मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सरस्वती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ सरस्वती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सरस्वती नमस्तुभ्यं

वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि

सिद्धीर्भवतु मे सदा.

पाटीवर सरस्वतीचे चिन्ह काढून तिची पूजा करून वरील प्रार्थना केली जाते व विद्यार्जनास सुरुवात केली जाते. सरस्वती ही विद्येची देवता आहे. वरील प्रार्थनेचा अर्थ असा आहे की सर्वांच्या सर्व कामना पूर्ण करणारी माता सरस्वती, मी तुला नमस्कार करते. मी आज विद्या ग्रहण करण्यास सुरुवात करत आहे. माझ्या या कार्यात तू मला सिद्धी दे.

ऋग्वेदात सरस्वती देवीला सर्वोत्तम मातृशक्ती, सर्वोत्तम देवी आणि सर्वोत्तम नदी असे म्हटले आहे. वैदिक काळात सरस्वती ही एक प्राचीन नदी होती. सरस्वती देवीला बुद्धी आणि ज्ञानाबरोबरच सर्व नद्या, झरे, वायु, ध्वनी व प्रवाहित जलांची अधिष्ठात्री देवी मानले जाते.

माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी व श्री पंचमी असे म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.

ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायची ठरवले. त्यावेळी त्याला एका सहचराची मदत हवी होती. तो म्हणाला, मला खराखुरा जोडीदार हवा आहे. त्याने माझ्या कामात जोडीने मदत करायला हवी. शिवाय तो बुद्धिमान, शांत, विद्वान, विद्यासंपन्न, कलानिपुण आणि सुसंस्कृत असावा. त्याची स्वतःची जीभ आणि मन यावर त्याचा पूर्ण ताबा असावा. आणि अहो आश्चर्यम्! एक अत्यंत लावण्यवती स्त्री मधुर स्मित करत त्याच्यासमोर प्रगट झाली. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या आगमनामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी तुला सरस्वती वाग्देवी आणि वाणी या नावांनी हाक मारेन. तू ज्ञानाचे आणि संवादाचे निधान आहेस. या तिन्ही नावांमधून तुझे हेच गुण प्रतीत होतात. इथून पुढे सर्वच राज्यसृष्टी ज्ञान, कला आणि वाणी यांची देवता म्हणून तुझे आराधना करेल. आणि उभयतांनी एकत्र बसून विश्व निर्मितीच्या कामाचा शुभारंभ केला.

ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वती. ती विद्येची, ज्ञानाची आणि कलेची देवता आहे. ती नेहमी शुभ्र वस्त्र धारण करते. तिच्या हातात नेहमी वीणा असते. ती नेहमी वीणावादन करताना दाखवली जाते. तिला वीणावादिनी असेच म्हणतात. तिच्या एका हातात जपमाला तर दुसऱ्या हातात एक ग्रंथ असतो. आणि तिच्या चेहऱ्यावर कायम मंद असे हसू आपल्याला दिसत असते. तिचे वाहन म्हणजे हंस. सरस्वती शांतीप्रिय देवता आहे. आपल्या भारतातच नव्हे तर इतर अनेक देशातही तिची पूजा केली जाते. तिला वाग्देवी असेही नाव आहे. वाग्देवी याचा अर्थ वाणीची देवता. सरस्वती बुद्धिमत्तेचं, ज्ञानाचं आणि विद्येचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक महान वक्ते, लेखक आणि विद्वान तिचे उपासक आहेत. ती नेहमी मितभाषिणी असते.

सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ देवता आहे. तिला वाणी, वाग्देवता, वागेश्वरी, शारदा, भारती, वीणापाणि, ब्रह्मी, विशाला, मेधा, कुटीला अशी ही नावे आहेत. ती ललित कलांची अधीष्ठात्री देवता आहे.

ती शुभ्रवर्ण, शुभ्र वस्त्रधारिणी, अलंकार विभूषित, चतुर्भुज, पुंडरीकमाला, वीणा व कमंडलू धारण करणारी आहे. पुस्तक व वीणा हे तिची प्रमुख आयुधे आहेत. तिच्या मूर्तीशिल्पातून कमळ, हंस, मोर इत्यादी वाहने दाखवली जातात. मात्र हंस आणि मोर ही तिची लाडकी वाहने आहेत. ती कमलासनात बसलेली असते.

ओम् श्री श्री महा सरस्वती देवी भगवती नमः

हा तिचा मंत्र आहे. सरस्वती वंदना खालील प्रमाणे आहे.

या कुंदेदुतुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता ||

 या वीणावरदण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना ||

 या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता ||

सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष्यजाड्यापहा ||

एक दिवस देवी सरस्वती सत्य लोकांमध्ये वीणा वादनात गुंग झाली होती. त्यावेळी असुरांनी तिच्याकडे असलेला ज्ञानाचा ग्रंथ चोरला आणि ते पृथ्वीवर पळाले. सरस्वती देखील त्यांच्या मागोमाग आली पण पृथ्वीतलावर पोचल्यावर तिच्या लक्षात आले, आपण इतर देवदेवतांप्रमाणे लढू शकत नाही. त्यासाठी लागणारी शस्त्रे आपल्याकडे नाहीत. आणि आपली ती क्षमताही नाही. त्यामुळे तिने स्वतःकडे असलेल्या शक्तीचा वापर केला. या असुरांचा नाश करण्यासाठी तिने एका खळाळत वहाणाऱ्या नदीचं रूप घेतलं. आणि आपल्या पाण्याच्या प्रवाहात या असुरांना बुडवून टाकलं. त्या प्रवाहाचा वेग पाहून असुर गर्भगळीत झाले. त्यांनी तो ग्रंथ नदीच्या काठी टाकला आणि सूंबाल्या ठोकला. तो ग्रंथ घेऊन तिनेही त्यांचा नाद सोडला. आता यानंतर तिने ब्रह्मलोकी परत जायची तयारी सुरू केली. पण त्या प्रदेशात रहाणाऱ्या महर्षींना, ऋषीमुनींना तिच्या आगमनाची वार्ता योगसामर्थ्यामुळे कळली. त्यांना तिच्या त्या ग्रंथाविषयी सुद्धा कळलं. ते सर्वजण ताबडतोब तिचे दर्शन घेण्यासाठी आले. तिथे त्यांना हातात ज्ञानाचे पुस्तक घेतलेल्या देवी सरस्वतीचं मूळ रूपात दर्शन झालं. त्यांनी तिची करुणा भाकली. माते, आम्ही अगतिक आहोत. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू आमच्या मदतीसाठी इथे पृथ्वीवरच वास्तव्य करून राहशील का? सरस्वती गूढ हास्य करत म्हणाली, मला गेलं पाहिजे. मला ब्रह्मदेवांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी जायलाच हवं. पण तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत तर ती मला ऐकू येईल. मी इथून परत जाताना माझ्या शक्तीचा छोटाच प्रवाह इकडे सोडून जाईन. तो माझ्या नावाने सरस्वती नदी म्हणून येथे वहात राहील. ही नदी वहात जाऊन प्रयाग तीर्थक्षेत्रावर गंगा आणि यमुना या नद्यांना मिळून तिचा संगम होईल. आम्ही तीन नद्या त्या ठिकाणी भेटू. त्या ठिकाणाला प्रयागराज असे नाव असेल. त्यानंतर माझी ओळख नाहीशी होईल. तेव्हापासून सरस्वती नदी पृथ्वीवर वहात आहे.

… ही नदी काही भागात जमिनीखालून वहात असल्यामुळे तिला गुप्तगामिनी या नावाने ओळखण्यात येते. अशा या विद्येच्या देवतेला कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य…माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य – – 

सेरेना विल्यम्स (वय ४४) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण ५०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती—सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून जमा झालेली सर्व रक्कम – लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि स्वतःचा कुठलाही विमा नसलेल्या लोकांसाठी १, २०० खाटांचे, संपूर्णपणे मोफत असे रुग्णालय उभारण्यासाठी निधी म्हणून वापरली आहे.

बांधकाम कामगार सांगतात की सेरेना गेल्या ११४ दिवसांपासून थेट साइटवरच तंबूत राहत आहेत — नंगेपाय, पहाटे ३ वाजता गाड्या ढकलत काम करत आहेत, आणि या दरम्यान त्या गर्भवतीही आहेत.

– – या रुग्णालयात सर्व काही कायमस्वरूपी १००% मोफत असेल.

– – आणखी विशेष म्हणजे या रुग्णालयासाठी MRI मशीन खरेदी करायचं म्हणून त्यांनी गेल्या आठवड्यात आपला फ्लोरिडातील भव्य बंगला विकला.

आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं. , जे सेरेना यांच्याकडे आहे. हे खरे आजचे आदर्श व्यक्तिमत्व… त्यांना मनापासून प्रणाम.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देव दे व्हाऱ्यात नाही…लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ देव दे व्हाऱ्यात नाही…लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

देव देव्हाऱ्यात नाही…

आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. आपल्या भवतालात खूप घडामोडी होत असतात. चांगल्या वाईट बातम्या ऐकायला/ वाचायला मिळतात.

एखादी चांगली घटना घडली की आपण आनंदून जातो आणि दुःखद बातमी असेल तर आपण हळहळतो.

२४ जानेवारी, २०२६ हा दिवस मला आणि माझ्या ओळखीतील अनेकांना एक वेगळा अनुभव देऊन गेला.

२३ जानेवारीला दुपारी एका अप्रिय घटनेला सामोरे जावं लागलं.

माझी मैत्रीण, सुप्रिया पाटणकर – भरतनाट्यम् नृत्य शिक्षिका (बदलापूर) हिच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली. तिचे पती सुनील पाटणकर यांचं brain hamorrhage मुळे निधन झालं. मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी सुनीलला ठेवलं होतं. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही अपयश आलं होतं. डॉक्टर हे समाजसेवक असतात… पेशंट हाताळताना आपल्यासारख्यांना देवासमान भासतात. सुनील यांच्या या परिस्थितीत डॉक्टरांनी सुप्रिया आणि त्यांचा मुलगा – संकल्प यांच्यासमोर एक वेगळा प्रस्ताव मांडला – *अवयव दानाचा! * 

सुप्रिया आणि संकल्पनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आणि अवयव दानाचा निर्णय घेतला. तिने एकच गोष्ट डॉक्टरांना सांगितली – अवयव दान हे गरजू माणसांना करायचं आहे.

आजवर रक्तदान, नेत्रदान, क्वचित झालेलं देहदान इतपतच बातम्या मला परिचित होत्या… त्या ही लांबच्या, ऐकीवातील व्यक्तींच्या बाबतीत…

२४ तारखेला सकाळी ही procedure सुरू होणार होती. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुप्रिया समोर आल्यावर कसं समोर जायचं, काय बोलायचं ते कळत नव्हतं. एक मनाशी नक्की ठरवलं होतं की, तिच्याबरोबर थांबायचं… तेवढीच मदत करणं माझ्या हातात होतं.

मैत्रीण म्हणून आम्ही रोज भेटत होतो असं नाही पण भेटल्यावर सहज संवाद सुरू व्हायचा तसा कालही झाला. अवयव दानाच्या निर्णयावर ती खूप समाधानाने बोलत होती. माझ्या मनात मात्र अनेक विचारांची गर्दी… सुनील अचानक आजारी कसा पडला इथपासून ते हे सगळं कसं पार पडेल यासारखे अनेक प्रश्न…

घट्ट पकडलेल्या हातातून प्रिया खूप काही व्यक्त झाली होती. तिला हवी असलेली space मी दिली… काहीच विचारलं नाही. मनातून खूप गलबलून आलं होतं पण तिचा निर्धार बघून या परिस्थितीत दु:ख व्यक्त करण्यापेक्षा तिला सोबत करणं महत्त्वाचं होतं.

सकाळी सहा वाजल्यापासून organ removal procedure सुरू झाली होती. अंदाजे आठ एक तास या सगळ्याला लागतील असं डॉक्टर म्हणाले. Emergency ward च्या तळमजल्यावर waiting space मधे आम्ही थांबलो होतो. १२. ३० च्या सुमारास डॉक्टरांनी निरोप पाठवला… आता एकेक अवयव रेड बॉक्समधून ambulance मधे पाठवतील… तुम्हाला सांगतील.

तिथे ड्युटीवर असलेल्या काकांनी त्या पॅसेजमधल्या खुर्च्या बाजूला सारून जागा मोकळी केली. पुढच्या १५ – २० मिनिटात security guards, organ donation team यांच्यासमवेत पहिला रेड बॉक्स आमच्यासमोरून ambulance पर्यंत गेला. सुनीलची एक किडनी कुणासाठीतरी रवाना झाली. त्यानंतरचे दोन तास काही मिनिटांच्या अंतराने असेच बॉक्स बाहेर गेले. प्रत्येक वेळी आम्ही एकच प्रार्थना करत होतो… आता ते योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचू देत आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊदे.

प्रत्येक बॉक्सला अभिमानी नजरेने प्रिया सॅल्युट करत होती. अनेक ठिकाणी पोहोचणाऱ्या सुनीलचा निरोप घेऊन समोर आलेल्या परिस्थितीला स्वतःचं वर्तमान आणि अनेकांचं सुंदर भविष्य ही सकारात्मक खुणगाठ मनाशी घट्ट करत होती.

त्यानंतर एखाद तासात त्याच जागेवर वेगळी धावपळ सुरू झाली. हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ, ज्युनिअर डॉक्टर्स संपूर्ण कॉरीडोअरमधे दुतर्फा उभे राहिले. लीफ्टमधून सुनीलला स्ट्रेचरवरून खाली आणलं. दुतर्फा उभ्या असलेल्या सर्वांनी पांढरे गुलाब वाहून श्रद्धांजली अर्पण केली. एखाद्या सैनिकाला मानवंदना द्यावी तशी सुनीलला सर्वांनी उभं राहून guard of honour बहाल केलं. डोळे, Lungs, Liver, दोन्ही Kidney Pancreas, bones, skin या सगळ्या अवयव दानाची certificates सुप्रिया आणि संकल्पकडे देण्यात आली. प्रत्येक सर्टिफिकेट देताना प्रियाविषयी अभिमान आणि हळहळ अशा संमिश्र भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात दाटून आल्या होत्या. Organ donation team व सुप्रिया यांच्यातील co-ordinator ज्योती मॅडम, नर्सिंग स्टाफ, सुनीलवर उपचारांसाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्टर्स या सर्वांसाठी प्रिया आज आदर्श ठरली होती. प्रत्येकाच्या बोलण्यात इतकंच होतं… एकाच वेळी इतक्या अवयवांचं दान आजवर बघितलं नाही. प्रत्येक जण सुप्रियाला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत होते. फोर्टीस हॉस्पिटलमधील(मुलुंड) २०२६ या वर्षातील हे पहिले दान होते. या सर्व औपचारिकतेनंतर पार्थिव घेऊन बदलापूरला जायची तयारी झाली – त्याच्या गावात, राहत्या घरी!

सुप्रिया आणि संकल्पबरोबर थांबायचं ठरवलं होतं ते निव्वळ सोबत म्हणून… पण त्या दरम्यान जे अनुभवलं, जे शिकले ते कुठल्याच अभ्यासक्रमात मिळालं नसतं. सुप्रियाचा कणखरपणा, दातृत्वाचं समाधान, तिने फक्त संकल्पवरच नव्हे अनेकांवर कृतीतून केलेला संस्कार हे खूप जवळून बघितलं. सुनीलच्या अचानक जाण्याने मनातून हलले होते तरी सुप्रियाच्या निर्णयाने विचारांना गती मिळाली होती, कक्षा रुंदावल्या. पुण्यकर्माची व्याख्या मनोमन बदलली आणि इतकंच म्हणावसं वाटलं…

देव देव्हाऱ्यात नाही

तव कर्मात मी पाही

मूर्त रूपी जो पूजिला

अमूर्त रूपी जाणिला

तोच तव बुध्दी दाता

तोच कर्ता करविता 

अंशरूपी ठायी ठायी

तव निश्चये जो जाई

सचेतन तो राही

लाभे जन्माची पुण्याई 

अनेकांना जीवन देई

कृतार्थ तव विचारे

नतमस्तक मी होई…

नतमस्तक मी होई…

सुनीलचा आकस्मिक मृत्यू स्विकारून यातून काय सकारात्मक करता येईल तर ते अवयव दान! हा निर्णय सुप्रियाने घेतला या विचारामागे सुप्रियाच्या आई वडिलांच्या संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. राधा मावशी आणि नाना काका दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, खंबीर मनाची माणसं होती…

तेच अगदी तेच सुप्रियाला बघताना आठवत होतं. आई-वडिलांच्या पश्चात त्यांचे संस्कार जपणं हेच तर महत्वाचं!

सहा महिन्यांपूर्वी सासरे गेले असताना आजारातून बाहेर पडू पाहणाऱ्या सासूबाई, महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर असलेला लेक यांना सांभाळण्यासाठी सुप्रिया स्वतःला सावरत होती. या सगळ्यात सावलीसारखी वावरत होती ती मुग्धा – सुप्रियाची खरं तर धाकटी बहीण!

पण या प्रसंगी आईसम आधार देणारी, वेळोवेळी तिला जवळ घेऊन समजवणारी मुग्धा सगळी procedure पूर्णत्वाला जाईपर्यंत सर्व धावपळ करत होती. मागचे तीन दिवस, तीन रात्र तीच होती आणि आता आयुष्यभर तीच असणार आहे सुप्रियाबरोबर!

कधीतरी गप्पा मारताना सहज अवयव दानाविषयी सुनील बोलून गेला होता ते धैर्याने सुप्रियाने पार पाडलं आणि साहचर्याची एक वेगळी ओळख सुप्रियाकडून बघायला मिळाली.

सुनील आणि सुप्रियाचा प्रचंड जनसंपर्क, प्रेमाने जोडलेली अनेक माणसं तिला मनोमन प्रार्थना करून धीर देत होती.

सदैव हसत खेळत, मनमिळाऊ असलेला सुनील अस्ताला जाताना सुध्दा अनेक घरांमध्ये आनंद वाटून गेला. अनेकांना आयुष्याचं वरदान देऊन गेला. सुनील नावाच्या अर्थाप्रमाणे जगताना तो शांत, आनंदी आणि स्वच्छ मनाचा होताच पण मृत्यूनंतरही अनेकांना सुंदर आयुष्य देऊन गेला.

सुनीलसाठी शब्द सुमनांजली

 सुप्रिया आणि संकल्पच्या निर्णयाला सलाम!

लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे

प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे

घरी “काहीच करत नाही” अशा स्त्रियांना समर्पित —

जिथे त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…

स्पेनमधील टोरेलाव्हेगा या शहरात एक विलक्षण कांस्य शिल्प उभं आहे — — 

एका स्त्रीच्या पाठीवर संपूर्ण घराचं ओझं ठेवलेलं : वॉशिंग मशीन, पोछे, बादल्या, इस्त्रीची पाटी आणि अजून बरेच काही. कलाकार मेर्सिडिज फिमेनिया यांनी घडवलेलं हे सार्वजनिक शिल्प “ला मुझेर डेल डिटर्जेंटे” (दि डिटर्जंट वुमन) नावाने ओळखलं जातं… 

… हे जगभरातील महिलांनी रोज करीत असलेल्या — दिसत नाही, पैसे मिळत नाहीत, पण घर चालवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या — तिच्या सर्व कामांना अर्पण केलेलं स्मारक आहे: स्वयंपाक, साफसफाई, मुलांची देखभाल, घरव्यवस्थापन… अनेकदा घरातल्या कोणत्याही व्यक्ती कडून कौतुक किंवा विश्रांतीशिवाय…

… हे शिल्प एक सार्वत्रिक सत्य सांगतं: “घरी काहीच करत नाही” या वाक्याच्या मागे खरं म्हणजे ती सगळंच करते — घर सांभाळण्यापासून ते भावनिक तें कणखर आधार बनण्यापर्यंत…

 

– – – हे फक्त कला नाही तर जगाला दिलेला संदेश आहे — अदृश्य कामाची किंमत ओळखण्याचा आणि योग्य सन्मान देण्याचा. ती काहीच करत नाही” म्हणणं थांबवूया — आणि “ती सगळं करते” असं म्हणूया.. प्रत्येक आईसाठी…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैन्याचा निडर चेहरा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

(साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.) 

इथून पुढे – —- 

आय. ई. डी. अर्थात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोजीव डिवाईस घराच्या दरवाजाजवळ लावायचे… रिमोटने त्याचा स्फोट घडवून आणायचा… त्या घराला भगदाड पडले की त्यातून आत शिरायचे आणि अतिरेक्यांना शोधून ठार मारायचे! अर्थात अतिरेकी सुद्धा प्रशिक्षित असतात… त्यांनी भारतीय सेनेची ही चाल ओळखली… त्यांचा गोळीबार एक मिनिट थांबला… याचाच अर्थ ते दोघे जागा बदलण्याच्या प्रयत्नात होते… स्फोटक लावल्यावर साहेब आणि आवेश कुमार तिथून मागे सरले… कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला… त्या घराचा दरवाजा उध्वस्त झाला… पण या गडबडीत एक अणकुचीदार दगड उडाला तो थेट मेजर साहेबांच्या हेल्मेटच्या अगदी खालच्या भागात डोक्याला लागला… मोठी जखम झाली… कारण दगडाने नेमकी एक रक्तवाहिनी फोडली होती… आवेश कुमार यांनी साहेबांना तेथून औषधोपचारासाठी हलवण्याचा मनोदय बोलून दाखवताच… साहेबांनी त्यास नकार दिला! एका सैनिकाने त्यांच्या डोक्याला मलमपट्टी केली. पंधरा मिनिटे गेली… वरून पुन्हा दोन रायफली धडाडू लागल्या! अंधार झाला होता. आता आणखी काहीतरी करणे भाग होते! यावेळी मेजर ऋषी साहेबांनी एक वेगळे शस्त्र हाती घेतले… पेट्रोल भरलेल्या आणि त्यात घासलेटमध्ये भिजवलेल्या कापडी वाती. जगभरात हिंसक निदर्शनात हे आयुध भलतेच प्रभावी ठरले आहे.. याला मोलोटोव कॉकटेल म्हणतात! या बाटल्या आत फेकल्या की फुटतील आणि त्यातून निर्माण होणारी आग आणि धूर यांमुळे आत थांबणे अशक्य होईल… अशी योजना होती. बिळात लपलेल्या विषारी सापाला असे धुराने बाहेर काढावे लागते! साहेबांनी पुन्हा घराकडे धाव घेतली… किचनमध्ये एक बाटली फेकली… आतमध्ये आणखी काही बाटल्या फेकल्या… घरातील कारपेट, कापडाने पेट घेतला… आता अतिरेक्यांना दुस-या मजल्यावरून उड्या घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नव्हते! त्यांच्या स्वागतास भारतीय रायफल्स सज्ज होत्या! पण त्या घराची आग विझली! हा प्रयत्न वाया गेला होता! आता आणखी काहीतरी केलेच पाहिजे!

मध्यरात्र उलटून गेली होती. कर्नल पांडे साहेबही तिथे पोहोचले होते. ऋषीसाहेबांनी त्या घरात घुसून आणखी आय. ई. डी. लावण्याचा निर्धार केला. डोके रक्ताने भिजलेले… बराच रक्तस्राव झालेला… पण साहेब कुठेही थकलेले दिसले नाहीत… दुस-या कुणाला आय. ई. डी. लावायला आत पाठवावे हा सल्ला त्यांनी मानला नाही… म्हणाले… हे माझे मिशन आहे… मीच संपवणार! हे दोघे अतिरेकी निसटून जाता कामा नयेत!

मेजर ऋषी साहेबांनी पंधरा किलोचे दोन आय. ई. डी. नेण्याचे ठरवले… पहिला आय. ई. डी. हातात घेताच… त्यांना त्यांच्या मातोश्रींची आठवण आली… कसे कुणास ठाऊक त्या मध्यरात्रीही मातोश्री राजलक्ष्मी जाग्याच होत्या… साहेबांनी मोबाईलवरून घरचा नंबर डायल केला… पण त्यांचे बोलणे आईच्या कानांना ऐकूच गेले नाही… पण हृदयाला मात्र गेले असावे!

वरच्या मजल्यावरून येणारा फायर आता सातत्याने येऊ लागला… दोघे आलटून पालटून भयावह गोळीबार करीत होते… साहेब दोन्ही हातात पंधरा पंधरा किलोचे आय. ई. डी. घेऊन सावधपणे पोटावर सरपटत त्या उध्वस्त झालेल्या दरवाज्यातून शिरले… आवेश कुमार सोबत येऊ पहात होते… त्याला त्यांनी बाहेरच थांबायला भाग पाडले.. मोहिमेत त्याला काही झाले तर? त्याच्या घरच्यांना काय सांगणार? सोबतच्या कुणाही जवानाच्या जीविताला धक्का लागणार नाही, अशी खात्रीच साहेबांनी मोहीम सुरु करताना दिली होती.. ! लढ्यात सर्वांत पुढे मीच असणार!

ऋषीसाहेब आत शिरले… तळमजल्यावर एका जागी आय. ई. डी. लावले आणि मागे फिरले… तीस सेकंद होताच स्फोट होणार होता… सुरुवातीला लावलेल्या एका आय. ई. डी. पेक्षा या दोन स्फोटकांचा परिणाम दुप्पट होणार होता… वीस सेकंद झाले आणि ऋषी साहेबांच्या मनात आणखी काहीतरी आले… आपण लावलेले आय. ई. डी. त्या घरात आणखी आत लावले तर अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल… त्यांनी स्फोट घडवून आणू नका असा आदेश दिला!

साहेब सरपटत पुन्हा आत शिरले… ती स्फोटके उचलणार इतक्यात त्या अंधारात वरच्या मजल्यावरून खाली सरकणारी एक सावली त्यांना दिसली… तोंडाच्या अगदी जवळ… रायफल धडाडली… एका गोळीने डोक्यावरचे हेल्मेट उडवून लावले… दुसरी गोळी साहेबांच्या नाकाचा डावा भाग भेदून गेली… तिसरीने जबडा तोडला.. नाक राहिलेच नाही… डोळा अगदी थोडक्यात बचावला… पण डोळयांखालचा चेहराच राहिला नव्हता… त्याही स्थितीत साहेबांनी त्या आकृतीवर एक मोठी फैर झाडली… एक अतिरेकी खतम झाला होता!

बाहेर उभे असलेले आवेश कुमार आत धावले… साहेबांनी त्यांना खुणेनेच थांबवले… दुसरा अतिरेकी अजून जिवंत आहे! तो अतिरेकी खाली येऊ शकतो… त्याचा गोळीबार सुरूच आहे… कवर फायर घेत, आपल्या हातात आपला चेहरा घेऊन मेजर ऋषी रांगत, सरपटत बाहेर आले… ! निसर्गाची किमया म्हणावी… मोठी जखम झालेली शरीराला लगेच जाणवत नाही.. वेदना जणू काहीकाळ थबकून राहतात! एका कोपरावर सरपटत साहेब पुढे आले… एक मीटर उंचीच्या कुंपणावरून त्यांनी स्वत:ला खाली लोटून दिले! आणि उभे राहिले! त्यांना सावरण्यासाठी पुढे आलेल्या सैनिकांनी आ वासला… साहेबांचा चेहरा? तिथे फक्त मांसाचा गोळा होता! प्राथमिक उपचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती होती… वैद्यकीय साहाय्यक हादरून गेले होते… मेजर साहेबांना लष्करी जीपमधून जवळच्या हेलिपॅडपर्यंत नेण्यात आले… रात्रीची वेळ असल्याने लष्करी वाहने अडवून धरणारे दगडफेकी लोक सुदैवाने तिथे नव्हते… रूग्णालयापर्यंतचा प्रवास वेदनेने चिंब भिजलेला होता… लष्करी रुग्णालयात निरोप गेला होता… ९२, बेस हॉस्पिटल, श्रीनगर येथे मेजर सौ. अनुपमा नायर त्या रात्री ड्युटी करून घरी गेल्या होत्या… आणि ऋषी साहेबांच्या गुड नाईट फोनची प्रतिक्षा करीत होत्या… त्यांनी त्वरीत गणवेश चढवला आणि त्या रुग्णालयात पोहोचल्या.. ! मेजर ऋषी चक्क बसलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून आले होते… त्यांच्या जखमा पाहून डॉक्टर्स विचारात पडले होते… इथे यावर काहीही उपचार करणे अशक्य आहे… अशी त्यांची खात्री होती.. पण त्याहीपेक्षा तो चेहरा पाहून तेही हबकून गेले होते! मेजर साहेबांनी त्यांना थम्स अप केले! आणि डॉक्टरांचा हात हाती घेतला… जणू सांगत होते… मी ठीक आहे.. मी ठीक होईन.. तुम्ही चिंता करू नका!

डोक्याला झालेल्या जखमेतून आधी झालेला रक्तस्राव आणि आता झालेल्या भयावह जखमांतून होत असणारा रक्तस्राव डॉक्टरांना काळजीत पाडणारा होता. हा रुग्ण बेशुद्ध झाला तर समस्या वाढणार होती. त्याला झालेल्या जखमा जर त्याने पाहिल्या असत्या, त्याला समजल्या असत्या तर त्याचा मानसिक ताण येऊन अधिक रक्तस्राव होण्याची शक्यताही अधिक होती. रक्तस्राव थांबवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न झाले आणि दिवस उजाडताच हवाई दलाच्या विशेष विमानाने मेजर साहेबांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात धाडण्यात आले! याच दिवशी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांनी त्यांचे दोन खासे जिहादी हाफिज मोहम्मद आकीब उर्फ आकीब मौलवी आणि सैफुल्ला उर्फ उसामा हे भारतीय सैन्याकडून मारले गेल्याचे जाहीर केले… मेजर ऋषी यांनी केलेल्या या शिकारी होत्या… एक मोठे यश होते हे!

दिल्लीच्या रुग्णालयात ऋषी साहेबांनी कित्येक दिवस प्रचंड वेदना सहन केल्या… त्यांच्या चेह-यावर तब्बल २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने लागायचे त्या जखमा ब-या व्हायला… वेदनांचा लांबचा प्रवास होता हा. त्यांच्या शरीरातील एक हाड काढून ते जबड्यात बसवण्याचाही प्रयत्न झाला. पंचेचाळीस दिवस ते एक शब्दही उच्चारू शकले नाहीत. दातांनी चावून अन्न खाण्याची तर सोयच नव्हती… अन्न रबरी नळीतून पोटात घातले जात होते. पण हे सर्व होत असताना साहेबांचा दिसू शकणारा चेहरा कधी उदास दिसला नाही. इतरांना त्यांच्या त्या भगदाड पडलेल्या चेह-याकडे पाहणेही अवघड होते पण साहेब मनातून पुन्हा काश्मीरमध्ये परतण्याचा विचार करीत होते… कारण सैनिक खरा शोभतो तो रणांगणामध्येच.

मातोश्री राजलक्ष्मी त्यांना भेटायला रुग्णालयात आल्या तेंव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही… डोळ्यांतून आसवे गाळली नाहीत… लेकाला वाईट वाटू नये म्हणून. पण पुढे कधीतरी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्याची स्वप्ने पाहिलेल्या मुलाच्या चेह-याची अशी दुरवस्था पाहून त्या मनातून खचल्या मात्र असतील… पण आपल्या मुलाचा जीव वाचला याचे समाधानसुद्धा त्यांना होतेच. मेजर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करणारे शेकडो फोन त्राल गावातून केले जात असत… हमारे खान साहब को वापस भेजो.. हम उन्हें ठीक कर लेंगे! अशी आर्जवे लहान मुलं करीत असत… इतका विश्वास ऋषी साहेबांनी प्राप्त करून ठेवला होता!

भारताचे तत्कालीन सेनाप्रमुख आणि पुढे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान झालेले दिवंगत बिपीनजी रावत साहेब मेजर ऋषी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले असताना… ऋषी साहेबांच्या डोळ्यांत आसवे तरळली… कारण आपले सेनाप्रमुख उभे आहेत आणि आपण त्यांना उभे राहून सल्यूट करू शकत नाही! मेजर साहेबांची कहाणी समजावून घेतल्यानंतर रावत साहेबांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘सर्वांत नीडर सैनिक’ अशी उपाधी दिली!

ऋषी यांनी या दुखण्यातून सावरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले… आणि सैनिकी सेवेत पुन्हा पाऊल ठेवले… फक्त एकच बदल झाला होता… चेह-याचा हनुवटी ते नाकापर्यंतचा संपूर्ण भाग झाकणारा मुखवटा त्यांनी कायमचा अंगिकारला! हाच मुखवटा परिधान करून त्यांनी सेना मेडल पुरस्कार स्वीकारला!

मेजर साहेबांना बढती मिळून ते लेफ्टनंट कर्नल झाले असून त्यांना काश्मिरात पुन्हा जायची आंतरिक इच्छा आहे… त्राल गाव आणि तेथील नागरीकांवर त्यांचा जीव जडला आहे. सध्या त्यांना त्यांच्या जन्मभूमीची, केरळची राजधानी असलेल्या थिरूवनंतपुरम येथील पान्गोडे लष्करी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आहे. तिथे ते लष्करी जवानांना प्रशिक्षित करत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट, २०२४ मध्ये वायनाड गावात भयावह भूस्ख्लन झाले. त्या गावात बचाव कार्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी लेफ्ट. कर्नल ऋषी राजलक्ष्मी साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडली गेली. ऋषीसाहेब स्थानिक जनतेमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये खूप प्रिय असून ते महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये अजून स्फूर्तीदायक व्याख्याने देत असतात… त्यांनी त्यांची शरीरसंपदा अतिशय उत्तम राखली असून त्यांच्यापासून युवक प्रेरणा घेत आहेत… काळा मुखवटा (मास्क) परिधान केलेला असला तरी भारतीय सेनेचा हा सर्वांत सुंदर चेहरा राष्ट्रप्रथम भावनेच्या तेजाने लखलखत असतो… जयहिंद साहेब… तुम्ही ऋषी आहात.. तुम्हांला राजलक्ष्मी प्रसन्न आहे… आणि नायर म्हणजे नायक हे कुलनाम तुम्ही यथार्थ ठरवलेले आहे! खूप खूप शुभेच्छा!

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्तिसूत्र ३९ – – 

महत्संगस्तुदुर्लभोऽगम्योऽमोघश्‍च ॥ ३९ ॥

अर्थ : संत महापुरुषांची संगत दुर्लभ, अगम्य व अमोघ – (कधीही व्यर्थ न जाणारी) आहे.

विवरण :  मागील सूत्रात महात्म्याची कृपा हे भक्तीप्राप्तीचे अंतरंग साधन आहे असे सांगितले पण तो महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे असे ते म्हणतात. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ‘प्रत्येक पर्वतावर माणिक म्हणजे रत्न सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मौक्तिक (मोती) नसतो. प्रत्येक वनात उत्तम चंदनवृक्ष असतो असे नाही, त्याप्रमाणे सर्वत्र साधू दिसतात, सापडतात असे नाही. ‘ बहुतेक संसारी जीव अनादि अज्ञानमूलक संस्काराने शुभाशुभ पापपुण्याचे फल भोगीत असतात. त्यातही बहुतेकांची ऐहिक पारत्रिक विषयभोगातच अधिक प्रवृत्ती असते. मनबुद्ध्यादिकाना तेच संस्कार असतात. म्हणून त्यांची धाव विषयापावेतोच जाते, विषयसंपादन हाच पुरुषार्थ होऊन बसतो. अशा बहिर्मुखतेमुळे हृदयस्थ सच्चितानंद भगवंताचे यथार्थ ज्ञानही नसते. म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती होत नाही. एखादाच सत्त्वसंपन्न विचारी पुरुष पूर्वसुकृताने परमार्थमार्गात प्रविष्ट होत असतो.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसर्‍याच्या संगतीमधे रहावे लागणे अनिवार्य आहे. संगत ही परमार्थाला मारकही असू शकते किंवा पोषकही असू शकते. ऐहिकतेकडे, सुखासीनतेकडे मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो. पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बाणवावे लागतात. मद्यप्राशन कसे करावे? हे शिकवण्याची शाळा कुठेही नाही, परंतु आज मद्यार्क निर्मिती हा सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा उद्योग आहे आणि तोही महाराष्ट्रासारख्या सतांच्या भूमीत, हा दैवदुर्विलास नव्हे काय?

श्रीसमर्थ मनोबोधात संगती कशी असावी याचे वर्णन करतात.

जयाचेनि संगे समाधान भंगे । 

अहंता अकस्मात येउनि लागे ॥ 

तये संगतीची जनीं कोण गोडी । 

जिये संगतीने मती राम सोडी ||४५||

ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते. पण त्यामुळे मनाचे समाधान भंग पावते. मनुष्याचा जन्म होताच त्याची देहबुद्धि जागृत होते. देहबुद्धि नष्ट होणे हे परमार्थ प्राप्तीसाठी अत्यावश्यक असते. एक सुभाषित आहे.

सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: स चेद्धातुं न शक्यते ।

स सद्भि: सह कर्तव्य: सन्त: सङ्गस्य भेषजम् ॥

सुभाषितकार म्हणतात की मुख्य म्हणजे संगत कुणाचीच करू नये. पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी. समाजात राहून पूर्ण नि:संग होणे कुणाही मनुष्यास शक्य नाही. समाजात सज्जन-दुर्जन, चांगली, धूर्त, लबाड, वाईट सर्वच प्रकारची माणसे असतात. या सर्वांची संगत पूर्णपणे टाळणे शक्य नाही, तरीही कोणाच्या संगतीत रहावे व कोणाच्या संगतीत राहू नये य़ाचे स्वातंत्र्य मनुष्याकडे नक्कीच आहे. तेव्हा मनुष्याने विवेकाने नास्तिक, लोभी, दुर्जन यांची संगत टाळावी व संतांचीच संगत धरावी.

संगतीचा विलक्षण परिणाम मनुष्यावर होत असतो. मनुष्याच्या हातात कोणी काठी दिली तर तो काठी कुणाला मारण्याचा प्रयत्न करेल पण काठीऐवजी त्या मनुष्याच्या हातात आपण जपमाळ दिली तर मात्र तो त्या माळेने नामजप करण्याची शक्यता जास्त. काठीच्या संगतीचा परिणाम वेगळा आणि जपमाळेच्या संग लाभला तर मनुष्याच्या वागण्यात किती फरक पडतो आणि जर साक्षात भगवंताचा म्हणजे त्याच्या नामाचा संग लाभला तर त्या मनुष्यात किती फरक पडेल. संतसंगतीमुळे मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होते.

चोखंदळ वाचकांनी खालील मनाच्या श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।

परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।

धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥

*

मना सर्वही संग सोडुनि द्यावा।

अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।

जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥

*

मना संग हा सर्वसंगास तोडी।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधका शीघ्र सोडी।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥

*

एकनाथी भागवतात कृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे, त्यात भगवंत म्हणतात,

“ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती । 

देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥ 

कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती । 

तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे॥”

(संदर्भ:- एकनाथी भागवत अध्याय ११, १५४९, ५०)

पूर्वसुकृत उदयास आले तरच संतसंग लाभतो. ध्यानीमनी राम असेल तर आपल्या कामात सुध्दा राम दिसतो. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या पायाला कान लावला तर त्यातून रामनाम ऐकायला येई असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते.

माऊली म्हणतात की माझे अनंत जन्माचे पुण्य फळा आले म्हणून माझ्या मुखी नाम आले. साधकाने नाम घेताना हा भाव नित्य ध्यानी ठेवला तर नामाची गोडी खात्रीने चाखायला मिळेल असे वाटते.

लौकिक उदाहरण द्यावयाचे तर विजेचा प्रखर दाब जेथे साठविला गेला आहे त्या विद्युत घटाशी दुरून जरी स्पर्श झाला तरी ती वीज सर्वांगात क्षणात प्रविष्ट होते, तसे संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यानी कायावाचामनाने संपूर्ण व्यापून गेलेले असतात. तसेच सर्वानी याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा व आपले जीवन भगवन्मय बनवावे हीच त्याची धारणा व खटपट असते. याकरिता त्याच्या संगतीत कोणी कसा जरी आला तरी त्याचे गुण दोष याति न विचारिता, सर्व संत त्या व्यक्तीवर कृपा करीत असतात. कोणी कितीही अज्ञानी, दुष्ट, दुराचारी, पापी असला तरी त्याची ती पापशक्ती संतांच्या पापनाशक, तारक अशा करुणाशक्तीपुढे व्यर्थ होते म्हणून महत्संग ‘अमोघ’ आहे असे सूत्रात म्हटले आहे.

भक्तिसूत्र ४० – – 

लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥

अर्थ : केवळ भगवंताच्या कृपेनेच सत्संग लाभतो.

विवेचन :  मागील सूत्रात महात्संग दुर्लभ आहे असे सांगितले आहे. दुर्लभ म्हणजे अशक्य नव्हे, अशक्याचा विचारच करावयाचा नसतो. दुर्लभ म्हणजे सामान्य प्रयत्नाने प्राप्त न होणारा. ज्याकरिता काही विशेष अधिकार, विशेष साधन अपेक्षित असते, तसा महत्संग दुर्लभ म्हणजे अगदीच न प्राप्त होणारा असा म्हणता येत नाही, तर त्याचे जे साधन या सूत्रात सांगितले आहे त्यानेच प्राप्त होणारा तो आहे. ते म्हणजे भगवत्कृपा.

जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत सद्‌गुरू प्राप्त होत नाही असे एक वचन आहे. भगवंताची कृपा कधी होईल याचा काहीही नेम नाही. ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल, याचा अंदाज हवामान खाते सांगू शकेल, पण अमक्या वेळी अमुक ठिकाणी पाऊस पडेलच असे सांगणे शक्य नाही. भगवंताच्या कृपेच्या बाबतीत सुद्धा आपण हेच समजू शकतो. आजपर्यंत अनेक संत होऊन गेले, त्यांनी विविध प्रकारे साधन केले आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण इथे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. पण त्यांची स्थिती अमुक अमुक होती म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असे म्हणणे चुकीचे ठरू शकेल.

यावन्नानुग्रहस्साक्षाज्जायते परमात्मनः।

तावन्न सद्गुरुं कञ्चित्सच्छास्त्रमपि नो लभेत॥

पूज्य बाबा बेलसरे एका ठिकाणी म्हणतात. साधना करून काहीही साधत नाही. मग, साधना का करायची? साधना अशासाठी करायची की साधनाने साधत नाही हे कळण्यासाठी साधना करायची. शेवटी देवाची प्रार्थना करायची की देवा, मला शक्य ते मी सर्व केलेझ तरी तुझी प्राप्ती झाली नाही. आता तूच काहीतरी कर. असे केले तर मनात शरणागत भाव दृढ होऊ लागतो. ज्याक्षणी साधक संपूर्ण शरणागत होऊन देवाची आळवणी करतो, तेव्हा भगवंताला यावेच लागते…! द्रौपदीने काकुळतीला येऊन भगवंतांची प्रार्थना केली, भगवंत धावत आले. गजेंद्राने अशीच प्रार्थना केली, भगवंत त्याला वाचवायला आले.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र सामान्य प्रापंचिक मनुष्यासाठी आदर्श आहे, असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. संत तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांना साक्षात्कार होण्या आधीचे जे अभंग आहेत, त्यात ते पांडुरंगाला विनवणी करतात की देवा मला सत्संग घडू दे. त्यात ते सत्संगाचा महिमा अधोरेखित करतात.

“तुम्ही संत मायबाप कृपावंत| काय मी पतित कीर्ती वाणू ||१|| अवतार तुम्हां धराया कारण उद्धरावे जन जडजीव ||२|| वाढवाया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ||३|| तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन ||४||”

भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर एका अभंगात ते म्हणतात,

“आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी||बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया ||”

या सूत्रात ‘लभ्यते’ हे क्रियापद सहेतुक वापरले आहे. म्हणजे यात ‘लाभ’ होणे हा अर्थ ध्वनित होतो. लाभ हे शब्द अनुकूल व प्रयोजनयुक्त वस्तूच्या प्राप्तीकडेच केला जातो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे देणे उचित होईल.

“दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥

आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥ 

उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥३॥ 

तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥”

– – सत्संगतीपेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभच नाही, असे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात.

साधकाच्या हातात आपली साधना नियमितपणे करावी आणि आपला शरणागत भाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. भगवंत कृपा केल्याशिवाय रहाणार नाही.

भगवत्कृपा व सत्संग याच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला तो कसा सिद्ध होणार? याचे उत्तर पुढील सूत्रात दिले आहे.

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ३९ आणि ४०. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैन्याचा निडर चेहरा! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

एकेका हातात पंधरा पंधरा किलो वजनाची संहारक स्फोटके हातात घेऊन दुश्मनावर निर्णायक प्रहार करण्यासाठी पुढे निघालेल्या त्या तरुण, देखण्या आणि बहाद्दर सैन्याधिका-याच्या डोळ्यांसमोर त्याची जन्मदात्री उभी राहिली… कारण मोहिम जोखमीची होती… जिवंत माघारी येता येईलच याची शाश्वती दिसत नव्हती! चांगल्या पगाराची, सुरक्षित आणि विशेषत: कुटुंबात रमू देईल अशी सरकारी नोकरी सोडून जेंव्हा तो फौजेत निघाला होता तेंव्हा… आईसाहेबांनी फर्मावले होते… ”हाती शस्त्र धरीत प्रत्यक्ष रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करणार असशील तरच भारतीय सैन्याधिका-याची वर्दी परिधान कर! ” 

मध्यरात्र उलटून गेलेली… तरीही नेमकी त्यावेळी आई जागी होती… तिने लेकाचा फोन दुस-याच घंटेला उचलला. त्याचा फोन अशा अवेळी? पोरगं काहीतरी सांगत होतं… आणि तिला काहीही ऐकू येत नव्हतं… अत्याधुनिक रायफली गोळ्या डागताना खूप मोठा आवाज करतात… तो धमाका ऐकून तिच्या कानठळ्या बसल्या… काहीतरी अघटित होत असावं… तिचं काळीज थिजून गेलं… आणि फोनचा रिसीव्हर तिच्या हातातून गळून पडला! आता त्याचा पुन्हा फोन येईपर्यंत देवाचा धावा करीत बसावं… तिच्या मनानं तिची समजूत काढली!

 “आई, मी कदाचित जिवंत परतू शकणार नाही… पण तुला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूनच दाखवेन… तुझी शपथ! ” हे त्याचे शब्द आईपर्यंत पोहोचेपर्यंत हवेत विरून गेले… गोळीबाराचा, दारूगोळ्याचा वास त्या हवेत भरून राहिला होता! साहेबांनी आपला मोबाईल फोन खिशात ठेवला आणि ते पुढे सरसावले.

 सैनिक माता असलेल्या या मातोश्रींच्या सूनबाई सुद्धा तिकडं फौजेत कर्तव्यावर तैनात होत्या. केरळातल्या अलापुझा जिल्ह्यातल्या मुथूकुलम नावाच्या निसर्गसुंदर अशा छोट्या गावात राजलक्ष्मी वेणूप्रसाद नायर, लेकाच्या फोनची वाट पाहण्याशिवाय करू तरी काय शकणार होत्या? ऋषी लहानपणापासून देशाला सर्वस्व मानणारा युवक. अभ्यासात अव्वल होताच आणि साहसीसुद्धा. मनात आणले असते तर साऊथ चित्रपटांचा नायक सहजी झाला असता. पण त्याही पेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता अधिक होता. आश्वासक शब्दांनी लोकांशी संवाद साधण्यात त्याचा हात धरू शकेल असा मुलगा गावात नव्हता. उच्च श्रेणीत इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर केरळ वीज मंडळात साहाय्यक अभियंता ही नोकरी हात जोडून उभी होती. पण या नोकरीत आयुष्य घालवण्यासाठी ऋषी जन्माला आलेले नव्हते… हे काळाने सिद्ध केले. हुतात्म्यांच्या कथा त्यांच्या मनात रुंजी घालीत असत… फौजेचा गणवेश त्यांना खुणावत असे. हाती बंदूक घेऊन आपण शत्रूवर तुटून पडलो आहोत, अशी स्वप्ने त्यांना दिवसा पडायची… राष्ट्रगीत गायले जाऊ लागले की ते रोमांचित होत असत! त्यांच्यात एक शूर सैनिक लपला होता… आणि त्याला या नागरी जीवनात अडकून पडल्यासारखे झाले होते! केरळ विद्युत मंडळात नोकरीला लागून एकच वर्ष झालेले असताना ऋषी यांनी विशेष परीक्षा देऊन एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली. पण या नोकरीत ते रमणारे नव्हते… त्यांना शस्त्र, युद्ध खुणावत राहिले. शेवटी हजारो तरुणांमधून ऋषी इंडियन मिलिटरी अकादमी, देहराडून येथील सैन्याधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठी निवडले गेले. शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये कमालीचे स्वारस्य असलेल्या ऋषी यांना भारतीय सैन्याने नेतृत्वगुणांनी संपन्न केले… एका कोवळ्या तरुणाचे कणखर सैनिकात रुपांतर झाले होते. २०१० मध्ये ऋषी नायर मेकनाईझ्ड इन्फंट्री मध्ये रुजू झाले. भारतासारख्या वैविध्यपूर्ण सीमा आणि शत्रू अन्य कोणत्याही देशाला लाभलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक अधिका-याला, प्रत्येक सैनिकाला देशभर फिरवून आणले तरच गरजेच्या प्रसंगी अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. सेना ऋषी साहेबांना असाच अनुभव देत गेली. चीन सीमेवर गेली कित्येक वर्षे मोठा सशस्त्र संघर्ष झालेला नाही. पाकिस्तान सीमेवरून समोरासमोर लढत नाही. ऋषी साहेबांसारख्या सळसळत्या रक्ताच्या सैनिकाला त्याची तलवार आजमावून पाहण्याची संधी मिळावी तरी कशी? ते संयुक्त राष्ट्र संघाच्या आफ्रिकी देशांतल्या शांतीसेनेमध्ये सेवा करून आले होते. परंतु प्रत्यक्ष मैदानात मर्दुमकी गाजवण्याची संधी त्यांना लाभली नव्हती! ते सैन्यात येण्याआधी कारगिल होऊन गेले होते… आणि काश्मिरात त्यांना पाठवण्यात आलेले नव्हते!

परंतु कश्मीरने त्यांना जणू बोलावून घेतले… कारण भारतीय सैन्याची काश्मिरात गेली कित्येक दशके ‘रात्रं-दिन आम्हां युद्धाचा प्रसंग’.. अशी स्थिती आहे. हजारो अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास २००४ ते २०१४ या दशकात २०९३ निष्पाप नागरिकांचा बळी घेणा-या ४०४३ अतिरेक्यांना मारण्यासाठी सैनिक, अधिकारी, पोलिस, विविध संरक्षण दलांचे मिळून १०६७ जण धारातीर्थी पडले होते. काश्मिरात भारतीय सैन्य अखंडपणे युद्ध लढत आहे…! आणि हे समोरासमोरचे थेट युद्ध नव्हे! नव्या युद्धास्थितीला सामोरे जाण्यासाठी खास जम्मू-कश्मीरसाठी १९९० मध्ये तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एस. एफ. रॉड्रीक्स यांच्या नेतृत्वात आरपार कारवाई करणा-या आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. लेफ्ट. जनरल पी. सी. मनकोटिया साहेब या दलाचे प्रथम डिरेक्टर जनरल होते. भारतीय सैन्याच्या विविध विभागांतून या दलात निवडक सैनिक, अधिकारी बोलावून घेतले जातात. पाकिस्तानी घुसखोर अतिरेकी, स्थानिक अतिरेकी यांच्या कारवाया रोखणे हे प्रामुख्याने कर्तव्य असलेली राष्ट्रीय रायफल्स स्थानिक जनतेमध्ये विकासात्मक कार्यक्रमसुद्धा हाती घेते. काश्मिरी जनतेला भारतीय संघराज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सेना करते… म्हणूनच काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे!

त्यावेळी मेजर असलेले ऋषी राजलक्ष्मी यांनी राष्ट्रीय रायफल्सकडून २०१५ मध्ये आलेले बोलावणे आनंदाने स्वीकारले. काश्मिरातील त्राल नावाच्या भागात अतिरेक्यांनी उच्छाद मांडला होता. मेजर ऋषी यांनी या काळात येथे कंपनी कमांडर असताना अतिरेक्यांशी शस्त्राने लढण्यासोबतच स्थानिक जनतेशी प्रेमाचे नाते जोडण्यात चांगले यश मिळवायला आरंभ केला होता. शत्रूला शस्त्राने जिंकणे जेवढे महत्वाचे तेवढेच स्थानिक जनतेचे मन जिंकून घेणेही महत्त्वाचे आहे.. हे त्यांनी जाणले. अतिरेकीविरोधी मोहिमांत ऋषी साहेब हिरीरीने सहभागी होत… त्यांना शत्रूच्या रक्ताची चटक लागली होती… त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी कर्नल विक्रम कड्यान त्यांना म्हणत… ”कधी तरी तुला भीती वाटू दे.. एकदा तरी स्वत:च्या जीवाची काळजी कर! ” २०१५ मध्येच मेजर ऋषी इंडियन नर्सिंग सर्विसेसमध्ये श्रीनगर बेस आर्मी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या मेजर अनुपमा यांचेशी विवाहबद्ध झाले! मेजर साहेब स्थानिक तरुणांशी, विशेषता: लहान मुलांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होते. पाकिस्तानी अपप्रचाराला बळी पडून ही नवी पिढी चुकीच्या मार्गाला जाणार नाही यासाठी मेजरसाहेब सतत प्रयत्नशील असत. याच भागात बु-हाण वानी नावाचा तरुण अतिरेकी कुप्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने शेकडो काश्मिरी युवक पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढले होते. भारतीय सैन्याने या बु-हाण वानीला ८ जुलै २०१६ रोजी त्राल पासून साठ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोकरनाग येथे यमसदनी धाडल्यावर काश्मिरात मोठा गहजब उडाला होता. परंतु मेजर ऋषी यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही… कारण त्यांनी स्थानिक जनतेची विविध मार्गांनी मने जिंकून घेतली होती… स्थानिक लोक मेजर ऋषी यांना खान साहब म्हणून संबोधू लागले होते! चार मार्च, २०१७. शनिवार होता. त्राल मध्ये भारतीय सेनेचा स्थानिक नागरीकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपक्रम सुरु होता. वैद्यकीय शिबिरासाठी सुमारे हजारभर रुग्ण जमा झाले होते. दुपारचे तीन वाजले होते. शिबिरात मेजरसाहेब लोकांशी संवाद साधत असताना त्यांना त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीरज पांडे साहेबांचा तातडीचा संदेश आला… आकीब मौलवी हाफू गावात लपला आहे! बुऱ्हान वानीची जागा घेऊ पाहणारा, पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेला कमांडो, अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याला हवा असणारा आणि प्रत्येक वेळी निसटून पळून जाण्यात यशस्वी झालेला आकीब मौलवी! याला आता सोडायचा नाही… मेजर ऋषी साहेबांनी निश्चय केला. अगदी काही मिनिटांतच त्यांनी आपली क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज केली… आणि तेथून तीस किलोमीटर्स अंतरावर असलेल्या हाफू गावाकडे कूच केले…!

या प्रवासादरम्यान विविध घटकांशी संपर्क साधला जाऊन हाफू गावाभोवती सी. आर. पी. एफ. (सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स) आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी मोहिमेचे क्षेत्ररक्षण लावले! स्थानिक लोकांना भारतीय सैन्याची ही हालचाल समजली… त्यांनी आकीबच्या समर्थनार्थ मोठा जमाव आणला… दगडफेक सुरु केली. मेजर ऋषी तिथे पोहोचताच त्यांने एका सैनिकाला सोबतीला घेऊन गावातील घरांत शोध सुरु केला… अर्धा तास झाला तरी कुणी हाती लागेना. पोलिसांनी दगडफेक करणा-या जमावाला कसेबसे रोखून धरले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या एका घराबाहेर चार-पाच माणसांचा एक गट उभा होता… मेजरसाहेब थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले… त्यातील एकानेही तोंड उघडले नाही… परंतु त्यातील एकाचे डोळे एका विशिष्ट घराकडे एकदा वळालेले मेजरसाहेबांनी चाणाक्षपणे टिपले… त्याच डोळ्यांनी मेजरसाहेबांच्या नजरेला नजर दिली… सावज त्या घरात लपले होते तर! साहेबांनी त्वरीत धाव घेतली… निवडक साथीदार सोबतीला घेतले… त्या घराभोवती फास आवळायला सुरुवात केली. त्या दुमजली घराच्या सीमाभिंतीपाठी आपल्या जवानांनी आपापल्या जागा घेतल्या!

भारतीय सैन्याच्या नीतीनुसार मेजर ऋषी साहेबांनी आकीबला ‘शरण ये.. अभय देतो’ असे आवाहन केले… या आवाहनाला आकीबच्या रायफलने दुस-या मजल्यावरून गोळीबाराने आव्हान दिले… त्या घरातून एकाच वेळी दोन रायफल्स धडाडू लागल्या! आकीब एकटा नव्हता… पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदचा सैफुल्ला उर्फ उसामा सुद्धा होता.. आज दोन शिकारी गवसणार होत्या! आता सी. आर. पी. एफ. , जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी त्या घरावर नेम धरले… तीन तास गोळीबार सुरु होता! ते दोघे शस्त्रसज्ज होते.. आधुनिक रायफली आणि भरपूर गोळाबारूद! ही मोहीम दिवसाउजेडी संपली तर बरे… त्या घरावर छोट्या तोफांनी मारा करणे शक्य होते.. मात्र परिसरातील इतर घरांचे नुकसान, नागरीकांच्या जीविताला धोका नको म्हणून आर्टीलरी फायरचा पर्याय निवडला गेला नाही. त्याऐवजी त्या घरात स्फोटके लावून ते उडवून लावण्याची योजना आखली गेली. मेजर ऋषी साहेबांनी फोनवरून सीओ साहेबांची परवानगी मिळवली आणि पंधरा किलोचे एक स्फोटक हातात घेऊन ते त्या घराकडे निघाले… इतर सैनिक त्यांना कवरिंग फायर देऊ लागले… साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथांचे पिता व वडील बंधूंचा वेद, उपनिषदांचा अभ्यास होता. त्यामधील संकल्पनांचा पुरस्कार (एकेश्वरवाद, अद्वैतवाद, निर्गुण उपासना) त्यांनी ब्राम्होसमाजाची जडणघडण होतांना केला कारण राजा राम मोहन रॉय यांच्याबरोबर रविंद्रनाथांच्या वडिलांनीच ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. वडिलांच्या निधनानंतर, रविंद्रनाथांचे वडील बंधू ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले.

रविंद्रनाथांचाही वेद व उपनिषदांचा अभ्यास होता व सुरवातीच्या काळात त्यांच्यावर ब्राम्हो समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रभावही होता. मात्र ब्राम्हो समाजाच्या विभाजनानंतर हा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. संत तुकारामांच्या अभंगांनी ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांच्या कांही अभंगांचे बंगाली भाषेत रूपांतर केलं. आणि आपल्याला चांगलच ठाऊक आहे की संत तुकाराम सगुणोपासक होते. यावरून असं सिद्ध होतं की टागोर सगुण उपासनेच्या विरोधात तरी नव्हते.

‘ऋग्वेदी’ या टोपणनावाने लेखन करणारे पु ल देशपांडेंचे आजोबा (आईचे वडील) श्री. वामन मंगेश दुभाषी यांनी रविंद्रनाथांच्या हयातीतच गीतांजलीचं अभंग रूपात भाषांतर केलेलं आहे. टागोरांनी ऋग्वेदींना पाठविलेल्या आपल्या संदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की ऋग्वेदींनी माझ्या कवितांचं यथार्थ भाषांतर करून माझे विचार मराठी वाचकांपर्यंत पोचविले आहेत. ऋग्वेदींनी तर आपल्या अभंगांत परमेश्वराला उद्देशून हरी, नारायणा, अनंता, विश्वनाथा म्हटलं आहे. कुठे त्याच्या मुरलीचा उल्लेख आहे तर कुठे त्याच्या भासमान सगुण रूपाचा संदर्भ आहे. पूजन, अर्चन यांचा उल्लेख तर अनेक ठिकाणी आहे. पूजाअर्चा तर सगुण रूपाचीच होते ना!

ऋग्वेदींच्या अभंग गीतांजलीत असे उल्लेख आहेत की परमेश्वर भक्तांना विविध रूपात भेटतो, तसेच तो विविध नावांनी ओळखला जातो. मात्र टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीत असे उल्लेख नाहीत कदाचित् मूळ बंगालीत ते असावेत. कारण ऋग्वेदींनी मूळ बंगाली व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कवितांचा अभ्यास करून मग हे भाषांतर केले आहे. कदाचित भाषांतराच्या इंग्रजी भाषेच्या संस्कृतीच्या संदर्भात असे उल्लेख गैरलागू ठरले असते म्हणून ते इंग्रजी गीतांजलीत आले नसावेत. पण आपण सामान्य मराठी वाचक तर परमात्म्याला राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध रूपातच ओळखतो व हीच रूपं आपल्याला जवळची, ओळखीची वाटतात. म्हणून आम्ही आमच्या भावानुवादात परमेश्वराच्या या रूपांचा संदर्भ जागोजागी वापरला आहे.

—–

☆ गीत : २२ ☆

In the deep shadows of rainy July, with secret steps, thou walkest, silent as night, eluding all watchers.

To-day the morning has closed its eyes, heedless of the insistent calls of the loud east wind, and a thick veil has been drawn over the ever – wakeful blue sky.

The woodlands have hushed their songs, and doors are all shut at every house. Thou art the solitary wayfarer in this deserted street. Oh my only friend, my best beloved, the gates are open in my house — do not pass by like a dream.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २२ ☆

*

आषाढातील संध्याकाळी

हळुच उतरते नीरव रजनी

वर्षा ऋतूतील रिमझिम वेळी

तव पदरव, मी अधीर नयनी॥

सजग निळ्या, आतुर आभाळी

पांघरुन शामल, मेघांची दुलई

अशा शांत, निद्रिस्त सकाळी

लगबग कसली ऐकू न येई॥

 *

सुस्तावलेले आसमंत सारे

परांत चोची पक्षी घालती

घर दरवाजे पण बंदच सारे

झाडे झुडपे गीत न गाती॥

 *

एकच तू मम सखा प्रियतम

फिरसी एकटा निर्जन वाटेवर

जाशील निसटुनी तू स्वप्नासम

म्हणुनि उघडले द्वार नि अंतर॥

 *

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत: २३ ☆

Art thou abroad on this stormy night on the journey of love, my friend? The sky groans like one in despair

It have no sleep to-night. Ever and again I open my door and look out on the darkness, my friend!

I can see nothing before me. I wonder where lies thy path!

By what dim shore of the ink-black river, by what far edge of the frowning forest, through what mazy depth of gloom art thou threading thy course to come to me, my friend?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २३ ☆

*

रात्र वादळी अन् अंधारी

उदास नभ हे कण्हत उरी

नीज न ये मज ऐशा काळी

नेत्र पाहती तुझी वाटुली॥

प्रेमरथावर स्वार होउनि

येशील वाटे अंधारातुनि

पाही राजसा मी दाराशी

येई उदासी, तू नच दिसशी॥

 *

कुठुनि? कशी? वाट कोणती?

काळोखाच्या नदी जवळ ती?

की उपवनीच्या फुलाफुलातून?

की दुःखाच्या चक्रव्यूहातून?

शोध शोधिले वाट दिसेना

तव भेटीची आस मिटेना

शोधी तू मार्गा, ये मजपाशी

सखया, लवकरी ये दाराशी॥

* 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : २४ ☆

If the day is done, if birds sing no more, if the wind has flagged tired, then draw the veil of darkness thick upon me, even as thou hast wrapt the earth with the coverlet of sleep and tenderly closed the petals of the drooping lotus at the dusk.

From the traveller, whose sack of provisions is empty

before the voyage is ended, whose garment is torn and dust-layden, whose strength is exhausted, remove shame and poverty, and renew his life like a flower under the cover of thy kindly night.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २४ ☆

*

जरी दिवस तो असेल सरला

पक्षी कोटरी असे परतला

वारा शिणुनी, दमुनी बसला

मिटल्या कमली, भृंग गुंतला

 *

निसर्ग निद्रेच्या अधीन झाला

दे अंधाराची गोधडी मजला

 *

संचित सरले, प्रवास उरला

धोतर फाटे, सदरा मळला

 *

प्राणांमध्ये त्राण न उरला

असा प्रवासी शरण तुजला

 *

प्रवाशाची त्या लाज राखण्या

दारिद्र्य तयाचे दूर करण्या

 *

पुनर्जन्म जणु त्याला देण्या

मिटली कमले पुन्हा उमलण्या

 *

येई लवकरी दीनानाथा,

अंगुलीवरी गिरीराज तोलण्या

*

– क्रमशः भाग आठवा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परिक्षा – पालकांची ‘चिंता’ आणि विद्यार्थ्यांची ‘चिता’… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ परिक्षा – पालकांची ‘चिंता’ आणि विद्यार्थ्यांची ‘चिता’…  ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

नवीन वर्षाचा पहिला महिना उत्साहात संपतो. लगेच दुसर्‍याच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीतील मुलांच्या उत्साहाला परीक्षेचं ग्रहण लागतं. सूर्य – चंद्र ग्रहणाप्रमाणं विद्यार्थ्याच्या मनात काही काळ मानसिक अंधार दाटून येतो. अफवा आणि भीती पसरवली जाते. पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांची सावली मुलांच्या गुणात्मक तसेच वास्तव क्षमतेला झाकोळून टाकते. परीक्षेचं हे ग्रहण केवळ मुलांच्या गुणांवर परिणाम करत नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आणतं.

दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे केवळ विद्यार्थ्याचं शैक्षणिक मुल्यांकन नाही तर त्या कौटुंबिक मानसिक सहनशक्तीचं आव्हान ठरलं आहे. परीक्षेत ९० % पेक्षा कमी गुण म्हणजे अपयश आणि अपयश म्हणजे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा लोप होय. असा सर्वसाधारण चुकीचा समज आहे. अशा कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक वृत्तीमुळे परीक्षा काळात काही विद्यार्थी सोडले, तर इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत प्रचंड गोंधळ असतो.

 विद्यार्थ्यांची मानसिकता –

परफाॅर्मन्स एन्झायटी – चिंता 

पालकांना अपेक्षित असलेले गुण मिळतील की नाही. प्रश्नपत्रिका आपण केलेल्या अभ्यासावर असेल की नाही. वेळ पुरेल की नाही. किती गुण पडतील. मनात अनावश्यक विचारांची गर्दी होते. अनेक चिंता मुलांचा मेंदू पोखरून काढतात. एकाग्रता कमी होते. परीक्षेची भीती वाढते. परीक्षेला जायलाच नको असंही वाटायला लागतं. त्या ताणामुळं धाप लागणं, घाम फुटणं, शरीर थरथरणं, प्रचंड रडायला येणं असे शारीरिक परिणाम दिसतात.

तुलनात्मकता – वर्गमित्र, शेजारचा मुलगा, नातेवाईकांमधला एखादा मुलगा याच्याशी पालक सतत तुलना करत असतील तर मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांची चिडचिड होते. झोप – भूक कमी होते. वेदनादायक आजार बळावू शकतात. ‘शेजारच्या मुलाला पाहा’ हे वाक्य म्हणजे फक्त इतरांशी केलेली तुलना नाही तर सामाजिक प्रतिस्पर्धेचं लक्षण आहे. शेजारी, नातेवाईक अशा स्पर्धेत हिरीरीने पुढाकार घ्यायला भाग पाडतात.

हरणं जिंकणं शिकणं – हरणं जिंकणं याबरोबरच बरंच काही शिकायला मिळणं हे ही महत्त्वाचंच आहे. ठेचकाळून पडलं म्हणून कुणी पडूनच राहत नाही तसं परीक्षेत गुण कमी पडले म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे पुन्हा परीक्षाच न देण्याची मानसिकता करण्याची गरज नाही. आधुनिक मानसशास्त्र अडचणींतून परत उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर देतं. पण सध्या पालकांच्या कडक भूमिका मुलांमधे असहाय्यतेची भावना निर्माण करतात. ‘मी कितीही प्रयत्न केला तरी चांगले गुण मिळणार नाहीत’. असा मुलं सतत नकारात्मक विचार करायला लागतात. हरण्यातूनही जे शिकायला मिळतं त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल.

गुण = मूल्य – परीक्षेतील गुण हेच विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतात. परीक्षेतील गुणांशिवाय इतर कितीतरी कौशल्य त्याच्याकडे असतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जितके गुण जास्त तितका तो हुशार असा सार्वत्रिक गैरसमज आहे. परीक्षेतील अपयश हे केवळ शैक्षणिक अपयश आहे असं मानलं जात नाही. तर त्या विद्यार्थ्याला कुचकामी, निरुपयोगी ठरवलं जातं. त्यामुळं त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्याच्या यशाची रेषा त्याच्यापासून लांब होत जाते.

पुन्हा पुन्हा असमानता – बर्‍याचवेळा विद्यार्थ्याचं अपयश त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. बौद्धीक क्षमता असूनही त्याला आवश्यक ती शैक्षणिक साधनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं समाजात अपयशी ठरतो. त्याच्या मनात श्रीमंतीविरूद्ध द्वेष निर्माण होण्याची शक्यता बळावते. गरीब श्रीमंत विद्यार्थी भेद नसावा पण सरकारी शाळा आणि खासगी शाळा नियमितपणे हा भेद आणि पक्षपातीपणा रुजवण्याचंच काम करतात. दहावीच्या निकालानंतर ही तुलना मोठ्या प्रमाणात होते. सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा निर्माण करण्यास मदत करते.

पालक असे कसे…?

पालक स्वत:ची अपूर्ण स्वप्नं मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात.

घरातील टी व्ही बंद होतो.

पालकांचं स्वत:चं सामाजिक जीवन थांबतं.

घरी नेहमी असणारी माणसांची वर्दळ बंद होते.

मुलाचे खेळ, त्याचे छंद सगळं बंद होतं.

त्याला मित्रांमधे जाणं, गप्पा मारणं करू दिलं जात नाही.

मुलानी अभ्यासाव्यतिरिक्त काहीही करू दिलं जात नाही.

विद्यार्थी जगतातलं वास्तव –

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात १, ४२६ विद्यार्थ्यांवर केलेल्या २०२३ मधील अभ्यासानुसार, ७४% विद्यार्थ्यांना तीव्र शैक्षणिक ताण आहे. यावरून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो.

 हिमाचल प्रदेशातील शिमला मधील २०२२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ८३% विद्यार्थ्यांना मध्यम ताण आहे.

कोलकात्यात २०१५ मधे केलेल्या अभ्यासानुसार, ६३. ५% विद्यार्थी शैक्षणिक दबावामुळे तणावग्रस्त होते, तर ८१. ६% विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली.

तमिळनाडूमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये मुलींपेक्षा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चिंतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते.

कर्नाटकातील एक अभ्यास असंही सांगतो की, मुलांमध्ये अभ्यासाचा दबाव, गुणाची चिंता आणि स्वतःची अपेक्षा यांमुळे ताण जास्त असतो.

कोलकात्यातील एक अभ्यास असं सांगतो की, ६६% विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांकडून चांगल्या शैक्षणिक कामगिरीबद्दलचा दबाव आहे.

अनेक अभ्यास आणि NCRB च्या अहवालांनी भारतातील तरुण वयातील आत्महत्या आणि परीक्षचा ताण याचा संबंध जोडला आहे.

उपाय – 

पालकानी बुद्धिमत्तेची व्याख्या नीट समजून घ्यावी. परीक्षेतील गुणांवर बुद्धीमत्ता ठरवू नये. मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर ‘बहुबुद्धिमत्ता सिद्धांत’ सांगतात. ते म्हणतात, “परीक्षा केवळ तार्किक-गणितीय आणि भाषिक बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करतात. मुलाची सर्जनशीलता, सामाजिक कौशल्ये, भावनिक समज अशा इतर महत्त्वाच्या बुद्धिमत्ता परीक्षांमधून कळत नाहीत. “

सर्व शाळांमधे समुपदेशक, मानसतज्ज्ञ यांची नेमणूक करायला हवी. शहरी-ग्रामीण, सरकारी – खासगी, श्रीमंत-गरीब शाळांमधील मूलभूत सुविधा आणि दर्जा यात समानता आणायला हवी.

पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच भावनिक साक्षरता, ताण व्यवस्थापन, लवचिकता यांसारख्या कौशल्य आधारीत शिक्षणाची गरज आहे.

दहावी बारावीची अंतिम परीक्षा म्हणजेच यशस्वी भविष्य हा गैरसमज आहे हे लक्षात घ्यायला हवं.

डॉक्टर-इंजिनियर शिवाय करिअरचे अनेक पर्याय आहेत याची समाजात, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी.

सकारात्मक प्रेरणा द्याव्यात. त्यामुळं मुलांचं अंतर्गत कुतूहल आणि शिकण्यातील आनंद टिकवून ठेवतात.

परीक्षापूर्व, परीक्षाकाळ, परीक्षेनंतरचा काळ आणि सगळ्यात महत्त्वाचा निकाल या सर्व कालावधीत मुलांच्या वेदना समजून घ्याव्यात. वेदनेचं मुळ शोधावं. त्यानुसार मुलांशी संवाद साधावा.

आम्ही तुझ्यासोबत आहोत. परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी चालेल. आपण तो साजरा करू हा विश्वास मुलांना द्यावा.

शालेय व्यवस्थापनाने १००% निकालाचा हट्ट सोडायला हवा कारण त्याचाही ताण मुलांवर असतो.

ग्रहण म्हणजे तात्पुरता अंधार. अगदी तसंच परीक्षेचं असतं. दुर्बिणीतून ग्रहण बघणं सुरक्षित असतं. तसंच परीक्षेकडे चाचणीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भीती कमी होण्याची शक्यता वाढते. जसं ग्रहणामुळं सूर्याचं अस्तित्त्व संपत नाही तसं परीक्षेमुळं विद्यार्थ्याचंही अस्तित्त्व, त्याचं कर्तृत्त्व कधीच संपत नाही. ग्रहणात विशेष करून डोळ्यांची काळजी घेतली जाते. परीक्षाकाळात मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागते. ग्रहनानंतर सूर्य तसाच चमकतो जसा तो होता. परीक्षेनंतर मुलंही अधिक चमकतात हे लक्षात घेतलं तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत. पालकांच्या चिंता विद्यार्थी चितेच्या चरम सीमेपर्यंत पोहोचणार नाहीत.  

– – फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीची परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा!!!

 

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

श्री. बंकिमचंद्र चटर्जी 

वंदे मातरम्” या गीताची रचना – – 

आपल्यापैकी अनेकांना कदाचित हे माहीत नसेल की, एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या भांडणामुळेच “वंदे मातरम्” या गीताची रचना झाली? सुमारे १५० वर्षांपूर्वी, पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील बॅरॅक स्क्वेअर (आताचे स्क्वेअर फील्ड) मैदानावर एक वाद निर्माण झाला, ज्याने बंकिमचंद्र चटर्जी यांना हे देशभक्तिपर गीत लिहिण्याची प्रेरणा दिली. जर त्या क्रिकेट सामन्यादरम्यान ब्रिटिश कर्नल डफिनने बंकिम बाबूंवर हल्ला केला नसता, तर कदाचित ‘वंदे मातरम्’ हे गीत कधीच लिहिले गेले नसते.

हा वाद १८७३ मध्ये बहरामपूर छावणीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डफिन यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या एका क्रिकेट सामन्यापासून सुरू झाला. १५ डिसेंबरच्या संध्याकाळी, मुर्शिदाबाद जिल्ह्याचे तत्कालीन डेप्युटी कलेक्टर बंकिमचंद्र चटर्जी आपल्या पालखीतून घरी परत येत होते. त्यांच्या नकळत, पालखी वाहकांनी क्रिकेटच्या मैदानावरून एक शॉर्टकट घेतला, ज्यामुळे खेळात व्यत्यय आला. रागाच्या भरात कर्नल डफिनने पालखी थांबवली, बंकिम बाबूंना बाहेर ओढले आणि त्यांना चार-पाच वेळा ठोसे मारले.

ही घटना प्रिन्सिपल रॉबर्ट हँड, रेव्हरेंड बार्लो, न्यायाधीश बेनब्रिज, लालगोलाचे राजा जोगेंद्र नारायण रे, दुर्गाचरण भट्टाचार्य आणि इतर अनेक ब्रिटिश व भारतीय प्रतिष्ठित व्यक्तींसमोर घडली.

बंकिम बाबूंनी या अपमानाबद्दल न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. १६ डिसेंबर १८७३ रोजी, त्यांनी मुर्शिदाबाद येथील जिल्हा दंडाधिकारी श्री. विंटर यांच्या न्यायालयात कर्नल डफिन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. साक्षीदारांना बोलावण्यात आले, परंतु बहुतेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही घटना नाकारली. तथापि, प्रिन्सिपल रॉबर्ट हँड, राजा जोगेंद्र नारायण रे आणि दुर्गाचरण भट्टाचार्य यांनी बंकिम बाबूंच्या बाजूने साक्ष दिली.

पुढील सुनावणी १२ जानेवारी १८७४ रोजी होणार होती. त्या सकाळी हजारो भारतीय आणि युरोपीय प्रेक्षक न्यायालयात जमले होते. सुनावणीदरम्यान, न्यायाधीश बेनब्रिज यांनी दंडाधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावले आणि बंकिम बाबूंना खटला मागे घेण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, परंतु नंतर कर्नल डफिन यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी या अटीवर ते सहमत झाले. अखेरीस, कर्नल डफिनने न्यायालयात हात जोडून माफी मागितली.

भारतीय तरुणांनी टाळ्या, हशा आणि “हो-हो” च्या घोषणांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बंकिम बाबूंना ठार मारण्याचा गुप्तपणे कट रचला. हे कळल्यावर, राजा जोगेंद्र नारायण राय यांनी बंकिम बाबूंना लालगोला येथे आमंत्रित केले, जिथे ते जानेवारी १८७४ मध्ये स्थलांतरित झाले.

लालगोला येथे, बंकिम बाबूंनी जगद्धात्री, दुर्गा आणि काली मंदिरांना भेट दिली. तिथे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताला एकाच ‘मंत्रा’ने कसे एकत्र आणावे याचा विचार केला. अखेरीस, ३१ जानेवारी १८७४ रोजी, माघी पौर्णिमेच्या रात्री, त्यांनी १२ अक्षरी ‘वंदे मातरम’ची रचना केली, ज्यामुळे भारतीयांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटली आणि ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण झाली.

नंतर, त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचे काही भाग १८८१ मध्ये बंगदर्शन मासिकात (खंड ७) प्रकाशित झाले आणि संपूर्ण पुस्तक १८८२ मध्ये प्रसिद्ध झाले. ब्रिटिशांनी बंकिम बाबूंवर कादंबरीतील मजकूर बदलण्यासाठी दबाव आणला, ज्यामुळे त्यांनी १८८५-८६ मध्ये सरकारी सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली.

१४५ वर्षांनंतरही, ‘वंदे मातरम’ आपल्या मनात देशभक्तीची भावना जागृत करत आहे! ही घटना सिद्ध करते की अपमान, न्यायासाठीचा लढा आणि स्वातंत्र्याच्या इच्छेतून ‘वंदे मातरम’चा जन्म झाला. आजही हे गीत आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करते. वंदे मातरम!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares