मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

.. आय ॲम समथिंग स्पेशल 

.. आय हॅव टॅलेंट… आय ॲम ग्रेट 

.. आय से थँक्यू फॉर द लाईफ 

.. आय ॲम एन्जॉईंग…!

 एका ऑपेरात ऐकलेलं आवडतं गाणं गुणगुणत लीना बाथरूममध्ये शिरली. शॉवर घेतल्यावर तिने टबभोवतीच्या स्टॅंडमधल्या रंगीत सुगंधी मेणबत्त्या लावल्या. सुवासिक फेसाने भरलेल्या टबमध्ये अलगद बसून तिने बाजूचा बुकस्टॅन्ड जवळ ओढला. सर्वांगाला गरम सुगंधी शेक घेत तिने बुक स्टॅंडवरच्या पुस्तकांवरून नजर फिरवून एक पुस्तक निवडण्याचा प्रयत्न केला. पण डोक्यात विचारांची गर्दी उसळली होती. अस्वस्थ मनाला दिलासा देण्याचा तिचा प्रयत्न सफल होत नव्हता. नीरज आणि एमिलीची वाढती सलगी तिच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. अमेरिकेतल्या गेल्या जवळजवळ वीस वर्षांच्या वास्तव्याने तिथल्या मनमुक्त स्वैर वातावरणाला ती सरावली होती. पण हे एमिली प्रकरण हाताबाहेर जातंय या भीतीने तिच्या मनात घर केलं होतं. बुडबुड्यांच्या आवाजाने तिचे विचार विचलित झाले.

टबमध्ये तरंगणारे, डुलणारे इंद्रधनुष्यी बुडबुडे न्याहाळताना तिचं मन खूप मागे, गावच्या शंकराच्या देवळ्यामागल्या तळ्यावर पोचलं. पाणी भरायला आलेल्या बायकांच्या घागरींमुळे तळ्यावर लहान- मोठे बुडबुडे नाचत होते. त्यात छोटासा दगड भिरकावत आपण शेजारी बसलेल्या इशाला म्हटलं होतं, इशा या गावंढळ गावातून सटकायचा एकच मार्ग म्हणजे लग्न. थोडी तडजोड स्वीकारून एखाद्या मोठ्या शहरातला मुलगा पत्करला तर आपल्या मनासारखं आधुनिक जीवन अनुभवायला मिळेल.

इशाची आणि आपली मैत्री लहानपणापासूनची. दहावीनंतर दोघींनीही घरी हट्ट करून, तालुक्याच्या ठिकाणी राहून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्या पुढचं शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. नशिबानं त्याचवेळी सरकारी योजनेमुळे गावात मुलींसाठी मोफत कॉम्प्युटर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. त्या संधीचा फायदा घेऊन दोघींनी कॉम्प्युटरच्या मायाजालातल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. एका क्लिकवर होणाऱ्या विश्वरूप दर्शनाने त्यांची शहरी, श्रीमंत, चैनीच्या आयुष्याची ओढ वाढली होती. स्वतःच्या सौंदर्यावर हुशारीच्या जोरावर काहीतरी वेगळं मिळवण्याची त्यांची धडपड होती.

त्यावेळी इशाने तिचे बदामी पिंगट डोळे आपल्यावर रोखून म्हटलं होतं,  ॓अगं तेच सांगायला मी तुला इथे बोलावलंय. माझ्या दूरच्या, डोंबिवलीत राहणाऱ्या आत्याने तिथलं स्थळ माझ्यासाठी जमवत आणलंय. तो दिसायला अगदी सामान्य आहे पण नोकरी चांगली आहे. स्वतःची जागा आहे. जबाबदारी अशी काही नाही. आमचा जोडा विजोड दिसेल पण मी ॓हो ॔म्हणायचं ठरवलं आहे. पैशांची अडवणूक नाही त्यामुळे घरचेही खुश आहेत.

काँग्रॅटस् इशा. गो अहेड. नंतर मलाही शहराचा रस्ता शोधायला मदत कर. इशाने बाजी मारल्यामुळे मनातून थोड्या नाराजीने पण वरकरणी हसून आपण तिचं अभिनंदन केलं. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता तरी ॓कॉम्प्युटरच्या बाईंनी स्पेशल क्लासला बोलवलय ॔ अशी घरात थाप मारून आपण दुपारी बाहेर पडलो. तालुक्याच्या ठिकाणाहून या गावात मुलींना कॉम्प्युटर शिकवायला आलेल्या सरकारी बाई एकट्याच एक खोली राहत घेऊन रहात होत्या. घरातून निघताना पर्समध्ये हळूच भरून घेतलेले भोपळ्याचे पाच-सहा घारगे बाईंपुढे करत आपण म्हटलं आईने दिलेत. आणि सांगितलंय की त्या कॉम्प्युटरवर स्थळं शोधता येतात ना तर बाईंच्या मदतीने बघ काही बरं ठिकाण दिसतंय का ते! घारगे पाहून खुश झालेल्या बाईंनी त्यांच्या घरातला कॉम्प्युटर उघडून दिला. नशिबाने इंटरनेट कनेक्शन होतं. दोन-तीन तास खर्च करून आपण स्वतःच अशोकचं स्थळ शोधून काढलं. अमेरिकेत नोकरी करीत होता म्हणजे हुशार असणार. पण त्याच्या चेहऱ्यावरचा बावळेपणा लपत नव्हता. अगदी साधा शामळू दिसतो म्हणून अनेक मुलींनी नाकारलेला असावा. आपण अशोकला पत्करायचं ठरवलं. घरी आल्यावर बाईंच्या नावाने या स्थळाची माहिती सांगितली. भावाच्या मदतीने पुण्याला पोहोचलो. लांब केसांचा घट्ट शेपटा घालून दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन भावी सासू-सासर्‍यांना वाकून नमस्कार केला. दोघेही खुश झाले. यथावकाश अमेरिकेहून आलेल्या, चेहऱ्यावर बावळट हसू ओघळणाऱ्या अशोकशी लग्न होऊन आपण अमेरिकेत या स्वप्न नगरीत पोचलो तेव्हा नातेवाईक आणि गावकरी म्हणावे ॓नशीबवान आहे मुलगी !॔

तीन-चार वर्षांनंतर आपल्या बाळंतपणासाठी सासू-सासरे अमेरिकेत आले. त्यावेळी आपणच पुढाकार घेऊन स्वतःच्या बेबी- शॉवरचा घाट घातला. गेल्या चार वर्षात जमविलेल्या अनेक मित्र मैत्रिणींनी हौसेने येऊन भरपूर धमाल केली. पण अशोक तोंडदेखलं बावळट हसू हसून थंडपणे त्याच्या रूममध्ये जाऊन बसला होता त्याला सोशल लाईफची मौज मस्तीची अजिबात आवड नव्हती. शिवाय एवढे डॉलर्स खर्च करणंही त्याच्या जीवावर आलं होतं. मुुलगा झाल्यावर सासू-सासर्‍यांवर मुलाला बिनधास्त टाकून आपण आपलं पूर्वीच सोशल लाईफ सुरु ठेवलं.

अशाच एका पार्टीत नीरज भेटला. आपल्या ड्रेसचं, दिसण्याचं, ग्रेसफुल डान्सचं त्यानं भरभरून कौतुक केलं. आपल्या सर्वांगावरून त्याची नजर भिरभिरत होती. आपण मनातून सुखावलो. हवं असं काहीतरी सापडल्यासारखं झालं. उच्चपदस्थ नीरज घटस्फोटीत होता. फारसा विचार न करता पुढच्या पायऱ्या भराभर ओलांडून आपण अशोक बरोबर घटस्फोट घेतला.

अशोकचं घर सोडताना चार-पाच वर्षांच्या छोट्या आनंदसाठी पाय अडखळत होते पण नीरजला मुलाबाळांचा गुंतवळा नको होता. त्याला फुलपाखरासारखं स्वच्छंदी, रंगीबेरंगी आयुष्य उपभोगायचं होतं. चैनीच्या स्वैर, विलासी आयुष्याचा आपल्यालाही मोह पडला.

जवळजवळ दहा वर्ष आपण नीरज सोबत ऐषोआरामात काढली. या काळातही तो दुसऱ्या काही स्त्रियांच्यात थोडाफार गुंतला होता. तरी आपण हुशारीने, सावधपणे नीरजवरची पकड अधिकच घट्ट केली. पण हे एमिली प्रकरण डोईजड होतंय. आपल्याला सोडून नीरजने एमिलीशी लग्न करायचं ठरवलं तर आपलं भवितव्य काय? या अफाट अमेरिकेत आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? कपडे घालता घालता लिनाचं विचारचक्र सुरू होतं. तिने मान झटकली आणि निश्चय केला,  ॓छे! अशी हार मानून चालणार नाही. आयुष्यातलं हेही वळण सफाईन पार केलं पाहिजे मात्र आता स्थिर आयुष्याच्या दृष्टीने विचारपूर्वक, हुशारीने पावलं टाकली पाहिजेत. पन्नाशी जवळ आलीय. चांगली संधी मिळेपर्यंत नीरजला दुखावून चालणार नाही या विचारांनी तिला थोडं हलकं वाटलं.

 ****

 नीटनेटका भरलेला डबा आणि पाण्याची बाटली लीनाने किल्ली न्यायला आलेल्या ड्रायव्हर जवळ दिली.

 पावसाचं लक्षण दिसतंय. छत्री आहे ना गाडीत? आणि दुपारी वेळेवर जेव बरं का. डब्यात वरतीच दुपारची औषधं ठेवल्येत. ती घे. मी फोन करीनच. लीनाने प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने सदानंदला बाय केलं.

  ॓अगं हो हो! किती काळजी घेशील? आणि आता जरा रेस्ट घे. काल रात्रीही एअरपोर्टवरून यायला उशीर झालाय. गेला महिनाभर धावाधाव चाललेय तुझी. मावशीनाही आज सुट्टी दे. संध्याकाळी आपण बाहेरच जाऊ. सदानंदने लीनाला अच्छा करताना प्रेमाने बजावलं.

सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली .॔

झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

रंग…

रंग. रंग मनुष्याच्या आयुष्यात ok खूप महत्वाची भूमिका बजावतात…! कोणतीही वस्तू विकत घेताना, निवडताना, भेट देताना, स्वीकारताना इतर बाबींसोबत त्या वस्तूचा रंग अवश्य पाहतो…! रंगाच्या बाबतीत प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी आवडनिवड असते, असू शकते…!

काही रंग मनाला शांती देणारे असतात, तर काही रंग मनुष्याला नकोसे असतात…

बऱ्याच लोकांना विशिष्ट रंगाच्या वस्तूच नव्हे, तर व्यक्तीही आवडत नाहीत. अनेक लोकांना मनुष्याच्या सावळ्या (खरंतर काळया…) रंगाचे वावडे असते…

या वावड्या स्वभावाचा कधीकधी अतिरेकी नमुना पाहण्यात येतो…! एखाद्या गोऱ्या रंगाच्या मनुष्याच्या बाजूला एखादा काळा मनुष्य बसला तर त्याला असे वाटते की याचा काळा रंग आपल्या अंगाला लागणार तर नाही ना?

इथेच हे थांबत नाही…

एक जुने मराठी गाणे आठवले…

काळाही म्हणतो गोरी पाहिजे,

गोरा ही म्हणतो गोरी

आता तुम्हीचं सांगा पावण 

कुठे जातील काळ्या पोरी…

एक गाणे म्हणजे समाजमनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल…

एका आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचे रंग (शरीराचा वर्ण) भिन्न भिन्न असल्याचे आपण पाहतो…

पण, गोरा म्हणजे चांगला आणि काळा म्हणजे वाईट असे अंधविश्वासू समीकरण आपल्या मनात मांडतो आणि मनुष्य त्यानुसार आचरण करतो…

हा वेताळ नव्हे काय?

आपण सर्वजण एकाच आईची लेकरे आहोत, असे मनावर बिंबवून पक्के केले तर मनामनात लपलेला वेताळ बाहेर काढून टाकायला हवा…

मनुष्य महत्वाचा की त्याचा रंग महत्त्वाचा याचा निर्णय करता आला तर या वेताळाला पळवून लावणे शक्य होईल.
पटतंय ना?

मानवी जीवन प्रवासात रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्या लक्षात येईल. किंचितशी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की रंग आहेत म्हणून आयुष्य रंगीबेरंगी आहे, रंग नसते तर आयुष्य बेरंगी झालं असतं…

हेच सूत्र भगवंतांच्या, ही चराचर सृष्टी निर्माण करणाऱ्याच्या मनात असावे म्हणून त्याने एकाच रंगाची किंवा एकाच प्रकारची माणसे निर्माण केली नाहीत… (त्याने एकाच रंगाचं आणि गंधाचे तसेच एकाच आकाराचे साबण बनवणारा कारखाना काढलेला नाही…)

त्याने त्याच्या कार्यकौशल्याप्रमाणे काही ठिकाणी एकदम गोरी, काही ठिकाणी निमगोरी, काही ठिकाणी सावळी, काही ठिकाणी लख्ख काळी अशी विविध प्रकारची माणसं निर्माण केली…

हे वर्णन वाचताना खूप छान वाटत, नाही का?

पण प्रत्यक्षात…

प्रत्येकाला गोरे व्हायचे आहे, प्रत्येकाला अधिक गोरे व्हायचे आहे…

सध्या मनुष्याला गोरे करणारी अनेक मलमे बाजारात विकत मिळत आहेत… (अर्थात अशी मलमे लावून फक्त जाहिरातीत दाखवलेली महिला गोरी होत असते, प्रत्यक्षात तसे गोरे कोणीही होत नसते…) 

एकेकाळी पांढरी पूड लावून मनुष्य तात्पुरता गोरा व्हायचा आणि त्यात समाधान मानायचा, पण आता काळ बदलला, तशी अनेक शोध लावले गेले…

आता ठिक्कर काळा मनुष्य देखील कृत्रिम रित्या काही काळापुरता गोरा होऊ शकतो…

गोरे होणे वाईट आहे असे बिल्कुल नाही, पण विधात्याने सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला उचित असा रंग दिला आहे तो न स्वीकारता, त्याने निगुतीने केलेल्या एखाद्या रचनेत मनुष्याने ढवळाढवळ केल्यासारखे होणार नाही का? या कृत्रिम रित्या गोरे होण्याचा हव्यास म्हणजे एक प्रकारचा

वेताळच नव्हे काय?

ह्या वेताळामुळे मनुष्य गोरा होतो की नाही ते सांगणे अवघड आहे, पण दोन गोष्टी नक्की होतात. एक म्हणजे त्या मनुष्याचा न्यूनगंड वाढतो आणि अशी विशिष्ट मलमे विकणाऱ्या कारखान्यांची भरभराट खात्रीने होते…

पटतंय का?

आपण वेळीच या वेताळाला आवर घालायला हवा…

– लेख क्र. ९

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या जाहिरातींचा सुळसुळाट सगळीकडेच आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या जाहिराती असतात. टीव्हीवर जाहिराती असतात. रेडिओ वर जाहिराती असतात. पूर्वी रेडिओ वरती एक कार्यक्रम संपला की एखादी जाहिरात असायची आणि दुसरा कार्यक्रम सुरू व्हायचा.

आता तर गाणं सुरू झालं, की दोन ओळी संपतात आणि जाहिरात सुरू होते. कडवं पूर्ण होतं आणि दुसरी जाहिरात लागते.

आता जाहिरातीचा आणखीन एक छान प्रकार बघूया…

तुम्ही म्हैस ही माझी गोष्ट वाचली असेलच.

बावधन या भागात रहदारीचा रस्ता सुखाने आणि आनंदाने आणि सुरक्षितपणे क्रॉस करण्याकरता तिथल्या मुलाने चौका चौकात आता म्हशी ठेवल्या आहेत.

लोकांची रस्ता क्रॉस करण्याची छान सोय होते, मुलाला छान पैसे मिळतात, म्हशीचा आणि मुलाचा छान व्यायाम पण होतो.

एक दिवस मी त्या मुलाला सहज सुचवले की या म्हशीच्या पाठीवर या भागातल्या लोकांना काही जाहिरात करायची असेल तर ती कापडा वरती लिहून म्हशीच्या पाठीवर झूल म्हणून टाकायची.

दुकानदारांची जाहिरात होईल आणि तुला त्यांच्याकडून पैसे पण मिळतील. आणि त्यामध्ये म्हशीला त्रास असा काहीच नाही.

मुलाला कल्पना पटली आणि लगेच त्याने इम्प्लिमेंटेशन केले.

आता तो त्या म्हशींच्या पाठीवर रोज निरनिराळ्या जाहिराती लिहिलेली कापडाची झूल घालत असतो.

म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणाऱ्यांकडून पैसे मिळतातच, आणि आता जाहिरात दारांकडून पण पैसे मिळतात.

मी जेव्हा जेव्हा तिथे रस्ता क्रॉस करण्याकरता जातो, तेव्हा मला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याकरता तो माझ्याकडून पैसे घ्यायला नकार देतो. आणि आभार म्हणून प्रत्येक वेळा मला एक छान फुलाचा पुष्पगुच्छ देतो.

पुढे मागे अजूनहि काही नवीन नवीन कल्पना सुचतीलच…

चला बाय बाय, शुभ दिवस 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथांचा जन्म उच्चवर्णीय, गर्भश्रीमंत, जमीनदार व उच्चशिक्षित घराण्यातला. त्यांच्या व्यापक विचारांना जाती धर्माची, वर्ण पंथांची, देश वा राज्याच्या सीमांची बंधनं मान्य नव्हती. ते अखिल मानव जातीच्या भल्याचा विचार करीत. कदाचित् त्यामुळेच समकालीन विचारवंतांच्या मनात त्याच्या विषयी नेहमीच संशयाचे धुके असत असे. परंतु त्यांचं आपल्या देशावर, या वसुंधरेवर निरतिशय प्रेम होतं. त्यांचे विचार प्रगल्भ होते. बुद्धिमत्ता अलौकिक होती. आरशासारखं स्वच्छ मन होतं.

त्यांच्या मते प्रत्येकाला शिक्षणातून स्वतःचा उत्कर्ष घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार व समान संधी मिळायला हवी. त्यासाठी देश, प्रांत अशा सीमारेषा नसाव्यात. त्या काळातही ते जागतिकीकरणाचे ध्येय बाळगून होते.

गीतांजलीतील आपल्या ३५ व्या कवितेत त्यांनी अत्यंत सकारात्मक असे हे विचार मांडले आहेत. जेथे जात, पंथ, वर्ण, रूढी, भाषा अशा कोणत्याही भेदभावाच्या भिंती नाहीत, समानता आहे, परस्परांबद्दल आदर आहे, नैतिकता, विवेक, सत्यवचन यांचा अंगिकार करणारं मन आहे अशा विश्वाची, मानवजातीची आस त्यांनी इथे व्यक्त केली आहे.

समाजात भयमुक्त, संघर्ष मुक्त वातावरण असावे. दडपशाहीच्या निंदनीय वास्तवातून बाहेर पडले पाहिजे अन्यथा वाळवंटातील रेती मध्ये रुतल्याप्रमाणे बसावे लागेल. ते ओलांडून गेलो तरच प्रगतीशील भविष्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा स्वच्छ प्रवाह निर्माण होईल, जो कधीच थांबणार नाही. एकसंध, निष्पक्ष असा परिपूर्ण भारत, परिपूर्ण जग निर्माण केले पाहिजे.

ते ह्या काव्यातून प्रत्येक मानवासाठी नैतिक, बौद्धिक व आध्यात्मिक स्वातंत्र्याची मागणी करतात. तसेच वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध भाष्य करतात. वैयक्तिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सर्व बंधनांना तोडून जे स्वातंत्र्य लाभेल ते स्वर्गासम असेल. त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जागे कर, अशी ते विधात्याकडे प्रार्थना करतात.

त्यांचे हे काव्य म्हणजे जणू सगळ्या मानवतेला आवाहन आहे. विचारही इतके दूरदर्शी, सार्वकालिक आणि व्यापक आहेत की आजही ते सर्वांना मार्गदर्शक ठरतील. या कवितेने स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली. स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्ता बदल नाही. तर भयमुक्त समाज निर्माण करणे जेथे परस्परांबद्दल आदरभाव असेल, समानता असेल.

हे काव्य संपूर्ण विश्वात गाजले कारण यातील विचार वैश्विक आहे. यात सामूहिक प्रबोधनाचे आवाहन आहे. न्याय्य, खुल्या भयमुक्त मानवी जगाच्या निर्मितीचं आवाहन आहे. ही कविता फक्त भारतातच नाही तर बांगलादेशातही पाठ्यपुस्तकातून शिकवली जाते.

सन १९१७ च्या कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रविंद्रनाथांनी ही कविता ‘इंडियन प्रेअर’ म्हणून प्रस्तुत केली होती. तिचं सिंहीली भाषेतही भाषांतर झालं आहे. सन १९१० च्या आधी त्यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. नंतर त्यांच्या ‘नैवेद्यम्’ या कवितासंग्रहातून ‘प्रार्थना’ या शीर्षकाखाली ती प्रसिद्ध झाली. ही मूळ कविता क्रांतिकारी वळणाची व अधिक आवेशपूर्ण होती. तिचे इंग्लिश मध्ये भाषांतर करताना टागोरांनी त्यात

काही बदल करून ती बरीच

सौम्य केली आहे.

—–

गीत ३४

LET only that little be left of me whereby I may name thee my all.

Let only that little be left of my will whereby I may feel thee on every side, and come to

thee in everything and offer to thee my love every moment.

Let only that little be left of me whereby I may never hide thee.

Let only that little of my fetters be left whereby I am bound with thy will, and thy purpose

is carried out in my life ⎯ and that is the fetter of thy love.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३४

☆ 

सायुज्य मुक्ती नकोच देऊ

जरा विलगता आपण ठेऊ

असेल जर का थोडे अंतर

पाहिन रुपडे तुझे निरंतर

घडोघडी तव चरण सेवा

माझ्या हातून घडेल देवा

असशील जर तू आजुबाजूला

तू माझा, मी दाविन सकला

क्षणोक्षणी तुज अर्पिन प्रीती

म्हणून करतो ही तुज विनती

एकरूपता नकोच मजला

थोडे अस्तित्व दे गोपाला

☆ 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३५ ☆ 

WHERE the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free; Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls; Where words come out from the depth of truth; Where tireless striving stretches its arms towards perfection;

Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit; Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action ⎯

Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ३५ ☆ 

जेथे मनी भिती नाही

मान सदा ताठ राही

जेथे ज्ञान असेल मुक्त 

संकुचित भिंती होती लुप्त

*

असं विश्व माझं घर असेल

सत्याच्या गर्भातून शब्द बरसेल

कर्तव्यनिष्ठा, चिकाटी न् अचूकता

असेल आचार विचारांची प्रगल्भता

*

वाट दाखवणारा जर तू असशील

तर धरतीवर असा स्वर्ग वसवशील

तुझ्या कृपेचा असेल वरदहस्त

तर असाच असेल माझा भारत

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆  गीत ३६ ☆ 

THIS is my prayer to thee, my lord ⎯ strike, strike at the root of penury in my heart.

Give me the strength lightly to bear my joys and sorrows.

Give me the strength to make my love fruitful in service. Give me the strength never to disown the poor or bend my knees before insolent might.

Give me the strength to raise my mind high above daily trifles. And give me the strength to surrender my strength to thy will with love.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत ३६ ☆ 

☆  हे देवा! ☆ 

☆ 

घाव एक तो असा घाल की 

दारिद्र्य मनाचे समूळ जाऊ दे

दीन दुबळ्यांची सेवा आणिक

परोपकार हातून घडू दे

*

असोच इतके बळ मनाचे

सुखदुःखाच्या पार जाऊ दे

सत्तेच्या या माजापुढती

कधी न मजला नत होऊ दे

*

तुच्छ गोष्टींना महत्व देऊन

मन कोते ना कधी वाटू दे

इच्छा तुझिया पूर्ण कराया

शक्ती माझी खर्ची पडू दे

☆ 

– क्रमशः भाग १२.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वयंपाकघर” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “स्वयंपाकघर” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

स्वयंपाकघर म्हणजे एक छोटीशी कंपनी

आपणच असतो फाऊंडर, एखाद-दोन व्यक्ती कामं करायला हाताखाली

रोजचं नवीन प्रोजेक्ट, रोजचीच डेडलाईन

सकाळी 6 ला उघडणार ऑफिस, ते थेट रात्री नाईन

 

काहीवेळा वीकएंडला शटडाऊन, तर ओव्हरटाईम सणावारी

वर्षातले 300 दिवस  प्रोजेक्ट ‘जेवायला काय?’ चं  भूत मानगुटीवरी

ऑफिसला जावं लागत नाही, कायम वर्क फ्रॉम होम असतं

या ऑफिसमध्ये काम करणं इतकंही सोपं नसतं

 

महिन्याच्या महिन्याला भरावं लागतं सामान, स्टॉक अपडेट करायला लागतो

आवडीनिवडी आणि आरोग्य ह्यांचा मेळ घालावा लागतो

 

इथे चालत नसतो आयपॅड आणि लॅपटॉप

इथे असतो फक्त पोळपाट आणि हॉटपॉट

 

दर आठवड्याला प्रोजेक्ट ‘भाजीपाला’ असतं

त्यानुसारच आठवड्याचं प्लॅनिंग करावं लागतं

आलंच एखादं इस्कलेशन, त्यांनुसार घ्यावे लागतात कॉल

शांत राहून करावे लागतात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह

 

आठवड्यातून एकवेळ तरी बंद ठेवावी भट्टी

आराम करावा, घ्यावी मस्त सुट्टी

आठवडाभर असतेच की ओट्याशी गट्टी

भांडीकुंडी आणि गॅसशी घ्यावी तात्पुरती कट्टी

 

जगात भारी’ हेच अप्रेजल आणि हाच परफॉर्मन्स बोनस, खुश होते स्वारी

कंपनीच्या यशाची हीच तर किमया न्यारी

इथे आपणच आपले असतो बॉस

गैरहजेरीत आपल्या, होतो खूप केऑस

 

या कंपनीतून रिटायरमेंट मात्र योग्यवेळी घ्यावी

कंपनीची किल्ली लगेच सुपूर्द करावी

गरज लागलीच तर मदत करावी

नाहीतर रिटायरमेंट मस्त एंजॉय करावी

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “पार्थसूत्र” — लेखक : श्री वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पार्थसूत्र” — लेखक : श्री वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

 

पुस्तक : पार्थसूत्र

लेखक – वैभव केळकर 

सहलेखिका – डॉ. मेघना दलाल 

प्रकाशक- मधुर राजीव बर्वे.. दिलीप राज प्रकाशन.

मूल्य – रुपये ३००

“पार्थ सूत्र” अर्जुनाच्या जीवन यात्रेवरील एक प्रेरणादायी गाथा आहे महाभारत या महाकाव्याचा आधार घेत हे पुस्तक प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत लेखक द्वय वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडून दाखवतात.

साधारणपणे 200 पानांचे हे पुस्तक महाभारतातील माहित असलेल्या गोष्टी पार्थ म्हणजे अर्जुनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगते.

 एकूण 23 कथनातून हे महाभारत आपल्यापुढे उभे केले आहे. ‘,

शून्य प्रहरी’ या सुरुवातीच्या लेखातच अर्जुन आपला नातू परीक्षित याला सांगतो की, “थांबण्याची वेळ ज्याची त्यालाच ओळखता आली पाहिजे.. “सर्व पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघाले आहेत आणि अर्जुनाचे मन भूतकाळाच्या विहिरीत डोकावले आहे, जिथे उमटते चित्र ते पांडवांचे! ज्यांची विटी विहिरीत पडली आहे आणि ती काढून देण्यासाठी त्यांना एका तेजःपुंज ऋषीची मदत मिळत आहे.. ते प्रत्यक्ष द्रोणाचार्य त्यांचे गुरु झाले! भीष्माचार्य हे पितामह! पांडवांना असे गुरु आणि पितामह मिळाले हे त्यांचे भाग्यच! त्यांनी कौरव- पांडवांना ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातून अर्जुनाचे भावविश्व समृद्ध होत होते. त्यांच्यामध्ये शिस्त आणि प्रेम यांचा संगम तेव्हा राहिला होता..

 अर्जुन एक विशिष्ट उद्देश घेऊन जगला. जे करायचं ते स्थिर बुद्धीने करत होता. जिथे शंका येईल तिथे श्रीकृष्णाची त्याला साथ होती. अर्जुन मूल्यांनी प्रेरित असा होता. या पुस्तकात अर्जुनाच्या वैयक्तिक संघर्षांचे आणि कठीण प्रसंगातील त्याच्या विचार प्रक्रियेचे उत्कृष्ट चित्रण केलेले आहे.

अर्जुनाचा काळ आणि सद्य परिस्थिती याची सांगड घालत लेखकांनी या पुस्तकातील लेखन केलेले आहे. अर्जुनाने केलेली प्रत्येक गोष्ट काल सुसंगत अशी होती की, त्यातून आत्ताही प्रत्येकाला काही शिकण्यासारखे आहे..

एकूण 23 लेखातून महाभारतात असणारे अर्जुनाचे स्थान, त्याचे विचार आणि त्या त्यावेळी अर्जुन कसा वागला, यासंबंधी लेखक द्वयीने विचारपूर्वक लेखन केले आहे. बालपण, द्रौपदी स्वयंवर, एकांत वास, वनवास, विराट युद्ध, कर्ण वध असे सर्व लेख आपल्याला अर्जुनाचे महाभारताशी असलेले नाते त्याच्या तोंडून व्यक्त करून दाखवतात.. अगदी वानप्रस्थाश्रमा पर्यंतचा अर्जुनाचा जीवन प्रवास यात आपल्याला उलगडून दाखवलेला आहे.

 द्रोणाचार्य, भीष्म यांच्या बद्दल अर्जुनाला असलेला आदरही येथे व्यक्त झाला आहे. द्रौपदी आणि इतर सर्व भाऊ यांच्या बद्दलचे प्रेम, कर्तव्य ही अर्जुनाने आयुष्यात सांभाळले होते. हे एक वेगळ्या प्रकारचे असे पुस्तक मला वाटले..

 महाभारतातील गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत तसेच मोठेपणी ही महाभारत अधिक सखोल त्याने वाचले आहे पण अर्जुनाच्या दृष्टिकोनातून महाभारत आणि त्याचा आधुनिक काळाशी असलेला संबंध हे अशा पद्धतीने लिहिलेले पुस्तक मात्र मी प्रथमच वाचले.

 प्रत्येक लेखात अर्जुन असा वागला होता आणि आताच्या काळात येणाऱ्या संघर्षात अर्जुन कसा वागला असता यासाठी होणारे वैचारिक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळते. आपण प्रत्येक जण अर्जुनच असतो, की ज्याला वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते.

अधून मधून प्रसंगाला अनुसरून काव्य लेखन ही या पुस्तकात केलेले आहे. दर्शन वृत्ती, जिज्ञासा वृत्ती, स्वामित्व वृत्ती, संघ वृत्ती, रचना वृत्ती, युद्ध प्रवृत्ती, पलायन वृत्ती अशा विविध गोष्टी जशा पितामहांनी सांगितल्या त्यातून पार्थला मिळालेले शिक्षण हे आजच्या काळातही उपयुक्त आहे. इंद्रप्रस्थ नगरी उभारली तेव्हा राज्य कसे असावे? प्रजेसाठी काय काय करावे? तसेच सर्वांना शांत सुखी व समृद्ध जीवन देण्यासाठी राज्यकर्त्यांनी कसे वागावे? अशा बऱ्याच गोष्टींचा अर्जुनाने कसा विचार केला असेल याचे मनोज्ञ दर्शन या लेखक द्वयीने केले आहे.

एकंदरच पुस्तक वाचनीय वाटले आणि महाभारतातील मुख्य नायक पार्थ म्हणजेच अर्जुन याच्या विचाराचा मागोवा घेऊन त्यातून आपल्याला आत्ताच्या काळातही उपयुक्त असे काही ज्ञान मिळते हे विशेष!

“पार्थसूत्र” या पुस्तकामध्ये मला जे आवडले ते मी येथे लिहिले आहे. एकंदरच महाभारताविषयी आपल्याला आपुलकी वाटते आणि मानवी आयुष्य आणि त्यात घडणाऱ्या घटना ह्या पुरातन काळापासून तशाच आहेत. म्हणूनच म्हंटले जाते की महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे! आणि ते कालातीत आहे..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ पिता कोई पैकेज नहीं होते… ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम् ☆

कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

(हम कैप्टन प्रवीण रघुवंशी जी द्वारा ई-अभिव्यक्ति के साथ उनकी साहित्यिक और कला कृतियों को साझा करने के लिए उनके बेहद आभारी हैं। आई आई एम अहमदाबाद के पूर्व छात्र कैप्टन प्रवीण जी ने विभिन्न मोर्चों पर अंतरराष्ट्रीय स्तर एवं राष्ट्रीय स्तर पर देश की सेवा की है। आप सी-डैक के आर्टिफिशियल इंटेलिजेंस और एचपीसी ग्रुप में वरिष्ठ सलाहकार के रूप में कार्यरत थे साथ ही आप विभिन्न राष्ट्र स्तरीय परियोजनाओं में भी शामिल थे।)

कैप्टन प्रवीण रघुवंशी जी ने अपने प्रवीन  ‘आफ़ताब’ उपनाम से  अप्रतिम साहित्य की रचना की है। आज प्रस्तुत है नव वर्ष पर आपकी अप्रतिम रचना “पिता कोई पैकेज नहीं होते…

? पिता कोई पैकेज नहीं होते… ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम् ☆ ?

दोपहर के तीन बज रहे थे।

पुणे का श्मशान घाट धूप से झुलस रहा था।

आसमान चुप था।

धरती चुप थी।

और हवा में तैरती चंदन की गंध मानो किसी अदृश्य विदाई का संगीत बन गई थी।

एक काली चमचमाती कार आकर रुकी।

दरवाज़ा खुला।

आर्यन उतरा।

चौंतीस वर्ष।

लंदन की बहुराष्ट्रीय कंपनी में निदेशक।

विदेशी वेतन।

डॉलर में पैकेज।

कंधे पर महँगा लैपटॉप बैग।

कान में ब्लूटूथ।

कलाई पर ऐसी घड़ी, जिसकी कीमत उसके पिता की पूरे वर्ष की पेंशन से अधिक थी।

उसने घड़ी देखी।

तीन बजकर पाँच मिनट।

रात नौ बजे की फ्लाइट थी।

कल बोर्ड मीटिंग।

वह तेज़ कदमों से भीतर आया।

सब व्यवस्था हो चुकी थी।

लकड़ियाँ सजी थीं।

पंडित मंत्रों के पन्ने उलट रहे थे।

और सफेद कपड़े में लिपटा एक शांत शरीर पड़ा था।

वसंतराव।

अठहत्तर वर्ष।

पिता।

आर्यन कुछ पल ठिठका।

चेहरे पर झुर्रियाँ थीं, पर वही करुण मुस्कान अब भी अटकी थी।

वही चेहरा — जो कभी देर रात तक दरवाज़े पर बैठा उसका इंतज़ार करता था।

वही हाथ — जिन्होंने गिरते समय उसे उठाया था।

एक आँसू निकला।

उसने तुरंत पोंछ दिया।

गला साफ किया।

“सब जल्दी हो जाएगा ना? मेरी फ्लाइट है। कल बहुत ज़रूरी प्रेज़ेंटेशन है। प्लीज़ समय पर करा दीजिए।”

पास खड़े अनिरुद्ध ने उसकी ओर देखा।

वे अंतिम संस्कार की व्यवस्था करने वाली संस्था से थे।

उनकी आँखों में प्रश्न था —

क्या पिता के लिए भी समय स्लॉट तय होता है?

पर उन्होंने कुछ नहीं कहा।

मंत्र शुरू हुए।

घंटी बजी।

आर्यन सब करता रहा — जैसे किसी प्रोजेक्ट की प्रक्रिया पूरी कर रहा हो।

बीच-बीच में घड़ी देखता रहा।

फिर वह क्षण आया।

उसने अग्नि दी।

लपटें उठीं।

धीरे-धीरे ऊँची होने लगीं।

धुआँ ऊपर उठा —

जैसे वर्षों का परिश्रम, त्याग, भूख, चिंता और अनकहे सपने आकाश में विलीन हो रहे हों।

कुछ देर बाद आर्यन ने वॉलेट निकाला।

“कितना बिल है? अस्थि-विसर्जन भी आप करवा दीजिए। मैं दोबारा नहीं आ पाऊँगा। जितना भी है, अभी ट्रांसफर कर देता हूँ।”

अनिरुद्ध शांत स्वर में बोले —

“आपका बिल पहले ही जमा है।”

आर्यन ठिठका।

“किसने किया?”

“सात वर्ष पहले आपके पिता स्वयं आए थे। तब चल भी मुश्किल से पाते थे।

उन्होंने पूछा था —

‘सब व्यवस्था ठीक रहेगी न? मेरे बेटे को कोई परेशानी न हो।’

उसी दिन उन्होंने अग्रिम भुगतान कर दिया।

और यह पत्र छोड़ गए थे।”

लिफाफा उसके हाथ में था।

हाथ काँप रहे थे।

उसने पत्र खोला।

प्रिय आर्यन,

मुझे पता है तुम बहुत व्यस्त हो।

तुम्हारी दुनिया बड़ी है।

मीटिंग, लक्ष्य, प्रस्तुति, यात्राएँ।

मेरी खबर सुनकर तुम्हें सबसे पहले छुट्टी और टिकट की चिंता होगी।

और बेटा, यह स्वाभाविक है।

मैंने तुम्हें इसलिए पढ़ाया था कि तुम आगे बढ़ो।

तुम्हारी उड़ान मेरे सपनों की ऊँचाई है।

एक बूढ़े शरीर के कारण अपने काम में बाधा मत आने देना।

इसलिए मैंने सब पहले ही कर दिया है।

यदि आ सको तो अच्छा।

न आ सको तो भी कोई शिकायत नहीं।

बस एक छोटी सी बात —

जब तुम छोटे थे और सड़क पार करते थे,

मैं तुम्हारा हाथ कसकर पकड़ता था।

आज जब तुम मुझे अग्नि दो,

तो तुम्हारा हाथ ढीला न पड़े।

और हाँ —

जल्दी लौट जाना।

तुम्हारी मीटिंग छूटनी नहीं चाहिए।

तुम्हारा

बाबा

पत्र समाप्त हुआ।

आर्यन के हाथ से वॉलेट गिर पड़ा।

राख में धँस गया।

पर उससे कहीं गहरा कुछ और धँस चुका था —

उसका अभिमान।

उसकी उपलब्धियाँ।

उसकी तथाकथित सफलता।

वह वहीं घुटनों के बल बैठ गया।

“बाबा…!

मैं कमाता रहा…

और आप मेरे लिए मरने तक की तैयारी करते रहे…!”

उसकी आवाज़ फट गई।

“मैंने आपके लिए समय नहीं निकाला…

और आपने मेरी सुविधा के लिए अपनी मृत्यु तक नियोजित कर दी?”

लपटें तेज़ हो उठीं।

मानो उत्तर दे रही हों।

उस रात आर्यन ने फ्लाइट रद्द कर दी।

मीटिंग छूट गई।

फोन बंद कर दिया।

वह पूरी रात वहीं बैठा रहा —

जलती चिता के सामने।

पहली बार उसने घड़ी नहीं देखी।

क्योंकि समय अब उससे छूट चुका था।

उसे समझ में आया —

सुविधाएँ प्रीपेड हो सकती हैं।

बीमा पॉलिसी प्रीपेड हो सकती है।

अंतिम संस्कार की व्यवस्था भी प्रीपेड हो सकती है।

पर पिता का प्रेम कभी प्रीपेड नहीं होता।

वह उधार नहीं होता।

वह अनुबंध नहीं होता।

वह पैकेज नहीं होता।

वह अनंत होता है।

निःस्वार्थ होता है।

अपरिमेय होता है।

संस्था चिता सजा सकती है।

अस्थियाँ बहा सकती है।

पर जो हाथ बचपन में थामे गए थे —

उनका मूल्य कोई नहीं चुका सकता।

और जब संतानों की संवेदना सूख जाती है,

तब वे सफल तो रह जाते हैं —

पर पुत्र नहीं रह पाते।

पिता सचमुच

कोई पैकेज नहीं होते…!

~ प्रवीन रघुवंशी ‘आफताब’

© कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

पुणे

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १३८ – बुन्देली कविता – “नौके बेइ वकील भये हैं” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – नौके बेइ वकील भये हैं।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १३८ – बुन्देली कविता – “नौके बेइ वकील भये हैं” – ☆ आचार्य भगवत दुबे ✍

नौके बेइ वकील भये हैं

कइ नोट्स तामील भये हैं

*

बढ़तड़ जा रइ है आबादी

बड़े गाँव तैसील भये हैं

*

पैलउँ बड़ी दॉँतकाटी रइ

अंतर बीसों मील भये हैं

*

ओके घर में छापा पर गव

घर-दफ्तर सब सील भये हैं

*

हिलबिलान हो गये कहाँ पै

गायब सारे चील भये हैं

*

रय जंगल में ठौर-ठिकाने

भटकन बारे भील भये हैं

*

‘भगवत’ पोल खुलत जा  रइ है

मनो फिलम की रील भये हैं

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जादू ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – जादू ? ?

तपता मरुस्थल,

निर्वसन धरती,

सूखा कंठ,

झुलसा चेहरा,

चिपचिपा बदन,

जलते कदम,

दूर-दूर तक

शुष्क और

बंजर वातावरण,

अकस्मात

मेरी बिटिया हँस पड़ी,

अब लबालब

पहाड़ी झरने हैं,

आकंठ तृप्ति है,

कस्तूरी-सा महकता तन है,

तलवों में जड़ी मखमल है,

उर्वरा हर रजकण है,

चहुँ ओर श्रावण है..!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 21 दिवसीय आशुतोष साधना रविवार दि. 8 फरवरी से शनिवार 28 फरवरी तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही शिव पंचाक्षर स्तोत्र का पाठ भी करेंगे 💥

॥ श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रम् ॥

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय,
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै न काराय नमः शिवाय ॥१॥

मन्दाकिनी सलिलचन्दन चर्चिताय,
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय,
तस्मै म काराय नमः शिवाय ॥२॥

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द,
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय,
तस्मै शि काराय नमः शिवाय ॥३॥

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य,
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय,
तस्मै व काराय नमः शिवाय ॥४॥

यक्षस्वरूपाय जटाधराय,
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय,
तस्मै य काराय नमः शिवाय ॥५॥

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥

💥 मालाजप शिव पंचाक्षर स्तोत्र के साथ आत्मपरिष्कार एवं मौन-साधना भी नियमित रूप से चलेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Book Review ☆ SHOE DOG ☆ Shri Jagat Singh Bisht ☆

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Authored six books on happiness: Cultivating Happiness, Nirvana – The Highest Happiness, Meditate Like the Buddha, Mission Happiness, A Flourishing Life, and The Little Book of HappinessHe served in a bank for thirty-five years and has been propagating happiness and well-being among people for the past twenty years. He is on a mission – Mission Happiness!

☆ Book Review ☆ SHOE DOG 🥾 ☆ Shri Jagat Singh Bisht 

When Business Becomes a Run Towards Meaning 🥾

There are autobiographies one reads with admiration. There are others one reads with curiosity. And then, once in a rare while, there comes a memoir that one lives through — breath by breath, doubt by doubt, heartbeat by heartbeat.

This was my experience with Shoe Dog.

I have always loved autobiographies. They allow us to sit quietly beside another human being and listen — not to their achievements alone, but to their fears, their confusions, their missteps. Yet this memoir felt different. It did not read like a polished success story told from a glittering summit. It read like a man sitting across the table, sleeves rolled up, speaking plainly, even vulnerably, about a life that unfolded in chaos, anxiety and relentless uncertainty.

And that is what makes it unforgettable.

A Story Without Armour 🥾

Many founders narrate their journeys with an air of inevitability — as though success was merely waiting for them to arrive. But in Shoe Dog, Phil Knight does something rare: he dismantles the myth of certainty.

The story is messy. It is perilous. It is riddled with mistakes, near-bankruptcies, strained relationships, sleepless nights and heart-in-the-mouth moments. Banks threaten to shut him down. Shipments are delayed. Competitors loom. Cash flow evaporates like morning dew.

And yet, there is no bravado in the telling. No chest-thumping. No self-congratulation.

Instead, there is candour. There is anxiety. There is fear admitted openly.

In a world obsessed with projecting invincibility, here is a man who confesses frailty. He speaks of doubt as though it were an old companion. He acknowledges the terror of payroll deadlines. He reveals how often he felt on the brink of collapse.

That honesty is disarming.

Not Just Shoes, But People 🥾

Though the book chronicles the birth of Nike, it is not merely a corporate saga. It is the story of a “shoe dog” — a man obsessed not with profit margins but with running tracks, athletes’ feet, and the poetry of movement.

There is a deep respect for sportsmen. A reverence for the discipline of runners. A quiet admiration for grit.

But even more touching is the affection for family and colleagues. The early team — eccentric, loyal, imperfect — feels like a band of brothers bound by something far greater than commerce.

These were not employees; they were co-dreamers.

And through it all, one senses a son’s regard for his father, a husband’s gratitude, a friend’s loyalty. There is not even an iota of ego in the narrative. If anything, there is an almost startling humility — an insistence on sharing credit, on exposing weakness, on acknowledging dependence on others.

A Dream That Was Never About Money 🥾

What struck me most deeply was this: money was never the dream.

We are so conditioned to believe that entrepreneurship is fuelled by the hunger for wealth. But Knight’s hunger moved along a different tangent. He writes:

“I wanted to leave a mark on the world. I wanted to win. No, that’s not right. I simply didn’t want to lose… I saw it all before me, exactly what I wanted my life to be. Play.”

That word — play — lingers.

Running, for him, was not just sport; it was revelation. As his “young heart began to thump” and the trees blurred into green streaks, he glimpsed not a balance sheet, but a way of living. A life in motion. A life engaged.

What he sought was not accumulation but aliveness.

The Only Advice That Matters 🥾

In 1962, he told himself:

“Let everyone else call your idea crazy… just keep going. Don’t stop. Don’t even think about stopping until you get there, and don’t give much thought to where ‘there’ is. Whatever comes, just don’t stop.”

This, to me, is perhaps the best advice — maybe the only advice — any of us should ever give.

We spend so much time defining “there”. We obsess over milestones, titles, recognition. Yet the real work is in continuing — especially when the path is foggy, when the numbers don’t add up, when others shake their heads in polite disbelief.

Keep going.

Not blindly, not arrogantly, but steadily.

Keep going when your lungs burn.

Keep going when your accounts tremble.

Keep going when doubt whispers its favourite word — “quit”.

The memoir reminds us that greatness is rarely glamorous in real time. It is repetitive. It is exhausting. It is frightening. But if one keeps moving, one day the blur becomes a landscape.

The Real Victory 🥾

By the time I finished the last page, I did not feel I had read about a global brand. I felt I had walked beside a young man who refused to stop running — even when he had no clear map, no guarantees, no safety net.

Perhaps that is the deeper lesson.

We do not need perfect clarity.

We do not need universal approval.

We do not even need certainty about the destination.

We need only enough courage to take the next stride.

And then the next.

And then the next.

That is how a shoe dog built something lasting.

And that is how any of us might leave our own quiet mark on the world.🥾

#shoedog #nike #philknight

♥ ♥ ♥ ♥

© Jagat Singh Bisht

Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker

FounderLifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. 

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares