हिन्दी साहित्य – कविता ☆ अभिव्यक्ति # -१२५ – … बुरा न मान जाए ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता ‘बुरा न मान जाए…‘।)

☆ अभिव्यक्ति # १२५ ☆

☆ बुरा न मान जाए… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

☆

वो उसे कुछ लिखना चाहता है,

लिखता है, पर पसंद नहीं आता,

लिख कर, फिर मिटा देता है,

कई विचार आते हैं, लिखता है,

पसंद नहीं आता, मिटा देता है,

सोचता क्या लिखे, नाराज न हो,

पढ़कर बुरा न मान जाए।

*

शब्दों का संयोजन, संतुलित हो,

उसकी बात समझे, नाराज न हो,

मन में बहुत कुछ है लिखने को,

कागज पर शब्द उभर नहीं पाते,

मन में विचार तो बहुत आते हैं,

मन से बाहर, निखर नहीं पाते,

अपने मन का हो, या उसके मन का,

मन का भाव, समझ तो पाए,

सोचता क्या लिखे, नाराज न हो,

पढ़कर बुरा न मान जाए।

☆

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – आलेख ☆ जीवन – मंजरी ☆ श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव ☆

श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव 

गोरखपुर, उत्तर प्रदेश की निवासी लेखिका व कवयित्री श्रीमती अभिलाषा श्रीवास्तव जी एक प्रेरणादायक महिला हैं। साहित्य की सेवा में निरंतर रत | आपको 2024 में अंतरराष्ट्रीय महिला सम्मान पत्र से नवाजा गया। विशेष सम्मान : एक्सीलेंट कवयित्री अवार्ड से सम्मानित तथा पुरस्कृत |उनके द्वारा संवाद टीवी पर फाग प्रसारण में प्रस्तुत किया गया और विभिन्न राज्यों के प्रमुख अखबारों व पत्रिकाओं में उनकी कविता, कहानी और आलेख प्रकाशित हो चुके हैं। उनकी लेखनी में समाज के प्रति संवेदनशीलता और सृजनात्मकता का सुंदर संगम देखने को मिलता है।

 

☆ आलेख ☆ जीवन – मंजरी ☆

तुलसी के चौरे की मिट्टी भी कितनी अजीब होती है!

उसके गर्भ में जितनी पवित्रता है, उतनी ही एक कठोर नियति भी। जब उसी चौरे के बीचों-बीच, हवा के किसी अनछुए झोंके से तुलसी की नन्हीं-नन्हीं मंजरियाँ छिटक कर खुद-ब-खुद पनपने लगती हैं, तो घर की सयानी स्त्रियाँ दौड़कर आती हैं। वे ममता से भर जाती हैं। बड़े मान-सम्मान के साथ, वे उन कोपलों को उठाकर आँगन की किसी दूसरी छांव वाली मिट्टी में रोप देती हैं।

सोचती हैं स्त्रियाँ किचलो, इसे भी जीवन का विस्तार मिले।

लेकिन ज़रा ठहरिए…

उस चौरे की चौड़ाई से निकलकर जो तुलसी दूसरी मिट्टी में पनपी, वह रही तो तुलसी ही— उसकी पत्तियाँ आज भी उतनी ही सुगंधित थीं, उसकी तासीर आज भी वैसी ही ठंडी थी। पर अब उसके और उसके स्वतंत्र अस्तित्व के बीच एक अदृश्य लक्ष्मण-रेखा खींच दी गई थी। उसे बता दिया गया था कि उसका हर हरा होना, उसका हर बार बढ़ना, बस उस तयशुदा दायरे के भीतर ही मान्य है।

और यह दृश्य देखते ही मन अनायास ही सिहर उठता है…

क्योंकि यह सिर्फ एक पौधे की कहानी नहीं है।

यह तो ठीक वही रेखा है, जो हर उस लड़की के इर्द-गिर्द खींच दी जाती है, जो ब्याह कर किसी नए घर की देहरी लांघती है। जब वह दुल्हन बनकर आती है, तो उसे नई मिट्टी, नए रिश्ते और ढेर सारा सम्मान दिया जाता है। उसे सजाया जाता है, संवारा जाता है, उसकी पूजा भी होती है।

पर उस सम्मान के अदृश्य बक्से में एक शर्त भी जड़ दी जाती है— कि तुम्हारी जड़ें इस घर की तय सीमा से बाहर न जाने पाएँ। तुम महको, तुम छांव बनो, तुम ममता बरसाओ…

और फिर, जब कभी वह स्त्री अपने वजूद के लिए, अपनी अस्मिता के लिए या अपने हिस्से की हवा के लिए थोड़ा सा भी ज़ोर लगाती है, अपनी आवाज़ को ऊँचा करती है, तो समाज की सदियों पुरानी दीवारें और संस्कार एक ही झटके में उस पर यह मुहर लगा देते हैं—

“तुम सुदंर तो हो…. बस, आवाज़ उठाती अच्छी नहीं लगतीं! “

☆

© श्रीमति अभिलाषा श्रीवास्तव

गोरखपुर, उत्तरप्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

संसार पेलताना जनता पिचून गेली

लटकी उगी जगाला सांगू नका खुशाली

जगणेच आज येथे झाले आहे हमाली

आहेत वंचनेच्या पाठीवरी पखाली

 *

होणार पूर्ण नाही अशा मनात जपली

अंधार उजळणा-या नाहीत या मशाली

आहेच वास्तवाची काळोख रात आली

झालोय आज आम्ही स्वप्नात भाग्यशाली

 *

सरली उमेद आहे बांधून ठेवलेली

सगळीकडे निराशा आहेच पसरलेली

संधी सुधारणांची फसवून दूर गेली

सद्भावना कुणाची नाही कुठेच दिसली

 *

समता इथेच दिसते द्वेषात गुंतलेली

जातियतेत आहे धूसफूस चाललेली

वाचनास जाणारी नियती निघून गेली

संस्कार संस्कृती ही नाही कुठेच उरली

 *

माणूस माणसाचा नाहीच आज वाली

बदलून भावभक्ती झालीय आज नकली

जिकडे बघाल तिकडे विध्वंसता पसरली

होईल काय पुढती चिंताच फक्त उरली

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकल पालकत्व आणि चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी बालमनं… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

🌸 विविधा  🌸

☆ एकल पालकत्व आणि चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी बालमनं… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

एकल पालकत्व

आणि

चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी बालमनं

शाळेतील नोकरीच्या काळात एकल पालकत्वाचे वास्तव मला फार जवळून अनुभवता आले.

एक चित्रकला शिक्षिका म्हणून मी नेहमीच विद्यार्थ्यांना चित्र आणि रंगांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले. निबंध कोणीही वाचू शकते, पण मुलांच्या रंगरेषांमागील खरा अर्थ आणि त्यांच्या मनातील भावना फक्त मलाच वाचता येतात, असा विश्वास मी त्यांच्यात निर्माण केला.

या प्रक्रियेत मुलांच्या जगण्यातील संघर्ष आणि त्यांची अस्वस्थता माझ्यासमोर उघडी पडली.

एकदा मुलांना ‘घर’ हा विषय दिला असताना, पाचवीतल्या एका मुलाने काढलेले चित्र अत्यंत बोलके होते. त्याने घराचे चित्र खूप लहान काढले होते आणि त्याला कुलूप मात्र अफाट मोठे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर समजले की त्याची आई रंगाच्या दुकानात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत काम करते. ती रात्री उशिरा घरी परतते, तोपर्यंत पाचवीतले ते मूल आपल्या दप्तरावरच डोकं ठेवून झोपी गेलेले असते. या एका चित्राने त्या बालमनावरील एकाकीपणाची आणि आईच्या विरहाची भीषण जाणीव करून दिली.

दुसऱ्या एका प्रसंगी, स्लम एरियात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला शेजारच्या मुलाने सिगरेट आणण्यासाठी पाठवले होते. एकल पालकत्वामुळे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी ही मुले नकळत चुकीच्या मार्गाला लागतात किंवा कुणीही त्यांचा वापर करून घेतो. मी त्याला प्रेमाने समजवले की, “तुला ‘नाही’ म्हणायला शिकलं पाहिजे. अभ्यासाची वेळ आणि स्वतःचे भवितव्य महत्त्वाचे आहे. “

आठवीत शिकणारा आणखी एक मुलगा कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी हाकलून दिल्याने झाडाखाली गुडघ्यात डोकं घालून बसल्याचे चित्र काढला होता. अशा वेळी रागीट पालकांचे धोरण त्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते.

कला हे मन मोकळे करण्याचे आणि व्यक्त होण्याचे अत्यंत सुंदर माध्यम आहे. मुले या माध्यमातून निःसंकोच बोलतात. या सगळ्या अनुभवातून मला प्रकर्षाने वाटते की, मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधी ‘पालक शाळा’ घेणे गरजेचे आहे, जेणेकरून पालकांना मुलांचे वयानुसार बदलणारे विश्व समजून घेणे सोपे होईल.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीच कहाणी पुन्हा एकदा? ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ तीच कहाणी पुन्हा एकदा? ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

रामा मूळचा अलिबागचा. वडिलांना मुंबईत टेक्सटाइल मिलमध्ये नोकरी लागली आणि सगळं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. परळच्या चाळीतल्या भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये त्याची आई तुटपुंज्या पगारात जमा व खर्चाचा मेळ घालायचा प्रयत्न करत बसायची.

रामा म्युनिसिपालिटीच्या शाळेत. अगदी नापास नाही झाला कधी पण अभ्यासात यथातथाच. कधी मन रमलंच नाही त्याचं शाळेत. ती फुटक्या गळक्या हौदाची गणितं, ते भुमितीतले त्रिकोण आणि त्यांची क्षेत्रफळं, इतिहासांच्या सनावळ्या – रामाचं डोकंच गरगरायचं. फक्त खेळायचा तास तेवढा त्याच्या आवडीचा. कबड्डीचा तो राजा होता – एकदा चढाईला उतरला की दोघा तिघांना शिवल्याशिवाय तो परत यायचाच नाही आणि कोपऱ्यात रक्षण करताना असा तो समोरच्याच्या पायात घुसायचा आणि चिवटपणाने त्याला असा धरून ठेवायचा जणू गुळाला चिकटलेला डोंगळाच.

PT चे शिक्षक एकदा वडिलांना म्हणालेही होते – पोरगं चांगलं खेळतं. त्याला खेळू द्या, राज्यस्तरावर गेला तर त्या सर्टिफिकेटच्या जोरावर पुढं नोकरी वगैरे चांगली भेटेल. पण धोपटमार्गाने जाणाऱ्या वडिलांच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.

अगदी गटांगळ्या खात नाही पण कसाबसा SYBA पर्यंत रामाची गाडी गेली, SY ला दांडी गुल झाल्यावर वडिलांनी रामाला आपल्याच कारखान्यात चिकटवलं आणि रामा आपल्या वडिलांचे आयुष्य परत पहिल्यापासून जगू लागला. तीच कहाणी पुन्हा एकदा.

रामाचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगी होती. आई वडिल परत अलिबागला आपल्या घरी गेले होते. रामाची मुलगी त्याच म्युनिसिपल शाळेत होती. बापाची कबड्डी तिच्याही रक्तात उतरली होती. तीच चढाई करायची तडफ आणि तोच कोपऱ्यातला चिवटपणा. आज मुलीच्या शिक्षकांनी रामाला शाळेत बोलावून घेतले होते – शाळेच्या अभ्यासात गती नसेल फारशी पण तुमची पोरगी चांगलं खेळते. तिला खेळू द्या, राज्यस्तरावर गेली तर त्या सर्टिफिकेटच्या जोरावर पुढं नोकरी वगैरे चांगली मिळेल तिला. आणि हल्ली व्यावसायिक कबड्डीतही करियर करता येतं.

रामासाठी जणू कोणी घड्याळाचे काटे उलट फिरवले होते. त्याच्या नजरेसमोर कबड्डीचा सामना जिंकलेला, घामाने डबडबलेला, अर्ध्या चड्डीतला शाळकरी रामा आला – आणि डोळ्यासमोर आला आजचा कारखान्यात घाम गाळणारा, अजूनही चाळीतल्या त्याच दोन खोल्यांत राहणारा रामा.

 रामा निर्धार करून शिक्षकांना म्हणाला – “तिला खेळू दे, मास्तर. माझीच कहाणी मी माझ्या पोरीला पुन्हा एकदा जगायला नाही लावणार. “

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मी वाट पाहतोय…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मी वाट पाहतोय…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

किती गोड मुलं आहेत ना ही???

अगदी आपल्या घरातल्या सारखी…

पण आपल्या मुलांना आपण ज्या सोयी सुविधा देतो त्या यांना मिळत नाहीत, कुत्र्या मांजरासारखी ती रस्त्यावर राहतात, (कुत्र्या मांजरांना सुद्धा हल्ली बरे दिवस आहेत) 

कुणी दिले तर कपडे घालतात, कुणी दिले तर खातात….!

फक्त लाचारीची सवय लावली जाते, जन्मल्यापासून…

ती ही खुद्द त्यांच्या माता-पित्यांकडून…!

या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी खूप प्रयत्न करत आहे, परंतु आमच्या भिक्षेकऱ्यांमध्ये एक गट असा आहे की, जो शिक्षण घेतले तर पाप लागते असं समजतो.

– – किंवा मुलांकडून जास्त भीक मिळते या कारणास्तव पालक या समजाच्या पडद्याआड लपत असतील…!

या मुलांच्या आणि पालकांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहे, मात्र मागील दहा वर्षात मला हे जमलं नाही….!

It’s my failure….! त्यांचा विश्वास जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अनंत गोष्टी आजपर्यंत केल्या….

आता आपण या मुलांना चांगल्या क्वालिटीचे स्वेटर थंडी पडण्याच्या अगोदर देणार आहोत….!

मिळणाऱ्या देणगीतून स्वेटर साठी थोडे पैसे बाजूला टाकत आहे… ऑक्टोबर पर्यंत सर्व सांभाळून, काही बाही जमा होतीलच….!

– – बघू मायेची ऊब मिळाली तर विरघळतील कधी तरी, आज ना उद्या… मी वाट पाहतोय…!

आपला स्नेहांकित.

डॉ. अभिजीत सोनवणे

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्ही पण बापट… – लेखिका : नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – रमा मोडक ☆

रमा मोडक

? मनमंजुषेतून ?

☆ आम्ही पण बापट… – लेखिका : नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – रमा मोडक ☆

पस्तीस वर्षांपूर्वी लग्न करून मिरजेहून सोलापुरला आले. मिरज आणि सोलापूर समकुलीन. कोरडी हवा, भरपूर धूळ, माफक पाऊस, कर्नाटकचा शेजार, डोक्याला फारसा त्रास करून न घेणारी निवांत माणसं.. चांगुलपणावर विश्वास असणारी नि स्वत:ला शहाणं न समजणारी.. पडतं घ्यायला कुठेही नि कधीही तयार असणारी..

वर्षाच्या कुठल्याही दिवशी नि कुठल्याही प्रहरी घराबाहेर पडलं की चौकात एखाद्या महापुरुषाचा मोठ्ठा फोटो. विविध वयाच्या मानवजातीचं कोंडाळं. प्रचंड मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर लावलेली गाणी. दर चार दिवसांनी निघणा-या मिरवणुकी, उधळला जाणारा गुलाल, ढोलांचा ढमढमाट नि सिनेमातल्या गाण्यांवर (ज्याचा त्या उत्सवाशी काडीमात्र संबंध नसलेला) बेधुंदपणे नाचणारी तरुणाईच नव्हे तर वार्धक्यसुद्धा..

काळाबरोबर तंत्रज्ञानानं प्रगती केली. अनेक शोध लागले. बाकीचं तंत्रज्ञान सोलापुरपर्यंत किती पोहोचलं ते देवास ठाऊक पण डॉल्बी, डीजे मात्रं वा-याच्या वेगानं सोलापुरात अवतरलं.

आमची कॉलनी सोलापुरातील पहिली आणि महाराष्ट्रातली दोन नंबरची.. शंभर वर्षांपूर्वी वसलेली.. डेरेदार वृक्षांनी सजलेली.. तशी शांत पण पुढच्या बाजुला अखंड वाहणारा हमरस्ता नि मागच्या बाजुला असणारी अठरापगड वस्ती..

विविध जाती, धर्म म्हणूनच विविध भाषा, पोषाख, अन्न… विविधरंगी संस्कृतींचा महासागर…

खरंतर हे सारं सुखद..

पण यात जोरजोराने किंचाळणारे ध्वनीक्षेपक, हृदय फुटून बाहेर येतं की काय.. अशी धडकी भरवणारे डीजे नि डॉल्ब्या.. यांनी मिठाचा खडा सोडला होता..

पहाटे चारला जाग यायची तीच विविध धर्मांच्या प्रार्थनांनी. धर्माधर्मातील चढाओढींमुळे वाढत जाणारे प्रार्थना, गाणी, स्तोत्रे, श्लोक यांचे आवाज…

मराठी, हिंदी, उर्दू, तेलगु, कानडी.. सा-या भाषांनी लावलेली हजेरी..

“सकाळ झाली नि कोंबडा आरवला”.. या तालावर मोठे झालेल्या आम्हाला आता..

” सकाळ झाली नि कर्णा वाजला ” याची सवय करून घ्यावी लागली.

सकाळच्या प्रार्थनांचा बहर ओसरेपर्यंत एखाद्या लग्नाची किंवा जयंती-पुण्यतिथीची मिरवणुक आसमंत दणाणून सोडायची..

सायंकाळची नि रात्रीची वेळ तर डीजे -डॉल्बी या बंधुभगिनींची हक्काची..

रोजची मिरवणुक, कर्णबधीर करून सोडणारा प्रचंड आवाज..

मागच्या किंवा पुढच्या रस्त्याने मिरवणुक निघाली की एकाच खोलीतल्या लोकांना माईकवर बोलायला लागावं अशी परिस्थिती..!!

खिडक्यांच्या काचाही थरथरायच्या.. भूकंपासारख्या..

लहान बाळं, वृद्ध, आजारी माणसं, परीक्षार्थी, रुग्णालयातील पेशंट्स, शाळेतील विद्यार्थी.. कुणाचीही पर्वा न करता केवळ नशेपोटी नि धुंदीत नेणारे हे असुरी आवाज..

सोलापुरकर जन्मत: सोशिक.. जशी तप्त हवा, दुष्काळ त्यांनी काही न बोलता स्वीकारला, राजकारण्यांची खोटी आश्वासनं, त्यांच्याकडून वाट्याला आलेला अन्याय-उपेक्षा.. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता पचवली तसचं हे ध्वनीप्रदूषणही त्यांनी निमूटपणे स्वीकारलं..

आम्हीही त्याच सोलापुरकरांचे प्रतिनिधी..

आमच्या सोसायटीत येणारा गवळीसुद्धा मोटारसायकलवर प्रचंड आवाजात गाणी लावून येणारा.. हाक मारायला लागू नये म्हणून…!!

हरतालिकेदिवशी लेक जन्मली. दुसरे दिवशी हॉस्पिटलमधून घरी परतताना गणपतीच्या मिरवणुकीतून गाडीनं धरलेला घरचा रस्ता..

वहिनीच्या मांडीवर पहुडलेलं माझं दोन दिवसाचं इवलुसं लेकरू.. त्या डीजेच्या आवाजानं नि ढोलाच्या प्रत्येक घणघणाटानं दचकणारं.. तिच्या प्रत्येक दचकण्यानं माझा, माझ्या नव-याचा नि माझ्या वहिनीचा खालीवर होणारा जीव..

या पिटुकलीच्या कानांना इजा नाही नं होणार, तिचं काळीज दुखावणार नाही नं..? लेकीच्या आगमनाच्या आनंदाऐवजी काळजीचा डोंगर उराशी बाळगून, एका हाताने तिचे कान बंद करत नि ती दचकू नये म्हणून दुसरा हात तिच्या पोटावर ठेवत आम्ही कसंबसं घर गाठलं..

नि तिथे माझ्या नव-याचा बांध फुटला..

त्याने पोलीसस्टेशनला फोन केला.

” आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं तुमचं काम नाही? डेसिबलची मर्यादा कायद्याने घालून दिलेली असताना तुम्ही तिची अंमलबजावणी का करत नाही? यामुळे कुणाला ऍटॅक आला, कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? “.. एवढं संतापलेलं त्याला कधीच पाहिलं नव्हतं..

” डॉक्टरसाहेब, गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. वरून प्रेशर असतं आमच्यावर.. ” 

तो त्याच भागातला एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे पोलीस एवढंतरी बोलले..

गणेशोत्सवात काहीच करता येण्यासारखं नव्हतं..

उत्सव संपला..

नंतर मात्रं रस्त्यावरून रात्रीच्या वेळी डीजेचा आवाज येऊ लागला की माझा नवरा नि मी पोलीस स्टेशनला फोन करायचो.. प्रसंगी पोलिसस्टेशनलाही नवरा जायचा. तक्रार नोंदवायचा..

अन् विशेष म्हणजे पोलीसही स्वत: मिरवणुकीत जाऊन आवाज कमी किंवा बंद करायला लावायचे..

अनेक वर्षं हा लढा आम्ही लढला..

कोणतीही लाज न बाळगता.. कंटाळा न करता.. हार न मानता..

“यात तक्रार करण्यासारखं काय आहे.. आमच्या घरीतर चोवीस तास हे आवाज असतात. माणूस म्हटल्यावर हे चालणारच “.. आमच्या कामवाल्याही आमची चेष्टा करत असत..

पण आम्ही हरलो नाही..

कधीकधी कमिशनर ऑफिसही गाठलं.

सोलापुरचं पोलीसखातं कर्तव्यदक्ष..

किंवा

आमची कळकळ असेल

नाहीतर 

बरेच पोलीस नव-याचे पेशंट असल्यामुळेही असेल..

किंवा 

देशाचे गृहमंत्री आमच्या सोसायटीचे रहिवासी असल्यामुळे असेल..

पण

आमच्या तक्रारीची प्रत्येकवेळी दखल घेतली गेली.

नि

आमची चिमुरडी लेक शांतपणे झोपू शकली.

गेल्या वर्षी मिरवणुकीत दोन व्यक्ती डी. जे. च्या आवाजामुळे मृत पावल्याच्या बातम्या सोलापुरातील पेपरमधे आल्या..

अतिसोशिक नि निवांत असणारा सोलापुरकर यावेळी कसा पेटून उठला देव जाणे..

आय. एम. ए.. , काही सामाजिक संस्था, काही समाजसेवी व्यक्ती यांनी पोलीस कमिशनर, कलेक्टर यांच्याकडे डीजेबंदीची मागणी केली..

नि

सोलापुरकरांचं नशीब बलवत्तर.. ती मागणी चक्क मान्यही झाली..

ना कोणी त्या मागणीला विरोध केला..

ना आंदोलनं झाली..

चांगल्या प्रथेला कसला विरोध..?

“शुभस्य शीघ्रम”.. म्हणत त्वरित अंमलबजावणीही झाली..

गेले वर्षभर सोलापुरकर डीजेमुक्तीची सुखद शांतता अनुभवतायत..

मिरवणुका होतात पण त्यांचा आवाज त्रासदायक नसतो..

विद्यार्थी शांतपणे अभ्यास करू शकतात..

रुग्णाचं हृदय आता डीजे नं धडधडत नाही…

लहान बाळं डॉल्बीच्या आवाजानं दचकून उठत नाहीत..

शांततेची सोलापुरात साथ आलीय..

प्रार्थनास्थळं, देवळं… सगळीकडे शांततेत भक्तीचा सोहळा पार पडतोय…

कदाचित देव पण त्यामुळे सुखात आहे..!!

आम्हा सोलापुरकरांची पहाट पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटानं फटफटतेय

नि

रात्रं रातकिड्यांच्या पार्श्वसंगीतानं निद्राधीन होतेय…

निसर्गाचा कोमल स्पर्श पुन्हा एकदा सोलापुरकरांना सुखावतोय..

हा बदल इतका सहज झाला की त्याचं तेंव्हा काहीच वाटलं नाही…

आज पुण्याच्या बातम्या वाचताना उगीचच सोलापुरचा अभिमान वाटतोय..

ज्या सोलापुरला सुधारित खेडं, मागासलेलं गाव.. अशा विशेषणांनी हिणवलं गेलं.. त्या गावानं चांगल्या गोष्टीचा, ख-या-खु-या सुधारणेचा उगीचच विरोधासाठी विरोध न करता किती सहजतेनं स्वीकार केला…

ना त्यात धर्म मधे आला ना कोणता पक्ष..

“माणसाचे हित “.. एवढ्याच अजेंड्यावर सोलापुर एक झालं.

“डीजे मुक्ती ” ही शांतपणे जगण्यासाठीची गरज आहे… हे लहान मुलालाही कळेल, अशी वस्तुस्थिती असताना विद्येच्या माहेरघराच्या नशिबी त्यापोटी येणारा संघर्ष पाहिला की…

सोलापुर भले पुढारलेलं नसेल, हुशार लोकांचं गाव नसेल पण शहाणी नि समंजस माणसं इथं राहतात, असं वाटून जातं..

नि

एकेकाळी मी नि माझ्या नव-याने आमच्यापरीने ध्वनिप्रदूषणाविरोधी उचललेलं चिमुकलं पाऊल आठवतं..

आणि वाटतं..

आम्ही पण बापट….

लेखिका : नीला महाबळ गोडबोले

(मिरज – सांगली) मु. पो. सोलापूर

प्रस्तुती : रमा मोडक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संधी-विग्रहाच्या पलीकडे… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ संधी-विग्रहाच्या पलीकडे… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

 – – नाती, व्यवहार आणि समत्वाचा अंतर्मुख प्रवास

 

“शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ ।

भव समचितः सर्वत्र त्वं वाञ्छस्यचिराद्यदि विष्णुत्वम् ॥”

(द्वादशपञ्जरिका स्तोत्रम्)

व्दादशपञ्जरिका स्तोत्रात आचार्य शिष्याला वरील उपदेश करतात.

– – शब्द थोडे पण आशय अथांग.

आचार्य असे का म्हणतात?

– – शत्रू असो वा मित्र, पुत्र असो वा बंधू—या नात्यांच्या संधी-विग्रहात मनाला इतके गुंतवू नकोस की तुझे चित्तच अस्थिर होऊन जाईल. सर्वत्र समचित्त राहा. परमात्म्याशी ऐक्याची आकांक्षा असेल, तर अंतःकरणात समत्व जागव.

आचार्यांचे हे वचन वाचताना एक प्रश्न मनात येतो—

— मग व्यवहार करायचा कसा?

शत्रूशी विग्रह करायचा नाही? मित्राची चूक झाली तर विरोध करायचा नाही? पुत्र चुकीच्या मार्गावर गेला तर त्याला थांबवायचे नाही?

– – या प्रश्नाचे उत्तर शोधले की या श्लोकाचा सूक्ष्म अर्थ उलगडू लागतो.

 

नाती नकोत असे नाही…

आचार्य नाती तोडायला सांगत नाहीत.

ते नात्यांभोवती मनाने विणलेली आसक्तीची जाळी तोडायला सांगतात.

– शत्रू असेल तर त्याचा प्रतिकार करावा लागेल.

मित्र असेल तर स्नेह ठेवावा लागेल.

पुत्र असेल तर प्रेम करावे लागेल.

बंधू असेल तर नाते निभवावे लागेल.

व्यवहार नाकारून अध्यात्म साधत नाही.

– मग सोडायचे काय?

अतिरेकी मोह. द्वेष. अपेक्षांचे ओझे. ‘माझे’ आणि ‘परके’ यांत मनाला अडकवणारी तीव्रता.

– – नाती राहू द्यावीत.

पण नात्यांनी मनाला कैद करू नये.

नाती हातात असावीत;

गळ्यातील फास होऊ नयेत.

 

संसार बाहेर कमी, मनात अधिक

शत्रू बाहेर असतो; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपण मनात वाढवत राहतो.

मित्र बाहेर असतो; पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा मनात घर करतात.

पुत्र आपला असतो; पण त्याच्यावरील मोह कधी विवेकावर सावली टाकतो.

म्हणून प्रश्न नात्यांचा नाही.

– प्रश्न आहे—नात्यांशी आपले मन किती बांधले गेले आहे?

आचार्यांना हीच गाठ सोडवायची आहे.

 

समत्व म्हणजे समान वर्तन नव्हे

‘समचित्त’ म्हणजे सर्वांशी अक्षरशः एकसारखे वागणे नव्हे.

– दुष्ट आणि सज्जन यांच्यात भेद करावाच लागतो. न्याय आणि अन्याय यांत फरक करावाच लागतो.

समत्व म्हणजे विवेक सोडणे नव्हे;

– विवेकाला राग-द्वेषाच्या ताब्यात जाऊ न देणे.

गीता सांगते—

“समत्वं योग उच्यते।”

– – मन एखाद्याच्या प्रेमाने उंचावले आणि दुसऱ्याच्या द्वेषाने कोसळले, तर त्या मनाचे स्वातंत्र्य कुठे राहिले?

ज्याच्या हातात आपला राग आहे,

त्याच्या हातात आपल्या मनाची दोरी आहे.

 

व्यवहारात भेद, दृष्टीत अभेद

गीतेतील—

“पण्डिताः समदर्शिनः”

– – ही दृष्टी समत्वाचा गाभा सांगते.

समदर्शी ज्ञानी सर्वत्र एकच आत्मतत्त्व पाहतो. याचा अर्थ व्यवहारातील सर्व भेद नष्ट करणे नव्हे. प्रत्येक व्यक्तीचे आचरण, कर्तव्य आणि स्थान वेगळे असू शकते.

पण अंतःकरणातील दृष्टी द्वेषाने कलुषित होऊ नये.

व्यवहारात भेद.

दृष्टीत अभेद.

– – कदाचित समत्वाचे हेच सर्वांत नेमके सूत्र.

 

मग विग्रह करायचाच नाही?

करावा लागला तर करावा.

अन्यायासमोर उभे राहणे हेही कर्तव्य असू शकते. सत्यासाठी विरोध करावा लागू शकतो. म्हणून विग्रहाचा निषेध नाही; विग्रहामागील द्वेषाचा निषेध आहे.

महाभारताच्या रणभूमीवर अर्जुनासमोरही मोह आणि कर्तव्य यांचा संघर्ष उभा राहिला. श्रीकृष्णाने त्याला पलायनाचा मार्ग दाखविला नाही; मोह बाजूला ठेवून कर्तव्यकर्म करण्याची दिशा दिली.

म्हणून—

कर्तव्य करावे; पण द्वेषाने नव्हे.

विरोध करावा; पण प्रतिशोधाने नव्हे.

सीमा आखावी; पण अंतःकरणात वैराची भिंत उभी करू नये.

 

संधीही विवेकाने, विग्रहही विवेकाने

संधी म्हणजे नेहमी सद्गुण नव्हे.

कधी ती शहाणपण असते; कधी भीतीची सावली.

विग्रह म्हणजे नेहमी दोष नव्हे.

कधी तो अहंकार असतो; कधी धर्मरक्षणाचे रूप.

 

म्हणून प्रश्न कृतीचा कमी आणि अंतःप्रेरणेचा अधिक.

 

मी का लढतो आहे?

स्वार्थासाठी?

अहंकारासाठी?

प्रतिशोधासाठी?

की न्यायासाठी?

 

मी का संधी करीत आहे?

भीतीपोटी?

लोभापोटी?

की शांततेसाठी?

«कृती बाहेरची असते;

तिचे खरे स्वरूप मनात ठरते. »

 

प्रेम असावे; मोह नसावा

पुत्रावर प्रेम करावे; पण त्याची चूक दिसली तर सांगावी.

मित्रावर प्रेम करावे; पण तो चुकीचा असेल तर सत्य सांगावे.

बंधूवर प्रेम करावे; पण बंधुत्वाच्या नावाखाली अन्यायाला समर्थन देऊ नये.

शत्रूचा विरोध करावा; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपल्या अंतःकरणात साठवू नये.

प्रेम माणसाला उंचावते;

मोह त्याला बांधतो.

 

कमळाचे रहस्य

कमळ पाण्यात असते.

पण पाणी त्याला चिकटून राहत नाही.

– – संसाराचेही तसेच.

संसार सोडून दूर जाणे हीच विरक्ती नव्हे. संसारात राहूनही संसाराला मनाचा स्वामी होऊ न देणे—ही खरी विरक्ती.

– हात संसारात.

– मन समत्वात.

– – हीच अंतर्मुक्तीची दिशा.

संघर्ष बाहेरचा, शांती आतली

जीवनात संघर्ष टाळता येत नाही.

कधी घरात.

कधी समाजात.

कधी कार्यक्षेत्रात.

आणि कधी स्वतःच्या मनातच.

– – पण प्रत्येक संघर्ष अंतःकरणात उतरवायचा नसतो.

काही संघर्ष बाहेरच थांबवायचे असतात.

सीमा बाहेर आखायची.

शत्रुत्व आत वाढू द्यायचे नाही.

अध्यात्म म्हणजे संघर्षापासून पलायन नव्हे.

संघर्षाच्या मध्यातही विवेक आणि शांती जपण्याची शक्ती—हीच साधना.

 

शेवटी काय उरते?

– शत्रू कायमचा राहत नाही.

– मित्रही कायमचा राहत नाही.

– आजचा परका उद्या जवळचा होऊ शकतो.

– आजचा जवळचा उद्या दुरावू शकतो.

– संधी होतील.

– विग्रह होतील.

– जिंकणे-हरणे चालूच राहील.

 

मग या सगळ्यांच्या पलीकडे काय उरते?

– –आपले चित्त.

ते रागाने व्यापले असेल तर विजयातही पराभव असतो.

ते द्वेषाने भरले असेल तर शत्रू दूर असूनही आपल्या मनातच वसतो.

आणि ते समत्वाने उजळले असेल

तर संघर्षाच्या मध्यातही शांती जन्म घेते.

आचार्यांचा अंतिम संकेत

आचार्य म्हणतात—

शत्रूशी व्यवहार कर.

मित्राशी स्नेह ठेव.

पुत्रावर प्रेम कर.

बंधूचे नाते निभाव.

 

पण या सर्वांच्या पलीकडे स्वतःला विसरू नकोस.

संधी करावी लागेल—कर.

विग्रह करावा लागेल—कर.

पण मनाचा ताबा कोणालाही देऊ नकोस.

– – कारण मुक्ती नात्यांपासून पळण्यात नाही.

 

मुक्ती आहे—

नात्यांत राहूनही अनासक्त राहण्यात.

विग्रह बाहेर असला तरी चालेल… तो अंतःकरणात नको.

संसार हातात असू दे.

मन परमात्म्यात असू दे.

 

आणि मग—

शत्रू असो वा मित्र,

पुत्र असो वा बंधू,

संधी असो वा विग्रह—

 

चित्ताच्या आकाशात एकच ऋतु उरेल—

– समत्वाचा!

 

©️ दिवाकर बुरसे

पुणे.

संपर्कः ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कागद झाले आहे – लेखिका : वेदवती कुलकर्णी ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मी कागद झाले आहे – लेखिका : वेदवती कुलकर्णी ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

अंदमानच्या कारावासात दिवसभर काथ्या कुटून तर कधी कोलू ओढून शरीर आणि मन अतिशय थकलेल्या अवस्थेत असताना सुद्धा वीर सावरकर यांना कविता सुचत. पण कागदाचा तुकडा ठेवायला सुद्धा परवानगी नव्हती. कविता लिहिणार कशावर?

 मग मजुरीसाठी कोठडीबाहेर नेले की परत येताना ते एखादा घायपाताचा काटा लपवून आणत असत. भिंतीवर त्या काट्याने कवितेच्या ओळी लिहीत. लिहून लगेच पाठ करायच्या. कारण भिंतीवर चुना लावला गेला की पहिले लिखाण नष्ट होत असे. पुन्हा नवी पाटी. अशा पद्धतीने त्यांनी “कमला” हे महाकाव्य लिहून काढले आणि मुखोद्गत ही केलं.

या प्रसंगावर लोककवी मनमोहन यांनी मी कागद झाले आहे ही कविता लिहिली.

अशी कल्पना केली आहे की, सावरकरांनी आधी आभाळाला कागद होण्याची विनंती केली. पण आभाळ म्हणाले, “मी मुक्त आहे, तू कैदी आहेस. माझ्यावर फक्त वायूलहरी गीत लिहितात. तू भूमीला विचार. “

भूमीनेही नकार दिला. शब्दांचे उच्चारण होण्याआधीच उच्चाटन झाले.

पण….

दगडाची भिंत पुढे आली आणि “चल लिही” असे ती वदली.

कवी मनमोहन यांची मूळ कविता अशी आहे…….

मी मुक्तामधले मुक्त

तू कैद्यामधला कैदी

माझे नि तुझे व्हायाचे 

ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते

या मंद समीरण लहरी 

माझ्यावर चित्रित होते

गरुडाची गगन भरारी

*

जड लंगर तुझिया पायी

तू पीस कसा होणार 

माझ्याहुन आहे योग्य

भूमीला प्रश्न विचार 

*

आभाळ म्हणाले ‘नाही’

भूमीही म्हणाली ‘नाही’

मग विनायकाने त्यांची

विनवणी केली नाही

*
पापण्यात जळली लंका

लाह्यापरी आसू झरले 

उच्चारण होण्याआधी

 उच्चाटन शब्दा आले

*
ती पहाट लालमलाल

अनपेक्षित झाली काळी

दगडाची पार्थिव भिंत

तो पुढे अचानक सरली

*
“मी कागद झाले आहे,

चल लिही”असे ती वदली

ज्ञानेश्वरानंतर भिंत

पुन्हा एकासाठी चालली.

 – लोककवी मनमोहन

– – – 

लोककवी मनमोहन यांची ही कविता……

अप्रतिम… केवळ अप्रतिम!

ही कविता वाचून माझ्या मनामध्ये त्या भिंतीचं एक व्यक्तीचित्र उभं राहिलं

ते मी पुढील प्रमाणे शब्दांकित केलं आहे :-

पंचमहाभूतातील आकाश आणि पृथ्वी या दोन महान शक्तींनी सुद्धा जी कविता पेलायला असमर्थता दाखवली ती ह्या अतिसामान्य, उपेक्षित किंवा सर्वसामान्य जनांच्या दृष्टीने अपशकुनी वाटावी अशा दगडाच्या भिंतीने का बरं आपल्या शरीरावर चितारू दिली असावी? कुठून आलं हे असामान्य धैर्य तिच्यामध्ये? …… हा विचार ही कविता वाचतानाच मनात आला. मग मला असं वाटलं की बारीबाबाच्या अनन्वित छळाच्या यातना सोसून स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा या काळ कोठडीत डांबण्यासाठी परत ढकलले जात असतील तेव्हा त्या मूक भिंतींची ती काळ कोठडी आईच्या मायेने त्यांना जवळ घेत असेल आणि म्हणूनच हे असं अद्भुत घडलं!

एका तपस्वी देशभक्त कवीसाठी काळकोठडीच्या भिंतीमध्ये प्राणांचे प्रक्षेपण झालं! आणि घायपाताच्या काट्यांनी स्वतःच अंग विंधून घेऊन या महान कवीची काव्याक्षरं आपल्या अंगावर गोंदून घेण्याचं परम भाग्य त्या भिंतीला लाभलं.

या मनस्वी कवीचे अनन्वित हाल ती पहात होती, ती त्याची मूक साक्षीदार होती. म्हणूनच बाहेर यमयातना सोसून हा महाकवी ज्या वेळेला त्या काळकोठडीत परत डांबला जात असेल तेव्हा ती अभेद्य भिंत जणू आईच्या मायेने त्याच्याकडे पाहत असेल. हे अंदमान आणि काळापाणी तुरुंगातली मी कोठडी हा आपल्या मातृभूमीचाच तर भाग आहोत ना! या अभिमानाने तिचा ऊर भरून आला असेल.

ही आईची असीम माया काहीही नवल घडवू शकते.

जे आकाश आणि पृथ्वीला ही शक्य झालं नाही ते या भयाण दिसणाऱ्या पण अंतरात कोमल ममता असलेल्या भिंतीने सहज पेलेलं. त्यांनं ती किती सुखावली, खुलली असेल आणि आपल्या लेकराचं हे वाग्वैभव तिने अलंकारासारखं मिरवलं असेल.

तिच्यावर चितारलेली अक्षरं तिच्याच या असामान्य पुत्राने पटकन मुखोदगत करावी म्हणून तिचं मन कसं आसुसलं….. व्याकुळलं असेल. विनायकरावांची कविता पाठ झाली आहे हे पाहताच तिने केवढा समाधानाचा सुस्कारा टाकला असेल.

धारदार बुद्धिमत्तेची आणि विलक्षण स्मरणशक्तीची कवचकुंडलं लेऊन आलेला हा आपला विनायकबाळ पाहता पाहता स्वतःच्याच रचना मुखोद्गत करून टाकतो. बारीबाबांनी कितीही अक्षरं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्या लेकराच्या मनात कायमची कोरली गेली आहेत अक्षर झाली आहेत, हे बघून या भिंतीला केवढा आनंद होत असेल. त्या साऱ्या छळवादाचा, क्रूरकर्मांचा एका क्षणात झालेला हा पराभव!

अनादी मी अनंत मी

अवध्य मी भला 

मारील रिपु जगती 

असा कवण जन्मला?

हे आव्हान साक्षात मृत्यूला देण्याची हिंमत आणि विजिगीषू वृत्ती असलेल्या आपल्या मुलाबद्दल केवढा अभिमान तिला वाटला असेल.

बारीबाबाच्या क्रूरकर्मातून त्या भिंतीची रंग सफेती झाली असेल. पण ही भिंतमाय मनात खुदकन हसली असेल. आता माझ्या बाळाच्या नव्या कविता गोंदवून घेण्यासाठी मी परत सिद्ध आहे असं ती स्वतःशीच म्हणाली असेल आणि तिचं मन सुपा एवढं झालं असेल. कोणालाही न दिसणार्या कृतार्थतेच्या, आनंदाच्या अश्रूंनी तिचे डोळे भरून आले असतील. ते आसू ही ज्वालामुखीच्या तप्तरसाचे असतील…… ज्या ज्वालामुखीतून त्या भिंतीच्या अभेद्य दगडांचा जन्म झाला…. त्याच तप्तरसाचे!

केवळ एक आईच आपल्या बाळासाठी हे करू धजेल………. म्हणूनच ते अद्भुत घडलं!

☆

लेखिका : वेदवती मुकुंद कुलकर्णी

विलेपार्ले, मुंबई

संग्रहिका / प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “थांबायला शिका…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “थांबायला शिका…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

☆

‘कौन बनेगा करोडपती’च्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की ज्यामुळे अमिताभ बच्चननाही धक्का बसला.

कधी कधी थांबणे हेसुद्धा मनाला विलक्षण समाधान देऊन जाते…

‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझन १६ मधील एपिसोड क्रमांक ४९ मधील एका भागात डॉ. नीरज सक्सेना यांनी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत सर्वात जलद उत्तर देत हॉट सीटवर स्थान मिळवले.

विशेष म्हणजे, हॉट सीटवर पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ना उत्साहाचा गोंधळ, ना नाचणे, ना आरडाओरड, ना भावनिक प्रदर्शन… ते अगदी शांतपणे बसले होते.

डॉ. नीरज सक्सेना हे शास्त्रज्ञ, पीएच. डी. धारक आणि एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. कलाम साहेबांच्या सहवासामुळे त्यांच्या विचारांमध्ये झालेला बदल ते स्वतः मान्य करतात—

“सुरुवातीला मी फक्त माझा विचार करायचो; पण कलाम साहेबांकडून इतरांचा आणि राष्ट्राचा विचार करायला शिकलो. ”

खेळ सुरू झाला आणि नीरजजींनी अत्यंत शांतपणे, आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देत ₹३, २०, ००० जिंकले. त्यांना बोनस रक्कमही मिळाली. त्यांच्या हातात अजूनही अनेक लाईफलाईन्स शिल्लक होत्या आणि पुढे मोठी रक्कम जिंकण्याची संधी होती.

कार्यक्रमाला ब्रेक झाला.

ब्रेकनंतर अमिताभ बच्चन म्हणाले,

“चला डॉ. साहेब, पुढे जाऊया. हा आहे अकरावा प्रश्न…”

तेवढ्यात नीरजजी शांतपणे म्हणाले—

“सर, मला खेळ सोडायचा आहे. ”

क्षणभर अमिताभ बच्चनही थक्क झाले.

इतकी चांगली कामगिरी करणारी व्यक्ती, अजून लाईफलाईन्स शिल्लक असताना आणि करोडपती होण्याची मोठी संधी असताना अचानक खेळ का सोडते?

अमिताभजींनी विचारले,

“असं तर आधी कधीच घडलं नाही…”

नीरजजींचं उत्तर मात्र मनाला स्पर्शून जाणारं होतं—

“सर, इतर लोकही वाट पाहत आहेत. ते माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळायला हवी. मी आधीच भरपूर पैसे जिंकलो आहे. माझ्याकडे जे आहे, ते माझ्यासाठी पुरेसे आहे. मला यापेक्षा जास्त काही नको. ”

किती साधं उत्तर… पण किती मोठा विचार!

जिथे प्रत्येकजण “आणखी थोडं… अजून थोडं…” या हव्यासाच्या शर्यतीत धावत आहे, तिथे एखाद्या व्यक्तीने स्वतःहून म्हणावं—

“माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे; आता दुसऱ्याची पाळी. ”

यापेक्षा मोठं समाधान कोणतं?

नीरजजींनी खेळ सोडल्यानंतर पुढची स्पर्धक हॉट सीटवर आली. तिने आपली कहाणी सांगितली. ती म्हणाली की, “आम्ही मुली आहोत, या एका कारणामुळे माझ्या वडिलांनी आम्हा तिन्ही बहिणींना आणि आईला घरातून काढून दिलं. आता आम्ही अनाथाश्रमात राहतो…”

हे ऐकल्यावर मनात एक विचार आला—

नीरजजींनी जर खेळ सोडला नसता, तर कदाचित त्या मुलीला त्या दिवशी हॉट सीटवर बसण्याची संधीच मिळाली नसती.

एका व्यक्तीने स्वतःसाठी मिळू शकणारी संधी सोडली… आणि दुसऱ्याच्या आयुष्यात संधी निर्माण झाली.

हीच खरी श्रीमंती आहे!

आज आपण पैशाच्या, मालमत्तेच्या आणि अधिकाधिक मिळवण्याच्या शर्यतीत इतके पुढे आलो आहोत की, “आपल्याकडे किती आहे? ” यापेक्षा “दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा जास्त का? ” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे.

वारसाहक्काच्या एका पैशासाठी नाती तुटतात.

मालमत्तेसाठी भाऊ-बहिणी एकमेकांचे शत्रू होतात.

स्वार्थापायी प्रेम, आपुलकी आणि माणुसकी मागे पडते.

पण आयुष्याचा खरा अर्थ कदाचित याच्या अगदी उलट आहे.

सगळं मिळवणं म्हणजे यश नाही;

कधी कुठे थांबायचं, हे समजणं म्हणजे समाधान.

आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतरही दुसऱ्याच्या वाट्याची संधी आपण घेत राहिलो, तर आपल्याकडे संपत्ती कितीही असो—मन मात्र गरीबच राहील.

आणि जेव्हा आपण म्हणतो—

“माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे… आता दुसऱ्याला पुढे जाऊ दे, ”

तेव्हा आपण केवळ एखादी संधी सोडत नसतो;

आपण कुणाच्या तरी आयुष्यात आशेची एक खिडकी उघडत असतो.

कदाचित म्हणूनच देव मंदिरातच नाही, तर अशा माणसांच्या विचारांत आणि कृतीतही दिसतो.

डॉ. नीरज सक्सेना यांच्यासारखी माणसं आपल्याला एक अत्यंत साधा, पण विसरलेला धडा शिकवतात—

‘जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील, तेव्हा थांबायला शिका…कारण तुमचं थांबणं कदाचित दुसऱ्याच्या पुढे जाण्याची सुरुवात असेल.

स्वार्थ कमी करा… समाधान वाढवा…

आणि शक्य असेल तिथे स्वतःसाठी मिळालेली संधी दुसऱ्यालाही द्या.

कारण आयुष्याच्या शेवटी आपण किती मिळवलं, यापेक्षा

आपल्यामुळे किती जणांना मिळवण्याची संधी मिळाली—

हेच कदाचित अधिक महत्त्वाचं ठरेल. ‘

मनापासून नमन अशा विचारांना आणि अशा माणुसकीला!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares