर प्रेम करीत असेल…..!

इथून पुढील काही सूत्रात आपण प्रेमाची अर्थात भक्तीची लक्षणे पाहणार आहोत.

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ 

जय जय रघुवीर समर्थ 

– लेख क्र. १४ 

नारद महाराज की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धरणीचा पर्वकाळ… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ धरतीचा पर्वकाळ... ☆  डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

श्रावणात बागडता

दवबिंदू चमकले

क्षणार्धात सर आली

तृणपाते शहारले ||१||

*

केकारव मोर करी

पिसाऱ्यास फुलविता

थेंब होति अलवार

लोलकात विहरता ||२||

*

झाडे ही सळसळती

घुंगुरती पर्णफुले

खळाळीत गात झरे

विहगांचे गान फुले ||३||

 *

हिरवळ ही ओलेती

पायवाट मखमली

लेवुनिया सोनसाज

मोहरल्या तरूवेली ||४||

*

भक्तिभाव श्रावणात

चंपकात स्वर्णमयी

अवनीच्या उत्सवात

 इंद्रधनू रंगमयी ||५||

*

सडा दारि पारिजात

जाइजुई बकुळीचा

गुलबक्षी सूत्रहार

पर्वकाळ धरणीचा ||६||

*

न्हाउनिया सचैल ही

वसुंधरा सुखावली

सृष्टिच्याच गर्भगृही

ध्यानमग्न विसावली ||७||

*

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तो तसा.. हा असा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तो तसा…. हा असा... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तो आषाढ तसा आणि असा हा श्रावण

तो सहस्रधारा, हा ऋतू मनभावन

*

माळून गळ्यामधे थेंबांचे मणिहार

फेर गुंफिती करात घालुनिया कर

*

तो भिजवीत जाई मुक्तपणाने तन

हा मन रिझवी नेसून कोवळे उन्ह

*

कोसळतसे उद्दाम होऊनी तो तिथे

झिरमिरे सोनसळी उन्हात हा इथे

*

आक्रमे नभाला तो घेऊन घनफौज

थांबतो, बरसतो अशी ही याची मौज

*

सोनेरी किरणे कधी ना दिसती त्याला

हा सजण्यासाठी सदैव कांचन ल्याला

*

अवसेला जातो देऊन दिव्यांचे तेज

व्रत, वैकल्यांचा शोभतो श्रावणी साज

*

आषाढ सरतो, सोडून श्रावणधारा

चैतन्याचे पंख लाभतात मनमोरा

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – माप म्हणे… – अनुतापे दोष ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – अनुतापे दोष… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

अनुतापे दोष /

जात न लागता निमिष//१//

*

परि तो राहे विसावला /

आदी आसवांनी मला //२//

*

हेच प्रायश्चित्त/

अनुतापी न्हाय चित्त //३//

*

तुका म्हणे पापा/

शिवो नये अनुतापा//४//

  – संत तुकाराम.

तुका म्हणे

केलेल्या चुकीचा पश्चात्ताप झाल्यावर चुकीचा दोष घालवण्यासाठी एका क्षणाचा कालावधी पुरेसा असतो. पश्चात्ताप वाटल्यानेच माणूस अगदीच शांत होईल आणि शांतच राहील. माणसाच्या मनात पश्चात्ताप भरून रहाणे हेच खरे प्रायश्चित्त आहे. जर असे झाले तर प्रायश्चित्त करणा-याच्या मनात पाप शिरकावच करू शकणार नाही. आपण केलेल्या किंवा आपणाकडून नकळतही झालेल्या चुकांचा आपल्याला खरा पश्चात्ताप झाला असेल तर वाईट गोष्टी करायला लागणारे सगळे दोष आपल्या पासून दूर पळून जातील. त्यामुळे आपल्या कायम व्यस्त असणा-या मनाला विश्रांती मिळेल. मन सतत दग्ध असणे हीच केलेल्या कुकर्मिची खरी शीक्षा असते. मनात जर पश्चात्ताप भरून राहिला असेल तर आपल्या कडून वाईट वर्तन घडणारच नाही. आणि वाईट वर्तन घडले नाही तर पाप आपल्याला चिकटायला येणारच नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुलबक्षी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुलबक्षी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

तिन्ही सांजेला दिसते झाडा झाडावर नक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*
वेळ अजबच हिची श्रावणात बहरते

भादव्यात गणेशाच्या अंगावर लहरत

चंद्रकंठ म्हणतात चंद्रप्रकाश हा रक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*

देशामध्ये विदेशात आहे खूप हिची ख्याती

संध्या मालती होऊन नित्य बहरत जाती

कधी गुलाबी पांढरी वेधतसे जणू लक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

 *

कोणी जांभळी चमेली, बहुरंगी निशाचर

कुठे असरुमा नामे कुठे सूर्यास्त सुंदर

मधु कण हिच्यावर गोळा करी मधुमक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

 *

कुठे रात्रीची ही राणी आणि गोधुली गोपाल

हिच्या संगतीत रमे सानथोर किती काल

शांत निशांत वेळेला सूर्य चंद्र हिच्या कक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनचाफा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “सोनचाफा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

तेजस्वी रुप पाहता

मन मोहरुन गेले 

अंतरीच्या वेदनांचे

सुगंधी फूल झाले.

*

मकरंद गोड हृदयी

मज मोह आवरेना

देखणे इतके फूल

मज तोल सावरेना

*
भाव गंध दरवळ 

मज ध्यास सोडवेना

हळूच स्वल्प न्याहळे

परी दूर लोटवेना

*

सद् विचार मानवी

अवीट या चाफ्यापरी 

अलगद स्पर्श होता

सुगंध ओंजळभरी 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 279 ☆ अनुभव… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 279 ?

☆ अनुभव… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

हे तुझ्यामाझ्यात वाहते आहे…

अखंड ते काय आहे ?

नदीचे सागरात

मिसळून जाणे

माहित होते….

पण हे वेगळेच आहे !

तू नद आहेस…

निळाशार, अथांग, असीम..

तुझे जळ ही किती मधूर,

जन्म जन्मांतरीची,

तहान मिटविणारे….

हे पाणी… जल.. नीर…

ही ओढ,

पाण्याची पाण्याला…..

हे असे मिसळून जाणे,

एकमेकात…..

अशा ओढीला

आकर्षण म्हणतात !

पण हा निरंतर..

आणि चिरंतन…

जिवंत अनुभव….

“सर्व बंध सोडून

जेव्हा नदी धुंद धावे,

मीलन वा मरण पुढे—

तिला नसे ठावे”

या गाण्यातली आर्तता

अनुभवण्याची,

हीच ती अनावर ओढ,

जे तुझ्यामाझ्यात

वाहते आहे अखंड,

ते हेच आहे !

 

 -प्रभा सोनवणे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

ओल्या हिरव्या पाऊली, आला आषाढ-श्रावण

आली स्वागतास त्याच्या, उन्हे केतकी न्हाऊन

वारा मातला गंधात, झाले रानवेडे पक्षी

निथळत्या पानांतून, झाली जळभर न‌क्षी

*

झुले हालती फांद्यांचे, झाली पानांची पैंजणे

तृणपाते इवलेसे, तेही डोले दिमाखाने

ऊन खेळे पावसाशी, तेढ विसरून जुनी

झाली मनांमनांतील, दुःख वेदनांनी गाणी

*

थोडा माझ्या ही देहात, स्वैर वाहू दे हा वारा

आणि मिटल्या मनाचा, धुंद फुलू दे पिसारा

भग्न.. ओसाड जीवाचे गजबजू दे रे गांव

पुन्हा एकदा श्रावणा, ‘जीवलगा ‘स भेटव

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares