मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९८ ☆ कळले मला… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९८ ?

☆ कळले मला… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

धुक्यात दिसते धूसर हे शहर कळले मला,

तुझ्याच साठी जगले आजवर कळले मला!

*

उदास वाटा, निबीड जंगल, भयावह सर्व,

प्रकाश नव्हता, तिकडे लांबवर, कळले मला!

*

प्रवाह नेतो, आपण मुकाट जावे तिकडे,

अमृत समजत, प्राशावे जहर कळले मला!

*

 शिकवण होती, इथे ‘बायका जगतात असे’,

नवीन मुलगी आहे बेखबर कळले मला!

*

 नसतो दोषी, येथे कोणी, प्राक्तना समज,

नियती आहे लहरी जन्मभर कळले मला!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पत्र… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ समरूप… ☆ सौ. गौरी गाडेकर

प्रिय गौरी,

माझं पत्र पाहून तुला वाटेल नवल

आधी न कळवता सदा मी जातो जवळ

 *

पण तुझी गोष्ट वेगळी तू आहेस खास

म्हणून हे पत्र लिहिण्याचा मी केला प्रयास

 *

कधी कसा अचानक मी हळूच येईन

आणि तुला माझ्यासवे अलगद उचलून नेईन

 *

आई-बाबा, इतर जिवलग स्वागताला सारे

आनंदित होतील तुला पाहून भेटून सारे

 *

कधी न्यायचं तुला ते मलाच नाही ठाऊक

एकच जीव न्यायचा की जीव न्यायचे घाऊक

 *

तोवर तू इकडची आवराआवर करून ठेव

नात्यांमध्ये गुंतला जीव अलगद सोडवून ठेव

 *

आता घोळ घालू नकोस ठरव प्राथमिकता

एवढं लिहून निरोप घेतो – तुझा मुक्तिदाता

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१२ ☆ नववर्षाचं स्वागत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१२ ?

☆ नववर्षाचं स्वागत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ऐन मध्यरात्री

गतवर्षाचा हात सोडून

दुसऱ्याच क्षणी

त्याने

एक वर्षासाठी

नववर्षाचा हात धरला आहे

 

या क्षणीक आनंदासाठी

शोभेच्या दारुचा धूर

आणि

झिंग आणणाऱ्या

दारुचा पूर

आपण सारेच अनुभवतो

 

नववर्षाचा सूर्य पाहून

पक्षाचे थवे

आकाशात झेपावले

रात्रीचा धूर

अजून आकाशा कवेत

विसावला होता

त्याचा त्रास

पाखरांना

श्वसन घेताना

होत होता

 

दारुच्या पुरात

वाहून आलेले

काही युवक

अजून

लोळत पडले आहेत

नववर्षाचा सूर्य

त्यांनी पाहिलाच नाही

 

बरंच काही

दिलं घेतलेल्या

गतवर्षाच्या आठवणींना स्मरून

झालं गेलं विसरून

आपण सर्वांनी

नववर्षाचं स्वागत

केलं पाहिजे…!

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुसुम ज्योत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कुसुम ज्योत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कुसुम सुवर्ण ज्योत झळकते

पाचूंनी धरेचे अंगण सजते

*

स्पर्शाने धुंद लताकांती शहारे

तेजोमय शृंगार सृष्टी हसते.

*

चांदण पांघर झटकून नभ

हरिते प्रांजळ ओहोळ जाग्रते

*

डोंगर घाटी उजळून निघता

उषा देवता मृदमुख पुजते.

*

पुर्वदिशा क्षितीजास खुलविती

गाई हाकितो वनी कृष्ण भासते

*

तृणटोकी दव कळस होऊनी

पर्णपताके जणू टाळ भजते.

*

समई वात हळू तेवीत अग्नी

पंख पसरुनी भूमाता भिजते

*

चतुर्भुजांना नवचैतन्य भरे

समुह स्वरात कलकल गाते.

*

किरणकळ्या उघडूनी पुष्पांचे

प्रभात सुकुमार भाव प्रसूते

*

आत्मजीव ब्रम्हांडी क्रिया इंद्रिये

सरोवरी अणू हिरकण लेते.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सादर प्रणाम!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सादर प्रणाम!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

तीर्थ अंदमान | जिथे झाली सजा |

तिथे आता पूजा | क्रांतीसूर्या ||१||

*

मातृभूमी तुज | तन मन धन |

अर्पिले जीवन | सर्वार्थाने ||२||

*

सेल्युलर जेल |काळे पाणी शिक्षा | 

राष्ट्रयज्ञ दिक्षा | क्लेशदायी ||३||

*

अंधार कोठडी | रोज काथ्याकूट |

शिक्षेचा मुकुट | शिरावरी ||४||

*

फिरवून कोलू | तीस पौंड तेल |

शृंखलांचा वेल | देहावरी ||५||

*

राष्ट्रासाठी त्याग | तरी उपेक्षित |

गंधर्व शापित | विनायक ||६||

*

तात्याराव तुम्हां | सादर प्रणाम |

उपेक्षा विराम | शुभ दिनी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खेळ चाले माध्यमांचा

वास्तवाला झाकण्याचा

बोलतो रेटून खोटे

प्रश्न नाही लाजण्याचा

 *

गौरवाचे गीत गाता

तोल ढळतो लेखण्यांचा

 *

वारसा जपतोय आम्ही

जीवघेण्या श्वापदांचा

 *

ऐतखाऊ माणसाला

छंद नाही राबण्याचा

 *

आत्मप्रौढी ऐकताना

वीट आला भाषणांचा

 *

हे कसे स्वातंत्र्य आहे

जाच होतो बंधनांचा

 *

धर्म वेडे लोक झाले

विषय आहे चिंतनाचा

घ्या जरा अंदाज काही

यावयाच्या भाकितांचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घळ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ घळ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

विरळ झाडीतून पुढे जाणारी ती घळ

फार सजीव भासत होती खरी,

झाडांची कमतरता सोडली तरी

वाटत होती ती खूप भारी.

पाण्याचा स्रोत काही अंशी हजर होता ;

म्हणून की काय पक्ष्यांचा तिथे वावर होता.

संध्याकाळमुळे काळोखात ती बुडत होती,

असले असे तरी इतरांना ती निरखीत होती.

 *

पडलेल्या संध्येच्या लालीमेत ती

आणखीन खुलून दिसत होती.

लुप्त होऊ पहात असलेली ती

पाहत राहावी अशी वाटत होती.  

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कळतच नाही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कळतच नाही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कळतच नाही मतदाराला

कोणता झेंडा घ्यावा हाती

नेम नाही उमेदवाराचा आता

कोणत्या पक्षात कोण जाती!

*

देशभक्ती अन देशप्रेम हे

उमेदवारा असते वा नसते

सत्ता मिळविणे अन भोगणे

प्राधान्य केवळ हेच असते!

*

मतदार आता शहाणा होवो

व्यक्ती नव्हे देशभक्ती पाहो

जाती, भाषा, धर्मापलीकडे

देशहिताचाच विचार होवो!

*

 जाती, भाषा, धर्मापलीकडे

 देशहिताचाच विचार होवो!!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

राठी साहित्य – कविता ☆ श्री स्वामी समर्थ आरती… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

साकव्य विकास मंचने आयोजित केलेल्या आरती लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐

आरती लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक प्राप्त आरती “श्री स्वामी समर्थ आरती” आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “श्री स्वामी समर्थ आरती” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

!! श्री !!

  जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जय देव जय देव ||ध्रु||

 *

भक्तांचा तारक तू सागर करुणेचा

मार्ग दावी सकला अनन्य भक्तीचा

दत्तात्रय अवतारी हे जगत उद्धराया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया

जयदेव जयदेव ||

 *

भिऊ नको पाठीशी मीस्फूर्ती देतसे

श्री स्वामी समर्थमंत्र तारक होतसे

नाम मुखी वसो सदा मोक्षाप्रत जाया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया

जयदेव जयदेव ||

 *

अगाध महिमा तुमचा दयाघन स्वामी

मायपिता आमुचे तुम्हीच हो स्वामी

श्रद्धेचे बळ मिळो भवसागर तराया ||||

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जयदेव जयदेव ||

 *

जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया

ओवाळू आरती वंदन तव पाया ||

जयदेव जयदेव ||ध्रु||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

उत्पत्ती तेथे लय

लय तेथे उत्पत्ती

वर्ष बाविसचा लय

वर्ष तेविसची उत्पत्ती…

*

आत्मा तोच

वसन बदलले

तैसेचि हेही वर्ष

आकडे बदलले..

*

गताची नको खंत

स्वागतम् येणा-याचे

नवी उभारी, नवे संकल्प

कवच आहे सद्गुरुंचे…

*

किती गेले, येणार बरेच

भूतकाळात जमा हे वर्ष

असतील केल्या चुका अनेक

सुधारून त्या क्रमूया नववर्ष…

*

आणू तिव्रता साधनेत,

रिपूंना देवू मूठमाती,

नका दवडू वेळ,

सदगुरु आहेत सांगाती…

* नववर्षाच्या मन: पुर्वक शुभेच्छा *

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares