☆ “चायना हो या कोरिया… गणपती बाप्पा मोरया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
रे गाडीवाल्या वाईच जरा हळू चालव तुझो खटारो टेम्पो… माका मागे हौद्यात बसान धक्यावर धक्के बसता… हाडा किती खिळखिळी केलीस ता…आनि ते खड्डे इले तर बघान घे रे… ते ढोल ताशे चा पोरीबाळींंचा पथक खयं रव्हला… टेम्पो समोर वाजवूक नाय ता… सगळे आधी रिल करूच्या मागे असततं… नि गरजेच्या ऐनवेळेला भितूर पळत़त… रे गाडीवाल्या तुझ्या खटाऱ्या टेम्पोच्या टपावरची ती ताडपत्री मात्र तड तड ताश्यासारखीच वाजान रव्हली रे… तुझ्या त्या टेम्पो बसलो त्यावेळे पासान माझे हे सुपासारखे कान पन किटले रे… पाऊस यंदा बरो पडलेला दिसता… तेवाच रस्त्याच्या दोन्ही बाजूक कसो हिरवळीचा तोरण बांधलेला दिसता… रे काय रे तुझ्या गाववालांका यंदाच्या वर्षी फुरसा चावला कि काय केव्हढी मोठी माझी मुर्ती हाणलयनं… तेव्हढो मोठो मंडप बांधलेला असा ना रे… मी सपनात पन बघूक नाय कि माझी एव्हढी मोठी अगडबंब मुर्ती तुमी बनविशाल म्हणून…अरे मूर्ती लहान असा दे नाय तर मोठी गणपती तर तेव्हढाच असता.. मगे कित्याक असलो अट्टाहास ता.. विसर्जनाच्या वेळी किती पंचायत व्हता.. आनि ता रव्हलाच… ता मंडपात लाईटींग कसो झकपक असाना रे… ता काय ता डी. जे. फि. जे लावा नका रे.. तुमचे नाय तर माझे कान किटान जाता… लोगा काय गार्हाणा घालतंत ता ऐकू येना नायं.. मंगे मी त्येंका पावयचा कसा… अरे किती महाप्रसाद घालतत नि हे हार नारळ नि उदबत्त्याचो धूर करतत त्याचा प्रदूषण होऊन माका खोकलो येता…ता अनंत चतुर्दशीला जवा देव लोकात मी परत जातयं ना तर माका एकविस दिवस क्वारंटाईन करतंत…का तर मी थयसून कसलो ना कसलो व्हायरल इन्फेक्शन नक्कीच हाणला असणार आनि त्याची लागण सगळ्या देवलोकास व्हतली म्हणून खबरदारी घेततं..आनि दुसरा मागच्या वरसापर्यंत तुम्ही सगळोच भेसळीचा नैवेद्य दाखवत व्हते त्याची माझ्या या पोटाला चांगलीच सवय झाली व्हती पण या वर्षी तुमका काय इपरीत बुद्धी झाली कळंना नाय तो बिना भेसळीचा नैवैद्य घश्याखाली उतरा नाय ता…मंगे मी निम्माहून उपाशीच रव्हलो…काय करतलो….तुम्ही मातर माका छप्पन भोग दाखवून सोताचा तुडुंब पोटा भरून घेत रव्हले…ता सकाळ संध्याकाळ ती आरती तुम्ही करतत ता जरा पुस्तकातली नीट वाचून करा रे… कोनाक वंदना व्हयी तर कोनाक सजना.. फळीवर काय? कायेव बी पदरचा घालुन घसा फोडून आरती करतत… रे कानाक कसा वाटता ते… शांत सुरात चालीत दोनच आरती करा पन ता कानाक गोड लागाक व्हयी… तुमच्या भक्तीचा उदंड पीक दिसता माका… आता तर काय तालुक्याचा राजा म्हणून माका प्रसिद्धी दिलीय तुम्ही…चौसष्ट कलांचा अधिपती मी म्हणून माझ्यासमोर तुम्ही तुमच्यातली ता हिडीस कला माका दाखवू नका… आमच्या कडच्या रंभा उर्वशी नि मेनका या मदनाच्या अप्सरा पन आपली कलेची मानमर्यादा राखून इंद्र दरबारात नृत्याचे पदन्यास दाखवतात.. नटराजाला प्रसन्न करून घेततं.. नाहीतर तुमचा कोन तो नटराजन बाईलवेडा पिसाटल्या सारखा रूपये उधळत राहतो… चांगले कार्यक्रम काय तुमच्या लोकांना बघायला आवडूक नाय का… गाणं, प्रवचन, किर्तन, नाटक, चर्चा,परिसंवाद ह्या तुम्ही ऐकलेला पाहिलेला नसेल ना… जरा याची एकदा झलक बघून घ्या… ता तुमच्या कडेचा दशावतार, दह्यकालो, सोंगाचा, भारूड ह्या तर कुठे रद्दी टाकलान तुम्ही… माका तसला आवडता रे… ता तुम्ही एक टाईम करा रे… गावातले कलाकार जरा प्रकाशात आले तर त्येंचा नशिब का नाही फळायचा…
… आला का रे गावाचा मंडप.. बराच लांबचा प्रवास झाला म्हणायचा.. तरी बरा आतल्या रस्याने आणलंस ता हायवेवर नं आलो असता तर ट्रफीक मधेच अडकान गेलो असतो… मग या वर्षी ची काय चतुर्थी मिळाली नसती पुढच्या चतुर्थी पर्यंत पोहचलो असतो कि नाय कोणास ठावं… ते कोकणातले रस्ते खड्डे मुक्त बांधायची बुद्धी तर मी कंत्राटदारांना कधीची दिली होती.. पण त्येंच्या बुद्धीत स्वार्थाचा नि भ्रष्टाचाराचा कलीचा व्हायरस पुढे मी मात्र शरण गेलो बाबानु… आता त्येच्यावर एकच उपाय असा आमच्या पिताजीनी म्हणजे महादेवानी तांडवनृत्य करान तिसरो डोळो उघडान त्या रस्त्या बांधणाऱ्या सगळ्या ठेकेदारांका भस्मिभूत करून टाकतले तेव्हा कुठे पुढे भविष्यात रस्त्याची समस्या संपून जाईल… तोवर तुझो नि माझो ह्यो वनवास सुटना नाय…
चल आता लेझीम वाले आणि ढोल ताशे वाले वाजाक लागलेले दिसता… हळूहळू आता मंडपाजवळ घेऊन जाशील रे माका… हि सर्विस मनापासून दिल्याबद्दल तुका पुढच्या चतुर्थी पर्यंत आनि दोन चार टेम्पो मालकीचे होतील असा आर्शिवाद देतयं… नि माका विसर्जनाच्या वेळी तूच येशील रे बाबा… आता पहिल्या दिवशी आपली चांगली दोस्ती कशी जमान गेली हा…आणि माका कसा न्यायचा याची तुका आयडिया असा.. तेवा तेव्हढा कर माझ्यासाठी…. तुझो मी चांगला भला करतलो… ता जुन्या जमान्यातील घासून गुळगुळीत झालेली गणपती बाप्पा मोरया घोषणा करू नका.. तर ता डिजिटल जमान्यातील
चायना हो या कोरिया… गणपती बाप्पा मोरया ह्या नवी गर्जना व्हयी…
☆ मराठी शुद्ध बोलतांना ऐकून आपल्याला आश्चर्य का वाटते? ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अलीकडे विद्यानंद बापट नामक एका सर्वसामान्य पुणेकराचे अस्खलित, स्पष्ट आणि समृद्ध मराठी महाराष्ट्राने ऐकले आणि अनेकांना आश्चर्य वाटले.
“इतकं शुद्ध मराठी आजही कोणी बोलतं?”
मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे कौतुक केले. माध्यमांत त्याची चर्चा झाली. काहींनी तर त्या भाषेची टवाळी करणारी रिळेही प्रसारित केली.
टवाळा आवडे विनोद!
पण या प्रसंगाने विनोदापेक्षा मोठा प्रश्न उभा केला—
शुद्ध मराठी ऐकून आपल्याला आश्चर्य का वाटते?
बापट एकटे नाहीत. पुण्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उत्तम मराठी बोलणारे असंख्य लोक आहेत. प्रश्न त्यांच्या संख्येचा नाही. प्रश्न आहे तो अशा भाषिक परंपरेचा वारसा आपण पुढे नेतो आहोत की गमावतो आहोत, हा.
भाषा केवळ शब्दांचे साधन नाही. ती संस्कृतीची स्मृती आहे. विचारांची वाहिनी आहे. एका पिढीचा अनुभव दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविणारा सेतू आहे.
म्हणून भाषेची उपेक्षा ही केवळ भाषेची उपेक्षा राहत नाही.
हा प्रयत्न नवा नाही
मराठी शुद्ध, समर्थ आणि स्वाभिमानी व्हावी, यासाठीचे प्रयत्न आजचे नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राजव्यवहारकोश निर्माण झाला. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह अत्यंत प्रखरपणे धरला. त्यांच्या प्रयत्नांची प्रारंभी टवाळी झाली; पण कालांतराने त्यांच्या प्रयत्नांतून रूढ झालेले अनेक शब्द व्यवहाराचा भाग झाले.
इतिहास एक गोष्ट शिकवतो—
आज अपरिचित वाटणारा शब्द उद्या आपलासा होऊ शकतो; आज टवाळीचा विषय ठरलेला आग्रह उद्या भाषेच्या संवर्धनाचा पाया ठरू शकतो.
म्हणून भाषेचा विचार केवळ आजच्या सोयीने करता येत नाही.
‘चालते’ पुरेसे आहे का?
आजच्या भ्रमणध्वनी-संदेशसंस्कृतीने एक नवी सवय लावली आहे—
आतपुढे म्हणजे – –
आले तसे पुढे पाठवायचे.
स्वलिखित असो वा अग्रेषित—शब्ददोष, व्याकरणदोष, सदोष वाक्यरचना, चुकीचे शब्दप्रयोग आणि विरामचिन्हांकडे झालेले दुर्लक्ष सहज दिसते.
‘कळतंय ना काय म्हणायचंय ते, मग झालं!’
‘काय फरक पडतो?’
‘चालते!’
हीच तर अडचण आहे.
चूक वारंवार दिसली की ती रूढ होते; आणि रूढ झालेले आपण योग्य समजू लागतो. हेच पहा ना, व्यक्ती हा स्रिलिंगी शब्द पण सध्या ‘ तो व्यक्ती ‘ असंच म्हणू लागले आहेत लोक.
शुद्ध म्हणजे कठीण नव्हे
शुद्ध भाषा म्हणजे अवघड भाषा नव्हे. संस्कृतप्रचुर शब्दांची गर्दी करणे म्हणजे भाषाप्रभुत्व नव्हे. दुर्बोध शब्द वापरणे म्हणजे भाषाशुद्धी नव्हे.
शुद्ध भाषा म्हणजे व्याकरणसम्मत, अर्थ स्पष्ट करणारी, प्रसंगानुरूप, नेमकी आणि सहज आकलन होणारी भाषा.
भाषा साधी असावी; पण अशुद्ध नसावी.
भाषा सहज असावी; पण सवंग, निष्काळजी नसावी.
सहजता आणि निष्काळजीपणा यांत भेद आहे.
लेखकाचे दायित्व
आपण जे लिखाण इतरांच्या वाचनासाठी पाठवतो, त्यात वाचकाचा वेळ आणि श्रम गुंतलेले असतात.
म्हणून लेख पाठवण्यापूर्वी तो एकदा नीट वाचणे, शब्द तपासणे, वाक्यरचना पाहणे, विरामचिन्हे लावणे—हे लेखकाचे कर्तव्यच नव्हे तर वाचकाप्रतीचे दायित्व आहे.
वाचकाने आपल्या लेखाचा अर्थ लावण्यासाठी श्रम करू नयेत; अर्थ स्पष्ट करण्याचे श्रम लेखकाने घ्यावेत.
भाषा आणि विचार
भाषा केवळ विचार व्यक्त करत नाही; ती विचारांना आकारही देते.
शब्द नेमके असतील तर विचार नेमका होतो. वाक्यरचना स्पष्ट असेल तर विचारांची मांडणी स्पष्ट होते.
म्हणून भाषेची शिस्त ही केवळ व्याकरणाची शिस्त नाही.
ती विचारांचीही शिस्त आहे.
परभाषिक शब्दांचा प्रश्न
मराठी अनेक भाषांच्या सहवासातून समृद्ध झाली आहे. त्यामुळे प्रत्येक परभाषिक शब्द अशुद्ध आहे, असे म्हणणे योग्य नाही.
प्रश्न आहे तो अनावश्यक परावलंबित्वाचा.
जिथे मराठीत नेमका, रूढ आणि अर्थवाही शब्द उपलब्ध आहे, तिथे केवळ सवयीने परभाषिक शब्द योजण्याची आवश्यकता काय?
आणि जिथे पर्यायी शब्द नाही, तिथे नवा शब्द निर्माण करण्याची क्षमता आपल्या भाषेत नाही का?
भाषाप्रेम म्हणजे परभाषाद्वेष नव्हे; स्वभाषासामर्थ्याची जाणीव होय.
भाषा जपायची की जगवायची?
भाषा काचेच्या पेटीत ठेवून जपायची नसते.
भाषा वापरली की जगते.
नेमकी वापरली की समृद्ध होते.
नव्या अनुभवांना सामावून घेतली की विकसित होते.
नवे विज्ञान, नवे तंत्रज्ञान, नवे व्यवहार, नवे विचार—या सर्वांसाठी नवे शब्द लागतील. ते निर्माण करण्याचे दायित्व आपलेच.
वाचन : भाषेची मुळाक्षरे
शब्दसंपदा एका दिवसात निर्माण होत नाही.
वाचनातून शब्द भेटतात. उत्तम वक्त्यांचे बोलणे ऐकण्यातून वाक्यरचना मनात साठते. चांगले साहित्य वाचल्याने भाषेची लय, अर्थछटा आणि अभिव्यक्ती समृद्ध होते.
म्हणून भाषाशुद्धीचा आरंभ केवळ व्याकरणाच्या पुस्तकापासून होत नाही.
तो वाचनापासूनही होतो.
वाचनाला पर्याय नाही.
विद्यानंद बापट यांच्या भाषेच्या संदर्भात त्यांच्या वाचनाच्या सवयीचा उल्लेखही पुढे आला आहे.
उद्याची मराठी कोणती?
आज प्रश्न असा नाही की मराठी टिकेल का.
मराठीची परंपरा विशाल आहे. ती टिकेल.
खरा प्रश्न आहे—
आपण पुढच्या पिढीला कोणती मराठी देणार?
शब्दसंपन्न?
नेमकी?
सुसंस्कृत?
अस्खलित?
की स्वतःचे समर्थ शब्द असूनही त्यांचा उपयोग करण्याचे कष्ट न घेणारी?
उत्तर आपल्या रोजच्या वापरातूनच ठरणार आहे.
श्रीगणेशा कुठून?
दुसऱ्याच्या चुका शोधण्यापासून नव्हे.
स्वतःपासून.
एक शब्द योग्य लिहिणे.
एक वाक्य नीट रचणे.
एक अनावश्यक परभाषिक शब्द टाळणे.
पाठवण्यापूर्वी आपले लिखाण पुन्हा वाचणे.
इतके केले तरी आरंभ झाला.
भाषेचा स्तर एखादी व्यक्ती एकटी ठरवत नाही.
लक्षावधी सामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारातून भाषेचा स्तर घडत असतो.
म्हणूनच भाषेचे भवितव्य आपल्या हातात आहे.
आज शुद्ध मराठी ऐकून आपल्याला आश्चर्य वाटले.
उद्या असे मराठी ऐकून आश्चर्य वाटू नये.
शुद्ध मराठी बोलणारा माणूस विशेष वाटू नये;
शुद्ध मराठी बोलणेच स्वाभाविक वाटावे.
ही अपेक्षा अवास्तव नाही.
त्यासाठी इच्छा हवी.
हव्यास हवा.
वाचन हवे.
भाषाज्ञान हवे.
शब्दसंपदा हवी.
विवेक हवा.
आणि सर्वांत महत्त्वाचे—
स्वतःपासून आरंभ करण्याची सिद्धता हवी, संकल्प हवा!
व्याकरणातील ऱ्हस्व–दीर्घ, ‘न’–‘ण’, ‘स’–‘श’–‘ष’, लिंग, वचन, विभक्ती, काळ, शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार आणि शब्दसंग्रह यांसारख्या विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलता येईल.
पण त्यापूर्वी एक गोष्ट मनात रुजली पाहिजे—
आपली भाषा शुद्ध असावी, अशी इच्छा.
कारण भाषाशुद्धी ही दुसऱ्याला सुधारण्यापासून नव्हे, स्वतःला सुधारण्यापासून सुरू होते.
२०२० सालची ही गोष्ट. इंस्पेक्टर सूर्यकांत भोसले नुकतेच दौंड पोलिस स्टेशनला बदलून आले होते आणि ही करोनाची धावपळ चालू झाली. कडक शिस्तीचा माणूस, कायद्याच्या जरा विरूध्द गेलं की यांच्या मस्तकावरची शीर थड थड उडायला लागायची.
आज सर स्वत: round ला निघाले होते. कोणी ना कोणी तरी दुकान उघडं ठेवायचा, किंवा उगाच जमावबंदी कशी असते ते बघायला बाहेर पडायचा. असं कोणी सरांच्या तावडीत सापडलं की त्याची खैर नसायची.
आजही तसंच झालं, पाटस गावाला हमरस्त्यावर एका टपरीवजा घराचं शटर अर्धं वर ठेवलेले दिसले. सरांनी जीप साईडला घ्यायला सांगितली आणि जीप थांबायच्या आतच चालत्या जीपमधून उतरून लांब ढेंगा टाकत सर त्या शटरपर्यंत पोचले देखील. आत बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी वगैरेचं छोटंसं दुकान होतं.
swagger stick ने शटरवर खट खट करत सरांनी घुश्यातच विचारलं – कोण आहे रे इकडे आणि हे शटर का उघडं ठेवलंय? दुकानं बंद ठेवायची आहेत माहित नाही का?
एक सत्तर – पंच्याहत्तर वर्षाची आजी भिंतीचा आधार घेत घेत बाहेर आली – लेकरा, दुकान नाही उघडं ठेवलेलं. म्हाताऱ्याची उन्हानं काहिली होत होती, मधुनच झुळूक आली की जीवाला थंड वाटायचं म्हणून ठेवलं शटर उघडं थोडा वेळ. तू म्हणतोस तर बाबा करते बंद.
म्हातारीला बघून सरांचा राग निवळला होता. बरं, बरं. बाकी घरात कोण असतं? बोलता बोलता सरांनी घराबाहेरच बुट काढले व देवाला नमस्कार करण्याच्या बहाण्याने घरात एक चक्कर मारून आले. परिस्थिती बेताचीच होती. जेमतेम एक वेळचं जेवण होईल इतपतच शिधा होता.
“लेक पुण्यात हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सुट्टीला घरी यायची, तेव्हा थोडे पैसे घेऊन यायची पण आता या साथीच्या रोगाने तिला रजा मिळत नाही. एरवी या बांगड्या विकून दोन पैसे सुटायचे, पण आता तर दुकानही बंदच आही आणि कोणी गिऱ्हाईक येतही नाही. “
“पण मग पैश्या पाण्याचं, डाळ तांदूळाचं काय? “
” लेकरा, सगळं बेस आहे बघं आणि आम्ही आहोत माळकरी – वारकरी, माऊली या ना त्या रुपाने पाठीशी उभी रहातेच. “
काही न बोलता सर बाहेर आले, माने हवालदारांना त्या आजींचा पत्ता टिपून घ्यायला सांगितला आणि सरकारी योजनेनुसार मिळणारा महिन्याचा शिधा संध्याकाळच्या आत आजीकडे पोचवायला सांगितले. “आणि हो, ” स्वतःच्या पाकिटातून २००० ची नोट काढून हवालदाराच्या हातावर ठेवत सर पुढे म्हणाले, “हेही त्या आजीला दे. मी दिलेत म्हणून सांगून नकोस. “
दुसऱ्या दिवशी मुद्दाम सर त्या आजीकडे गेले. आजी जणू सरांची वाटच बघत होती.
“आलास लेकरा, ये ये. ” समोर मोठा साहेब उभा आहे याची जराही भीती न वाटता आपल्या सहज सुलभ साधेपणाने बोलत होती. “काल तू विचारलंस ना जेवणाखाण्याची सोय काय म्हणून? काल जेमतेमच शिधा उरला होता. मी विठू माऊलीला साकडं घातलं होतं – माझ्या म्हाताऱ्याला उपाशी ठेवू नकोस म्हणून. आणि देव हाकेला धावला बघ. कुठल्याशा सरकारी ऑफिसातून एक माणूस आला आणि महिन्याचं राशन घरात भरून गेला. त्याच्या रुपानं काल प्रत्यक्ष विठू माऊलीच घरी येऊन गेली बघ. “
आजी बोलत होत्या. तिला थांबवून आजोबा बोलू लागले, “पोरा, त्या बाबाने हे दोन हजार रुपयेही दिलेत खर्चापाण्याला. पण आम्हाला आता कशाला लागतात हे पैसे? राशन भरलंय, बाकीचा तर खर्च काही नाही. तू हे पैसे घे आणि कोणा गरजू गरीब माणसाला देऊन टाक. त्याला अडीअडचणीला उपयोगी पडतील. आणि लागली आम्हाला गरज, तर तो विठूराया आहेच की मदत करायला. “
त्या आजी आजोबांच्या जगण्याच्या साध्या सोप्या तत्वज्ञानाला सरांकडे उत्तर नव्हतं. त्यांनी निमुटपणे ते दोन हजार रुपये परत घेतले आणि गाडीत बसता बसता माने हवालदारांना म्हणाले – “इतकी निर्मळ श्रद्धाळू माणसं! खरंच, यांच्या रुपाने, अजि म्या देव पाहिला. “
रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते, पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री नऊचा होता. संध्याकाळी सातनंतर आवरायला घेतलं,
एवढय़ात दार वाजलं. आत्ता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानेच मी दार उघडलं. एक पासष्टीच्या काकू उभ्या होत्या.
धनश्री लेले तुम्हीच ना?
मी म्हटलं, हो. या ना आत.
त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. दोन हातांत दोन मोठय़ा पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं, ‘आवरायचं आहे, साडेसात पर्यंत थिएटरला पोहोचायचंय, आता किती वेळ जाणार आहे काय माहीत. ’
माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, अगं, तुझा वेळ नाही घेत. खरंतर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले.
छे छे बसा की. माझं होईल वेळेत आवरून. मी असं म्हटलं होतं खरं. पण या कोण काकू? आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे? हा पुढचा प्रश्न मनात उभा.
जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले.
इथेच असता का तुम्ही? मी विचारलं.
नाही इथे माझी मुलगा-मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू.. त्यांनी माहिती पुरवली. काकू तुम्ही शिक्षिका होतात का? असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं.
काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी काही टीव्हीवर वगैरे नसते त्यामुळे इतक्या आत भू पर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं? अगदी सहज ओघात विचारलं.
अगं, मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता, ते पुस्तक वाचलं होतं. आम्ही टिव्ही नाही गं जास्त बघत. हां पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली नि आले.
अहो, पण एवढय़ा पावसात? ’
अगं, पावसाचं काय? आमच्या कोकणाचा जावईच तो. पडायचाच. एस. टी. असते ना संध्याकाळची. मग निघाले. दीड-दोन तास लागतात भू गावातून यायला. काकू म्हणाल्या.
बसा, चहा सांगते तुम्हाला.
अगो छे, तुझं आवर तू.. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले. असं म्हणून काकूंनी त्या मोठय़ा दोन पिशव्या माझ्या हातात दिल्या.
काय आहे यात?
काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार? पानाची डावी बाजू आहे. , काकू म्हणाल्या.
म्हणजे? मी चक्रावून विचारलं.
अगं, त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस. घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं. सांडगी मिरच्या, मेतकूट, दोन-तीन प्रकारचे मुरंबे, दोन-तीन प्रकारच्या कोरडय़ा चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आलीय.
थोडं थोडं? बाप रे. मला पिशव्या उचलवत नव्हत्या. आणि या काकू एस. टी. ने पावसात एवढय़ा जड पिशव्या घेऊन आल्या.
अगं, डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना. पोळीशी काय? हा प्रश्न राहत नाही. तूही रात्री यायला उशीरबिशीर झाला तर पोळी बरोबर हे खा हो.
भरल्या डोळ्यांनी, नि:शब्द होऊन मी एकदा काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी होते. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली.
कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वत:ला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढय़ा लांब आल्या त्या? काय बोलू?
शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही.. ‘धन्यवाद.. थॅंक्यू.. ’ या शब्दांना इथे काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता. निर्व्याज.. खरंच निर्व्याज.. काय मिळवायचं होतं त्यांना?
जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, बघतील त्याचं ते.. अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना. गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली?
खरंच, माझा काय फायदा? मला काय मिळणार आहे? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी.. त्यात ही ‘श्रवण केलियाने काय प्राप्त’ असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थानीही केला. फायद्याशिवाय जन नाही.
पण इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती. जिचा आपल्याशी दूरान्वयेही संबंध नाही तिचा एवढा विचार करून, तिला आपण थोडं तरी सहकार्य करू या. हा असा विचार म्हणजे रामराज्यच.
आपण या गोष्टीला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारे ही कुणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढय़ा पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो.. सबसे तेज.. व्हॉट्स अपवर अपलोड करून व्हर्चूअल अश्रू गाळणारे आपण असं कुणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय. असं म्हणून मोकळं होतो.
मनात विचार आला हे असं निर्व्याज वागायला कधी तरी जमणार आहे कां आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो. झाडं स्वत:ची फळं स्वत: खात नाही. नदी स्वत:चं पाणी स्वत: पीत नाही, गाई स्वत:चं दूध स्वत: पीत नाहीत. आठवीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता.
कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ‘ऐंशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती’ लाभाविण प्रीती. बाप रे. कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात.
पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो. म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन. काकूंच्या बोलण्याने मी भानावर आले. आणि यातलं काही संपलं आवडलं तर नि:संकोच सांग. पाठवून देईन मुंबईस.
मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या ओंजळी समर्थ नाहीत हो.
तुझमे कोई कमी नही,
मेरी ही झोली तंग है’..
काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजाने सगळा आसमंत उजळून निघावा. तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या ‘मी, माझा’च्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं. खूप कठीण.
लेखिका : सुश्री धनश्री लेले
संग्राहिका / प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गुरुजींनी एका एका व्यक्तीचे नाव घ्यायला सांगितले आणि मला तिचे नावच आठवेना! दरवर्षी पितृपक्षात आई-वडिलांच्या श्राद्धादिवशी तर्पण विधी करायला गुरुजी घरी येतात. तर्पण विधीचा लाभ अन्य पितरांनाही मिळावा म्हणून गुरुजी दिवंगत झालेल्या माझ्या सर्वच नातलगांच्या आणि अगदी मित्रांच्याही नावाने तर्पण करायला सांगतात… या निमित्ताने आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपल्याआधी निघून गेलेली माणसं अगदी समोर येऊन उभी राहतात! अकाली गेलेली तर खूपच स्पष्टपणे दिसतात मनाच्या डोळ्यांसमोर!
तिचं नावच माहीत करून घेण्याचा कधी संबंधच आला नाही, जरुरीही नव्हती. तिच्या गावाच्या नावावरून अमुक अमुक वाली मावशी.. एवढंच लक्षात होतं कारण आजीही तिचा उल्लेख तसाच तर करायची.
त्याचं कारणही तसंच असावं. आज्जीला झालेल्या चार मुलींमध्ये ती थोरली. दोन मुलगे झाले होते आज्जीला पण ते अकालीच निवर्तले. त्यामुळे या काय किंवा आमच्या कोणत्याही मावशीला, आईला माहेर असं नव्हतंच. त्यात या मोठीचं लग्न त्या काळातील पद्धतीने रीतीनुसार तिच्या वयाच्या दहाव्या वर्षीच उरकून टाकलं गेलं होतं! आजोबांनी त्यांच्या पसंतीने मुलगा पाहिला आणि तिला उजवून टाकली. कारण तिच्या पाठच्या आणखी तिघी होत्या. मुलगा असता तर त्याने कमवायला लागल्यावर बहिणींच्या लग्नात हातभार लावला असता. म्हणून आजोबांनी घाई केली होती. तिच्या पाठच्या दोघींची लग्नं तर आजोबा चक्क शिकारीला जंगलात गेलेले असताना, अमावास्येच्या रात्री घनदाट अरण्यात सावजाची वाट पहात बसलेले असताना शिकारीसाठी सोबत आलेल्या हौशी गावक-यांच्या मुलांशी ठरवूनही टाकली! मुलांनी मुलीला पाहण्याचा किंवा मुलीने मुलाला पाहण्याचा, दाखवण्याचा प्रश्नच नव्हता. घराणी, खानदान आणि पाटीलकी-देशमुखी जुळली म्हणजे झालं! नाही म्हणायला एका मावशीचं लग्न मात्र तिला आवडेल असं झालं!
पण या अरण्यात लग्न ठरलेल्या दोघींच्या लग्नाला थोरली मावशी येऊच शकली नव्हती. तिच्या लग्नात काहीतरी उणं पडलं होतं म्हणून तिच्या सासरचे आणि आजोबा यांच्यात काही शब्द दोन शब्दांची देवाणघेवाण झाली असावी… तिचं माहेर दूर राहिलं. त्यात तिचं गाव त्यावेळी आडवळणी आणि काकांचा स्वभाव अगदी कडक. नोकरीच्या ठिकाणी वाघ असणारे काका घरातही अत्यंत आक्रमकपणे वागत… जवळजवळ सर्वांशीच. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग तसा कमीच यायचा. आणि तिच्या कडे जाणे-येणेही तसे फार उशिरा सुरु झाले सर्वांचे. काका वारल्यानंतर सासर आणि माहेर जवळ आलं होतं पण तोवर उशीर झाला होता. संसाराने हातपाय पसरले होते. अगदी लहानपणापासून वाणीवर, मनावर, विचारांवर झालेले संस्कार घट्ट झाले होते आणि स्वभावात एकाच वेळी प्रेम, जिव्हाळा तर कधी तात्पुरता दिसणारा कडवटपणा दिसायचा. इतक्या लहानपणी लग्न करून दिल्याचा राग ती कधीकधी व्यक्त करी. पण आज्जी तिच्या पोरांना जीव लावी, गरज पडली तर तिच्या संसाराला एखादा आणा पुरवी… तिच्यात त्या दोघीही खुश होत्या. मावशीच्या पोराने या जगाचा लवकरच निरोप घेतला. आर्थिक तंगी होतीच आणि शेकडो प्रापंचिक विवंचना ज्या बाईच्या जातीला त्याकाळी तर खूपच असायच्या… पण दिवस निघून जात होते. तिचं तसं आमच्याकडे फारदा जाणं-येणं झालं नाही. आणि तिला माहेरी येण्यासाठी फारशी कारणेही उरली नाहीत… तिचे वडील आधी आणि नंतर आईने यथावकाश राम म्हटले होते.
तिची धाकटी बहिण वारली तेंव्हा तिचा मूक शोक पाहिला तेंव्हा समजलं की एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलींची एकमेकींशी किती घट्ट वीण बांधलेली असते! आता माझी आई आणि या तीन मावश्या देवाघरी गेलेल्या आहेत. आई मरो आणि मावशी जगो.. असं म्हणायची सोय नाही राहिली आता. आईच्या आगेमागे एक एक करीत तिघीही गेल्या.
तिचं नाव मात्र कधी विचारायचा प्रसंग आला नाही. आणि ते सांगू शकतील अशी माणसंही राहिली नव्हती. तिच्या पोरांना, सुनांना, नातवांना विचारायचं राहून जायचं प्रत्येकवेळी.
तर्पणाच्या वेली दरवर्षी कुणाचे ना कुणाचे तरी नाव विसरून राहते सांगायचे. नाव माहीत नाही म्हणून गंगाबाई, भागीरथीबाई अशी नावे सांगून वेळ मारून न्यावी लागते, आणि तशी सोयही अआहे शास्त्रात. गोत्र माहीत नसेल, आठवत नसेल तर कश्यप गोत्र सांगता येतं. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेच… केवळ भावना मात्र अस्सल असल्या म्हणजे झालं!
म्हणून मी यादीच लिहून काढली गेलेल्या सर्वांची. ती सर्वच माणसं या दिवसाची वाट पहात असतील, असं वाटून गेलं. कुणी काहीही म्हणो, आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्या पितरांचे स्मरण व्हावे, त्यांना पुढची उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून नेमून दिलेला हा संस्कार मोलाचा वाटतो. मृत्यूनंतर पुढे काय? या प्रश्नाची उत्तरे भिन्न मिळतात. मिळालेली उत्तरे बुद्धीच्या कसोटीवर उतरतीलच असं नाही. पण या विधीतून मिळणारे मानसिक, आत्मिक समाधान, नात्यांची होणारी उजळणी, आपल्याही मृत्यूचे स्मरण या जमेच्या बाजुच असतात.. अर्थात जो मानील त्याच्यासाठीच. आणि विधींवर किती खर्च करावा याचाही निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो… दोन फुलं आणि लोटीभर पाणी याला किती पैसे लागतात. अवडंबर न करताही धर्माचं, परंपरेचे पालन करता येते आणि हे सर्व आपल्या मागे येणा-या पिढ्या बघत असतात.
शेवटी मावशीचं नाव कुणाकडून तरी समजलं… हिरा! हिराबाई. नाव तर साजेसं पण हा हिरा काळाच्या मातीत आता गडप झाला आहे. आता तिचं नाव तर्पणावेळी विसरलं जाणार नाही… कधी विसरलं जाऊही नये!
मागे उरलेल्यांना पुढे गेलेल्यांच्या आत्म्यांसाठी करता येईल, अशी ही एकमेव गोष्ट असावी! ही देणगी देऊन गेलेल्या आपल्या पूर्वजांचे आभार मानावेत तेवढे कमीच असतील.
आपल्या देशात अलीकडे दुचाकीस्वारांची एक नवीन जमात उदयाला आली आहे. तिचे नाव आहे ‘वाकडमाने’! या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे दुचाकी चालवताना यांची मान कायम एका बाजूला कललेली असते. खांदा आणि कान यांच्या मध्ये भ्रमणध्वनी अडकवून हे महाभाग भरधाव वेगाने गाडी चालवत असतात. जणू काही देशाची अर्थव्यवस्था यांच्या खांद्यावरच उभी आहे! यांनी दोन मिनिटे गाडी बाजूला घेऊन संभाषण केले तर शेअर बाजार कोसळणार, आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होणार आणि देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न काही लाख कोटींनी घटणार! त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून प्रत्येक मिनिट वाचवण्याचे महान राष्ट्रीय कर्तव्य हे वाकडमाने अत्यंत निष्ठेने पार पाडत असतात.
या वाकडमान्यांची कार्यक्षमता पाहून मोठमोठ्या उद्योगपतींनाही न्यूनगंड निर्माण व्हावा! एकाच वेळी गाडीचा वेग सांभाळायचा, वाहतुकीतून मार्ग काढायचा, समोरच्या वाहनांवर लक्ष ठेवायचे आणि भ्रमणध्वनीवर अखंड बडबडही करायची! एवढी बहुविध कौशल्ये असलेली माणसे आपल्या देशात निर्माण होत असताना आपल्याला महासत्ता होण्यापासून कोण रोखू शकते? अर्थात, या महान कार्यात कधीतरी एखादा पादचारी, सायकलस्वार किंवा दुसरा दुचाकीस्वार आडवा आला आणि अपघात झाला तर त्याला या राष्ट्रीय प्रगतीसाठी दिलेले किरकोळ बलिदान समजावे!
या प्रकारामागे एक विलक्षण मानसिकता कार्यरत असते. आपल्याला आलेला प्रत्येक दूरध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तत्काळ स्वीकारला नाही तर जगबुडी होईल, असा या मंडळींचा ठाम समज असतो. वास्तविक, त्यांच्यापैकी अनेकांचे संभाषण ऐकले तर ते ‘कुठे आहेस? ’, ‘काय करतोयस? ’, ‘मी येतोय! ’, ‘मग काय झालं?’ अशा जागतिक महत्त्वाच्या विषयांवर चाललेले असते. विशेष म्हणजे, ‘मी गाडीवर आहे, थोड्या वेळाने बोलतो’, एवढे सांगून संभाषण संपवण्याची कल्पनाही त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेला सुचत नाही. कारण त्यासाठी गाडी थांबवावी लागेल आणि आयुष्यातील दोन अमूल्य मिनिटे वाया जातील!
यामागे वेळेच्या नियोजनापेक्षा स्वतःविषयीचा फाजील आत्मविश्वास अधिक दिसतो. सतत उपलब्ध असणे म्हणजे आपण अत्यंत कार्यक्षम आणि व्यस्त आहोत, अशी एक आधुनिक समजूत निर्माण झाली आहे. आजच्या काळात हातात भ्रमणध्वनी, कानाला यंत्र आणि चेहऱ्यावर प्रचंड व्यस्ततेचे भाव असले की माणूस आपोआप महत्त्वाचा ठरतो! मग आपण कोणाशी बोलतो आहोत, कशासाठी बोलतो आहोत आणि त्या संभाषणाची तातडी किती आहे, हे प्रश्न गौण ठरतात. आपल्याला दूरध्वनी आला म्हणजे तो उचललाच पाहिजे, या मानसिक गुलामगिरीलाच आपण आधुनिक जीवनशैली समजू लागलो आहोत.
यातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे या वाकडमान्यांना स्वतःच्या जीवाइतकीच इतरांच्या जीवाचीही किंमत नसते. मान वाकडी करून गाडी चालवताना वाहनावरील नियंत्रण कमी होऊ शकते. संभाषणात गुंतल्यामुळे रस्त्यावरील अचानक बदलणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची क्षमता घटते. समोरून येणारे वाहन, रस्ता ओलांडणारे मूल किंवा अचानक थांबलेली गाडी यांचा वेळीच अंदाज घेण्यात चूक होऊ शकते. आपण कितीही कुशल चालक असलो तरी मानवी मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात. भ्रमणध्वनी हातात न धरता बोलल्यानेही संभाषणामुळे होणारे लक्ष विचलित होणे टळत नाही. विज्ञानाचे हे साधे वास्तव मान्य केले तर आपल्या वाकडमान्यांच्या असामान्य कर्तृत्वाचे काय होणार?
विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर याच मंडळींच्या नातेवाइकांकडून ‘नशिबातच होते’, ‘देवाची इच्छा’ किंवा ‘काळ आला होता’ अशी तात्त्विक विधाने ऐकायला मिळण्याची शक्यता असते. मात्र अपघातापूर्वी गाडी थांबवून बोलण्याचा विवेक वापरला असता तर कदाचित हा तथाकथित काळ पुढे ढकलता आला असता, याचा विचार फारसा होत नाही. स्वतःच्या निष्काळजीपणाची जबाबदारी नशिबावर ढकलण्याची आपली सामाजिक परंपरा तशीही फार प्राचीन आहे!
खरे तर हा प्रश्न एका दुचाकीस्वाराच्या बेशिस्तीपुरता मर्यादित नाही. ते आपल्या सार्वजनिक जीवनातील जबाबदारीच्या अभावाचे लक्षण आहे. स्वतःची घाई, स्वतःचे काम आणि स्वतःचे संभाषण यापुढे इतरांच्या सुरक्षिततेला दुय्यम स्थान देण्याची प्रवृत्ती त्यामागे आहे. वाहतुकीचे नियम हे पोलिसांनी दंड वसूल करण्यासाठी तयार केलेले अडथळे नसून प्रत्येकाच्या जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे, एवढी साधी जाणीवही अनेकांच्या वर्तनात दिसत नाही.
या वाकडमान्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात घ्यावी. दोन मिनिटे वाचवण्याच्या नादात आयुष्याची उरलेली अनेक वर्षे गमावण्याचा धोका ते पत्करत असतात. त्यांना स्वतःच्या आयुष्याशी जुगार खेळण्याची हौस असेलही; पण रस्त्यावरील निरपराध माणसांच्या आयुष्यावर घाला घालण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही. अखेर प्रश्न एवढाच आहे की, ज्या संभाषणासाठी दोन मिनिटे थांबण्याची सवड नाही, त्या संभाषणाचे मोल स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवापेक्षाही अधिक आहे काय? वाकडमान्यांना याचे उत्तर शोधण्यासाठी फार मोठे तत्त्वज्ञानी असण्याची आवश्यकता नाही. फक्त एकदा गाडी बाजूला घेऊन सरळ मान करून विचार केला तरी पुरेसे आहे!
मान वाकडी करून भ्रमणध्वनीवर बोलणे ही आधुनिकतेची खूण नसून विवेकाला दिलेली सोडचिठ्ठी आहे, हे त्यातून खूब समजून असावे. त्यांना या विवेकाचे भान राहिले नाही, तर एखाद्या दिवशी त्यांना मान सरळ करण्याची संधीही मिळणार नाही! आणि मग त्यांच्यासाठी खरीच जगबुडी झालेली असेल!
☆ “मिलॉर्ड…” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
“मेरे फाजील दोस्त की दलीले बिलकुल बेबुनियाद हैं.”
(हिंदी सिनेमातील प्रतिस्पर्धी वकीलाला “फाजील” विशेषण लावलेलं मला फार भारी वाटायचं. प्रत्यक्षात आमचे मित्र खरोखरच फाजील आहेत,
हा केवळ योगायोग नाही.
दलीलें, बेबुनियाद हे शब्द दहावीपर्यंत कुठल्याही धड्यात नव्हते, तरी अर्थ माहीत होता).
मेरे मुवक्कील के खिलाफ ये गहरी साजिश हैं.
(काळा कोट घालतो तो वकील आणि पिंजऱ्यात असतो तो मुवक्कील….. असा मराठीभाषिक हिंदी समज झाला होता.)
मै कोर्ट से दरख्वास्त करता हू की इन्हे जल्द से जल्द बाईज्जत बरी किया जाए.
(त्यावेळी श्री पाचखेडे सरांना या शब्दांचा अर्थ विचारायचा राहून गेला.)
शाळेपेक्षा, टॉकीज हीच आमची हिंदीची क्लासरूम होती.
“दरख्वास्त”चा अर्थ “बरखास्त” आहे यावर मी ठाम होतो.
“जल्दसेजल्द” हा एकच शब्द आहे.
“बाईज्जत” म्हणजे बा ची इज्जत,
हे सगळे चुकीचे अर्थ मनाने तयार केले होते, तरीही साधारण संदर्भाचा अर्थ तसाच असायचा.
फक्त ” बरी” या शब्दाने फार त्रास दिला.
आज्जी आजारी असताना “डॉक्टरसाब तुमको बरी कर देंगे” असं म्हणून मी आजोबांचा मार खाल्ला होता.
स”डॉक्टर तूला बरं करतील” यात मार खाण्यासारखं काय होतं.?
पण मार खाताना आजोबांचा “शुभ बोल नाऱ्या” हा डायलॉग चांगला लक्षात आहे.
पुढचा डायलॉग अक्षर आणि अक्षर लक्षात आहे.
पडद्यावरचा न्यायाधीश बोलायच्या अगोदर सगळे शब्द आणि वाक्यांचा सिक्वेन्स मनात तयार असायचा.
सारे गवाह और सबूतोंको मद्दे नजर रखते हुवे ये अदालत इस नतीजे पर पहोंची है की सुरेश का खून मिस्टर अशोक ने ही किया हैं.
लिहाजा ये कोर्ट मिस्टर अशोक को मुल्जिम करार देते हुवे,
ताजिराते हिंद दफा तिनसौ दो के तहत फांसी की सजा सुनाती हैं.
द कोर्ट इज एडजरंड.
माझे मानसिक युद्ध शेवटच्या शब्दापासून सुरू व्हायचे.
हिरोला फाशी दिली हे एकवेळ ठीक आहे. पण “एडजरंड” म्हणून इंग्लिश शिवी द्यायची काय गरज आहे?
तीन तास त्याने ईमान इतबारे नोकरी केली, गाजर का हलवा खाल्ला, चाय के बागान में मॅनेजर म्हणून काम केले. रोमान्स केला, गाणी गायली. तो खुनी नाही, हे अख्ख्या थिएटरला माहिती आहे.
जरा थोराड असला म्हणून काय झालं ?
तो “एडजरंड”….
मद्दे नजर चा संबंध मद्याशी नाही असं मी स्वतःला बजावून सांगायचो. न्यायाधीशांनी भानावर राहून हा निर्णय दिला आहे. हीदेखील सर्वांनी कायदेशीरपणे नोंद घ्यावी.
आणि ताजिरातेहिंद हा मंतरलेला ताविज मला शोधून देखील हिरो, हिरोईन, व्हिलन, मुकरी, फौजीचाचा, मॉं, जिगरी दोस्त, मुन्ना, फाजील वकील यांच्यापैकी कुणाच्याही गळ्यात दिसला नाही.
कुठल्या सिनेमात दिसला तर मला सांगा.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘माँ आज भी गाती है !‘। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # १६६ ☆
☆ लघुकथा – माँ आज भी गाती है ! ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
माँ बहुत अच्छा गाती है, अपने समय की रेडियो कलाकार भी रही है। पुरानी फिल्मों के गाने तो उसे बहुत पसंद हैं। भावुक होने के कारण हर गाने को इतना दिल से गाती कि कई बार गाते-गाते गला भर आता और आवाज भर्राने लगती। तब आँसुओं और लाल हुई नाक को धोती के पल्लू से पोंछकर हँसती हुई कहती- अब नहीं गाया जाएगा बेटा! दिल को छू जाते हैं गाने के कुछ बोल!
‘तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा’, ‘ऐ मेरे प्यारे वतन, ए मेरे उजड़े चमन’ जैसे गाने माँ हमेशा गुनगुनाती रहती थी। वह ब्रजप्रदेश की है इसलिए वहाँ के लोकगीत तो बहुत ही मीठे और जोशीले स्वर में गाती है। लंगुरिया, होरी और गाली (गीत) गाते समय उसका चेहरा देखने लायक होता था। माँ गोरी है और सुंदर भी, गाते समय चेहरा लाल हो जाता। लोकगीतों के साथ-साथ थोड़ी हँसी-ठिठोली तो ब्रजप्रदेश की पहचान है, वह भला उसे कैसे छोड़ती? जैसा लोकगीत हो, वैसे भाव उसके चेहरे पर दिखाई देने लगते।
हम अपने समधी को गारी न दैबे,
हमरे समधी का मुखड़ा छोटा,
मिर्जापुर का जैसा लोटा….
लोटा कहते-कहते तो माँ हँस- हँसकर लोटपोट हो जाती। ढ़ोलक की थाप इस गारी (गीत) में और रस भर देती थी।
उम्र के साथ माँ धीरे-धीरे कमजोर होने लगी है। कुछ कम दिखाई देने लगा है, थोड़ा भूलने लगी है लेकिन अब भी गाने का उतना ही शौक और आवाज में उतनी ही मिठास। हाँ पहले जैसा जोश अब नहीं दिखता। अक्सर माँ फोन पर मुझसे कहती – ‘बेटा ! संगीत मन को बडी तसल्ली देता है। कभी-कभार अपने को बहलाने के लिए भी गाना चाहिए। जीना तो है ही, तो खुश रहकर क्यों ना जिया जाए। इस जिंदादिल माँ की आवाज में उदासी मुझे फोन पर अब महसूस होने लगी थी
वह अपने दोनों बेटों के पास है। बहुएँ भी आ गयी हैं, अपने-अपने स्वभाव की। पिता जब तक जिंदा थे माँ अपना सुख-दुख उनसे बाँट लेती थी। उनकी मृत्यु के बाद वह बिल्कुल अकेली पड़ गयी। ‘नाम करेगा रौशन जग में मेरा राज-दुलारा’ गा-गाकर जिन बेटों को पाल-पोसकर बड़ा किया, उनकी बुराई करे भी तो कैसे? पर वह यह समझने लगी कि अब बेटों को उसकी जरूरत नहीं रही।
माँ उदास होती है तो छत पर बैठकर पुराने गाने गाती है। एक दिन माँ छत पर अकेली बैठी बड़ी तन्मयता से गा रही थी- ‘भगवान! दो घड़ी जरा इन्सान बन के देख, धरती पर चार दिन मेरा मेहमान बन के देख तुझको नहीं पता कोई कितना…’
‘निराश’ शब्द आँसुओं में डूब गया। गीत के बोल टूटकर बिखर रहे थे, या माँ का दिल, पता नहीं।