मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवस ते… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवस ते… ☆ राधिका भांडारकर ☆

(वृत्त दासी – ६ ६ ६ ६)

धुंद पवन जागवतो आठवणी

प्रेमाच्या

दिन वेडे कितीतरी भेटी त्या

सौख्याच्या..

 

धडधडत्या उरातल्या दडलेल्या

प्रणयाची

लहर लहर जाणवते हळवेल्या

स्पर्शाची …

 

मिठीतल्या श्वासांचा गंध तुझा

विसरू का

मनोमनी तुला दिले माझेपण

नव्हते का…

 

फरकाने दुरावलो टाळाया

मतांतरे

दुखावलो खूप जरी त्यावेळी

तेच खरे, ,.

 

दूर दूर जाताना कातरली

सुनी मने

विरहाची खोल दरी भयकारी

ती रुदने..

 

कधी कधी खळखळत्या लाटांचा

स्वर कानी

त्यावेळी बुडलेला आठवतो

सूर्य मनी…

 

वाळूचे (वाळुतले) रचलेले घर होते

दोघांचे

नकळत ते कोसळले सूत्र तुटे

स्वप्नांचे..

 

थेंब थेंब पाझरतो थरथरतो देह

पुन्हा

कधीतरी दोघांचा जुळेल का स्नेह

पुन्हा..

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नीलमणी ती मनमोहकशी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नीलमणी ती मनमोहकशी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : सूर्यकांत (समुदितमदना)

(मात्रा :८+८+८+३=२७ यति ८ व १६ व्या मात्रेवर)

किती देखणी जांभुळलेली लतिका मज आवडे

नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||ध्रु||

*

सदाहरित ही वेल बहरते खरखर पाने किती

अखंड पाने फुले बहरती कधी न होते रिती 

गगनभेदण्या भरभर भरभर उंच चालली गडे

नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||||

*

हेमंत, शरद फुलव फुलवती वसंत झुलवी झुला

खार येउनी सरसर सरसर खाते साऱ्या फुला

मधमाशांना, चित्रपतंगा मधुघटची सापडे

नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||||

*

खोड जणू हे पेड घातले वेणीचे साजरे

राणीचे पुष्पहार त्यावर लटकतात हासरे 

फांदीवरती लखलखणारे नीलख भरले खडे 

नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||||

*

सुगंध त्यांचा मोहित करतो मन जाते ना तिथे

हरितांगावर नीलांबरसे पहा उतरले जिथे

समुदितमदना वृत्तामधले काव्य सुमंगल घडे 

नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – छकुला बालकृष्ण – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – छकुला बालकृष्ण – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

(वृत्त — पादाकुलक (८|८)

शांत झोपला कान्हा बाई 

डोक्याखाली++ हात घेतले

गोड गोजिऱ्या वदनावरती 

मुग्ध मनोहर हास्य दाटले ||

*

काळ्या कुरळ्या कुंतलातुनी 

मोरपीस हे साजिरे दिसे 

कान्हाच्या या बालरुपाचे 

प्रत्येकाला लागते पिसे ||

*

तलम रेशमी वसने लेई 

बाजूबंद अन् करी मनगटी 

शोभिवंत ते वदन साजिरे 

ललाटावरी केशरी वटी ||

*

गोकुळ सारे बने कृष्णमय 

वेड लावितो नटखट कान्हा 

बालकृष्ण जरि डोळ्यापुढती 

वाटे माझा छकुला तान्हा ||

*

कुंजवनीची सावळबाधा

मोहविते या अवघ्या जगता 

ओवाळुनिया कुरवंडी मी 

शरण जातसे त्या भगवंता ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२६ ☆ चंद्राची ती कोर… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२६ ?

☆ चंद्राची ती कोर ☆  प्रभा सोनवणे ☆

ती मस्त रात्र,

तिच्या आणि त्याच्या

मधूर मीलनाचा

 सुरेख सोहळा

चंद्र आणि चांदणीचा….

 

निसर्गाने निर्मिलेली

एक सुंदर गोष्ट,

शिव आणि सतीच्या,

मैथुना इतकीच पुनित!

 

क्षण एक पुरे…..

म्हणता म्हणता…

सरकणारी रात्र…

आणि खिडकीतून

दिसणारी चंद्राची ती कोर,

भाग्यच की थोर,

लाभलाय….

जन्मोजन्मीचा चितचोर!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अपेक्षा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ अपेक्षा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

मेघ होउन नाही

निदान वारा होउन ये.

अ‍ाकाशा खाली माझ्या

पाऊस घेउन ये.

पौर्णिमा होउन नाही

निदान काैमुदी होउन ये.

खिडकीतून घराच्या

चंद्र घेउन ये.

वृक्ष म्हणून नको

निदान पक्षी होउन ये.

चैत्रातल्या पालवीची

गाणी घेउन ये.

वास्तवात नकोच

निदान स्वप्न होउन ये.

रणरणत्या वाळवंटी

मृगजळ घेउन ये.

मीरा म्हणून नको

निदान राधा होउन ये.

सर्जनशील प्रेमाची

बासरी घेउन ये.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३६ ☆ भिडले लोचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३६ ?

☆ भिडले लोचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कसे अचानक जलधारांनी घिरले लोचन

आनंदाची वर्षा होता झरले लोचन

*

जे दिसले ते ह्या डोळ्यांना मृगजळ होते

फसवे पाणी फसवत होते फसले लोचन

*

चंद्र सूर्य अन् कुणीच साक्षी नव्हते तेव्हा

या प्रेमाचे केवळ साक्षी ठरले लोचन

*

मूक युद्ध हे दोघांमध्ये चालू होते

तेव्हा तेव्हा प्राणपणाने भिडले लोचन

*

दोघांचेही दुःख सारखे होते तरिही

तुझेच केवळ सहजपणाने रडले लोचन

*

डोळ्यांमधले सुख पाहू मी नाही शकलो

ओठांवरती ओठ ठेवता मिटले लोचन

*

शृंगाराची ती श्रीमंती उधळत गेली

असा अचानक धनाढ्य झालो हसले लोचन

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढ भेट… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द भाव... ☆ श्रीशैल चौगुले ☆

(प्रमाणिकाः अक्षरगण-समवृत्त.)

जळात दिसता कुणी

गळास मासळी फणा

मनात भावना तशी

भ्रमात प्रेयसी विना.

ऋतूत श्रावणी क्षणा

स्मृतीत धारही घना

शब्दात काव्य जे ऋणी

प्रतिभ साधना प्रणा.

 *

क्वचित भासते कवण

नभास ग्रासते नयन

हव्यास मिलनी पवन

शब्दास लाभते प्रणय.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं…

कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं..

कधीतरी तू किती सुरेख आहेस असं म्हणावं..

यासाठी किती किती आटापिटा करायचा..

 

एक कळलंय मला आताशा..

हे सगळं करणं व्यर्थ आहे..

या सगळ्यासाठी तुम्ही काहीही करायची

गरजच नसते..

 ज्यांचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे..

ते तुमचे लखलखीत अंतःकरण जाणतात..

तुम्हाला बदलायच्या भानगडीत ते पडत नाहीत.. ते तुम्हाला आहे तसे स्वीकारतात..

 

तुमच्या आत खोलखोल दडलेलं प्रेम त्यांना जाणवतं..

तुमचे चांगले गुण त्यांना समजतात..

त्यांच्या बरोबर राहून तुम्ही आनंदी बनता, खूश रहाता..

आजूबाजुची भौतिक परिस्थिती कशी आहे हे त्यांच्यासह असताना गौण ठरतं..

 

आपल्यातल्या काही त्रुटी असू द्याव्यात तशाच..

आपल्यावर मनाच्या नजरेने कोण प्रेम करतंय ते कळण्यासाठीच..

* * * *

लेखक- मधुकिशोर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मैत्रीची भूक ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मैत्रीची भूक ? श्री आशिष  बिवलकर ☆

भेट ही कृष्ण सुदाम्याची

मैत्रीचे प्रतिक अजोड 

सुदाम्याचे पोहे लागे हरीला 

मिष्ठान्नाहुन अति गोड

 

बालपणीच्या नटखट लीला

दोघांना आठवती 

आलिंगन देत एकमेकांचे 

डोळे पाणावती

 

द्वारकाधीश जरी असला

कृष्ण मुरलीमनोहर

सुदाम्यासाठी त्याचा सखा

उभा दिसे समोर

 

मन हलके होई सदैव

मित्र सहवासात

चंदनाची शीतलता, सुगंध

दरवळे मनामनात

 

यशात स्तुतीसुमने सर्वच 

जयजयकार करी

वाट चुकता खरा मित्रच

कठोर कान धरी

 

सुख दुःखात जिवलग

मित्रच देई साथ

जीवाला जीव लावी

सोडे न कधी हात 

 

जिवलग मित्र असता 

सोडून लांब दूर

आठवण येता त्याची

भरून येई उर

 

कृष्ण सुदामा असो

अथवा कोणी ही आपण

मैत्रीची भूक असावी 

आपोआप जाई दडपण

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

दमदार पावलांनी हळुवार रात आली

काळोख संपवाया या पेटवू मशाली

 

पेठेत आज इथल्या विकतात माणसे ही

करतात लोक काही चोरून ही दलाली

 

ज्याना घरात त्यांच्या काहीच वाव नाही

बदलून चेहऱ्याना फिरतात ते मवाली

 

आहेत मंद बुद्धी लाचार दास काही

म्हणतात मालकांची हळवी नवी कवाली

 

जिंकून जे आले ते झालेत आज राजे

गद्दार सर्व त्यांच्या जमलेत भोवताली

 

मागून रोज पाणी घायाळ लोक झाले

आल्या समोर त्यांच्या पण कोरड्या पखाली

 

देशात वैभवाच्या चालू किती वराती

जनतेस नाचण्याची संधी कुठे मिळाली

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares