हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 180 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 180 – मनोज के दोहे  ☆

सत्य अहिंसा मार्ग पर, मिलें पुष्प के हार।

सामाजिक परिवेश में, जीवन है गुलजार।।

 *

सुखद कर्म की नींव पर, करें भव्य निर्माण।

हों प्रसिद्ध इतिहास में, अमर रहे निर्वाण।।

 *

राजपाट को त्याग कर, बोधिसत्व पर ध्यान।

पूज्य हुए सिद्धार्थ जी, सच्चा उपजा ज्ञान।।

 *

तथागत के संदेश से, भटकें हैं कुछ देश।

लोभ-लालसा में फँसे, बढ़ा रहे हैं क्लेश।।

शक्ति-मार्ग से जा रहा, प्रेम-शांति संदेश।

बुद्ध-युद्ध के द्वंद्व में, हँसता है परिवेश।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #290 ☆ सुजल्या टाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 290 ?

☆ सुजल्या टाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अवघे जीवन झिजले आणिक झिजल्या टाचा

अशा कशा ह्या माझ्यावरती रुसल्या टाचा

*

किती चांगले जीवन होते लग्नाआधी

तारुण होते तेव्हा गोऱ्या हसल्या टाचा

*

जरीकाठची नवीन कोरी होती साडी

पैठणीत ह्या कधी अचानक रुतल्या टाचा

*

हे धोब्याचे काम आमचे काय करावे

सोड्याच्या माऱ्याने होत्या चिरल्या टाचा

*

या मातीवर प्रेम एवढे शेतकऱ्याचे

प्रेमाखातर मातीतच या फसल्या टाचा

*

वेगवेगळ्या मलमाच्या ह्या डब्यासोबती

तोंड पाडुनी औषध चोळच बसल्या टाचा

*

चप्पल सुद्धा पायालाया काचत आहे

चपला म्हणती तुझ्या किती ह्या सुजल्या टाचा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कलियुगाशी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ कलियुगाशी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सा-या युगाची साक्ष

पंचभूतांचे रक्ष

जीवनिर्जीव दक्ष

देवप्रमाण.

*

अहं प्रवृत्ती दुष्ट

आयु जीवन नष्ट

असूर तेची स्पष्ट

दैत्यसमान.

*

सत्य वर्तनी राम

एक वचनी धाम

एक पत्नीत नाम

पुरुषोत्तम.

*

विश्व लिलेचे चित्र

ज्ञान शिक्षेचे छत्र

सत्ता प्रजेचे सत्र

श्रीकृष्णरुप.

*

हेची आदर्श देशा

तेची मानवा शेषा

पुण्य संचित आशा

कलियुगाशी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उजळो सर्वांचे भाग्य…. ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? कवितेचा उत्सव ?

उजळो सर्वांचे भाग्य… डॉ. माधुरी जोशी 

 मागते फक्त सन्मान

वाहून सर्व जीवन.

घरी दारी ती सतत

कष्टते साहून अपमान

कारण मायेचा धागा

सर्वांसाठी तसाच

मानिते आपुले सारे

ना कधीच पंक्तीप्रपंच

त्या अंतिम श्वासापर्यंत

जर ती असते जुळलेली

मग एकंच दिवस का हा?

गौरव तिच्या भाळी?

सारेच नसती अन्यायी

मग भाग्यवानही काही

सर्वांचे ऊजळो भाग्य

एवढीच विनंती पायी

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? क्षणार्धात संपला, सुंदर स्वप्नांचा डाव ? श्री आशिष  बिवलकर ☆

निष्पाप निरागस,

जीव तीन कोवळे |

झडप काळाची,

पाणावलेत डोळे |

*

सुंदर फुलण्याआधीच,

काळाने कळ्या तोडल्या |

क्रूर निष्ठुर नियतीने,

अग्नीकुंडात जाळल्या |

*

निरागस नजर,

निरागस त्यातले भाव |

क्षणार्धात संपला,

सुंदर स्वप्नांचा डाव |

*

मृत्यू म्हणजे काय,

समजण्यापलीकडचे वय |

गाठले मृत्यूने त्यांना,

कशाचीही नाही केली गय |

*

हसतं खेळतं कुटुंब,

क्षणात झालं उध्वस्त |

अग्नीच्या ज्वाळांनी,

क्षणात केलं फस्त |

*

सांग ना गं नियती,

इतकी निष्ठुर का वागली |

गोऱ्या गोबऱ्या गालांवरची,

लाली कशी ना तुज उमगली |

*

वज्राहून कठोर हृदये,

ती देखील पिळवटलीत |

पाहून मृत्यूचे थैमान,

करोडो मनं हळहळलीत |

*

शेवटचा गोड हा सेल्फी,

लावून गेला जीवाला खंत |

वैरी जरी असला कोणी,

नसावा त्याचा असा अंत |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 14 जून 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ओढ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

हळू किती पावले चालली

तरी तुझी पैंजणे वाजली

*

मनातला कोपरा हासला

तशी खुळी कोतुके जागली

*

तुझा किती चेहरा लाजला

गळामिठी वेगळी वाटली

*

हळू मला आरसा बोलला

तिने म्हणे पापणी झाकली

*

खरे तुला आज मी सांगतो

तुझ्या मुळे कळजी संपली

*

हळू करू मागणी आणखी

मिळायला संपदा चांगली

*

जगा पुढे सारखे जायचे

मनो मनी ओढ ही लागली

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “थोडं तुझं थोडं माझं…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ थोडं तुझं थोडं माझंसौ. वृंदा गंभीर

संसाराची घडी अशीच

बसवायची असते

थोडं तुझं थोडं माझं करत

पुढे चालायचं असतं

 *

पती पत्नी संसाराची

दोन चाकं असतात

एकाचं चुकलं तर दुसऱ्याने

सावरायचं असतं

 *

पेल्यातलं वादळ कधी

कधी येत असतं

हसत हसत पाळून

लावायचं असतं

 *

एकाचं मीठ एकाची मिरची

संसार असाच असतो

तुझं माझं मिळून घर

सांभाळायचं असतं

तुझे आई बाबा माझे

माझे आई बाबा तुझे

मन भरून जगायचं असतं

थोडं तुझं थोडं माझं

म्हणून स्वीकारायचं असतं

 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पुन्हा एकदा… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ पुन्हा एकदा… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ पुन्हा एकदा ☆

(लवंगलता)

कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा

आयुष्याला सोसत नाही रुक्ष कोरडा वारा

 *

संवाद नसे शब्द माधुर्य  हरवले कसे कोठे

तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे

 *

ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे

जलधारांनो तुम्ही आपुले  आनंदगीत गारे

 *

असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता

परत एकदा जुळवू आपण बेसुरातला  भाता

 *

वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू

त्या वाळुतले सदन आपुले वचनांना मग पाळू

 *

मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी

निरोप त्याला दोघे देऊ प्रेमस्मृतींच्या वेशी

 *

नको दुरावा या वळणाशी  त्या नात्यांच्या गाठी

जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी

 *

 कवयित्री- सौ.  राधिका भांडारकर

रसग्रहण – 

राधिका ताईंची ही कविता वाचल्यानंतर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या कवितेची नायिका एक ज्येष्ठ,अनुभव संपन्न, आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहिलेली आणि त्या चढ- उतारांवर सतत पतीची साथ लाभलेली अशी आहे. पती-पत्नी हे नातेच असे आहे की संसाररथाची ती दोन चाकेच जणू. सुरुवातीच्या काळात ही चाके नवीन असल्यामुळे ती फार जोमाने, जोशाने चालतात परंतु हे नाते जसजसे जुने होत जाते तसतसे ते अधिक दृढ झाले तरी तो पहिला जोश राहत नाही आणि दोघांत बऱ्याचदा अगदी क्षुल्लक कारणांवरूनही वाद होत राहतात. या कवितेची नायिका अशीच या टप्प्यावर आलेली आहे आणि तिच्या भावनांचा, संवेदनांचा आविष्कार म्हणजेच पुन्हा एकदा ही कविता.

1) कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा

   आयुष्याला सोसत नाही वृक्ष कोरडा वारा

आयुष्याच्या या टप्प्यावर कवितेतील नायिका काहीशी उदास अंतःकरणाने बसली आहे. तिच्या मनात येते की तेव्हाची तारुण्यातील ती प्रिती कुठे बरे हरवली? आता हे आयुष्य अगदीच रुक्ष, कोरडे वाटत आहे. त्यातील सगळे रंगच फिके, पुसट होऊन गेले आहेत.

2) संवाद नसे शब्द मधुरता हरवली कशी कोठे

    तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे

आता आम्हा दोघांत काही संवादच उरला नाही. कारण काही बोलायला गेले तर एकेका शब्दावरून नुसते वादच होतात. तेव्हा अशा वादळांपेक्षा मौनातच राहणे बरे, काहीच बोलायला नको.

3) ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे

   जलधारांनो तुम्ही आपुले आनंद गीत गा रे

काळ्या ढगांनी आभाळ भरून आले, की अंधार दाटून येतो, आणि चमचमणारे तारे ढगाआड विरून जातात. नायिकेच्या मनाची अवस्था अशीच मळभ आलेल्या नभासारखी  काळोखी झालेली आहे. परंतु ती स्वतःला धीर देते आणि म्हणते की अंधारलेल्या आकाशातून जशा पावसाच्या सरीवर सरी आनंदाने टप टप कोसळत असतात त्याचप्रमाणे मला माझे आनंद गीत गात राहिलेच पाहिजे.

या ठिकाणी कवयित्रीची सकारात्मक वृत्ती वाचकांचेही औदासिन्य निश्चितच कमी करते.

4) असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता

     परत एकदा जुळवू आपण बेसुरातला भाता

पुन्हा एकदा तिला आपल्या नात्यातला, सहवासातला दरवळ निघून गेल्याची खंत वाटत आहे. परंतु या बेसूर झालेल्या संवादिनीचा ( जीवनाचा) भाता आपण सुरात जुळवू शकतो याचा तिला भरवसा वाटतो. तिच्या वृत्तीतील सकारात्मकता पुन्हा जागृत होते.

5) वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू

   त्या वाळूतले सदन आपुले वचनांना मग पाळू

तारुण्यातील नात्यात प्रेमाचा ओलावा होता आणि त्या ओलाव्यात आपला संसार एकमेकांना दिलेली वचने पाळत कसा अगदी दृष्ट लागण्यासारखा होता. नायिकेला वाटते की तोच ओलावा आजही असावा आणि तीच वचने आपण वर्तमानातही पाळावी.

6) मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी

     निरोप त्याला दोघे देऊ प्रेम स्मृतींच्या वेशी

आता आपला अस्तकाल समीप आला आहे, सूर्य मावळून दूर देशी जातो, कुठे जातो ते अज्ञात आहे. आपलेही तसेच आहे. इथून आपण कुठे जाणार माहित नाही, परंतु निदान निरोप घेताना तरी त्या मधुर गतस्मृतींच्या वेशीवर आपण दोघांनी उभे राहण्यास काय हरकत आहे?

7) नको दुरावा या वळणाशी त्या नात्यांच्या गाठी

    जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी

नायिका तिच्या पतीला आर्जवून सांगते आहे की आता या वळणावर आपल्या दोघात दुरावा नको रे! आपल्या नात्याच्या या गाठी जशा होत्या तशाच आपण जपूया, त्या सैल नको पडायला. त्यावेळी बेधुंद मनाने जसे आपण हातात हात घालून जगलो तसेच आताही जगू या ना!

संसार म्हटला की ॲडजस्टमेंट आली असे आपण नेहमीच म्हणतो. तसेच स्त्रीलाच ती करावी लागते असेही आपण म्हणतो. ही कविता वाचल्यावर हे अगदी सोळा आणे सत्य आहे याची जाणीव होते. नायिका दोघातील नात्यांचा दुरावा दूर करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे.

लवंगलता या मात्रा गण वृत्तातील ही कविता कुठेही सूट न घेता राधिकाताईंनी यथायोग्य शब्दांचा वापर करून अगदी सहज लिहिली आहे. यातील काळ्या ढगांनी दाटलेले नभ, बेसूर भाता, ओल्या वाळूतले सदन वगैरे उपमा व उत्प्रेक्षा या अलंकारयुक्त शब्दांनी कवितेला एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झाले आहे यात शंका नाही.

कवितेची सुरुवात उदासीन असली, तरी पुढे पुढे ती सकारात्मकता निर्माण करणारी असल्यामुळे आभाळाचे मळभ दूर करणारी आणि नंतर लख्ख प्रकाशाने उजळविणारी अशीच वाटते.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, या कवितेतील नायिका ही समाजातील अशा कित्येक जोडप्यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे आणि आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसून ते दोघे एकमेकांसाठीच असतात हा बोध देणारी आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ पाठवणी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ पाठवणी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

कशी वागलीस आज सांग तू नव्हेस माझी पत्नी

वृद्धाश्रमी आई बाबांना धाडणारी तू तर कैदाशिणी

*

नावावर करून घेतलीस संपत्ती गोड बोलुनी

धिक्कार असो तुझा ग तू तर निघाली चांडाळणी

*

आई वडील दैवत माझे होते गरीब अडाणी

घात त्यांचा केलास तू कुठे फेडशील हे पापिणी

*

झडली नाही जीभ कशी तुझे खोटे नाटे बोलुनी

निघ इथून तू का थांबली जा तोंड काळे करुनी

*

शरम नाही तुला थोडीही संस्कार गेली विसरुनी

थांब तुलाही देतो आता तुझ्या माहेरी पाठवुनी

*

काय पडले कमी तुला काय साधले असे करुनी

कोणते सुख शोधतेस चौकट घराची मोडुनी

*

येऊ नकोस समोर माझ्या नाव माझे घेऊ नकोस

नरडीचा घोट घेईन तू नको परीक्षा पाहूस

*

शोधून आणेन त्यांना आकाश पाताळातुनी

बघ तुझे तू आता चालती हो या घरातूनी

*

होशील तू ही म्हातारी तुझीच स्मरूनी करणी

मुलेच करतील तुझी वृद्धाश्रमी पाठविणी

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकांत की एकाकी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ एकांत की एकाकी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

वाटते कधी कधी मना,

 एकांत हवा उपभोगाया!

 पण माणूस प्रीय मन माझे,

 लागते सहवास शोधाया!

 *

एकांत माणसाला,

 शांतता‌ प्रीय वाटे!

 पण एकाकीपणाची

 खंत मनात दाटे!

 *

कधी वाटते समाजापासून,

 दूर राहावे एकांती!

 अन् शांत मनाचे पडसाद

उमटावे अपुल्या भोवती!

 *

कधी वाटते सुटून जावे,

 गर्दीतून या दूर!

 एकट्या मनाला मिळत नाही,

 जगण्याचा तो सूर!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares