मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असं घडलं असतं तर… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🤔 असं घडलं असतं तर 🤔 श्री सुहास सोहोनी ☆

असं घडलं असतं तर …

चित्र थोडं वेगळं असतं …

असं घडलं नसतं तरी …

चित्र वेगळंच दिसलं असतं….!

 

अति श्रीमंती लाभती तर…

कष्टांचं मोल कळलं नसतं …

गरिबी झिम्मा खेळती तर …

भिक्षेचं मोल कळलं असतं …

 

नात्यांचा गुंता नसता तर …

मस्त कलंदर झालोअसतो …

गाणारा बंजारा किंवा …

भटका फकीर झालो असतो …

 

राजकारण चिकटतं तर …

नेता बिलंदर झालो असतो …

सत्ता पैसा हाव प्रतिष्ठा …

यातच गरगरत राहिलो असतो…

 

गुरूमुखातुन जर मिळता तर …

अनुग्रहाचा दैवी लाभ …

समाधिस्थ मग झालो असतो …

बर्फगुहेतिल योगी आज …

 

पण मी जसा आहे …

तसाच मी छान आहे …

गुणावगुणांचा या साऱ्या …

माझ्यात थोडा अंश आहे …

 

श्रीमंत आहे गरीब आहे …

बंजारा तसाच फकीर आहे …

वाडगाभरून सभ्य आहे …

तरी चमचाभर सद् बिलंदर आहे …

 

विश्वात्मका आता मला …

आत्मचिंतनाची लाव गोडी …

बर्फातल्या योगीयाची …

थोडी जुळावी रे जोडी …

🌹

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुरस्कृत कविता – सौर ऊर्जा… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पुरस्कृत कविता – 🌞 सौर ऊर्जा… 🌞 सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त~पादाकुलक)

नभांतरीचा रविराजा तो

 प्रकाश देतो या विश्वाला

किरण फेकितो प्रखर ऊष्णता

जीवन देतो चराचराला

 

अफाट संख्या प्राण्यांची या

धन सृष्टीचे कसे पुरावे

किरणोत्सर्गा अडवुनि आपण

सोलर ऊर्जा प्राप्त करावे

 

वीज निर्मिती करते ऊर्जा

कृषीवलांना पाणी मिळते

घरोघरी या ऊर्जेवरती

आनंदाचे जीवन जगते

 

या शक्तीचे महत्व आहे

पर्यावरणा रक्षण करते

खर्च एकदा करावा तरी

अवघे जीवन सुसह्य बनते

 

बुद्धीने ह्या मनुजाने तर

असे शोधले पर्यायाला

शक्तीचा या उपयोग करा

निसर्ग साठा जपावयाला

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – फक्त नि फक्त आई… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– फक्त नि फक्त आई… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

झरझर झरती पाऊस  धारा

जवळ कुठेही नसे निवारा 

कावरी बावरी माय जाहली

कसे वाचवू चिमण्या पोरां —

जवळ कुठेही झाड दिसेना

आडोसा टप्प्यात  कुठे ना

 भिजून पोरे आजारी पडतील

 हतबल आई  ,काही सुचेना —

 क्षणात तिने पंख फुगविले

 सर्व  पिलांना पुर्ण  झाकले

मान उंचावू नभा न्याहाळत 

 पाऊसधारांना स्वत:झेलले —

बाईमधल्या आईपणाला

जन्म  कोणता सीमा नसते

पिल्लांसाठी जगताना ती

फक्त  न फक्त आई असते —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हव्यास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ हव्यास…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सुखदुःखाची जात कळाया

जरा तरी वनवास हवा

 

जीवन अभिनव जगवायाला

अविरत चालू श्वास हवा

 

या देहाची भूक शमवण्या

अन्नाचा पण घास हवा

 

भाव मनाचा खुलवायाला

गंधाचा मधुमास हवा

 

मनमोराला नाच कराया

अवती भवती भास हवा

 

जीवनसाथी सामर्थ्याचा

निवडायाला खास हवा

 

ज्ञान संपदा अर्पण करण्या

सेवाभावी दास हवा

 

नियोजनाच्या अचूकतेवर

विजय खरा हमखास हवा

 

चंचलतेने अधिर व्हायला

नित्य नवा आभास हवा

 

कृष्ण राधिका जपता जपता

खेळायाला रास हवा

 

प्रसन्न तेने गीत गायला

गीताला अनुप्रास हवा

 

सामर्थ्याचा बहरायाला

जगण्याचा हव्यास हवा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 – माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 माझा पांडुरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

भक्ती वेडा पुंडलीक

भक्ती त्याची साधा भोळी..।

ऊभा राही चंद्रमौळी …।

विटेवरी…।।१।।

धन्य धन्य  सखूबाई ..।

देव बंदी तिच्या घरी..।

संत सखू वारी करी..।

पंढरीची…।।२।।

जनाईचे जाते ओढी.,।

नाम्यासाठी खीर खाई…।

गुरे राखी चोख्या पायी…? 

पांडुरंग …।।३।।

बादशाही दरबारी..।

महार झाला जगजेठी..।

हातामधे घेऊन काठी..।

दामासाठी..।।४।।

थोर भक्त अधिकार..।

देव बनला कुंभार।

देई मातीला आकार..।

गोरोबांच्या…।।५।।

भक्तांसाठी ना ना रंग..।

उधळीतो पांडुरंग ..।

रोज कीर्तनात दंग…।

 नामाचीया…।।६।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #183 ☆ मनी‌मानसी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 183 – विजय साहित्य ?

 मनी‌मानसी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(वृत्त : पृथ्वी ) २४ मात्रा प्रत्येक ओळींत

मनपटलावर काजळकांती

कुणी कोरली

तुझ्या घराची वाट वसंता दुःख

घालवी

नको अबोला,नकोच सलगी,

प्रेम राहुदे

तुझ्या घराचे दार मोकळे,चैत्र पालवी.

हवी कशाला, सुखे उशाला,रहा अंतरी

तना मनाची, शाल धुक्याची, सौख्यसुंदरी

सुर्यगंध नी शब्दसुतेची काव्यस्पंदने

सुमन शलाका,प्रेम प्रितीची,

स्नेह मंदिरी.

आधाराची, प्रेमळ छाया, जगण्याचे बळ

जीवननौका,तरंग केशर,

तरते अविचल

ऋणानुबंधी, जुळले धागे,

संचित ठेवा

मित्र मिळावा,तुझ्या सारखा,

पचवी वादळ.

एक मागणे,तुला ईश्वरा, रहा पाठिशी

सखा सोबती, अतूट नाते, असो गाठिशी

नाना‌रूपे,भेट जीवनी, तू वरचेवर

गोंदण झाले, तव स्नेहाचे,

मनी मानसी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मेघ-मल्हार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मेघ-मल्हार…” ☆ श्री आशिष मुळे ☆

टाकून केश-संभार उभ्या

निष्प्राण या वेली

उभे निःशब्द वृक्ष

अजुनच निस्तब्ध होऊनी

 

पसरली कोरडी धरती

मैलों न मैल भेगाळली

सरकली निवडुंगाच्याही

पाया खालची माती

 

मनात मेघ बळीराजाच्या

नयानांतुनी बरसती त्याच्या

चिंता-सर्प विहरती आता

छोट्याशा नंदनवनात त्याच्या

 

प्रेम पक्ष्यांच्या मावळती आशा

उन्हात या हरवले ते दिशा

लेखण्या संतप्त कवीयांच्या

फेकती आज नभात पाशा

 

आता वेळ लावू नकोस रे

ऋतुकाल विसरू नकोस रे

प्रताप नभांत करावया

फक्त विजाच तळपवू नकोस रे

 

सोडून सिंहासन तुझे

आता उतरून खाली ये

बिलगावया प्रियेला तुझ्या

आज आत्ता लगेच ये….

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगबेरंगी  शब्दाविष्कार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगबेरंगी  शब्दाविष्कार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

     रंगबेरंगी शब्दांनी

       कवणांची रंगावली

     हृदयाच्या या अंगणी

        कृष्णनाद केकावली.

     चंचल ऋतू चलन

         भक्तीप्रीय  शब्दांजली

     अक्षर जीवन रंग

           राधेसाद  कृष्णांजली.

     पर्णलेखणी मुरली

           भावचरणे अधीर

     लयताल  सुमधूर

            ज्ञानदर्शन  मंदिर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

अभंग वृत्त

इवलासा जिव

फिरे गावोगाव

आस-याचा ठाव

घेत असे…!

 

पावसाच्या आधी

बांधायला हवे

घरकुल नवे

पिल्लांसाठी..!

 

पावसात हवे

घर टिकायला

नको वहायला

घरदार..!

 

चिमणीच्या मनी

दाटले काहूर

आसवांचा पूर

लोटलेला..!

 

पडक्या घराचा

शोधला आडोसा

घेतला कानोसा

पावसाचा….!

 

बांधले घरटे

निर्जन घरात

सुखाची सोबत

होत असे..!

 

घरट्यात आता

रोज किलबिल

सारे आलबेल

चाललेले..!

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पक्षी का नक्षी… – कवी – श्रीपाद  देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  “ पक्षी की नक्षी ?” – कवी – श्रीपाद  देशपांडे ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

ऊन सावली सुंदर नक्षी 

फांदीवर तो बसला पक्षी 

छायाचित्र हे कुणी काढले 

वळून पाहतो निरखून पक्षी —

निसर्ग रचना किती मनोहर 

वसती येथे अगणित पक्षी 

सौंदर्याची जाण ना त्याला 

पंखावर ही दुर्मिळ नक्षी —-

बघणार्‍याने बघत रहावे 

कुणी अचानक दृश्य टिपावे 

तोच म्हणे मी याचा साक्षी 

सावली मधून ही बनते नक्षी —-

एकच फांदी एकच पक्षी 

निसर्ग असे जो त्यांचा साक्षी 

ऊन कोवळे कोवळी पाने 

त्यातून इतकी सुंदर नक्षी —-

वर्णन करण्या शब्द अपुरे 

इतका सुंदर दिसतो पक्षी 

सुंदरता हा निसर्ग देतो 

आपण व्हावे त्याचे साक्षी —

         (हा फोटो ज्याने कुणी काढला त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार) 

कवी – श्रीपाद देशपांडे 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print