मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एक दु:खद सत्य… – कवी : एक अनामिक मास्तर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

विद्यालयाच्या जागेपायी

कुणीच इथं भांडलं नाही

अन् देवालयाच्या जागेसाठी

रक्त कमी पडलं नाही…

*

माझाच देव मोठा म्हणण्यात

रक्ताच्या नद्या वाहिल्या

अन् ज्ञानगंगा कोरडी पडत

शाळा इथे ओसाड पडल्या…

*

शाळा अजुनही तशीच आहे

पडक्या, तुटक्या भिंतींची

गरीब माझ्या देशामध्ये

उभी मंदिरं सोन्याची…

*

शाळे मधली दानपेटी

भरलेली कधी पाहिली नाही

अन् मंदिराची दानपेटी

रिकामी कधी राहिलीच नाही…

*

शाळेतला पालक मेळावा

पालकांवाचून राहून गेला

देवालयात चेंगराचेंगरीत

माणुस मात्र तुडवून मेला…

*

विद्येचं ज्ञान देऊन

गुरूजी गरीबच राहीला

अन् अंधभक्तांचं’ दान घेऊन

पुजारी धनवान गब्बर झाला…

*

खरंतर धर्म नावाचं पुस्तक 

शाळेत कधीच उघडत नाही

पण धर्माच्या नांवाशिवाय

देशात पानही हालत नाही…

 कवी : एक अनामिक मास्तर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७२ – आनंद पर्वणी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७२ – विजय साहित्य ?

☆ आनंद पर्वणी…!

विषय – चुलीवरचे जेवण

[वृत्त अनलज्वाला. – ८ ८ ८ – २४ मात्रा. (२४ ओळी.)]

शिजे चुलीवर ,रुचकर भोजन

धगधगणारे

स्वाद आगळा निसर्ग निर्मित,‌

रसरसणारे.१

 

सुकी लाकडे, शेण गोवऱ्या सालपटांनी

चुलीत शिजती,पदार्थ सारे, रटरटणारे.२

 

वायन देई, चुलीस जागा, दिसे निखारा

पचना हलके ,पदार्थ बनवी,  चमचमणारे.३

 

पारंपारिक, रित तयाची, चव जीभेवर

पोषक आणिक,पौष्टिक व्यंजन, लखलखणारे.४

 

भूक भागवी, जाळत काया,  कळते आई

व्यंजनास त्या, सहजी बनवी ,

खळखळणारे.५

 

आग आतली, जिला समजली,

रांधे माया

शेणसारवण, विस्तव हाती, घमघमणारे.६

 

ताजी भाकर,वरण आमटी, भाजी रुचकर

चुली सारखे,भोजन नाही, दरवळणारे.७

 

पाटा भानस, अंग चुलीचे, करते माया

पाककलेचे, तिच्या दाखले,

सळसळणारे.८

 

चुली सारखे,नाही कोणी, जीवनदायी

पोटी विस्तव,देई भोजन,

शांतवणारे.९

 

थाट वेगळा, घाट आगळा, या विश्वाचा

इथे माणसा, जीवन कळते,  तळमळणारे.१०

 

ओढ लावते, घराघराला,

जळता जळता

सतत चुलीवर, शिजते काही, लुभावणारे.११

 

स्नेह भोजना, एक पर्वणी, 

आनंदाची

कधी चुलीचे,जेवण जेवा,

सुखावणारे.१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाही त्याचा विचार कशाला? ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

? कवितेचा उत्सव ?

☆ नाही त्याचा विचार कशाला? ☆ श्री विश्वास दाते ☆

प्रेम मिळाले अपरंपार

मनात तरी रिपू वारंवार

 *

आनंद मिळाला भाराभार

दुःखाची तरी आठवण फार

 *

सडा सुखाचा जरी सभोवार

मनःस्तापाचा करी सतत विचार

 *

व्यक्ती असे भांडार गुणांचे

मोजमाप तरी का दोषांचे

 *

शुभ्र ढगांना कड काळीशार

मनी मात्र त्या कडेचीच धार

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अजून यौवनात मी…☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ अजून यौवनात मी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 वय नुसतीच संख्या

फक्त मोजणी वर्षांची

अजून यौवनात मी

मंत्र ताकद मनाची ||

*

बालपण मनामध्ये

जपुनिया ठेवले मी

अवखळ खोड्या मस्ती

मैत्रिणीत खेळते मी ||

*

मनी जाग्या अजूनही

तारुण्याच्या आठवणी

रूप तरुणपणीचे

मज खुणावे दर्पणी ||

*

छंद जपते मनाचे

येते उत्साहा भरते

साऱ्या आवडीच्या गोष्टी

मनापासूनी करते ||

*

मन पाखरू स्वच्छंदी

ताण वेदना विसरे

संसारात रमताना

त्याला अध्यात्म आवरे ||

*

सारा विसरून ताण

शब्दरंगात रंगते

ठेव बुद्धीला शाबूत

परमेशा विनविते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आसवं… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “आसवं…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

गिळालेली आसवं कुठे जातात?

काही न राहून पापण्यावर तरंगतात.

काही दीप होऊन तेवत राहतात.

*

काही पुस्तकांची पान होतात तर

काही आपल्याकडून पुसली जातात..

*

काही नामशेष होतात,

जगणं कवटाळण्यासाठी

 *

एकाचे दुःखाश्रू

दुसऱ्याचे आनंदाश्रू होतात तेव्हा 

अश्रू ही ओक्साबोक्शी रडतात.

संपत चाललेल्या मानवतेने कोरडे होतात.

*

अश्रू खूप प्रेमळ असतात.

त्यांना किंमत दिली नाही की 

ती अस्तित्वहीन होऊन

कायमचे नाहीसे होतात.

*

मग माणसंच माणसाला 

निष्ठूर म्हणतात.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सीता अशोक ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सीता अशोक ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 (भावगीत)

सीता शोक करताना याने नित्य पाहिलेला 

सीता अशोक नावाने अजरामर झालेला ||ध्रु||

*

कामदेवासाठी प्रिय त्याने भात्यात ठेवले

याच्या शांत छायेखाली बुद्ध गौतम जन्मले

आनंदाच्या झाडाने या आनंद सारा दिलेला 

सीता अशोक नावाने अजरामर झालेला ||1|| 

*
फुले केशरी पांढरी गंध सुगंधी देणारी

मधमाशा, किटकांना नित्य कवेत घेणारी 

स्त्रियांसाठी गुणकारी बहुगुण हा ल्यालेला

सीता अशोक नावाने अजरामर झालेला ||2||

*

श्वेत पिवळी नारंगी लाल छटेत फुलतो

रक्तअशोक देखणा पर्णसंभार झुलतो 

रक्तपल्लव देखणा हळदी कुंकू प्यालेला

सीता अशोक नावाने, अजरामर झालेला ||3|| 

*

फुले लाल पिवळीशी अंगभर याचा साज

अशोक वाटीकेमध्ये सीतेसवे नाव आज

कवितेत आज माझ्या नावारुपास आलेला

सीता अशोक नावाने अजरामर झालेला ||4||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९१ ☆ आयुष्य… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९१ ?

☆ आयुष्य… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

खूप सुंदरच म्हणायला हवं,

हे आयुष्य,

सुख – दुःख सावली सारखं,

येतं – जातं!

आपण येऊन पोहोचतो,

अशा ठिकाणी—

जिथे सारे रिपू निघून जातात!

आपण शुध्द होऊन,

फक्त सात्विकताच स्वीकारतो!

निर्मम होऊन,

चालत राहतो अखेर पर्यंत,

परतीच्या प्रवासात!!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काय आहे सुख?… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काय आहे सुख? ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त~ पादाकुलक)

सुख दुःखाच्या धाग्यांनी हे

वस्त्र माणसा विणले आहे

त्या वस्त्राते लेवुनिया तुज

आनंदाने जगणे आहे

*

जखडलास तू मायेमध्ये

सुख शोधाया वणवण फिरसी

वाटेमधल्या काट्यांमध्ये

जखमी होता उगाच रडसी

*

सुख सुख म्हणजे काय तरी रे

खेळ सुखाचा आहे मनाचा

घेत रहावा स्वाद सुखाने

कणाकणातिल सौंदर्याचा

*

वसंतातला बहार सुंदर

पर्णाविरहित झाले तरुवर

तरी भासतो शिशीर ऋतुही

देत गारवा किती मनोहर

*

मिसळावा जो रंग जळात

त्या रंगाचे  पाणी दिसते

पटलावरच्या रंगावरती

सुखदुःखाचे प्रमाण ठरते

*

सत्याला या जाण मानवा

दुःखाला मग नुरेल थारा

जीवनातल्या वाटेवरती

बरसतील हो शीतल गारा

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०६ ☆ नवी सत्ता नवे रस्ते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०६ ?

☆ नवी सत्ता नवे रस्ते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मनाच्या कोंडवाड्यातच अचानक भेटले घोडे

मिरवणुक काढुया म्हणता सुखाने नाचले घोडे

*

वरातीच्याच खर्चाची जराशी काळजी होती

स्वतःचा खर्च केला अन् खुशीने झिंगले घोडे

*

गुलालाची इथे उधळण अरे सूर्या कुणी केली

तुझ्या आधीच पृथ्वीवर तुझे बघ पोचले घोडे

*

रथाचे चाक वेगाने फिराया लागले आता

नवी सत्ता नवे रस्ते भराभर दौडले घोडे

*

तुकोबा ज्ञानराजाची निघाली पालखी आहे

सनातन पालखी सोबत किती बघ दंगले घोडे

*

जुगारी धनिक लोकांनी उडवली धूळ टापांची

बुकीने लाटले पैसे बिचारे धावले घोडे

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी ऋतू बोलतो..! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मी ऋतू बोलतो..! ☆ श्रीशैल चौगुले ☆

 बरसत येतो ओल्या अंगाने

देत सुखावा, घेत प्रेम गाणे.

*

पसरत जातो या नभांगणी

चंद्रासोबत मैत्री तारांगणी.

*

हळूच वारा फुंकित गारवा

सृष्टीभोवती पिंगून बरवा.

*

आता भावना टाकून गळीत

हृदयांतरी पालवी माळीत.

*

मग मनाने बहरुन येतो

आनंदाला सार्या कवेत घेतो.

*

कोकिळ साद माझ्यावर फिदा

प्रेम उधळीत नवखी अदा.

*

ऊन्हात पेरित येतो मी दाह

धरतीला झळात छाया चाह.

*

सहा युगांचे सोहळे जगणे

ऋतू सुंदर मी कवीचे जीणे.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares