विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

अग्नी किंवा तेज तत्त्व हे पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत प्रभावशाली तत्त्व आहे. मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचे अनेक फायदे होतात.

शारीरिक फायदे

पचनशक्ती (जठराग्नी) आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी अन्नाचे पचन करतो. हा अग्नी संतुलित असल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

रोगप्रतिकारशक्ती सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून मिळणारे ‘तेज’ शरीरातील जंतूंचा नाश करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

चयापचय 

शरीरातील उष्णता रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखते.

मानसिक आणि बौद्धिक फायदे

स्पष्टता आणि निर्णयक्षमता प्राप्त होते.

‘तेज’ म्हणजे प्रकाश. ज्याप्रमाणे अंधारात प्रकाश दिशा दाखवतो, त्याचप्रमाणे तेज तत्त्वाच्या प्रभावामुळे बुद्धी तल्लख होते आणि संभ्रम दूर होऊन विचारांमध्ये स्पष्टता येते.

आत्मविश्वास आणि उत्साह मिळतो

तेज ऊर्जेमुळे माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नैराश्य किंवा आळस दूर करून कार्य करण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा आवश्यक असते.

अध्यात्मिक फायदे

नकारात्मकतेचा नाश ज्याप्रमाणे अग्नी अशुद्ध गोष्टी जाळून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे तेज ऊर्जा मनातील नकारात्मक विचार आणि विकार भस्म करण्यास मदत करते.

तेजस्वी व्यक्तिमत्व उपासनेतून किंवा ध्यानधारणेतून तेज तत्त्व आत्मसात केल्यास व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि स्वभावात एक प्रकारचे ‘ओज’ किंवा तेज जाणवते, ज्यामुळे समाजात त्याचा प्रभाव पडतो.

तेज ऊर्जा मिळवण्याचे काही मार्ग

१ सूर्योपासना: सकाळी लवकर कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यनमस्कार घालणे.

२ दीप दर्शन: शुद्ध तुपाचा दिवा लावून त्याकडे त्राटक (एकाग्रतेने पाहणे) करणे. या मुळे एकाग्रता वाढते. मनातील नकारात्मकता भस्म होऊन मानसिक शक्ती मिळते.

३ सात्त्विक आहार: शरीरातील जठराग्नी प्रदीप्त ठेवणारा ताजा आणि संतुलित आहार योग्य वेळी घेतल्यास शरीरातील अग्नी, अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करतो. जास्त मसालेदार व जास्त तिखट अन्न, जास्त उष्ण पदार्थ यामुळे पित्त वाढते. ते तेज किंवा अग्नीचे असंतुलित स्वरूप आहे. ते टाळण्यासाठी शीत व पाचक पदार्थांचा समावेश करावा.

जर हा अग्नी मंद झाला तर शरीरात आळस व रोग निर्माण होतात.

४ प्राणायाम व योग : भस्त्रिका व कपालभाती या सारख्या प्राणायामा मुळे शरीरातील उष्णता वाढते. व रक्ताभिसरण सुधारून मानसिक जडत्व दूर होते.

५ उष्ण पाण्याचे सेवन : कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आणि चयापचय क्रिया सुधारते.

थोडक्यात सांगायचे तर, अग्नी किंवा तेज ऊर्जा ही माणसाला केवळ जिवंत ठेवत नाही, तर त्याला प्रगतीसाठी आवश्यक असलेले चैतन्य आणि दीप्ती प्रदान करते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted