मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट आपुली ती पहिली… + संपादकीय निवेदन – प्रा.सौ.सुमती पवार – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

प्रा.सौ.सुमती पवार

🪻 अभिनंदन 🪻

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुमती पवार यांच्या, मानस, इंद्रा आणि नक्षत्र या तीन कवितासंग्रहांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा.

आज त्यांची एक नवीन कविता “भेट आपुली ती पहिली…“,कवितेचा उत्सव‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

☆ भेट आपुली ती पहिली… ☆ प्रा.सौ.सुमती पवार

आठवते भेट मला भेट आपुली पहिली

लाजेने मी चूर चूर नजर नाही उचलली…

माती कोरत राहिले, शब्द नेती माझ्या ओठी

भेटीची ती ओढ अशी हुरहुर लागे पोटी..

*

न बोलताच बोलणे मौनातच सारे आले

समजत होते तुला मन माझे भांबावलेले…

मिष्किल नजर तुझी डोळ्यातही हसू होते

अस्फूट ते तुझे ओठ गोड किती होते नाते…

*

नाही पाहिले हो पूर्वी तरी ओढ का लागते

हृदयात काठोकाठ प्रेम का हो ओसांडते…

जीवाशिवाची का भेट देवादारी ठरवली

एका ह्याच नात्यासाठी मायबापे दुरावली..

*

वरचढ ठरे नाते अशी कोणती पुण्याई

जन्मदिला वाढवला त्यांना सोडूनच जाई…

जीव जीवात गुंततो नवे जीव येती घरा

अशी चाले घरोघरी मायबाप परंपरा…

*

ठेचा लागल्या हो किती पूर्णत्वाला नेती थेट

हात हातात घालून दूर जरी दिसे वाट

सुखदु:खे घरोघर मातीच्या चुली असती

पळसाला पाने तीन निभाऊन सारे नेती…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाईपण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ बाईपण ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

अंतरीतला अंधार विझवायला,

ती रोज पेटवते.

आशांचे असंख्य दीप,

नैराश्याच्या काठावरती.

उद्ध्वस्त झालेला किनारा सावरायला.

हारलेल्या क्षणांचे हिशेब,

ती लावत बसते.

एकांताच्या कोपर्यात आणि

जुळवते एक एक करून,

धागा नशिबाचा.

पुन्हा एकदा बाई नावाची,

गोफण गुंफायला.

ती प्रारब्ध म्हणून स्विकारत आहे

हे बाईपण निभावणं,

आई, आत्या, बहिण, सासू वगैरे वगैरे

यांच्या चालीरूढींची वारस म्हणून.

ती कधी ढासळते! , कोलमडते!

कधी हारते! कधी जिंकते!

पण सावरून नेते स्वतःला,

समाज-रूढींच्या प्रत्येक कसोटीतुन.

जन्म-जन्मांतरीचे,

स्त्री नावाचे अस्तित्व

टिकवायला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 *

विचारावाचून /

न पाविजे समाधान //१//

*

देह त्रिगुणांचा बांधा /

माझी नाही गुण सुधा //२//

*

देवाचिये चाडे/

देवा द्यावे जे जे घडेल //३//

*

तुका म्हणे होते /

बहु गोमटे उचिते //४//

*

  – संत तुकाराम.

तुक म्हणे

कोणत्याही गोष्टीचा सारसार विचार केल्याशिवाय मनाला समाधान वाटता कामा नये. आपण माझा माझा म्हणतो तो देह त्रिगुणांनी बनलेला आहे . पण त्या देहातले गुणावगुणही माझ्या मालकीचे नाहीत. म्हणून मनात देवाचे भान ठेवून जे काही घडते ते देवालाच अर्पण करावे. त्याच्यामुळे जे काही घडेल ते उचित, देखणे, आणि योग्यच घडेल .

मनात सतत विचार असायलाच हवेत त्याशिवाय मन स्वस्थ रहातच नाही. मला दिसणारा आणि मला माझा वाटणारा देह माझा नाही . त्याची रचना निराळीच आहे .तो पंचमहाभूते व त्रिगुणानी बनलेला असून त्यांच्याशीच कटीबद्ध आहे. मला ज्यांचा अभिमान वाटतो ते गुणही माझे नाहीत. दूस-या कुणीतरी ते गुण माझ्या देहात भरलेले आहेत. हे जेव्हा पक्के आपल्या मनात बसेल तेव्हा जे काही बरेवाईट घडेल ते सारे देह घडवणा-या परमेश्वरालाच अर्पण करावे असे वाटायला हवे. त्या मुळे आपल्याला जे फळ आणि बळ मिळेल ते महत्त्वाचे आणि यथायोग्यच असेल.

 © प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी रद्दी देता का रद्दी…? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कुणी रद्दी देता का रद्दी…?☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिक्षेकरी म्हनून जगलो, आता काम करून 

गावकरी होयाची आलीया संधी…

नशिबानं थट्टा केली,

मानुस म्हनून जगायची केली व्हती बंदी….

आता गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

पेपरापसनं ब्याग बनवतो, फिरू फिरून इकतो 

आता भीक न्हायी मागत शहरामंदी…

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

ल्येकरं रस्त्यावर टाकून सोडून गेली,

माऊली तुमी तरी नका करू गावबंदी

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

साखर होती तवा आई बाबा म्हनत मुंगळे चिकटले

साखर संपली आनी आमी पडलो उकिरड्यामंदी…

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

(“मध्यरात्रीचे सूर्य” हा भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेला प्रकल्प! इथे अंध, अपंग आणि वृद्ध आई-बाबा आणि आजी आजोबा रद्दीतील पेपर पासून बॅग बनवतात, आपण त्याची विक्री करत आहोत आणि त्यातून मिळणारा निधी हा प्रत्येक आई-बाबा आजी-आजोबांना दररोज पगार म्हणून सन्मानाने देत आहोत, माणूस म्हणून जगण्याची संधी देत आहोत) 

आपली रद्दी, रस्त्यावरील आई-बाबांना जगण्याची देणार आहे एक संधी…

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 259 – संसाराची गाथा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 259 – विजय साहित्य ?

☆ संसाराची गाथा…!

चुकला ना कोणा

संसाराचा मोह

कर्मफल डोह

भारवाही…! १

*

आजन्म सोबती

विश्वाचा पसारा

वाजवी नगारा

संसारीक….! २

*

बाल प्रौढ आणि

वार्धक्य विचार

सत्यता स्विकार

संसारात…! ३

*

भवपाश बंध

सुख दुःख भोग

लागू नये रोग

संसाराला…! ४

*

राजा आणि राणी

अपुरा संसार

वंशवेल भार

अभिप्रेत…! ५

*

जन्म आणि मृत्यू

यांतील प्रवास

दैव दुर्विलास

असो नये…! ६

*

संसार सुखाचा

मौज मस्ती छंद

आनंदाचा कंद

मेळवावा…! ७

*

अवती भवती

रागरंग खेळ

संसाराचा मेळ

लवलाही…! ८

*

संसार सांधतो

प्रपंचाची गोडी

भवबंध जोडी

विश्वासाने….! ९

*

संसार सदनी

जाणूनीया मर्म

नका काढू वर्म

आप्तेष्टांचे….! १०

*

संसाराची नाळ

गुंफलेले नाते

स्वभावाचे जाते

कर्म कांडी….! ११

*

संसार आरसा

पाही भूतकाळ

दावी तिन्ही काळ

आयुष्याचे…! १२

*

संसार म्हणजे

मानव्याचे रूप

जळतसे धूप

रात्रंदिन..! १३

*

गृहस्थाश्रमाचा

घेतलासे वसा

आशीर्वादी ठसा

लाभतसे…! १४

*

संसाराची गाथा

कविराज बोल

सांभाळला तोल

संसारात….! १५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवा होऊन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

🍃 दिवाहोऊन 🍃 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

🪔 दीप पूजा🕯️

सूर्य होताच येणार नाही

 काजव्यांची कास धरा

खूप अपेक्षा धरण्यापेक्षा

 दिवा होऊन जळत रहा

फुले मिळो अथवा काटे

 सत्याच्या वाटेने चालत रहा

शत्रूत्वाने होईल उद्ध्वस्त

 प्रेमाने जगण्याचा मार्ग बरा

फुले सुगंध देतात

 नद्या व पाऊस पाणी

वातावरण देते प्राणवायू

 पक्षी देतात गाणी

निसर्गाची कास धरा

 निर्व्याज जगणं फुलावत रहा

अतिहव्यासाने करतो माणूसच

 स्वतःचाच घात खरा

 स्वातंत्र्य आणि समतेसाठी

 लढले त्यांचे स्मरण करा

दीन-दुबळ्या लोकांसाठी

 जगणे आपुले तेवत ठेवा

आपण कुणी महामानव नाही

 आपल्या परीने झटत रहा

खूप अपेक्षा ठेवण्यापेक्षा

 दिवा होऊन जळत रहा

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “श्रावण आला…“☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण आला☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

अवखळ, अल्लड, पाऊस धारा,

प्रसन्नतेचा करती शिडकावा,

बटा मनोहर जलबिंदूंच्या,

खुळ्या, न आवरती, सावरता!

*

पदन्यास सृष्टीचा रंगला,

पागोळ्यांनी धरिला ठेका,

लय-तालाच्या समेवरी या,

इंद्रधनुची आगळी शोभा!

*

 व्रतवैकल्ये, सणवारांचा,

श्रावण, सात्विक, दरवळणारा,

 ऋतुगंधाने बावरलेला,

 वेड लावितो तना-मनाला!

*

 चैतन्याचा फुले पिसारा,

 नैराश्याला मुळी न थारा,

 आबालवृद्धां, हवाहवासा,

 श्रावण आला, श्रावण आला!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेहेमीच… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नेहेमीच ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

काळजात फुलू पाहे

घोस सुगंधी फुलांचे

पापण्यांच्या काठी तिष्ठे

जग अद्भूत स्वप्नांचे

*

धुंद गाण्याची लकेर

थबकून ओठांवर

हसू कधीचे तयार

पसरण्या गालावर

*

नेहमीच घोंघावते

अंतरीचे वावटळ

नेहमीच उठणारी

हृदयीची तीव्र कळ

*

असे आयुष्य उभे हे

जरी पाणवठ्यापाशी

नेहमीची घालमेल

नेहमीची कासावीसी

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रूबाब… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रूबाब… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

गेले घडून काही उरले अजून बाकी

जगणे मना प्रमाणे घडले जपून बाकी

*

संधी मिळेल तेव्हा मजबूत होत गेले

संधान माणसासी जपले म्हणून बाकी

*

खोटे लबाड कोणी करतात खूप धंदे

त्यांनी घबाड लुटले सगळे दडून बाकी

*

ज्यांनी मजेत केले भरपूर प्रेम खोटे

ते प्रेमवीर आता दमले रडून बाकी

*

अंदाज बांधलेले हुकले किती खुलासे

किस्से किती कळाले लोकांकडून बाकी

*

होत्या ब-याच त्यांनी पण जिंकल्या लढाया

शक्ती बरीच त्यांची गेली गळून बाकी

*

मोठे बनावयाला नकली रुबाब केला

प्रतिमाच आज त्यांची गेली मळून बाकी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अडीचकी… रचनाकार : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ अडीचकी… रचनाकार : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

  ☆

अडीच अक्षरांचा कृष्ण

अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा

अडीच अक्षरांची शक्ती!

*
अडीच अक्षरांची कान्ता

 अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची इच्छा

 अडीच अक्षरांचा योद्धा!

*
अडीच अक्षरांचे ध्यान

अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म

अडीच अक्षरांचाच धर्म!

*
अडीच अक्षरांत भाग्य

अडीच अक्षरांत व्यथा

अडीच अक्षरांतच व्यर्थ

बाकी सारे मिथ्या!

*
अडीच अक्षरांत संत 

अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र

अडीच अक्षरांचे यंत्र!

 *

अडीच अक्षरांची तुष्टी

अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्र्वास

अडीच अक्षरांतच प्राण!

*
अडीच अक्षरांचा मृत्यू

अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि

अडीच अक्षरांचाच अग्नि!

*
अडीच अक्षरांचा ध्वनी

अडीच रे मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य

अडीच अक्षरांचेच वित्त!

… जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे,

… नाही कुणा उमगले नाही कुणा समजले.

रचनाकार : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares